रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 16 MB (Official) द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 16

अध्याय 16

परशुरामांचा प्रताप :

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

सीता स्वयंवरासी जाण । शिवचापासी लावला गुण ।
जा जनकें करावया पण । काय कारण तें ऐका ॥ १ ॥

शिवधनुष्याचा पण करण्याचे कारण :

पूर्वी परशुराम कैलासीं । धनुर्विद्या शिवापाशीं ।
परशुविद्या गणेशापाशीं । लघुलाघवेंशीं शिकला ॥ २ ॥
परशुराम कैलासीं । राहिला असे शिवसेवेसी ।
तत्परता अहर्निशीं । श्रद्धा गणेशीं समसाम्य ॥ ३ ॥
तंव आक्रंदे आत्यंतिक । ऐकिली रेणुकेची महाहाक ।
परशुरामें एकाएक । ऐकोनि साशंक तो झाला ॥ ४ ॥
येवोनि सांगे शिवापाशीं । रेणुका बोभात आक्रंदेशीं ।
आज्ञा पुसतों स्वामींसी । मज मातेपासीं जावया ॥ ५ ॥

रेणुकेची कथा :

ऐका रेणुकापुराण । जें कां अतिपावन ।
दोष नासती दारुण । कथा श्रवण करितांची ॥ ६ ॥
ऐकतांचि तें वचन । रुद्र जाला कोपायमान ।
जगीं अधर्म वाढला पूर्ण । दानवीं ब्राह्मण वधिला दर्पें ॥ ७ ॥
शिव म्हणे जामदग्न्या । मी तुज प्रसन्न सर्वज्ञा ।
वेगीं दुष्ट वधीं प्रतिज्ञा । विद्यासंपन्ना परशुरामा ॥ ८ ॥
त्यासी देवोनि निजत्र्यंबक । निर्दाळी म्हण ब्रह्मघातक ।
क्षत्रिय श्रीमदें उन्मादक । तेही एकेंएक निर्दाळीं ॥ ९ ॥
या त्र्यंबकाच्या बाणीं । निःक्षत्रिय करीं धरणीं ।
गणेशें परशु देवोनी । परशुपाणि पाठविला ॥ १० ॥
तैंपासुनी परशुरामाभिधान । वरद गणेशाचें पूर्ण ।
ज्या कार्या प्रवर्तसी जाण । तें निर्विघ्न करीन मी ॥ ११ ॥
वेगीं येतां परशुरामासी । मार्गी भेटले आश्रमवासी ।
तिहीं सांगितलें त्यांपासीं । अति कदनेंसीं पितृघात ॥ १२ ॥
परशुरामें केला प्रश्न । पितृघाता काय कारण ।
त्या विग्रहाचें मूळ कथन । आश्रमींचे जन सांगती ॥ १३ ॥

जमदग्नींच्या वधाचे कारण :

सहस्रार्जुन वनक्रीडेसी । आला जमदग्निआश्रमासी ।
रेणुका प्रार्थोनिया पतीसी । राजा कटकेंसीं निमंत्रिला ॥ १४ ॥
ऋषि म्हणे राजासी केवळ । आणोनि घालू फळमूळ ।
जी म्हणे आश्रमधर्म विकळ । अन्नें सकळ तृप्त कीजे ॥ १५ ॥
आश्रमा आले ते ते अतीत । तृप्त करावे समस्त ।
तुम्हीं सामर्थ्यें अति समर्थ । विकळ परमार्थ न करावा ॥ १६ ॥
याची मात्र कामधेनु । आणोनि द्यावें दिव्यान्न ।
राजा विभूति श्रीभगवान । यथोक्त पूजन करावें त्याचें ॥ १७ ॥

रेणुकेच्या सांगण्यावरून सहस्रार्जुनाला मेजवानी :

निजपत्नीयचें धर्मवचन । ऐकोनि ऋषि सुखायमान ।
मग कामधेनू लागून । विजनीं अनुष्थान आरंभिलें ॥ १८ ॥
रायें पाहों पाथविलें दूतांसी । अन्नसिद्धि केलीं ऋषीं ।
तंव वैश्वानर नाहीं दुलीसीं । पाकाची कायसी कथावार्ता ॥ १९ ॥
त्या ऋषींची ऋषिकान्ता । वदान्य अति उदारता ।
नवल तिची अगाधता । चित्तीं चिंता असेना ॥ २० ॥
ते ऋषिपत्नी राजबाळा । विचित्र घालिते रंगमाळा ।
राजपूतेचा सोहळा । अति आगळा उत्साह ॥ २१ ॥
राजदूत गेले परतोन । तंव ऋषीनें आणिली कामधेन् ।
तेणें रेणुकेचे हातीं देवोन । राजभोजन संपादी ॥ २२ ॥
मज न सोसे खटपट । राजोपचार अति चोखट ।
जें जें मागसी वरिष्ठ । तें तें यथेष्ट देईल धेनु ॥ २३ ॥
धेनु प्रसवली कृपासंतुष्टीं । पहिले एक ताट देखिलें दृष्टीं ।
त्याची ताटाच्या पोटीं ताटें कोट्यानुकोटी प्रसवलीं ॥ २४ ॥
ऋषीनें सांडिला निजकोप । त्यासी नाहीं संकल्प विकल्प ।
लौकिक क्रिया खटाटोप । नाहीं साटोप तयासी ॥ २५ ॥
राजभोजन कर्तव्यता । घातलें रेणुकेच्या माथां ।
पुढे काय वर्तली कथा । सावधानता अवधारीं ॥ २६ ॥

जमदग्नीने क्रोधत्याग का केला ? :

कोणा कार्यार्थ जमदग्नीने । कोप सांडिला आपण ।
ऐसा श्रोतीं केला प्रश्न । तेही कथन अवधारा ॥ २७ ॥
ब्रह्मांडखंडपुराणीं । वदली मार्कंडेयाची वाणी ।
तेचि कथा निरूपणीं । साधुसज्जनीं परिसावी ॥२८ ॥
वध करावया सहस्रार्जुनासी । इंद्र आला जमदग्नीपासीं ।
धरोनियां दीन वेषासी । अति तृष्णेसीं तृषित ॥ २९ ॥
पाहोनियां विहित काळ । साधून अतिथीची वेळ ।
मागों आला जी तात्काळ । केवळ जळ ऋषीपाशीं ॥ ३० ॥
तोंड कोरडें पैं जालें । दोनी ओंथ पैं वाळून गेले ।
कांही न बोलवे बोलें । कराग्रीं दाविलें उदकासी ॥ ३१ ॥

रेणुकेची संभ्रमावस्था :

ऋषी म्हणे रेणुकेसी । शीघ्र उदक देईं अतिथीसी ।
येरी जाणोनि कपटवेषासी । निजमानसीं शंकली ॥ ३२ ॥
मज यासी देतां उदक । हा करील कडु विख ।
ऋषि कोपेल आत्यंतिक । जीवीं धुकधुक लागली ॥ ३३ ॥
अतिथी छळील उदक देतां । जमदग्नि कोपेल न देतां ।
थोर ओढवली संकोचता । कांही कर्तव्यता स्मरेना ॥ ३४ ॥
जमदग्नि अति समर्थ सर्वज्ञ । जाणे आश्रमधर्म संरक्शण ।
हातींचे अग्रोदकजीवन । करवी प्राशन अतिथीसी ॥ ३५ ॥
जमदग्नीनें आपण । करविलें अतिथीसी उदकपान ।
रेणुका म्हणे मी छळिलें पूर्ण । विघ्न दार्य्ण मज आलें ॥ ३६ ॥
कोपें ऋषि म्हणे रेणुकेसी । तूं केवळ कृत्या कर्कशी ।
उदक न देवोनि अतिथीसी । पतिवचनासी पराङ्‌मुख ॥ ३७ ॥
चोर चांडाळ कपटवेषी । आश्रमा आला समयासी ।
जें जें मागेल तें तें त्यासी । अवश्यतेसीं अर्पावें ॥ ३८ ॥
केवळ निमोल उदक । नेदून झालीस विमुख ।
जळों तुझें काळें मुख । तुझें सुख मज नाहीं ॥ ३९ ॥
गृहिणीस्तव गृहस्थाश्रम । ते जैं पाळीना आश्रमधर्म ।
तिचा मग कोण संभ्रम । अति दुर्गम कोपला ॥ ४० ॥

रेणुकेचा वध करण्याची जमदग्नीची आपल्य मुलांना आज्ञा :

कोप नावरे ऋषीसी । पाचारोनियां पुत्रांसी ।
वेगीं तुम्ही वधा इसी । ममाज्ञेसी अति शीघ्र ॥ ४१ ॥
पुत्र म्हणती स्वामिनाथा । जैसा पिता तैसीच माता ।
आम्हांसी वध्य नव्हे सर्वथा । हें तत्वतां विचारिजे ॥ ४२ ॥
पुत्र न मानिती पित्याचें वचन । पांचही तुम्ही समसमान ।
आतांचि जावोनि प्राण । प्रेतत्व पूर्ण पावाल ॥ ४३ ॥
ऐसें ऐकतां ऋषिभाषण । तत्काळ ते पांचही जण ।
प्रेतत्व पावले संपूर्ण । ऋषिभयें प्राण पळाले ॥ ४४ ॥
प्राण म्हणती आयुष्य असतां । आम्हांसी जावों नये म्हणोनि राहतां ।
तैं ऋषिशाप बैसेल माथां । तेणें दाकें तत्वतां पळाले प्राण ॥ ४५ ॥
ऋषिभयें पळालें प्राण । प्रेतत्व पावले पांचही जण ।
तरी ऋषीचा कोप दारूण । क्षोभलेपण सांडीना ॥ ४६ ॥
तेचि समयीं परशुधर । सुमनें घेवोनि आला सत्वर ।
ऋषीस केला नमस्कार । त्यासही दुर्धर आज्ञापी ॥ ४७ ॥
करीं रेणुकेच्या घाता । येरें तत्काळ छेदिला माथा ।
तेणें आल्हाद ऋषीचिया चित्ता । प्रसन्नता संतुष्ट ॥ ४८ ॥

पित्राज्ञ पालनामुळे परशुरामास वरदान :

ऋषि गर्जे प्रसन्नता । मागसी तें देईन आतां ।
रामें चरणीं ठेविला माथा । विनंती स्वामिनाथा अवधारीं ॥ ४९ ॥
माझी उठवावी हे माता । बंधूंची दवडावी निजप्रेतता ।
हेंचि मागतो गुरुनाथा । दिल्हें तत्वतां ऋषि म्हणे ॥५० ॥
तुझा लागतांचि हात । बंधू प्रेतत्वा होती निर्मुक्त ।
चेतनासुखें सावचित्त । यथास्थित वर्तती ॥ ५१ ॥
रेणुकेचीं दुखंडें । तुझेनि हातें अखंडें ।
शांतिसुखाचेनि सुरवाडें । वाडेंकोडें उठतील ॥ ५२ ॥
म्यां छेदिली निजमाता । हें नाठवो मातेच्या निजचित्ता ।
ऐसी द्यावी मज वरदाता । चरनीं माथा ठेविला ॥ ५३ ॥
तुझें नाठवे छेदिलेपण । अंगीं घायाचे न दिसती वण ।
निद्रपासून उठिली आपण । तैसे लक्शण पावेल ॥ ५४ ॥
ऐकोनि पित्याचें वरद भाषण । पुधती पित्याचे वंदोनि चरण ।
करावया मातेचें उद्धरण । हर्षे संपूर्ण उठिला ॥ ५५ ॥
रेणुकेच्या छेदाच्या अंतीं । तिसी भेटों आली आदिशक्ती ।
तूं जन्मलीस ज्या कार्यार्थीं । कां तदर्थीं उदास ॥ ५६ ॥
तुवां वधावा सहस्रार्जुन । हें तूं गेलीस विसरून ।
त्याची द्यावया आठवण । इंद्रें आपण तुज छळिलें ॥ ५७ ॥
रेणुका म्हणे कार्यसिद्धी । साधावी लागेल गुह्यबुद्धी ।
कळों नेदावें जनापवादीं । विरोधसंधि लक्षेना ॥ ५८ ॥
कळों न द्यावें पैं जनीं । कळों नद्यावें जमदग्नी ।
ऐसें मज लक्षितां अनुदिनीं । विरोधकरणी लाधेना ॥ ५९ ॥
तंव बोलिली आदिशक्ती । परशुरामाची वरदोक्ती ।
तूं पावसी देहप्राप्ती । येचि कार्यार्था साधावया ॥ ६० ॥
रेणिका बोलली वचनोक्ती । तूंचि कार्य तूंचि कर्ती ।
मज सांगसी जैसी युक्ती । त्या त्या गती साधीन ॥ ६१ ॥
जगदंबा साम्गे रेणुकेसी । सहस्रार्जुन पारधीसी ।
येईल तुझ्या आश्रमासी । तै कार्यसिद्ध्यर्थीं पूजावा ॥ ६२ ॥
सकळ सैन्येंसीं नृपती । निमंत्रवीं ऋषिजातीं ।
कामधेनु आणावी तदर्थीं । ऋषिप्रती सांगोनी ॥ ६३ ॥
दुर्लभ उपचार त्रिजगतीं । तें ते मागून धेनूप्रती ।
साधावया निजकार्यार्थीं । आदरें नृपति पूजावा ॥ ६४ ॥
करितां चोन्ही शक्ती भाषण । तंव परशुरामें आपण ।
लाहोनि पित्याचें वरदान । केलें सावधान मातेसी ॥ ६५ ॥
परशुरामें लावितां हात । बंधू जाले सावचित्त ।
ते नेणती मातेचा घात । तिसीही निजघात नाठवे ॥ ६६ ॥
पुत्र सोडविले शापापासून । रेणुकेसी आल्हाद पूर्ण ।
परशुरामातें आलिंगून । वदे वरदान रणविजयीं ॥ ६७ ॥
रामें ऐकतां ते वरद गोष्टी । दृढ बांधिली शकुनगांठी ।
पुढील कथेची परिपाटी । सावध दृष्टीं अवधारा ॥ ६८ ॥

जमदग्नीकडून क्रोधनिंदा :

स्त्रीपुत्र जालिया सावधान । जमदग्नि जाला अति उद्विग्न ।
केवढें क्रोधाचें विंदान । अधःपतनदायक ॥ ६९ ॥
स्त्रीपुत्रांचा अक्रिता घात । मज होतें अधःपतन येथे ।
धन्य धन्य परशुराम सुत । अति अनर्थ चुकविला ॥ ७० ॥
माझें घेवोनि वरदान । माझें चुकविले अधःपतन ।
क्रोधें ठकविलें मज संपूर्ण । त्याचें निर्दळण मी करीन ॥ ७१ ॥
क्रोध म्हणिज केवळ मांग । तो मजमाजि वसे सांग ।
जळो माझा योग याग । क्रोध डाग अपवित्र ॥ ७२ ॥
क्रोधाएवढा महावैरी । बैसला असतां जिव्हारीं ।
जो ज्ञानाची मानी थोरी । तो संसारी महामूर्ख ॥ ७३ ॥
अल्प अन्याय देखिल्यावरी । त्यावरी जो तो कोप करी ।
क्रोधाएवढा अपकारी । क्रोध क्रोधावरी न करिती ॥ ७४ ॥
क्रोध अपराधाची थोरी । अतर्क्य रिघोनि जिव्हारीं ।
चहूं पुरुषार्थांची करी बोहरी । नानापरी विभांडी ॥ ७५ ॥
क्रोध आलिया कडकडाडी । काम पळे उठा‍उठीं ।
धर्म जाय बारा वाटीं । क्रोधें तुटी अर्थस्वार्था ॥ ७६ ॥
क्रोध रिघोनि अंतरीं । मुख्य ,मोक्षा जीवें मारी ।
ऐसा क्रोध पैं निजवैरी । तो मी संहारीन पैं सत्य ॥ ७७ ॥
ऐसें बोलोनि ऋषि आपण । दृढ घालोनो आसन ।
आवरोनि प्राणापान । क्रोधदहन करूं पाहे ॥ ७८ ॥

क्रोधाची दर्पोक्ती :

क्रोध म्हणे ऋषि विचारीं । मह निघाल्या देहाबाहेरी ।
वृथा जाईल तुझी थोरी । तृणावारीं न पुसती ॥ ७९ ॥
ऐक माझे वस्तीची थोरी । म्यां प्रवेशोनि नृसिंहशरीरीं ।
हिरण्यकशिपूयेवढा वैरी । नखाग्रीं निवटला ॥ ८० ॥
म्यां शिवरूपीं भालोनि ठाणें । त्रिपुर निवटला एक्या बाणें ।
माझेनि योगें त्रिनयनें । जीवें मारणें जालंधर ॥ ८१ ॥
म्यां रिघोनि विष्णुदेहीं । मधुकैटभ मारिले ठायीं ।
म्यां संचरोनि कुमाराच्या देहीं । मर्दिला पाहीं लवणासुर॥ ८२ ॥
ऐसें माझेनि योगें जाण । देवांहीं केलें दुष्टनिर्दळण ।
विचारीं ऋषिराया तूं आपण । मजविण तूं तृणप्राय ॥ ८३ ॥
तूं मज दवडिल्या ऋषी । तुझी दशा होईल कैसी ।
ते मी सांगेन तुजपासी । सावधानेंसीं अवधारी ॥ ८४ ॥
मज निघाल्या देहाबाहेरी । बाइला घेती टोलेवारी ।
तुज मारिल्या तोंडावरी । साटोप शरीरीं तुज नाही ॥ ८५ ॥

क्रोधाला जमदग्नीचे उत्तर :

ऐसी ऐकोनि त्याची कथा । कोपावरी अति क्षोभता ।
पूर्ण बाणली ऋषि नाथा । तुज मी आतां मारीन ॥ ८६ ॥

त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः ।
कामक्रोधस्तथा लोभ तस्मात् एतत् त्रयं त्यजेत् ॥ १ ॥

भगवंताचिया वाक्यथोरी । काम क्रोध लोभ ज्याचे शरीरीं ।
त्याची वस्ती नरकाभीतरीं । त्याच्या घरीं नित्य नरक ॥ ८७ ॥
नरका जाणें न लगे त्यासी । तोचि स्वयें नरकरासी ।
क्रोधा तुझी गति ऐसी । व्यर्थ जल्पसी वाढिवा ॥ ८८ ॥
क्रोध कामाचा कैवारी । क्रोध अभिमानाचा साहाय्यकारी ।
क्रोध लोभा सबाह्याभ्यंतरीं । पापकारी निजक्रोध ॥ ८९ ॥
क्रोध संचरल्या देहीं । अणुमात्र हित नाहीं ।
पापाच्या कोटी पाहीं । क्रोधाच्या पायीं तोडरी ॥ ९० ॥
ऐसें बोलोनि जमदग्नी । चेतवूं पाहे जंव योगाग्नी ।
तंव क्रोध निघाला गजबजोनी । देह त्यागुनी ऋषीचा ॥ ९१ ॥
क्रोध म्हणे ऋषिनाथा । तुझी आज्ञा वंदोनि माथां ।
मी निघालों जी तत्वतां । कोठें आतां म्यां राहावें ॥ ९२ ॥
ऋषि होय विचारिता । माझ्या क्रोधाची दुर्धरता ।
यासी वस्ती न दिसे सर्वथा । म्यां काय आतां सांगावें ॥ ९३ ॥

क्रोध स्वीकारण्याची परशुरामाची तयारी :

ऐसी जमदग्नी करितां चिंता । परशुधरा कळलें तत्वतां ।
चरनीं ठेवोनियां माथा । होय बोलता अति नम्र ॥ ९४ ॥
स्वामीचा कोप अति दारुन । हा सर्वत्र करील दहन ।
यासी करावें मदर्पण । कृपा करोनि स्वामिया ॥ ९५ ॥
जमदग्नि विचारी आपण । माझ्या क्रोधा अति सांटवण ।
परशुधर शुद्ध संपूर्ण । हा रामार्पण करावा ॥ ९६ ॥

क्रोधाची साधकबाधकता :

ऋषि सांगे नित्यब्रह्मचारी । धनलोभ नाहीं ज्याभीतरीं ।
जो द्विजांचा द्वेष न करी । क्रोध त्या माझारी शांतत्वें वसे ॥ ९७ ॥
याहूनि अन्यथा पैं होतां । क्रोध करील त्याच्या घाता ।
जरी तुज टाकेल तत्वतां । तरी मी आतां अर्पीन ॥ ९८ ॥
द्रवदारलोभ ज्यापासीं । क्रोध तेथें सदा मुसमुसी ।
ज्ञानगर्व ज्याचे मानसीं । क्रोध त्यापासीं चाविरा ॥ ९९ ॥
ज्ञानगर्व द्रव्यदारा । इहीं द्वारीं क्रोधाच्या मारा ।
हे जिंकिलिया परशुधरा । क्रोध कामारा तयाचा ॥ १०० ॥

परशुरामांचा क्रोधाचा स्वीकार :

परशुराम म्हणे ताता । तुझे चरणींचें तीर्थ घेता ।
तेणें तीर्थ मज सामर्थ्यता । क्रोध राखतां भय नाहीं ॥ १ ॥
पित्यासी करोनि नमन । घेतलें चरणतीर्थ प्रार्थून ।
तेणें तीर्थेंसी आपण । केलें प्राशन क्रोधाचें ॥ २ ॥
क्रोध बोलिला आपण । भार्गवा करितां दुष्टनिर्दळण ।
संग्रामीं साहाय्यकारी आपण । तुज मी होईन भृगुवीरा ॥ ३ ॥
परशुराम जंव क्रोध घोटी । अंगीं बाणलो पुष्टी तुष्टी ।
चौगुनीं वाधीव पोटीं । संग्रामी लाथी वीरवृत्ति ॥ ४ ॥
करितां क्रोधाचे प्राशन । परशुरामासी समाधान ।
अंगी बाणली आंगवण । दुष्टनिर्दळण करावया ॥ ५ ॥
क्रोध त्यागिला जमदग्नीनें । त्याचें सांगितलें निरूपण ।
एकाजनार्दना शरण । कथानुसंधान अवधारा ॥ ६ ॥

सह्स्रार्जुनाचे आतिथ्यवर्णन :

कामधेनु आणोनि ऋषीं । स्वयें दिधली रेणुकेपासीं ।
तिणें पूजोनि धेनूसी । राजोपचारासी मागितलें ॥ ७ ॥
जे रायें देखिले ना ऐकिले । जे रायें नाहीं चाखिले ।
ते ते उपचार भलेभले । धेनूनें दिधले तत्काळ ॥ ८ ॥
दिव्यान्नें लेणीं लुगडीं । एके ताटें प्रसवली आवडी ।
निघालीं ताते लक्षकोडी । निघाल्या चवडी ताटांच्या ॥ ९ ॥
राजदूत सांगे रायापासीं । अन्नसामग्र्ती कैंची ऋषी ।
वैश्वानर नाहीं चुलीसी । कथा कायसी पाकाची ॥ ११० ॥
रायें पाठविला प्रधान । आश्रमीं पाहे अन्नसदन ।
नसेल तरी द्यावें आपण । अन्नधन ऋषीसी ॥ ११ ॥
ऐसें ऐकोनि वचन । ऋषिआश्रमा प्रधान ।
स्वयें पातला आपण । तंव ऋषि बोलावणें पाथवितु ॥ १२ ॥
प्रधान म्हणे लागला उशीर । शिष्यवर्ग म्हणती धरा धीर ।
संपादिला अन्नप्रकार । आतां सत्वर चलावें ॥ १३ ॥
प्रधानें जाणविलें रायासी । ऋषीनें पाथविलें बोलवायासी ।
रायें सिद्ध करोनि सर्वांसी । आला कटकेंसीं भोजना ॥ १४ ॥
आले देखोनि रायासी । ऋषि सामोरा येवोनि प्रीतीसीं ।
रायासी पूजिलें उपचारेंसी । मधुपर्कासी सिद्ध केलें ॥ १५ ॥
पाहती राजा आणि प्रधान । तंव दिव्य मंदिरें शोभायमान ।
सुवर्नताटीं दिव्यान्न । समसमान सर्वांसी ॥ १६ ॥
उषीनें बैसविली पंक्ती । राजा अति विस्मित चित्तीं ।
धन्य ऋषीची संपत्ती । अगाध स्थितिसामर्थ्य ॥ १७ ॥
सकल बैसले भोजनपंक्ती । मागणें नाही मागुती ।
वाधणें न लगे पुढती । अवघ्या तृप्ती एकची ॥ १८ ॥
दिव्यालंकारभूषणें । दिव्यांबरें परिधानें ।
सर्व गौरविलें सन्मानें । अवघेही मनें विस्मित ॥ १९ ॥
राजा म्हणे प्रधानाप्रती । आम्ही राजे चक्रवर्ती ।
आम्हां ऐसी नाहीं संपत्ती । ते ऋषीप्रती कैसेनी ॥ १२० ॥

पाकसिद्धी कामधेनूमुले झाली म्हणून तिचीच ऋषीजवळ मागणी :

पुरोहित सांगे ऋषीची थोरी । कामधेनु आहे त्याचे घरीं ।
तिचेनि प्रभावेंकरीं । दिव्य उपचारीं वर्षत ॥ २१ ॥
ऋषीपासीं आहे कामधेनु । ऐसें ऐकता सह्स्रार्जुन ।
ते आम्ही घ्यावी मागून । ऐसा अभिमान दृढ धरिला ॥ २२ ॥
राजा म्हणे जमदग्नीसी । थोर केलें सुखी आम्हांसी ।
कांहींएक मागेन तुजपाशीं । ते अवश्यतेसीं मज द्यावें ॥ २३ ॥
ऋषि म्हणे तुम्ही राजे आत्यंतिक । येर्तु म्हणे मी तुझा याचक ।
तुज मागेन कांहीएक । तें अवश्य मज द्यावें ॥ २४ ॥
आश्रमीं आहे कामधेनु । ते मज द्यावी कृपा करोन ।
वचन ऐकोनि जमदग्न । अति उद्विग्न स्वयें जाला ॥ २५ ॥
कामधेनु स्वर्गभूषण । मृत्युलोकीं नाहीं जाण ।
गाय आणली इंद्रापासून । परवस्तुदान केवीं द्यावें ॥ २६ ॥
ताया त्य्झें पूजेचे अंतीं । धेनु न्यावी इंद्राप्रती ।
ऐसें करोनिया निगुतीं । आश्रमाप्रती आणिली ॥ २७ ॥

राजाचे बळजबरी व जमदग्नीचा वध :

राजा विचारी मानसीं । बलात्कारें नेऊं धेनूसी ।
इंद्र येईल चांवण्यासी । शिक्षा मी त्यासी लावीन ॥ २८ ॥
सोडावया कामधेनु । रायें धाडिला प्रधान ।
आडवा राहिला जमदग्न । देदीप्यमान तेजस्वी ॥ २९ ॥
जमदग्नीच्या तेजापुढें । प्रधान पळे मागिलीकडे ।
योद्धे पळाले निधडे । सैन्य बापुडें ते किती ॥ १३० ॥
ऐसे देखोनियां जाण । राजा धांविन्नला आपण ।
पुढें उभा जमदग्न । तो अणूप्रमाण ढळेना ॥ ३१ ॥
ऐसें देखोनियां त्यासी । राजा मोकली शस्त्रांसी ।
तीं लागों न शकती ऋषीसी । मग हातवसी निर्वाणखड्ग ॥ ३२ ॥
जेथें विषयाचा अति स्वार्थ । तेथें नाथवे कर्तव्यार्थ ।
राजहस्तें ऋषिघात । ऐसा अनर्थ ओढवला ॥ ३३ ॥
राजा अत्यंत क्रोधयुक्त । निर्वाणशस्त्रे टाकित ।
तेणें ऋषीचा केला घात । पडिला अचेत जमदग्नि ॥ ३४ ॥
जमदग्नीनें सांडिला कोप । यालागीं त्यासी न देववे शाप ।
तेणें रायाचा प्रताप । शस्त्रसाटोप चालिला ॥ ३५ ॥

रेणुकेकडून राजा मूर्छित :

जमदग्नीचा गेला प्राण । पळाले आश्रमींचे ब्राह्मण ।
राजा बोलिला आपण । आता कामधेनु आणा रे ॥ ३६ ॥
धेनु सोडूं आले सेवक । रेणुका क्षोभली आत्यंतिक ।
चक्र करोनियां ताटक । युद्ध सन्मुख ते जाली ॥ ३७ ॥
ताटंकचक्राभेणें । उठाउठी पळाले प्रधान ।
सेना निघे जीव घेऊन । पळालें सैन्य बारा वाटीं ॥ ३८ ॥
ताटंकचक्राची तिखट धार । निधडे पाडिले महावीर ।
वाहती रुधिराचे पूर । तिजसमोर कोण राहे ॥ ३९ ॥
कामधेनूतें लवलाहो । सोडूं धांविन्नला स्वयें रावो ।
रेणुकेनें आसुडितां बाहो । पडे सहस्रबाहो मूर्च्छित ॥ १४० ॥
त्या सहस्रार्जुनाचे सुत । धांविन्नले क्रोधयुक्त ।
तिहीं युद्ध केलें अत्यद्भु त । तंव सावचित्त नृप जाला ॥ ४१ ॥
निर्वाणशस्त्रांचे घाये । राव सोडी लवलाहे ।
तिसी न लागती पाहें । देखोनि राव गजबजला ॥ ४२ ॥
मज सहस्रार्जुनाचा यावा । न सहवे देवा दानवा ।
मा मनुष्यांचा कोण केवा । त्या मज लघुत्वा आणिलें स्त्रियें ॥ ४३ ॥
चामुंडास्त्राचा प्रळयघात । बळें सहस्रार्जुन हाणित ।
साहोनि एकवीस आघात । पडे मूर्च्छित जगदंबा ॥ ४४ ॥

कामधेनूकडून राजाचा पराभव :

जमदग्नि आज्ञेचें बंधन । कामधेनूसीहोतें पूर्ण ।
ऋषि म्=निमतांचि जाण । धेनु निर्बंधन स्वयं झाली ॥ ४५ ॥
रेणुका रणीं पडलियावरी । राजा धांवोनि धेनु धरी ।
थडका हाणोनि निघे बाहेरी । सह्स्र करीं नाटोपें ॥ ४६ ॥
राजा खुरावरी हाणे घात । तेणें खुरीं निघालें रक्त ।
तेचि झुरासनी जाले आरक्त । आले युद्धार्थ रायासीं ॥ ४७ ॥
खुरासनी पळवूनि पाहें । राजा शृंगीं हाणी घाय ।
जाला सिंगाळांचा उद्भव । तिहीं सहस्रबाहो हांकिला ॥ ४८ ॥
आक्रंदें दे हंबरड्यासी । ते ठायीं झाले कालेमसी ।
जन्म पावले हबसी । तिहीं सहस्रबाहु हांकिला ॥ ४९ ॥

कामधेनूचे स्वर्गाला प्रयाण :

इतुकें करोनियां कंदन । स्वर्गा गेली कामधेन ।
राजा जाला अति उद्विग्न । म्लानवदन अनुतापी ॥ १५० ॥
म्हणे स्वार्थ ना परमार्थ । उगाच केला शस्त्रघात ।
मज घडला ब्रह्मघात । सद्यः अनर्थ स्वलोघें ॥ ५१ ॥
राजा अनुतापी मानसीं । कांहीं न बोले कोणासी ।
घेवोनि सकळ सैन्यासी । निजनगरासी तो गेला ॥ ५२ ॥
रणीं रेणुका मूर्च्छापन्न । ती स्वयें होवोनि सावधान ।
ठायीं ठेवोनियां प्राण । चेतना संपूर्ण पावली ॥ ५३ ॥
कंदन देखोनि आत्यंतिक । आक्रंदें दिधली हांक ।
परशुरामा पाव आवश्यक । माझें निजदुःख निवारावया ॥ ५४ ॥
तो मातेचा महाध्वनी । कैलासी पडे तुझ्या कानीं ।
तू आलासी तत्क्षणीं । मातृवचनीं अति भक्तीं ॥ ५५ ॥
हे पूर्वकथा इतिहासीं । जाली होती जैसी तैशी ।
ते सांगितली परशुरामासी । आश्रमवासी ब्राह्मणीं ॥ ५६ ॥

रेणुकेकडे परशुरामांचे आगमन :

ऐसी ऐकोनि वार्ता । सवेग पाहूं आला माता ।
तिसी घायवट देखतां । आक्रंदतां गहिंवरला ॥ ५७ ॥
रेणुका म्हणे पुत्रासी । तूं का येथें रडों आलासी ।
पुरुषार्थ नाहीं तुजपासीं । कैवारी होसी तूं काय ॥ ५८ ॥
ऐकोनि मातेच्या वचना । परशुराम लागे चरनां ।
शीघ्र मज द्यावी अनुज्ञा । सहस्रार्जुना छेदीन ॥ ५९ ॥
क्षोभें आज्ञा दिधली दुर्धर । सहस्रार्जुनाचे सहस्र कर ।
छेदोनि निवटीं त्याचें शिर । दानव समस्त निर्दाळीं ॥ १६० ॥
युद्धामाजीं शस्त्रास्त्रीं । मज घायवट केले क्षत्रीं ।
तरी त्वां पृथ्वी करावी निक्षत्री । धुंडमारी करोनियां ॥ ६१ ॥
सहस्रार्जुनासहित राजसुत । शोधोनि मारावे समस्त ।
दैत्य मातले उन्मत्त । तरी समूळ घात करीं त्यांचा ॥ ६२ ॥

एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय करण्याची परशुरामाल रेणुकेची आज्ञा :

माझें शरीर ते धरित्री । एकवीस घाय केली क्षत्रीं ।
एकवीस वेळां निःक्षत्री । पृथ्वी करीं ममाज्ञा ॥ ६३ ॥
वंदोनि मातेचे चरण । घेवोनियां धनुष्यबाण ।
परशु धरोनियां दारुण । कोपायमान चालिला ॥ ६४ ॥

जमदग्नीची उत्तरक्रिया व रेणुकेचे सहगमन :

मातेची आज्ञा निःसीम । मूळपीथ पवित्र परम ।
तेथें मी करीन सहगम । मग उत्तरकर्म तूं करीं ॥ ६५ ॥
ऐसें बोलताचि पाहीं । रेणुका प्रवेशे जमदग्निदेहीं ।
तिचें प्रेत उरलें नाहीं । ते देहींच विदेही जगदंबा ॥ ६६ ॥
परशुराम ललाट पिटी । माते मज दे कां हो भेटी ।
येरीं वो दिधली मूळपीथीं । सांगितली गोष्ट करावी ॥ ६७ ॥

परशुरामाची सहस्रार्जुनावर स्वारी :

मग सिंहाद्रीसी परशुरामू । करोनि दोघांचे उत्तरकर्मू ।
पुढें आरंभिला युद्धधर्मू । परम संग्रामु रायासी ॥ ६८ ॥
जेथें वसे सहस्रार्जुन भूपती । तेथें ठाकोनि आला महिकावरी ।
धनुष्यबाण घेवोनि हातीं । नगराप्रती पैं आला ॥ ६९ ॥
म्हणे विभांडूं राजनगरी । तैं प्रजा पॆऎडिती समग्री ।
राजा निघालिया बाहेरी । सहपरवारीं मारीन ॥ १७० ॥
बाहेर येवोनि करावें रण । सांगून धाडूं धर्मवचन ।
नगरीं भिडतां आपण । होईल कंदन प्रजेसी ॥ ७१ ॥
ऐसें ऐकोनि जाण । राजा न येईल मजभेणें ।
तैं नगरीं प्रवेशों आपण । राजभुवन लक्षोनी ॥ ७२ ॥
प्रजेसी देऊनियां अभयदान । स्वस्थ राखून गोब्राह्मण ।
राजभुवनीं प्रवेशोन । सहस्रार्जुन वधीन ॥ ७३ ॥
युद्धास यावें मजप्रती । सांगून धाडूं कोणाहातीं ।
ऐसें विचारतां चित्तीं । पुष्पहस्ती भेटला ॥ ७४ ॥
रायाचे देवपूजेचा माळी । पुष्पें घेवोनियां करतळीं ।
ब्राह्मणाची अभिनव शैली । देखोनि जवळीं पाहूण् आला ॥ ७५ ॥
परशुराम पुसे त्यासी । प्जुलें नेतोसी कोणासी ।
तो म्हणे मी रायाचा विश्वासी । देवपूजेपासीं पुष्पधारी ॥ ७६ ॥

राजास अयुद्धार्थ आव्हान :

राम सांगे पुष्पधार्याहसी । जावोनि सांग रायापासीं ।म
जसी यावें युद्धासी । सकल सैन्येसीं सन्नद्ध ॥ ७७ ॥
दिकोनि रामवचनासी । माळी त्यातें उपहासी ।
मरणा धरणें कां बैसलासी । युद्ध रायासीं वांछिसी ॥ ७८ ॥
अंगीं दिसे ब्राह्मणपण । तुज कां आले धनुष्यबाण ।
परशु धरावया काय कारण । त्वां वेदपठण करावें ॥ ७९ ॥
राजा सैन्येंसीं सन्नद्ध सबळ । तूं एकाकी ब्राह्मणबाळ ।
तूं त्यासीं युद्ध प्रबळ । रणकल्लोळ घडे केवीं ॥ १८० ॥
जे जे मार्गस्थ देखती । ते ते म्हणती द्विज अपघाती ।
रायासी युद्धप्राप्ती । हा मरणार्थीं आतुर ॥ ८१ ॥
क्षत्रियासी युद्धाचें बळ । ब्राह्मण शापबळें सबळ ।
तें तू वाछिसी युद्ध प्रबळ पूर्ण केवळ अविवेकी ॥ ८२ ॥
फुलारी म्हणे मज सांगतां । राजा करील तुझ्या घाता ।
ब्राह्मणहत्या बैसेल माझ्या माथां । मी सर्वथा सांगे ना ॥ ८३ ॥
मग परशुराम म्हणे मनीं । साधुत्वें येथें कोणी न मानी ।
पुरुषार्थ देखोनि जनीं । वचन मानी भलताचि ॥ ८४ ॥
ऐसें परशुराम अवधारी । मग धुमसिला फुलारी ।
फुलें हिरोनि घेतलीं करीं । जायें शंख करीत राजसभेसी ॥ ८५ ॥

आव्हान ऐकून घबराट :

आघातें पीडिला फुलारी । तो शंख करी राजद्वारीं ।
ऐकोनि धाकती नरनारी । राजा भीतरीं जीत कीं मेला ॥ ८६ ॥
सहस्रार्जुनाच्या राज्याभीतरीं । बोंब जाईकों स्वप्नांतरीं ।
ते बोंब पडली राजद्वारीं । राजा भीतरी निमाला ॥ ८७ ॥
ऐसी विश्वतोमुखी वार्ता । भविष्य वदे वाग्देवता ।
ती बोंब रायें ऐकतां । चळकांप चित्ता सुटला ॥ ८८ ॥
म्यां गाईस केला शस्त्रघात । आणि ब्राह्मणा केला घात ।
पाप आचरलों बहुत । जय निश्चित मज नये ॥ ८९ ॥
फुलारियासी पुसे प्रधान । तुझे बोंबेसि काय कारण ।
तो म्हणे एक आलासे ब्राह्मण । धनुष्यबाणपरशूंसीं ॥ १९० ॥
तो रायासीं समदळीं । युद्ध करूं पाहे बळी ।
तो म्हणे सांगा रायाजवळी । त्याची वचनावळी छेदिली म्यां ॥ ९१ ॥
रायासीं ब्राह्मणासीं युद्ध । बोलणें तुझें अति अबद्ध ।
तेणें त्या ब्राह्मणासी आला क्रोध । मज सुबद्ध धुमसिलें ॥ ९२ ॥
फुलें होरिनोयां करीं । मज प्रहारिलें मुखावरी ।
तेणें मज आलें जिवावरी । यालागीं मी करीं महाशब्द ॥ ९३ ॥

राजाच्या सैन्याची दुर्दशा :

प्रधानें बोलाविला सेनानी । ब्राह्मण आणावा धरोनी ।
तेणें ठाणांतरी पाचारोनी । म्हणे ब्राह्मण बांधोनि आणावा ॥९४ ॥
नगर नागरिक लोक । तेथें आले स्वाभाविक ।
हे बहुत तो एकला एक । युद्धकौतुक पाहूं पां ॥ ९५ ॥
बाहेर निघाला ठाणांतरी । पुढें पायिकाच्या हारीं ।
एक गर्जती हाहाकारीं । एक शस्त्रें करीं झेलिती ॥ ९६ ॥
परशुराम म्हणे हे दीन । मारिलिया पुरुषार्थ कोण ।
यांचा रायासी अपशकुन । होय तैसें चिन्ह करूं यांसी ॥ ९७ ॥
ऐसें म्हणॊनि सोडिला बाण । अवघियांची शस्त्रें छेदून ।
सवेचि नाक कान सरकटून । बाण परतोन भारां रिघे ॥ ९८ ॥
कोणाचा व्याही जांवई । कोणाचा भेटूं आला भाई ।
कौतुक पाहतां तेही । नाककानांस पाहीं मुकले ॥ ९९ ॥
कोणाचा पाहुणा मेहुणा । जांवई आणिला दिवाळसणा ।
ते ते मुकले नाका काना । दावितां वदना सलज्ज ॥ २०० ॥
शंख करिती आक्रंदोनी । नाक कान गेले दोनी ।
फेंफें करितां निघे ध्वनी । हे विटंबनी युद्धाची ॥ १ ॥
सन्मुख घाई गेलिया प्राण । तें वीरांसी उत्तम मरण ।
परि जितां गेलिया नाक कान । तें चौगुण मरण निंद्यत्वें ॥ २ ॥
वीर विटंबिले अनेक । नगरामाजी पडली हांक ।
कोपले राजपुत्र विटंक । सन्नद्ध कडक तिहीं केलें ॥ ३ ॥
साठ प्रयुतें कुंजर । कोट्यानुकोटी रहंवर ।
अमित चाल्लिले असिवार । पायाचे मोगर गर्जती ॥ ४ ॥
सेनामुखीं सेनानी । राजपुत्र मध्यमानी ।
दक्षिणें राजे मुकुटमणी । चंड प्रचंड दोनी वामभागीं ॥ ५ ॥
वेगीं निघे सहस्रार्जुन । कुमर आणि प्रधान ।
तिहीं राहविला प्रार्थुन । ब्राह्मण बाअंधोन आणूं आम्ही ॥ ६ ॥
आम्ही असतां इतुके जण । एकला एक ब्राह्मण ।
तयावरी निघावें आपण । हें समरांगण नव्हे राया ॥ ७ ॥

युद्धार्थ राजा निघाला त्या वेळी त्याला अपशकुन होतात :

यापरी मंत्रीं आणि कुमरीं । राजा राहवोनियां नगरी ।
आपण येवोनियां दळभारीं । नगराबाहेरी निघाले ॥ ८ ॥
पुढें भेटले निर्नासिक । तो अपशकुन आत्यंतिक ।
मुख्य रायासीच घातक । हा आवश्यक शस्त्रार्थ ॥ ९ ॥
जळो तुमचें निंद्य मुख । मुहुर्तीं कां आलेति सन्मुख ।
अवघे निर्मर्त्सित लोक । तें अति दुःख घायाळां ॥ २१० ॥
घायाळ बोलती आपण । ब्राह्मण कोणाचा न घे प्राण ।
तुम्ही वांचवाल नाक कान । तें दादुलपण जाणवेल ॥ ११ ॥
प्रधान बोलिला आपण । परतों नये अपशकुनाभेणें ।
परतणें हाचि अपशकुन । अति निंद्य जगामाजी ॥ १२ ॥
युद्ध करितां परस्परीं । एका जय एका हारी ।
हें न चुके भलत्यापरी । शकुनाची थोरी मूर्खांप्रती ॥ १३ ॥
अंगीं नाहीं आंगवण । त्यासी काय जय देईल शकुन ।
हें मानिती ते मूर्ख पूर्ण । शूरांचे लक्षण ऐसें नव्हे ॥ १४ ॥
देव असे शकुनाचे ठायीं । तो काय अपशकुनीं नाहीं ।
शकुन अपशकुनाचें कांही । निधडे पाहीं न मानिती ॥ १५ ॥
ऐसें बोलोनि प्रधान । त्राहाटिलीं भेरी निशाण ।
सैन्य चालविलें अंपूर्ण । पुढें ब्राह्मण लक्षूनी ॥ १६ ॥
एकाजनार्दन शरण ऑ दानवांचे युद्ध दारुण ।
राम करील निर्दळण । तें रणकंदन अवधारा ॥ २१७ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायने बालकांडे एकाकारटीकायां
परशुरामयुद्धप्रभावो नाम षोडशोऽद्यायः ॥ १६ ॥
॥ ओंव्या २१७ ॥ श्लोक १ ॥ एवं २१८ ॥