रंग तिच्या प्रेमाचा - भाग ३ chaitrali yamgar द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रंग तिच्या प्रेमाचा - भाग ३

समजत होतं आपण जे तिच्यासाठी करतोय ....ते चुकीचे नाही तर....साफ गुन्हा आहे...पण नाईलाज होता त्याचा...बापाच्या प्रोपर्टीसाठी नाही...तर बापाच्या प्रेमासाठी...बापाने आज पहिल्यांदाच काहीतरी मागितलं होतं...आणि ते ही स्वतः च्या फायद्यासाठी नाही...तर एका बापाने आपल्या मोठ्या मुलाच्या सुखासाठी...छोट्या मुलाकडे मागितलेली भीक होती ती...मनात नसुनही त्याने बापाच्या खुशीसाठी हे आव्हान स्विकारले ...आणि महिनाभर तिला भेटायला लागला...तिची आवड निवड माहित असुनही परत एकदा तिच्याकडून जाणुन घ्यायला लागला ... चांदण्या रात्रीत ...तिचा तो उजाळलेला चेहरा पहायला मिळण ...त्याचंही सौभाग्य चं म्हणायचं ...जे काम गेल्या वर्षभरात झालं नव्हतं... आज त्याला बापाने ईच्छेपोटी सुख मिळत होतं...नव्याने ती त्याला कळत होती...ती ही आपल्यात गुंतत चालली आहे हे त्याला जाणवत होतं‌..आणि परत आपली चुक लक्षात येतं होती...मग कित्येक वेळा मनात तिला घेऊन पळून जायचा ही निर्णय होत होता...पण परत आपल्या त्या लाचार बापाचा चेहरा आठवुन....मनातले विचार क्षणात झटकायचा....ठरवलं मग त्याने...या महिनाभराच्या भेटीत तिला आपलं खुप प्रेम द्यायचं ...ईतकं कि तिला कधी परत याची कमतरता जाणवणारच नाही...आणि तिच्या प्रेमासाठी क्षणाक्षणासाठी मरणारा तो ....आपलं भरभरून प्रेम तिला द्यायला लागला..आणि ती ही वेडी नुसतंच प्रेम न घेता ...त्यावर रिटर्न गिफ्ट म्हणून तितकंच भरभरून प्रेम द्यायला शिकली त्याच्यावर..


लग्नाच्या आदल्या रात्री ...मात्र त्याला असह्य होत होतं...प्रेम आहे आपल्यावर...संसार हा काही भातुकलीचा खेळ आहे का ...आज एका बरोबर खेळायचा ...आणि उद्या दुसर्याच बरोबर.. तिला दुसर्याच व्यक्तीची उष्टी हळद लागताना पाहुन तर तो कोलमडून गेला होता...आणि मनावर परत प्रेम त्यांच जिकंल ...तसंच तो खुप दारू पिऊन बापाच्या खोलीत गेला...बापाला बोलयाला बळ हवौ होतं ना अंगात.. त्यामुळे दारूच्या थेंबाला ही न स्पर्श करणारा तो...आज आपल्या प्रेमासाठी ...ते ही करायला गेला....आणि बापासमोर खरं काय ते सांगुन टाकलं...आणि मी चं लग्न करणार अशी धमकी वजा त्याने आपले मत मांडले....जे बापाने हाणुन पाडले...कान उघडणी करून कि घराबाहेर पड...तो पडला ही असता...पण आपल्या मोठ्या भावाकडे पाहिले...जो नुकताच खोलीत आला होता...आणि ह्यांच बोलणं टुकुर टुकूर पाहत होता...आपल्या त्या अनिमिष डोळ्यांनी...आणि परत एकदा त्याच प्रेम हारल.....त्याने माघार घेतली....आणि आज आपल्याच ....प्रेयसी व आपल्याच सख्ख्या भावाच्या ‌.‌....लग्नाला तो हजर झाला...मनात कितीही दुःख असलं तरी.... कदाचित बाबा बोलतो तसं....हीच आपल्या भावाचं दुःख कमी करेल...आपल्या भावाला कायम सुखात ठेवेन....हे पटल्याने....



" ही तर शुद्ध फसवणूक आहे.." तिने त्या मुलाच्या मुंडावळ्या काढून त्याच्याकडे रडत रडतच पाहून ती म्हणाली...तिचे बाबा, आई...पाहुणे ही या सगळ्या प्रकाराने अचंबित झाले होते....मिस्टर सानेंनी गुन्हा केलाय हे त्यांना कळत होतं...कारण दाखवताना एक मुलगा आणि लग्नाच्या बोहल्यावर दुसराच....आणि ते ही असा...मनोरूग्ण ...हो...विहान ...तिचा आताच झालेला नवरा...वेडसर होता...वेडसर म्हणण्यापेक्षा...त्याचं शरिर वाढत गेलं होतं...पण बुद्धी दहा वर्षांच्या मुलाची ...असावी तशीच होती....मिस्टर सानेंनी हात जोडले...आणि आपली व्यथा मांडली..हिला त्यांनी एकदा रस्त्यावर....भांडताना पाहिलं होतं....एका वेड्याला सगळे दगडी मारत होते ...तो जावा म्हणून ...पण तेव्हा तिने त्याला वाचवलं होत...व त्या लोकांची खरडपट्टी काढली होती...हे बोलुन कि तो वेडसर असला तरी एक माणुस आहे....त्याला प्रेम भेटले कि तो ही शहाणा होईलच कि....माणसाने माणसाकडे प्रेमाने बघावं ...असं बरंच काही ती बोलली होती...आणि तेव्हाच सिग्नल उभी असलेल्या गाडीतुन ...मिस्टर सानेंना हीच आपल्या विहान ला बरं करू शकते असं वाटून गेलं...पण सुन ती सहज अशी बनेल याची श्वाश्वती नसल्याने त्यांनी हा प्लॅन केला...देवांग ला समोर केलं...आणि तिचा व तिच्या लोकांचा होकार मिळवला...हो माहित आहे असं मी वागुन तुमच्याशी चुक च केली आहे...पण वचन देतो...या पोरीला माझ्या घरात कसलीच कमतरता भासणार नाही...तिला हवं ते हवं तेव्हा मिळेल...तिच्या पायात सुख लोळण घेत असेल...


क्रमशः