भाग 5
पाहिला बळी..
विलेज 405 मध्ये एकुण सत्तर -ऐंशी घरांची वस्ती होती. त्यात काही कपड्यांची दुकान, किराणा स्टोरर्स, हॉटेल्स सुद्धा होते. गावातली घर सोडली की जरा दुर, एक ख्रिश्चन मंदिर होत. मंदिराला चारही बाजूनी पंधराफुट भिंती होत्या. सफेद रंगाच्या मंदिराच्या पुढच्या भिंतीवर दोन झापांच्या बारा फुट उंच मोठ्या दरवाज्यावर एक लाकडी क्रॉस बसवलेला होता. आणी दरवाज्याच्या दोन्ही तर्फे थोड दुर चार फुट अंतर सोडून दोन झापांच्या विविध रंगी काचेच्या दोन बंद खिडक्या होत्या. ख्रिश्चन मंदिराच्या अवतीभोवतीचा परिसर सोनेरी गवताने सजलेला होता. जस की मी म्हंणालो होतो? की ख्रिश्चन मंदिर विलेज 405 पासुन लांब आहे.म्हंणुनच मंदिराजवळ ऐंशी-नव्वद मीटर अंतरा पर्यंत घर दिसत नव्हती.सर्व कस दुपारच्या उन्हात भ्क्कास वाटत होत. एक अभद्र शांतता पसरलेली त्या शुभ स्थळी. ख्रिश्र्चन मंदिरावर पिरेमीड आकाराच तपकीरी कवलांच छप्पर होत. आणि त्या पिरेमीड छप्परावरुन मागे पाहता. ते पांढरट कबरिंच त्यावर मागे क्रॉस असलेल..कब्रस्तान दिसत होत. कब्रस्तानाला चारही बाजुनी टोकदार तारांच कंपाउंड बसवलेल. कंपाउंड बाहेर एक दोन मोठी उंच झाड होती. आणी त्या झाडांपुढे मधोमध पांढरट कबरी ज्यांच्या आत मूडद्यांची सेना गाढ निद्रेत झोपलेली. हे सर्व दृष्य त्या तपिरेमीड आकाराच्या छप्परावरुन दिसत होत.की मंदिरातुन कसला तरी कुजबुज, बोलण्याचा आवाज येऊ लागला. या पाहूयात काय सुरु आहे आत. ख्रिश्चन मंदिरात एक मोठा विशाल हॉल दिसुन येत होता. हॉलमध्ये डाव्या आणि उजव्या बाजुला त्याच रंगीबेरंगी काचेच्या दोन बंद खिडक्या होत्या. बंद खिडक्यांमधुन आत येणा-या रंगीबेरंगी धुसर प्रकाशात पुढील दृष्य दिसत होते. हॉलमध्ये डाव्या आणि उजव्या बाजुला लाकडाच्या खुर्च्या भगवान येशुच्या भक्ताना प्रार्थना करत बसण्यासाठी एका रांगेत ठेवल्या आहेत. पुढे एक भगवान येशुची
क्रॉसला हाता पायांना खिले ठोकलेली मूर्ती दिसत होती. आणी मूर्तीसमोर एक पांढरट कपडे घातलेला, गळ्यात येशुच बेरीज चिन्हाच क्रॉस असलेला म्हातारा केस पिकलेला पाद्री (फादर ) उभा होता. त्याच वय जेमतेम साठीच्या पुढे होत.
" हेय भगवंता! आज पुन्हा एकदा तो दिवस उजाडला आहे ! ज्या दिवशी तो सैतान ह्या गावावर घराघरांत मयताच थैमान घालतो. हा उभा आसमांत ही थरथरतो त्याच्या पाश्वी, विकृत कृत्यांना पाहून. गेली कित्येक वर्ष हे गाव त्या सैतानाच अत्याचार मुकाट्यान सोसत आहे.
पण अजुन किती सोसणार ही लोक? का तु ह्या गोरगरीबांची अशी परिक्षा घेतो आहेस?भगवंता आता तरी काही चमत्कार घडवुन आण!
त्या पाश्वी हैवानाच संहार करुन टाक." त्या ख्रिश्चन (फादर)पाद्रीने अस म्हंणतच.आप्ल्या छातीवर क्रॉसची खून करत पाया पडून, दोन्ही हातांना जोडत विशिष्ट प्रकारे मुठ आवळून डोळे बंद केले. पाद्रीच्या पुढे एक दहा-अकरा फुट लांबीचा कडक निळसर रंगाची चादर अंथरलेल टेबल होत. त्या टेबलावर पांढरट रंगाच्या मेणबत्त्या जळत होत्या. तर बाजुलाच त्या टेबलावर एक मोठी काळ्या रंगाची शवपेटी ठेवलेली दिसत होती. आणी त्या शवपेटीवर एक गोलसर फुलांचा गुच्चा ठेवलेला दिसत होता. जो मृत प्रेताच्या छातीवर किंवा बाहेर ठेवला जातो. आपल्या हिंदू जाती धर्मात अस केल जात नाही! प्रत्येक धर्माची अंत्यविधी आगळी वेगळी असते. काही देशांत तर मृत प्रेताची अंतयात्रा मोठ्या आनंदाने वाजत, गाजत, नाचत, ढोल ताश्यांच्या गजरात निघते..तर काही देशांत अंतयात्रा अगदी भयावह पाहणा-याच्या काळजात भयाचा बान घुसून अटेक येइळ अशी निघत असते. असो आपण कथेकडे वळूयात. पाद्री डोळे बंद करुन येशुच्या मूर्ती समोर उभा होता. सफेद रंगाची येशूची मूर्ती खाली मान घातलेल्या अवस्थेत होती.की अचानक भगवान येशूच्या डोळ्यांतुन रक्ताचा एक अश्रु हळकेच बाहेर निघाला जात शरीरावरुन खाली आला.हळू-हळू डोळ्यांतुन थेंब-थेंब बाहेर येणा-या रक्ताची मात्रा वाढु लागली, धारे सारखा लाल रक्त दोन्ही डोळ्यांतुन पाझर फुटल्याप्रमाणे बाहेर पडू लागल, मग हलूच हात वर केलेल्या पंजातुन, खाली गुढघ्यांतुन सुद्धा रक्त
वाहायला सुरुवात झाली. मूर्ती पुढे उभ्या पाद्रीने दोन्ही डोळे उघडले.डोळे उघडताच त्याला येशुच्या डोळ्यांतुन, दोन्ही हाताच्या पंज्यामधुन, गुढघ्यातुन पाण्याप्रमाणे लाल रंगासारख काहीतरी? वेगाने बाहेर पडताना दिसल.पाद्रीने हळकेच एक आवंढा गिळला. ते लालसर द्रव काय आहे ? हे जाणून घेण्यासाठी आपला एक हात पाद्रीने पुढे वाढवुन हलकेच येशूच्या पायांवरुन ओघाळणा-या त्या लाल द्रव्यास स्पर्शला..
पाद्रीने हाताच्या दोन बोटांची चिमटी केली..आणी ती एकमेकांवर घासत..हळकेच तो लाल रंगाने माखलेला पंजा नाकाजवळ आणुन त्या द्रवाचा वास घेतला.नाकपुड्यातुन त्या लाल रंगाचा वास आत जाताच
त्या पाद्रीचे डोळे चेंडू येवढे मोठे झाले..! श्वास नाकपुड्यांमधून घेण्याऐवजी ..तोंडावाटे आत घेतला जाऊ लागला..त्या पाद्रीचा आत्मा अक्षरक्ष तडफडू लागला. कारण त्या पाद्रीला हे समजल होत की साक्षात भगवंताच्या देहातुन रक्त बाहेर येत आहे.ह्याचा अर्थ काहीतरी
विध्वंस घडणार आहे! आकाशात काळ्या काजळी ढगांचा थैमान माजणार आहे. भुतळावर हैवानाची हैवानियत ओसंडून वाहणार आहे.
त्याच्या हातून निष्पाप लोकांच्या जिवाचा खेळखंडोबा जोरात चालणार आहे...चौही दिशेना शोकाकुल हंबरड़ा फोडण्याचे असुर उभा आसमंत दणाणून सोडणार आहेत. ती कालोखाची तिमीर काजळी सीमा ओलांडुन.. तो येणार ! तो येणार....! काळ्या ढगांनी गराडा घातलेल्या आकाशात जोरदार वीज कडाडली..एक मोठा कानठळ्या बसवणारा आवाज आणि निलसर शॉर्टसर्किट सारखा प्रकाश पुर्णत 405 विलेज गावावर अभद्र सावटाप्रमाणे पहूडला..! नी त्याच वेळेस ख्रिश्चन मंदिराबाहेर अचानक एक ट्रकच लालसर चाक पुढे येऊन ख्रिश्चन मंदिराच्या प्रवेश चौकटीपासुन थोड दूर येऊन थांबल. ट्रकच लाकडी दार कर्रकर्रत उघडल..मग दारातुन एक आठफुट उघड्या शरीराची पांढरीफट्ट आकृती उडी मारुन खाली उतरली...त्या आकृतीच्या चौकलेटी रंगाची पेंट, पायांतले चकचकीत बुट खालची माती हवेत ऊडवत काहीक्षण तिथेच थांबले. मग थोड्यावेळाने हळूच त्या आकृतीने आपले पाऊल मंदिराच्या बंद दाराच्या दिशेने वाढवायला सुरुवात केली..तसा चालताना त्या आकृतीच्या चकचकीत बुटांचा (टोक, टोक, टोक) आवाज होऊ लागला.
"ओह माय गॉड! अरे माझ्या देवा ! तो आला..! "
पाद्रीची पाचावर धारण बसली. ट्रकचा आवाज त्यांनी ही ऐकला होता. ह्याच अर्थ ते आल होत व ते अभद्र ध्यान एका साधारणश्या दरवाज्या मागे उभ होत.पाद्रीने एक कटाक्ष त्या बंद दरवाज्यावर टाकला. अद्याप बाहेरुन कसलीही हालचाल झाली नव्हती..पन पुढे होणार नाही ह्याची
शाश्वती कोण देणार? ते साधारणस द्वार त्या अभद्र, तामसी, पास्वी शक्तिला किती काळ रोखु शकणार होत? त्या हैवानाच्या एका लाथाडाने ही द्वाराचा चकनाचूर होईल! हे पाद्रीना ठावुक होत. आजुबाजुला विस्फारलेल्या नजरेने कुठे काही लपायला जागा मिळते का? हे ते पाहु लागले. की तेवढ्यात दाराच्या दोन्ही झापा कर्रकर्रत उघडल्या, बाहेरचा कालोखी प्रकाश हळकेच मंदिरात शिरला. नी दारात उभ्या असलेल्या त्या पांढ-याफट्ट बलदंड बाहू पार्थिवी(मृत -प्रेत) देहाच्या सैतानाच्या दोन विषारी हिरवटमय डोळ्यांना मंदिरात कोणीच दिसल नाही.
" फाहाऽऽऽऽदह्रर्रर्रऽऽऽऽऽऽऽ!" एक घोगरा खवखवता आवाज आवाज त्या मंदिरात घुमला. रामचंदचे काळे कोळश्यासारखे धार धार दात बोलताना दिसत होते.
" मी आलोय फादर ! बघ मी पुन्हा आलोय. गेल्या वेळेस तुम्ही मला अडवलत. कारण तुझा बाप ह्या गावात होता..पण आता तर तो ही जिवंत नाही. मग आता कोण आहे तुमचा वाली? कोण आहे तुमच्या सोबत.हिहिहिही..! मला माहीतीहेऽऽऽऽऽ! तु इथेच..! तु इथेच लपलायेस..? म्हाता-या..! आणि सर्व काही ऐकतो आहेस....ए बाहेर ये...? " रामचंदने हळकेच आपला डावा पाय मंदिरात टाकला..! क्षणार्धात येशू समोर जळणा-या अगरबत्त्या विझल्या.
त्याच्या चकचकीत बुटाचा टोक आवाज झाला...भिंतीवर आदळत..मग संपुर्णत मंदिरात, नी शेवटला..खुर्च्यांचा आसरा घेऊन लपलेल्या पाद्रीच्या कानांत शिरला.(टोक, टोक, टोक, टोक, टोक) मोठ मोठाल्या पाच पावलांच्या ढेंगा टाकुन त्या सैतानाने भगवान येशुला गाठल..
" ही, ही, खिखिखी, हा हा !" भयंकर पाश्वी हसु...!
" ए म्हाता-या बघ ! बघ तुझा हा देव ? इतक्या जवळ उभा असुन सुद्धा काहीही करु शकत नाही तो माझ..! "रामचंड आपले दोन्ही हात हवेत धरत येशूच्या मूर्तीकडे पाहून म्हंणाला. इकडे पाद्री खुर्च्यांमधुन मार्ग काढत अगदी शिताफीने हळू-हळू उघड्या दरवाज्याच्या दिशेने जायला निघालेले. भीतिपोटी ते कधी मागे तर कधी पुढे पाहत होते. मागे पाहताच त्या सैतानाचा कमरे इतका उघडा मृत कलेवरासारखा पांढराफट्ट देह दिसत होता, फुगीर बळदंड बाहू, आणि डोक्यावर ते पांढरट केस..! खाली असलेली चौकलेटी पेंट आणी ते टोक टोक आवाज करणारे चकचकीत काळे बुट, मोठा दरारा होता..त्या काळ्या बुटांचा.
" अरे ए म्हाता-या, खुप झाली ही लपाछपी! चल बाहेर ये ! " रामचंद अस म्हंणतच मागे वळला..! पाद्रीनी ही त्याचक्षणी मागे वळून पाहिलं, एक मोठी चुक झाली..! पाद्रीच्या घा-या डोळ्यांची, नी हैवान रामचंदची जहरी हिरवट खसखसती विषारी नजरेची जुळवा जुळ्व झाली. रामचंदला खुर्च्यांमधोमध गुढघ्यांवर बसलेले, हात खाली फरशीवर टेकवलेले कुत्र्यासारखे चालणारे पाद्री दिसले.त्यांना पाहून त्याच्या ओठांवर एक पाश्वी हसू उमटल, ते काळे मसेरी सारखे किडसर दात, डोळ्यांतल्या हिरवट नजरा काहीक्षण लुकलुकल्या.
" हा हा हा! फाहादर..! वळखला का ! " खोल खर्जातल्या आवाजात ते ध्यान ओरडल व हसल. पाद्रीची पाचावर धारण बसली, मुळाच्या देठापासुन ते डोक्यातल्या मेंदूपर्यंत भीतीचा करंट दौडला. ताडकन आजुबाजुच्या खुर्च्या दुर फ़ेकत पाद्री जागेवरुन उठला..!
" ए..ए...म्हाता-या ए ! " रामचंद आपल्या दोन्ही हातांची बोट हालवत म्हंणाला.जबडा हसताना त्याची हनवटी थोडी पुढे आली.आणि बत्तीसच्या बत्तीस धारधार काळसर दात पाद्रीला दिसले.
" ए न्हाई ! ए नाय, ए नाय, नाय ! माझ्या जवळ येऊ नको !" पाद्रिंनी उघड्या दरवाज्याच्या दिशेने धाव घेतली. मोठ्या मेहनतीने दरवाज्याची चौकट ओलांडून बाहेर ही आले..आणि येताच सर्वप्रथम त्यांनी दाराची कडी आपल्या मागे ओढून घेतली..दाराला पाठटेकवुन दम भरु लागले..
"वाचलो! वाचलो..! " पाद्री स्व्त:शीच म्हंणाले. काहीवेळ निघुन गेला..त्यांचे श्वास पुर्ववत होताच त्यांनी हळकेच डोळे उघडले.पाद्रीचे खाडकन डोळे उघडताच, वेगाने दोन हेडलाईटचा पिवळा प्रकाश त्यांचे डोळे दिपवुन गेला..! कारण त्या राक्षसी ट्रकमध्ये ड्राइव्हसीटवर सैतान रामचंद जबडा विचकत काळसर दात दाखवत, त्यांच्याकडे पाहुन हसत होता. (घृर्रर्रर्रर्रर्रर्रर्र ) ट्रकच्या इंजीनचा मोठा भेसुर आवाज झाला
नळीच्या तोंडातुन काळसर धुर हवेत उडाला..! (पोंऽऽऽऽऽमऽऽऽऽ) हॉर्नचा आवाज..व इंजीनचा तो आवाज ऐकुन पाद्रीने खाडकन डोळे उघडले. नी डोळे उघडताच ती काळी ट्रक, इंजीनच्या टाकिवर एक जाड्या लाल घुबडाच, वटारलेल्या पिवळेजर्र डोळ्यांच चित्र त्यांना दिसल..ते शेवटच..!
" आऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ!" पाद्रीची शेवटची किंकाळी निघाली.की त्याचवेळेस आकाशात एक विज कडाडली..! आणि त्या किंकाळीस..त्या गड़गडाटी आवाजाने पाद्रीच आपल्या अजस्त्र मुखात सामावुन घेतल. परंतु एकजण होता..ज्याने हे थरारनाट्य सोनेरी गवतात लपून उभ्या डोळ्यांनी पाहिल होत..! ज्याच्या चेह-यावर सहा-सात महिन्याची उगवलेली दाढी दिसत होती..डोक्यावरचे केस..
खांद्यांना स्पर्श करत होते. हाफ बाह्यांचा पांढरट सदरा मळुन जागोजागी फाटला होता..खालच धोतर..मातीत मळुन गेल होत..!
आणी तो होतां... वेडा भु-याऽऽऽऽऽ
क्रमश: