राधा.... शोध अस्तित्वाचा - 1 ️️️shravu........ द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

राधा.... शोध अस्तित्वाचा - 1

दुपारच्या तीन वाजता आज अचानक वातावरण बदल झाला होता........ आभाळ इतक आल होत की रात्रीचे आठ-दहा वाजल्या सारखे वाटत होते........ आणि ती एकटीच अनवानी चालत होती...... आजूबाजूला काय चालू आहे.... काही समझत नव्हत..... डोळ्यात पाण्याचा थेंब नव्हता पण आतुन आक्रोश करत होत....... " काsssss? " मीच का........ पण कदाचित उत्तर तर तिच्याकडे ही नव्हत आणि वरच्या त्या देवाकडे ही नव्हत..........

चालता चालता तिचा हात पोटावर गेला आणि ती एकाच जागी स्तब्ध झाली...........डोळे बंद करताच तिच्या आयुष्यातील दोन ते तीन वर्ष सरलें...... डोळ्यातून एक एक थेंब अलगद तिच्या गालाकडून मानेकडे जाऊ लागले........ती तशीच खाली घुडघ्यावर बसली आणि जोरजोरात रडायला लागली.......आणि पाऊस ही तिची सोबत करत होता........ जानेवारी महिन्यात काळवेळ नसताना तोही धो धो कोसळत होता..........रडून थोड मन थोड हलक वाटल तस ती परत उठून चालयला लागली.........

कुठे जायच.... काय करायच काही माहित नव्हत.... पण मनात मात्र पक्का केल होता....... परत त्या वाटेला जायच नाही म्हणून....... चालता चालता रात्रीचा दिवस झाला तरी तिला समजल नव्हत......... आता पाय थकले होते..... पुढे एक एक पाऊल ती खुप कष्टाने टाकट होती..... मध्येच तिच्या डोळ्यासमोर काही तरी चमकल्या सारख झाल आणि ती चमक आता आपकल्याकडेच येत आहे अस वाटल तस ती जागेवरच थांबली.....ती चमक एकदम तिच्या समोर आली....... पण आता डोळ्यासमोर अंधारी येत होती आणि पुढच्या दोन सेंकदात ती खाली जमीनिवार कोसळली.........

◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️

" पाऊसात भिजल्यामुळे फिवर आहे आणि वीकनेस खुप आहे आणि दोन दिवस कदाचित त्यांनी काही खाल नाही त्यामुळे बेशुद्ध पडल्या आहेत काही टेस्ट करयला लागतील काही त्या त्यांना शुद्ध आली की बघू आपण " डॉक्टर सलाईन लावत बोले.......

" शुद्धिवर कधी पर्यंत येईल " त्याने विचारल.......

" तीन ते चार तासा नंतर येतील उठल्या की त्यांना ही
ओषधे दया.... " डॉक्टर

" ओकेssss.... " तो

चेक करून डॉक्टर निघून गेले..... तस त्याने आईकडे बघितल तर tya कोणत्यातरी विचारात हरवल्या होत्या... त्यानी आवाज दिला तस भानावर आल्या....

" आईsss..!! काय गं कसला विचार करतीयेस.......तो त्याच्या पायाशी बसत त्याच्या मांडीवर डोक ठेवत बोला.... " तो

" माहित नाही का पण हिला आधी कुठेतरी बघितल्या सारखी वाटतय....पण कुठे ते आठवत नाहीये....." त्या त्याच्या केसात हात फिरवत बोल्या........

"बघितल असेल कुठेतरी आठवेल नंतर..... चल आता तु पण आराम कर मी आशा मावशीना बसायला सांगतो हिते चल....." त्याने बोलून त्यांना त्याच्या रूममध्ये सोडल आणि तो पण मावशीना सांगून त्याच्या रूममध्ये निघून गेला........

पाच तासानंतर.......

तिला जाग आली पण डोळे उघडत नव्हते..... डोक खुप जड झाल होत..... हातपाय दुखवही होते आणि एकदम थंड पडल्यासारखे वाटत होते.... हळूहळू थोडा जोर देऊन तिने डोळे उघडले आणि नजर आजूबाजूला फिरवली पण तिला काहीतरी वेगळ वाटल पण नक्की काय ते समजल नाही आणि तिला दुसऱ्या सेंकडला आठवल की ती तर घर सोडून आली होती मग आपण आता कुठे आहे असा विचार करत उठत होती पण तिला उठताच आल नाही....तेव्हाच त्या रूममध्ये आल्या....

" उठलीस तु.....ये मी तुला मदत करते उठायला "

बोलतच त्यांनी तिला उठवून बेडला टेकवून बसवल.....
ती फक्त काही न बोलता त्याच्या तोंडाकडे बघत होती कारण तिला समजत तर काहीच नव्हत..... तिच तोंड बघून त्याच बोल्या.....

" खुप प्रश्न पडले असतील तुला, मी सगळ सांगते पण आधी फ्रेश हो.....आपण जेवन केल की निंवात बोला हा......ही बग तुझ सामन उठ आणि तयार हो मावशीन सोबत खाली ये मो तोपर्यंत तयारी झाली का बघते...."

त्या निघून गेल्या तस ती उठली सामान बघितल तर सगळ होता तसच होत.... तिने एक साडी घेतली आणि चेंज करून खाली आली.......

************

तीला खाली आलेल बघितल तस त्यांनी पुढे होऊन तिला
बसायला लावल तस ती बसली....... त्या ताट तयार करत होत्या की तोही येऊन बसला....... त्याच जेवन झाल तस तो निघून गेला कारण ती आपल्यासमोर काही सांगेल की नाही ह्याचा अंदाज नव्हता........

त्या दोघी पण ती होती त्या रूममध्ये आल्या..........तीला काही विचारण्याआधी त्यांनीच त्याची ओळख तिला करून दिली........


" मी आशा काळेssss!! आता आपण साताऱ्यामध्ये आहोत....... आम्ही एका कार्यक्रमासाठी हिथे आलो होतो...... हे बघ मी तुला काय झालssss? कुठुन आली आहेसssss? वगैरे वगैरे असे काही प्रश्न विचारणार नाही ये..... तुला जेव्हा वाटेल तेव्हा मन मोकळ कर...... त्यानी तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि निघून गेल्या पण आज तीन चार वर्षानी मायेचा आधार भेटल्यासारख वाटल.......
.
.
.
.
To be continue.......

❤️shravu❤️