Moksh - 7 books and stories free download online pdf in Marathi

मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 7

थरथराट कालोख्या रात्रीचा

नोट - ह्दयाचा त्रास असणा-यांनी ह्या पुढचे भाग बिल्कुलंच वाचू नका !🙏


पंतांचा वाडा

हॉलमध्ये ड़ायनिंग टेबल बाजुलाच थोड दूर
चार सोफे होते. मधोमध एक मोठा काचेचा टिपॉय होता.

एका सोफ्यावर ललिताआज्जी तिच्या बाजुलाच
आनिशा, तिच्या बाजुलाच रिया बसली होती.

दुस-या डाव्या बाजूच्या सोफ्यावर रघुराव त्यांची पत्नी
निषा, दोघेच बसले होते.

आणि ह्या सर्वाँसमोर पुढच्या सोफ्यावर एकटा आर्यंश बसला होता . दोन्ही पाय एकमेकांना जोडून, आणी दोन्ही हात मांडीवर ठेवून , खाली मान घालून तो बसला होता.

ह्या सर्वाँत जखोबाचा मात्र पत्ता नव्हता! न जाणे तो कोठे असावा?

ही सर्व मंडळी जिथे बसली होती -त्या सर्वाँच्या मागेच
डायनिंग टेबल होत.

डायनिंग टेबलवर राहिलेल जेवण गंगू, आणी अजुन तीन चार बायका होत्या - त्या मिळून किचनमध्ये नेहत होत्या
..

भीमा हातात एक गोल ट्रे घेऊन आला ! त्यात सहा काचेच्या वाट्या होत्या - आणि त्या सर्व वाट्यांमध्ये
काजू-बदाम, स्ट्रॉबेरी मिक्स थंडगार आईस्क्रीम होती.

त्याने तो ट्रे टिपॉयवर ठेवला , आणि आल्या पावले निघुन गेला.

सर्वाँनी एक एक करत आईस्क्रीमची काचेची वाटी घेतली. आर्यंशने मात्र तेवढी स्वत:हा घेतली नाही, त्याला निषाबाईंनी उचलून दिली.

" काय रे बाळा, काय नाव तुझ?" ललिताबाईंनी आर्यंशला विचारल.

" माझ नाव आर्यंश !" आर्यंश खाली पाहतच म्हंणाला.

" कुठून आला आहेस ?" ललिताबाई.


" मुंबइ वरून आलो आहे !"

" अच्छा ! काय काम करतोस ?"

आर्यंशच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या होत्या.
तो हे तर नाही सांगू शकत होता ना ? की मी एक रेसलर आहे ! आणि एका रेसलरचं खून केल्याने मला काहीदिवस दुस-या शहरात पाठवल आहे ! परंतु उत्तर देण भाग होत ना ?



" कंपनीत कामाला आहेत ते ! "

मध्येच आनिषा म्हंणाली.

तस आर्यंशने आ- वासून तिच्याकडे पाहील..

" पन आनू तुला कस माहीती !" तिच्या बाजुला बसलेली चमच्याने आईस्क्रीम खात म्हंणाली.

उर्वरीत सर्वजन आनिषाकडेच ती पुढे काय बोलेल हे पाहत होते.

" अंग काळ बोलता बोलता त्यांनीच सांगितलं मला!"

" औह अच्छा!" रघुराव बोलू लागले.

" कोणती कंपनी आणि काय काम करतो तिथे !"

आर्यंशने पुन्हा काव-या बाव-या नजरेने आनिषाकडे पाहील..
जणू तो नजरेनेच बोलत होता , की आता तूच मला वाचव !

" अप्प्पा , आज्जी ?" आनिषाने त्या दोघांकडे पाहील.. " काय करताय तुम्ही दोघ, अंग त्यानी माझी एनवेळेस संकटात येऊन मदत केलीये ! आणि तुम्ही दोघ त्याला थँक्स बोलण्या ऐवजी , नुस्ते प्रश्ण काय विचारत आहात ?"

आनिषा म्हंणाली.

आर्यंश अजुनही खालीच पाहत होता.

" हो हो सॉरी सॉरी ! मग आर्यंश ?"
रघुरावांनी ललिताबाईंकडे पाहील..

" तु शहरातून ह्या देवपाडा गावात का आलायेस ? नाही म्हंणजे काही काम वगेरे की फक्त फिरण्यासाठी."

" फिरायला - फिरायला !"
आर्यंश -आनिशा दोघेही एकदाच म्हंणाले. आनिषाने तर हळूच जीभ चावली

...

आर्यंशने एक आवंढा गिळला..

" आनिषा तूला कस माहीती हे ?,"

निषाबाईंचा आवाज.. त्या जरा रोखून आनिषाकडे पाहत होत्या...

" मम्मी , मी म्हंणाले ना ! त्यानेच सांगितल मला -- आता तो सुद्धा तेच तर म्हंणाला ना ?"

निषा बाईंना लगेचंच खात्री पटली..

त्यांंनी फक्त होकारार्थी मान डोलावली.

" बर मग ! " ललिताबाई खुर्चीतून उठल्या

" आर्यंश , तु आमच्या नातीला त्या गुंडांपासून वाचवलस , ती मदत म्हंणजे तू आमच्यावर खुप मोठ उपकार केल आहेस ! म्हंणूनच तु जितके , दिवस ह्या गावात फिरण्यासाठी आला आहेस , तितके दिवस आमच्या वाड्यात आतिथी बनून रहा !"

आर्यंशने फक्त होकारार्थी मान हळवली ..

" आनिषा?रिया ?" ललिताबाईंनी आनिशा व रियाकडे पाहिल.

" आर्यंशला दुस-या मजल्यावरची जखोबां जवळचीच एक खोली दाखवा जा पाहू !"

" हो -हो !" त्या दोघींनीही एकदाच होकार दर्शवला..

आर्यंशने आपल्या बैग उचलल्या.. ललिता बाईंकडे
पाहत त्याने हळकेच हात जोडले..

" थँक्यू ! " तो इतकेच म्हंणला.

त्यावर ललिताबाईंनी फक्त होकारार्थी मान हळवली.

आनिषा- रिया दोघीही पुढे तर आर्यंश त्या दोघींच्या मागून जाऊ लागला..

बाजुलाच जिन्यावरून ते तिघे दुस-या मजल्यावर जाऊ लागले.

" वा खुप चांगला मुलगा आहे नाही !" निषाबाईंनी त्यांच्या सासूबाईंकडे मग रघुरावांकडे पाहिल.


" हो ना !" रघुराव म्हंणालें

ललिताबाईंनी फक्त होकारार्थी मान हळवली.

" चला , झोपायची तैयारी करा ! रात्र खुप झालीये!"
ललिताबाई म्हंणाल्या.

रघूरावांनी आणि निषाबाईंनी होकारार्थी मान हळवली.

ललिताबाई निघुन गेल्या - लागोलाग रघुराव आणि निषाबाई सुद्धा आपल्या खोलीच्या दिशेने निघुन गेल्या...

xxxxxxxxxxxx

आकाशात चंद्राची पांढरट दूधाळ आकृती दिसत होती.
त्याच आकृती जवळून पूर आलेल्या वेगवान पाण्याच्या प्रवाहासारखे काळे ढग हळुच सरू लागले..

पाहता पाहता काळया ढगांनी चंद्राची दुधाळ कांती गिळून टाकली..!

धरतीवर पसरलेला निळसर प्रकाश नाहीसा झाला...
आता तिथे चौहीदिशेला डांबरी युक्त काळा अंधार पसरला..

वातावरणात हलकिशी थंडी पसरायला सुरुवात झाली होती. धुक्याने आपला जंजाळ, कोष संपूर्णत देवपाडा गावात पसरवला होता. पुर्णत गाव जणु श्रापीत, बधीत , पछाडलेल भासत होत.

काळ्या अंधारात फ़ेसाळता पांढरट धुका खीखी खीखी खिदळत मिरवत होता. त्याच काळ्या अंधारात धुक्यात न जाणे काय काय वावरत होत?

कल्पनाच करवत नाही ! त्या फ़ेसाळत्या धुक्यावर ती साडे सहा फुट उंचीची काळी आकृती कधी हवेतून उडत , तर कधी सापासारखी सरपटत येतांना दिसत होती.

स्मशान शांततेत परावर्तित झालेल गाव , त्या शांततेच कारण काय होत? अंधा-या कोप-यात पडून राहिलेले मुके जनावर सुद्धा डोक खाली घालून -डोळे थोडेसे किलकिले करून भित्र्यासारखे धुक्यात पाहत होते..!

त्या मुक्या जनावरां सुद्धा ते अमानविय ध्यान पुढे पुढे जातांना दिसत होत.

त्या आकाराला पाहताच गल्लीतील कुत्रे कुई कुई..आवाज करत तोंड पायांत लपवत होती.

.... रातकिड्यांची किरर्किर्र अंतयात्रेतल भजण गात होती.
राम-नाम सत्य हेचे बोल कानांत कान वाजावे तसे ऐकू येत होती.

तो भ्रम -की आभास ओळखण कठीण होत.

मालकाच्या हुकूमावरून ते ध्यान एकून तीन जनांच म्हढ पाडण्यासाठी गावात आलेल.

म्रृत्यूचा तोहफा घेऊन तो त्या त्या सावजाला देणार होता.

जो की अखेरचा ठरणार होता..


देवपाड गावात दोन सरपंच होते.

सरपंच नामदेवआबा वय पंचावन्न(55) दुसरे
उपसरपंच म्हंणून सुर्यकांतराव , वय पंचेचाळीस (45) होत.

सरपंच नामदेवआबांचा देवपाड गावात वारसा ह्क्काने मिळालेला दुमजली - दगडी बांधकाम असलेला- जुनाट काळातला वाडा होता.

वाड्याला चारही बाजूने सात फुट उंचीच दगडांच कंपाउंड होत. मधोमध दोन झापांचा गुलाबी रंगाचा ब्ंद दरवाजा दिसत होता.

दरवाज्याजवळ आत दोन गडी उभे होते.
डोक्यावर टक्कल , शरीरयष्टीने जाड्जूड, खाली पांढ़रट धोतर - आणि हातात एक जाड्जूड काठी...

" ए भिंग-या , आज वाड्याव मालकीण न्हाई हाई ! म्हणुन आबा आण सू-या दादांची मैफिल रंगली हाई बघ ! आत काय काय बिरंडड दारू आणलीय आबांनी लगा इचारूच नग बघ ! , " त्या दोन गड्यांमधला एक गडी भिंग-या नाव असलेल्या आपल्या सहका-याला म्हंणाला.

" व्हय रे ,वास कसला भारी येतो बघ ! देशी माळ न्हाई यो ! विदेशी हाई ,आपल्याला बी एक एक गिळास भेटाला पायजे ना ?" भिंग-याने जिभल्या चाटल्या...

भिंग-याच्या गळ्यात एक जाडजुड काळ्या दो-याची त्यात काळी ताविज ,बांधलेली होती.
त्या दोघांच्या नेहमीप्रमाणे गप्पा सुरु होत्या.

पुढे चौरस आकाराच लाल मातीच अंगण होत.
मधोमध हिरव्या ट्वटवीत पानांची तुळस होती.

सरपंच आबांची बायको भिमाअक्का रोज सकाळ-संध्याकाळ त्या तुळशीची पुजा करायची - तिथे दिवा लावायची ! तुलशीला पानी घालायची (म्हंणूनच पाने हिरवी टवटवीत होती.)

परंतु जर चालक गाडीत नसेल तर ती गाडी चालेल का? ती सक्रिय होइल का? नाही ना ? तसंच देवाधर्माच असत !

श्रद्धा असेल , तरच देवांची मदत मिळते! मनात देवा
विषयी आपुलकी असेल , तरच देव मदतीसाठी धावून येतात ! अन्यथा त्या प्लास्टीकच्या फोटोतल्या त्या चित्रात जिव नसतो ,श्रद्धा ही खुप महत्वाची असते ! श्रद्धेच्या शक्तिने दगडात सुद्धा देव शोधला जाऊ शकतो !

आज वाड्यात भिमाअक्का नसल्याने देव्हा-यात दिवा पेटला नव्हता , सकाळची दिव्यातली वात तशीच काळी निळी पडुन होती.

देव्हा-यात असलेले देव त्या देवांसमोर काळा अंधार पसरला होता...देवघर अंधारात बुडाल होत.


अंगणात चार पाय-या होत्या..त्या चढल्या की वाड्यातची भिंत आणि तो दोन झापांचा उघडा दरवाजा दिसत होता.
उघड्या दरवाज्यातून आतला पिवळसर ब्ल्ब जळतांना दिसत होता .

त्याच पिवळ्या ब्ल्बच्या उजेडात हॉलमध्ये असलेले
टेबल खुर्च्या, सोफा, अस सामान दिसत होत.

हॉलच्या उजव्या बाजुला एक चौकट आणि बाजुलाच वर जाणारा लाकडी सफेद रंगाचा जिना होता, उजव्या बाजुच्या चौकटीतून पुढे जाता स्वयंपाक घर लागत होत !

डाव्या बाजुला असलेल्या चौकटीतून पुढे देव्हारा होता ... ! खाली एका चौरस आकाराच टेबल होत - त्यावर लाल रंगाचा कपडा अंथरला होता.

शंकर -पार्वती गणपती , स्वामीसमर्थ, लक्ष्मी, लंडा बाळकृष्ण अश्या सर्व मुर्त्या देव्हा-यात होत्या.

देवांना प्रकाश देणारा दिप सुद्धा होता-पण पेटलेल नव्हत ! सकाळची कापसाची वात काळी निळी पडली होती.
देव्हा-यात दिवा नसल्याने देवांच्या मुर्त्या भेसुर दिसत होत्या...
देव जणु नाखुष - असक्रिय वाटत होते.

जिन्याच्या पाय-या वर चढुन गेल्यावर समोर एक L आकाराची कॉरिडॉर होती. सात आठ ब्ंद रूम्स तिथे होत्या.

वर पिळवळे बल्बज पेटले होते..ज्याने भीतीच काही कारण नव्हत ! पन जर लाईट गेली तर? किती भयानक विचार !

वरच्या मजल्यावरच्याच एका खोलीत ...

दोन लाकडी खुर्च्या दिसत होत्या , एक खुर्चीवर नामदेव आबा बसले होते.

तर दुस-या_!! खुर्चीवर उपसरपंच सूर्यकांतराव..

त्या दोघांच्या मधोमध एक चौरस आकाराच काचेच टिपॉय होत- त्यावर महागड्या दारुच्या बाटल्या ठेवल्या होत्या.

बाजुलाच गोल थाळीत चणे-शेंगदाने, गावठी मटन होत.

दोन दारूने भरलेली काचेची ग्लास सुद्धा तिथे दिसत होती.

हळूच दोन हात आले आणि दोन्ही काचेचे ग्लासाल हवेत उचल्ले गेले.

" चियर्स !" नामदेव आबा- सुर्याकांतरावांनी आप -आपले ग्लास एकमेकांना टच केले..

मग ग्लास हळूच तोंडाला लावल..

" हंम्म वाह्ह्ह सू-या वाह्ह्ह्ह.. ! काय चव हाई वाहाह...!"

नामदेव आबा दारूचा एक घोट घेत उच्चारले.

" थँक्यू आबा थँक्यू !" सुर्यकांत राव म्हंणाले.

" काय सांगू सू-या , आमच्या मालकीण बाईंना देवा धर्माच लेय याड! म्हंणून दारूला हात बि लावून देईना ! "

सुर्यकांतराव फक्त मान हळवत हसत ऐकत होते.

ह्या दोन्ही सरपंचांची जोडी खुपच घट्ट होती. दोघेही वयाने जरी सारखे नसले तरी मैत्री मात्र लहानपणाची होती. त्यातच नामदेव आबा सुर्यकांतरावांना आपला लहाण भाऊ समजायचे. आणि सुर्यकांतरावांच्या मनातही नामदेव आबांसाठी खुप आदर होता..गावच्या विकासासाठी घेतले जाणारे निर्णय ते दोघेही ठरवत असत ! गावक-यांना सुद्धा ह्या दोन्ही सरपंचांवर खुप विश्वास होता.


" आबा ! " सुर्यकांतराव

" हं काय ?" आबांनी हळुच दारूचा एक घोट घेतला , ताटातल मटन तोंडात टाकल..

" आपण जे तुकडोजी पुजा-यांना सांगितलं, ते ललिताबाईंना पटल का ?"

सुर्यकांत रावांच्या वाक्यावर आबा त्यांच्या खुर्चीत जरा ताठ बसले.

कपाळावर जराश्या आठ्या आणत ते म्हंणाले.

" सू-या , त्या म्हातारीला पन माहीती असल ना ? की तो हरामखोर तिच्या ..!"

' फडफड 'मध्येच पंखांचा फडफडता मोठा आवाज झाला .

स्मशान शांतता, रातकीड्यांची किरकिर आणी हा अभद्र अपशकूनी गिरगिराट घुत्कारण्याचा आवाज ...

" ए भिंग-या Sssss!" आबांनी मोठी हाक दिली...

" ए भिंग-याsss!" दुस-या हाकेला जिन्याच्या पाय-या जोरात चढत असल्याचा आवाज आला..आणि पुढच्याक्षणाला दारात जल्लाद सारखा भिंग-या दारात उभा होता..

" जी..जी मालक!" तो म्हंणाला..

" आर ए लेका त्या उघड्या खिडकीत काय येऊन घुत्कारतय बघ जरा ? हाकल त्या रांडच्याला ! " आबांनी घुबड हा शब्द वापरला नाही.

खोलीच्या दरवाज्यापासून समोरच पंधरापावलांवर उघड्या झापांची चार उभ्या सळ्या असलेली खिडकी होती.
भिंग-या त्याच खिडकीच्या दिशेने निघाला..


" अहो आबा ! दहा पावलांवरच खिडकी आहे की ?
मी गेलो असतो की ? त्याला खालून वर कशापाई बोलावलं , ! उगीचंच तरास बिचा-याला " सूर्यकांतराव बोलले.

" ए बाबा , रातच्याला त्या मुस्काट फुट्याच त्योंड नाय पाहायचं समजल ! सैतानाच माणुस हाई ते , बटा-या डोळयांनी बघतय आण जाऊन सांगतय त्या शैतानाला..! आण त्या भिंग-याची बॉडी बघ ! पैलवान हाई पैलवान! दोन हात करल अलगद अस हाई.."

सुर्यकांतरावांनी फक्त होकारार्थी मान हळवली..
त्यांच्या डोळ्यांत हळूहळू दारुची नशा चढतांना दिसत होती.. डोळ्यांच्या पापण्या जराश्या जड झाल्या होत्या..

भिंग-याने खिडकीतल्या सळ्यांवर हात ठेवले.
मान हळूच त्या सळ्यांच्या दिशेने आणत चेहरा , सळ्यांवर टेकवला.. दोन डोळ्यांनी बाहेर पाहू लागला...

ही वाड्याची मागची बाजू होती ..
मागे केळीची चार-पाच झाड होती. त्या केळ्यांच्या झाडा पुढे एक गोलसर कठड्याची विहीर होती. आणि त्या पूढे कंपाउंड व कंपाउंडच्या ही पुढे बाजरीची पाच फुट उंच कन्सांची शेत होती.

भिंग-याने वाड्याच्या मागच्या बाजूला पाहिल काहीही नव्हत - मग त्याने एक नजर कंपाउंड पल्याड असलेल्या बाजरीच्या शेतात टाकली..तस त्याला दिसल.

देवपाडा गावातल्याच कोण्यातरी गावक-याच शेत होत ते आणि त्या शेतात गावक-याने पक्षी- प्राण्यांपासून पिक वाचवण्यासाठी एक बुजगावण लावल होत.

कन्सांपेक्षा उंच जेमतेम सहा फुट उंचीच्या काठीवर ते तपकीरी फुल बाह्यांच जागो जागी चिंध्या झालेल.. सद-याच, आणी खाली एक सफेद शिवलेली पेंट, डोक्याच्या जागी v आकाराचा पेंढ़ा असलेला मुकुट आणि त्यावर रेखाटलेले काळे टपोरे डोळे आणि जबडा विचकलेल लालसर रंगाच हास्य...अस साडे पाच फुट उंचीच ते भयान बुजगावण भिंग-याला दिसल.

त्या अंधा-या शांततेत ते निर्जिव बुजगावण भिंग-याच्या
मनातल्या भीतिच्या फोल्डर मध्ये टच झाल.

भिंग-याने आवंढ़ा गिळला... आणी तेवढ्यात हवेतून एक घुबड पंख फडफडत येऊन त्या..बुजगावण्याच्या खांद्यावर बसली.

अंधारात तिचे गारगोटीसारखे पिवळेधमक डोळे चांदीच्या नाण्यासारखे चकाकले. ती घुबड भिंग-यालाच पाहत होती.

" ए शूशूशू...हाड...हाड तिच्या..आईला..हाड हड...!"
भिंग-या त्या घुबडेला पाहून मोठमोठ्याने ओरडत हातवारे करत त्या घुबडेला हाकळण्याचा प्रयत्न करत होता..पन ती घुबड जागेवरून ह्ळायच नाव घेत नव्हती.

" काय आहे रे भिंग-या ?"
नामदेव आबांनी विचारल..

" तेच हाई मालक , त्या बुजगावण्यावर बसलय!"

" अस हाई काय ! हाकल मग त्याला खाली जाऊन !"
आबांच्या वाक्यावर भिंग-याला जराशी भीति वाटली..
वाड्याची मागची बाजू तशी सूनसूनाट, मागे गवत सुद्धा वाढलेल होत..त्यातच..सर्पांची सुद्धा भीती जास्त होती..
पन भिंग-याच भय काही औरच होत...आणी तो होता अंधार !

भिंग-याने ना पस्ंतीनेच होकार दर्शवला..आणि खाली जाणार तोच त्याने एक शेवटच कटाक्ष खिडकीत टाकल..तर त्या बुजगावण्याच्या खांद्यावरची घुबड गायब होती.

" आर तिच्या पळाली की ते अभद्र तोंडाच!"
भिंग-याने वळून आबांकडे पाहील...

त्याच्या दोन्ही हात खिडकीच्या सळयांवर होते..
आणि मान मात्र डाव्या बाजुला आबांच्या दिशेने होती..
तेव्हा त्याचक्षणाला खिडकीतून समोरच्या बुजगावण्याच V आकाराच डोक हळुच वर आल..! त्याचे ते गारगोटीसारखे काळे डोळे पिवळ्या रंगाने चकाकले त्यात..एक मोतीएवढ़ा काळसर टीपका होता...

त्या बुजगाण्याच्याच्या विचकलेल्या जबड्यातून किडलेले चौकलेटी रंगाचे सुळ्यासारखे दात बाहेर आले...आणि ते ध्यान खिडकीत उभ्या भिंग-याकडे पाहून डात विचकत हसल.....

हिहिहिहिहिहीही...खिखिखी.....

क्रमश !:

पुढचा भाग लवकरच...


प्रेत मांस आवडे मजला..
भुक माझी... ..असमीप्त...

अशुभ , पावळे मज माझी..
होइल तुजला..कष्ट...


ए आये...ए..आये...
रगात...रगात............

मसाला..मसाला...

हिहिहिहिहिहीहीहीही...






इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED