श्रमसंत्सग - 4 Chandrakant Pawar द्वारा तत्त्वज्ञान मराठी में पीडीएफ

Featured Books
  • रहस्य - 4

    सकाळी हरी आणि सोनू गुजरात ला पोचले आणि पूढे बस ने संध्याकाळ...

  • आर्या... ( भाग १ )

    आर्या ....आर्या ही मुलगी तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी...

  • गया मावशी

    गया मावशी ....    दिवाळी संपत आली की तिची आठवण हमखास येते…. ...

  • वस्तीची गाडी

                                                  वसतीची  गाडी  ...

  • भुलाये न बने

                  भुलाये न बने .......               १९७0/८0 चे...

श्रेणी
शेयर करा

श्रमसंत्सग - 4

श्रम हे अजिबात थोतांड नाही किंवा दृढ असे नकारात्मक गुढ नाही. काही लोक हातावरच्या रेषा पाहतात मात्र त्या हातावरच्या रेषांमध्ये श्रम रेषा अनेकांना ओळखता येत नाही हेच मोठं भविष्य आहे. श्रम रेषा हे सजीवांचे आयुष्य ओळखू शकत नाहीत. हे आणखीन एक मिथ्य उकलता येणार नाही. हस्तशास्त्र मुळातच श्रमाच्या शक्तीला परिचारित करते. ते विचलित न होता जीवन आमंत्रित करते. लाभ मर्यादा ठरवते.

शरीर स्पष्टपणे,ठळकपणे श्रमादित्य निर्माण रेषा सजीवांसाठी वर्तुळामध्ये आणते. ती हातावर पेलत जीवन पुढे सरकत रहाते.
त्यावेळी जर त्याचा तोल अजिबात सातारा नाही व संतुलन राखता आले नाही तर मग बेरोजगारी किंवा बेकारी ही शक्ती अनेक स्वप्ने बेचिराख करते. जगण्याची वाट लावते. मग श्रमादित्यांची वाढ खुंटते. तिथे श्रमशक्ती
खुजी ठरते.

तिथे श्रमयोग शब्द उलटा फिरतो. नशीब, नियती साडेसाती यांची त्रियुती जीवनाची विल्हेवाट लावायला सज्ज होते . शरीर भयभीत होते. जीवनाचे हाल होतात . मनुष्य वैफल्यग्रस्त बनतो. हा अंदाज नाही. तो त्रिवार बिभत्स कुश्रम शक्ती संचार आहे.

जीवनाला विचलित करणाऱ्या गोष्टी अनेकदा घडतात. परंतु त्यांना थोपवून ठेवत मनाला श्रमांलिंत करणाऱ्या गोष्टी लक्षात आणून दिल्या जातात त्याचं कारण हेच आहे की श्रम खूप सेन्सिटिव्ह आहे. श्रम हळवे,कातर आहे. त्याच्यापेक्षाही श्रम अधिक मजबूत कणखर आणि पराक्रमी वृत्तीचा आहे. जीवनाला अगदी सर्वस्व बहाल करणारा आहे. हेच आणि हेच तर शरीराला मोठेपणा देऊन स्वतःला लहानपणा श्रम घेतो. श्रम व्यक्तिगत आहे आणि सार्वजनिक आहे... दोन्हीच्या दोन गोष्टी दोन्ही प्रकारे करणारा श्रम दोन्हीकडे तितकाच संतुलित करणारा आहे.

लहान मुलांच्या शरीरात वावरणारा श्रम जसा अल्लड आहे तसा तरुणांच्या मनामध्ये राहणाऱ्या श्रम साहसी आहे. ऊर्जांकित आहे. महिलाना साथ देणारा श्रम संसारिक आहे .तर पुरुषांच्या सोबत राहणारे श्रम नेहमीच काहीतरी दिव्य भव्य करणारा आहे. वृद्धांना मदत करणार श्रम हा त्यांना ताणतणावातून बाहेर काढून पुन्हा नवीन दृष्टिकोन प्राप्त करून देणारा असतो. दिव्यांग्याच्या बाबतीत म्हणायचे झाले तर सतत त्यांना कार्यरत ठेवणारा श्रम त्यांचा जीवन हे नेहमीच कृतीशील ठरवत राहते. आजारी व्यक्ती किंवा रुग्ण यांच्या श्रमाची जी शक्ती आहे ती त्यांना आजारपणातून बाहेर काढून पुन्हा आरोग्य प्राप्त करून देते आणि त्यांना तंदुरुस्त करते.श्रमाच्या दिव्यत्वाची अनुभूती जीवनाला तेव्हा येते जेव्हा शरीर हे विविध गोष्टी झपाटलेपणाप्रमाणे मेहनत कष्ट परिश्रम करीत करीत जीवनात विलक्षण आनंद घडवण्याचा प्रयत्न करते.

किशोरवयीन मुला मुलींच्या श्रमाची बात न्यारी आहे. उस्फूर्त अशी प्रेरणा त्यांना श्रमातून मिळत राहते. मग तो खेळ असो शिक्षणा असो अथवा काहीतरी करण्याची उर्मी असो .श्रम त्यांना नेहमीच उत्तुंग अशी शिकवण देत आलेला आहे. त्या वयात समाजसेवक बनण्याची जी कुमकुम मी त्यांच्या रक्तामध्ये आढळते किंवा त्यांचे रक्त उसळत असतं याचे मुख्य कारण ही श्रमाची त्यांना मिळालेली महानुभूती आहे हेच खरे होईल...

तरुणांमध्ये एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करताना त्यामध्ये झोकून देऊन ती गोष्ट आपलीशी स्वीकारण्याची जी गंमत आहे. ती गंमत श्रमाच्या शक्तीची हिम्मत दाखवते.

जगात अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टी माणसाला अजून समजल्या नाही .त्या समजून घेण्याची कुवत निर्माण करण्याची बुद्धी प्रेरणा आणि दिशा श्रमाच्या मार्फत शरीराला ,मनाला, बुद्धीला, व्यक्तीला,जीवनाला प्राप्त करून देण्याची जीगिषा आहे ती जीगिषा श्रमा मार्फत शरीराला मुक्तपणे निर्माण होते. जी मोक्षाकडे नेणारी असते.
श्रमाचे अनेक प्रकार आहेत .श्रमाच्या अनेक पद्धती आहेत. त्या त्याप्रमाणे श्रम त्या व्यक्तीला ती गोष्ट करण्यासाठी प्रवृत्त करतो आणि त्या प्रवृत्त करणाऱ्या ज्या गोष्टीमागचा प्रयत्न असतो. ती प्रेरणा मुळात श्रमाच्या बाबतीमध्ये अधिक प्रखरतेने बाहेर दिसण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी जी शक्ती लागते ती शक्ती श्रमच त्या व्यक्तीला, शरीराला ,मनाला, बुद्धीला प्रदान करतो. ब्रम्हांड नाही... ब्रह्मांडचा अर्थ श्रमांड असा होईल... असे नाही. परंतु एकच शक्ती आहे असे म्हणायला हरकत नाही... असं म्हणणं म्हणजे खरं तर धाडसाची गोष्ट आहे. परंतु श्रमाच्या बाबतीत अशा धाडसाची गोष्ट सांगायला काही हरकत नाही. याची कारण म्हणजे श्रम भविष्याकडे नेणारी गोष्ट करतो. भूतकाळामध्ये तो प्रवेशक नाही. तर वर्तमान काळाची गती भविष्य काळाला पुरवतो. आणि जीवन पुढे रेटतो. मग त्या जीवनाची इच्छा असो नसो किंवा शरीर साथ देवो न देवो याची पर्वा तो अजिबातच करीत नाही. समाजामध्ये,जगामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला याचा प्रत्यय येईल .
कारण श्रमादित्य ते जे आहे ते नेहमी प्रकारे पुढे पुढे गेलेले आढळते .