रंग तिच्या प्रेमाचा - भाग १ chaitrali yamgar द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रंग तिच्या प्रेमाचा - भाग १

आज तिचं लग्न आहे ... नववधु प्रमाणे ती ही आज नटली होती...हिरवा चुडा...फुल मेकअप...आणि ती खुप रंगलेली हातावरची मेहंदी...असं म्हणतात जितका हातावरच्या मेहंदीचा रंग गेहरा तितक तिच्या नवर्या चं प्रेम जास्त....तिची ती रंगलेली मेहंदी पाहुन सर्वच मैत्रिणी तिला यावरून चिडवत होत्या....आणि ती लाजत होती...त्याच तिच्या रंगलेल्या प्रेमाच्या हाताने आपला चेहरा लपवत होती...मुलीला घेऊन या असं गुरूजी म्हणाले आणि तिला मांडवात घ्यायला तिचा भाऊ...व मामा आले...सर्व स्वप्ने आता सत्यात उतरणार...आपण प्रेम केलेल्या मुलाशीच आपलं लग्न होणार....तो आता त्या वर भुषणात कसा दिसत असेल याचा विचार करत करतच मंद हसत ती स्टेजवर गेली...तसं गुरूजींनी मध्ये कापड धरलं ...म़ंगलाष्टके सुरू झाल्या...तिची ती कावरी बावरी नजर पलीकडच्या त्या डोळ्यांना शोधत होती....तोच तिला मागे ते डोळे दिसले ज्याला पाहण्यासाठी ती केव्हा पासुन आसुसली होती....तिने तसे घाबरून समोरच्या डोळ्यांकडे पाहिले....आणि काही बोलणार तोच शुभमंगल सावधान गुरूजी म्हणाले आणि बाहेर फटाक्यांचा आवाज झाला.....मधला त्या दोघांतला पडदा दुर झाला....आणि गुरूजींनी गळ्यात हार घालायला सांगत होते.....तिने त्या मुलाच्या मागच्या डोळ्यांकडे पाहिले ...आणि डोळे शांत होते...अगदी...निर्विकार....आणि ज्याला हार घाला म्हणून गुरूजी सांगत होते ...त्या डोळ्यांत वेगळीच चमक होती....तिला समजेना चं क्षणभर कि तिच्याबरोबर काय होतंय...पण हातातील मेहंदीचा रंग आता काळा पडला होता..." बाबा का पण ...?? माझं देवाश्री वर खुप प्रेम आहे...आपण असं करून त्यांना फसवत नाही आहोत काय...??" देवांग आपल्या बाबांना समजावत होता..

" हे बघ ..देवा ...तुला अजुन हिच्या पेक्षा चांगल्या मुली भेटतील...आणि मी माझी सुन म्हणुन देवाश्री ला पसंत केली आहेच कि...त्यांच्यावर मी उपकारच करत आहे..." मिस्टर साने, महाराष्ट्राचे उद्योगमंत्री बोलले...

" पण बाबा...मला दुसरी तिसरी नको ...मला ती देवाश्री चं मुलगी बायको म्हणून हवी आहे..." तो हट्ट करत म्हणाला...

" हे बघ उगाच हट्ट करू नको...विहान साठी मला हिच्या पेक्षा चांगली मुलगी मिळणार नाही.... त्यामुळे मी विहान चं लग्न देवाश्री शी चं लावणार आहे...मग तुला मान्य नसेल तरी....आणि जर तुला विरोध चं करायचा असेल तर दार उघडा आहे..." मिटर साने कडक शब्दांत त्याची कान उघाडणी करतात...तसं तो चिडून आपल्या खोलीत जातो...


मिस्टर साने यांना विहान व देवांग ही दोन मुलं...विहान मोठा तर देवांग लहान...दोघांत दोनच वर्षांचं अंतर तसं...एम सी ए च्या शेवटच्या वर्षाला असताना देवांग कोल्हापूर च्या शिवाजी युनिव्हर्सिटी मध्ये शिक्षण घेत होता.....तेव्हा महाविद्यालयात नुकतीच जॉईन झालेली देवाश्री त्याला दिसली आणि लव्ह ॲट फर्स्ट साईट त्याला झालं...

मग तिची बाहेरून चौकशी झाली तेव्हा ती ही याच कॉलेज ला एम सी ए च्या फर्स्ट यिअरला कळाल ...आणि गाडी खुश झाली....कारण ती ज्युनिअर होती...दिसायला सावळी असली तरी नाकी डोळी नीटस...गुलाबी ओठ...हेअर खांद्यापर्यंत रूळलेले ...कायम डोळ्यांत काजळ ...बोलायला लागली कि हिरे मोती पडतील अशी स्वच्छ व सुंदर मराठी भाषा...टोण वरून तरी पुणेकर वाटत होती...मग काय...गाडी एकदम चेन्नई एक्सप्रेस सारखी धावली आणि तिच्यापुढे मैत्रीचा हात पुढे केला.... बॉलिवूडचा प्रभाव...प्रेमाची सुरुवात मैत्रीपासुन होते..म्हणून मैत्री ...

त्याला नाही म्हणणं आतापर्यंत तरी कुणाची हिम्मत नव्हती ...कारण ही तसं नव्हतंच...कारण त्यात काहीच अशी गोष्ट नव्हती कि नाही बोलावं... उद्योग मंत्री चा मुलगा असला तरी डोक्यात हवा नव्हती गेली श्रीमंतांची ...मैत्रिणी भरपुर होत्या पण तेवढ्यापुरत्याच....ग्रुपमध्ये चं फक्त बोलणं त्यांच्याशी...अशी खास कोणाशी मैत्री वाढवली नव्हती..मुद्दाम तर बिलकुल नाही...तसेच दिसायला ही अगदी चॉकलेट हिरो...सहा फुट उंची..गोरा रंग... तरतरीत नाक... त्यामुळे अशा सभ्य व सुसंस्कृत असलेल्या मुलाशी मैत्री कोण नाही म्हणणार...??पण पहिल्याच भेटीत त्याचा हात तिने नाकारला ...दोस्तीला चं काय साधं बोलायला ही नको म्हटली ती...त्याला याच आश्चर्य वाटलं कि असं का...पण तिने त्याला कधीच सांगायचा प्रयत्न केला नाही...कायम ती दुरदुर त्याच्यापासून पळायची ...आणि मानव जात चं अशी आहे कि एखादी गोष्ट नाही मिळत म्हटलं कि त्यामागेच जास्त लागणार....तसंच त्याच्या बाबत झालं...आणि तिला तो परत परत मैत्रीसाठी विचारत राहिला...नकार कायम ठरलेला तरी...क्रमशः