रहस्याची नवीन कींच - भाग 5 Om Mahindre द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रहस्याची नवीन कींच - भाग 5

सचिनला जेव्हा पासून ते लॉकेट भेटले तेव्हा पासून त्याला वाटायचे की काही तरी खुप रहस्यमयी आहे त्या लॉकेट मध्ये व कधी कधी त्याला ते जाणवायचे सुद्धा म्हणून त्याला आता चिंता वाटू लागली की काही चुक तर नाही केली ना राघव व प्रविणने . त्याच गोष्टीचा विचार करत सचिन एक दिवस त्या बंद हवेलीत गेला व तेथे तो तपास करू लागला . तो हवेलीत शोधाशोध करू लागला . तपास करत तो रामच्या बॉस च्या रुम मध्ये गेला . तेथे त्याला काही मिळते का तो शोध घेत होता . तेव्हा त्याला ती बंद अलमारी दिसली . ती अलमारी त्याने उघडली व तो तपास करू लागला . त्याला अलमारीत काही जूने अल्बम मिळतात . त्यात त्याला काही विचीञ प्रकार च्या ठिकाणचे छाया चित्र पाहायला भेटले . आणि त्या छाया चित्रात रामचा बॉस सुद्धा दिसत होते . ते छाया चित्र पाहल्या वरून ते कोणत्या तरी उत्खनन ठिकाणचे जाणवत होते . त्यात त्याला लॉकेट सुद्धा पाहायला मिळाले . सचिनला काही कळाले नाही की काय रहस्य दडलेल आहे त्या लॉकेट मध्ये व का जेव्हा पासून लॉकेट राघव ला मिळाले आहे का अगदी त्याच्या नंतरच त्याच्या सोबत नकारात्मक व भयावह घटना का घडत आहे . पहिले राधा सोबत घडलेली घटना व नंतर परत घरला जाताना गाडी खाली आलेले जनावर (मांजर ) अशी सर्व घटना क्रम हा लॉकेट आल्या पासून सुरु झाला आहे तेव्हाच सचिन च्या मागुन कोणतरी गेल्याचा भास हा सचिन ला झाला . तो काही क्षणा साठी घाबरला त्याच्या हृदयाचा ठोकाच जणू चुकला त्याला काही समजण्या पहिले त्या अल्बम ला आग लागली व सर्व माहिती ही जळून गेली . तो आता खुपच घाबरला होता . त्याला काय कराव ते समजत नव्हत . म्हणून तो परत निघाला तेव्हा तो शीडी वरून उतरत होता तेव्हा त्याला कोणी तरी मागुन धक्का दिला व सचिन चा तोल गेला व तो खाली खुप जोराने पडला . त्याला हाताला पायाला खुप खरचटले पण त्याच्या वर लक्ष न देता तो तसाच उठला व पळू लागला व तसाच आपल्या खोलीत गेला . खोलीत गेल्या नंतर तो पलंगावर पडला त्याच्या पडल्यामुळे त्याला ज्या जखमा झाल्या त्यांना तो पाहात होता व त्याच्यावर उपचार करीत होता त्याला कळून चुकले होते की राघवने नको ती संकटे ओढावून घेतली आहे . त्यामुळे सचिन खुपच घाबरलेला होता . त्याने ही सर्व घटना रामला सांगीतली त्यावर राम हा बोलला की हे होणारच होतो कारण जिथे जिथे हे लॉकेट असते तेथे त्या मायावीची शक्ती बळावते . व त्या शक्ती लॉकेट धारकाला एकतर मुत्युमुखी देते नाही तर त्याच्या शरीरावर आपले वर्चस्व प्रस्थापीत करते व नको ती कृत्य करण्यास भाग पाडते . रामच्या बॉसला जेव्हा ते लॉकेट सापडले तेव्हा ते त्यांनी आपल्या जवळच ठेवले . त्या लॉकेट वरती काही परीक्षण करण्यासाठी काही दिवसातच बॉसच्या स्वभावात जाणीवपूर्वक बदल झाले . जसे ते पहिले आपल्या सहकार्याना आपला कुंटुब समजायचे आता तेच त्याच्या सहकार्याशी कठोर अश्या पद्धतीची वागणूक करू लागले . आणि काही दिवसा नंतर बॉसवरती चोरीचा आळ आला . हि वार्ता सर्वत्र पसरली आणि काही दिवसात बॉसनी याच बंद हवेलीत आत्महत्या केली . पण बॉसच्या मुत्यु च्या आधी बॉस मला बोलले की आपण ज्या ठीकाणी संशोधन करत आहो ते आपण करायला नको होते . हे सगळे झाल्या नंतर मी एका महान तपस्वी ला भेटले व त्याच्याशी बोललो . विचार विर्मष केला . तेव्हा मला असे कळाले की ते लॉकेट शापीत आहे व जो कोणी त्याला धारण करेल त्याला ती जीवंत राहू देणार नाही . आणि त्यांनी एक आनखी गोष्ट सांगीतली की ज्याने मी खुप मोठ्या संकटातून वाचलो .
काय असेल ते संकट ज्याच्या बद्दल राम बोलत होता .