Sutradhar - 2 books and stories free download online pdf in Marathi

सूत्रधार - भाग २

टेबलवर दोन्ही बाजूला असलेल्या फाईल्स च्या ढिगांमध्ये इन्स्पेक्टर सरनाईक त्रासिक चेहऱ्याने समोरची फाईल चाळत होते,मध्येच घड्याळाकडे कटाक्ष टाकत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा वैताग सहज दिसून येत होता.टेबलवर बाजूलाच अर्धा झालेला ग्लास होता आणि बऱ्याच पेपर्स ची दाटीवाटीही झाली होती.इतक्यात त्यांना कोणाच्या तरी येण्याची चाहूल लागली.

"या मिस्टर पटवर्धन तुमचीच वाट बघत होतो मी, या बसा."समोरची फाईल मिटवत शिव आणि अनिशला त्यांनी बसायला सांगितलं.
"Sir is there any serious case? नाही म्हणजे इतक्या तातडीने बोलावलंत आणि तुम्हीही इतक्या टेन्शन मध्ये दिसताय म्हणून म्हटलं." शिवने खुर्चीवर बसत थेट मुद्द्याला हात घातला.
"हो खूपच serious केस आहे, वेळ कमी आहे,पुरावे तर त्याहूनही कमी आहेत आणि वरून वरिष्ठांचं प्रेशर ही दिवसेंदिवस वाढतयं." इन्स्पेक्टर सरनाईक टेबल वरचा अर्धा ग्लास तोंडाला लावत म्हणाले.
"केस काय आहे? म्हणजे, जरा सविस्तरपणे सांगितलं तर बरं होईल."
"मागच्या मंगळवारी झालेल्या आमदार देसाईंच्या खुनाबद्दल तर तुम्ही ऐकलच असेल."इंस्पेक्टर सरनाईक दोन्ही हात दुमडून टेबलवर ठेवत म्हणाले.
"हो ऐकलं मी,गुन्हेगाराने गळा चिरून हत्या केली होती.त्यांच्याच फार्महाऊसवर."
"बरोबर पण तिथे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत.अगदी झटापटीच्या खुणा देखील नाहीत."
"पण त्याने खुनासाठी ज्या धारदार शास्त्राचा वापर केला त्याबद्दल तरी काही माहिती मिळाली असेल."
अनिश ने शांतपणे आपली शंका विचारली.
"नाही तेही नाही." इन्स्पेक्टर हताशपणे म्हणाले."आम्ही सीसीटीव्ही फुटेज check केले. पुरावे शोधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली,पण निराशेशिवाय पदरी काहीच पडलं नाही.खून इतका सफाईदारपणे केलाय की खरंच माणसाने खून केलाय की एखाद्या भूताने इतकी शंका यावी."
त्यातच काल त्या मर्डरर ने आपला पुढचा बळी घेणार असल्याची माहिती फोनवरून दिली आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.आणि मिस्टर पटवर्धन सध्या कोणताही अनुचित प्रकार होऊन होऊन अजिबात चालणार नाही कारण तशी सक्त ताकीद आम्हाला आमच्या वरिष्ठांकडून मिळाली आहे.आणि म्हणूनच मी तुम्हाला तातडीने बोलावणं धाडलं."इन्स्पेक्टर सरनाईकांच्या चेहऱ्यावरील चिंतेचं मळभ अजूनच गडद झालं.
शिव कसल्यातरी विचारात गढून गेला होता .अनिश ला याची सवय होती.
"तुम्हाला गुन्ह्यासंबंधित जी काही माहिती मिळाली असेल ती आम्हाला द्या,आणि पुराव्यांचे तपशीलही द्या."अनिश चिंतेत बुडालेल्या इन्स्पेक्टर ना म्हणाला.
"ठीक आहे मी व्यवस्था करतो. फक्त मिस्टर पटवर्धन तुम्ही लवकरात लवकर याचा छडा लावा आणि तुम्हाला जी काही मदत हवी असेल ती मी करायला तयार आहे....मिस्टर पटवर्धन....?"
"अं...? हो... हो नक्कीच."शिव भानावर येत म्हणाला
"बरं .ठीक आहे सर आम्ही निघतो आता. जर तुम्हाला अजून काही माहिती अगर पुरावे मिळाले तर प्लीज कळवा आम्हाला.मीही तुम्हाला updates देतच राहीन."शिव खुर्चीवरून उठत म्हणाला.
"नक्कीच." इन्सपे. सरनाईक.
पोलिस स्टेशनमधून दोघे नेहमीच्या टपरीवर आले दोन कटिंग ची ऑर्डर देऊन वाफाळलेला चहा आणि खमंग भडंग शेवेसोबत त्यांची चर्चा सुरू झाली.अनिश चहाचा एक घोट घेत म्हणाला,
"I think the criminal is must be a psychopath. What do you think about it?"
"There is a strong possibility, but we cannot draw any conclusions right now."
शिव पुन्हा आपल्या विचारांच्या तंद्रीतून बाहेर येत म्हणाला.
"पण शिव तुझ्या एक गोष्ट लक्षात , येतीये काय? म्हणजे कदाचित माझा अंदाज चुकीचाही असेल पण जर हे काम खरंच एखाद्या psychopath चं असेल तर तो सगळे murders एका ठराविक पॅटर्न मध्येच करेल,म्हणजे आपल्या या आधीच्या cases मध्ये मी असच पाहिलंय psychopaths साधारणतः एकाच पद्धतीने ठराविक दिवसांच्या अंतराने murders करतात..."
"म्हणजे तुला म्हणायचं आहे की मागचा खून मंगळवारी झाला होता तर तो कदाचित परवाच्या मंगळवारी होऊ शकतो,हो ना?"शिव त्याला मध्येच तोडत म्हणाला.
"नाही म्हणजे खरतर हे सुतावरून स्वर्ग गाठल्यासारखं होईल पण आपण सध्याच्या परिस्थितीत कोणतीही रिस्क नाही घेऊ शकत कारण ते आपल्याला मुळीच परवडण्यासारखे नाहीये." अनिश नेआपली चिंता बोलून दाखवली.
"ह्मम्म्म्म्म्म.....वेळ कमी आहे आणि आपण रिस्क नाही घेऊ शकत."शिव ने शेवटचा घोट घेत म्हणले.
चहा संपवून दोघे ऑफिसेकडे जायला निघाले.
"पण काय रे ते इंस्पे.सरनाईक इतक्या काळजीत का होते ? म्हणजे वरून pressure आहे पण एवढं pressure का?"अनिश ने बाईक वर बसत विचारलं.
"अरे साहजिक आहे ते खून झालेले आमदार विरोधी पक्षाचे होते आणि महिन्याभरात निवडणुका आहेत तर असा त्यांचा खून झाल्यानंतर simply संशय सत्ताधारी पक्षाकडे जातो.आणि हे त्यांना मारक असतं आणि तसंही तुला एक गोष्ट सांगू का सत्ता....." शिव ने त्याचं वाक्य पूर्ण केलही नव्हतं की इतक्यात एका ब्लॅक व्हॅन ने त्यांच्या बाईकला जोरदार धडक दिली त्यांची बाईक जोरदार वेगाने फरफटत दुभाजकाला जाऊन धडकली.
शिव आणि अनिश दोघेही जोरात रस्त्यावर फेकले गेले.इतक्यात शिवला मागून त्याच्याच दिशेने येणारा ट्रक दिसला मुका मार लागल्याने त्याला लगेच हलताही येत नव्हते ट्रक चं पुढचं चाक त्याच्या छातीवरून जाणार इतक्यात त्याने पूर्ण शक्ती लाऊन पलटी मारली, आणि तो ट्रक पुढे कर्कश्य आवाज करून थांबला.अनिश मात्र रस्त्याकडेला निपचित पडला होता. त्यांना धडक देणारी ब्लॅक व्हॅन कधीच ट्रॅफिक मध्ये गायब झाली होती .बेशुद्ध होण्यापूर्वी चेंदामेंदा झालेली त्याची बाईक आणि तिच्याखाली दबलेला आणि एक पाय बाईकमध्ये अडकलेला रक्ताळलेला अनिश आणि त्यांच्याकडे धावत येणारे लोक शिवला पुसट पुसट दिसत होते पापण्या जड होत होत्या, डोकं बधीर होत होतं आणि आजूबाजूचा कोलाहल हलका हलका विरून जात होता...

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED