संयोग आणी योगायोग - 1 Gajendra Kudmate द्वारा नियतकालिक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

संयोग आणी योगायोग - 1

(यात वापरलेली नावं काल्पनिक आहेत. याचा कुणाशी काहीही संबंध नाही. असल्यास केवळ एक योगायोग समझावा )
मित्रांनो, संयोग म्हटला तर अचानक घडणारी एक गोष्ट म्हणा कि बाब म्हणा आणि योगायोग म्हटल तर आवर्जून घडून आलेली गोष्ट किंवा बाब. या दोघांचा मध्ये अनपेक्षित सापडलेला मी आज एका उंबरठ्यावर म्हणा कि वळणावर उभा आहे. मला कळतच नाही आहे, कि मी यात अडकलो कसा.
माझ्याविषयी सविस्तर सांगायचे तर तसा मी धीरज, मना भावाने आणि स्वभावाने मी एकदम शांत आणि कमी बोलणारा त्याचबरोबर फार लाजाळू अशा वृत्तीचा मनुष्य आहे. माझ्या सरळपणामुळे अनेक लोक माझ्या वाट्टेल तसा उपहास करतात. या लोकांनाच काय म्हणावे, माझ्या नशिबानेच सुद्धा माझ्याबरोबर फार मोठा उपहास केलेला आहे. माझ्या लाजाळू आणि सरळपणामुळे मी कुणाशीही काही बोलण्यास घाबरतो. मी आधीपासूनच ज्या गोष्टींपासून लांब राहण्याचा प्रयत्न करत आलो,अनपेक्षित आज मला त्याच गोष्टीकडे जावयास लागत आहे. याला मी संयोग म्हणावे कि योगायोग.
माझे पूर्वीचे आयुष्य हे फारच दुख कष्ट आणि वेदना यांनी परिपूर्ण भरलेले होते. माझ्या आयुष्याला आणि माझ्या नावाला काळिमा फासणारा प्रसंग माझ्यावर लोटला होता. माझे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मी एकदम शांत आणि सरळ, याउलट माझी पत्नी हि चंचल स्वभावाची होती. मला आधीपासून वेड वाकड काही आवडायचे नाही आणि आता सुद्धा आवडत नाही. तर याच कारणावरून आम्हा दोघांत वाद होत असायचा. त्याचा परिणाम म्हणून लवकरच मी पत्नीपासून वेगळ व्हायचा निर्णय करून घेतला. परंतु माझ्या अगोदर अनपेक्षित माझ्या पत्नीने माझ्यावर खोटा घरेलू हिंसेचा आरोप करून माझ्यापासून घटस्फोट घेतला. मोबदल्यात माझ्याकडून मनमर्जीने दंड म्हणून रक्कम लुटली. मला त्या गोष्टीचा आणि गेलेल्या पैशांबद्दल तेवढे वाईट वाटलं नाही. वाईट वाटलं त्या गोष्टीमुळे कि तिने दुसऱ्या लोकांपुढे माझा उपहास केला आणि माझा नावाला एक क्रूर पुरुष म्हणून जन्मभरासाठी काळिमा फासली. तेव्हापासून स्त्री जातीचा मी अधिक तिरस्कार करू लागलो होतो. त्यामुळे कुठल्या हि पर स्त्रीचा संपर्कात यायचे नाही आणि त्यांचाशी कसलाच संबंध ठेवायचा नाही असा मी स्वतःशीच ठाम निर्धार करून माझे एकांत जीवन जगत होतो.
यानंतर मात्र संयोग याचाशी माझा सामना म्हणा कि भेट घडत आली आहे. अनायासपणे आणि अनपेक्षितपणे सीमा बरोबर माझी भेट झाली. आम्हा दोघांची भेट होणे हा निव्वळ एक संयोग होता कि ईश्वराने घडवून आणलेला योगायोग होता. हे मी आजवर समजू शकलो नाही. सीमा आणि मी दोघे हि एकमेकांपासून एकदम अनोळखी आणि अनभिग्य असे होतो. यापूर्वी आम्ही कधीच भेटलो, कि कधीच एकमेकांना बघितले सुद्धा नव्हते. माझ्याबरोबर घडलेल्या त्या न विसरणाऱ्या प्रसंगामुळे मी जास्तीत जास्त स्वतःला कामात आणि माझ्या मनाला ज्या गोष्टीने किंवा बाबीने समाधान आणि आनंद मिळू शकतो. अशा बाबींमध्ये स्वतःला जास्तीत जास्त व्यस्त करून आपला संपूर्ण दिवस आणि वेळ घालवायचो. माझ्या कामाचा ठिकाणी सुद्धा माझे असेच वर्तन असायचे. आपले काम प्रामाणिकपणे करायचे आणि व्यर्थचा बाबींपासून लांब रहायचे. कारण कि माझ्या कार्यालयात हि अनेक स्त्रिया काम करायचा.
तर असा माझा नित्यक्रम असायचा, त्याच अनुषंगाने एके दिवशी मी कामावरून घरी जाण्यास निघालो होतो. मी कार्यालयातून निघून थेट बस स्टॉप वर जाऊन उभा राहिलो. सायंकाळची वेळ असल्यामुळे तेथील आसपासची सगळी कार्यालये त्या वेळेस बंद होतात म्हणून बस स्टॉप वर घरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची गर्दी फारच असते. तर मी पोहोचलो तेव्हा बस स्टॉप वर फारच गर्दी होती आणि त्यातल्या त्यात विशेष करून महिलांची संख्या हि फार होती म्हणून मी एका कोपर्‍यात जाऊन उभा राहिलो, तेवढ्यात पहिली बस आली. ती बस आधीपासूनच प्रवाशांनी गच्च भरलेली होती. तरीही त्यात काही प्रवाशांनी विशेष करून महिला प्रवाशांनी चढण्याचा प्रयत्न केला. त्यांचा तो प्रयत्न असफल झाला म्हणून त्यांनी ती बस सोडली. मात्र त्यातील एका महिलेने बस स्टॉप वर हंगामा आणि आरडाओरडा केला होता. ती महिला तिचा मागे असणार्‍या पुरुष प्रवाश्याला शिविगाडी करत होती. प्रतिउत्तरात तो पुरुष प्रवासी तिची सारखी समजूत काढत होता, कि ताई माझी यात काहीही चूक नाही आहे. आधीच एवढी गर्दी आहे, माझ्या मागील प्रवाश्यांनी मला धक्का दिला म्हणून माझा धक्का तुम्हाला लागला. परंतु ती महिला त्याचे काहीही ऐकायला तयार नव्हती म्हणून तो मनुष्य शेवटी हताश होऊन माझ्या शेजारी त्या कोपर्‍यात येऊन उभा राहिला. त्या मनुष्यानेही माझ्या प्रमाणे एक नाही तर दोन बसेस सोडल्या. आता संपूर्ण स्त्रिया त्या दोन बसेस मध्ये गेलेल्या असताना तिसरी बस आली. संयोग म्हणावा कि योगायोग इकडे बस त्या स्टॉप वर आली आणि मला एका मित्राचा फोन आला. मी फोनवर बोलत असताना ती तिसरी बस हि सुटून गेली आणि मी तिथेच राहून गेलो.
असे करता करता रात्रीचे ७ वाजून गेले होते. माझ्याबरोबर तेथे आणखी चार प्रवासी उरले असतांना, आम्हाला असे कळले कि शेवटची बस येणार नाही. कारण कि ती बस रस्त्यात फेल झाली आहे. तेव्हा सगळ्यांन पुढे एकच पर्याय होता तो ऑटोरिक्षा करायची आणि घरी जायचे. तेथेही माझे नशीब कमकुवत होते. उरलेले ते चार जन एकाच दिशेने जाणारे होते आणि मी एकटाच विरुद्ध दिशेने जाणारा होतो. म्हणून ते चौघे हि ऑटोरिक्षा करून निघून गेले आणि आता मी एकटाच तेथे उरलो होतो. मी आता आतुरतेने ऑटोरिक्षाची वाट बघत उभा असतांना मात्र संयोग म्हणा कि योगायोग हा माझी आतुरतेने वाट बघत होता.
शेष पुढील भागात ...........