उत्कर्ष… - भाग 5 Pralhad K Dudhal द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

उत्कर्ष… - भाग 5

उत्कर्ष भाग 5

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मी गॅलरीतून उत्कर्षचा अंदाज घेत होतो ...
मी पहिले की सकाळी उठून उत्कर्ष त्याच्या गॅलरीतला त्याने करून ठेवलेला पसारा आवरत होता...
थोड्या वेळात कुणीतरी कामवाली मावशी त्याच्या मदतीला आली आणि उत्कर्ष तिच्याकडून हवी तशी घराची साफसफाई करून घ्यायला लागला. उत्कर्षने कामवालीला दिलेल्या सूचना मला माझ्या घरात ऐकू येत असल्याने मला घरात बसून खाली काय चालले आहे याचा अंदाज येत होता.
उत्सुकता म्हणून सहज खालच्या मजल्यावर डोकावले तर उत्कर्षने दरवाजाच्या बाहेर ओळीत मांडून ठेवलेल्या पंधरा वीस बियरच्या बाटल्या आणि घरातला जमा केलेला खूप सारा कचरा दरवाजाच्या जवळ ठेवलेला दिसला.उत्कर्ष कामवालीला सांगत होता...
" दोपहरके पहले ये सब बोतल और कचरा लेकर जाना,मेरी दीदी कभी भी आ सकती हैं... "
काल उत्कर्ष सांगत होता त्यात तथ्य होते तर! खरंच त्याची बहीण अमेरिकेहून येणार होती...
दिवसभर उत्कर्षची बहिण येणार असल्याने धावपळ चालू असलेली जाणवत होती.त्याचे सारखे सोसायटीच्या आत बाहेर येणे जाणे चालू असलेले दिसत होते.
आम्ही नेहमी प्रमाणे संध्याकाळी बाहेर फिरायला गेलो असताना उत्कर्ष तयार होऊन गेटच्या बाहेर रिक्षात बसून गेल्याचे मी पाहिले. रात्री उशीरापर्यंत त्याच्या फ्लॅटचा लाईट बंदच होता.बहुतेक तो बाहेरच थांबला असावा...
त्या दिवशीच्या रात्री खाली कसलीच हालचाल जाणवली नाही.
आम्हाला त्या रात्री छान शांत झोप लागली....
सकाळी उठून मी खालचा अंदाज घेतला, बहुतेक उत्कर्ष अजूनही घरी आलेला नव्हता. त्याची आईही एवढ्यात दिसली नव्हती.उत्कर्षने दोन रात्री घातलेला गोंधळ बघून ती निघून गेली असावी कारण घराला आज चक्क कुलूप दिसत होते.
दोन तीन दिवस उत्कर्षने घातलेल्या गोंधळामुळे असेल,पण नकळत मन सतत खालच्या फ्लॅटमधील हालचालीचा मागोवा घेत होते!
आश्चर्य म्हणजे तो दिवसही शांततेत पार पडला.रात्री कधीतरी उत्कर्ष घरी आला असावा सकाळी तो एकदोन वेळा गॅलरीत येऊन गेल्याचे दिसले...
उत्कर्ष मध्ये झालेला सकारात्मक बदल मला नक्कीच सुखावत होता...
'त्याने खरंच बियर पिणे सोडले असेल तर छान होईल' असा विचार मनात आलेला असताना
दुपारी चारेक वाजता बाहेर सोसायटीच्या गेटवर ढोलीबाजा वाजवल्याचा आवाज येऊ लागला आणि पावले आपोआप गॅलरीतून गेटवर काय चालले आहे ते बघण्यासाठी वळाली...
गेटच्या आतल्या बाजूला दोन ढोलवाले, एक ताशावाला आणि उत्कर्ष हातात एक मोठी पॉलिथिन बॅग घेऊन कुणाची तरी वाट बघत असल्यासारखा उभा असलेला दिसत होता . ढोलवाले बहुतेक त्यांच्या वाद्यांची वाजवून ट्रायल घेत होते.
तेव्हढ्यात गेटवर एक कॅब आली आणि थांबली.
Bउत्कर्ष ढोलवाल्याना वाजवायचा इशारा करत तिकडे धावला. ढोलीबाजा जोरात वाजायला लागला. त्या कॅबमधून एक तरुणी उतरली.उत्कर्ष तिच्या पाया पडला आणि हातातल्या बॅगेतून काढलेला झेंडूच्या फुलांचा हार बहिणीच्या गळ्यात घातला.तिने त्याला जवळ घेतले आणि त्याच्या पाठीवर हात फिरवला. उत्कर्षने तिला पुन्हा कॅबमध्ये बसवले आणि स्वतः कॅबच्या समोर नाचू लागला. पुढे ढोलताशा त्यांच्या मागे हातात फुलांची पिशवी घेऊन नाचणारा उत्कर्ष आणि त्यामागे बहिणीची ती कॅब अशी मिरवणूक गेटपासून आमच्या बिल्डिंगच्या दिशेने सरकू लागली. मध्येच नाचता नाचता उत्कर्ष थांबायचा हातातल्या पिशवीतून चारपाच फुले घेऊन कॅबवर टाकायचा आणि पुन्हा नाचायचा! हे नक्की काय चालले आहे हे माहीत नसणारे लोक ही मजेशीर मिरवणूक पाहून एकमेकाकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने बघत कुजबुजत होते! हळू हळू मिरवणूक आमच्या बिल्डिंगपाशी आली.सगळेजण उत्सुकतेने पुढे काय होते आहे ते बघत होते.उत्कर्षची बहीण कॅब मधून उतरली आणि तिच्या अंगावर उत्कर्षने फुलांच्या पाकळ्या उधळल्या.आता ढोल ताशा वाजायचे थांबले,बॅगा खाली उतरवल्या गेल्या. उत्कर्षने एका लिफ्टमध्ये आधीच फुले पसरून ठेवली होती. उत्कर्षने बहिणीला त्या सजवलेल्या लिफ्टमधून वर आणले....
उत्कर्ष आज उत्साहाने आपल्या बहिणीचा स्वागोतोत्सव साजरा करत होता...
बहीण घरात गेली आणि दरवाजा बंद झाला...

(क्रमश:)
.... प्रल्हाद दुधाळ.
9423012020