Haiwan a Killer - 4 books and stories free download online pdf in Marathi

हैवान अ किलर - भाग 4

भाग 4

हायवे नंबर चारशे पाच म्हंणायला पाच तासांचा होता. आणी अडिज तासाचा हायवे पार केल्यावर एक गाव लागायच, एक छोठस दोनशे-अडीज:शे वस्तीच गाव. हे गाव केव्हापासुन इथे आहे ? आणी कधी वसल? कोणि ह्या गावाच साक्षात्कार केल? लोक इथे केव्हापासुन रहायला आली? आतार्यंत कोणत्याही वाटसरुला हे माहीती नव्हत. शायनाने पाचवा गियर शिफ्ट करुन गाडीला असा काही चपराक बसवला होता. की गाडीच स्पीड आता दोनशेच होत.गाडीच्या काळ्या टायर्सना मधोमध बसवलेल्या सफेद रंगाच्या भिंग-या, हेलिकॉप्टरची पात जशी अतिवेगाने फिरावी तशी फिरत होती. रस्त्यावर जे काही एकदोन पानांचे तुकडे पडलेले असायचे ते गाडीच्या वेगाने हवेचा मारा बसुन काही सेकंद वर हवेत उडून पुन्हा खाली येत होते. शायना एकटक स्टेरिंग हातात धरुन अगदी शिताफीने गाडी दमडावत होती. तिच्या पातळसर भुवया जराश्या भेदक झाल्या होत्या. डोळे जरासे बारीक करुन पापण्या उघडझाप करत अगदी हैवी ड्राईव्हर असल्याप्रमाणे ती विंडो ग्लास मधुन पुढे पाहत गाडी चालवत होती. शायनाच्या कपाळापासुन थोडस वर एक काचेचा आरसा दिसत होता. त्या आरश्यात मागचा हायवे आणी मधोमध असलेली सरळ सफेद रंगाची लाईन दिसली जात एक काळा लहानसा टीपका दिसत होता. जो ऐंशी -नव्वद मीटर दूर असून हळू हळू पुढे येत होता. शायनाच्या फोर्च्युनरच्या वेगाला मागे सोडत अगदी अमानवीय वेग घेत तो काला टिपका पुढे-पुढे येत होता.आणी जसा तो काळा टीपका पन्नास मीटर अंतर कापुन पुढे आला.तस दिसल.की ती एक अशुभ काळ्या रंगाची ट्रक आहे, ट्रकच्या इंजीनच्या टाकीवर एक लाल रंगाच्या घुबडाच चित्र असून डोळे पिवळेजर्द आहेत. ड्राइव्हसीट पुढे असलेले दोन मोठाल काच काळ्या रंगाचे असुन अस वाटत आहे, की त्यात असीम अंधार जणु कोंबला आहे. नी तो अंधार मुद्दामुन त्या ड्राईव्हरचा चेहरा दिसु देत नाहीये. पन असं का? चेहरा दिसला तर अस काय घडेल?

काही संकट ओढावणार का पाहणा-यावर? की काही क्लिष्ट, अमानविय, तामसी, अघोरी, क्रुर, हिंस्त्र, जनावर त्या वाहनास हाताळतआहे, जे पाहणा-याच रक्त लुचेल, हात, पाय, डोक, मेंदू, मानवी देहाच्या एक नी एक अवयवाचा फडश्या पाडेल.

विंडो ग्लासमधुन ताणलेल्या भुवयांसरशी पुढे पाहत शायना ड्राईव्ह करत होती! म्हंणुनच मागे असलेली ती ट्रक, तिचा पत्ता अद्याप शायनाला लागला नव्हता.

शेवटी शायनाला विलेज 405 दिसली . सर्वप्रथम तिच्या नजरेस मक्याची मोठ-मोठ्या कणसांची हिरवी शेत दिसली.मग त्या शेतापुढे लाकडांपासुन बनवलेली परदेशी जमाती मध्ये राहणा-या मांणसांची जशी घर असतात, त्याचप्रकारची घर दिसली. आणी सरळ रस्त्यावर पाहता एक दोन विजेच्या लाकडी खाबांपासुन थोड दुर एकदोन हॉटेल्स दिसले. पन हॉटेलसची नाव मात्र दिसत नव्हती. कारण अंतर दुर होत. शायनाने हलकेच गियरवर हात ठेवल आणि पाचव गियर उतरवल, मग चौथा, तीसराही. गियर कमी होताच शायनाच्या गाडीच स्पीड कमी होऊ लागल. पन मागे ? मागे असलेल्या त्या ट्रकच काय ?

तसंही सामान्य मानवी तर्कांनुसार पाहता त्या ट्रकच्या इंजीनचा बाकी ट्रकनुसार आवाज यायला हवा होता ! पन तो आवाज येत का नव्हता? गाडीची चारही मळलेली लाल रंगाने माखलेली फुगीर काळी पिसाळलेल्या सर्पा सारखी चाक, हायवेच्या रस्त्यावर फिरायला हवी होती ?पन ह्या ट्रकच्या टायर्स सहित ही संपुर्णत ट्रकच हवेत तरंगत होती ! बापरे कीती अविश्वासनीय दृष्य! नाही का? शायनाने विंडो ग्लासमधून एकनजर पुढे टाकली. काही अंतरावरच विलेज 405 दिसत होती. गाडीच स्पीड जेमतेम साठ होत मंद गतीने गाडी पुढे निघालेली. शायना एकटक आश्चर्यकारकरित्या पुढे पाहत विलेज 405 ची घर, दार, हॉटेल सर्वांच निरीक्षण करत होती. की तेवढ्यात एक अक्ल्प्निय, मानवी तर्काला लाजवेल अस दृष्य घडल.वर आकाशातल्या पांढ-या शुभ्र मेघांना , क्षणात, सेकंद काट्यागणिक अंधारीकाजळी फासली गेली, आकाशात गोल वादळी चक्राची छवी काहीक्षण शायनाला दिसली जात, एक जोरादार निल्या रंगाची वाकडी तिकडी विज कडाडली. काहीमिनीटांपुर्वी शुभ भासणार वातवरण, घरात कोणि अचानक मयत पावाव तस सुतक लागल्यासारख अशुभनीय झाल. ह्या समंध भुतळावर कोण्या अतृप्त, अघोरी, क्लिष्ट, तामसी, कृल्पती, अशुभ, अमानविय, अक्ल्प्निय, अखंड शक्तिचा शिरकाव झाल्याप्रमाणे आकाशातला सुर्य काहीक्षण भेदरुन जात त्या काळ्या ढगांच्या पदराआड गप्प गुमान लपून बसला. शायना आ-वासुन, डोळे फाडुन पुढील घडणा-या अक्ल्प्निय देखाव्याची एकमेव वारस झाली होती..तिने बदलेल्या ह्या वातावरणाच रुप उभ्या डोळ्यांनी पाहिल होत, पाहत होती.

तिच्या फोर्च्युनरमध्ये काळ्या कोळश्यासारखा रेघोट्या मारल्याप्रमाणे अंधार चिकटला जात होता, गाडीच्या आतल छप्पर, मागचे सीट सर्वकाही अंधारत बुडाले होते. मागची विंडो काजळी फासल्यासारखी काळी झाली होती..मागचा रस्ता, ती ट्रक काहीही दिसत नव्हत.

शायनाच्या गाडी मागे असलेल्या त्या काळ्या ट्रकच्या आतमध्ये..

 ड्राईव्ह सीटवर एक आकृती बसलेली दिसत होती. त्या आकृतीची उंची एका सैतानासारखी आठफुट होती. डोक्यापासुन ते कमरेपर्यंतच फुगिर बलदंड हातांच शरीर, बर्फासारखा वाफाळत होत..ज्याशरीरातुन दुर्गंध, ओकारी आणणारा, घाणेरडा दर्प असलेला, असहनीय वास सुटलेला. जसा प्रेताला सुटतो. त्या आकृतीच्या डोक्यावर पांढरे चकचकीत केस होते.. रुंद कपाळ, हिरवे लुकलूकणारे जहरी डोळे, उभा खप्प्ड चेहरा, त्यावर टोकदार चेटकीणीसारख नाक, आणि भयाण विचकलेल्या जबड्यातल्या धारधार चौकलेटी दातांच दर्शन घडून येत

हनुवटी जराशी पुढे आलेली. कमरेपासून खाली एक चौकलेटी रंगाची पेंट घातलेली होती, पायांत दोन चकचकीत काळे बुट होते..ज्यांचा चालताना मोठा भयावह (टोक, टोक)अवाज होत होता. समजा सावज आणि शिका-याच लपाछपीच खेळ सुरु झाल तेव्हा हा आवाज मनात धडकी भरवणा-यांमधला होता. त्या ट्रकच्या काळ्या विंडो ग्लासमधुन 

थोड खाली एक फोर्च्युनर धावताना दिसत होती. ज्या फोर्च्युनरमध्ये बसलेल्या शायनाच्या पाठमो-या आकृतीकडे पाहत, ह्या सैतानाने हळकेच आपली सरड्यासारखी लवचिक चौकलेटी जिभ, काळसर ओठांवरुन फिरवली, आणि तो बळदंड फुगीर पांढरट हात वाढवुन स्टेरिंगच्या खाली नेत -त्या सैतानी ट्रकची चावी फिरवली..!

शायनाच्या फोर्च्युनरला काळ्या अंधारीची मीठी मारली गेलेली..संपुर्ण गाडी अंधारी बोगद्यातुन जावी तशी भासत होती. कारण त्या गाडीअल्त काळोख पसरलेपा शायनच सर्व लक्ष पुढे बदललेल्या वातावरणावर होत! ते काळे ढग त्या ढगांच्यात चमकणा-या विषारी निलसर विजांचा प्रकाश तिच्या डोळ्यांतल्या बुभलांत ऊमटलेला दिसत होता. पन मला काही शंका येत आहेत! नक्की बदल्ल होत का हो ते वातावरण?की त्या अमानवीय शक्तिने एका मोहीनीने तिला भुळ पाडली होती? हव तसं दृष्य दाखवुन, तिला त्या भ्रमनिरास जाळ्यात ओढुन घेतल होत?

ट्रक मध्ये असलेल्या त्या विद्रूप ध्यानाने चावी फिरवताच, सर्वप्रथम

ट्रकच्या इंजीनचा विशिष्ट प्रकारचा घर्रघरता आवाज झाला (घृरर्रर्रर)

मागची मोठी काळसर नळी तोंडातुन काळधुर फेकत गरजली, मग अमानविय शक्तिने हवेत तरंगणारी ती ट्रक धाडकन बिन आधारासहित हायवेवर कोसळली..चार टायर्सचा स्पर्श रस्त्याला होताच..पुढच्या दोन पिवळेजर्द हेडलाईटस चमकल्या, नी त्याचक्षणी पुढे असलेल्या शायनाच्या फोर्च्युनर गाडीच्या आत पसरलेल्या काल अंधारात, मागच्या विंडोला चिकटलेल्या काळ्या काजळीतुन दोन मोठ्या गोल हेडलाईटचा

प्रकाश संपुर्णत गाडी उजळून टाकत आत आला, आणी त्याला जोड म्हंणुन एक काळजाचा ठोका चुकवणारा, कानठळ्या बसवणारा [पोंमऽऽऽऽऽऽऽऽ] हॉर्नचा आवाज मंद गतीने शायनाच्या कानांत घुमला..

कानांतल्या पातळ पडद्यातुन..पुढे जाऊन थेट मेंदूत घुसला.चारशे चाळीस व्होल्टेजचा झटका बसल्यागत जसा एक वेडा हुशार व्हावा तस शायना त्या वेड भ्रमित दृष्यांमधुन थेट शुद्धीवर आली.. की तेवढ्यात त्याचवेळेस तिच्या गाडी मागे असलेल्या काळ्या ट्रकने..पेटलेल्या लाल हेडलाइटस सहित तिच्या गाडीला धडक दिली. शायनाच सर्व शरीर सीट बेल्ट न बांधल्याने वाकड तिकड हळल गेल.. ! मनात भीतीची भावना उफाळून आली. मागे असलेला तो ट्रक किलर आता कोणत्याही क्षणी आपल्याला चिरडणार! धडक बसताच ट्रकच आणि गाडीच अंतर पुन्हा वाढल होत..तशी ती ट्रक पुन्हा एकदा शायनाच्या फोर्च्युनरला धडक देन्यासाठी गाडीचे लालसर चक्र फिरवत , नळीतुन काळसर धुर उडवत..इंजीनचा घर्रघर आवाज करत पुढे येऊ लागली..!

(पोंमऽऽऽऽऽऽ) पुन्हा एकदा तोच विचित्र खर्जातला हॉर्नचा आवाज चौहीदिशेना घुमला. शायनाने पुढे असलेल्या आरशातुन भयग्रस्त भाव चेह-यावर ठेवून मागे पाहिल.काळ्या रंगाची तीच ती ट्रक पुढचे दोन हेडलाईटस चालू असलेल्या अवस्थेतच पुढे पुढे येत होती.कोणत्याही क्षणी एक वेगवान धडक बसणार..की तोच शायनाने मागचा पुढचा काहिच विचार न करता थेट उजव्या बाजुला स्टेरिंग फिरवली. शायनाची फोर्च्युनर अगदी वेगाने रस्त्यापासुन विलग होऊन थेट मक्याच्या शेतात घुसली, मग मोठ-मोठ्या मक्याच्या कणसांना तुडवत, पुढे जाऊ लागली. शायनाच्या विंडो ग्लासवर मक्याच्या कणसांचे फटके बसु लागले. त्यांचा फट, फट असा फटाके फुटावे त्याप्रकारे आवाज हो. शेवटी शायनाने करकचुन ब्रेक मारला.. तसे दोन्ही चाक जमिनीला घासत काही मीटर गाडीला आपल्या समवेत सोबत घेऊन जात हळुच थोड दुर थांबले गेले. शेवटी शायनाने एक मोठा श्वास घेत तो सोडत स्टेरिंगवर डोक टेकवल.

×××××××××××××××××

" हाई सर ! " निल ने खिडकीजवळच्या सीटवर बसलेल्या त्या स्पाईसारख्या दिसणा-या मांणसाला म्हंटले. निल च्या वाक्यावर त्याने फक्त त्याला खालून वरपर्यंत नेहाळल. एक चकार शब्दही उच्चारल नाही. निल गप्प त्याच्या सीट बाजुला बसला. त्याच्या मनात ह्या मांणसाविषयी त्याच व्यक्ती महत्व जाणून घेण्याची इच्छा जागृत झालेली.आणी अटीट्यूड ईगो माहीत नसलेला निल त्याला असंच सोडणार थोडीना होता.

" सर माझ नाव निलेश उर्फ निल ! आपल परिचय ?"

निल ने आपला हात हँडशेक साठी पुढे केला. तस त्या मांणसाने हळकेच आपला उजवा हात वर उचल्ला.निल ला वाटल हा सुद्धा आता आप्ल्याशी हात मिळवणार, दात काढत निल त्याच्या हाताच्या दिशेने पाहू लागला..पन झाल ऊलटच.त्या मांणसाने आपला उजवा हात डाव्या हातात असलेल्या काळ्या चौकोनी स्मार्टवॉचकडे नेला..आणी हळकेच दहा बारा वेळा टच केल. तो पर्यंत निल ने जीभळ्या चाटत गप गुमाने आपला पुढे केलेला हात मागे घेतला होता. ईकडे त्या मांणसाच्या काळ्या चौकोनी स्मार्टवॉचमध्ये हिरव्या रंगाचे हेकिंग कॉड़स अगदी जलद वेगाने काहीतरी सर्च करण्यात व्यस्त होते.

" सर्च सक्सेसफूल !" त्या वॉचमधुन हळकेच एक आवाज आला, आणि एक इंग्रजीत नाव ही दिसल. पुढच्याक्षणाला त्या वॉचमध्ये निलचा हसरा चेहरा व पर्सनल बायोडेटा त्यात दिसु लागला, जन्मापासुन ते आतापर्यंतच सर्व इन्फॉर्मेशन, महत्वाची कागदपत्रे, व्यव्साय, आवडी, निवडी, त्याची गर्लफ्रेंड, काही मोजक्या मित्रांची माहीती, इतकेच नाही तर त्याची बैंक रक्कम सुद्धा तिथे दिसत होती.

" हाई मिस्टर निल ! " काहीवेळाने तो माणुस प्रथमच म्हंणाला. त्याचा आवाज भारदस्त होता.आवाज येताच निल ने गर्रकन मान वळवून त्याच्याकडे पाहील. गो-यापान चेह-याची लालसर त्वचा ऑईली होती..

अस वाटत होत! कोणि फाईटरच असाव. कपाळावर एक वाकडी तिकडी नस उमटलेली, केस चोपुन मागे बसवलेले. निल ने त्या माणसाकडे पाहताच त्याने आपला डोळ्यांवरचा काळ्या चौकोनी फ्रेमचा चष्मा काढुन कोटच्या वर खिशात अडकवला. त्या माणसाचे डोळे लहानसर असुन घारे होते. भुवया पातळस ल्र होत्या.

" हाई सर !" निल ने पुन्हा हात हँडशेक साठी वाढवला.ह्यावेळेस दोघांनाही हात मिळवणी केली.

"सर तुमच नाव? " निलने हसत विचारले. 

" माय नेम इज मार्शल ! "

" ओव ! मार्शल " निल ने ओठांचा चंबु केला.

" व्हॉट ! काय झाल ?" मार्शलच्या वाक्यावर निल जरासा हसला व पुढे म्हंणाला.

" तुमचे कपडे आणि हे नाव ऐकून तर मला तुम्ही कोणी मोठे स्पाई असल्यासारखे वाटताय !" निल हसतच होता.

" हो मी एक एजंट स्पाईच आहे ! " मार्शल सीटवर ताठ बसुन थंड नजरेने पुढे पाहत इतकेच म्हंणाला. त्याच वाक्य ऐकून हसणारा निल क्षणात गप्प झाला.

" तुम्ही माझी चेष्टा करताय का?" निल ने दात दाखवत पुन्हा हसत विचारल.

" नाही ! आई हेट चेष्टामस्करी! " मार्शल त्याच थंड नजरेने भारदस्त आवाजात म्हंटला. मार्शलच वागण-बोलणच अस होत ! कि तो खोट बोलत आहे! हे निलच अंतरमन ही विचार करु शकत नव्हत. त्याचे ते लहानसर घारे डोळे अगदी थंडपने शुन्य भाव घेऊन एकटक पुढे पाहत होते..आणी निल आ-वासून त्याच्याकडे पाहत बसलेला.

" प..प..पन तुम्ही स्पाई आहात मग मला तुमची ओळख का सांगत आहात?" निलच्या वाक्यावर मार्शलने हळुच मान वळवुन त्याच्याकडे पाहिल व गंभीरपने म्हंणाला,

" कारण तुझ आणि माझ टारगेट एकच आहे!"

 

क्रमश :

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED