अनाथ - भाग 2 Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अनाथ - भाग 2

अनाथ भाग २

राघव विदेशात पोहोचला होता. त्यानं मालमत्तेचा खटला न्यायालयात दाखल केला होता. तसं पाहता ती केस पैशानंच लढली जाणार होती. तेवढा पैसा होता त्याचेजवळ. तसा त्यानं आपला खटला न्यायालयात लढायला वकील उभा केलाच होता. फैरी फैरी झडत होत्या.
राघवचा खटला सुरु झाला होता. त्यात लिहिलं होतं की ती मालमत्ता त्याचीच असून ती त्याच्या वडीलांकडून वारसानुसार त्याला मिळालेली होती. शिवाय ज्यावेळेस त्यानं किमान सतरा वर्ष पुर्ण करुन अठरा वर्षात पाऊल टाकलं. त्यावेळेस तो अठरा वर्षाचा असतांना पाहिजे त्या प्रमाणात समजदार झाला नव्हता. अशातच त्याच्या नासमझपणाचा फायदा घेवून मॅनेजरनं ती मालमत्ता आपल्या नावावर केली. जर ती मालमत्ता त्याला विकायचीच राहिली असती तर त्यानं ती पुर्णच विकली नसती. काही भाग आपल्या उदरनिर्वाहासाठी वाचवून ठेवला असता. तशीच ती मालमत्ता तो अठरा वर्षाचा होताच विकली नसती तर त्यानंतरही त्याला विकता आली असती. त्यामुळंच ही शुद्ध त्याची झालेली फसवणूक आहे असं त्याचं म्हणणं होतं.
न्यायालयात खटला सुरु होता. तसं प्रत्येक तारखेचं वास्तविकता राघव मानसीला देत होता. तो तसा दररोजच तिच्याशी बोलल्याशिवाय राहात नव्हता.
न्यायालयात खटला सुरु होता. तसा कारखान्यात कामगारांचाही संप सुरु झाला होता. कारखान्यात मोठं नुकसान झालं असा हवाला देवून कारखान्याचा मालक बनलेल्या मॅनेजरनं कामगारांचे पैसेच दिले नव्हते. म्हणूनच वाद झाला होता कामगार व मालकात.
न्यायालयात खटला सुरु होता. तसं प्रत्येक तारखेचं अपडेच राघव मानसीला देत होता. तो तसा दररोजच तिच्याशी बोलल्याशिवाय राहात नव्हता.
न्यायालयात खटला सुरु होता. तसा कारखान्यात कामगारांचाही संप सुरु झाला होता. कारखान्यात मोठं नुकसान झालं असा हवाला देवून कारखान्याचा मालक बनलेल्या मॅनेजरनं कामगारांचे पैसेच दिले नव्हते. म्हणूनच वाद झाला होता कामगार व मालकात.
सध्या काही लोकं मालक म्हणून वावरतात व मालक म्हणून आपलं आयुष्य जगायला पाहतात. त्यांना मालक म्हणून घेणं आवडतं. अशा लोकांजवळ काहीही नसतं. परंतू त्यांना मालक म्हणून दाखवायची सवय असते. तशी गरज वाटते. तसं ते दाखवतातही. त्यानंतर त्यांचं कोणी जेव्हा ऐकत नाही. तेव्हा भ्रमनिराश होतो व त्यानंतर जेव्हा भ्रमनिराश होतो. तेव्हा त्यांची परियंती आत्महत्येत होते.
समाजात जसे स्वतःला मालक म्हणून घेणारे लोकं आहेत. तसेच स्वतःला कमजोर म्हनवून घेणारेही लोकं आहेत. त्यांचं जीवनच मुळात लाचारीनं जगण्यात जातं. त्यांच्याकडं बरंच काही असतं तरीही. अपवाद काहींजवळ नसतं. मात्र अशाच लाचारीचा फायदा घेवून बरीचशी मंडळी अशा लाचारी जीवनच घालवणा-या लोकांना छळत असतात.
लाचारीपण........हे लाचारीपण आजचं नाही. ब-याच वर्षापासून अस्पृश्य समजला जाणारा अस्पृश्य समाज अशाचप्रकारे लाचारीनं जीवन जगत होता. त्यामुळंच आजपर्यंत या लोकांना अस्पृश्यतेच्या कळा सोसाव्या लागल्यात यात शंका नाही.
लाचारीपण द्वापर युगातही दिसलं. द्वापर युगात भिष्म पितामहाकडे सारं काही असूनही त्यांनी मी विवश आहो असं म्हणत आणि स्वतःला विवश समजत संपूर्ण आयुष्य काढलं. त्याचा परिणाम असा झाला की हस्तीनापुरातील सर्व लोकांना युद्धाला सामोरं जावं लागलं. युद्ध टळलं नाही. त्यातच त्या हस्तीनापुरातील राजगादीवर बसलेला धृतराष्ट्रही तसाच वागला. तो तर राजा होता. सारं काही करु शकत होता तो. परंतू त्यानंही स्वतःचं विवशपण दाखवलं. तसा विदूरनंही. तसा अर्जुनही विवशपण दाखवत होता ऐन युद्धाच्या प्रसंगी. परंतू त्याला सर्वतोपरीनं श्रीक्रिष्णानं समजावून सांगीतलं. ज्याला आपण गीता म्हणतो. त्यामुळंच युद्ध झालं आणि युद्ध होणंही गरजेचंच होतं. कारण स्वतःला मालक समजणा-या दुर्योधनाला जो गर्व झाला होता मालकशाहीचा. तो तोडणं कुठंतरी गरजेचं होतं. म्हणून युद्ध.
लाचारीपणाबाबत सांगायचं झाल्यास सर्व प्राणी आज लाचारीचं जीवन जगत आहेत. अगदी हत्ती आणि वाघ, सिंहही. हत्ती एवढा ताकदवान आणि बलवान असूनही त्याला मानव आपल्या मनानं काबूत करतो व त्यांच्याकडून हव्या त्या स्वरुपाची कामं करवून घेतो. तसंच वाघ, सिंहाचंही आहे. वाघ, सिहासारख्या प्राण्यांकडूनही माणूस हा सर्कशीत काम करवून घेत असतो. हत्ती, वाघ, सिंह हे तर ताकदवानच आहेत. परंतू कोंबडे, बकरे वा पाळीव पशूपक्षी. त्यांची तर काहीच सोय नाही. त्यांच्या लाचारीपणाचा फायदा घेवून लोकं त्यांच्याकडून बळजबरीनं कामंही करवून घेतात. प्रसंगी जीवही घेत असतात. तसंच काही वर्षापुर्वी माणसांच्या लाचारीपणाचा फायदा घेवून त्यांची खरेदी विक्री होत असे आणि स्रियांचीही खरेदी विक्री होत असे. ही खरेदीविक्री आजही काही भागात सुरु आहे.
लाचारीपण........या लाचारीपणाबाबत एक प्रसंग सांगतो. एक मुलगी एके घरी किरायानं राहायला आली. तिची मजबुरी म्हणजे तिचे कोरोनात मायबाप मरण पावले. तिला एक मोठी बहीण होती. तिनं प्रेम करुन विवाह केला. त्यानंतर त्या मुलीनं आपला संसार थाटला. परंतू तसा संसार थाटल्यानंतर तिच्या पतीनं म्हटलं की तो तिला पोषणार नाही. जर तिला ठेवायचे असेल तर तिनं आपला वेगळाच संसार थाटावा. शेवटी बहिणीचं लाचारीपण. तिनं आपल्या स्वबहिणीला सहारा दिला नाही. त्यानंतर त्या मुलीला आपला स्वतःचा सहारा शोधावा लागला.
ती तरुण झाली होती. मात्र ती अजूनपर्यंत अठरा वर्षाची झाली नव्हती. तरीही तिला आधार हवा होता. म्हणून की काय, तिनं एका मुलाशी मैत्री केली, जो अति श्रीमंत होता. त्या मुलानं तिला आधार देत त्या घरी किरायानं आणलं व तो तिचं पालनपोषण करु लागला. मात्र त्यालाही भीती होती की हे बिंग फुटू नये. फुटल्यावर आपल्यालाच समस्या उद्भवतील. कधी पोलीस केस. नाबालीग मुलगी अशी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये ठेवता येत नाही. असं त्याचं मत. शेवटी त्यालाही मायबाप होतेच.
ती नाबालीग होती. यात तिचा गुन्हा नव्हता, तसा त्याचाही गुन्हा नव्हताच. तिची मजबूरी होती आणि त्याची? त्याची मजबुरी नसली तरी त्यानं तिला आधार दिला होता.
सुरुवातीला ती मुलगी जेव्हा राहायला आली त्या घरी. तेव्हा त्या घरमालकीनीनं तिला खायला प्यायला दिलं. वाटत होतं की ती मालकीन बरीच चांगली आहे. परंतू हळूहळू तिनं आपले दात दाखवणे सुरु केले. तिचा धंदाच असा लुबाडणूक करण्याचा होता. एक दिवस तिला तिनं आमीष दिलं की तिनं त्या मुलांसोबत राहण्याऐवजी दुस-या मुलाशी विवाह करुन टाकावा. ज्या मुलांना ती आणणार व ती त्या मुलांकडून त्यांना मुलगी मिळवून दिली म्हणून पैसे कमविणार. परंतू अशा परिस्थितीला त्या मुलीनं विरोध केला. तिला वाटत होतं की ज्या मुलानं तिला आधार दिला, त्या मुलाला सोडायचं कसं? शेवटी ती म्हणाली की मला दुस-यासोबत विवाहच करायचा नाही.
ते किरायाचं घर. ती मालकीन. ती मालकीन तिच्या लाचारपणाचा फायदा घेवू पाहात होती. तिच्यापासून तिला पैसा कमवायचा होता. परंतू तिनं दुस-याशी विवाहाला नकार देताच समस्या निर्माण झाली होती. तिनं तिला विकण्याचे बरेच प्रयत्न केले. परंतू ती त्या मुलीला विकूही शकत नव्हती प्रसंगी दुस-यासोबत विवाहही लावून देवू शकत नव्हती जबरदस्तीनं. तसा मुलीचा संपूर्ण इतिहास घरमालकीनीला माहीत झाला होता.
आता काय करायचं? घर मालकीन विचार करु लागली. तिच्यापासून पैसा कसा कमवायचा? यावरही ती विचार करु लागली. शेवटी एक दिवस तिनं विचार केला. आपण तिला असं फसवायचं व मजबूर करुन टाकायचं की ती स्वतःच त्या गोष्टीसाठी तयार होईल. तशी तिनं योजना बनवली. त्या योजनेनुसार तिनं तिला पैसा द्यावा. तसेच ती आपल्या झाश्यात येत नाही हे पाहून तिनं चक्कं तिच्यावरच चोरीचा आरोप लावला. म्हटलं की तिनं दागीने चोरले. तिनं आता त्याचे पैसे द्यावे नाहीतर तिनं पोलिसात जायला तयार व्हावं. शेवटी घरमालकीनीनं पोलिसात तक्रार केली. पोलिसांनीही त्या प्रकरणाची शहानिशा न करता त्या मुलीला व त्या मुलाला ताब्यात घेतलं. वेगवेगळ्या कलमा लावून त्यांना आतमध्ये टाकलं. आधार देणा-या त्या मुलाला तुरुंगात पाठवलं व तिला सुधारगृहात.
लाचारपण. काय करावं लाचारपणात. लोकं लाचारपणाचा अतिरिक्त फायदा घेतात. परंतू हा विचार करीत नाहीत की आपण का बरं अशा लाचारपणाचा फायदा घ्यावा मालक बनून? आपल्यासारखे तेही लाचारच. मग त्यात मानवच नाही तर प्राणीमात्राचाही समावेश होत असतो. तेही आज आपलं वागणं पाहून म्हणत असतील, मालकशाही मुर्दाबाद, लाचारपण नको गं बाई. परंतू आज त्यांनी तसं जरी म्हटलं तरी ते काहीही करु शकत नाहीत. परंतू एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की काळ कुणासाठी थांबत नाही. तो सतत बदलत असतो. दुःखानंतर सुख येतं आणि सुखानंतर दुःख. आज आपण मानव आहोत वा कदाचीत आपली परिस्थिती चांगली आहे. समजा काळ बदलला आणि आपला जन्मच अशा लाचारपणात झाला तर पाहात राहा ती वेळ. आज आपण त्यांच्या लाचारपणाचा फायदा घेत आहोत. उद्या तेही आपल्या लाचारपणाचा बदला घेतील. आपलाच लिलाव करतील. आपल्यालाच करकर कापतील कोंबड्या बक-यांसारखं आणि आपलीच मिरवणूक काढून म्हणतील जशास तसे. तेव्हा त्यावर विचार करायला आपल्याजवळ सद्बुद्धी असणार नाही.
राघवचं तसंच झालं होतं. त्याचं कोणीच नाही असं ठरवून मॅनेजरनं ती संपूर्ण मालमत्ता तो अठरा वर्षाचा होताच आपल्या नावावर केली होती. ती मालमत्ता मॅनेजरची नव्हतीच. परंतू दाखविण्याच्या कृतीनंच व राघवच्या लाचारीपणानं म्हणा की अज्ञानानं म्हणा, त्यानं आपली मालमत्ता त्या मॅनेजरच्या नावावर करुन दिली होती.
राघवनं न्यायालयात टाकलेला खटला. त्यातच त्याच्या वकीलानं दिमाखानं लढलेला खटला. त्यामुळं की काय, राघवनं केस जिंकली होती. तसा त्याला न्यायाधीशानं निकाल दिला होता.
न्यायालय म्हणालं होतं की सर्व पुरावे तपासले असता न्यायालय या निष्कर्षाप्रत पोहोचले की सदर मालमत्ता ही राघव यांच्या वडीलाची असून ती वडीलोपार्जीत आहे. सदर अपीलार्थी हे सदर मालमत्ता मॅनेजरच्या नावावर करतेवेळी ते जरी अठरा वर्षाचे झाले असले तरी त्यांना मालमत्ता नावावर करुन देतांना फसवलं गेलं असावं हे पुराव्यानिशी सिद्ध झालंय. सबब पुराव्यानुसारच न्यायालय निर्णय देत आहे की ही मालमत्ता जरी राघवनं मॅनेजरच्या नावावर केली असली तरी ही मालमत्ता मॅनेजरची नाही. ती राघवची मालमत्ता असून या प्रकरणात न्यायालय मा. रजिस्टॉर साहेबांना आदेश देत आहे की या दस्तऐवजातील नोंदणी एका आठवड्याच्या आत रद्द करावी व ती रद्द करुन त्यावर राघवचे नाव चढवावे. हाच न्यायालयाचा अंतिम निर्णय आहे. That is the last order.
तसंच न्यायालय आणखी एक आदेश पारीत करीत आहे की यापुढं कोणीही अशी कोणाशी फसवणूक करु नये. केल्यास त्याला असा न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार तर राहील. व्यतिरीक्त कोणी कोणाची फसवणूक करु नये म्हणून न्यायालय मॅनेजरला पन्नास हजार रुपये दंड ठोकत आहे. समजा मॅनेजरनं जर ही रक्कम न्यायालयात न भरल्यास ते शिक्षेत पात्र ठरतील व त्यांना पाच वर्षाची शिक्षा देण्यात येईल. सदर दंड स्वरुपातील रक्कम न्यायालयात भरण्यासाठी न्यायालय मॅनेजरला एक आठवड्याचा अवधी देत आहे.
तो न्यायालयाचा आदेश. तसं पाहता त्या न्यायालयाच्या आदेशानं सदर संपूर्ण मालमत्ता राघवला मिळाली होती. आज तो त्या करोडो रुपयाच्या मालमत्तेचा एकमेव वाली झाला होता.

**********************************************************

सदर मालमत्ता न्यायालयाच्या आदेशानंतर राघवची झाली व राघव त्या प्रचंड मालमत्तेचा मालक बनला. त्यानंतर त्या मॅनेजरनं त्याची माफी मागीतली व त्यानं त्या मॅनेजरला न रागवता माफ करुन टाकलं. परंतू त्याला आता त्यानं मॅनेजर पदावर ठेवलं नाही. लवकरच त्यानं त्या मॅनेजरची त्या पदावरुन हकालपट्टी केली.
आज त्यानं त्या मालमत्तेची सुत्र आपल्या हातात घेतली होती. तशी कारखान्याचीही सुत्र त्यानं आपल्या हातात घेतली होती. त्यानंतर त्यानं एक निर्णय घेतला. आपल्याला फायदा होवो की न होवो, कर्मचा-यांचे वेतन वाढवणे. त्यानं कर्मचा-यांचे वेतन वाढवले होते. त्यामुळंच की काय, संप मिटला होता व कारखानाही डौलानं भरभराट करीत पुढं आला होता.
राघवचा तो निकाल ऐतिहासिक ठरला होता. आता कोणीही कोणाची मालमत्ता दाबू शकत नव्हतं. कारण त्यांना माहीत होतं की जर तशी मालमत्ता आपण दाबलीच तर तो न्यायालयात जाईल व न्यायालय याच निकालाचा वापर करुन आपल्यावर दंड ठोकेल किंवा तो दंड न भरल्यास शिक्षा देईल.
या निकालाचा बराच फायदा झाला होता. आज बरेच जण न्यायालय दंड करेल वा शिक्षा करेल. म्हणून कोणाची मालमत्ता दाबत नव्हते. मात्र काही काही महाभाग असेही होते की जे आजही या न्यायालयाच्या आदेशाला न घाबरता आजही कोणाची मालमत्ता दाबत होते. त्यातच त्या व्यक्तीनं न्यायालयात दाद मागीतल्यास दंडाची रक्कम भरीत असत वा शिक्षा भोगत असत. मात्र आज तशी शिक्षा भोगणा-यांची संख्या कमी झाली होती.
राघव बारावी शिकला होता. तो पाहिजे तेवढा हुशार नव्हताच. त्या देशातील कायद्यानुसार त्याला आठवीपर्यंत नापास करता आलं नाही. तसं करता येणं शक्य नव्हतं. मुलं काहीही असो, शिकून सवरुन राहावी, म्हणून हे आठवीपर्यंत पास करण्याचं सरकारचं धोरण. तसं पाहता आठवी पास झाल्यावर तो कसाबसा बारावीपर्यंत शिकला. तो बारावीत नापास झाला. त्यानंतर तो शिकलाच नाही.
राघव बुद्धूच होता. त्याचं शिक्षणात डोकंच चालत नव्हतं. मग तो काय करणार? शिकणार कसा? त्यामुळंच सारेच प्रश्न. तो विचार करायचा कधीकधी की बुद्धू विद्यार्थ्यांचा वाली कोण? कारण त्याच्या शाळेत तो बुद्धूच असल्यामुळं त्याच्या शाळेतील शिक्षक त्याचेकडे दुर्लक्ष करायचे. कोणीच त्याला आपलं समजत नव्हतं वा कोणीच त्याचेवर प्रेम करीत नव्हतं.

**********************************************************

बुद्धू मुलं.......ज्याचा बुद्ध्यांक हा अतिशय कमी आहे. अशी मुलं शिक्षणात कमी पडतात. अशा मुलांना शिकवतो म्हटल्यास तारेवरची कसरत असते. अशावेळेस त्या शिक्षकांना त्या मुलांना शिकविण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते.
ती बुद्धीची कसरतच असते शिक्षकांची. शिक्षक मुलांसाठी अपार मेहनत करीतच असतात. पण अशी अपार मेहनत करणारी शिक्षक मंडळी काही जास्त प्रमाणात नसतात. त्यांची संख्या फार कमी असते.
शिक्षक मेहनत घेतात यात काही वावगं नाही. परंतू काही काही अशाही शाळा आहेत की ज्या शाळेत मुलांना शिकवायचे असल्यास आधी त्यांच्या आईवडीलांची पात्रता परिक्षा घेतली जाते. ती पात्रता परिक्षा पैशाची नसते. तर तो पालक किती शिकलेला आहे? त्याला इंग्रजी वाचता येतं का? तो मुलांना शिकवण्या लावू शकेल काय? यासाठी असते.
शिकवण्या लावू शकेल काय? तो पालक किती शिकलेला आहे? त्याला इंग्रजी वाचता येते काय? हे प्रश्न. कशासाठी? तर आम्हाला शाळेत जास्त मेहनत घ्यावी लागू नये यासाठी. पालकांना वारंवार सांगता यावं की त्यानं आपल्या मुलांना तो शिकलेला असल्यानं शिकवावं. जर त्याला तसं शिकवता येत नसेल तर त्याच्या मुलाला काढून टाकावं लागणार शाळेतून. तसं काढावं लागू नये, यासाठी त्या पालकांचं शिक्षण हवं. दुसरा मुद्दा हा की त्या पालकाला इंग्रजी यावं. कारण अलीकडे स्पर्धेचा काळ. अशा काळात जर त्या पालकाला इंग्रजीचं ज्ञान नसेल तर तो पालक आपल्या मुलांची इंग्रजी पुस्तक कशी काय हाताळू शकेल? हा प्रश्न शाळा प्रशासनाला पडतो. म्हणूनच ते त्या पालकाला इंग्रजी येणं पाहतात. तसाच तिसरा मुद्दा आहे, तो म्हणजे त्या पालकानं त्या मुलांची स्वतःच शिकवणी लावायची सोय उपलब्ध करावी. का? तर तो मुलगा अभ्यासात आणि शिक्षणात मागे पडू नये.
हा झाला अलीकडच्या शाळेतील व्यवहार. आता शिकवणी वर्गाचं सांगतो. शिकवणी वर्गाचं सांगत असतांना मला एकदा जो फोन आला ॲकेडमीकडून त्याचा उल्लेख करणं गरजेचं समजतो.
"हॅलो."
"हं, बोला."
"मी अमूक अमूक ॲकेडमीकडून बोलतेय."
तसं ॲकेडमीकडे बोलायला मुलीच असतात. कारण मुलींचा आवाज ऐकू आला की चांगली चांगली पुरुषमंडळी पिघलतात व न करणारं कार्यही करु पाहतात. म्हणून खास करुन ॲकेडमीनं ग्राहक खेचण्यासाठी केलेली विशेष सोय.
"आपली मुलगी दहावीत आहे ना."
"होय. मग?"
"आमची अमूक अमूक ॲकेडमी आहे. शिकवणी लावायची असेल तर सांगा?"
तिचा तो प्रश्न. ते ऐकून मी तिची फिरकी घेण्यासाठी केलेलं बोलणं.
"सध्या नववीतच आहे. पास व्हायची आहे. पास झाल्यावर सांगेन."
"अहो, सगळी मुलं पासच होतात. हुशार आहे ना."
"नाही. हुशार नाही. त्यामुळंच तर म्हटलं की पास झाल्यावर सांगेन. अन् मला सांगा आतापासूनच शिकवणी का बरं लावायची? पास झाल्यावर पाहू ना."
"अहो, इंटरव्ह्यू घ्यावा लागतो."
"कोणाचा?"
"कोणाचा म्हणजे? आपला. आपण किती शिकले आहात ते पाहावं लागेल की नाही."
"का बरं?"
"आपली मुलगी मेरीटला आणायची असेल तर ते पाहावं लागेल की नाही?"
"हे बघा, माझी मुलगी पाहिजे तेवढी हुशार नाही व मिही जास्त शिकलेला नाही व माझी पत्नीही. हं, पैसे लावू शकतो मी. परंतू निकाल लागल्यावरच. चालेल का? मलाही वाटतं की माझी मुलगी मेरीटला यावी. बोला येईल का?"
"नाही येणार."
"का बरं?"
"अहो, मुलगी तेवढी हुशार पाहिजे. त्याचबरोबर तिचे मायबाप. तिचे मायबाप दहावी असून चालत नाही. ते कमीतकमी एमएससी, बीएससी तरी पाहिजेत."
"हो का? नाही बा. आम्ही तेवढे शिकलेलो नाही."
"बरं मग ठीक आहे. ही ॲकेडमी तुमच्या काही कामाची नाही."
"म्हणजे? मी आणू नाही का पास झाल्यावर मुलीला आपल्या ॲकेडमीत?"
"नाही, मुळीच नाही."
"का बरं?"
मी त्याचं कारण विचारत असतांनाच त्या मुलीनं फोन कापला.
मी थोडासा फिरकी घेण्यासाठीच बोललो. परंतू माझं ते बोलणं ऐकताच त्या मुलीला समजलं की हे पालक काही जास्त शिकलेले नाहीत व यांची मुलगीही जास्त हुशार नाही. तेव्हा यांच्या मुलीवर कोण मेहनत घेणार?
तिच्या मनातील वावगे विचार. तिचं बरोबर होतं. तसं पाहता प्रत्येकच शिकवणी वर्गाची तशी भावना. तसा प्रभावपणा. एकही नापास होवू नये हे त्यांचं ब्रीद. त्यातच बरीचशी मुलं मेरीटला यावीतच. हे ठरलेलं. शिकवणी वर्गात मुलं मिळवायचीय. म्हणूनच त्यांचं तसं वागणं. शेवटी पोटाचा प्रश्न. मग कोण येणार मेरीट? झोपडपट्टीतील गण्या, श्याम्या तिम्या. ज्याचे आईबाप दोघंही दिवसभर राबायला जातात कामावर. त्यांना त्यांच्या मेहनतीपेक्षा कमी वेतन मिळतं. ते जर कामावर गेले नाहीत तर त्यांच्या घरची चूलच पेटत नाही. जे शिकलेले नाहीत. मात्र त्या टोलेजंग इमारतीतील पॅकबंद सोसायटीतील मुलं मेरीटला येणार. ज्यांचे मायबाप बरेच शिकलेले असतात. जे वशिलतेबाजीनं मोठमोठ्या नोकरीवर असतात. जे भ्रष्टाचार करुन लाखो रुपये कमवतात. जे भरपूर शिकलेले असतात. परंतू आपल्या शिकलेपणाचा वापर भ्रष्टाचार करण्यासाठी करतात.
ह्या शिकवणी वर्गातून नेहमीच घडून येणा-या गोष्टी. अलीकडील मेरीट आणणा-या शिकवणी वर्गात गरीबांची व कमी शिकलेल्या लोकांची मुलं बहूतेक दिसत नाहीत. तसंच अलीकडे मेरीट येणा-या शाळेतही गरीबांची व कमी शिकलेल्या लोकांची मुलं दिसत नाहीत. परंतू मुलं मेरीटला आल्यास त्यांचंच नाव होतं. अशा शाळेतून आणखी मुलं मेरीटला यावीत. म्हणून या मेधावी मुलांचा सत्कार केला जातो. अशा शाळांना देणग्याही दिल्या जातात. तसंच ज्या शाळेचं शुल्क जास्त आहे. त्या शाळेतून जास्त मेरीटला मुलं येत असतात. असंच का? तर पैशाचा जमाना आणि पैशाला किंमत. परंतू ज्या शाळेत गरीबांची मुलं आहेत. निरक्षरांची मुलं आहेत. ज्या मुलांना शिकवायचे म्हटल्यास तारेवरची कसरत आहे. अशी मुलं अशा गरीबांच्या शाळेतून कमीतकमी साठ टक्केपर्यंत मुलं जाणे म्हणजे तारेवरची कसरतच असते. त्यांचे साठ टक्के गुण म्हणजे त्यांचं मेरीटच असतं. परंतू त्यांची कोण दखल घेतं? कोणीच नाही. याबाबत मी सांगतांना एवढंच म्हणेल की एखाद्या रोपट्याला पुरेशी त्यांची वाढ होण्यासाठी पुरेसं वातावरण दिलं तर त्यांची वाढ चांगली होणार. याउलट एखादं रोपटं अवर्षणात जगत असेल तर, तर त्या रोपट्याची वाढ होईल काय? मुळातच होणार नाही किंवा एखाद्या मुलाला चांगलं खायला प्यायला दिल्यास तो मुलगा धष्टपुष्ट दिसेल अन् नाही दिल्यास तो धष्टपुष्ट दिसेल काय? नाही दिसणार. तेच गणित असतं मेधावी मुलात. मुलांना अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळालं की ती मेरीटला येणारच आणि नाही मिळालं तर ती मेरीटला येणारच नाहीत.
आज अशा ब-याच शाळा आणि शिकवणी वर्ग आहेत की जे पालकांचं इंग्रजीचं ज्ञान पाहतात. त्यातच ते किती शिकलेले आहेत तेही पाहतात आणि मुलगा जर अभ्यासात कमजोर आढळल्यास पालकांनाच वेठीस धरतात. शेवटी असे पालक नाईलाजानं शिकवण्या लावून देतात. सोबतच शिकवणी वर्गातील व शाळेतील अभ्यास स्वतः आपल्या पाल्यांकडून घरी करवून घेतात. मग ती मुलं मेरीटला येणार नाही तर काय? मेहनत पालकांची असते व नाव शाळेचं आणि शिकवणी वर्गाचं होतं. का अशा शाळा एखाद्या झोपडपट्टीतील गरीबांच्या मुलाला शाळेत प्रवेश देवून मेरीटला आणू शकत नाहीत? का असे शिकवणी वर्ग ग्रामीण भागातील एखाद्या गरीबाच्या मुलाला दत्तक घेवून मेरीटला आणत नाहीत? परंतू ते तसे करीत नाहीत. मुलं मेरीटला येतात. कारण त्यांना सगळं आयतं मिळतं. आयतं म्हणजे हुशार मुलं आणि हुशार पालक. तसंच श्रीमंत पालक आणि श्रीमंत मुलं. सगळं पोषक वातावरण.
बुद्धू आणि विशेषतः ग्रामीण भागातील मुलांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी आजच्या काळात मुलांचा कोणी वाली नाही. त्यांनी शिकावं यासाठी शासन वेगवेगळ्या योजना राबवत असतांना दिसतं. परंतू ती मुलं शिकतील तेव्हा ना. तिही मुलं शिकू शकतात. त्यांना तसं वातावरण मिळालं तर...... परंतू तसं वातावरण आजच्या शाळा व शिक्षक द्यायला तयार नाहीत. ते स्वतःच पालकांना सांगतात. शिकवणी लावून द्या. तेही एवढं शिकविण्याचं वेतन मिळत असतांना. अन् शिकवणी वर्गही पालकांकडून तीच अपेक्षा ठेवतात. शिकवलेलं पालकांनं पुन्हा घरी शिकवावं. जर तो पालक निरक्षरपणानं घरी शिकवायला तयार नसल्यास अशा पालकांची मुलं शिकवण्या लावूनही मागं पडतात. ती मेरीटला येणं दूरच. ती साध्या सोप्या पद्धतीच्या असलेल्या परिक्षेतही पास होत नाही.
आज मुलं कसेतरी आठवीपर्यंत तरी शिकतात. कारण मुलांना आठवीपर्यंत नापास करता येत नाही म्हणून. जर ह्याच ठिकाणी मुलांना पास होण्याची संधी नसती तर, अशी मुलं ही पहिली दुसरीच्या पुढे गेलीच नसती. हे तेवढंच सत्य आहे. यावरुन बुद्धू मुलांचा वाली कोण? हा प्रश्न निर्माण झाला आहे. बुद्धू मुलं मायबाप म्हणतात म्हणून शाळेत येतात. कशीतरी शाळा सुटेपर्यंत बसतात. सुट्टी झाली की घरी जातात. दप्तर फेकतात व निव्वळ खेळतात. मायबाप जेव्हा कामावरुन घरी येतात. तेव्हा ती झोपेच्या आहारी गेलेली असतात. सकाळीही कामावर जायच्या घाईनं मायबाप त्यांचा अभ्यास करवून घेवू शकत नाहीत.
अशी मुलं अभ्यासात मागे पडतात. कारण ना त्यांचा अभ्यास मायबाप करवून घेत, ना शाळेतून शिक्षक करवून घेत. मग ती अभ्यासात मागे पडणारच. शेवटी ती मुलं अशी मागे पडतात की ती कशीबशी आठवीपर्यंत तर शिकतात आणि आठवीनंतर शाळा सोडतात. काही काही मुलं कशीतरी शालान्तपर्यंत जातात. मग नापास होतात. ती मुलं नापास झाली की अगदी अल्प वयातच कामाला लागतात व जीवनभर वेठमजूर म्हणून जीवन घालवीत असतात. त्यानंतर त्यांची संततीही तशीच अल्प शिकून तिही वेठमजूरच बनतात. ही वास्तविकता आहे. त्यामुळंच बुद्धू मुलांचा वाली कोण? हा प्रश्न युगानूयुगे पडणारच आहे. केवळ आणि केवळ शिक्षकांमुळे. शिक्षकच या बुद्धू मुलांना न्याय देवू शकतो. परंतू तो तरी काय करणार? तोही विवश आहे.
अलीकडे शासन जरी आठवीपर्यंत नापास करु नये हे धोरण राबवीत असलं तरी कामं एवढी वाढवली आहेत की शिक्षकांना ती कामं करावी लागतातच. व्यतिरीक्त ऑनलाईन कामंही वाढवली आहेत. त्यातच शाळेत अशी ऑनलाईन कामं करायला बाबू नाही. त्यामुळंच शिक्षकांची तारांबळ उडते. ते सतत ऑनलाईन कामात व्यस्त असतात. मग अशावेळेस विद्यार्थ्यांच्या शिकवण्याकडे दुर्लक्ष होते व ज्यातून बुद्धू मुलांचं नुकसान होत असतं. हेही तेवढंच खरं आहे. त्यामुळंच सरकारनं यावर उपाय म्हणून ज्या ठिकाणाहून देशाचं भवितव्य घडतं. त्या प्रत्येक शाळेत ऑनलाईन कामं करण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या हितासाठी एकतरी बाबू द्यावा. म्हणजे बुद्धू विद्यार्थ्यांचीही गळचेपी होणार नाही व शिक्षकांनाही मुलं का शिकवली नाही म्हणून बहाणा सापडणार नाही. तेही चांगले विद्यार्थी घडवतील. विद्यार्थ्यांवर चांगली मेहनत घेतील नव्हे तर त्यानंतर बुद्धू मुलंही शाळेत दिसणार नाही. तसेच कोणत्याही विद्यार्थ्यांना प्रवेश देतांना पालकांचा इंटरव्ह्यू घेवून प्रवेश नसावा. तसे आढळल्यास अशा शाळेवर कार्यवाहीची सोय असावी. जेणेकरुन चांगल्या शाळेतही बुद्धू मुलांना शिकता येईल. प्रत्येक शाळेत केवळ आणि केवळ हुशारच विद्यार्थ्यांचाच विचार होवू नये तर बुद्धू विद्यार्थ्यांचाही विचार व्हावा हे तेवढंच खरं. मग कोणावरही बुद्धू विद्यार्थ्यांचा वाली कोण? हे म्हणण्याची वेळ येणार नाही व कोणताच बुद्धू विद्यार्थीही दिसणार नाही. अन् दिसलाच तर ते शिक्षक कार्यवाहीस पात्र असतील यात शंका नाही.
राघव बुद्धू विद्यार्थ्यांचा वाली कोण? असे मानत होता. तो शिक्षकांना दोषी ठरवत त्यांच्यावर ताशेरे ओढत होता. परंतू त्याला शिक्षकांवर काय बेतते. जेणेकरुन तो शिकवू शकत नाही. ह्या गोष्टीची कल्पनाच नव्हती. म्हणून त्याचे शिक्षकांवर ताशेरे ओढणं साहजीकच होतं.
निकाल लागला होता. निकालानंतर राघवला मालमत्ताही मिळाली होती. कारखानाही व्यवस्थीत चालायला लागला होता. त्याचीही घडी व्यवस्थीत बसली होती. आता उरले होते फक्त मानसीचे पैसे देणे. जे तिनं खटला टाकायला दिले होते. राघवला वाटत होतं की ती होती, म्हणूनच त्याला खटला टाकता आला. तो जिंकता आला व आपली मालमत्ता मिळवता आली. तिचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत.
तसं पाहता ते तिचे उपकार नव्हते. ती एक उपकाराचीच परतफेड होती. गतकाळात तिची आई गेल्यानंतर जो काही त्यानं तिला आधार दिला होता, त्याची ती परतफेड होती. त्यानं ती कधीकाळी संकटात असतांना आधार दिला होता. आज तिनं तो संकटात असतांना आधार दिला. म्हणजेच ती उपकाराची परतफेड. परंतू तो तसं मानत नव्हता. त्याला वाटत होतं की तिनं त्याला ऐन संकटात मदत केली व तिच्यामुळेच मालमत्ता मिळाली. म्हणून ते उपकार.
आज त्याला मानसीची आठवण येत होती. आजपर्यंत तिला भेटायला जाण्यासाठी उसंतच मिळाली नव्हती. परंतू आज तिची आठवण येताच तिला केव्हा केव्हा भेटतो असं होवून गेलं होतं. तसं पाहता तिला पैसेही द्यायचे होते.
मानसीची सकाळी सकाळी आठवण येताच त्यानं तिला सकाळीच फोन लावला. परंतू तिचा फोन लागत नव्हता. तो सकाळपासूनच प्रयत्न करीत होता तिला फोन लावण्याचा. परंतू तो फोन व्यस्त वाटत होता काय झालं सुचत नव्हतं.
पुरते आठ दिवस निघून गेले होते. मानसीचा ना फोन आला होता. ना तिला फोन लागत होता. त्यामुळं राघवपुढं प्रश्नचिन्हं उभं होतं. काय झालं मानसीचं आणि काय नाही असं त्याला होवून गेलं होतं.
जिनं एवढे उपकार केले, त्या मानसीला आठ दिवसापासून फोन लागत नसल्यानं व तिचाही फोन आला नसल्यानं ती संकटात असेल असे समजून राघवनं तिला भेटण्यासाठी तिच्या देशात येण्याची तयारी केली व लागलीच त्यानं पैशाची बॅग घेतली व तो विदेशातून देशात आला आणि ती जिथे राहात होती. तिथं गेला. परंतू.......परंतू तिथं मानसी नव्हती. विचारणा केल्यावर माहीती पडलं होतं की मानसीला तेथील वेश्या प्रशासनानं कुठंतरी दूर स्थलांतरीत केलं होतं व तिच्याकडून फोनही हिरावून घेतला होता.
चौकशीअंती त्याला सदर प्रकरण माहीत होताच तो निराश झाला व पुन्हा ते पैसे घेवून तो आपल्या देशात रवाना झाला. जातांना त्याच्या चेहर्‍यावर तो आनंद नव्हता. जो आनंद तिच्याकडून पैसे मिळताच झाला होता.
राघव आपल्या देशात परत आला होता. आता त्याच्या जीवनात सारस्य उरलं नव्हतं. तो मानसी गेल्यापासून केवळ निराश राहात होता. काय करावं सुचत नव्हतं. तसा काही वेळ पास व्हायचा कारखान्यातील कामगारांशी संवाद करता करता. परंतू दिवसाचे चोवीस तासही कामगार त्याचेसोबत राहायचे नाही. त्यामुळं पुन्हा निराशा. अशातच तो आज एका बागेत मन गमवायला गेला.
ती बाग. त्या बागेत मन गमवतांना तो एका खुर्चीवर बसला. ज्या खुर्चीवर एक मुलगी बसली होती. तसं त्याचं लक्ष सहजच तिच्याकडं गेलं. चेहरा ओळखीचा वाटत होता. तसा चेह-यात काहीसा बदल झाला होता.
राघवनं तिच्याकडं पाहिलं. तसा तो चेहरा ओळखीचा. त्यातच तो विचार करु लागला. कोण असेल ही. त्यानं आपल्या डोक्याला ताण दिला. हळूच डोकं खाजवलं. तसं त्याला कळलं की ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून ती झरीना आहे. परंतू तिला विचारायचे कसे? प्रश्न होता. हिंमत होत नव्हती. परंतू विचारावं तर लागणारच. त्याशिवाय माहीत कसं होणार! त्यामुळंच तशी ओळख पटताच त्यानं हिंमत केली व तो म्हणाला,
"आपण झरीना आहात काय?"
"होय. आपण?"
"आपण मला ओळखलं नाही."
"ओळख सांगाल तरच ओळखेल ना."
"मी राघव. अमूक अमूक महाविद्यालयात तुमच्यासोबत शिकत होतो. आपण मित्र होतो. आता ओळखलं का?"
"अरे, तू राघव आहेस काय? ब-याच दिवसानं भेटलास. कुठं होतास एवढे दिवस?"
"अगं उन्हाळे, पावसाळे करीत होतो."
"म्हणजे?"
"अगं संघर्ष करीत होतो."
"म्हणजे?"
"अगं तुला माहीतच असेल की माझी मालमत्ता! ती मालमत्ता त्या मॅनेजरनं मारली होती. ती मिळविण्यासाठी न्यायालयात लढत होतो."
"मग मिळाली काय मालमत्ता?"
"होय. मिळाली. पुर्णच मिळाली."
"आता कसा आहेस?"
"ठीक आहे आणि तू कशी आहेस?"
"मिही ठीकच."
"म्हणजे? ठीकच म्हणजे? काही प्रॉब्लेम आहे का?"
"आहे किरकोळ."
"म्हणजे काय झाल?"
"जावू दे. ते प्रस्तराचे भोग आहेत. जावू दे. माझं मीच पाहील. जावू दे."
"असं कसं जावू दे. मी मित्र ना तुझा. मग सांग मला. पाहू काही उपाय निघतो का ते?"
राघवनं तिला दिलासा दिला. तशी तिनं आपली जीवनकहाणी सांगायला सुरुवात केली.
"मी तुझ्यावर विश्वास करुन तुला सोडून त्याचेशी विवाह केला. परंतू मी काही सुखी नव्हती. तो मला मारत होता. लय त्रास देत होता तो. त्याचा त्रास दिवसेंदिवस वाढतच चालला होता. तसा तो व्याभीचारीही होता.
मी त्याची पत्नी म्हणून सासरी गेली. तशी त्याला दुसरीही पत्नी होती. त्यानं तिला सोडलं नव्हतं. तसं पाहता त्यानं तिच्यापासून फारकत न घेता माझ्याशी विवाह केला. तसं आमच्या देशात चालतं म्हणून मिही त्याची पत्नी आहे हे माहीत असतांनाही त्याचेशी विवाह केला. परंतू तो आपल्या पहिल्या पत्नीवरच प्रेम करीत होता मला सोडून. मग मी काय करणार. मला त्याचा त्रास सहन होत नव्हता. मी सोडले त्याला. तसं पाहता हा आमचा देश. हा आमचा देश तुमच्यासारखा नाही. तिथं एकपत्नीत्वाची पद्धत चालते. आमच्याकडे मात्र तसं नाही. आमच्याकडं विवाहाची करारपद्धती आहे. हवं तेव्हा विवाह करा व हवं तेव्हा विवाह मोडा. मिही तसाच मोडला विवाह."
"परंतू मला सांग की तुला आता त्या पतीची आठवण नाही येत का?"
"कशी येणार. मी सोडलंय न मनातून त्याला. कधीकधी येते आठवण. परंतू मी विसरते. विसरावीच लागते."
"बरं."
"ए, मला तुझा फोननंबर दे ना."
"कशासाठी?"
"कशासाठी म्हणजे? बोलण्यासाठी. कधी माझा मुळ खराब झाला तर मी बोलेल तुझ्याशी. तू बोलशील की नाही."
"बोलणार नं. का नाही बोलणार."
त्यानं तिला फोननंबर दिला. त्यानंही तिचा फोन नंबर घेतला. तशी ती म्हणाली,
"मी निघतेय आता. बरं निघू का?"
"बरं. परंतू फोन करशील."
"ठीक."
ते दोघंही निघाले होते. त्यांना एकमेकांची मदत हवी होती. ती दुःखी होती आणि तोही. दोघांनीही एकमेकांचे फोन नंबर घेतले होते.
काही दिवस असेच निघून गेले होते. त्यांचे एकमेकांना फोन येत होते. दोघंही एकमेकांना भेटत होते. दोघंही एकमेकांशी सुखदुःखाच्या गोष्टी बोलत होते. त्यातच त्यांचं एकमेकांवर प्रेम निर्माण झालं होतं. ते दोघंही एकमेकांवर प्रेम करु लागले होते.
त्यांचं ते प्रेम. ते प्रेम एकमेकांवरचं. ते जीवलग प्रेम होतं. त्यातच तो एक दिवस उजळला. तो एक दिवस उजडताच तिनं त्याला विचारलं,
"माझ्याशी विवाह करशील?"
तिचा तो प्रश्न. तसा तो विचारात पडला. तशी ती म्हणाली,
"काय झालं? नसेल विवाह करायचा तर नको करुस. परंतू तसं मला सांग. मी पुन्हा विचारणार नाही."
तिचं ते बोलणं. तसा तो म्हणाला,
"ठीक आहे. मी करेल विवाह तुझ्याशी. परंतू मला काही दिवसाची विचार करायला सवड दे."
"ठीक आहे."
ते त्यादिवशीचं बोलणं. तशी ती आज फारच आनंदात होती. तिला फार बरं वाटत होतं. कारण तिला आज तिचा महाविद्यालयातील मित्र मिळाला होता. ती आनंदात होती. कारण तो तिचा जुना मित्र तिच्याशी विवाह करणार होता.
लवकरच त्यानं तिला विवाहासाठी होकार दिला. तसा त्यानं तिच्याशी विवाह करण्याचा होकार देताच तिनं आपल्या मायबापाला सांगून त्याचेशी विवाह केला. त्यानंतर ते आपल्या घरी पती पत्नी म्हणून सुखात राहू लागले होते.
एक दिवस असाच उजळला. तसं त्या दिवशी सकाळी अगदी कसंतरी वाटत होतं. तसा सकाळी सकाळीच एक फोन आला. फोनवरुन मानसी बोलत होती.
"हॅलो दादा, मी मानसी बोलतेय."
तो फोन झरीनानं उचलला होता. तशी झरीना म्हणाली,
"कोण मानसी?"
"आपण कोण बोलत आहात?"
"झरीना. मी झरीना बोलत आहे."
"कोण झरीना? हा राघवदादाचाच फोन नंबर आहे ना?"
"होय. राघवचाच. परंतू आपण कोण?"
"दादा आहे का घरात?"
"नाही. बाहेर गेलेत. काय काम आहे?"
"दादा, आल्यावर म्हणावं मानसीचा फोन होता."
"ठीक आहे. सांगेन तसं."
राघव बाहेर गेला होता. काहीवेळानं तो घरी आला. तसा तो घरी परतताच ती म्हणाली,
"एक फोन आला होता तुमच्यासाठी."
"कुणाचा होता?"
"मानसी........मानसी म्हणत होती ती."
"मानसीचा! कशासाठी होता फोन?"
"माहीत नाही." झरीना म्हणाली. तशी ती चूप बसली. तसं त्यानं फोनमध्ये तिचा नंबर शोधला व त्यानं तिला फोन लावला. तशी त्याचेसोबत मानसी बोलती झाली.
" हॅलो मानसी, मी राघव बोलतोय. बोल, कशी आहेस?"
"दादा, मी मरणाच्या दारात आहे. हॉस्पीटलमध्ये आहे. परंतू आता माझ्याकडे पैसे नाहीत उपचाराला. डॉक्टरनं सांगीतलंय की आधी रुग्णालयात उपचाराचे पैसे भरा. त्यानंतरच ते उपचार करणार आहेत."
"बरं, त्यांना सांगावं की तुम्ही ऑपरेशनची तयारी करावी. माझा दादा येणारच आहे उपचाराचे पैसे घेवून."
"बरं दादा, सांगतेय. तसं डॉक्टरांना." मानसीचं ते बोलणं. तसा त्यानं फोन ठेवला. त्यानंतर तो आपल्या पत्नीला म्हणाला,
"मला जायला हवं. मानसी भरती आहे."
"कोण मानसी?"
"ते मी नंतर सांगणार." तो म्हणाला. तशी त्यानं तयारी केली व तो तिनं दिलेल्या लोकेशनवर रवाना झाला.
राघवनं ते हॉस्पिटल शोधलं व तो मानसीला भेटला. मानसी तिथं निपचीत झोपली होती. त्यानं तिची हालत पाहिली व तो डॉक्टरांशी बोलला. त्यानं डॉक्टरांशी बोलणं करुन तिचं ऑपरेशन करवलं. त्यानंतर काही दिवसांतच ती बरी झाली.
ती बरी झाली होती. तसं डॉक्टरांनी सांगीतलं की हिला आता आराम हवा. हिला सुख हवं. आता तिला आराम हवा यासाठी तुम्ही सोय करा.
ते डॉक्टरांचे शब्द. तशी तिनं त्याला मदत केली होती. तो आता जे काही होता, ते तिचेच उपकार होते. ते पाहून त्यानं तिला आपल्या घरी न्यायचं ठरवलं व लागलीच त्यानं हॉस्पीटलची सगळी फी देवून तिला आपल्या घरी नेलं.
मानसी राघवच्या घरी आली होती. ते पाहून झरीना विचलीत झाली होती. तसा आजपर्यंतच्या काळात ना तिचा फोन होता ना कोण्या व्यक्तीचा. तशी ती दिसताच झरीनाचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला होता. ती दररोजच विचार करीत असे. कोण असावी ही आणि हिला राघवनं का बरं घरी आणलं असावं? जरा विचारायलाच हवं.
तो मानसीची नित्यनेमानं सेवा करीत असे. परंतू झरीनाला पडलेला प्रश्न. तशी ती एक दिवस त्याला म्हणाली,
"राघव, ही कोण आहे अन् हिच्यासाठी एवढा आटापीटा का?"
तिचा तो प्रश्न. तसा तो विचार करु लागला. म्हणाला,
"ही असा शख्श आहे की आज जो काही मी उभा आहे, ते हिच्यामुळेच. ही माझ्या मालमत्तेच्या इमारतीची पायाभरणी आहे."
झरीनानं ती गोष्ट ऐकली. त्यानंतर ती चूप बसली. तसे आणखी दिवसानंतर दिवस गेले व एक दिवस झरीनानं लपून राघवसोबतचा मानसीचा संवाद ऐकला. त्या संवादात तिला समजलं की ती एक वेश्या होती व आता तिला त्याच वेश्येपणातून एक गंभीर आजार झालाय. ज्या आजाराला लोकं टाळतात.
झरीनानं तो संवाद ऐकताच एक दिवस ती त्याला तिच्या नकळत म्हणाली,
"ही असली वेश्या आणलीय घरात. कशाला आणलीय? आपली बदनामी करण्यासाठी की काय? कोण तुमची ही? हिला हाकलत का नाही घरातून."
"जाईल ती. ती बरी होताच जाईल. जरा धीर धर." तो म्हणाला. तशी ती चूप बसली.
झरीना चिडचिड झाली होती. तिचा पारा वाढला होता. मात्र त्यानं शांतपणे उत्तर दिल्यानंतर ती चूप बसली. त्यानंतर तोही शांत होवून ते सगळं न बोलता पाहात होता.
मानसी कालपर्यंत अंथरुणावरच होती. आज मात्र तिला थोडं बरं वाटत होतं. परंतू दररोजचं तिचं त्याच विषयावर बोलणं. ते पाहून दररोजच चिडचिड होणारी झरीना त्यानंतर त्यांच्यात होत असलेलं दररोजचं भांडण. तशी एक दिवस झरीना त्याला म्हणाली,
"आता पुरे झालं. एक वेश्या नकोच आपल्या घरात. तिला आपण हाकलून का लावत नाही. ती आपली काही नातेवाईक तरी आहे काय? जेव्हा ही गोष्ट लोकांना माहीत होईल. तेव्हा लोकात आपली बदनामी होईल."
ते तिचं बोलणं. तसा तो म्हणाला,
"जाईल नं बरी झाल्यावर."
"अजून केव्हापर्यंत? मी आतापर्यंत बरंच ऐकलं तुमचं. चूप बसले. परंतू आता मला सहन होत नाही. आता मी शेवटचं सांगते. मी तुम्हाला उद्यापर्यंतचा दिवस देते. एकतर तिला हाकलून लावा. नाहीतर मीच जाते." ती म्हणाली व चूप बसली.
दोन दिवस झाले होते. झरीना काही केल्या शांत झाली नव्हती. तसं त्यानं तिलाही हाकललं नव्हतं. त्याचा तिला भयंकर राग आला होता. आज सकाळीही त्याचं व तिचं कडाक्याचं भांडण झालं होतं. शेवटी तिनंच आपली तयारी केली व ती घरातून निघून गेली.
झरीना निघून गेली होती घरातून. तशी ती निघून जाताच राघवला वाईट वाटलं. परंतू आता त्याचेजवळ उपाय नव्हता.
झरीना घरातून निघून गेली होती. दिवसामागून दिवस जात होते. तसं झरीनालाही एकटं एकटं वाटत होतं. तिला त्याची आठवण येत होती. तशी त्यालाही यायची. परंतू तो आपली आठवण दाबत होता.
राघव दुःखी होता. तो नेहमी उदास असायचा. कामावर मन लागायचंच नाही. कारण आता त्याची पत्नी झरीना त्याचेबरोबर राहात नव्हती. मानसी ते सगळं पाहात होती. त्याचं ते दुःख मानसीला पाहाणं होत नव्हतं. तशी एक दिवस मानसी झरीनाला भेटायला गेली. तिला तिनं समजावलं. म्हणाली,
"झरीना, काय झालं असं की तू त्याला सोडून परत आलीय."
मानसीचे ते शब्द. तशी झरीना म्हणाली,
"माझ्या रागाचं कारण तुम्हीच आहात. तुम्ही वेश्या आहात ना. मग तुम्ही कशाला राहाताय इथं. आमची समाजात किती मोठी अब्रू आहे. लोकांना हे जेव्हा माहीत होईल. तेव्हा आमची इज्जत नाही जाणार काय? कारण तुम्हालाही माहीत आहे की यांच्याकडे येणारे जाणारे किती असतात. एखाद्या व्यक्तीनं तुम्हाला ओळखलं तर."
"बरोबर आहे तुझं. मीच तुला प्रॉब्लेम आहे ना. मग मी आजच जाईल. तू परत ये."
मानसी गेल्या पावली परत आली. तशी झरीनाही आज परतच आली होती एका आशेनं. ती आस होती ती जाण्याची. तसं तिनं आज रात्रीला जाण्याचं आश्वासन दिलं होतं.
झरीना आली होती. तसा रात्रीला राघवही परत आला. त्यानं पाहिलं की झरीना परत आली आहे. तो फार आनंदी झाला होता. त्याचा आनंद गगनात मावेनासा होता. तसं पाहता त्याला काय माहीत होते की आज एखादी अविचीत्र घटना होणार आहे.
सर्वांचे जेवणखावण झाले. सर्वजण झोपी गेले. राघवही आणि झरीनाही. परंतू मानसीला काही झोप येत नव्हती. तिला ते घर सोडून जायचे होते झरीनाच्या सुखासाठी. तिला त्याचा संसार बसवायचा होता.
ती हळूच उठली. तिनं दोघांनाही न्याहाळले. तशी ती दोघांनाही नमन करुन तेथून निघून गेली.
सकाळ झाली होती. तसा राघव उठला. त्याचबरोबर झरीनाही. तसा झोपेतून उठल्याबरोबर तो मानसीच्या कम-यात गेला. तिथं मानसी नव्हती. त्यानं इकडंतिकडं शोधलं. त्याला मानसी काही सापडली नाही. त्यानं झरीनाला विचारलं. तशी झरीना म्हणाली,
"मीच जायला लावलं तिला."
ते तिचे बोल. तसा त्याला तिचा भयंकर राग आला व रागाच्या भरात तो जोरानं ओरडत म्हणाला,
"माहीत आहे मानसी कोण? ती माझी बहीण आहे लहान. सख्ख्यापेक्षा मोठी. मी अनाथ झालो जन्मतःच आणि आजही अनाथच. तुही नको माझ्या जीवनात. नको मला ही सर्व मालमत्ता. जिच्यामुळं मी ही मालमत्ता मिळवली. तिनं मालमत्ता मिळविण्यासाठी व न्यायालयीन लढाई लढण्यासाठी मला पैसे पुरवले. तू तर सोडून गेली होती त्या काळात. जेव्हा माझी मालमत्ता गेली. अन् ती मालमत्ता माझ्याजवळ जेव्हापर्यंत आली नाही. तेव्हापर्यंत तू माझ्याजवळ आली नाहीस. मात्र तिनं ही अपेक्षाच केली नव्हती. ती जगली स्वतःसाठी नाही तर दुस-यासाठी. अगं तू तिची हेळसांड केली. माहीत आहे, त्या वेश्येच्या अंगणातील मातीनं आपलं अंगण पवित्र होतं आणि आपलं घरदारही. माहीत आहे ती स्वतः वेश्या बनली नाही. तिला समाजानं जबरदस्तीनं वेश्या बनवलं. माहीत आहे, तिच्याच आईनं मला एकेकाळी पोषलंही होतं रस्त्यावर आणि आधार दिला होता."
तो काय बोलायचं ते बोलला. तशी त्यानं गाडी काढली. तसा तो मानसीचा त्या शहरात शोध घेवू लागला. दिवसभर आज तो मानसीलाच शोधायला फिरला. परंतू त्याला काही मानसी मिळाली नाही.
आज तो रात्रीला परत आला होता. त्यानं रात्री जेवन केलं. ते जेवन त्याला धकेनासं होतं.
ती रात्र त्याचेसाठी काळरात्र ठरली होती. त्याला मानसीचाच विचार होता. तशी अर्धी रात्र झाली. तो उठला. त्यानं एक चिठ्ठी लिहिली. त्यात लिहिलं,
''तुला मालमत्ता हवी ना. मालमत्ताच खा. मला शोधशील नको. मी कालही अनाथ होतो, आजही अनाथ आहे. मात्र उद्याचा जन्म मला अनाथांचा नको. मला अनाथ या जन्माचा अगदी वीट आलाय.''
ते शब्द. ते चिठ्ठीतील शब्द राहिले. ती चिठ्ठी त्यानं तशीच पलंगावर ठेवली व तो रवाना झाला तेथून.
सकाळ झाली होती. तशी झरीना उठली. तिथं राघव नव्हता. तिनं आजूबाजूला पाहिलं. राघव आढळला नाही. तसा बराच अवधी झाला. तशी शोधाशोध करता करता तिला पलंगावर ती चिठ्ठी सापडली व तिनं त्या चिठ्ठीतील मजकूर वाचला. त्यात लिहिलं होतं.
''तुला मालमत्ता हवी ना. मालमत्ताच खा. मला शोधशील नको. मी कालही अनाथ होतो, आजही अनाथ आहे. मात्र उद्याचा जन्म मला अनाथांचा नको. मला अनाथ या जन्माचा अगदी वीट आलाय.''
ती चिठ्ठी व त्या चिठ्ठीतील मजकूर वाचताच तिनं त्याचा शोधाशोध केला. परंतू ना तो सापडला ना मानसी.
दोनतीन दिवस झाले होते. पोलीस शोध घेत घेत तिच्या घरी आले होते. त्यांनी दोघांचेही कपडे दाखवले. तशी तिला ओळख करुन घेण्यासाठी ठाण्यात बोलावलं. तिनं ते मृतदेह ओळखले. विचारलं, कुठं सापडले. त्यानंतर उत्तर मिळालं. या शहरातील तलावात. तरंगत होते. ते प्रेत बाहेर काढलं. तेव्हा त्यात एकवचिठ्ठी होती व पत्ता होता. म्हणून आम्ही बोलावलं तुम्हाला. वाटल्यास मृतदेह घेवून जा. परंतू प्रक्रीया करुन.
तिनं पोलिसांच्या म्हणण्यानुसार प्रक्रीया केली व त्यानंतर ती त्या मृतदेहांना घेवून घरी आली. त्यानंतर तिनं त्या मृतदेहाचा अंत्यविधीही आटोपवला.
आज झरीनाला पश्चाताप होवू लागला. तिला त्यातून काहीही झालं नाही वा ती सापडलीही नाही. पुराव्यावरून ती पुर्णतः निर्दोष सुटली. तसं तिला मालमत्ता नको होती. तसाच तिनं मालमत्तेसाठी त्याचेशी विवाह केला नव्हता. परंतू तिनं त्याला व तिला आत्महत्येला तयार केलं होतं नव्हे तर उकसवलं होतं. तिनं केलेल्या किरकोळच भांडणातून त्या दोघांनीही तिला न सांगता आत्महत्या केल्या होत्या. जणू काही त्यांचे एकमेकांशी ऋणानुबंध जुळले होते की काय असं वाटत होतं.
आज त्या दोघांच्या मृत्यूनं त्यांचे वाद कायमचे मिटले होते. तिनं राघवच्या कारखान्याची सुत्रे हातात घेतली. तसा कारभारही. तिनंही आयुष्यभर विवाह केला नाही. त्याच्याच नावावर राहिली जीवनभर. मात्र तिनं दोन अनाथ मुलं दत्तक घेतली होती व त्यांना नाव दिलं होतं, राघव आणि मानसी. आता तिला जेव्हा जेव्हा त्या दोघांची आठवण येत असे. तेव्हा तेव्हा ती हळूच त्यांना जवळ बोलवत असे. लाड करीत असे नव्हेतर आपल्या छातीशी लावत घट्ट मिठी मारत असे. ज्यात तो राघव होता की ज्यानं तिला मालमत्ता दिली होती आणि ज्यात ती मानसी होती की जिनं आपल्या अंगणातील माती पैशाच्या स्वरुपात राघवकरवी तिला दिली होती. ज्यातून ती तर सुखी झाली होती अन् तिचं अंगणही तेवढंच पवित्र झालं होतं.

**********************************************************************************समाप्त*********