Champa - 8 books and stories free download online pdf in Marathi

चंपा - भाग 8

चंपा

चंपा कुठेच दिसत नव्हती.त्याने गाडी पार्क केली आज सगळीकडे शांतता होती ज्या त्या बायका शांत होत्या. आज ना कोणी रस्त्यावर उभं होत ना अंगचटी कोणी येत होतं. राम तिच्या स्कूलच्या रुम मध्ये पोहचला. दोन तीन छोटी मूलं होती.
"हाय… ऐकाना…"
एक छोटा मुलगा जवळ आला.
"हा काका"
"चंपा टीचर कुठे आहेत…?"
"टीचर…? त्या कोठीवर आहेत?"
"काय?"
"तुम्ही बसा...मी आलोच…तुमचे नाव काय सांगू"?"
"राम सर आलेत म्हणून सांगा."
चंपाने जॉब सोडून त्यांचा धंदा…? बापरे आलो ती चुक केली का? नाही नाही आपण एकदा बोलू मग तिचा रस्ता वेगळा नि माझा रस्ता वेगळा…
तेवढ्यात चंपा आली त्याला पाहून ती क्षणभर दारातच थबकली आणि तिच्या डोळ्यांमधून अश्रू वाहत होते. ती पळत जावून रामला बिलगली.
हे असे पाहून राम थोडा बिचकला पण नंतर त्याने तिला कुरवाळले आणि विचारले.

"काय झाले चंपा? दोन दिवस मी तुझा मोबाइल ट्राय करतोय एकदा फोन करून कळवायचे तरी नक्की काय झाले आहे?"

ती पटकन बाजूला झाली.
"सॉरी सर… आंटी म्हणजे माझी आई गेली."
"काय?"
"हो… अचानक चक्कर आली हॉस्पिटलमध्ये नेले तर… चंपा पुन्हा रडायला लागली. मला कळवता ही नाही आले खूप गडबडीत झाले सगळे."
"इट्स ओके पण तुला कसे समजले... म्हणजे तुझी आई आहे?"

"आंटी गेली तेंव्हा सगळे विधी मला करायला सांगितले तेंव्हा मी विचारले तर मला सांगितले ती तुझी आई आहे. सगळे एकच बोलत आहेत... ही कोठी तुला सांभाळावी लागणार आहे.
आंटी होती तेंव्हा वाकड्या नजरेने कोणी पहायची हिम्मत नव्हती पण आता…"

रामला काय बोलावे सुचत नव्हते. तिच्या सोबत जरा वेळ बसून राम निघाला. त्याचा पाय निघत नव्हता मात्र बरेच जण बघतायेत हे लक्षात आले अणि तो तिथून बाहेर पडला.
राम ऑफिसमध्ये सगळ्या फाईल्स फक्त घेऊन बसला होता. त्याचे लक्ष कशामध्येच लागत नव्हते. तो उद्याची वाट बघत होता. चंपाच्या आयुष्याचा प्रश्न होता. काय करेल ? सगळं तिच्या हातात होत. तिचा होणारा एक निर्णय आयुष्य बदलणार होता. तिथून निसटन एवढं सोपं नव्हतं चंपाला एकटीला सोडून यायला नको होतं. चंपाला भल्या बुऱ्याची जाण आहे ती घेईल तो निर्णय योग्य घेईल.

चंपाला चाचा समजावत होता.
"चंपा गिऱ्हाईकाची लाईन लगेगी तुझ्यासाठी...तेरी आय व्हती म्हणून मै गप ऐकत व्हतो पण अब नही. तुझे धंद्यावर बिठाके पैसे कमवायचा ते लावली भायर कामाला...चंपे आग महिनेमे जितना कमवतीसना ते एक दिनमें कमवशील… बड़े बड़े गिऱ्हाईक आंटी गेल्याच कळल्यापासून तेरे लिये नंबर लगाके बैठे है| आता मै काय सुनेगा नही तेरा, आयाच व्यवहार करके पण तू जर न्हाय म्हंटलीस तर तेरी माँ नही अब मुझे ना बोलने के लिये|"
चंपा शांत ऐकत होती.

"चाचा मी नाही म्हणणार नाही ...पण आज नको मला थोडा वेळ दे."

"ही माझी पोरगी… साबास..." चाचा खुश झाला,
"तू हा बोली इसमें मेरा काम निम्मं झालं आज काय नि उद्या काय… चंपे अब खरा ह्या कोठीवर धंदा होयेगा. आजकी रात्र तुझी. " चाचा खुश होऊन निघून गेला… चंपाचे डोळे पाण्याने भरले.
"कोण मदत करेल की या नरकाचा स्वीकार करावा लागेल…? पळून गेले तर... पण कुठे ? कोण मदत करणार आणि का?" चंपाला विचार करायला जराही वेळ नव्हता तिच्याकडे फक्त आजची रात्र होती. गौरी तिच्या बाजूला झोपली होती.
"ताई आज जी भरके सो ले... उद्यापासन झोपायला नाही मिळनार..." गौरी हसत होती. चंपाने गौरीकड़े पाहिले.
हिला आनंद होतोय... मी इथे तिच्यासारखी... गौरी मला कुठल्याच मुलीने या व्यवसायामध्ये याव अस वाटत नाही आणि मी तर मुळीच येणार नाही. मला माहित आहे आंटी होती म्हणून मान मिळत होता. आता ती नाही... या आधी सुद्धा बऱ्याच जणांना माझा हेवा वाटत असणार हे मला त्यांच्या नजरेत दिसले आहे. मी इथे या सर्वांसारखी सर्वसाधारण होणार म्हणून किती जणींच्या मनामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतील. नाही... हे अशक्य आहे. चंपा खोलीत येरझाऱ्या घालत मनामध्ये बोलत होती.
बॅग घेतली तर या सर्वांना संशय येईल रात्र खूप झाली होती . तिने बुरखा घातला आंटीचे दागिने तिचे दागिने आणि पैसे घेतले. बाहेर पडायची मुश्किल होती पण जे होईल ते होईल या विचाराने ती निघाली. पाय बाहेर टाकताच तिला चाचाचा आवाज आला.
चाचा फोन वर बोलत होता.

लडकी तैयार हे आप कल कॅश लेके आ जावो… खुश होके जावोगे.
रश्मी आज वैतागली होती. साले खडा नही होता तो कायको मेरा वक्त बरबाद करने के लिये आता हें। तसा कष्टमर उभा राहिला. साली तुझमे दम नही हे ये बोल, सिर्फ पांव फैलाके सोती हें। फोकड नही आता किंमत देता हूं तेरे वक्त की, हरामी साली.. कष्टमर कपडे चढवतो आणि निघून जातो.
भाडखाऊ साला मुझे शानपत्ती सिखाता हें। इसिलीये तो बीबी सोती नही होगी इसके साथ। रश्मी बडबडत करत कपडे घालत होती.
चाचा खुशीतच बाहेर पडला. चंपाने जरा चाहूल घेतली आणि बाहेर पडली तोच रश्मी दिसली.
अरे ये कौन आंटी के कोठी से बाहेर जा रहा हे रुक... रश्मी जोरात ओरडली.
रश्मीच्या आवाज चंपा ने ओळखला. चंपा थांबली.




राहून मीच विचारलं
माझी चूक काय होती…?
तेंव्हा,
समोरून उत्तर मिळालं,
तू एवढं गुंतायला
नको हवं होतंस...



क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत.


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED