श्री संत ज्ञानेश्वर - २ Sudhakar Katekar द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

श्री संत ज्ञानेश्वर - २



श्री संत ज्ञानेश्वर २

ज्ञानेश्वरांचे घराणे पैठणजवल असलेल्या आपे गावाच्या कुलकरण्यांचे,माध्यंदिन शाखेचे देशस्थ यजुर्वेदी ब्राम्हणाचे होते.त्यांचे गोत्र वत्स होते.हरिहरपंत कुलकर्णी हे या घराण्यातील ज्ञात असलेले पाहिले पुरुष होत.हरिहरपंतांस रामचंद्रपंत इ केशवपंत ही दोन मुले व मोहनाबाई हि मुलागी .केशवपंत लहानआणीच निवर्तले.हरिहर पंतानंतर,रामचंद्र पंत त्यांचे चिरंजीव गोपाळपंत त्यांचे चिरंजीव त्र्यंबकपंत त्र्यंबकपंत हे ज्ञानदेवांचे पणजोबा ते यादव राजाच्या नोकरीत होते बीड देशाचे अधिकारी म्हणून तुणी काही वर्षे काम पाहिले.पंत व हरिहर अंत असे त्यांचे दोन पुत्र होते.यादव रॅजा करिता लढत असतांना हरिहरपंत धारातीर्थी अडले.त्यामुळे त्र्यंबकपंतांस वैराग्य

उत्पन्न झाले.पुढे त्यांना गोरक्षनाथांचा अनुग्रह झाला.”.त्यांची समाधी आपेगावी आहे.त्र्यंबक पंतांचे ज्येष्ठ पुत्र गोविंदपंत हे ज्ञानदेवांचे आजोबा.त्यांच्या पत्नीचे नाव विराई

गोबिंदपंतांना गहिनीनाथांचा आनुग्रह झाला होता.,ज्ञानदेवांच्या घराण्यातील नाथपंथाची परंपरा त्र्यंबकपंतापासून सुरू झाली. गोविंदपंतांना विराईचे पोटी पुत्र प्रति झाली त्यांचे नाव विठ्ठलपंत हे ज्ञानदेवांचे पिता होय.

विठ्ठल पंतांच्या रूपाने कुलकर्णी घराण्यात मूर्तिमंत

अवतरले.गोविंदपंत व विराई या उभयतांनी वैराग्य वेद बेदान्ताचा गाढ अभ्यास केला होता.विठ्ठल पंतांचे प्रतिक म्ह्णजे त्यांच्या पुत्राचे विठ्ठल हे नाव.घरातील उच्च संस्कारात् त्यांच्या व्यक्तिमत्वाची घडण होत होती.अशा संस्कासरक्षम वातावरणात वाढत असताना त्यांचा व्रतबंध झाला.

या नंतर विठ्ठल पंतांनी वेड,वेदांचे,काव्य व्याकरण विविध शास्रांचे अध्यान केले.विठ्ठल पंतनी तीर्थ यात्रा करण्याचे ठरविले.वैराग्य,ज्ञान,भक्ती यांनी संपन्न झालेले त्यांचे व्यक्तिमत्व कोणावरही प्रभाव एडेल असे आकर्षक होते. माता पित्यांना वंदन करीन ते तीर्थ यात्रेला निघाले. द्वारका,सुदाम्याची पुरी,सोराती सोमनाथ हे तीर्थ उररकून ते परतले..अनुभवात भर पडून सात्विक

व्यक्तिमत्वाला तेज प्राप्त झाले.परत येतांना सप्तशृंग,भीमाशंकर,त्र्यंबक या तीर्थना भेटी देऊन देवोच्या दर्शनाची सांगता

केली आणि प्राचीन शिवभक्तीचे शिवोपासकाचे पीठ असलेल्या आळंदी या

क्षेत्री आले.तेथे इंद्रायणी काठी स्नान करून अश्वस्थ

वृक्षाखाली ध्यानस्थ बसले असता तेथील सिखोपंत कुलकर्णी या गृहस्थाच्या

हा तरुण तेजस्वी पुरुष भरला त्याचे ध्यान संपल्यानंतर त्याची विचारपूस

करून मोठ्या आदराने त्यांनी त्यांना आपल्या घरी नेले त्यांचे आदरातिथ्य

करून,नाव गाव, कोठून आला कोठे जाणार माता पिता कोण यांची

पृच्छा केली विठ्ठल पंतांनी आपली खरी हकीगत सांगितली

योगायोग असा की त्याच रात्री पंढरीनाथ सिंधोपंतांच्या स्वप्नात आले ह्या तुमच्या अतिथीस सालंकृत कन्यादान करा.प्रातःकाळी उठल्या नंतर त्यांनी विठ्ठल पंतांचे चरण वंदून स्वप्न वृत्तांत कथन केला आणि कन्येचे पाणिग्रहण करा म्हणून विनवले,विठ्ठल पंतांनी नम्रपणे उत्तर दिले की,भगवंताची मला तशी आज्ञा कोठे आहे ?हा प्रश्न त्यांच्या मनात सतत घोळत राहिला. कट्ट्यावर त्यांना झोप आली.त्यावेळी स्वप्नात भगवंत आले आणि त्यांना आज्ञा केली की,सिंधोपंतांच्या सुशील कन्येचे पाणिग्रहण कर.भक्ति-ज्ञान वैराग्याच्या साक्षात चार मूर्ती हिच्या उदरी आहेत!झोपेतून उठल्यावर विठ्ठलपंतांनी हे स्वप्न सिंधोपंतांना सांगितले आशा तर्हेने विठ्ठलपंत आणि सिंधोपंतांची मुलगी रुक्मिणी हे विवाहबद्ध झाले.विठ्ठलपंतांच्या प्रपंचास नुकतीच सुरुवात झाली असली तरी त्यांनी आपले जीवनाचे तारू सतत वैराग्याच्या दिशेने हकले.विवाहानंतर विठठलपंत आणि रुक्मिणीबाई पंढरपूरच्या यात्रेस गेले.पती पत्नीनी पांडुरंगाचे चरणी मस्तक ठेवले.विठठलपंत मूलत:विरक्त वृत्तीचे पारमार्थिक होते.प्रपंच करावा की तीर्थ यात्रा करीत देह झिजवावा हा विचार अजूनही त्यांच्या मनात घोळत होता.सिंधोपंतांनी त्यांचा निरोप घेतला व गावी परतले.विट्ठलपंत आपगावी न पसरतता तीर्थयात्रा करीत राहिले.श्रीशैल्य,व्यंकटाद्री,अरुणाचल,चिदंबर,मदुराई,कावेरी तीरावरील अनेक तीर्थे करून ते रामेश्वरला पोहचले.रामेश्वराच्या यात्रेचा संकल्प पुरा केला.तेथून गोकर्ण,हटकेश्वर,कोल्हापूर,माहुली तीर्थे करून आळंदीस आले.तेथून आपेगावास आले.आणि माता पित्याचे दर्शन घेतले.माता-पित्याने अनेक वर्षा नंतर मुलगा भेटल्याचा आणि तो गृहस्थी झाल्याचा परमानंद झाला.त्यांनी सिंधोपंतांचे स्वागत केले. सिंधोपंत नंतर आळंदीस परतले.विठ्ठल पंतांचे आई वडील खूपच वृद्ध झाले होते.काही काळानंतर स्वानंदपूर्ण स्थितीत वैकुंठवासी झाले.विठठल पंतांवर प्राणचाची सारी जबाबदारी पडली परंतु त्यांच्या वृत्तीतले वैराग्य दिवस दिवस वृद्धिंगत होत राहिले.त्यांच्या या उदासीन वृत्तीचे वर्तमान सिंधोणतांच्या कानी पडले.ते आपगावी आले आणि वितथालपंतांना आणि रुक्मिणीबाईला घेऊन आळंदीस आले.