Unexpected Love - 1 saavi द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

Unexpected Love - 1

रूद्र आर्या

" mom dad.... कोल्हापुर मध्ये राहण्यासाठी घरांची कमी आहे का जे तुम्ही त्या आर्या ला आपल्या घरी आणत आहात?? ", रूद्र वैतागत म्हणाला... त्याला त्याच्या मॉम डैड च्या बेस्ट फ्रेंडस् ची मुलगी आर्या अजिबात आवडत नव्हती..

" रूद्र!!!! ... काय असा लहान मुलांसारखा वागतो आहेस??? एक नावाजलेला बिझनेसमेन आहेस तू... आणि आर्या शी तुला काय प्रॉब्लेम आहे??? किती गोड मुलगी आहे ती??? ", रूद्र ची आई त्याच्यावर गरजली....

" गोड नाही... फुगलेल्या पूरी सारखी आहे तुमची आर्या... जिला खाण्या आणि कोणाला त्रास देण्या व्यतिरिक्त काहिच येत नाही....", रूद्र पण शांत बसायला तयार नव्हता...

" तू शेवटचा कधी भेटला होतास तिला?? 10 वर्षा पूर्वी... हो ना??? फक्त 15 वर्षांची होती ती तेव्हा...तुला काय माहिती आहे तिच्याबद्दल??? ज्या व्यक्तीला आपण पुर्णपणे ओळखत नाही ना.. त्यांच्या बद्दल उगीच काहीही मत बनवू नये...", रूद्र ची आई चांगलीच तापली होती.... तिच्या आर्या बद्दल कोणी काही बोललेलं तिला अजिबात चालत नव्हतं... मग तो तिचा सक्खा मुलगा असला तरी....

" आई मी खरंच तुझाच मुलगा आहे ना... की कुठून उचलून आणलं होतंस??", रूद्र वैतागून म्हणाला.... त्याची आई असून सारखी आर्या आर्या करत होती जे त्याला अजिबात आवडलं नव्हतं....

" काय वेडेपणा आहे हा?? कसे प्रश्न विचारत आहे हा मुलगा?? ", रूद्रची आई त्याला रागात बघत होती....

रूद्रचे बाबा आणि छोटा भाऊ सिध्दार्थ सोफ्यावर बसून या दोघांचे भांडण एन्जॉय करत होते... हे भांडण त्यांच्या साठी नवीन नव्हते...

" dad... तुला काय वाटतं?? कोण जिंकेल?? मागच्या भांडणात आई जिंकली होती...", सिद्धार्थ त्याच्या वडिलांना म्हणाला...

" अरे माझी बायको भांडण्यात एक नंबर आहे.. तिच जिंकेल बघ .... आमच्या लग्नाला एवढी वर्षे झाली तरी एक पण भांडण मी जिंकलो नाही... मग तुझी आई कशी हरेल??", त्याचे dad त्याला दुजोरा देत म्हणाले...

दोघेही एकमेकांना बघून हसू लागले...

" dad... काय आहे हे.. समजावा ना मॉमला... ती आर्या कशाला हवी आहे तुम्हाला या घरात.. नुसता वैताग आलाय.... ", रूद्र ला त्याच्या आईशी बोलण्यात जिंकता येत नव्हते... म्हणून त्याने त्याच्या वडिलांना हाक मारली...

" dad काय dad?? त्यांना काहिच प्रॉब्लेम नाहिये माझ्या आरु चा.. ते कशाला काहि म्हणतील?? ", रूद्र ची आई परत एकदा त्याला बडबडली...

" हो बरोबर... dad ला कशाला त्रास होईल तुमच्या लाडक्या आरुचा.. after all she's your best friend's daughter.... एवढे तिचे लाड करतात जसं की ती तुमचीच लेक आहे... आना तिला या घरात.. पण माझ्याशी जर ती नडली ना तर लक्षात ठेवा... अजिबात तिला सोडणार नाही मी... ", रूद्र मुद्दाम आरु शब्दावर जोर देतो... आणि सरळ सरळ त्यांना धमकी देत त्याच्या रूममध्ये निघून गेला...

" काय यार किती लवकर ड्रामा संपला... चल ते पण ठिक आहे... चल मॉम dad मी पण जातो माझ्या रुम मध्ये... स्टडी करायचा आहे... ", म्हणत सिद्धार्थ पण त्याच्या रूममध्ये निघून जातो...

रूद्र ची आई आणि वडील सोफ्यावर बसतात...

" या मुलाला काय त्रास होतो माझ्या मुलीचा काय माहित?? ", रूद्रची आई सुस्कारा सोडत म्हणाली...

" अगं तो अजुनही आरु ला तिच आरु समजतो जी लहानपणी खोडकर होती... 10 वर्षात तिच्यात किती बदल झालाय हे त्याला कुठं माहित आहे?? ", रूद्रचे वडील तिला समजावत म्हणाले...

" बघू आता.. पण उद्या आरु येणार आहे.. तिच्या साठी तिचं सगळं आवडीचं बनवणार आहे.. किती वेळ झाला तिला भेटलोच नाही आहोत... ", रूद्रची आई आर्या ला आठ्वत म्हणाली..

" उद्या भेट होईलच ना... मनभरुन बघून घे तिला.. ", रूद्र चे बाबा हसत म्हणाले...

" अहो मला खरंच आर्या खूप आवडते.... आपल्या रूद्र सोबत किती छान जोडी दिसली असती... पण हा रूद्र आहे की तिला नजरेसमोर बघायला पण तयार नाहिये... कसं व्हायचं??", रूद्र ची आई हताश होऊन म्हणाली...

" अगं... तु एवढी अपेक्षा का करतेस त्या मुलांकडून?? ते आता लहान नाहीयेत... ते त्यांचा जोडीदार निवडू शकतात... आपण जबरदस्ती नको करायला... आणि आता आर्या ही लहान नाही... ती पण तिच्या आयुष्याचे निर्णय स्वत: घेऊ शकते... ", रूद्र चे वडील म्हणाले..

" पण मला खरंच काळजी वाटते आहे आपल्या रूद्रची.. जेव्हापासून त्याने आर्मी मधून retirement घेतली आहे... तेव्हापासून खुपच चिडका झाला आहे... आता आर्मी मध्ये नसला तरी त्याचा तो कडक स्वभाव अजुनही तसाच आहे.. होईल का तो पुन्हा नॉर्मल?? लग्नाचा विषय काढल्यावर असा चिडतो की विचारयलाच नको.. 30शी जवळ आली तरी काही अजुन पत्ता नाही लग्नाचा..", रूद्रची आई टेंशन मध्ये म्हणाली...

" अगं नको विचार करूस जास्त... होईल सगळं नीट.. फक्त विश्वास ठेव... आपला रूद्र लवकरच नॉर्मल होईल...", रुद्रचे बाबा म्हणतात... त्यांच्या बोलण्यातून जाणवलं की त्यांनी काहीतरी ठरवलं आहे..

रूद्रची आई ही शांत होते..
थोडयावेळ दोघेही बोलत बसतात.. आणि मग झोपण्यासाठी त्यांच्या रुम मध्ये निघून जातात...

क्रमशः

नवीन कथा लिहायला सुरवात करते आहे... i hope तुम्हाला आवडेल .... सदर कथा फक्त मनोरंजनासाठी आहे... कोणत्याही व्यक्तीच्या शारिरीक आणि आंतरीक सौंदर्याचा अपमान करण्याचा हेतू नाही... फक्त कथे साठी काही शब्द वापरले आहेत...
काही चुकीचं आढ्ळल्यास माफी असावी...

कथा आवडल्यास कॉइन आणि कमेंट नक्की करा...