Moksh - 4 books and stories free download online pdf in Marathi

मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 4

4


एक उघडी खिडकी दिसत होती.

त्या उघड्या खिडकीतून सकाळच्या उन्हाची किरणे खोली आत येत होती. खिडकी बाजुलाच थोड दूर एक उभट आरसा होता! आरश्याच्या काचेतून पुढच बैड-आणि बैडच्या मागचा दोन झापांचा काच आणि लाकडावा वॉशरूमचा बंद दरवाजा दिसत होता , तोच दरवाजा उघडला.

उघड्या दरवाज्यातून ती चालत आली. आरश्यासमोर उभी राहीली. ती आनिषा होती.

तीने आताच अंघोळ केली होती. तिच्या अंगावर फिकट निळसर, हाफ बाह्यांचा ड्रेस होता. खाली फिकट पिवळ्या रंगाचा पायजमा घातला होता. डोक्यावरचे काळे केस अद्याप ओलेचिंब होते...त्याच केसांना ती टॉवेलने पुसत होती.

केस पुसुन झाल्यावर आरश्यासमोर एक चौकोनी
प्लास्टीकचा डब्बा होता तो तिने उघडला , आणि त्यातून काचेच्या गोल लाल रंगाच्या बांगड्या बाहेर काढल्या ..मग ..मोजून पाच पाच अशा दोन्ही हातांत भरल्या..!

तिने एकवेळ मंद हसत आरश्यात पाहिल.

सोनेरी रंगाचा कांतीमय चेहरा , टपोरे डोळे, आणी हलकेसे लालसर ओठ !

तीने आरश्या बाजुला पाहिल.

तिची बैग भिंतीला टेकून उभी केलेली होती.
तीने ती बैग उचल्ली..आणि बैडवर झोपवली..

" खर्र्रखर्र !" विशीष्ट आवाजासहित , बैगची चैन उघडली.

काहीवेळ ती काहीतरी शोधतच राहिली.

" आरे हा फोन कुठे राहिला.? आई-बाबांना कॉल करून सांगितल नाही की मी इथे सुखरूप पोहचलीये, तर नुसत टेंशन घेत बसतील! आणी जयेश झोमटे सरांची भयकादंबरी शूश्श्श कोण आहे सुद्धा वाचायची आहे ना ? भेट ना रे बाबा फोन !" ती स्वत:शीच बडबड करत होती.

तोच तिच्या खोलीचा दरवाजा ठोठावला गेला..

" ठक ठक !" दरवाजा ठोठावल्याचा आवाज.

" हं कोण आहे ?" तीने बैग बंद केली.

" जी बाईसाहेब मी जखोबा , मालकीण बाईंनी तुम्हाला बोलावल हाई ? "

" ठिक आहे तुम्ही जाऊन सांगा आज्जीला , आलीच ती !" आनिषा म्हंटली.

तिच्या वाक्याला प्रतिऊत्तर आल नाही! कारण

दरवाज्याबाहेर कोणीच नव्हत ! इतक्या लवकर ज्खोबा त्या कोरिड़ॉर मधुन गेला कसा ? की तो तिथे नव्हताच? पन आवाज मात्र आला होता ना? किती गुंता हा ! विचारच नको.

आनिषाने मोठ्या दुखानेच बैग बंद केली.

" शट! हा फोन कुठे गेला असेल ? "
ती आठवू लागली.

तस तिच्या डोळ्यांसमोर काळ रात्रीचा तो थरार झळकला.!

" अरे तो मुलगा ?" अचानक तिला आर्यंश बद्दल आठवल.

" औह शट, रागाच्याभरात मी गाडीत बसले आणि त्याचे आभार मानायचे विसरलेच ! किती उपकार केले त्याने माझ्यावर , जर तो त्या गुंडांमधोमध मला वाचवायला आला नसता तर ? शिट आनिषा , लानत है तुज पर - एक छोठासा थँक्यू नाही बोलू शकलीस त्याला ! हा थोडासा खडूस आहे , पन चांगला...आहे !" आनिषा स्वत:शीच हसली. मग ती खोलीतून बाहेर पडली बाहेर तिची आज्जी वाट पाहत होती ना ?

एवढ्यावेळात ती एक गोष्ट मात्र विसरली होती..तिचा फोन ! काहीवेळा अगोदर तिच फोन तिला भेटत नव्हत! तिच्या आई- वडिलांना आपन सुखरूप पोहचलो आहोत हे कळवायचं होतं म्हणून तिच्या मनाला कितीहूरहूर लागली होती..! पन आता ? तिच्या मनाला आर्यंशच्या भेटीची उत्सुकता जास्त होती...तिला असं झाल होत की कधी एकदाच त्या आर्यंशला भेटून त्याचे अभार मानते.
पन तो तिला भेटेल का ? नियतीच्या मनात काय आहे , कोण ओळखू शकतो ?


Xxxxxxxx


आनिषा महालाच्या मोठ्या दरवाज्यातून बाहेर पडली.
चार पाय-या उतरून ती बागेच्या दिशेने निघाली...
समोर हिरव्यागार बागेत गोल टेबलाभोवती असलेल्या एका लाकडी खुर्चीत एका स्त्रीची पाठमोरी आकृती बसलेली दिसत होती.

डोक्यावरचे केस पांढरे होते. अंगात एक काळया रंगाची साडी होती.

त्या आकृती बाजुलाच जखोबा हातात एक दोन फाईल घेऊन उभा होता -आंणि त्या म्हाता-या स्त्रीशी त्याचा काहीतरी संवाद सूरू होता.

तेवढ्यात त्याची नजर बागेतून चालत येणा-या आनिषावर गेली.

" शुश्श!" आनिषाने ओठांवर बोट ठेवत जखोबा कडे पाहत त्याला गप्प राहण्यास सांगितल. ...तसा तो गप्प बसला.

हळुच दबक्या पावलांनी आनिषा पुढे पुढे येऊ लागली.

" आज्जी आई !" अस म्हंणत एकदमच तिने, तिच्या आज्जीच्या गळ्यात दोन्ही हात टाकले.

" काय ग कशी आहेस ?"
आनिषाच्या आज्जीने तिला हाताला धरून पुढे आणल..

दोघि आज्जी-नात दोघिंकडे पाहून हसत होते.

" मी मस्त मजेत आहे बघ , आज्जी !" आनिषा म्हंणाली.

काहीवेळ त्या दोघींच असंच गंमती -जमतीच बोलण सूरू राहिल . सकाळच वातावरण त्यात हा आनंदाचा विस्फ़ोट झाला होता.

त्या दोघींच्या बाजुलाच जखोबा छातीशी फाइल्स कवटाळून उभा होता. त्या दोघींच संभाषन ऐकत होता.

" जखोबा - त्या दोन्ही हरामखोरांना पोलिसांच्या ताब्यात द्या ! माझ्या ओळखीचे एक आई.पी.एस आहेत , प्रणव धनावडे- त्यांच्याशी संपर्क साधा !"

आनिषाच्या आज्जीच नाव ललिताबाई नरहर पंत.
पंतांच्या मृत्युनंतर त्यांचा सर्व व्यवसाय त्याच पाहू लागल्या होत्या. इतकी वर्ष व्यवसायात गुंतलेल्या ललिताबाई व्यव्हारी जग पुरेपुर शिकल्या होत्या - ईतकंच नाही तर
ते मोठ मोठ्या राजकारण्यांची सुद्धा त्यांची ओळख होती- वेळ आल्यावर त्यांची मदत सूद्धा होत होती-

ललिताबाईंना देवपाडा गावात जितका मान होता
तितकाच आजुबाजुंच्या गावातही होता.


" जी मालकीणबाई !" जखोबाने खिशातून फोन काढल व तो बागेतून बाहेर पडला.

आनिषा ललिताबाईंसमोर बसली.

" ए आज्जी ,!"

" काय ग ?"

" अंग. तू ह्या मॉडर्न युगात,लोक जिथे सोन घालतात ? तिथे तू चांदी दागीने घालतेस !"

ललिताबाईंच्या हातात आणि गळ्यात चांदीचे दागीने होते.त्यांनाच पाहत आनिषा म्हंणाली.

( काहीवेळा अगोदर त्या ब्ंद खोलीत पेटलेल्या हवनकूंडासमोर बसुन ती काळी जादू करणा-या -आणि त्या सैतानाला आव्हान केलेल्या म्हाता-या स्त्रीच्या अंगावर सुद्धा काळी साडी आणि हेच तर चांदीचे दागीने होते ना ? मग ह्याचा अर्थ ललिता बाइच तर त्या चेटकीण नव्हत्या ना ? )

" अंग मला आवडतात बाई चांदीचे दागीने !"
ललिता बाई म्हंणाल्या.

" का ग ? का आवडतात पन ? सांग ना? "

" अंग त्यात सांगण्यासारख काय आहे ? असंच आवडतात!"

" सांग ना ग आज्जू ! " आनिषा लाडात येत म्हंटली.

" आज्जू ? हे काय बाई नाव काढलस नविन आता !"

" तू सांग ना का आवडतात तुला , आजोबांना आवड़ायचे का ?"

आनिषाच्या मुखातून जस आजोबा शब्द बाहेर पडला.
ललिताबाईंच्या चेह-यावरचा आनंद झपकन गायब झाला. काचेवरची धुळ जशी फुंकर मारुन उडवावी तसा तो क्षण होता..

चेह-यावर निर्विकार भाव पसरले होते! अगदी कठोर गंभीर, जणु त्यांना हा आजोबा -स्वत:च्या पतीचा विषय आपल्या समोर काढलेला आवडला नव्हता - इतका मनस्ताप, इतकी घृणता का? आणि कशासाठी?

" आज्जी !" आनिषाचाचा आवाज आलां

" अनू ! पुरे बाई तुझ बोलण, तुझ काय ते फोन हरवलय ना ? " आनिषाने होकारार्थी मान हळवली.

" मग जखोबांबरोबर बाजारात जा , आणि तुला हवा तो फोन घे, पैश्याचा बिल्कुल विचार करू नकोस !"

लताबाईंनी सपशेल विषय बदल्ला होता - हे आनिषाला दिसल नव्हत !

" जखोबा !"लताबाईंनी एक हाक दिली. तसा जखोबा लागलीच धावत आला.

" जी मालकीणबाई ! "

" जखोबा आनिषाला बाजारात घेऊन जा आणि एक चांगला महागडासा फोन घेऊन द्या आमच्या नातीला ! "

लताबाईंचा आवाज .

" जी -मालकीबाई !"

" आनिषा जा !" लताबाई म्हंटल्या. तशी आनिषा जखोबांबरोबर जाऊ लागली.

लताबाई एकटक उभ्या राहून आनिषाच्या पाठमो-या आकृतीकदे पाहत होत्या.

त्यांच्या चेह-याच्या डाव्या बाजुला हवेलीचा तिसरा मजला दिसत होता .आणि तिस-या मजल्यावरच्या सर्व दोन झापांच्या ब्ंद काचेच्या खिडक्या असलेल्या खोल्या.

तोच एक काचेच्या खिडकीची झडप हळु हळु उघडू लागली! पहिली झडप उघडली, दूसरी झडप सूद्धा उघडली..

खोलीत मिट्ट अंधारी पोकळी होती. असीम अंधार भरला होता. गर्द विरहात घेऊन जात होता. त्या काळोख्या
बोळात नक्की काय लपल होत - ज्याने ती खिडकी उघडली होती.. आकाशात हळकेच जऊळ आल, पांढरट प्रकाशाला हळुच काजली चढली, सुर्याभोवती अंधाराने गराडा घातला .

सकाळच्या वेळेस अभद्र अंधार पसरला -
जसा अंधार पसरला सुर्याची किरणे नाहीसी झाली तसा त्या उघडलेल्या खिडकीतून एक चेहरा बाहेर आला..

चुना पोतलेला चेहरा. डोक्यावर टक्कल, घारे चिंचोळे डोळे, विचकलेला जबडा- धार धार सुळ्यासारखे दात ! दात विचकत ते लताबाईंकडेच पाहत होत .

लताबाईंची नजर एकक्षण आकाशात गेली.
सुर्याच्या गोळसर स्वच्छ प्रकाशा भोवताली काळी आसुरी छाया फिरकत होती.

त्यांच्या डाव्या डोळ्याला कसलीतरी भनक लागली, स्त्रीयांचे अवयव तसे उत्तेजितच.. असतात .गर्रकन वळुन लताबाईंना डाव्याबाजुला तिस-या मजल्यावर पाहिल..!

तस त्यांना दिसल.

Xxxxxxxxxxxx

नेहमीप्रमाणे देवपाडा गावचा बाजार भरला होता.
सकाळची वेळ असल्याने एवढीकाही गर्दी नव्हती. साड्यांची, सलून, मेडिकल , हॉटेल दुकान उघडली गेली होती.

वडापावच्या गाड्यांवर वडे तळले जात होते - कुठे चायनिज भजे , तळले जात होते - त्या सर्व पदार्थांचा खमंग वास बाजारात दरवळत होता.

असाच एक वडापावचा गाडा बाजारात उभा होता.
गाड्यामधोमध वडापाव वाला वडे तळत होता तर बाजुलाच त्याची बायको - चहा ढवळत होती.

गाड्याबजुला बसण्यासाठी दोन बाक होते.
त्यातल्या एका बाकावर दोन अनोळखी मांणस बसली होती. तर ऊर्वरीत एका बाकावर आर्यंश चहा पित बसला होता. त्याच्या हातात एक काचेचा ग्लास होता , त्यात चहा होत.

आर्यंश चहा पिण्यात व्यस्त होता तेवढ्यात आजुबाजूला मोठ मोठ्याने भांडल्यासारखा आवाज येऊ लागला.

पन आर्यंशला बाकीच्या लोकांशी काय घेण देन होत..? लोकांच पाहायला ? त्यांना मदत करायला तो काही देव थोडी ना होता..? किंवा साधू संत ? थंड चेह-याने तो चहा पित होता..कानांना ते आवाज ऐकू येत होते. गलिच्छ शब्दांच वापर होत होत..

वडापावच्या गाड्यापासून बाजुलाच रस्त्यावर भाजीवाले भाजी विकायला बसले होते. त्यातल्याच एका म्हाता-या भाजीवाल्यासमोर तीन गुंड ह्फ्ता मागत उभे होते.

" ए म्हाता-या हफ्ता काढ "

" आताच दुकान उघडल आहे माइबाप आता माझ्याकडे पैसे नाहीत हो , पन धंदा झाल्यावर देतो ना मी !"

" ए तुझी ही नाटक ब्ंद कर , आणि गप्प पैसे काढ! नाहीतर हा भाजीपाळा रस्त्यावर फेकू आम्ही !"

" अव मायबाप अस करू नका ओ , वाटलस तर मी हात जोडतो तुमच्यासमोर, ! माझ्या पोरींची लग्न व्हायचीत हो!"

" तुला पोरीपन आहेत का रे?" एक गुंडा म्हंणाला.

"ए मस्त आहेत का दिसायला पोरी!" दुस-या गुंड्याने जिभळ्या चाटल्या.

" आम्ही करतो ना मग लग्न एक दिवसासाठी ! खिखिखिखी!" ते तिघेही एकसाथ हसू लागले..

आपल्या मूलींच्या चारीत्र्यावर उडवलेले शिंतोडे भले कोणता बाप सहन करू शकतो !

" ए हरामखोर !" त्या भाजीवाल्या म्हाता-याने एका गुंडाची कॉलर पकडली.

" आई शप्पथ! हा उस्मान काका तर गेला आता !"
तो वडापाव तळणारा म्हंणाला. त्याच्या बायकोने सुद्धा समोर पाहिल.

" बिच्चारा उस्मान काका ! दोन पोरी लग्नाच्या आहेत आणि त्यासाठी हा - एवढ्या म्हातार वयात काम करतो.
बायको तर पोरी बारीक असतांनाच मेली.तेव्हापासून उस्मान काकानेच पाहिल त्यांच- ते अजुन परंत पाहातच आहेत . "

आर्यंश चहा प्यायचा थांबला- त्याला त्याच्या वडीलांच्या निधना नंतर, त्याच्या आईने किती काबाडकष्ट करून वाढवल होत ते आठवल, कधी-कधी जेव्हा दोन वेळच जेवन मिळत नसे तेव्हा त्याची आई आणि तो उपाशी झोपायचं! शेवटी आर्य्ंशच्या डोळ्यांसमोर तो देखावा आला जेव्हा तो पाच वर्षाचा असतांना अश्याच एका गुंडा मुळे त्याच्या आईचा जिव गेला होता.

त्याच्या मेंदूत ती आठवण येताच , कपाळावर रागीट नस उमटली! डोळ्यांत अंगार फुलला- काचेचा ग्लास त्याने बाकावर ठेवल!

" ए म्हाता-या तुझ्या तर?" अस म्हंणतच त्या गुंडाने उस्मान काकांच्या एक थोबाडात लगावली- वय झालेले उस्मान काका त्या चापटीने जामिनदोस्त झाले.

" देवा महादेवा तूच वाचव रे आता उस्मान काकाला !"
ती स्त्री म्हंणाली. तस त्याच क्षणाला जणु महादेवाने कौल दिला..

" वंssssssssss !" महादेवाच्या मंदिरात शंखानांद झाला !

आकाशातली काळी काजळी पुसली गेली..

त्या वडे तळणा-या मांणसा पुढे कढईत गरम उकळत्यात तेलात असलेला काळ्या रंगाचा तलवारीएवढ़ा झरा कोण्या एका हाताने अलगद स्लोमोशनने उचल्ला. झ-या वरून अलगद तेल कढईत पडल..

त्या वड्यावाल्याने त्या ईसमाकडे पाहील तो आर्यंश होता..

" हे हे. .हे..हे म्हाता-या तुझ्या पोरींसोबत आम्हीच सुहाsssss!" तो गुंड पुढे काही बोलणार तोच त्याच्या, डाव्या गाळावर एक काळया रंगाच्या जाडजुड झ-याचा घाव बसला.

" फस्स!" त्या गरम झ-याचा घाव त्या गुंडाच्या गालावर बसताच-त्वचा करपून ती झ-याला चिटकली.

" आहssssss!" तो गुंड जामिन दोस्त झाला.

एका किड्या मुंग्या सारखा वेदनेने तो जमिनिवर हात पाय हळवत ओरडत होता.

" अहा...आई...आई...!" गुरासारखा तो गुंड घसाफाडून ओरडत होता .

पाहता पाहता बाजारातल्या लोकांचा गोल गराडा जमला. बघ्यांची गर्दी मेल्यासारखी जुंपली.. तो वडापाववाला-त्याची बायको , सुद्धा पाहत होते.

खाली पडलेल्या उस्मानकाकांच्या खांद्यावर एक हात आला , त्या हाताने उस्मानकाकांना आधार देत उचल्ल!

उस्मानकाका पायांवर उभे राहीले.

तो वड़ापाववाला आणि त्याची बायको उस्मानकाकांजवळ आले.

" पकडा ह्यांना !" आर्यंश इतकच म्हंटला.
तस उस्मानकाकांना त्या दोघांनी आधार दिल.

" ए पोरा , कोण आहे रे तू? आणि आमच्याच इलाक्यात येऊन , आमच्याच मांणसाला मारतो का रे ?"

त्या उर्वरीत दोन गुंडांमधला एक सडपातळ गुंड म्हंटला. तो नक्कीच त्यांचा म्होरक्या होता.

त्या दोघांपासून दहा पावलांवर आर्यंश उभा होता..

बाजुलाच एक मोठ इलेक्ट्रॉनिक दुकान होत !
त्याच दुकानात आनिषा फोन विकत घेत होती.

दुकानाला ब्लर स्टाईल काच असल्याने तिला बाहेरची गर्दी-दिसत होती.

तिच्यापासून थोड दूर एक नऊ- दहा वर्षाचा मुलगा आपल्या आई- वडिलांबरोबर टिव्ही घ्यायला आला होता.

आणि नेमका त्याच वेळेस सर्व टिव्हीँवर (K.G .F. 1 ) के.जी.एफ मुवी लास्ट सीन सुरु होत.

K.G.F मध्ये काम करणारी मांणस गोल गराडा करून उभी होती.आणि रॉकीने एक म्हाता-याला गुंडांपासून वाचवून खाणीतून बाहेर आणल होत.

त्या मुलाची नजर टिव्हीवरून नकळत काचेच्या दरवाज्यातून बाहेर गेली-

त्याला रसत्यावर गोल गराडा केलेली गर्दी आणि त्या गर्दीत मधोमध एक युवक हातात काळ्या रंगाचा झरा घेऊन उब असलेला दिसला.. ! त्याच्या पुढ्यात दोन गुंड हातात चाकू तर एकान रॉड घेतल्य अवस्थेत उभे होते.

"आई शप्पथ रीयल K.G.F. फाइट !" तो मुलगा स्वत:शीच म्हंटला.

" ए पो-या बहनxद ! तु आमच्याशी पंगा घेऊन बर नाही केल आहेस ! " त्या सडपातळ गुंडाने एक शिट्टी वाजवली. तस गर्दीतून अजुन तीन गुंड बाहेर आले.

त्या तिघांच्याही हातात जाड़जुड लोखंडी रॉड होते . डोक्यात बसताच , डोक्याची कवटी फुटेल असे.

आर्यंशला चारही बाजुंनी त्या गुंडानी घेरल होत.
आजुबाजुला उभे लोक नेहमीप्रमाणे फक्त बघ्यांची भुमिका साकारत होते.

XXXXXXXXXXXX

ललिताबाईंनी गर्रकन वळुन समोर पाहिल..
तिस-या मजल्यावरची एका रूमची खिडकी उघडली होती.
त्या खिडकीतून आतल्या खोलीतला अंधार जरा गडद वाटत होता.

जर आपण असंच त्या अंधाराकडे पाहत राहिलो , तर क्दाचित संमोहिंत होऊ, नाहीतर असंच पाहता पाहता त्या अंधारातून काहीतरी भस्सकन डोक काढुन बाहेर आल तर?
ललिताबाईंच्या मनात ते विचार आले.

" गंगू ? ए गंगे ?" ललिताबाईंच्या आवाजासहित गंगू धावतच आली.

" जी मालकीणबाई !"

" काय ग , तिस-या मजल्या वरची ती खिडकी कशी उघडी राहिली? तुला माहितीये , वाड्याची एक बी खिडकी, दरवा जा उघडा राहता कामा नये !"

गंगूने तिस-या मजल्यावर पहिल..
पन कोणतीच खिडकी उघडी नव्हती.

" अव पन मालकीणबाई , सर्व खिडक्या तर ब्ंदच हाईत की !"

" काय ?" ललिताबाईंनी गर्रकन वळून तिस-या मजल्यावर नजर टाकली.

ह्या उभ्या डोळ्यांनी काहीवेळा अगोदर जे पाहिल , खर ? की आता पाहतोय तो नजारा खरा ? नक्की विश्वास तरी कशावर ठेवाव.

गंगूला सुद्धा आज सकाळचाच फरशी पुसतानाचा अनुभव आठवला.

" मालकीणबाई एक बोलू !" ती म्हंणाली.

" हो बोल!" ललिताबाई अद्याप त्याच तिस-या मजल्यावरच्या खोलीकडे पाहत होत्या.

" आज सकाळ मी फरशी पुसत होते ! फरशी पुसून झाली तशी मी बालदी घेऊन उठले - तेवढ्यात मला फरशीवर पायाखाली रक्ताचे डाग दिसले."

ललिताबाईंची मान गर्रकन गंगूच्या दिशेने वळली.

" आण मी ते डाग पुसून टाकायच्ं प्रयत्न केल तर जातच नव्हते! तेवढ्यत अन्ना (जखोबा) तिथे आले! मी बी त्यांना असंच रक्ताच डाग दाखवल , पन!" गंगू थांबली.

" पन? पन काय? ?"

" प..प..पन तिथल रक्ताच डाग अचानक गायब झाले होते.!" .

" काय ? " ललिताबाईंच्या नजरेत आश्चर्यकारक भाव होते.

गंगूच्या चेह-यावरची उफाळून आलेली भीति आणि तिचे ते उद्दार , खोटेपणाची साक्ष मुळीच देत नव्हते. तसंही खोट बोलून त्या मोलकरीणीला काय मिळणार होत?

" मालकीणबाई , वाड्यात पून्हा तसल काही फीरकत नसल ना ?" गंगूच्या ह्या वाक्यावर ललिताबाईंच्या भुवया विस्फारल्या.

" जा ! काम कर जा ?" ललिताबाईंना जणु ह्या विषयावर जास्त बोलायचं नव्हत !

" जी !" गंगू अस म्हंणतच निघुन गेली.

तसंही उलट प्रश्ण करणारी ती कोण? वाड्यात मोलकरीण म्हंणुन काम करणारी ती , तिची एवढी मजल नव्हती! ललिताबाईंच्या वाक्यावर खाली मान घालुन ती जाऊ लागली.

तिच्या मागे चिंतीत चेह-याने ललिताबाई अद्याप बागेतच उभ्या होत्या.

ललिताबाईंनी हळुच वळुन तिस-या मजल्यावर पाहिल..
सर्व खिडक्या ब्ंदच होत्या.

" बहादूर !" त्यांनी आवाज दिला .

" जी मेमशाब !"
बागेत काम करणारा गडी ललिताबाईंसमोर उभा होता.

" बहादूर ,वाड्याच्या वरच्या मजल्यावर एक फेरी टाक! बघ कोणत्या खोलीची खिडकी वगेरे तर उघडी राहिली नाही ना?"

" जी मेमशाब , देखतो.. बगते मी !"
बहादूर म्हंणाला. तसा ललिताबाई बागेतून वाड्यात जायला निघाल्या.

क्रमश :



इतर रसदार पर्याय