मला वाटले ती निघेल, पण ती जरा वेळ ऑफिस निरखून पाहत होती. पंधरा वीस मिनिट झाले असतील तरी फाइल्स, बुकशेल्फ, टेबल अगदी बारकाईने पाहत होती. माझा एक टेबल आणि दोन खुर्च्या सध्यातरी इतकचं होत. मी तिच्या टेबलचा विचार करत मोबाईल उचलला आणि एक टेबल आणि खुर्चीची ऑर्डर दिली. तिचे माझ्या बोलण्याकडे मुळीच लक्ष नव्हते. मी फोन ठेवला तशी ती ताडकन उठली आणि म्हणाली.
"येवू सर..."
मला लाजल्यासारखे झाले. इतका वेळ बसून तिला पाणी देखील विचारले नाही.
"नाही थांबा चहा, कॉफी सांगतो."
"नाही नको... येते मी ."
चालेल… अस म्हणायचे होते पण मी काहीच बोललो नाही.
चंपा गेली. नाव अगदीच जुनं वाटत होत.
" 'चंपा' तिच्या आईवडिलांना दुसर नाव नसेल का सुचल...?
जाऊदे म्हणत मी कामाला लागलो आणि उद्या तिला काय काम द्यायची याचा विचार करून ठेवला. का कोणास ठावूक? मी उद्याचा दिवसाची आतुरतेने वाट बघत होतो."
चंपा सहा, साडेसहा तास माझ्यासोबत असणार, मी सांगेल ते काम करणार.
मी सांगेल ते… किती वाईट विचार? ऑफिस मधले काम संपवून मी गाडी काढली आणि घरचा रस्ता धरला. नेहमी गाडीमध्ये बसलो की गाणी ऐकायची सवय होती. गाडीला स्टार्टर मारला आणि गाणी सुरु झाली. नवीन जनरेशनचा असल्यामुळे माझ्या गाडीमध्ये सगळी नवीन गाणी भरलेली असायची ती ऐकली की पुन्हा उत्साह वाटायचा आणि लवकर घराजवळ येवून पोहचायचो.
चंपाच्या आठवणीत अचानक त्याला सिद्धार्थ आठव
ण झाली. "अरे... हा सिद्ध्या का नाही आला आज?"
सिद्धार्थ स्वतःचे ऑफिस असून माझ्याकडे दिवसातून दोन वेळा तरी यायचा. त्याने सिद्धार्थला फोन केला.
"हॅलो, अरे काय झालं आज का नाही आला ऑफिसला"?
"अरे ऑफिसमध्ये कामाची खूप गडबड होती.आज त्याच्यामुळे मला जमलं नाही यायला आणि आज बाबाही नव्हते."
"एनीथिंग सीरियस... काही प्रॉब्लेम झालाय का?"
"नाही काहीच प्रॉब्लेम नाही झालेला तू आला नाहीस म्हणून विचारलं पण..."
"पण काय रे काय झालं?"
रामने दिवसभर घडलेला घटनाक्रम सिद्धार्थला सांगितला. सिद्धार्थ भाऊ असला तरी मित्रापेक्षा खूप काही होता.
आई- बाबा कार अक्सिडेंट मध्ये गेले. तसं विष्णुकाकांनी म्हणजे बाबांच्या मित्राने मला सांभाळल. आईला ते फारसं पटलेलं नव्हतं. मी तिला सिद्धार्थ मुळे आईच म्हणायचो. तिला असं वाटायचे की सिद्धार्थचे प्रेम वाटले जाईल, पण प्रेम कधी वाटतं का? आईने कधी मला प्रेमाने जवळ घेतलं नाही की कधी चिऊ काऊचा घास भरवला नाही. सिद्धार्थला आई जवळ घ्यायची तेंव्हा मी फार तिच्याकडे अपेक्षेने बघायचो. अपेक्षा प्रत्येकाला असते मला आईकडून मायेची अपेक्षा होती. तिने कधीच पूर्ण केली नाही, विष्णुकाकांना माझे वाईट वाटायचे. विष्णु काकांनी मला आई वडील दोघांच प्रेम दिल.
आई आणि काकांची भांडण मला ऐकू यायची. अर्थात माझ्यावरून असायची. त्यांच्यापेक्षा मला त्यांच्या भांडणाचा कंटाळा आला होता. एवढं लाचार व्हाव मी फक्त प्रेमासाठी...यांची माझ्यामुळे होणारी रोजची भांडण, मला मिळाव अस वाटणार प्रेम, आईकड़े अपेक्षेने बघणारी माझी नजर पण या प्रेमाची भूक मला शेवटी मिळणारचं नव्हती. एवढ्या लहान वयात हे अनुभव मला सहज मोठ करत होते. आईने बोलावं म्हणून मी आदर्श मुलासारखा तिच्या मागेपुढे करायचो. विष्णुकाकांमुळे मला बाकी सगळी वागणूक सिद्धार्थ सारखी मिळत होती. फक्त आईच प्रेम मिळत नव्हतं.
मी नोकरी करून वकील व्हायच ठरवलं. कारण माझा सतत साजरा होणारा दुस्वास मलाच बघवत नव्हता. बऱ्याच वेळेला आईला काकांनी समजावून सांगितले होते. आपला दूसरा मुलगा समज, पोटात नऊ महीने वाढणारे मूलच फक्त आपल अस नसत. तिला हे मान्य नव्हत. त्यांनी माझी होणारी उलघाल पहिली होती. मी ठरवून विष्णुकाकांसोबत बोललो, मला माझ्या घरी रहायचे आहे. त्यांनी मला परवानगी दिली. काकांना वाईट वाटतं होत पण पर्याय नव्हता. मला माझ्यामुळे काकांच्या घरामध्ये होणारी भांडण बघवत नव्हती. माझ्यामुळे त्यांच्यामध्ये दरी निर्माण झालेली हे मला कळत होते.
मी माझ्या घरी रहायला आलो. विष्णुकाकांनी बंगला अगदी मस्त ठेवला होता! आई बाबा गेल्यानंतर मी पहिल्यांदा बंगल्यामध्ये आलो होतो. आई बाबा मला आठवत नव्हते. आई कशी असते? हा मोठा प्रश्न होता मला? नातेवाईक होते किंवा आहेत का हे सुद्धा मला माहित नव्हते. करण आई बाबा गेल्यानंतर माझं अस कोणीच मला न्यायला आलं नव्हतं. बंगल्यावर आल्यानंतर खुप मोठ दडपण गेल. विष्णुकाका एवढे बिझी असून दोन वेळा फोन करायचे. सिद्धार्थ माझ्याकडे आला की दोन दोन दिवस घरी जायचा नाही. सिद्ध्या आणि मी कधी तूटलोच नाही. त्या रात्री तो नेहमीप्रमाणे आला. आज ठरवले त्याला वाईट वाटले तरी चालेल पण आज बोलायचेच. मी समजावून सांगायचा निष्फळ प्रयत्न करू लागलो,
"सिद्धार्थ आईला तुझ सतत इथे माझ्याकड़े येवून राहण आवडत नसेल. तुमची ताटातुट नको म्हणून मी इथे रहायला आलो. तू जर असा सारखा येवून राहणार असशील तर मग माझ ते घर सोडून येण्याचा उपयोग का्य? सिद्ध्या हसला, आईला मी हेच सांगत होतो,
"तू एकदा रामला इथे रहा म्हण बघ तो तुझा शब्द मोडणार नाही. पण ती तिच्या मतावर ठाम होती. मला तीच वागण कधीच पटल नाही."
"सिद्ध्या अस नको बोलू अरे ती तुझ्यावर प्रेम करते म्हणून…"
मी पुन्हा त्याला समजवानीच्या सूरात बोललो.
"अरे लहान होतो तेंव्हा काहीच कळत नव्हत पण आता मोठा झालोय. तशी ती ही मोठी झाली आहे आणि तुला तिच्या मागेपुढे करताना पहिल आहे मी... तू दाखवल नसलस तरी तुझ्या डोळ्यातुन वाहणारे पाणी पहिलंय मी, एकदा नाही कित्तेकदा... राम बाबांनी आईला खुपदा समजावल, मी ऐकलयं, तुझ्यासाठी बाबांना दुसर मूल नको होत. आईला ह्याच गोष्टीचा राग येत होता अणि सगळा राग तुझ्यावर निघत होता. अरे बाबा सांगायचे आईला राम असताना कशाला हव आहे तुला दुसर मूल? पण आईचा एकच ठेका रक्ताच ते रक्ताच... परक्याच रक्त कधीही आपलं होवू शकणार नाही.पण गम्मत अशी होती की बाबांनी सुद्धा त्यांचा हट्ट सोडला नाही. त्यानी दुसऱ्या मुलाचा विचारही केला नाही. " सिद्धार्थ शांत बसला. पुन्हा बोलला.
"राम तू कितीही समजवलस तरी माझ इथ येणं थांबणार नाही. माझं तुझ्यावर असणार प्रेम कमी होणार नाही. कारण तुला दूर करण्याचा नादात मी सुद्धा तिच्यापासून फार दूर गेलो रे..."
मला का्य बोलाव हे समजत नव्हतं कारण, त्याला समजावून तो ऐकून घेणार नव्हता. त्याला माझे मन कळत होते हेच माझ्यासाठी खुप होते.
मी माझ्या पायावर उभा राहिलो. काकांना खुप अभिमान वाटत होता. शेवटी एकट रहायची सवय झाली होती. तसं आठवड्यातले चार दिवस सिद्धार्थ माझ्याकडेच असायचा. त्यामुळे एकट तात्पुरत होत.
क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत
"आई तुझ्या नावांमध्ये
खूप काही दडलेलं
तुझ्या प्रत्येक शब्दांमध्ये
प्रेम असतं जडलेलं…"
याचा अर्थ सिध्दार्थच्या आईला समजायला हवा होता. हो ना???
(नक्की स्टार द्या कमेंट करा.)