मोक्ष 3
सकाळचा सुर्य उगवून आला होता.
चारही दिशेना हळकासा थंडावा आणि सुर्याचा कोवळा उन्ह पसरलेला दिसत होता..
आकाशातून चिमण-पाखर किलबिलाट करत उडत होती. त्यांचा तो आवाज किती मंत्रमुग्धिंत करत होता?
पंतांचा वाडा म्हंणायला काही वाडा नव्हताच.
एक शाही हवेली होती !
प्रथम एक दोन झापांच बारा फुट उंचीच काळ्या रंगाच लोखंडी गेट होत. गेटला जोडून चारही दिशेना , पंधरा फुट उंचीची कंपाउंडची भिंत होती.
गेटच्या बाहेर दोन गुंडासारखी शरीरयष्टी असलेली मांणस उभी होती.
दोघांच्या हातात काठ्या होत्या.
गेटलासून पुढे एक S आकाराचा रस्ता पुढे जात होता..
त्या रस्त्याच्या दोन्ही बाजुला गार्डन होत गार्डनमध्ये दोन इंचाएवढ कट केलेल गवत होत...तर बसण्यासाठी सफ़ेद रंगाच्या खुर्च्या- लाकडी टेबल सुद्धा होत.
आणि ह्या सर्वाँपुढे होता पंतांचा वाडा!
एकून तीन मजल्यांचा , शंभर फुटांवर पसरलेला हा वाडा ? कोणि वाडा म्हंणेल का ? प्रत्येक मजल्यावर चाळीस खोल्या होत्या. एकुण एकशे वीस खोल्यांची ही हवेली होती.
पांढरट भिंती सकाळच्या उन्हाच्या प्रकाशाने चकाकून उठल्या होत्या.
वाड्यात प्रवेश करण्यासाठी प्रथम चार u आकाराच्या पाय-या होत्या.
प्रवेशद्वार दहा फुट उंच आणि आठ फुट लांबीच होत.
दोन झापांचा चौकलेटी दरवाजा उघडा होता.
त्याच उघड्या दरवाज्यातून अंगयष्टीने सडपातळ असलेलो एक बाई हॉलमधली खालची पांढरट रंगाची फरशी पुसत होती. गंगूलता गावडे उर्फ गंगू खुप वर्षांपासून मोलकरीण म्हंणुन वाड्यात कामाला होती. तिच्या व्यतिरिक्त अजुन सुद्धा गड़ी होते. ते सूद्धा आपल्या कामात व्यस्थ असावेत.
गंगूने एक लाल रंगाची साडी, आणि मैंचिंग लाल ब्लाउज घातला होता. डोक्यावर पदर पसरवुन चेहरा झाकून ती फरशी पुसत होती.
त्या पांढरट फरशीवर तिच्या हातातला सफेद फडका फिरत होता.
सर्व फरशी पुसुन झाली होती. तीने फडका , बालदीत टाकला व ती बालदी घेऊन जागेवरशक उठली तोच न जाणे कोठून तिच्या पाया खाली फरशीवर लाल भडक ताज्या रक्ताचे डाग उमटले.
" अंगो बाई हे रक्ताचे डाग कुठून आले ?"
तीने बालदी खाली ठेवली- आणि फडक्याने तो डाग पुसु लागली.
परंतू तो डाग मात्र काही केल्या निघत नव्हता.
फडक्याने ती तो डाग अक्षरक्ष रगडून रगडून साफ करत होती.. तिचे हात दुखू लागलेले
.परंतू तो डाग मात्र काही केल्या निघत नव्हता.
जणू फरशीला चिटकला होता.
" गंगे !" गंगू आपल्या कामात व्यस्थ असतांनाच अचानक तो खेकसता आवाज ऐकून ती दचकून उभी राहिली..
" जी...जी अन्ना !"
तिच्या मागे जखोबा उभा होता. ज्खोबाला वाड्यातले नोकर चाकर अन्ना म्हंणुन हाक मारत. त्याच्या राकिट, म्हाता-या खेकसी स्वभावाला सर्व जरा घाबरूनच असत.
" किती पुसतीया ती लादी ? " जखोबा खेकसतच म्हंणाला.
" अं..अं..अन्ना , ते फरशीवर रक्ताचे डाग!"
गंगूचा काफरा स्वर ..
रक्त नाव ऐकून जखोबा जरासा गोंधळला.
" कुठ आहे रक्त ?" त्याने विचारल.
" हे काय इथंच !" अस म्हंतच गंगूने मागे हात करत खालची फरशी दाखवत खाली पाहिल..
खाली पाहताच तिचे डोळे जरासे विस्फारले..
" कूठ हाई रक्ताच डाग ?"
खाली फरशीवर काहीच नव्हत.
पांढरटफरशी नव्यासारखी चकाकत होती .
" अव अन्ना म्या माझ्या डोळ्यांनी पाहिल..इथ!"
" गप्प बस्स ! " जखोबा मध्येच खेकसला.
" काय बी नाय हाई इथं , आणि ह्यो ईषय कुणासमोर काढू नगस ! जा कामाला लाग ?" जखोबाने ग्ंगूला धुडकाऊन लावल.
बालदी घेऊन स्वत:शीच विचार करत ग्ंगु निघुन गेली.
जखोबाच ओरडण नेहमीचंच असाव , कारण तिला त्याच राग आल नाही- किंवा तिला सवय असावी.
" ए भीम्या !" जागेवर उभ राहूनच जखोबाने आवाज दिला.
तस तिथे एक शरीरयष्टीने जाडजुड असलेला माणुस धावत पळत आला.
खाली सफेद धोतर आणि खांद्यावर एक टॉवेल सोडल तर त्या व्यतिरिक्त त्याच्या अंगावर काही नव्हत. डोक्यावरचे केस सूद्धा टक्कल होती.
" जी अन्ना !" भीम्या म्हंणाला.
" हे बघ , आजपासून जेवणाच्या टेबलावर नवीन नवीन पदार्थ असायला हवेत ! कसलीच कमी नको काय?"
" जी अन्ना ! शाकाहारी-मांसाहारी , गोड धोड सगळ बनवतो बघा !" भीम्या म्हंणाला.
" हंम्म. चल निघ आता !" जखोबा रूबाबात म्हंणाला.
मान हलवत भीम्या निघुन गेला.
भीमानाथ उर्फ भीम्या , पंतांच्या वाड्यावर स्वयंपाक बनवण्याचा काम करायचा - आपल काम आणि पैसा एवढच त्याला ठावूक होत , बाकीच्या व्यव्हारांशी त्याला काही घेण देन नव्हत ? की वाड्यावर कोण पाव्हणे होतात? किती दिवस राहणार ? आलेल्या कोण्या पाव्हण्याने हालचाल विचारली? तर जी -बरा आहे ! थोडस औपचारीक हसून-प्रतिउत्तर द्यायचं बस्स !
भीमा आल्या पावळे निघुन गेला.
हॉलमध्ये आता जखोबाच उभा होता.
हॉल म्हंणायला तस मोठ होत. खाली पांढरट फरशी, सोफे,
लाकडी खुर्च्या, टिपॉय, फुलदाणीचे टेबल, भिंतिंवरच्या पेंटिंग्स सर्वकाही हॉलमध्ये होत. हॉलमधुनच दोन जिने 0 आकारात वर जात होते. जिन्यांच्या पाय-यांवर लाल रंगाची सतरंजी होती- लाकडी रेलींग नागमोडी वळणासारखी वर जात होती.
जखोबा एकटाच हॉलमध्ये उभा तीरकस नजरेने चारही दिशेना पाहत होता. त्याची बारीकशी धारधार नजर आता गंगूने दाखवलेल्या रक्ताचे डाग उमटलेल्या जागेवर आली..पन तिथे मात्र काहीच नव्हत.
परंतू जखोबा मात्र तिथे पाहून हळकेच छद्मी हसला..
त्याच्या हसण्या मागे काय कारण होत ? हे एक गुढच होत
xxxxxx
एक दहा × दहा ची खोली दिसत होती. त्या खोलीत मध्यभागी एक हवनकुंड पेटला होता. हवनकूंडातल्या लालसर आगीने खोली उजलून निघाली होती.
हवनकुंडाच्या चारही बाजुंनी टाचण्या टोचलेले लिंबू,काळे बिबे, मेलेल्या काळ्या बिन धडाच्या कोंबड्या, मानवाच्या किडण्या,ठेवल्या होत्या.. हवनकूंडा समोर एक काळ्या रंगाची साडी घातलेली हाडकूल्या देहाची म्हातारी चेटकी बाई बसली होती. तिने साडीचा पदर तोंडावर घेतला होता.ज्याने तिचा अर्धा चेहरा झाकलेला होता..फक्त तिची हनुवटी आणि त्यावर असलेली हिरव्या गोंदवणाची तीन चांदण्या दिसत होत्या. म्हातारीच्या मागे दोन झापांचा चौकलेटी दरवाजा होता..
म्हातारीच्या हातात चांदीचे पाच सहा कडे होते. तोच चांदीचा हात पुढे आला..
हवनकूंडाच्या पुढच्या बाजूस तीन पांढ-या पिठाच्या बाहुल्या मांडल्या होत्या..त्या तीन्ही बाहुल्यांना हात-पाय , गोल चेहरा असा विचित्र आकार दिला होता.
तोंड म्हंणुन रक्ताने कोरळ होत..डोळे म्हंणुन काळसर खडे खोचले होते.
करणी, काळा जादू ह्यातलाच काही प्रकार सुरु होता का ?
म्हातारीचा चांदीचा हात पुढे आला. हाताची मुठ झाकलेली होती..तीच तीने उघडली...बंद मूठित त्यात एक खिळा होता.
पुर्णत खोलीत पसरलेल्या लाल आगीने खोलीला लाल अभद्र रक्ताळलेला प्रकाश पूरवला होता. पुर्णत खोली लाल रंगाने ऊजळून निघाली होती.
वाममार्गी वामपंथ्यांची पुजा- अर्चा सुरु होती का?
काय सुरु होत इथे ? नक्की कसली अर्चा होती. नक्की काय प्रकार होता हा ?
" ए मेल्याaasss , घे खा ....खा मेल्या आकारमाश्या!"
ती म्हातारी खेकसली.
तीने हातातला खिला उचलून तोच तिच्या पाचही बोटांत एक एक करत खुपसला. प्रत्येक बोटातून लालसर रंगाचा रक्त थेंब थेंब करत बाहेर आल, त्या म्हातारीने हाताच्या पाचही बोटांतून निघणार रक्त त्या बाहुल्यांवर एक एक थेंब वाहिल..
त्याचक्षणाला मागे असलेला तो दोन झापांचा तो चौकलेटी दरवाजा खाडकन उघडला.
" धाड sss!" फळ्यांचा मोठा आवाज झाला.
दरवाज्याबाहेरून निळ्सर प्रकाश आत येत होता आणि त्याच प्रकाशात एक सहा फुट उंचीची हाडकूली अंगात झब्बा घातलेली काळसर आकृती उभी होती. त्या आकृतीच्या बाजूने पांढरट रंगाच धुर वाहत होत.
" आलास व्हय रे मेल्या !"
ती म्हातारी खेकसली.. पन तीच सर्व लक्ष पुढेच होत.
" होय आये..आलो..खिखिखिखी! "
खांदे हळवत ते ध्यान हसत होत.. त्याचा खसखसता खवखवता आवाज जिवघेणा होता.
" ए आये, मसाला दे ना ? "
" व्हय रे मेल्या एवढ वर्ष म्याच खायला देतीये ना घे !"
त्या म्हातारीने एक एक करत हवनकूंडासमोर असलेल्या त्या बाहुल्या पुढे पाहतच मागे दाराच्या दिशेने भिरकावल्या..
.." तिंघांचा पन काटा काढ रातच्याला ? जा !"
त्या ध्यानाने आपल्या प्रेताड काटकूळ्या हातांनी त्या बाहुल्या उचल्ल्या..! तसा तो दोन झापांचा दरवाजा हळुच आपोआप कर्र कर्र... आवाज करत बंद झाला...
क्रमश :
"