वस्तीतल्या वाटेवरची ..... हवेली - भाग 1 prajakta panari द्वारा भयपट गोष्टी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

वस्तीतल्या वाटेवरची ..... हवेली - भाग 1


फायनली संपली बाबा एकदाची एक्झाम जाम टेंशन येत होत आधीच ऑनलाईन लेक्चर्स होत होती. त्यात गावात रेंजचा प्रॉब्लेम आणि मधीच कॉलेज सुरू झाल सिलॅबस संपत आल्यावर... शेवटचे दोन टॉपिक तेवढे समजलेले पण नशिब आपल आपली सारिकाशी ओळख झाली. अन्वी म्हणाली."

हो ग खरच बर झाल ती जर नसती तर काय झाल असत आपल कारण शेवटचे दोन टॉपिकच आपल्याला समजलेले पण त्यातला एकही प्रश्न पडला नव्हता. सगळे प्रश्न आधीच्याच टॉपिकमधले पडलेले पण तिला कस कळल काय माहित पण ती ने सांगितलेलेच प्रश्न पडलेले.. खरच खूप हुशार आहे हा ती.... ऋतूजा म्हणाली."

अग हा पण या सगळ्याच श्रेय तुम्ही मला पण दिला पाहिजेत आखिरकार माझ्यामुळेच तर तुमची तिच्याशी मैत्री झाली... रवी म्हणाला."

हो का? म्हणून तर तिला मदत करायला आधी नाही नाही म्हणालतास.वैभव म्हणाला."

पण मीच नंतर तुम्हाला तयार केल ना विसरलात का? सगळ.रवी म्हणाला."

ये शांत व्हा काय लहान मुलांसारख वागताय आपण यंगस्टर्स आहोत.अनन्या म्हणाली."

अरे हा ना आणि काही का असेना सारिका शी ओळख तर झाली ना आपली झाल तर मग पण एक गोष्ट तर आहे आपली अशा प्रकारे कोणाशीच मैत्री झाली नाही किती वेगळ्या पद्धतीने झाली आपली मैत्री.... विराज म्हणाला."

................

आपल्या सगळ्यांना कळवण्यात येत आहे कि, यावर्षी आपली सहल आठ दिवसांसाठी जायच ठरल आहे. आपल्याला गोवा साईटला जायच आहे आणि गोव्यातून परत कर्नाटक भागात जायच आहे. तिथे एक प्राचीन मंदिर आहे जे आपल्याला बघायच आहे तिथल्या भागाचा अजून विकास झालेला नाही म्हणून आपल्याला तिथल्या लोकांच्या अडचणी जाणून घ्यायच्या आहेत. आपण समाजाच देण लागतो म्हणून निर्मळ भावनेने त्या लोकांना थोडीफार मदत करायची आहे... " नोटीस बोर्डवरची नोटीस वाचून अनन्याला खूपच आनंद झाला. ती धावत धावत सगळ्यांना सांगायला आली... खर तर नोटीस त्या दिवशीच लावली गेली होती त्यामुळे अजून बाकिच्यांनी पाहिली नव्हती तसच कोणी वर्गांमध्ये सांगितली सुद्धा नव्हती...

खरतर कोरोनामुळे दोन वर्ष कॉलेजस बंद होती दिड वर्ष सगळ ऑनलाईनच झालेल त्यामुळे हि सगळी कॉलेज गॅंग कंटाळली होती.. इक्झाम पण ऑनलाईनच झालेल्या.. आता नुकतच कॉलेज सुरू झालेल. त्यानंतर महिन्याभरात हि ट्रिपची नोटीस वाचून सगळ्यांना आनंद झाला. दिड वर्ष घरात कोंडल्यागत बसाव लागलेल आता मस्त मनसोक्त फिरायला मिळणार म्हणून अनन्याच ऐकून सगळ्यांनाच आनंद झाला."

काही वेळातच वर्गात सुद्धा हि नोटीस सांगितली गेली मग सगळ्या वर्गाच्याच गप्पा गोष्टी सुरू झाल्या खरतर निम्मा वर्ग तयार झाला ट्रिपसाठी. अस वाटत होत सगळेच आतुरलेले होते बाहेर जाऊन फिरायला...

सगळ्यांची चर्चा याच टॉपिक वर रंगली यात शिक्षक स्वतः सुद्धा सामिल होवू लागले. सगळे तास यावेळी याच टॉपिक वर होऊ लागले. इतर वेळी पण ट्रिप निघायच्या दर वर्षी. पण इतकि चर्चा पहिल्यांदा रंगत होती कदाचित दोन वर्षात कोंडून राहिलेल्या भावनाच जणू बाहेर पडत होत्या..

.............

अरे तुम्ही...... मला..... सांगायचय.... तुम्हाला क काही कळल का? हायपर झालेल्या अवस्थेत तसच घाबरलेल्या अवस्थेत अन्वी काहितरी सांगण्याचा प्रयत्न करू लागली. पण तिचे शब्द अडखळत होते. जणू काय प्रचंड धक्का बसलाय....

सगळ्यांना काहीच समजेना कि हिला नेमक काय झालय कालच तर टेंशन कमी झाल म्हणून किती खूष होती आज मात्र अशी काय अवस्था झाले हिची.. सगळे मनातल्या मनात याच गोंधळलेल्या अवस्थेत विचारात अडकले.. पण लगेच अन्वीला सावरण्याचा प्रयत्न करू लागले...

ये अन्वी काय ग काय झाल हे घे पाणी तू आधी हायपर होण सोडून दे बी रिलॅक्स... काम डाऊन काम डाऊन... सारिका परिस्थितीच गांभीर्य राखून तिला सावरू लागली....

सगळेच तिच्या जवळ येऊन तिला धीर देवू लागले... हळूहळू अन्वी शांत होवू लागली... तस त्यांना सांगू लागली...

ते तिथ ऋतूजा आपली ऋतू ....

काय काय झाल? ऋतूला तू अस का बोलत आहेस तू आणि ऋतू प्रॅंक तर करत नाही आहात ना? रवी म्हणाला...

अरे रवी अस का म्हणत आहेस अरे बघ ना ती किती घाबरले. नक्कीच काहीतरी झाल असणार आधी तिच ऐकून तर घे.... सारिका समजवू लागली...

बोल अन्वी नक्की काय झालय ठिक आहे ना आपली ऋतू....

तुम्ही चला माझ्यासोबत ऋतूच्या घरी...... अन्वीच ऐकून सगळेच हातातल काम तसच ठेवतात आणि ऋतूच्या घरी जायला निघतात. तस तर सगळ्यांच्याच मनात कालवाकालव होत होती. सगळ्यांच्या मनाला नको त्या विचारांनी ग्रासल होत.. ते तसच मनातली धाकधूक तसच दाबण्याचा प्रयत्न करत स्वतः ला सावरत अन्वी सोबत जावू लागले...

.....................

आज में उपर आसमां नीचे आज में आगे जमाना हे पीछे......

ये अन्वी तुला एक चांगली कमेंट देवू का? वैभव म्हणाला."

तू आज चक्क मला कमेंट देतोयस दे ना मला पण सतत चिडवणाऱ्या मित्राकडून कमेंट मिळणार या भावनेनच आनंदाचे उकाळे फुटलेत..... अन्वी म्हणाली"

हा मला अस म्हणायच आहे काय यार कसली गातेस तू तुझा आवाज ऐकून ना... मी तर भांबावूनच गेलो ग... इतका बेसूरा आवाज तर कावळ्याचा पण नाही आहे... अस म्हणत वैभव हसू लागला... त्यापाठोपाठ सगळेच हसू लागले....

अन्वीचा तर रागच अनावर झाला. ती ने त्याला तसच ढकलल.. बाजूला थोडा चिखल होता. तसच तो बेसावध होता त्याचा तोल जाऊन तो त्या चिखलात पडला.... आता अन्वी जोरजोरात हसू लागली त्यापाठोपाठ बाकिचेही हसू लागले...

पण नंतर दोघेही एकमेकांना सॉरी म्हटले व पुन्हा ट्रिपच्या तयारीसाठी सज्ज होवू लागले. त्यांनी ट्रिपला सोबत कोण कोण काय घेऊन यायच ते सुध्दा ठरवून टाकल....

........... क्रमशः..