संयोग आणी योगायोग - 5 - अंतिम भाग Gajendra Kudmate द्वारा नियतकालिक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

संयोग आणी योगायोग - 5 - अंतिम भाग

भाग-५
आता तर मला खरच तो संयोग नसून योगायोग आहे यावर विश्वास बसला. सीमाचे बोलने संपल्यावर मी सुद्धा बोललो, “ होय मला हि तुला भेटण्याची खूप इच्छा होत होती आणि त्यातल्या त्यात हा योगायोग घडला, कि नेमक हि पत्रिका देण्यासाठी तुझा घराजवळच यावे लागले,” असे म्हणून आम्ही दोघेही मनमोकळेपणाने खुलून हसु लागलो. परंतु हसता हसता सीमा काहीशी थांबली आणि लाजून म्हणाली, “इश्श ”. मला कळलेच नव्हते कि त्याक्षणी माझ्या मनातील भावना आणि योगायोगाने सीमाने देखील तिचा मनातील भावना अजाणपणे सत्य स्वरुपात बोलून दाखवल्या होत्या.
काही वेळानंतर सीमाचा बाबांनी मला हाक दिली, “ अरे धीरज, बेटा तेथे दारातच काय बोलत उभा राहिला आहेस, घरात येणा.” मी सुद्धा कसलाच नकार न देता सरळ त्यांचा घरात गेलो. घरात बसले असतांना सीमाने सगळ्यांसाठी मस्त पैकी चहा बनवला होता. मी चहा पिऊन आम्ही गप्पागोष्टी करत बसलो होतो, तेव्हाच सीमाचे बाबा म्हणाले, “ धीरज आम्हाला तुझाशी काही बोलायचे आहे. ” मी उत्तरलो, “ हो बाबा नक्कीच बोला ना !” ते पुढे म्हणाले, “ बेटा आम्ही सीमाकरिता मुलगा बघण्याचे ठरवले होते, याबद्दल सर्वप्रथम आम्ही सीमाला विचारले. तर सीमाने आम्हाला तुझाबद्दल सांगितले होते. तुला वाईट वाटणार नसेल तर एक प्रश्न विचारू शकतो ? ” मी सहजच त्यांना परवानगी दिली आणि त्यांचे म्हणणे ऐकू लागलो. ते पुढे म्हणाले, “आमची आणि सीमाची इच्छा आहे कि सीमाचे आणि तुमचे लग्न व्हायला पाहिजे. यात तुमची कसलीही हरकत नसेल आणि तुमची या लग्नाला संपूर्ण सहमती असेल तरच. हि फक्त आमची विनंती आहे, तुमच्यावर कसलीही बळजबरी नाही. तुम्ही तुमचा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहात. तुमचा जो हि निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल.”
त्यांचे ते बोलने ऐकून मी काही वेळ शांत आणि स्तब्ध झालो. त्यावर ते बोलले, “ बेटा, एवढे चिंताग्रस्त होण्याची काही आवश्यकता नाही आहे, मी तर सहजच विचारतोय तुम्हाला.” त्यावर मी बोललो, “ बाबा मी माझे उत्तर देण्याआधी तुम्हाला काही सांगू इच्छितो. त्यानंतर तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचे आहे. त्यावर माझा काहीच आपेक्ष असणार नाही.” त्यानंतर मी बोलण्यास सुरुवात केली, “ बाबा माझे आधीच एक लग्न झालेले आहे आणि मी एक घटस्फोटीत पुरुष आहे.” त्यानंतर माझ्याबरोबर घडलेला तो विकट आणि दुखदाई प्रसंग मी त्यांना सांगितला. त्याच बरोबर त्या रात्रीचा तो प्रसंग, कसे मी आणि सीमा पहिल्यांदा भेटलो आणि तेव्हापासून तर आतापर्यंत काय आणि कसे घडले ते सगळ सत्य त्यांचापुढे सांगून मोकळा झालो. तेवढे बोलून मी त्यांना म्हणालो, “ आता तुमच तुम्हीच ठरवा काय उचित आहे आणि काय अनुचित आहे. काय करायचे आहे आणि काय नाही करायचे आहे.”
माझे बोलने झाल्यानंतर तेथे काही काळ चीर शांतता पसरली होती. कुणी कुणाशी काहीच बोलत नव्हत, फक्त एकमेकांचा चेहऱ्याकडे बघत बसले होते. काही वेळेने सीमाचे बाबा बोलले, “ बेटा, तुम्ही घटस्फोटीत आहात या गोष्टीची आम्हाला कसलीही हरकत नाही, शिवाय तुम्ही प्रामाणिकपणे सत्य काय ते संपूर्ण आम्हाला सांगितल्याबद्दल मला आणि माझ्या परिवाराला आनंद झाला. तुम्ही सत्यवादी आणि प्रामाणिक आहात आमचासाठी तेच भरपूर आहे. तसे आम्हाला आणि सीमाला तुम्ही पसंत आहात, आता तुमचा निर्णयाची प्रतीक्षा आहे आम्हाला.” माझा निर्णय देण्याआधी मी सीमाकडे बघितले, तर तीने लाजून पापण्यांना बंद करून होकारार्थी उत्तर दिले. मी त्याच क्षणी संयोग आणि योगायोगाचे मनपूर्वक आभार मानले ज्यांनी माझी आणि सीमाची भेट घडवून आणली, जसे मी आधीच बोललो होतो. हा केवळ संयोग किंवा योगायोग नव्हे तर हि संयोग आणि योगायोग यांची जुगलबंदीच होती.
अशाप्रकारे संयोगाने योगायोग आणि योगायोगाने संयोग घडून येतात आणि आपल्याला जे हवे असते ते अनपेक्षितपणे मिळवून देतात.
धन्यवाद
स्वलिखित
गजेंद्र गोविंदराव कुडमाते