हैवान अ किलर - भाग 7 jay zom द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

हैवान अ किलर - भाग 7

भाग 7

संध्याकाळचे साडे:सहा (6:30pm)वाजलेले. आकाशातला पांढरट प्रकाश जरासा मंदावला गेलेला. एका मोठ्या अमोजणीय डोंगरमाथ्यावरच्या वी आकाराच्या गर्तेतुन सूर्य अस्ताला जाता जाता ती निल्या रंगाची बस पाहत होता., वरच छप्पर सुद्धा निल्या रंगाचा होत..बसच्या डाव्या आणि उजव्याबाजुला एलडी अस दोन इंग्लीश शोर्टफॉर्म शब्द लिहिलेले दिसत होते व त्या पुढे ट्रैवल्स हा फुल स्पेलिंग मध्ये लिहीला होता.व एलडी शब्दीचा अर्थ लब्दी असा होत होता.

लब्दी ट्रैवल्सची निळी बस सुनसान हायवे नंबर 405 वरुन, एका उधळलेल्या घोड्यासारखी धावत पळत सुटली होती.

मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगु इच्छितो मुंबई, बिहार, दिल्ली, अशा विविध क्षेत्रांत पसरलेल्या ट्रैवल्स कंपनीमध्ये एक शर्यत लागलेली असते ! ती अशी की आपली बस लवकरात लवकर यात्रेकरुंना त्यांच्या

आंतिम स्टेशनवर घेऊन जायला हवी..ज्याने आप्ल्या कंपनीही वाह, वाह होईल. त्यासाठी हे बस ड्राइव्हर्स साठ-सत्तर लोकांच जीव घेऊन

त्या वाहनास शंभरीच्या वेगाने दमटावतात. आणि हा खेळ सुरु होतो..प्रवासी निद्राहीन असल्यावर रात्री. बसला तुफान लोकप्रियता मिळावी ह्यासाठी हा स्पीड घेतला जातो. बस शंभर दीडशेच्या वेगाने पुढील गाड्यांना ओव्हरटेक करत अगदी वेगाने पुढे-पुढे जात असते आणि अचानक ह्या तीव्रवेगा मुळे चालकाच स्टेरिंगवरील नियंत्रण सूटून..झोपेतच त्या बिचा-ता प्रवास्यांना आदरांजली मिळते.हे कटू सत्य आहे..अगदी शंभर टक्के ! सोशल मिडियावरुन ट्रैवल्स एक्सीडंट विडीयोज, खाली लाखोंच्या कंमेंटस मधुन ऐकलेली सत्यता आहे ही. असो आपण पुढे बघुयात.

आज स्त्रीयांना इतकी प्रगती केली आहे, की त्या पुरुषाच्या खांद्याला खांदा टेकून चालू शकता. ह्याच सांगण्याच मुळकारण हेच की लब्दी ट्रैवल्सचा ड्राइव्हर कोणी पुरुष नसुन एक तरुणच स्त्री होती. तिने डोक्यावर एक गोल काळी हेट घातलेली . अंगावर एक काळ जैकेट घातलेल. खाली पायांत जीन्स होती. फुल बाह्यांचा जैकेट असलेला हात गियरवर ठेवलेला, दुसरा हात स्टेरिंग असुन लक्ष विंडो ग्लासमधुन हेडलाईटच्या गोल सफेद प्रकाशात पुढे दिसणा-या रसत्यावर होत.

स्टेरिंग खाली असलेल्या उजळत्या स्पीडोमीटर मध्ये एकुन तीन गियर शिफट केलेले दिसुन येत बसच स्पीड नव्व्द होत.

" माया..पोरी ! अंग येवढ स्पीड़ बस्स की! टू जेव्हा गाडी चालवायला बसते ना, मला तर अस वाटत! की ही माझी शेवटची फेरी आहे. "

" ओह पप्पा ! तुमची पोर काय साधु सुद्धी ड्राईव्हर आहे का? हैवी ड्राईव्हर आहे हैवी!" माया आप्ल्या ड्राईव्ह रेंकच कौतूक करत म्हंणाला.

तर मित्रांनो निल ला जो माणुस काहीवेळा अगोदर बस मध्ये चढण्यास सांगत होता..तो हाच..आणि ड्राईव्ह रुम मध्ये ड्राईव्हसीटवर बसलेली तरुनी त्यांची एकुलती एक मुलगी मायरा उर्फ माया, लहाणपनापासुनच ड्राइव्हर बनण्याची तीची इच्छा होती. तिच्या वडिलांना ड्राईव्ह करताना पाहून पाहून तीने सुद्धा गियर नोलेज, गियर कसे शिफ्ट करायचे..स्टेरिंग कशी फिरवायची, कोणत्या रस्त्यावर कितीच्या स्पीडने गाडी पलवायचे सर्व तीने नुस्त पाहूनच शिकल होत. आणि तिचे वडिल म्हंणजेच वामन उर्फ वाण्या त्यांनीही तिला शिक्षण घेऊन काही जॉब वगेरे कर अस काहीच सूचवल नव्हत. कारण एकुलती एक पोरगी..काळजाचा अर्धा तुकडा होता त्यांचा.

" तु ना माझ ऐकणार नाहीस माया! " वामन उर्फ वाण्याने डोक्यावर हात मारुन घेतला. तशी माया हळकेच हसली...तिने डोक्यावर टोपी घातल्यामुळे तिच तोंड दिसत नव्हत. परंतु हसताना तिचे लाल ओठ मात्र दिसले.

" ओह पप्पा! माया हो साथ तो डरने की क्या बात!"

मायाने थरथरणा-या गियरवरचा हात हळकेच पुढे केल..नी गाडीचा चौथा गियर शिफ्ट झाला. स्पीडोमीटर मधल नव्व्दवर असलेला आकडा

हळुच शंभरी पार करुन दिडशेच्या दिशेने जाऊ लागला. नी वाण्याच्या कपाळावर आठ्या उभ्या राहिल्या...छातीतली धडधड त्या वेगाला पाहून

धडधडू लागली.

××××××××××××××××××

धावत पळत शायना, तिच्या मागोमाग ती म्हातारी आणि शेवटला मागे पाहून जोरजोरात भुंकणारा तो काळा कुत्रा. काहीवेळाने एका गेटपाशी येऊन थांबले. गेट कुलुप बंद होत. त्या म्हातारीने गेटपाशी थांबुन मेक्सीला असलेल्या खिश्यात हात घालून एक चांदेरी रंगाच्या चाव्यांचा अक्खा झुंडच बाहेर काढला. धावल्याने शायना आणि म्हातारी दोघींनाही धाप लागली होती. तो काळसर एका लांडग्यासारखा दिसणारा कुत्रा जोरजोराने मागे पाहून अद्याप मोठ मोठ्या भुंकत होता.शायनाने हळुच एक कटाक्ष त्या म्हातारीवर टाकला..ती हातात असलेल्या चाव्यांच्या झुंडांमधुन भेदरलेल्या घाब-या गुब-या अवस्थेत थरथरणा-या हातांनी गेटची चावी शोधत होती.तिची ही अवस्था पाहून शायनालाही भीती वाटु लागली. तिने एक कटाक्ष मागे भुंकणा-या कुत्र्यावर मग तो ज्या दिशेने भुंकत होता..त्या दिशेला पाहिला. पुढे खुप सारी बंद दरवाज्यांची घर होती.आणि त्या घरांबाजुंनी सरळ एक वाट जात होती.ज्या वाटेवरुन शायना ती म्हातारी पळत आलेली.

" छल डिकरा घरात चळ!" त्या म्हातारीने चावी शोधुन कुलूप काढून टाकल होत.तिने शायनाचा हात धरला, गेटमधुन आत घुसली..शायनाला तेवढ्यावेळे पुरतच एक नऊ फुट उंचीचा धिप्पाड़ पांढ-या फट्ट देहाचा, पांढरट चकचकीत केसांचा, खाली एक चौकल्रटी पेंट असलेला, पायांत चकचकीत बुट घातलेला ज्यांचा टोक टोक भयाण आवाज होत होता.

शायनाने त्याला पाहताच तिच सर्व शरीर भीतीने थरथरुन उठल..

ज्या एनर्जीला नेगेटिव एनर्जी, म्हंणजे अमानविय वाईट शक्ति ही संज्ञा दिली जाते! सैतान कोणाला म्हंणतात? भुत पिशाच्च, काय असते त्या रुपाला पाहून शायनाला समजुन चुकल ? त्याच्या एका झलकेने शायनाच देह काफरुन उठल? डोळे विस्फारले पाय गोठले. शेवटी त्या ख्रिश्चन म्हातारीने कसतरी शायनाला ओढतच तिच्या घरात आणल.

परंतु घाईगडबडीत ती गेटलावायच विसरली. 

" मायकल! त्या हैवानाला थांबव बॉय, थांबव त्याला.!"

ती म्हातारी त्या काळ्या कुत्र्याला म्हंणाली. त्याने सुद्धा शेपूट हलवत त्या गेटपाशी आपल बस्तान मांडल, मोठमोठ्याने तो त्या रिकाम्या गेटकडे पाहून भुंकु लागला.(भौ, भौ, भौ, भौ). शायनाला घरातच ठेऊन ती म्हातारी पुन्हा अंगनात आली. हातात तोच खुपसा-या चाव्यांचा गुंडा होता. तोच नाचवत ती तनतनत्या पावलांनी गेटपाशी आली. आणि जशी गेटजवल आली. रामचंद सुद्धा उडी मारुन त्या कुत्र्यापासुन अंतर ठेवत समोर आला. धिप्पाड पांढरफट्ट प्रेतासारख देह, सफेद चकचकीत

केस, बिना भुवयांचे हिरवट जहरी डोळे, चेटकीणी सारख टोकदार नाक, आणि हनुवटी थोडि पुढे आलेली हसताना काळसर बत्तीस दात त्या म्हातारीच्या काळजाचा ठाव घेत होते.

" ए म्हातारे सोड तिला.. सोड़ ? बाहेर आण तिला, बाहेर आण? नाहीतर तुझी हाड चोखून चोखून खाईल मी? खाऊ का तुला? खाऊ का " रामचंद तिला दरडावत म्हंणाला. त्याचा घोगरा खर्जातला आवाज वातावरणात कंपने निर्माण करत होती.शायना विस्फारलेल्या डोळ्यांनी उघड्या दरवाज्यातुन त्या सैतानाला पाहत होती. भितीने काळिज अस काही गोठून गेल होत..की वाचाच बसली होती तीची. तोंडातुन ब्र सुद्धा निघत नव्हता..फक्त कपाळावरुन टीप टीप करत खाली बरसत होते.

" अरे ए हैवाना! ही पूरी वस्ती तुला घाबरत असेल ! पन मी नाय घाबरत. मला खायचंय ना ये खा मला खा ! " ती म्हातारी ठसक्यात म्हंणाली.

" अंग ए थेरडे मी ही बघतो ना तुझ्या ह्या काळ्या मांजरींना माझ्या समोर नाचवुन किती उशिर तु तिला वाचवतेस ते ? " रामचंद त्या काळ्या कुत्र्याकडे दात ओठ खाऊन गुर्रकत म्हंणाला. त्या कुत्र्याच्या

ओरडत, भुंकण्याने रामचंदची हवा टाईट झाली होती. त्याच्या चकचकीत बुटांचे पाय टोक टोक करत मागे पुढे होत होते. वेळ वेगाने

पुढे सरकत होती..अंधाराची काजळी रात्र होत आहे ह्याची चाहूल लाऊन देत होती. रात्रीच्या अंधारात रामचंदचे हिरवट जहरी डोळे लकाकत होते. त्याचा खर्जातला आवाज दुर दुर पर्यंत भिंगत जात होता.

" ए थेरडे..रां××साली ! सोडणार नाही तुला.? आणि तुझ्या ह्या मांजरीना! ए हाड, हाड, हाड हाड! खाऊ का रे तुला ? खाउ का ? खाऊ..? " रामचंद खालच दगड हातात घेऊन येड्यासारखा हातवारे करु लागला, आपले धारधार कालसर दात त्या कुत्र्याला दाखवू लागला. त्या म्हातारीने तो पर्यंत गेटच कुलुप आतल्या बाजुने लावुन कुलूप बंद केल.मायकल कुत्र्याच पट्टा हातात घेऊन, मागे मागे जात तिच्या घराच्या चौकटीत पोहचली. मायकलला बाहेर तिथेच सोडून मग दरवाज्यावजवळ आली. रामचंदने हळकेच बंद गेटच्या सल्यांतुन एक हिरवट जहरी नजर शायनाच्या भेदरलेल्या चेह-याकडे पाहिल.शायनाचीही नजर त्या डोळ्यावरच होती..की तेवढ्यात खाडकन दार बंद झाल.

" धाड ऽऽऽऽ"

क्रमश: