Sanskaar - 2 books and stories free download online pdf in Marathi

संस्कार - 2

मनोगत

'संस्कार' नावाची पुस्तक वाचकांना देतांना अतिशय आनंद होत आहे. ही पुस्तक त्या जिवांसाठी लिहिली. जे घटक आजवर उपेक्षीत राहिले. त्यांनी कधीच कोणाला काहीही मागीतलं नाही. कधीच कुरकूर केली नाही आणि मागतील तरी कोणाला? ती त्यांचीच पिल्लं होती.
मायबाप......मायबाप आपल्या लेकरांना उन्हातून सावलीत नेतात. लहानाचं मोठं करतात. त्यांनी आपल्या पायावर उभं राहावं, म्हणून राब राब राबतात ते कर्तव्य करतात आपलं. परंतू बदल्यात मुलं काय करतात. मुलं त्यांच्या म्हातारपणात त्यांना ज्यावेळेस आधाराची गरज असते. त्या वयात त्यांना घरातून हाकलून देतात. प्रसंगी मारहाण करतात. वृद्धाश्रमात जायची इच्छा नसूनही पाठवतात. तरीही मायबाप आपल्या मुलांना माफ करतात.
ही कहाणी यावरच आधारलेली आहे. राधा नावाची ती एक मुलगी. संसार गाडा रेकतांना तिला प्रचंड वेदना झाल्या. तरीही तिनं मुलांना जगवलं. त्यांना शिकवलं. संस्कार केले. परंतू तिच्या संस्कारात काहीतरी कमीपणा झाला व ती मुलं वात्रट निघाली. त्यातच तिला वाटायचं की माझी मुलं सुधारावी. परंतू ती सुधारत नव्हती. याच घटकावर आधारलेली ही पुस्तक असून खरंच ती मुलं सुधारली का? त्यासाठी तिनं काय केलं? तिचं शेवटी काय झालं? ती कशी जगली? या सर्व प्रश्नांची उत्तरं ही पुस्तक वाचल्यावर सापडतात. संपुर्ण राधेच्या कर्तृत्वाचा प्रवास आहे यात. वयोवृद्धासाठी ही विशेष भेट आहे. आपण ही पुस्तक वाचावी व प्रतिसाद द्यावा एवढंच मागणं आहे.
आपला अंकुश शिंगाडे ९३७३३५९४५०



संस्कार (कादंबरी) भाग एक
अंकुश शिंगाडे

आंब्याला मोहोर फुटला होता. त्याचा सुगंधही परीसरात दरवळत होता. तो सुगंध घेण्यासाठी दुरदुरुन पक्षी आले होते. ते सुगंध घेत होते. त्याचबरोबर त्यांचा आवाजही परीसरात पसरला होता. तसं पाहता आंब्याला यावर्षी जास्तच मोहोर फुटला होता. त्यामुळं कल्पना करता येत होती, ती म्हणजे यावर्षी आंब्याला जास्त आंबे येतील.
तिमा खोपटात बसला होता. त्याला चिंता होती ती आंब्याची. कारण दरवर्षी आंब्याला जास्तच मोहोर फुटायचा. परंतू कधी गारपीटीनं त्या आंब्याचा बार जायचा तर कधी वादळानं आंबे पडायचे. त्यामुळं तिमाला चिंता भाषणं साहजीक होती.
तिमाची गंमतच होती. ती आंब्याला फुटलेली हिरवी हिरवी पानं. त्यातच त्या पानातून येणारा राघू मैनेचा आवाज. त्याला त्या खोपटातही अगदी प्रसन्न वाटत होतं. परंतू त्या चिंतेनं तो उदास झाला होता.
ती तिमाची आंब्याची बाग. आज ती बाग अगदी बहरुन गेली होती. त्या बागेवर त्यानं वर्षभर मेहनत केली होती. रात्र रात्र जागून त्यानं पाणी टाकलं होतं बागेला. ती बाग........ त्या बागेबद्दल विचार करीत होता तो. अगदी लहानपणापासूनच त्यानं त्या बागेला अगदी लेकरागत वागवलं होतं. वाढवलंही होतं. खत टाकलं होतं. पाणीही दिलं होतं नव्हे तर मशागत केली होती. ती आंब्याची बाग. ती आंब्याची बाग. त्या आंब्याच्या बागेला सांभाळतांना नाकीनव आलं होतं आतापर्यंत. कधी खोडकिड्यांचा बंदोबस्त करावा लागला होता तर कधी माकडांचा. माकडंही कमी बदमाश नव्हती. ती माकडं आंब्याची कोवळी पानं खायला येत होती झाडावर आणि आता आंबे लागल्यावर ती माकडं कोवळ्या कै-या खायला येत असत. त्या कोवळ्या कै-यांपैकी फक्त दोनचार कै-याच तेवढ्या खात असत आणि बाकीच्या सगळ्या कै-या झाडावरुन खाली फेकून देत असत. याचाच अर्थ असा की त्या माकडापासून त्या आंब्याच्या कै-याचं भयंकर नुकसान होत असे.
तिमाला आठवत होती ती गोष्ट. जेव्हा ती झाडं लहान होती. त्या झाडाच्या लहानपणी रानडुकरं व रानगाई आंब्याच्या झाडात येवून बसत असत. त्याचं कारणही तसंच राहायचं. या आंब्याच्या बागेत थंडावा राहायचा. परंतू त्यामुळं अतोनात नुकसान व्हायचं. ती आंब्याची झाडं कोलमडून जायची त्यांच्या बसण्यानं. त्यातच उन्हाळा म्हटला तर झाडं कोमेजूनही जात होती. त्याला सतत दोनचार दिवसाआड पाणी लागायचं.
तिमाला सगळं आठवत होतं. आज तिमानं लावलेली आंब्याची झाडं मोठी झाली होती. त्या झाडाला आज मोहोर दिसत होता. ते पाहून अगदी हायसं वाटू लागलं होतं. अशातच त्याला गतवर्षीची गोष्ट आठवली. गतवर्षी ती आंब्याची बाग लहरलेली असतांना व त्या आंब्याच्या झाडाला लटपट आंबे लागलेले असतांना संपुुर्ण आंब्याची वाढ झाल्यानंतर तिमानं आज ठरवलं की उद्या आपण आंबे तोडणी करु. परंतू त्याला आंबे तोडता आले नव्हते. त्याच रात्री पाऊस आला व पाऊस आणि वादळानं अख्ख्या आंब्याचंच नुकसान करुन टाकलं होतं.
तिमाला दरवर्षीचा अनुभव होता. दरवर्षी आंब्याच्या झाडावर आंबे खाण्यासाठी माकडं यायची व ती माकडं आंब्याच्या कै-या कमी खायची, नुकसानच जास्त करायची. त्यामुळं त्यावर उपाय म्हणून तिमा फळ धरतेवेळीच त्या कै-यांना प्लॉस्टीकचे वेष्टन लावत असे. आता त्या वेष्टनातून त्यानं माकडापासून पीक वाचवलं होतं
आंब्याच्या कै-यांना वेष्टन घातल्यानंतर तिमानं आपले आंबे माकडांपासून व त्याला पडणा-या डागापासून वाचवलं होतं. परंतू त्या प्लॉस्टीकच्या वेष्टनातून त्याला आपल्या बागेला गारापासून वाचवता येवूू शकत नव्हतं. तसंच वादळापासूनही वाचवता येत नव्हतं. गतवर्षीची तीच गोष्ट. गतवर्षी असंच वादळ आल्यानं मागील वर्षीचीच पुनरावृत्ती होईल की काय, असं त्याला वाटत होतं.
तिमानं याच भितीनं त्या आंब्याच्या झाडावर आलेले आंबे दुस-या दिवशी तोडून टाकण्याचा विचार केला. त्यानं विचार केला होता की यावर्षी जोमात आलेल्या आंब्याचं जोरदार उत्पादन घेवू. तसा विचार त्यानं गावक-यांजवळ बोलूनही दाखवला होता. परंतू तो त्याचा विचार होता. निसर्गाचा नव्हता.
तिमा दिवसभर शेतात राहात असे. सायंकाळी शेतावरुन घरी येत असे. घरी येताच निवांत झोपत असे. त्याला माहीत होतं की निसर्गचक्राला कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळं आपण कितीही विचार केला की त्या चक्राला रोखू. तरीही रोखू शकत नाही. त्यामुळं त्याचा विचार तो करीत नव्हता. कारण निसर्गचक्रानं कितीही नुकसान केलंं तरी त्याला फूल ना फुलाची पाकळी अशा स्वरुपाचं उत्पादन मिळतच होतं. त्यामुळं तो त्या निसर्गचक्राची किंचीतही चिंता करीत नव्हता.
आज तिमानं शेेतीत दिवसभर काम केलेलं होतं. तो दिवसभर काम करुन थकलेला होता. दिवसभर काम करुन थकलेला तिमा सायंकाळी घरी आला. उद्याची स्वप्न रंगवीत विचार करीत बसला. त्यानंतर उद्याची स्वप्न रंगवतच जेवन खावण करुन निवांतपणे झोपी गेला.
ती रात्र. ती रात्र तशीच निघून गेली होती. त्यातच पहाट उजळली. पहाटेचा कोंंबडा आरवला व वाटलं की सकाळ झाली. तसा तिमा उठला. त्याला लघुशंका लागली होती. तसा तो लघुशंकेला निघाला. त्याला त्या प्रभातकाळी लघुशंकेला जातांना थोडं अस्वस्थच वाटत होतंं.
तिमा लघुशंकेला गेला. तसं अस्वस्थ वाटत असतांना. तेव्हा त्यानं कोणालाही सांगीतलं नाही. कारण ती सकाळची वेळ होती व शौचालय घरात नव्हतं.
ती अस्वस्थता.......त्यातच रात्रीचा तो दळभद्री विचार. त्यामुळं की काय, त्याला त्या पहाटेच्याच अंधा-या गर्भात अंधारी मारली आणि तो धाड्कन एका दगडावर आदळला.
तो दगड...... तो दगड त्याच्या मस्तकाला लागला. त्याचबरोबर रक्तपात झालं व रक्त वाहून जावू लागलं. तसं अतिरिक्त रक्त वाहून जाताच तो हळूहळू कोमात जावू लागला.
तिमा कोमात गेला होता. तसा तो पहाटेचा अंधारही समाप्त झाला होता. त्यातच गावखेड्यातील लोक, त्यांच्या घरी शौचालयाची व्यवस्था नसल्यानं तेही शौचासाठी बाहेर पडले. जातांना त्यांना तिमाचा तो बेशुद्ध झालेला देह दिसला. तशी ती बातमी वा-यासारखी गावात गेली. तशी त्याच्या घरीही. मग गावातील लोकंही अगदी घाईघाईनं तिमा ज्या ठिकाणी पडला होता. तिथं निघाले. तिथंच महाभयंकर गर्दी जमली होती. तसं कोणीतरी म्हणालं,
"अबे, हा तिम्या होय."
"आरं, हा मेला की काय रं."
तिमा मेल्यागतच होता. त्याला अति रक्त गेल्यानं होशच नव्हता. तसा तो बेशुद्ध असल्यानं तो मेल्यासारखाच वाटत होता. परंतू त्यातील एकजण म्हणाला,
"आरं, श्वास चालू हाये याचा."
"श्वास चालू हाये. मंग याले ताबडतोब दवाखान्यात हालवा लागते."
"आरं तं त्याची बायको. त्याच्या बायकोले बोलावणं पाठोलं का?"
"हो, पाठोलं."
"मंग आली का ते."
"येत आसन ते."
थोड्याच वेळाचा अवकाश. तिमाची पत्नी राधा रडतरडत व धावत धावत तिथं आली. ती रडतरडतच म्हणाली,
"काय झालं माह्या तिमास्नी?"
"काय नाय. जरा बेशुध झालंया लमचं."
"बेशुध झालंया. आरं बाई, आतं माह्यं कसं होणार. मी कशी जगणार." तिनं हंबरडा फोडला. तोच एक म्हातारी म्हणाली,
"अवं चूप बस. मेला कावो तो. रडते अशी आग्याबेंदरासारखी. अवो, तो जीवंत हाय. पडला असन अन् रगत गेलं असन लई, म्हून शान बेशुध झालया."
ती म्हातारी बोलत होती. तसे लोकं तिच्या तोंडाकडं भिरभिर पाहात होते. तशी ती परत म्हणाली,
"आरं भैताडांनो, असं का पायता मा थुतराकडं. आरं कोणीतरी उचला आन् घेवून चाला दवाखान्यात. तवाच होश येईन न वं."
म्हातारी बोलली. तशी जोमात हालचाल झाली. त्या गावखेड्यातील माणसांनी त्याला उचललं आणि शहरातील दवाखान्यात नेलं.
दवाखान्यात पै पै पैसा लागत होता. तिच्याजवळ पैसा नव्हता. त्यामुळेच उपचारासाठी तिला कर्जाऊ रक्कम उचलावी लागली. तो कर्जाऊ पैसा. तो पैसा व्याजावर व्याज वाढवत होता. परंतू त्याला आराम पडत नव्हता.
तिमा दवाखान्यात भर्ती होता. तसा त्याच्यावर उपचार सुरु होता. तो उपचार निःशुल्क नव्हता. त्या उपचाराचा पैसा लागत होता. तसं राधाबाईनं उपचारासाठी पैसा कर्जाऊ घेतला. परंतू तिमाच्या उपचारादरम्यान काहीच रिस्पॉन्स दिसत नसल्यानं व डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार ऑपरेशन करावं लागणार असल्यानं तिनं पैसा मिळविण्यासाठी विचारचक्र फिरविलीत. तसं तिला आठवलं की गावाकडं तिची सदाहरीत शेती असून त्या शेतीवर आंब्याचा बगीचा आहे व झाडाला आंबे लागले आहेत.
तिला तो आंब्याचा बगीचा आठवताच ती ताबडतोब गावाकडं आली. तशी ती ताबडतोब शेतावर गेली तर पाहते काय, आंब्याच्या झाडाला आंबे नव्हते. कोणीतरी भामट्यानं तिमा आणि तिमाची पत्नी रुग्णालयात आहेत व गावात त्या आंब्याच्या झाडावर लक्ष ठेवणारं कोणीही नाही हे पाहून संपुर्ण झाडावरील आंबेच तोडून चोरुन नेले होते. आज त्या आंब्याच्या झाडावर एकही आंबा नव्हता.
प्रारब्ध ते. जेव्हा नशीब फुटतं, ते चारही बाजूनं फुटत असतं. त्यातच संकटं एवढी येतात की रस्ताच सापडत नाही. राधावरही असंच संकट आलं होतं.
ते खाजगी रुग्णालयात. तिथं भरपूर पैसा लागत होता. भरपूर पैसा लागला होता. भरपूर पैसा लागणारही होता. डॉक्टर उसासा देत होते. म्हणत होते की श्वास सुरु आहे, येईलच होशात. परंतू तिमा काही होशात येत नव्हता. काही लोक बेशुद्ध माणसांच्या गोष्टी सांगत होते. म्हणत होते की लोकं बरेच दिवसपर्यंत होशात येत नाहीत. हे डॉक्टर खाजगी आहेत. पैसे लुटतात. तुम्ही सरकारी रुग्णालयात हलवा. शेवटी अति पैसा लागतो, म्हणून त्याला खाजगी रुग्णालयातून सरकारी रुग्णालयात हलविण्यात आलं व त्याची अवस्था पाहून तिला डॉक्टरांनी सांगीतलं की तिनं आता निश्चींत राहावं. कारण त्याला केव्हा होश येईल याची काही शाश्वती नाही.
नितीनियमानं राधा निश्चींत झाली. ती गावाला गेली व आपली शेती करु लागली. आता महिन्यातून ती येत असे तिमाला भेटायला. तिमाच्या प्रकृतीची विचारपूस करत असे व डॉक्टरांना त्यांचे काही पैसे देवून ती परत गावाला रवाना होत असे.
कर्ज बरंच झालं होतं. व्याजावर व्याज चढत होतं. अतिरिक्त पैसा शिल्लक पडत नव्हता. शेतीही बरीचशी पीकत नव्हती. राधेला चिंता वाटत होती. ती चिंता होती पैशाची. शेवटी तिनं उपाय काढला. शेती व्याजात जाण्यापेक्षा आपण शेती विकावी.
राधेने तसा विचार केला. त्याचं दुसरंही कारण होतं. ते म्हणजे तिची मुलं. मुलांचाही शिक्षणाचा खर्च होतच होता. त्यामुळं राधा ही घायाळ हरणीसारखी झाली होती.
राधेला काही सुचत नव्हतं. तिची दिवसेंदिवस बिकट स्थिती वाढत चालली होती. त्यामुळंच तिनं निर्णय घेतला होता आपली शेती विकावी.
राधेनं घेतलेला निर्णय. तसं पाहता तिनं शेती विकण्याचा तसा विचार करताच तिची शेती विकल्या गेली व आलेल्या त्या पैशात राधेनं कर्ज दिलं व आपल्या लेकरांना घेवून ती शहरात आली. ज्या शहरात तिच्या पतीवर उपचार सुरु होता.

************************************************

ते रुग्णालय.........ते रुग्णालय राधेला खायला धावत होते. कारण परिचारिका तिला फार त्रास देत होत्या. तिची ती बिलंदर मुलंही तिला त्रासच देत होती. त्यातच औषधीलाही पैसा लागतच होता. परंतू आता तेवढी समस्या नव्हती.
राधेच्या पतीवर उपचार सुरु होता. तशी राधा फुटपाथवर झोपत होती. आपल्या इवल्या इवल्या मुलांना वाढवत होती. त्यांना शिक्षणाचं बाळकडू पाजत होती.
राधेला दोन मुलं होती. एक मुलगी आणि दुसरा मुलगा. मुलगा मोठा होता. मुलगी लहान होती. परंतू मुलगी हुशार होती. तसं पाहता मुलगा शिक्षण शिकत होता. त्याचं शिक्षण सुटलं होतं. कारण ते शहर तिच्यासाठी नवीन होतं.
ते नवीन शहर. तिनं रुग्णालयापाशीच बस्तान बसवलं होतं. तिथंच ती जवळच्या पैशानं अन्न शिजवीत होती. जवळ भरपूर पैसा होता. तशी भीतीही वाटत होती तिला. कधीकधी त्या रुग्णालयाजवळून भामटे फिरत. तिच्याकडे आगळ्यावेगळ्या नजरेनं पाहात. ती त्यावेळी घाबरायची. परंतू भीतीचा मनात किंचीतही लवलेश न बाळगता ती जगत होती.
तिला दोन प्रकारच्या काळज्या होत्या. पहिली काळजी होती तिच्या पतीची आणि दुसरी काळजी तिच्या मुलांची होती. तसं पाहता काळजीचं पहाडंच तिच्यावर तुटून पडलं होतं. अशातच एक दिवस चमत्कार होईल याची ती प्रतिक्षा पाहात होती नव्हे तर तिला त्याच दिवसाची आस होती.
असाही तो रुग्ण. आज तिच्या पतीला कोमात असतांना बरेच दिवस झाले होते. तो अजुनही होशात आला नव्हता. त्याबद्दल डाॅक्टरही आश्चर्यचकीत झाले होते. तसं पाहता इतर रुग्णांना उपचारासाठी सरकार पैसे द्यायचे. परंतू ती सुविधा सरकारकडून अजुनही तिमाला लागू झाली नव्हती.
सरकारकडे एक प्रावधान होतं. ते प्रावधान म्हणजे कोणत्याही क्रिटीकल रुग्णांना सरकारकडून निःशुल्क मिळणारी मदत. डॉक्टरांना तिच्या परिस्थितीची जाणीव होती. त्यामुळं डाॅक्टरांना तिची दया येत होती. त्यातच डाॅक्टरांनी तिची परिस्थिती लक्षात घेऊन तिला एक फाॅम भरायला लावला व आता तिच्या पतीवर उपचार सरकारकडून होवू लागला.
आज तिच्या पतीवरील उपचाराचा तिढा सुटला होता. थोडीशी चिंता होती. जी कधीच सुटणार नव्हती. ज्या चिंतेमुळे ती आजवर संकट झेलत आली होती. ती चिंता मिटताच तिनं आपला मोर्चा मुलांच्या शिक्षणाकडे वळवला. आता काहीही करुन तिला आपली मुलं शाळेत टाकायची होती. कारण तिला काम करायला कुठंतरी जायचं होतं. त्यामुळं तिला चिंता होती की ती जर कामाला गेलीच तर मुलं कुठं थांबणार. काय करणार? त्यांची सुरक्षा कशी करणार? याची चिंता तिला सतावत होती.

**********************************************

अलीकडे शिक्षणाला फार महत्व प्राप्त झाले आहे. अगदी जन्मापासून नाही तर गर्भापासून सुरु होणारे शिक्षण हे माणसाच्या चांगल्या उभारणीसाठी प्रेरणादायक ठरु शकते. असं हे शिक्षण. डाॅ. बाबासाहेबांनी शिक्षणाला वाघिणीचं दूधंही म्हटलं आहे.
शिक्षण आईच्या गर्भातही मिळत असते. असं म्हटल्यास लोकांना आश्चर्य वाटेल. परंतू ते सत्य आहे. आपण ऐकली आहे अभिमन्यूची गोष्ट. त्यानं गर्भातच चक्रव्यूह भेदण्याची कला हस्तगत केली होती. ती दंतकथा वाटते. परंतू आजही बरीचशी मुलं आईच्या गर्भातच शिकत असतात. तो बाळ गर्भात असतांना त्याची आई ही कशी वागली. तिनं कोणकोणत्या गोष्टी केल्या. तिनं परिस्थितीशी कोणती जुळवाजुळव केली. तसंच तिनं काय प्राशन केलं. यावरुन मनुष्याचे भावविश्व व स्वभाव तयार होत असतो. तेच शिक्षण असतं.
आज ख-या शिक्षणाचा -हास होत चालला आहे. मराठी माध्यमाच्याच नाहीत तर भाषेच्या प्रमाण शाळा ओस पडत चालल्या आहेत. काँन्व्हेंटचे प्रस्थ वाढत चालले आहे. भाषेच्या शाळेत मुले शिकायला मिळत नाहीत. त्याला सरकारही काही अंशी दोषी ठरत आहे.
ज्यांचा शिक्षणाच्या घडामोडीशी काहीही एक संबंध नसतो. फक्त शाळा संस्थाचालकांशी संबंध असतो. कारण तोच मालक असतो. पगार देत असतो. तो मालक सरकारी शिक्षकांना जेवढे वेतन मिळतं, तेवढंही देत नाही. तरीही त्याला घाबरावं लागतं आणि शिक्षक घाबरतातच. त्याच्या मनानुसार वागावं लागतं. कारण आजच्या बेरोजगारीच्या काळात तो पोटासाठी अल्प का होईना, वेतन तर देतो. असा दृष्टीकोण अंगीकारुन शिक्षक घाबरत असतात संस्थाचालकांना. कोणी पेन्शनचा मुद्दा ऐरणीवर ठेवत नाहीत व आतल्या गोटातून राजकारण होतं.
काँन्व्हेंटला सर्व सुविधा मिळतात. पण त्या सर्व सुविधा विद्यार्थ्यांना असतात. शिक्षकांच्या बाबतीत आश्वासनांचं भाकीत होतं.
आज महत्वपुर्ण मुद्दा हा की जे सरकारी नियुक्त शिक्षक आहेत. ज्याला काहीतरी वलय आहे. ज्यांच्यावर सतत अन्याय होत असतो. ज्याला शेंबड्यांचे शिक्षक अशी उपाधी देवून चिडवलं जातं. ज्याच्यामुळं खरंच विद्यार्थी शिकतात. जो आजच अशा शेंबड्या मुलांना शिकवायला लागला नाही तर ब-याच वर्षापासून विद्यार्थ्यांना शिकवतोय. त्या प्राथमिक वर्गाच्या शाळेत विद्यार्थी टाकले जात नाहीत व काँन्व्हेंटला मुलं शिकवली जातात. का? तर तिथं इंग्रजीत शिक्षण मिळतं. मग प्राथमिक मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शिकविणारे शिक्षक, शिक्षक नाहीत का? काँन्व्हेंटचेच शिक्षक खरे शिक्षक असतात का? नाही. तेही खरे शिक्षकच. हाडाचे शिक्षक. तरीही हा भेदभाव. हाच भेदभाव असतो शाळेशाळेमध्ये. मग ती काँन्व्हेंटची शाळा असो वा मराठी भाषेच्या शाळा. ते राजकारण आहे. परंतू आज खरी गोष्ट म्हणजे आजच्या या काँन्व्हेंटच्या उभारीमुळे गरीबांसाठी शिक्षण उरलेलं नाही. स्पर्धा निर्माण झाल्यामुळं गरीब व्यक्तीही आपल्या मुलांना काँन्व्हेंटलाच टाकतो. प्रसंगी मनमानी काँन्व्हेंटचे शुल्क भरतो नव्हे तर त्यासाठी कर्जही काढतो. त्यामुळं आज मराठीच नाही तर भाषेच्या शाळाही ओस पडत चालल्या आहेत. त्यामुळं मराठी किंवा भाषेच्या शाळांना मुले मिळविण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मुले मिळत नसल्यानं आता या शिक्षकांसमोर पुढील काळात उपासमारीची वेळ तर येणार नाही. ही स्थिती निर्माण झाली आहे. तसंच ह्या शिक्षकांना पुढील काळात कदाचीत भिकारी बनून 'शिक्षण घ्या हो शिक्षण' म्हणत दारोदारी हिंडून मुलं गोळा करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील ही शक्यता नाकारता येत नाही. अलीकडे ही अवस्था पाहून सरकारच्या नितीचा अंदाज बांधला जात असून वरील प्रकारची स्थिती निर्माण होवू शकते. त्यासाठी वेळीच शिक्षकांनी सावध झालेलं बरं.

****************************

राधा शिकली होती. उच्च शिक्षण झालं होतं तिचं. परंतू तिचा विवाह तिच्या मायबापानं तिमाशी केला होता. त्यांना तरी काय माहीत होतं की आपल्या मुलीवर असंही संकट येईल.
तिमा एक चांगला कास्तकार होता. तोही शिकलेलाच होता. घरी चांगली शेती होती. त्याला घरी कोणत्याच प्रकारचा कमीपणा नव्हता. तसा तो मायबापाचा एकुलता एक मुलगा होता.
तो शिकला होता. परंतू त्याला नोकरी न मिळाल्यानं त्यानं शेती करणं हा पर्याय निवडला होता. तसं पाहता शेती करण्यामागंही एक दृष्टीकोन होता. कुठंतरी त्यानं व्यापाराबाबत ऐकलं होतं. ते शिकले होते. परंतू त्यांची भाषा अनाडी होती.
व्यापारी बना असं म्हटल्यास लोकं म्हणतील की महोदय, आपण व्यापारी आहात का? व्यापार कराल तेव्हा समजेल. त्यांचं म्हणणंही बरोबर आहे. कारण व्यापार करणं काही सोपं काम नाही. व्यापार करणं कठीण काम आहे. त्यामुळं असा संदेश देतांना आतिशयोक्ती वाटते.
व्यापारी बना असा संदेश देतांना आतिशयोक्ती वाटू नये. कारण व्यापारानं माणसाचा खरा विकास होतो. माणसाची भरभराट होते. तो जीवनात पुढे जात असतो. जर व्यापार चांगला चालला तर........
कोणताही व्यापार हा सर्वांना लाभदायक असतो असे नाही. काही व्यापारात माणसं बुडतात. मग जवळ असणारी सर्व मालमत्ता विकून टाकावी लागते. बरं व्यापार हा चारही दिवस चालत नाही. कधी चालतो तर कधी नाही. कधी जास्त नुकसानदायक ठरतो व्यापार तर कधी कमी नुकसानदायक. फायद्याचा विचार केल्यास कधी जास्त फायदा करतो माणसाचा तर कधी कमी. तसेच व्यापार हा सदोदीत चालेलच असा नाही. म्हणून व्यापार करायला कोणीही धजत नाही. त्यामुळं त्याबाबत कोणीही म्हणतात की छोटीशी का असेना, नोकरी हवी.
नोकरी.......ज्याप्रमाणे व्यापारात जबाबदारी असते. तशीच जबाबदारी नोकरीतही असते. आपण नोकरीतील जबाबदारी लक्षात घेतो. परंतू व्यापारातील जबाबदारी लक्षात घेत नाही. म्हणूनच नेमके आपण व्यापारात बुडतो.
व्यापार करतांना जर नोकरीसारखं व्यापाराला सांभाळलं तर व्यापारातही माणसं यशस्वी होवू शकतात. जसे. नोकरीला जातांना वेळेवर जावे लागते. वेळ झाल्यानंतरच परत घरी जावं लागते. काम करावंच लागते. ते नाही केल्यास पैसे मिळत नाहीत. तसंच जास्तीच्या सुट्ट्या मारता येत नाहीत. वैगेरे बरेच नियम असतात नोकरीमध्ये. तसे नियम व्यापाराचेही असतात. परंतू व्यापाराचे नियम आपण पाळत नाही. म्हणून व्यापारात आपलं नुकसान होत असतं.
व्यापाराचेही काही नियम आहेत. जसं आपण नोकरीत वेळेवर जातो. तसा व्यापार ज्या ठिकाणी असतो. तिथं वेळेवर जायला हवं. नोकरी ज्यावेळी सुटते. तसा व्यापारही बंद करण्याची वेळ असावी. तसंच ज्याप्रमाणे नोकरीला आपण दररोज जातो. थोड्याशाही जास्तच्या रजा घेत नाही. तशा व्यापारातही रजा घेवू नये. सततच्या रजेनं व्यापार बुडतो. हे आपल्याला माहीत आहे. तरीही आपण व्यापार करतांना त्यात आपल्या घरचाच धंदा असल्यागत आपण व्यापार करीत असतो. मग व्यापारात नुकसान होणार नाही तर काय आणि त्यानंतर आपला व्यापार बुडला की आपण आपल्या प्रारब्धाला दोषी ठरवत व्यापारात नुकसान होतं असं सर्रासपणे सांगत सुटतो व व्यापाराला बदनाम करतो.
मुळात व्यापाराची दिशा बदनामीकारक नाही. आपल्याला माहीत नाही की ज्यांनी ज्यांनी इमानीइतबारे व्यापार केला, तो तो घटक विकसीत झालेला आहे. आता इंग्लंडचंच उदाहरण घेवू. इंग्लंडमध्ये औद्योगीक क्रांती झाली हे आपल्याला माहीत आहे. या औद्योगीक क्रांतीतून व्यापार भरभराटीस आला व आलेला पैसा त्यांना गुंतवता यावा म्हणून त्यांनी बाजारपेठा शोधल्या गेल्या. त्या बाजारपेठेतमध्ये भारताचाही समावेश आहे. आज याच व्यापारीक दृष्टीकोणातून भारतात आलेल्या इंग्रजांनी भारताला गुलाम करुन या भारतात राज्य केले. ही गुलामी केवळ आणि केवळ व्यापारात इंग्रजांनी केलेल्या प्रगतीतून लादलेली होती. प्रगत असलेल्या भारताला गुलाम करण्यासाठी व्यापार हेच प्रगत माध्यम होतं. आजही आपण पाहतो की जो कोणी व्यापार करतो तो सुखी आणि समृद्ध जीवन जगत असतो. जो व्यापार करतो, तो मालक बनतो व तो इतरांनाही रोजगार देतो व आपल्या व्यापारात ज्याला रोजगार देतो, त्याला गुलामागत वागवत असतो. हे व्यापाराचे गणित आहे आणि त्यात सत्यताही आहे. त्यातच व्यापाराचे सुत्र असे की नियमीत व्यापार करणे. ते सुत्र असा व्यापार करणारा व्यक्ती पाळतो. तोच इमानदार व्यापारी असतो. तो कधीच व्यापार बंद ठेवत नाही. तो व्यापार नियमीत चालवतो व नोकरदारांना जास्तीच्या सुट्ट्या देत नाही. याबाबत एक अनुभव.
एक व्यक्ती नोकरीवर होता. तो दुस-याच्या कारखान्यात काम करीत होता. त्याचे महिण्याचे सुरुवातीचे दिवस चांगले जायचे. परंतू जेव्हा महिना भरायचा, तेव्हा शेवटच्या काळात त्याला पैशाची समस्या यायची व तो घरखर्च भागविण्यासाठी आजुबाजूतून उसनवारी पैसे घ्यायचा. शेवटी त्यानं त्यावर विचार केला आणि निर्णय घेतला की आपण कोणतातरी व्यापार टाकावा. असे विचार करुन त्यानं व्यापार टाकला.
आज त्यानं व्यापार टाकला होता. तो नियमीत चालवत होता. आता त्याला कोणत्याही महिन्याला अडचण जात नव्हती. कोणत्याही स्वरुपाची समस्या येत नव्हती. कारण त्याचा व्यापार चांगला चालत होता. त्यातच एक दिवस त्यानं नोकरीही सोडली होती.
महत्वाचं सांगायचं म्हणजे व्यापारानं माणसाची भरभराट होते. जर तो इमानदारीनं चालवला तर..... माणसानं व्यापारी बनावं. व्यापार इमानदारीनं करावा. त्याचे जे नियम असतात, त्या नियमानं चालावं. सुसूत्रता पाळावी. जेणेकरुन व्यापार कधीच बुडणार नाही व तुम्हीही आत्मनिर्भर व्हाल नव्हे तर आपल्याबरोबर इतरांचेही पोट भरु शकाल हे निर्वीवाद सत्य आहे.
तिमालाही व्यापाराबाबत असंच वाटलं व बेरोजगारीवर मात करण्यासाठी त्यानं शेती हा पर्याय निवडला.
तिमानं शेती हा पर्याय निवडताच त्यावर आंब्याची बाग टाकली. तसा तो त्या आंब्याच्या बगीच्यावर दिवसरात्र मेहनत घेत असे.
सुरुवातीस आंब्याच्या बगीच्यानं तिमाला अगदी भरभरुन प्रतिसाद दिला. परंतू जसजसे दिवस गेले. तसंतसं त्या आंब्याच्या बागेनं आपला जलवा दाखवणं सुरु केलं व दरवर्षीप्रमाणेच नुकसान करणं सुरु केलं. यातच तो खंगला व विचाराअंती तो खाली पडला व कोमात गेला होता.
राधा तसा विचार करीत होती. तिनं ठरवलं की आपण व्यापार करायचा नाही. आपण नोकरी करायची आणि आपल्या मुलांना शिकवायचं.
त्याला मृत घोषीत केलं. त्यानंतर तिच्यावर पहाडच कोसळलं. कारण त्याच्या उपचारासाठी आधीच तिला शेती विकावी लागली होती नव्हे तर पै पै पैसा खर्च झाला होता. त्यातच त्या पैशाचं काही चीज झालं नव्हतं. त्यामुळं ती खचली होती मनातून. परंतू हिंमत खचली नव्हती ती. तिनं संघर्ष सुरुच ठेवला होता.
तिमा मरण पावला होता. त्याचबरोबर जबाबदारी वाढली होती तिच्यावरील. त्यातच तिनं ठरवलं की आता आपण आपल्या खेड्याकडे जायचं नाही. आता आपण शहरातच राहायचं. त्यापुर्वी तिनं ते प्रेत सरकारी दवाखान्यात दान दिलं. त्यानंतर हळूच तिनं एक कमरा पाहिला व ती त्या कम-यात किरायानं राहू लागली.
तिनं कमरा घेतला होता. त्याचबरोबर त्या कम-यात ती राहायला आली होती. गावचं घरंही सोडलं होतं. त्यानंतर तिनं मागं वळून पाहिलं नाही. ती शहरी जीवनात रमली व शहराच्या वातावरणात तिची भाषाही सुधारली.
गावचं घर सोडल्यानंतर राधा शहरात राहू लागली. ती तशी शिकलेलीच होती. मास्तरकीची पदवी तिनं आधीच घेवून ठेवली होती. तसा ती जॉब शोधू लागली. परंतू तिला जाब मिळत नव्हता. मात्र तिनं आपल्या मुलांना शाळेत टाकलं होतं.
ती नित्यनेमानं आता आपल्या मुलांना शाळेत पाठवीत असे. आपल्या मुलाच्या शाळेतच तिनं आपल्या मुलीला पहिल्या वर्गात टाकलं होतं.
ती शाळा पहिल्या वर्गापासून तर बारावी पर्यत होती. त्या शाळेत सातवीनंतर आठवी ते बारावीचा माध्यमीक वर्ग जुळला होता. या शाळेत मोठमोठ्या मुली होत्या. त्या मुली चांगल्या नव्हत्या त्याला जबाबदार होते तेथील शिक्षक. हे शिक्षक मुळातच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत नसत. त्यामुळं मुली बिघडल्या होत्या. मायबापही त्या मुलींकडे लक्ष देत नसत.
ती शाळा चांगली नव्हती. तिथं सुरक्षा भिंत नव्हती. तसं पाहता त्या शाळेत बाहेरची तरुण मुुलं येत व शाळेतील मुलींना छळत असत. त्यातच अगदी अल्प वयात या शाळेतील ब-याच मुलींनी प्रेमविवाह केले होते. त्यातच त्यातील ब-याचशा मुली सुखी नव्हत्या.
नवीन शैक्षणिक धोरण आलं होतं व त्या धोरणानुसार वय वर्ष सहा हे वर्ष नवीन प्रवेशासाठी निर्धारीत केलं गेलं होतं. कधी कधी राधा विचार करायची की आपल्या मुलीचं नवीन शैक्षणिक धोरणानुसार एक वर्षाचं नुकसान झालं. खरं तर काँन्व्हेंटचं प्रस्थ वाढलं, त्यामुळंच नुकसान झालं असा तिचा विचार होता. परंतू त्यावर तिच्याजवळ काही पर्याय नव्हता. तसं पाहता तिच्या पतीच्या आजारानं तिच्या मोठ्या मुलाचं अतोनात नुकसान झालं होतं. परंतू तिला ते नुकसान, नुकसानदायक वाटत नव्हतं. मुलींचे होणारे नुकसान तिला नुकसानदायक वाटत होते.

**********************************************

शाळेत जायचंय, वयोमर्यादा सहा. असं नवीन शैक्षणिक धोरण. नवीन शैक्षणिक धोरणाचा नवीन आकृतीबंध. या बंधानुसार शाळेचा पुर्वप्राथमिक स्तर नर्सरी, केजी वन व केजी टू तीन वर्षाचा अभ्यासक्रम, त्यानंतर पहिली ते पाचवी प्राथमिक, सहावी ते आठवी उच्च प्राथमिक, आठवी ते बारावी माध्यमिक असा स्तर निर्माण करण्यात आला व त्यानुसार वय वर्ष सहा हे वर्ष पहिल्या वर्गात प्रवेशासाठी निश्चीत करण्यात आलं. आता या बंधानुसार वयाची सहा वर्ष झालेली मुलं पहिलीत जाणार होती.
पहिल्या वर्गात प्रवेशाबाबत विचार करतांना एक इतिहास सांगणे गरजेचे. त्यासाठी इथून पंचेचाळीस ते पन्नास वर्ष मागचा इतिहास. साधारणपणे पन्नास वर्षापूर्वी पहिल्या वर्गात नाव दाखल करतांना मुलांना कानाला हात पुरवावा लागत असे. ज्या मुलांच्या कानाला हात पुरत असे. त्याला पहिल्या वर्गात घेतल्या जात असे आणि ज्यांचा हात कानाला पुरत नसे. त्याचा पहिल्या वर्गात प्रवेश निषिद्ध समजल्या जाई. ती पद्धत वय वर्ष सहा सारखीच होती. परंतू त्यात एक दोष होता. तो दोष म्हणजे काही काही मुलांचा कानाला हात सहा वर्ष पुर्ण होताच पुरत असे. काहींचा हात सात आणि आठ वर्ष पुर्ण होत असेल तरी पुरत नसे. यावरुन मुलांच्या शिक्षणाचं कानाच्या हात पुरण्यानुसार नुकसान झालं. काहींचं त्या मुलांच्या हुशारीनुसार नुकसान झालं.
जन्मतः काही मुलं हुशार असतात. तो मुलगा जरी वय वर्ष पाचचा असला तरी तर काही मुलं ही वयाची आठ दहा वर्षाची असली तरी ती बुद्धिमान नसतात. कारण प्रत्येकजणांचा मेंदू हा तसा तल्लख नसतो.
सरकारनं हाच विचार निश्चीत करुन पहिल्या वर्गात प्रवेशाबाबत वय वर्ष सहा निर्धारीत केले होते नवीन शैक्षणिक धोरणानुसार. कारण या वयात बहूतेक विद्यार्थ्यांचा मेंदू पुर्ण वाढ झालेला असतो असं सरकारचं मत होतं. अशा वयात जर त्याचा प्रवेश पहिलीत झाला तर तो पहिल्या वर्गातील ज्ञान पुरेपूर आत्मसात करीत असतो हेही सरकारचंच मत होतं. यामुळं पहिलीसाठी सहा वर्ष पूर्ण निर्धारीत केले गेले आणि त्या वयापुर्वी त्या मुलाला बालवाडीत टाकावे वा नर्सरी केजी वन व केजी टू ला टाकावे असे निश्चीत केले गेले होते.
मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांना पहिलीत टाकतांना वय वर्ष सहा हे बंधन पाळून जर त्याचा पहिलीत प्रवेश निश्चीत केल्या गेला तरीही विद्यार्थ्यांचं नुकसान झालंच. कारण काही काही मुलांचा मेंदू हा सहा वर्ष पुर्ण करण्यापूर्वीच पुर्ण वाढ झालेला असतो. असे असतांना मग वय वर्ष सहा हे पहिलीच्या वर्गात प्रवेशासाठी का निर्धारीत केले गेले असावे? हा उपस्थीत झालेला प्रश्न होता. त्याच कारणाचा विचार करतांना मुख्यतः काँन्व्हेंटला जास्त महत्व नवीन शैक्षणिक धोरणात केल्या गेला. काँन्व्हेंटला वय वर्ष सहा होण्यापूर्वी पहिलीत प्रवेश मिळत नव्हता. त्यापुर्वी तो मुलगा नर्सरी, केजी वन व केजी टू शिकत होता. त्याचाच विचार करुन सामान्य गरीबांच्या मुलांनाही ते कितीही हुशार असले तरी त्यांचा प्रवेश हा वय वर्ष सहा निश्चीत केल्या गेला व त्या मुलांचं नुकसान केलं गेलं होतं. हा पहिला हेतू सरकारनं साध्य केला होता तसाच दुसरा हेतू हा साध्य केला होता, तो म्हणजे काँन्व्हेंटला मुलं मिळावी.
काँन्व्हेंटला मुलं? हाही एक संभ्रमात टाकणारा प्रश्न होता. हो, संभ्रमातच टाकणारा प्रश्न. काँन्व्हेंटला मुलं सहा वर्षांत पहिलीत जात. म्हणून सामान्य मुलांनीही सहा वर्ष पुर्ण वय झाल्यावर काँन्व्हेंटला जावं नव्हे तर सरसकट लोकांनी मराठी भाषेतील गरीबांच्या शाळेत मुलांना न टाकता काँन्व्हेंटच्या शाळेत प्रवेश घ्यावा. याचाच अर्थ अभिप्रेत असलेला होता की मराठी अनुदानीत असलेल्या सरकारी शाळा बुडाव्या व काँन्व्हेंटच्याच शाळा चालाव्या. हा सरकारचा हेतू होता. यालाच म्हणत नवीन शैक्षणिक धोरण. हे नवीन शैक्षणिक धोरण सरकारनं अतिशय अभ्यासपूर्ण तयार केलं होतं व यातून मोठा डाव रचला गेल्याचं दिसून येत होतं. तो डाव वरअंगी विचार केल्यास दिसत नव्हता. सरकार या डावाअंतर्गत मराठीच्या अनुदानीत शाळा बंद करु पाहात होते. या नवीन शैक्षणिक धोरणानुसार अनुदानीत मराठीच्या शाळेत मुलं मिळणार नव्हती. तेव्हा सरकार सहजच म्हणू शकत होते की जिथं मुलंच नाहीत, तिथं अशा शाळा चालवून काय उपयोग. मग सहजच या शाळा सरकार बंद करु शकत होतं व त्याला कोणीच विरोध करु शकत नव्हता. तसेच सर्वांना काँन्व्हेंटच्या शाळांना प्रवेश घ्यायला लावेल असंही वाटत होतं. त्यासाठीच हे स्लो पायजन होतं. हे हळूवारचं विष कोणाच्याही लक्षात येणारं विष नव्हतं. कारण सरकारला माहीत होतं की या अनुदानीत शाळांना अनुदान द्यावं लागत असतं. तेथील वेतनही सरकारी खर्चातून चालत असतं.
अलीकडील हाच विषय लक्षात घेऊन सरकारनं २००५ मध्ये पहिला तासचा पत्ता फेकला. पेन्शन बंद केली. त्यानंतर हळूहळू लोकांना अंधारात ठेवून काँन्व्हेंटच्या शाळा आणल्या. या शाळा एवढ्या वाटल्या आणि त्याची जाहीरात केली गेली की अलीकडील काळात मराठीच्या अनुदानीत शाळा मोडकळीस आल्या. काँन्व्हेंटच्या शाळा आल्या. यातही काही शाळा किस्तवार शुल्क आकारुन शाळा चालवतात. काही शाळा माफक शुल्क घेतात. काही मात्र जास्त. परंतू आज ते शुल्क कमी आहे. त्यातच त्यांची एवढी जाहीरात आहे की सर्व लोकं मग ते कितीही गरीब का असेना, काँन्व्हेंटलाच टाकतात. त्यातच तो दिवस दूर नाही की सर्व पालक आपल्या पाल्यांना काँन्व्हेंटला टाकतील व मराठीच्या शाळेत मुलंच मिळणार नाहीत.
महत्वपुर्ण गोष्ट ही लक्षात घेण्यासारखी आहे की आज मराठीच्या अनुदानीत शाळेत कितीही का असेना मुलं आहेत. परंतू ज्यावेळी मराठीच्या अनुदानीत शाळा बंद पडतील, त्यानंतर काँन्व्हेंटच्या शाळेचं शुल्क एवढं भरमसाट वाढेल की गरीब लोकं आपली मुलं शिकवू शकणार नाहीत. ते आंदोलन करतील. परंतू त्याचा उपयोग होणार नाही. कारण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल.
आज गरीबीचा आकडा व अनुदानीत शाळेत शिकणा-या विद्यार्थ्यांचा आकडा जास्त आहे. सरकार हा आकडा कमी व्हावा यावर वेळोवेळी प्रयोग करुन प्रयत्न करीत आहे. ती बाब आपल्या लक्षात येत नाही. कारण आपण विचारशील व्यक्तीमत्वाचे असलो तर तेवढ्या चिकीत्सक विचारसरणीचे नाही. सरकारनं याच व्यापारीक विचारानं पेन्शनवर कुऱ्हाड चालवली आणि हळूच शाळेच्या अनुदानावर. ब-याच दिवसापासून नान सॅलरी ग्रँडही बंद आहे. आर टी ई चे पैसे देवू केले. परंतू कोणत्याही शाळेला मिळाले नाही. हा व्यवहारीक बदल काय दर्शवतो? ही विचार करणारी बाब आहे.
विशेष गोष्ट अशी की आज जो पालक साक्षर आहे, त्याला सरकारचं नवीन शैक्षणिक धोरण कळत जरी असलं तरी तो आपल्याला काय करायचंय असा विचार करतो. जो अज्ञानी पालक आहे, त्याला या गोष्टी कळत नाही. जो अल्पशिक्षीत आहे, परंतू त्याचेजवळ भरमसाठ पैसा आहे, तो पालक चिकीत्सक जरी असला तरी तो विचार करतो की आपल्याला काय घेणंदेणं आहे. मरणं मात्र गरीबांचंच आहे.
विशेष गोष्ट ही की वय वर्ष सहा हा शाळा प्रवेशाचा आकृतीबंध पेन्शन बंदसारखाच आकृतीबंध वाटतो. काल पेन्शनधारकांची पेन्शन बंद झाली. उद्या गरीबांच्या शाळा बंद होतील यात शंका नाही. सरकार पुरेपूर स्वरुपात खाजगीकरण करण्यासाठीच लागलं आहे. ही निर्वीवाद सत्य बाब आहे. यामुळं वेळीच सावध व्हावे. नाहीतर तेल गेलं तूप गेलं, हाती धुपाटणं आलं अशी अवस्था देशातील गरीबांची निर्माण होवू शकते. ही शक्यता नाकारता येत नाही. वय वर्ष सहा, ही विद्यार्थ्यांचा विकास करण्यासाठी चांगली बाब आहे. परंतू ती बाब विचारात घेऊन सरकारनं पदड्यामागचं राजकारण करु नये. गरीबांच्या शाळा बंद करु नये म्हणजे झालं.
राधेलाही तेच वाटत होतं. अजूनपर्यंत सरकारी शाळा बंद झाल्या नव्हत्या. परंतू त्या शाळेनं तिच्या मुलीचं एक वर्षाचं झालेलं नुकसान कधीच भरुन निघणारं नव्हतं.
राधेनं आपल्या मुलीला वय वर्ष सहा होताच शाळेत टाकलं. बाकीच्यांनी आपली मुलं काँन्व्हेंटला टाकली होती. काहीजण आपली मुलं काँन्व्हेंटलाच टाकत होते. जे पैसेवाले होते.
राधेजवळही पैसा नव्हता. तिला सरकारी नोकरी होती. ती नोकरी खाजगी अनुदानीत असल्यानं व सुरुवात असल्यानं वेतन नव्हतं. ती नोकरी सरकारी झाली नसल्यानं ती आपली मुलगी काँन्व्हेंटला टाकू शकत नव्हती.
सरकारी शाळा चालवायला मुलं लागतात. एका एका मुलांसाठी शिक्षक किती भटकंती करतात हे तिला माहीत असल्यानं तिनं आपली मुलगी सरकारी शाळेत आणि तेही मराठी माध्यमाच्याच शाळेत टाकली. त्याचबरोबर तिनं आपला मुलगाही त्याच शाळेत टाकला.
ती सरकारी शाळा. मुलं शिकत होती. त्याचबरोबर राधा आपल्या मुलांना शिकवीत होती. तशीच तिची दोन्ही मुलं शिकत होती. त्यातच तिला कामधंदाही नव्हता. पती मरण पावल्यानं तिची आबाळ होत होती. परंतू ती हिंमत हारली नाही.
ज्यावेळी तिचा पती मरण पावला, तेव्हा ती तरुणच होती. तिला कोणीही सल्ला देत की तिनं कोणी एखादा गरजू पाहून त्यांच्याशी विवाह करुन घ्यावा. परंतू तिला विचार होता आपल्या लेकराचा. त्यामुळं ती तसं करु शकत नव्हती.
दिवसामागून दिवस जात होते. तिची मुलं जास्त मोठी नव्हती. पतीपणाचा विरह जाणवत होता. तिला तिच्या पतीची फारच आठवण येत असे. तसं पाहता तिला पतीची आठवण येताच ती रडतही असे. शेवटी तिनं ठरवलं की आपण विवाह करायचा. राधानं तसं ठरवताच तिनं एक तरुण पाहिला व त्याच्याशी बोलणं करुन तिनं आपला विवाह करुन टाकला.
काही दिवस गेले. तो पती तिला पैसे देत नसे खर्चासाठी. तिची आबाळ होत असे. कारण मुलांच्या शिक्षणाला पैसा लागत असे. त्यामुळंच तिनं ठरवल. आपण नोकरी करावी. त्यानंतर ती एका शाळेत शिक्षीका म्हणून लागली.
नवीन पती. त्याचा स्वभाव काही चांगला नव्हता. तसा तो सुरुवातीला चांगला वागला. तो तिच्या मुलांनाही चांगला वागवत असे. परंतू जसजसे दिवस गेले, तसतसा त्याचा स्वभाव बदलत गेला. त्या बदलत्या स्वभावानुसार तो पुढे दारुही प्यायला लागला व त्या दारुमुळं घरात भांडणंही व्हायला लागली. त्याचं कारणही तसंच होतं. ते कारण म्हणजे ती शिक्षीका असल्यानं चांगले चांगले लोक घरी येत. कारण घरी पैसा नसल्यानं ती शिक्षीका म्हणून एका शाळेत रुजू झाली होती.
राधेच्या या पतीचं नाव दशरथ होतं. तो दशरथ पुर्वी संशयी वृत्तीचा नव्हता. परंतू जसजसे कामानिमित्त लोकं तिच्या घरी यायचे. त्यामुळंच त्याचा संशय वाढला व तो जास्त दारु प्यायला लागला. त्यातच त्या दारुमुळं तिच्या घरात रोजची भांडणं व्हायला लागली.
रोजची भांडणं. रोजच घरी दारु पिवून येणं. त्याचा परिणाम तिच्या मुलांवर होवू लागला. तसं पाहता त्या मुलांना तिचा दुसरा पती एक वडील म्हणून पसंत नव्हता. तिनं केलेला तो विवाह. त्या विवाहामुळं तिचं सारच नुकसान होत होतं. विवाह करण्यापूर्वी तिनं विचार केला होता की आपण विवाह केल्यास आपल्याला आधार होईल. परंतू ती गोष्ट फोल ठरली होती.
विवाह..... विवाह हा आधारासाठी केला जातो. राधानंही विवाह आधारासाठीच केला होता. तिलाही वाटत होतं की विवाह केल्यावर तिला दशरथची मदत होईल. तो पैसापाणीही कमवून आणेल. परंतू तिचा तसा विचार करणं हे मुर्खपणाचं लक्षण ठरलं होतं. दशरथ हा ऐतखावू प्रवृत्तीचा होता. त्यामुळं तिनं केलेला विवाह हा विवाहबंधन पाळणारा नव्हता. तो काही मुलांना सांभाळून घेत नव्हता.
त्यांची सतत होणारी भांडणं, त्यामुळं त्या भांडणानं तिची मुलं बिघडत चालली होती. तो फरक पडत चालला होता तिच्या मुलांवर. त्यामुळं आपल्या मुलाचं काय करावं आणि काय नाही अशी परिस्थिती व घालमेल तिच्या मनाची निर्माण झाली होती.
राधा तेव्हापर्यत गप्प होती, जेव्हापर्यंत तिच्यानं सगळ्या गोष्टी सहन झाल्या. परंतू त्या संपुर्ण गोष्टी जेव्हा सहन झाल्या नाहीत. तेव्हा तिनं आपली आपबीती आपल्या मुख्याध्यापकाला सांगीतली व मुख्याध्यापकांना विनंती केली की त्यांनी तरी तिला मदत करुन तिच्या बिघडणा-या मुलांना सुधारावं.
परिस्थिती गांभीर्याची होती. काय करावं सुचत नव्हतं. परंतू त्या शाळेतील मुख्याध्यापक चांगले होते. चांगल्या विचाराचे होते. त्यांना परिस्थितीचं भान होतं. तसे ते विचार करीत होते, ती मुलं बिघडू नयेत याचा. तसं पाहता त्या शाळेत कंपाऊंड नसल्यानं बाहेरची जी मुलं येत. त्यामुळं एकंदर शाळेची व्यवस्था हाताबाहेर गेली होती. त्या व्यवस्थेला पुन्हा वळणावर आणणं भाग होतं.
मुख्याध्यापक......त्या मुख्याध्यापकासमोर केवळ ती त्या राधाची दोनच मुलं नव्हती तर अख्खी शाळा होती. त्यामुळं केवळ ती राधाची दोनच मुलं नाही तर त्यांना अख्खी शाळा सुधारणे भाग होते. त्यामुळं ते विचार करीत होते.
ते विचार. ते विचार करता करता त्यांना त्यावर मार्ग उपलब्ध झाला. त्यांनी एक पत्र बनवलं व त्या पत्रानुसार त्यांनी त्या शाळेतील बाहेरून मुलं येण्याची तक्रार पोलीस ठाण्यात टाकली.
पोलिसांना पत्र प्राप्त झालं होतं. त्यानुसार होणा-या शाळेतील मधल्या सुट्टीत पोलीस शाळेत चक्कर मारु लागले. त्यातच पोलीस दिसताच बाहेरची शाळेत येणारी मुलं बंद झाली. त्यामुळं शाळेतील वातावरण बाहेरच्या मुलांना अनुकूल राहिलं नाही. आता उरलं होतं शाळेतील मुलांमध्ये सुसंस्कारित वातावरण निर्माण करणं. त्यावर मुख्याध्यापक योजना बनवीत होते. त्यासाठीही मुख्याध्यापक विचार करीत होते.
मुख्याध्यापक विचार करीत होते. यातही एक मार्ग सापडला. ते एका एका वर्गात जायला लागले. मुख्याध्यापक वर्गात जायला लागले. ते सुसंस्काराचे बीज वर्गात पेरु लागले. त्यांच्या बिघडण्याचे गणित विद्यार्थ्यांना सांगू लागले. हळूहळू ते संस्कार विद्यार्थ्यांत फुलू लागले. त्यातच बाकीचीच मुलं नाही तर राधाचीही मुलं संस्कारीत बनू लागली. राधाही आपल्या वर्गातील मुलांना संस्कारीत करु लागली. मात्र ती आपल्याच मुलांना संस्कारीत करु शकत नव्हती.
राधाची मुलं शाळेत गप्प बसत होती. परंतू तीच मुलं घरी मात्र आईचं ऐकत नसत. कारण त्यांचा त्यांच्या आईनं केलेला दुसरा पती हा काही चांगल्या संस्काराचा नव्हता. तसं कोणीतरी सांगीतलं की तिनं त्याचं तोंड बांधावं. जेणेकरुन तो काही बोलणार नाही. शेवटी तोंड बांधून घेणं हा काही चांगला प्रकार नव्हता. तो एक अंधश्रद्धेचा प्रकार होता.
ती एक काही जादू होती. त्या काळ्या जादूनुसार माणसाचं वशीकरण केलं जायचं. तसं पाहता या वशीकरणात माणसाला काही वस्तू चारल्या जात असत. मग माणूस ती वस्तू खाताच वशमध्ये होवून जात असे. तो दुस-या माणसाच्या मनानुसार चालत असे. त्यांच्या तोंडाला तोंड देत नसे.
राधा एक शिकलेली महिला होती. तिचा अशा भ्रामक प्रकारावर विश्वास नव्हता. परंतू माणसाची निकड. ती माणसाची निकड माणसाला अशा ठिकाणी घेवून जाते. त्यानंतर ज्या गोष्टी माणसं करु पाहात नाहीत. त्याही गोष्टी माणसं करायला लागतात. राधाच्याही बाबतीत तेच घडलं होतं.
राधा हुशार होती. तिला आठवत होता तिच्या उपासमारीचा काळ. ज्यावेळी तिचा पती मरण पावला होता. तेव्हा तिच्याजवळ पैसा नव्हता. जवळ नोकरीही नव्हती. गाठीला दोन पोरं होती. परंतू जवळ पैसा नसल्यानं, त्यामुळं मुलं आणि आपलं पोट कसं पालवावं याची चिंता तिला होती.
तिचा एक मित्र होता. जो आज राजकारणात होता. त्याच्याही काही शाळा होत्या. चाहे तर तो तिला कुठेही नोकरी मिळवून देवू शकत होता. परंतू त्यानं तिला काही नोकरी दिली नाही. त्यामुळं आज तिला नेत्यांचा राग येत होता. त्याचं नाव शंकरप्रसाद होतं.
तिची रोजच होणारी उपासमार. तशातच ती त्या मित्राकडे गेली. त्याला आपलं दुखणं खुपणं सांगीतलं. परंतू तिच्या मित्रानं तिच्या दुःखावर लक्ष केंद्रीत केलं नाही. तो बालपणीचा खास मित्र होता. त्यामुळं तिला विचार येत होता की जो आज राजकारणात मोठ्या हुद्द्यावर आहे. जो काल रिक्षा चालवत होता व नेत्यांच्या सतरंज्या उचलल्या होत्या त्यानं. परंतू अचानक त्याला तिकीट मिळाली व जो आज मोठा झाला होता. आज त्याचेजवळ भरपूर पैसा आहे. त्याच्या काही शाळाही आहेत. चाहे तर तो एका झटक्यात आपल्याला नोकरी लावू शकत होता. परंतू त्यानं तसं केलं नाही.
आज ती सुखी होती काहीशी. परंतू नेत्यांबाबत तिच्या मनात चांगलाच आकस भरला होता. याचा अर्थ सर्वच नेते वाईट होते असा नाही. परंतू तिला ते आवडत नव्हते. तिनं शितावरुन भाताची परीक्षा केली होती. त्यामुळं ती म्हणत असे कशाला हवेत राजकीय नेते. तसं पाहता तिचं म्हणणंही बरोबरच होतं.
अलीकडे सिलेंडरची भाववाढ होत होती. ही भाववाढ प्रदुषण मुक्त असलेल्या देशाला अडचणीची ठरत होती. यावर वेळीच पावलं उचलली गेली नाहीत तर उद्या प्रत्येक गृहिणी स्वयंपाक शेगडीवर करेल व प्रदुषण मुक्त देशाची कल्पना साकार होणार नाही. असं तिला वाटत होतं.
सध्या महागाई वाढतच वाढत चालली होती. ती महागाई केवळ सामान्य लोकांनाच छळत नाही तर गरीबांनाही छळत आहे असं तिला वाटत होतं. तशीच ती महागाई घरातील गृहिणींनाही छळत आहे असंही तिला वाटत होतं.

**********************************************

तिचे विचार रास्त होते. तिच्या विचारानुसार गृहिणी......गृहिणी घरी स्वयंपाक करतात. त्या कशा स्वयंपाक करतात, हे न सांगितलेलं बरं. कारण त्यांना जो त्रास होतो, त्या त्रासाचं वर्णनच करता येणं शक्य नाही.
हं, आता कोणी म्हणतील की गृहिणींना कोणता त्रास होतो? आयतं मिळते ना सिलेंडर स्वयंपाक घरात. तसेच नवरोबा सर्वच वस्तू घरात आणून देतात ना वरचेवर. तसंच आता राशनही राशनदुकानातून नि:शुल्क मिळतं. मग कोणता त्रास होतो बरे? यावर विचार मांडतांना एवढंच सांगणार की त्रास होतो. महाभयंकर त्रास होतो. परंतू जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे याप्रमाणे गृहिणींना जो त्रास होतो, तो आपल्याला दिसत नाही.
अलीकडे सर्वांना राशन दुकानातून गहू आणि तांदूळ फुकटात मिळत आहे. याचा अर्थ आपल्याला आवळा मिळत आहे. बदल्यात पोवळा काढून घेतल्यागत मुख्य म्हणजे स्वयंपाकाचा सिलिंडर महाग होत आहे. तो सिलिंडर गरीबांनाही कमी पैशात मिळत नाही. सबसिडी नाहीच्या बरोबर आहे. ही सिलिंडरची महागाई सांगीतली तर लोकं म्हणतील की तांदूळ गहू फुकटात मिळत आहे, तरी कुरकूर. ही कुरकूर संपणारच नाही सर्वच वस्तू फुकटात दिल्या तरी. परंतू मला हे म्हणायचं आहे की ह्या सर्व वस्तू फुकटात मिळतात. त्या मिळतात कोणाला? जर याचा रितसर सर्वे केला तर तो तांदूळ, गहू धनिकांना मिळत आहे. जो निःशुल्क मिळणारा तांदूळ, गहू घराकडे नेवून तो व्यापारांना कमी भावात विकला जातो. तसंच राशनकार्डवाल्यांचा सर्वे केल्यास असे बरेचसे कार्डधारक मिळतील की जे गरीब नाहीत. तसंच अशी बरीचशी मंडळी मिळतील की जे गरीब आहेत. परंतू त्यांचेकडे राशनकार्ड नाही. कारण ते मुळात हुशारच नाहीत. हुशार कोण असतो? याचा जर विचार केला तर धनीक हाच घटक जास्त हुशार आहे, जो या योजनांचा लाभ घेतो. गरीब नाही.
सिलेंडर बाबत सांगायचं झाल्यास मुख्य बाब ही सांगावी लागेल की ती अन्याय सहन करणारी बाई, ज्या घरात पती दारुडा आहे. तो दारुवर अतोनात पैसा खर्च करतो. त्यामुळं त्याच्या घरी सिलिंडर तर असतो. परंतू तो भरायला पैसा नसतो. तो पैसा व्यसनात जातो. अहो, या काळात अशा घरातील माणूस व्यसनापायी घरातील सामान विकतो. त्याच्या पत्नीनं ठेवलेले पैसे चोरतो. त्या घरात ती स्री सिलेंडर घ्यायला पैसा कुठून आणेल? मग ती स्री सिलेंडरचा हंडा तसाच ठेवून कमी पैशात असलेल्या काड्या वा भुसा आणते व आपला परीवार कसा तरी जगवते. खरं तर त्या घरी सिलेंडर निःशुल्क द्यायला हवं. निदान निःशुल्क मिळणारा गहू, तांदूळ निःशुल्क शिजवता यावा व कसंतरी चटणीमीठावर अशा गृहिणींना आपल्या लेकरांना जगवता यावं हा उद्देश. परंतू सरकार ते देत नाही. कारण तो व्यक्ती व्यसनापायी सिलेंडर विकणार नाही कशावरून?
अलीकडे सिलेंडरच दिवसेंदिवस महाग होत चाललेलं आहे. तो सिलेंडर साधी पूर्णतः गरीब असलेली स्री घेवू शकत नाही. त्यामुळं 'धूर मुक्त देश' वा 'प्रदूषणमुक्त देश' ही जी देशाची वा प्रगतीशील भारताची संकल्पना आहे, ती फोल ठरत चालली आहे.
दरवेळी भाववाढ होत होती. त्यात सिलेंडरचीही भाववाढ होत होती. तसं पाहता पैसा हा कोणत्या कोणत्या गृहिणी स्वतः कमवीत नसल्यानं त्यांचेजवळ राहात नव्हता. त्यामुळं त्या सिलेंडरला पडणारे जास्त दाम देवून सिलेंडर घेवू शकत नव्हत्या स्रिया. पर्यायानं सांगायचं झाल्यास चूलच फुंकावी लागत होती. याचाच अर्थ असा की प्रदूषणमुक्त वा धूर मुक्त देशाची कल्पना जी मांडली जात होती. त्या कल्पनेला फाटा फुटत होता. यावर महत्वाचं सांगायचं झाल्यास ती सिलेंडर कंपन्यांनी यावर ठोस पावले उचलून सरकारला सुचीत करावं आणि त्यावर योग्य असा निर्णय घेवून सिलेंडरच्या किमती कमी कराव्यात असं म्हणत होती. तसंच सिलेंडर सर्व गृहिणींना वापरता येईल. तसंच धूर मुक्त भारत वा प्रदुषण मुक्त देशाची कल्पना साकार होईल असंही सांगत होती. परंतू तिचं कोण ऐकणार होतं. ना ती कोणती नेता होती ना कोणती पत्रकार. मात्र इतर गृहिणींप्रमाणेच तिलाही त्रासच होत होता. कारण ती त्यावेळेस नोकरीला नव्हती.
नेत्यांबाबत राग होताच. तसं तिनं एकदा वर्तमानपत्रात बातमी वाचली. एका प्रभागातील दोनशे चेंबरची झाकणं चोरीला. त्या शहराला वालीच नसल्याचा हवाला. मुद्दा गंभीर असल्यासारखा वाटत होता. कारण शहराला नगरसेवक नव्हता. खरंच या प्रकरणावरून जाणवत होतं की शहराला नगरसेवक असावा. तो विषयच मुळात गत एक वर्षापासून नगरसेवक नसल्यानं गंभीर करुन टाकला होता.
विषय हा होता की शहराला नगरसेवक असावा की नसावा? यात शहराला नगरसेवक असावा अशी बाजू मांडली तर खरंच नगरसेवकाच्या कामावर ताशेरे ओढावे लागत होते. मग नगरसेवकाच्या कामाचा आढावा घ्यावा लागत होता. आता नगरसेवकाच्या कामाचा आढावा घेतल्यास तो कोणते काम करतो हेही पाहावे लागणार होते.
बरेचसे नगरसेवक असे असतात की ते निवडून आले की शो पीस म्हणून वागत असतात. जेव्हा जनता त्याचेजवळ जात असते, तेव्हा ते चक्क सांगतात की मला काही तू निवडून दिलेलं नाही. मी पैशाच्या भरवशावर निवडून आलेलो आहे. काही काही नगरसेवक असे असतात की ते प्रभाग किंवा वार्डात कोणतेच काम करीत नाहीत. त्यांच्या वार्डात किंवा प्रभागात गेल्यास ना बरोबर रस्ते राहात. ना बरोबर पाणी मिळत. ना कोणत्या सुविधा. तरीही त्याला सरकारी सुविधा लागू होत असतात. त्या सुविधा जनतेच्या पैशानं भागवल्या जात असतात. यात जनतेचा पैसा विनाकारणचा नष्ट होत असतो. त्यामुळं अशा नगरसेवकासाठी नगरसेवक म्हणून का निवडून आणावं असा प्रश्न निर्माण होतो.
ते राधाचं शहर. त्या शहराचं उदाहरण द्यायचं झाल्यास त्या शहराला एक वर्षापासून नगरसेवक नव्हता. तरीही कारभार व्यवस्थीत सुरु होता. एका चेंबरच्या झाकणाच्या चोरीची गोष्ट सोडली तर कोणाची कशाचीच कुरकूर नव्हती. सगळं शांततेत सुरु होतं. कारण सरकारी कर्मचारी असलेला महानगरपालिका आयुक्त व्यवस्थीत काम करीत होता आणि तो करणारच होता. कारण तो सरकारी कर्मचारी होता. हं, कुठं कधी कमीजास्त होत होतं. नगरसेवकही असतांना कमीजास्त होतच होतं ना ? इथं तर देशाची अशी स्थिती होती की देशात नगरसेवक नाही तर आमदार, खासदार, मुख्यमंत्री व पंतप्रधान असतांना देशात मोठमोठं साहित्य चोरीला जात होते. नगरसेवक नाही तर सारे आमदार, खासदार मालामाल होत होते. त्यांचा पुर्वइतिहास पाहिला तर असं जाणवत होतं की तो व्यक्ती किती गरीब होता आणि पद मिळताच किती पुढे गेला. मग एवढा पैसा कुठून आणला? याची शहानिशा केल्यास कळायला लागत होतं की त्यानं देशात मोठा घोटाळा केला. मग हा मिळवलेला पैसा हा चोरीचाच होता. परंतू त्याची चौकशी होत नव्हती. केली तर साधीच चौकशी होत होती. तसं पाहता सत्तारुढ पक्षाची चौकशी कोण करणार? परंतू ते जेव्हा पदावरून उतरत. तेव्हा मात्र एक एक मासा गळाला लागल्यागत सारे सापडत असत. याच स्वरुपानं देशातील अनेक घोटाळे पुढे आले होते. तसेच असे बरेच घोटाळे होते की जे आजही उजेडात आले नव्हते. त्यावर लक्ष कोण घालणार. हे देशातील मोठमोठे घोटाळे होते. स्थानीक नगरसेवकाच्या पातळीवरही बरेच घोटाळे होते. परंतू ते उजेडात आलेच नव्हते. कोणी उजेडात आणत नव्हते. कारण सर्वजण आपल्याला काय करायचं अशी बघ्याची भुमिका घेत गप्प बसत असत.
राजकारण्यांचं काही सांगता येत नव्हतं. ते केव्हा कोणाला संपवतील व कोणाला पुढं आणतील. ते काही सांगता येत नव्हतं. संपवतील याचा अर्थ राजकारणात मुरवतील असा आहे. देशाचा विचार केल्यास देशात शंभर प्रतिशत बेईमान होते. एक प्रतिशत इमानदार. देशात अरब लोकसंख्येत या टक्क्याचा विचार केल्यास इमानदारांची संख्या कोटीच्या घरात होती. ज्यांच्यावर देश सुरु होता. ते इमानदार कोणताच घोटाळा करीत नव्हते. देश त्या इमानदारावरच टिकून होता. तसंच देशात असेही काही लोकं होते की जे स्वतःच वस्तू चोरत आणि इतरांना बदनाम करत. असेच लोकं राजकारणातून आपला राजकीय स्वार्थ साधत असत. आपण केलेले घोटाळे जनतेसमोर येवू नये. म्हणून ताबडतोब पक्षबदल केले जात.
नगरसेवक, आमदार, खासदार, पंतप्रधान व मुख्यमंत्री हे सर्वच राजकीय घटक दबाव आणणारे घटक होते. हे घटक काम करणा-या घटकांवर त्यानं काम करावं. चांगलं काम करावं. म्हणून दबाव आणत असत. कोणतंही काम चांगलं वा वाईट करुन घेणं हे त्यांच्या हातात होतं. घोटाळे केव्हा होत? जेव्हा हे घटक असे काम करतांना त्यात स्वार्थ आणत तेव्हा. याबाबत राधेला वाटायचं की देश चालवायला नगरसेवक, खासदार, आमदाराची गरज नाही. मुख्यमंत्री व पंतप्रधानाची गरज थोडीशी राहू शकते खंबीर नेतृत्वासाठी. कारण मुख्यमंत्री राज्य चालवतात व पंतप्रधान देश. ते नेतृत्व देशातील सरकारी कर्मचा-यांमार्फत देश चालवू शकतात. मग कशाला हवेत नगरसेवक व आमदार, खासदार? त्यांना ठेवूच नये. कारण त्यांना उदरनिर्वाहासाठी देण्यात येणा-या वेतनासाठी खर्च होणारा पैसा हा जनतेचा असतो. तो तेवढा खर्च होणार नाही व जो पैसा वाचेल. तो देश विकासाच्या कामात येईल. हं, त्यातही एक यंत्रणा असावी. ती म्हणजे या सरकारी कर्मचा-यांवर लक्ष ठेवणारी. ती स्वतंत्र्य यंत्रणा असावी. त्या यंत्रनेनं कोणाच्याही दबावात काम करु नये. त्या यंत्रणेनं फक्त चौकशी करावी वा महाभियोगासारख्या याही देशात प्रक्रिया राबवून सरकारी कर्मचा-यांना पदावरून बरखास्त करावे. तसेच त्याची ताबडतोब चौकशी करुन तो दोषी आढळल्यास त्याची एकंदर संपुर्ण संपत्ती जप्त करावी. अशी जर प्रक्रिया राबवली तर देशातील भ्रष्टाचारही कमी करता येईल व देशाचा सर्वतोपरी विकासही करता येईल.
राधेचं म्हणणं बरोबरच होतं. परंतू आम्हाला तसा देशाचा विकास हवा नव्हता. आम्हाला आमचा विकास हवा होता. आम्हाला आमच्या देशातील पैसा आमच्या स्वतःसाठी गोळा करुन ठेवायचा होता. आमच्या सात पिढ्या सुखात जाव्या यासाठी हवा होता तो पैसा. कारण आमच्यात स्वार्थ कुटकूट भरला होता. हा स्वार्थीपणा सांभाळण्यासाठी आम्हाला मोठमोठी पदं हवी होती.
विशेष सांगायचं म्हणजे देशात सरकारी यंत्रणा होती आणि त्यावर लक्ष केंद्रित करणारी विशेष अशी यंत्रणाही. त्या यंत्रणेलाच आमदार, खासदार वा नगरसेवक वा सरपंच रचना म्हणता येईल. जिला पंचायत राज यंत्रणा म्हणतात. परंतू ही यंत्रणा आज घडीला कुचकामी ठरत चालली होती. कारण ही यंत्रणा आज आपला स्वार्थ पाहात होती व आपलाच विकास करीत होती. आज असा एकही आमदार, खासदार दिसत नव्हता की ज्यांच्याकडे गडगंज संपत्ती नाही. तिही संपत्ती कोटी आणि अरबोंच्या घरात होती. काहींची संपत्ती विदेशात होती. देशातील करंन्सी बदलली. परंतू त्या बदलल्या करन्सीचा कोणताच फरक अशा विदेशी बँकातील देशीय लोकांच्या पैशावर पडलेला नव्हता. म्हणूनच तो पैसा सुरक्षीत राहिला. म्हणूनच राधेला वाटत होतं की आमदार, खासदार वा नगरसेवक नसावा. त्यामुळं देशातील विनाकारणचा उध्वस्त होणारा पैसा वाचतो. परंतू हे जरी खरं असलं तरी ज्याच्यावर आपलं प्रेम असतं. तो जवळचा माणूस आपलं काम करतांना नक्कीच नियुक्त असावा. त्यालाच आमदार, खासदार वा नगरसेवक म्हणता येईल. परंतू ज्यांच्यावर आपण प्रेम करतो. तो आमदार, खासदार नगरसेवक घटक इमानदार असावा. त्यानं अशा प्रेम करणा-या घटकाच्या विचारांची हत्या करु नये. जनतेच्या विचारांचा त्यांनी आदर करावा. नाहीतर आता असे आमदार, खासदार वा नगरसेवक आम्ही पाहतो की जे कोणतीही व्यक्ती त्यांच्याकडे गेल्यास त्याला धुत्कारुन लावतात. हा माझ्या पक्षाचा व तो दुस-या पक्षाचा असे म्हणत भेदभाव करतात. भेदभावात्मक वातावरण तयार करतात. तसेच विनाकारणचे घोटाळे करतात. जो जनतेचा पैसा असतो. त्या जनतेनं अतिशय काबाडकष्ट करुन व रक्ताचं पाणी करुन कर भरलेलं असतं. असं जर कोणताही आमदार, खासदार वा नगरसेवक वा कोणत्याही राजकीय पक्षातील नेते करीत असतील तर ते नसलेले बरे. हे तेवढंच खरं आहे. तसंच कोणावरही 'कशाला हवेत राजकीय नेते' असं म्हणण्याची वेळ येणार नाही. असंच नेत्यांनी वागायला हवं. असं जनता मानत होती.
राधा नवीन विचारांची होती. तिला परंपरा ह्या भाकडकथाच वाटत होत्या. ज्यावेळेस ती दुकानात जात असे आणि त्या दुकानातून जेव्हा आवश्यक वस्तू तिला मिळत नसत आणि ज्यावेळेस अशा वस्तू घेतांना परंपरा आड येत. तेव्हा मात्र तिचा तिळपापड व्हायचा. ती त्या गोष्टीला विरोध करीत असे.
आज विज्ञानयुग होतं. अशा विज्ञानयुगात अंधश्रद्धेला थारा नव्हता. काल चंद्र, सुर्याला देव मानणारा माणूस आज त्याला चंद्र, सुर्य म्हणजे काय हे समजायला लागलं होतं. अशातच काही काही अंधश्रद्धा कालबाह्य ठरत चालल्या होत्या.
अंधश्रद्धेचा विषय मांडतांना एका दुकानाची गोष्ट. एका दुकानात गोष्टी चालल्या होत्या. त्या अंधश्रद्धेच्याच गोष्टी होत्या. दुकानदार ग्राहकाला त्याच्या दुकानात विक्रीला असलेल्या धूपबत्तीचं महत्व पटवून देत होता. म्हणत होता की आपण धूपबत्तीच घ्यायला हवी. कारण देवाला धूपडत्तीच चालतं.
धूपबत्ती.......या धुपबत्तीवरुन संवाद. सवांदात आठवतं की ज्या वस्तू मृत माणसांशी संबंध ठेवतात. अशा वस्तू आपण देवासाठी वापरु नयेत. जसे. वेळू कधीच मृत माणसांच्या शरणावर जाळला जात नाही. अपवाद आज त्यालाही जाळतात. म्हणून वेळूची काडी टाकून बनवलेली अगरबत्ती आपण देवघरात जाळता कामा नये. तसं पाहता वेळूचं झाड वंशवृद्धीचं प्रतिक आहे. असंही मानण्यात येतं.
कदाचीत वरील म्हणणं बरोबर असू शकते. कारण वेळूच्या झाडाला आपण जर पाहिलं असेल तर ते झाड पसरत असतं. लहान लहान अंकूर अगदी जमीनीवरुनच फुटत असतात. खाली जमिनीपासूनच ते झाड पसरत जातं. म्हणूनच त्याला जाळू नये हा संदर्भ.
अंधश्रद्धेच्याबद्दल सांगताना व त्याचा मृत आत्म्याशी संबंध जोडतांना काही अंधश्रद्धा. रात्र झाली की दुकानातून सुई किंवा टोकदार वस्तू विकता येत नाही. कारण असा समज आहे की या सुईनं किंवा टोकदार वस्तूनं मृत माणसाचं शरीर शिवलं जातं. तसंच मृत शरीराचं रात्री शवविच्छेदन करता येत नाही. कारण असं दिलं जातं की रात्री मृत शरीरातील आत्म्ये सक्रीय होतात. रात्री कुंकूही विकता येत नाही. कारण कुंकू हे सौभाग्याचं लक्षण समजलं जातं. रात्री कुंकू विकणं म्हणजे सौभाग्य विकणं होय असं मानण्यात येतं. तरीही आज परिस्थिती अशी आहे की ब-याचशा जत्रेच्या ठिकाणी कुंकू रात्रीला विकतात. कारण तो विकणं हा व्यवसाय आहे. तो विकल्याशिवाय पर्याय नाही. त्यातून बराच नफा कमवता येतो. अशा ब-याच अंधश्रद्धा आहेत. जसं हळद विकता येत नाही. तिही सौभाग्याचं लक्षण आहे. परंतू आज ती एक खाण्याचा पदार्थ असल्यानं लोकं हळदीला विकतातच.
महत्वाचं म्हणजे असल्या अंधश्रद्धा. खरं तर या अंधश्रद्धांना लोकांनी तिलांजली द्यायला हवी आजच्या विज्ञानयुगात. असं राधेला वाटत होतं. कारण आपलीच कामं अडत असतात. जशी मांजर वा कुत्रा आडवा गेल्यास एखादा व्यक्ती तो जाण्याचा रस्ता कोणी पार करेपर्यंत आजही रस्ता पार करीत नाही. त्यामुळ आपल्याला जिथं कुठं महत्वाच्या ठिकाणी जायचं असेल तर तिथं जाता येत नाही. प्रसंगी आपल्याला आपल्या अशा वागण्यानं बोलणं खावं लागते. नुकसानही सहन करावं लागतं.
आजही काही अंधश्रद्धा लाभाच्या मानल्या जातात तर काही अंधश्रद्धा ह्या नुकसानदायक मानल्या जातात. साप दिसणे अशुभ व मुंगूस दिसणे शुभ मानलं जातं. कोणी घुबड दिसण्याला शुभ तर कोणी अशुभ मानतात. अमूक अमूक तोटके केल्यानं लक्ष्मी येते असंही प्रसवलं जातं. खरंच या असल्या अंधश्रद्धा पाळल्यानं लक्ष्मी जर आली असती तर सर्वच लोकं करोडपती बनले असते. कोणीही गरीब उरले नसते.
विशेष सांगायचं म्हणजे या असल्या अंधश्रद्धा......या अंधश्रद्धांना परंपरा म्हणाव्या की भाकडकथा? या अंधश्रद्धा पाळाव्या की पाळू नये? या अंधश्रद्धा पाळल्यानं खरंच फायदा होतो की नुकसान होतं? आदि अनेक प्रश्न आहेत. या अंधश्रद्धा पाळल्यानं जर फायदा होत असेल तर अवश्य पाळाव्या. अन्यथा आजच्या विज्ञानयुगात त्या पाळण्याची गरज नाही. तरीही लोकं त्या पाळत असतात त्याचं आश्चर्य वाटतं.
महत्वपुर्ण गोष्ट ही की अंधश्रद्धा ह्या माणसाला अंधारात नेवून टाकतात. त्यातच आपला विकास खुंटवतात. असा राधेचा विचार. त्यामुळंच ती म्हणत असे की आज विज्ञानयुग आहे. विज्ञानानं सारंच सिद्ध केलं. आज आपल्याला ओळखता येतं सत्य असत्य. देव, दानवाची प्रतिकृती आपल्याला ओळखता येते व आजच्या काळात कोण कोणाला कोणत्या अंधश्रद्धा प्रसवून मुर्ख बनवतो तेही ओळखता येतं. म्हणून त्या पाळू नयेत व कोणाच्याही मायाजाळात जावू नये. जेणेकरुन आपण फसू व त्यातून निघू शकणार नाही. विशेष सांगायचं म्हणजे अंधश्रद्धा ह्या परंपरा नाहीत तर त्या भाकडकथाच आहेत.
राधा ही एक शिक्षीका होती. त्यातच तिला काॅपी करणं आवडत नव्हतं. यावर्षी सरकारनं एक नवीन उपक्रम हाती घेतला होता काॅपीमुक्त अभियानाचा. विद्यार्थ्यांनी काॅपी करु नये म्हणून हा उद्देश होता सरकारचा.
महाराष्ट्रात काॅपीयुक्त अभियान सुरु होतं. त्या अनुषंगानं परीक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार थांबविण्याचा हा प्रकार. ते प्रकार थांबविण्यासाठी शालेय शिक्षण व क्रिडा विभागानं पत्र काढलं होतं. त्यानुसार यावर्षी देशात कोणीही काॅपी करु नये. राज्य काॅपीमुक्त व्हावं. मुलं आत्मनिर्भर व्हावी ह्या उद्देशानं या काॅपीमुक्त अभियानाची निर्मीती करण्यात आली व त्यातूनच पुन्हा एकदा विद्यार्थ्याच्या मनात भीतीदायक वातावरण निर्माण झालं असं काहीजण म्हणत असलेले दिसत होतं.
काॅपीमुक्त अभियान. ही आधीपासूनच काळाची गरज होती. काॅपी पुर्वीपासूनच केली जात असे. त्यातच अशा काॅपीतून पुर्वी बरीचशी मुलं घरी बसली. तरी काॅपी बंद झाली नाही. काही ठिकाणी वादही झाले. त्यातूनच परीक्षा राबवितांना पोलिसांची मदत घ्यावी लागत असे. आता प्रत्येक शाळेत असे गैरप्रकार होवू नये. म्हणून पोलीस पाठवले जात.
पुर्वीपासूनच काॅपी हा प्रकार होता. तो या प्रकारानुसार लोकं शाळेचे काही मजले चढून खिडकीत बसलेल्या मुलांना काॅपी पुरवत. यात त्या शाळेत जेही शिक्षक त्या केंद्रावर राहात. त्यात शिक्षकांचा समावेश असायचा. कारण ही काॅपीबहाद्दर मंडळी अशा शिक्षकांना धमक्या देत. त्यांचा रस्ता अडवीत. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देत. ही वास्तविकता होती. परंतू आपली बदनामी होवू नये. म्हणून ती प्रकरणं उजेडात आली नाही व सर्रास काॅप्या चालवल्या जावू लागल्या.
काॅपी अभियानातंर्गत काॅपी पकडण्यासाठी कधी भरारी पथक यायचं. हे भरारी पथक काॅपी पकडायचं. त्यातच पकडलेल्या मुलाला पेपरपासून वंचित ठेवायचं. तसं त्या पथकाचं चालायचं. त्यामुळं काहीशी मुलं घाबरायची. परंतू काही घाबरत नव्हती. काही मुलं ते भरारी पथक गेलं की जैसे थे स्थिती निर्माण करीत. त्यांना वाटत असे की भरारी पथक गेलं. आता कोणीच काही करणार नाही. त्यानंतर पुन्हा काॅपीबहाद्दर सक्रीय होत. काही काही शाळा तर संगनमत करुन काॅप्या फळ्यावर लिहून देत असत.
आज तसं नव्हतं. आज फळ्यावर चक्कं काही काही शाळेत लिहून देतात म्हणून त्यावर उपाय काढण्यासाठीच बैठी पथकाची नेमणूक करण्यात आली होती. हे बैठी पथक शाळेतच बसत असे. ते पथक केव्हा धाड मारेल आणि केव्हा नाही याची शाश्वती नसे. सारं केंद्रच कडक करुन टाकलं होतं या माध्यमातून. त्यातच एखादा मॅनेज होवू शकतो म्हणून त्या ठिकाणी दोन, तीन लोकांची नियुक्ती केली होती. त्यांना पुर्ण अधिकार दिले होते. काॅपीमुक्त अभियान चांगलं राबविण्यात यावं म्हणून. यामुळं प्रत्येकच केंद्र कॉपीमुक्त माध्यमातून चांगलं चाललं होतं. परंतू यातही काही दोष होते. ज्यांची नियुक्ती झाली, त्यापैकी काही निवृत्त कर्मचारी होते. त्यांनी हजेरीच लावलेली नव्हती. तसंच काही पायानं वा आजारानं अपंग होते. काहींना साध्या पाय-याही चढता येत नव्हत्या. ती मंडळी फक्त शोभाच वाढविणारी होती. मग अशानं कॉपीमुक्त अभियान कसं राबवावं यावर प्रश्नचिन्हं होतं. हा प्रयोग होता मंत्रालयाचा. कारण हे पहिलं वर्ष होतं. पुढं मात्र कडक राहणार. कारवाई होणार आणि त्यासोबतच विद्यार्थ्यांचं जीवनही बरबाद होणार अशी चिन्हं दिसत होती. त्याची ही सुरुवात वाटत होती.
मुळात याबाबत सांगायचं म्हणजे एकीकडे मानसीक परिणाम होतो विद्यार्थ्यी जीवनावर म्हणून आठवीपर्यंत नापास करु नका म्हणणारा अभ्यासक्रम. त्या अभ्यासक्रमानं आठवीपर्यंतच्या वर्गापर्यंत भीती नष्ट केली होती आणि दुसरीकडं दहावीच्या केंद्रावर बैठी पथकाची नियुक्ती करुन पुन्हा त्याच विद्यार्थ्यांत भीती निर्माण करुन त्या विद्यार्थ्यांने कॉपी करु नये हे प्रतिपादन केले होते. यावरुन अभ्यासक्रम राबविणा-या घटकाला नेमकं काय साकार करायचे आहे ते कळत नव्हतं. एकीकडं आठवीपर्यंत फारच लाड केलं गेलं होतं विद्यार्थ्यांचं आणि तिकडे दहावीच्या परीक्षेत एकाएकी राग. यात जर विद्यार्थ्यांत या रागामुळं वा धाकामुळं नेमकं काही झाल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थीत झाला होता. तसाच तो प्रश्न संभ्रमात टाकणारा होता. कारण अलीकडील काळात बोलण्यावरही बंदी घातली गेली होती. मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे कोणी सांगितलं वा न सांगितलं तरी चालेल, त्यामुळंच विद्यार्थ्यांना जर आपल्या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्यांनी कॉपी करु नये. अभ्यास करावा व निर्भीडपणे पेपर सोडवावा. विद्यार्थ्यांचा अभ्यासच आजच्या काळात त्यांना तारेल यात शंका नव्हती. कारण हे अभियान केवळ कॉपीमुक्त अभियान नव्हते तर तारांकित अभियान होते.
राधा एक महिला होती. अत्याचार ग्रस्त महिला. तिच्या जणू प्रारब्धातच असं लिहिलेलं असेल असं जाणवत होतं. आज तिच्या देशात संपन्नता होती. महिलांना संपन्नता प्रदान केली होती देशानं. परंतू नशिबानं कुठं संपन्नता दिली होती तिला. विधाता आजही तिच्याशी भेदभाव करीत होता. त्यातच तिला वाटत होतं की देशानं संपन्नता प्रदान केली आहे. कायद्यानुसार देश संपन्नता प्रदान करु शकते. पण निसर्गानं तिला संपन्नता प्रदान केलेली नाही असं तिला वाटत होतं. कारण पहिला पती चांगला असूनही मरण पावला होता तर दुसरा दारुडा निघाला होता. तो तिला समानताही देत नव्हता.
दरवर्षी देशात महिला दिन साजरा व्हायचा. या महिला दिनी सुधारणेवर विचार केल्या जायचा. हा दिवस महिलांच्या दृष्टीकोणातून सन्मानाचा दिवस असायचा. या दिवशी महिला राजरोषपणे आपल्याबरोबर झालेला अत्याचार आठवत व तसा त्यांच्यावर अत्याचार होवू नये. म्हणून कार्य करण्याची शपथ घेत.
महिलादिन हा महिला संकल्पनेवर आधारित होता. दरवर्षीच जागोजागी हा महिलादिन साजरा व्हायचा. तसा तिच्या शाळेतही तो महिलादिन साजरा होत असे दरवर्षीच. तशी तिही अनुभव संपन्नच होती. याही वर्षी ती हिरीरीने विचार मांडणार होती. तसं तिला दरवर्षीच कार्यक्रमात पाहुणी म्हणून बसवतच होते. याहीवर्षी पाहुणी म्हणून तिला बसवलंच होतं.
तो कार्यक्रम. त्या कार्यक्रमात सर्वांनी विचार मांडले. तसा तिचा क्रमांक आला व ती बोलकी झाली.
महिलादिनानिमीत्यानं विचार मांडतांना मला एक विचार हाही मनात येतो. खरं तर तो संभ्रमाचा विचार आहे. कारण आज महिलांकडे पाहिलं तर महिला सक्षम आहे. त्याची उदाहरणं द्यायची झाल्यास नक्कीच देता येतील. कारण आज कैसर विल्यमसारखी महिला अंतराळात पोहोचलेली आहे. प्रतिभा पाटील सारखी महिला देशाच्या राष्ट्रपती बनल्या आहेत. किरण बेदी सारखी महिला राजकारणात सक्रिय झाली आहे. तसंच इंदिरा गांधींसारखी महिला भारताची पंतप्रधान झाली आहे. तसेच सोनिया गांधीसारखी महिला काँग्रेसची अध्यक्षा. अशी कितीतरी उदाहरणं देता येतील महिलांच्या सक्षमीकरणांची. यावरुन वाटतं की खरंच महिला सक्षम आहे.
आजचा काळही असाच महिलांच्या सक्षमीकरणाला अनुकूल आहे. आज महिलांनी आपला स्वतःचा विकासच केला नाही तर ती आयतोब्या असलेल्या व स्वतःला पुरुष समजणा-या माणसाला पोषते. आजही ठोंब्यासारखा बलदंड असलेला पुरुष हातपाय गळल्यागत महिलांसमोर गुलामागत वागतो व आजही घरातील स्नुषा चांगल्या निघाव्या, म्हणून विधात्याकडे साकडे घालणा-या भरपूर सासवा जगात आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजही महिला, पुरुषांना आपल्या पत्नीच्या हातचे कळसुत्री बाहुले म्हणून घरात वागवतांना दिसत आहेत. संसार करतांना त्यात पुरुषांना राबवितांना दिसत आहेत. त्यामुळं महिला सक्षमच वाटते.
कालचं ठीक आहे की महिला सक्षम नव्हती. तिला साधा शिक्षणाचा अधिकार नव्हता. सतत तिच्यावर अत्याचार होत होता. बलात्कार तर वारंवार व्हायचा. घरात, दारात आणि बाहेरही. पुर्वीच्या काळातील महिलांवरील अत्याचाराबाबत सांगायचं झाल्यास पुर्वी बालविवाह व्हायचा. वधू कमी वयाची व वर जास्त वयाचा. यात वर वयानं कितीतरी मोठा असल्यानं मरुन जायचा. मग त्या घरात त्या वधूची साडेसाती सुरु व्हायची. साडेसाती म्हणजे एकाच घरातील सारी मंडळी या तरुण असलेल्या विधवेवर अत्याचार करीत सुटायची. तो बलात्कारच असायचा. परंतू त्यावर आवाजही उठवता येत नव्हता महिलांना. कारण ती सक्षम नव्हती. तसेच कायदेही तसे सक्षम नव्हते. विधवा विवाह बंदी होती.
आज काळ बदलला आहे. महिलांना शिकता येतं. उच्च शिक्षण घेता येतं. महिलांना आपला बालविवाह रोकता येतो. त्यांना विधवा विवाह करण्याची अनुमती आहे. विनाघुंघट कुठेही जाता येतं. कुठंही केव्हाहीपर्यंत विहार करता येतं. एवढंच नाही तर एक पती असतांना तो जर बरोबर वागत नसेल तर वेळप्रसंगी बदलवता येतो. अर्थात घटस्फोट घेऊन दुसरा विवाह करता येतो. कारण त्यांना कायद्याच्या संरक्षणाचं कवच आहे. मग असे असतांना त्या महिला स्वतःला का कमकुवत समजतात तेच कळत नाही. त्याचं कारण आहे येथील संस्कृती. आपली संस्कृती महान आहे. त्या संस्कृतीला विशिष्ट असं वलय आहे. महिलांबाबतीत सांगायचं म्हणजे ही संस्कृती सक्षम आहे महिला बाबतीत. या भारतीय स्री संस्कृतीला त्यांचा पुर्वइतिहास माहित आहे. तो पुर्वइतिहास म्हणजे दुर्गा, काली अवतारांची. त्यातच त्यांना हेही माहीत आहे की या संस्कृतीनं गार्गी, मैत्रेयीच्या रुपात शास्त्रार्थही केला होता व त्या महिला संस्कृतीनं पुरुषांच्या बरोबरीला खांद्याशी खांदा लावला होता. महिला कमकुवत नाहीच आणि कोणीही तिला कमकुवत समजून घेवून भूल करु नये. ती कमकुवत सारखी वागते तेही आपल्यासाठीच. तिलाही वाटते की हा देश माझा आहे. माझ्या देशाचा अपमान होईल मी जर अशी संस्कृतीला धरुन वागले नाही तर. हाच हेतू ठेवून महिला वर्ग वागत होता काल. आजही वागतो. परंतू त्या महिला वर्गाच्या तशा वागण्याचा फायदा हा मध्यंतरीच्या पुरुष जातीनं घेतला व त्यांच्यावर विशेष अशी बंधनं घातली व त्यांना गुलामागत वागवलं. यात त्यांनी पुर्ण संस्कृती स्रियांना सोपवून दिली. त्यांनी काय खावं, काय प्यावं याबाबतही बंधनं घातली. डोक्यावर पदर असावा. लुगडंच घालावं अशी बंधनं.
आज ब-याच महिला पुढे गेल्या आहेत. राजकारण, अर्थकारण व देशाची धुरा सांभाळत आहेत. आज महिलांनी ओळखलं आहे की आपण जर आवाज उचलला नाही आणि असेच दबत राहिलो तर येथील पुरुष वर्ग आपल्यावर विनाकारणचा अत्याचार करतो. म्हणून त्या सक्षम बनल्या आहेत. आजही ज्या घरी मुली विवाह करुन जातात. त्या घरी मुली आपल्या मनानुसार नवरोबाला वागायला लावतात. जर नवरोबा तसे वागत नसतील तर त्यांना इंगाही दाखवायला त्या मागे राहात नाहीत किंवा पाहात नाहीत. जर नवरोबा व सासूसासरे चांगले असतील तर मुली चांगल्या वागतात. सांस्कृतीक परंपरेनं वागतात. परंतू जर नवरोबा चांगले नसतील तर मात्र अशावेळी त्या संस्कृत्यांनाही गहाण टाकतात. त्यानंतर कोणी नावबोटं ठेवो की अजून काही. त्या घाबरत नाहीत. त्या मुली डोक्यावर पल्लूही ठेवत नाहीत. कोणतीच व्रतवैकल्ये पाळत नाहीत.
महत्वपुर्ण गोष्ट ही की महिला ही आज कमकुवत नाही. तिला कोणीही कमकुवत समजू नये. ती कालही कमकुवत नव्हती. कालही ती दुर्गा रुपात वावरुन माजलेल्या महिषासूराचा विध्वंस करीत होती. आजही ती अशाच माजलेल्या महिषासूराचा विध्वंस करण्यास सक्षम आहे. तरीपण आजही अशा काही स्रिया आपण पाहतो की त्यांना पाहिलं की महिला कमकुवत जाणवते. अशा महिला आजही देशात ब-याच आहेत की ज्या आजही अत्याचार सहन करतांना दिसतात. आजही त्यांच्या डोक्यावर पदर दिसतो. घुंघटही दिसतो. आजही त्या महिलांवर घरादारात अत्याचार होत असतो. त्यांना मनमोकळे पणानं वागता येत नाही. ब-याच स्रियांना आजही कुठेही केव्हाही मनमोकळे पणानं फिरता येत नाही. सतत भिती आणि भितीच तसंच भितीदायक वातावरणही दिसतं. त्यांच्या आचरणातून आजही त्यांचं दुय्यम स्थान दिसून येतं.
आज महिला दिन आहे. महत्वाचं म्हणजे आजपासून तरी महिलांनाही चांगलं वागवावं. त्यांनाही सामाजिकता प्रदान करावी. त्या मान ठेवतात म्हणून त्यांच्याकडून जबरदस्तीनं प्रथांचं पालन करुन घेवू नये. तेव्हाच महिलादिनाचं सार्थक होईल एवढंच सांगावेसे वाटते
राधा शाळेत शिकवीत होती. मुलांना संस्कारीत करीत होती. त्यांच्यात संस्कार फुलवीत होती. परंतू तिच्या घरी मात्र अंधार होता. ती दुस-यांना बोध देत होती. परंतू तिचा संसार फाटका होता. तिचं एक बोट दुस-याकडं होतं. परंतू तिचे चारही बोटं तिच्याकडेच होती. हे तिलाही माहीत होतं. त्याबद्दल तिला पश्चाताप होत होता. तिला वाटत होतं की त्या गोष्टी जर दुस-यांना माहीत झाल्या तर ते काय म्हणतील. परंतू हे तिचं प्रारब्ध होतं. ज्या प्रारब्धावर ती पश्चाताप करीत होती.
तिचा पती.......तिचा पती निव्वळ दारुच पीत नव्हता तर तो तिला मारतही होता. एकदाचा तो दिवस. त्या दिवशी तिचा पती दशरथशी तिचं भांडण झालं होतं त्यानं तिच्या मुलांसमोरच तिला मारलं होतं. तशी ती पुष्कळ व्यथीत झाली व तिनं ठरवलं, आपण त्याला सोडावं. कारण तो तिचा पगार. परंतू तिचा पती दारु पीत असल्यानं तो तिचा पगार तिला पुरत नव्हता. अशातच मुलं मोठीही झाली नव्हती, इतक्यात तिला वाटत होतं की जर तिनं तिला सोडून दिलं नाही तर उद्या त्याचेच कुसंस्कार त्या मुलांवर पडतील व ती दोन्ही मुलं बिघडतील. शेवटी तिचा तो विचार. तिनं ब-या बोलानं त्याला सोडलं आणि ती आपल्या मुलांना घेवून वेगळी राहू लागली.
ती दारु........ त्या दारुला तिच्या पतीचे पैसे पुरत नव्हते. त्यातच आता ती घरात नव्हती. त्यामुळंच तो आणखीनच एकाकी झाला होता. तो आता अख्खा दारुच्या आहारी गेला होता. तो आता दिवसरात्र दारु पिवून असायचा. त्यातच त्याची प्रकृती ढासळली व त्या अवस्थेत त्याची सेवा करायला कोणीच नसल्यानं एक दिवस तो मरण पावला.
राधेला ती गोष्ट माहीत पडली. तशी ती आली. तिनं त्या प्रेताकडे पाहिलं. तसं ते प्रेत न्याहाळताच तिला आढळलं की त्याच्या डोळ्यावर मुंग्या लागलेल्या असून त्या मुंग्यांनी त्याचा एक डोळा खावून टाकलेला आहे.
कसाही का असेना. आपलाच पती होता. असा विचार करीत तिनं त्या पतीची अंतिम यात्रा पार पाडली व ती मोकळी झाली. आता ती आपल्या दोन्ही मुलांना शिकवू लागली. तशी ते शिक्षण शिकवतांना तिला पतीविरहाचाही त्रास होवू लागला.
तिचं ते तरुणपण तिला छळत होतं. पती सोबतचे तीनचार वर्ष आनंदात गेले होते. पहिला पती चांगला होता. परंतू दुसरा. दुसरा काही चांगला नव्हता. पहिल्या पतीनं तिला शेतीतून पैसा मिळवून दिला होता. दुसरा दारुडा होता. परंतू दुस-या पतीचं शहरात घर होतं. पैसा ब-यापैकी होता. तसं पाहता एका खाजगी शाळेत नोकरीही. परंतू संस्कार.........संस्काराची वानवा होती तिच्याघरी. तिची मुलं कशानं बिघडत होती ते तिलाही माहीत नव्हतं.
तिचे दोन्ही पती मरण पावले. परंतू ती काही त्यावेळेस म्हातारी नव्हती. तरुणपणा छळत होता. तिसरा विवाह करावासा वाटायचा. परंतू कसा करणार. तिसरा पती टिकेलच असं कशावरुन. शिवाय मुलांचा प्रश्न. तशी ती विचार करायची. ती विचार करायची की तिसरा पती. आपले तर दोन्ही पती मरण पावलेत. एक पती आपल्या प्रारब्धानं गेला आणि दुसरा पती दारुनं. आपल्या प्रारब्धातच पतीचं सुख नसेल. जर आपण तिसरा पती केला आणि तोही मरण पावला तर......किंवा तिसरा पती हाही चांगला नाही निघाला तर......आपण विचार केला होता की दुसरा पती आधार होईल. परंतू आपला विचार हा फोल ठरला. संस्काराच्या दृष्टीकोणातून विवाह केला दुसरा. परंतू आपली निराशा झाली. आपल्या दुस-या पतीनं आपल्या मुलांना सांभाळण्याऐवजी कुसंस्कारी वागत होता तो. आता आपण विवाहच करु नये. कधीच करु नये विवाह. परंतू हे तरुणपण. ह्या तरुणपणाला कसं रोकावं. हे तरुणपण जे छळत असतं पदोपदी. त्या तरुणपणाची वाट कशी लावावी.
तिचा तो विचार. तो विचारच रास्त होता. कारण तिचं ते तरुणपण छळत होतं तिला. परंतू ती आपलं तरुणपण दाबत होती. ते दाबणं आवश्यक होतं. कारण तिची मुलं आज लहानाची मोठी होत होती.
आज तिची ती मुलं लहानाची मोठी होत होती. परंतू ती लहानाची मोठी होत असली तरी ती लहान होती. त्यातच तिनं त्या मुलांच्या वाढत्या वयाची चिंता केली नाही. तिला वाटलं की ती अजून लहान आहेत. म्हणून की काय, ती बेधुंदसारखी वागत राहिली. ती आता व्यवहार स्वतःच करायला लागली. कारण तिच्याकडे कोणताच उपाय नव्हता. ती मनमोकळेपणानं वागू लागली. ज्याला लोकांनी दुषणं ठेवलीत. तिला तिचं तरुणपण छळत होतं, तरीही तिनं आपल्या इच्छा तृप्त करण्यासाठी वाममार्ग पसंत केला नाही. पत्करला नाही. त्यातच ती गैरमार्गाचा अवलंब करु लागली असती तर दोष तिचा असता. सुरुवातीला तिला अडचण गेली स्वतंत्र्य वागत असतांना. काही गोष्टी लपूनछपून केल्या. परंतू काही दिवसानंतर ती अभयासारखी अगदी बिनधास्त वागू लागली. बिनधास्त फिरु लागली. व्यवहारीकतेसाठी माणसांशी बोलू लागली. परंतू ते पुरुषांसोबत बोलणे तिच्या मुलांना खटकू लागले. ती लहानगी मुलं तिला टोचू टोचू बोलू लागली. परंतू तिच्याजवळ उपाय नव्हता. त्याचा परिणाम तिच्या मुलांच्या वागणूकीवर झाला. ती मुलं त्यांची आई व्याभीचार करते असं समजू लागली. ते पाहून ती तिची मुलंच बिघडतील असा अंदाज येणा-या ब-याच लोकांनी तिला समजावून पाहिलं. परंतू तिच्याजवळ पर्याय नव्हता. त्यामुळेच ती काही ऐकत नव्हती. त्यामुळं लोकांनी तिला समजावणं बंद केलं. आता ती अगदी लोकांचं न ऐकता बिनधास्तपणे उघडरितीनं वागू लागली. आता जेव्हा जेव्हा तिला तिच्या कामासाठी व्यवहाराचा प्रसंग असे. तेव्हा तेव्हा ती आपल्या कामासाठी पुरुषांशी बोलतच असे व आपली कामं पुर्ण करीत असे. त्यातच त्याचा परिणाम तिच्या मुलांच्या बिघडण्यावर होवू लागला होता.
मुलं लहानाची मोठी होवू लागली होती. तशी ती मुलं आपल्या आईला व्याभीचारी असण्याच्या दृष्टीकोणातून पाहू लागली. त्यातच ती मुलं त्या पारदर्शी व्यवहाराला तो व्याभीचार समजून बिघडू लागली होती. त्यांच्यात संस्कार उरलेे नव्हते.
वाढती मुलं. ती वाढती मुलं आता काही तिचं ऐकत नव्हती. ते पाहून तिनं आपल्या मुख्याध्यापकांना सांगीतलं व इच्छा व्यक्त केली की त्यांनी त्यांना समजवावं. त्यानंतर तिच्या मुलांना तिच्या मुख्याध्यापकानं समजावलं होतं. तशी ती काही काळासाठी चूप बसली होती. परंतू ती जेव्हा त्यांच्या वयात आली होती. तेव्हा मात्र ती मुलं तिचं ऐकायला तयार नव्हती. ती आपल्या आईचंच नाही तर कोणाचंच ऐकत नव्हती. तसं पाहता त्यांना कितीही समजावलं कोणी तरी ती ऐकायला तयार नव्हती. त्यांना त्यांच्या आईनंच बिघडवलं आहे असं ती मानत होती. ती मुलं आता वाढत्या वयाबरोबर त्यांच्या आईनं त्यांना समजदारीच्या दोन गोष्टी सांगतल्यास तिलाच खडेबोल ऐकवत होती.
राधा केवळ दोन मुलांची आईच नव्हती तर ती एक शिक्षीकाही होती. काही दिवस जाताच तिच्यासमोर चित्र उभं राहिलं की तिची मुलं बिघडतात आहे. तेव्हा तिनं त्यावर विचार केला. विचार केला की या बिघडण्यावर आळा कसा घालावा. विचाराअंती तिला समजलं की आपण मुलांना विचारात न घेता माणसांशी कामासाठी बोलणे केले. त्याचा परिणाम हा झाला की आपली मोठी होत असलेली मुलं बिघडत चालली. आपण चांगले कर्म केले. परंतू आपल्या कर्माचा परिणाम मोठ्या होत असलेल्या मुलांवर झाला. ती बिघडली. आता मुलं मोठी झालेली आहेत. तेव्हा आपण सुधरायला हवं. आपण आता कोणत्याच माणसांशी बोलू नये आजपासून. तसा विचार आला होता तिला. त्यानंतर मुलांसाठी का असेना, तिनं आपलं मुक्त स्वातंत्र्य गोठवलं.
माणूस पुर्वी झाडावर राहात असे. तो माकड रुपात होता. या झाडावरून त्या झाडावर उड्या मारायचा. केव्हाही झोपेतून उठायचा. केव्हाही झोपायचा. केव्हाही जेवायचा आणि केव्हाही प्रसाधन करायचा. त्याचे काहीच नियम नव्हते. परंतू तो जेव्हा झाडावरून खाली आला, तेव्हा त्यानं काही नियम बनवले. कारण त्याला त्या नियमांची गरज पडली. मग पुढे शाळेचीही गरज पडली. त्यातच शाळेसाठी काही नियम ठरविण्यात आले. त्यालाच शालेय दृष्टीकोणातून शिस्त म्हटलं गेलं.
शाळेची शिस्त. शाळेची शिस्त राखायलाच हवी. कारण ती शिस्त जर राखली गेली नाही तर शाळा ही शाळा उरणार नाही. तिची अवस्था एखाद्या स्मशानागत होईल.
अलीकडील काळात शाळेतील मुलं शिस्तीत वागत असतात. ती मुलं ड्रेस कोडचा पोशाख घालत असतात. त्यात व्यवस्थीत टाॅय बांधत असतात. प्रेसचे कपडे घालत असतात. चांगले स्वच्छ कपडे घालत असतात. परंतू काही काही मुलं अलीकडील काळात बिघडत चालली आहेत. मुलं शिस्तीने वागत नाहीत. शाळेला पोषक असलेल्या गोष्टी मुलं करीत नाहीत. जसे. चांगली वागणूक ठेवणे. यात दररोज घालत असलेले पोशाख न घालता चित्रविचित्र पोशाख घालणे. तसेच अभ्यास न करणे. वात्रट सारखं वागणे. मुलींना टाँगटिंग करणे. मारापीटी करणे.
महत्वपुर्ण गोष्ट ही की यात मुलं अशी जेव्हा वागायला लागतात. तेव्हा त्यात दोष त्या शाळेतील शिक्षकांचा असू शकतो. ती मुलं बिघडल्यासारखी वागतात. कारण शिक्षक त्या प्रकारचे मार्गदर्शन मुलांना त्यांच्या वागण्यावर करीत नसतात. ते प्रामाणिकपणाने वागायला शिकवीत नसतात.
मुलं जेव्हा तरुण होतात. ते त्यांचं बिघडण्याचं वय असतं. या काळात मुलांना त्यांच्या तरुण वयाचं आकर्षण असतं. त्यावेळेस त्यांना इतर मुलं ही अधिक आवडत असतात. ती मुलं वयात आली की प्रेम करायला लागतात. त्यामुळंच शिस्त बिघडत असते. या अवस्थेत अशी मुलं साध्या केसभुषेतूनही बिघडत आहे हे लक्षात येतं. जशी भांगाची वेगवेगळी केससज्जा वापरणे. यात मुली कपाळावर केसाचा फुगा काढतात तर मुलं डोक्याच्या मध्यभागात केसांचा कोंबड्यासारखा तुरा ठेवतात. त्यानंतर त्यांचे कपडेही स्टाॅयलिशच असतात. कपड्यांचा विचार केल्यास कधी कधी शाळा आहे असा विसर पडतो त्यांना. ते हापपँटवरुन पँटवर येतात. कधी कधी रंगीबेरंगी कपडे घालून येतात. पायातही ड्रेसकोडचा बूट वा साधी चप्पल घालण्याऐवजी स्टाॅयलिश बूट तोही वेगवेगळ्या स्वरुपाचा घालत असतात. यातही समजा शाळेत शिक्षक रागावतात. म्हणून ही मुलं शाळा सुटल्यावर शाळेच्या बाहेर जावून शाळेचा ड्रेस उतरवून रंगीत कपडे परिधान करतात. त्यावेळी त्यांचा उद्देश असतो शाळेतील मुलींना आकर्षीत करणे.
शाळेतील अशी मुलं........या मुलांना वेळीच सावध केलं नाही तर ही मुलं अल्प व परिपक्व न झालेल्या अवस्थेला समजून न घेता त्याच काळात पळून जातात अगदीच शिकायच्या व उमेदीच्या वयात. तसं पळून जातांना ते मायबापांनाही सांगत नाहीत. असं पळून गेल्यावर ते संसारात पडतात. परंतू असं संसारात पडल्यावर जसजसे दिवसं जातात ना. तसतसा त्यांना बारा आण्याचा भाव समजतो व प्रसंगी तो भाव समजल्यावर अशी मुलं अशा संसारचक्रातून विभक्त होतात नव्हे तर व्हायला पाहतात. यामध्ये मुलं सुटतात. कारण त्यांना मूल वेठीस धरत नाही वा मुलांची पाहिजे त्या प्रमाणात जबाबदारी नसते. त्यामुळं त्यांचं काहीच नुकसान होत नाही. परंतू मुलीचं अतोनात नुकसान होत असतं. त्या मुली अशा पळून गेल्यावर आणि संसारात रमल्यावर गरोदर होतात. मुलांना जन्म देतात. त्यानंतर मुलांच्या संगोपनाची त्यांच्यावर जबाबदारी असते. त्यांना असलेली ती मुलं त्या टाकून जावू शकत नाहीत. मग आत्महत्येचे विचार येतात. परंतू तेही करता येत नाही. कारण मुलांची जबाबदारी. काही आत्महत्या करतात. मुलांना मारुन. काही आत्महत्या करतात मुलं नसतांना. कारण त्यावेळी त्यांना आधार द्यायला कोणीही नसतात. मायबाप तर नाहीच नाही.
शाळेत शिस्त असावी. शाळेत शिस्त नसेल तर बरीच मुलं बिघडू शकतात यात शंका नाही. तसेच ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट की ज्याअंशी शाळेत शिस्त असते. तेथील मुलंही बिघडत असतात. मग जिथं शिस्त नसेल, तेथील मुलं किती बिघडतील.
महत्वाचं सांगायचं म्हणजे शाळेत शिस्त असावी. शिस्त असल्याशिवाय शाळा व्यवस्थीत चालत नाही आणि शाळा व्यवस्थीत चालविल्याशिवाय शिस्तही लागत नाही. ह्या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याचे दोन भाग आहेत. म्हणून शिस्त लावणे महत्वाचे व शाळेची शिस्त ही राखायलाच हवी. त्याशिवाय मुलांमध्ये संस्काराचं बीजारोपण करता येणार नाही. विद्यार्थ्यांत संस्कार फुलवता येणार नाही. तसेच त्याशिवाय अल्प काळात मुलांच्या पळून जाण्यावरही बंदी घालता येणार नाही आणि त्यांच्या आत्महत्याही थांबवता येणार नाही. खरं तर आपण अशी शिस्त प्रत्येक शाळेत ठेवणं गरजेचं आहे. त्याशिवाय शाळेला शाळा असं नामाभिमान देता येणार नाही. हे तेवढंच खरं.
राधेची मुलं सुधारली नाहीत. कारण आता वेळ निघून गेली होती. ती मोठी झाली होती आपल्या आईला व्याभीचारी समजत समजत. मुलगा तर सर्रासपणे आईसमोरच मुली फिरवीत होता आणि मुलीनं तर आपलं जीवनच उध्वस्त केलं होतं अगदी अल्प वयात. तिनं अगदी अल्प वयात पळून जावून विवाह केला होता. मुलगाही अगदीच अल्प वयात नशेच्या आहारी गेला होता.

************************************************

राधाची ती बिघडलेली मुलं. राधाची ती बिघडलेली मुलं. राधा एक शिक्षीका. संस्कार करणारी महिला. परंतू त्या राधेनं कामासाठी मदत घेतल्यानं व तसे मनमोकळेपणानं वागण्यानं कुसंस्कार फुलले होते तिच्या बाळात. त्यात तिचा दोष नव्हता तर तिच्या प्रारब्धाचा दोष होता. तिनं व्याभीचार केलाही नव्हता. परंतू तिच्यावर तसा दोष लादून ते लांच्छन जाणूनबुजून लावलं गेलं तिच्यावर. ती पुरुषांशी मदत घेणं तिची मजबूरी होती. तिला पती नव्हता. एक पती मरण पावल्यावर दुसरा केला. परंतू तोही काही फार काळ टिकला नाही. त्यानंतर तिनं तिसरा पती त्याच शंकेनं केला नाही तर तो पती न करता ती आपली कामं करीत राहिली. जी कामं केवळ एकट्या स्रीजातीनं करणं अवघड होती. राहिली इतर माणसांकडून कामं करुन घेण्याची शंका. मुलं समजायची की आई अशी पुरुषांचीच मदत का घेत असेल कामासाठी. स्त्रियांची मदत का घेत नसेल. परंतू ती लहान होती. त्यांना त्या गोष्टी कळत नव्हत्या. पुरुषांची कामं पुरुषच करु शकतात. स्री नाही हे लहानग्या वयात त्यांना माहीत नव्हतं. त्यामुळंच जे कृत्य तिची मुलं पाहात होती नव्हे तर त्यापासून नवा बोध घेत होती. त्यांनी त्या तिच्या वागण्याच्या कृत्यापासून सुधारण्याऐवजी ती बिघडली होती.
आज ती मुलं बिघडत चालली नव्हती तर बिघडलीच होती. त्यातच आज तिला पश्चाताप वाटत होता नव्हे तर ती त्या प्रारब्धावर रडत होती. आज ती पश्चाताप करीत होती. परंतू आज तिला पश्चाताप करुन काही उपयोग नव्हता. ती मुलं. त्या मुलांचं नाव गोविंद आणि विणा होतं.
विणानं आपल्या आईचं पाहून अगदीच अल्प वयात केलेला विवाह. त्यातच काही दिवस बरे गेले. परंतू काही दिवस जाताच विणाच्या पतीनं तिच्यावर अत्याचार करणं सुरु केलं. तो घरात वेगवेगळी माणसं आणत असे.
ती माणसं.......ती माणसं काही चांगल्या स्वभावाची नव्हती. ती माणसं सुरुवातीस चांगली वाटत होती. परंतू काही दिवसानं त्यांचा रंग दिसला. ती माणसं दारु प्यायची व त्यालाही पाजायची. तो मात्र तिला त्या माणसांसमोर राबवायचा. पाणी आणायला लावायचा. नाश्ता द्यायला लावायचा. त्याचा भयंकर राग यायचा तिला. तशी ती माणसं गेली की ती त्याला जेव्हा असं करु नये म्हणून समजंवायची. तेव्हा तो भयंकर मारायचा. कुठेही मारायचा आणि ती त्याचा मार सहन करायची.
राधा चांगली होती. चांगल्या स्वभावाची होती. तिनं दोन पती केले होते. त्यानंतर मदतही घेतली परपुरुषांची आपल्या दैनंदिन कामासाठी. परंतू तिनं त्यांचेसोबत व्याभीचार केला नाही. एखाद्या सती सावित्रीसारखी वागली ती. मग तिची मुलं, तिच्यावर कोणतीही शंका घेवो. त्यानंतर तिच्या मुलांना शंका आल्यावर व ती वात्रटसारखी वागायला लागल्यावर तिनं आपल्या मुलांना एक दिवस समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतू मुलांनी तिचं काहीएक ऐकून घेतलं नाही व समजावूनही घेतलं नाही.
विणाला मुळात सुख नव्हतंच. तिच्या प्रेमाचा पती हा कामालाही जात नव्हता. अशातच तिला एक पुत्ररत्न प्राप्त झालं होतं. ती मुलगी होती. त्या पुत्रीचीही आबाळ होत होती. विणा कामालाही निघाली असती. परंतू तिचं ते मूल लहान होतं.
घरची उपासमार व त्या परीवाराची होत असलेली आबाळ पाहून दारुच्या व नशेच्या आहारी गेलेल्या तिच्या पतीनं एक दिवस आपल्या मित्राकडून दारु पिवून व पैसे घेवून तिच्या कम-यात पाठवलं. तसं तिच्या ते लक्षात आलं व तिनं त्या मित्राचा प्रतिकार केला व त्याच्या त्या मित्राला कम-याच्या बाहेर काढलं. ती गोष्ट लक्षात येताच व त्याला आपल्या पतीनं पाठवल्याचं लक्षात येताच ती चिडली. तिला तिचा भूतकाळ आठवला. तिची आई सांगत असलेल्या सा-या गोष्टी आठवल्या. त्यातच आपल्या आईनं आपल्या दारुड्या बापाला का सोडलं असावं तेही लक्षात आलं. तेच संस्कार होते तिच्या आईनं तिला सांगीतलेले आणि हेही लक्षात आलं की आपण उगाचंच आपल्या आईला दुषणं दिलीत. आई आईच असते असं जाणवलं. आपण भविष्यात फार मोठी चुक केली तेही लक्षात आलं. मग पश्चातापाचा सूर गवसला. त्यातच तिला रडूही कोसळलं. आता तिला वाटायला लागलं की आपल्या आईला भेटावं. तिची माफी मागावी.
तो दिवस.....तिनं त्या दिवशी तिच्या पतीनं तिच्या कम-यात पाठवलेल्या तिच्या पतीच्या वात्रट वागण्याचा प्रतिकार केला. परंतू त्यानंतर ते प्रकरण विरले नाही. दुस-या दिवशी सायंकाळीही पुन्हा तेच घडलं. यावेळेस मात्र तिला प्रतिकार करता आला नाही व ती आता तिच्याच पतीमुळं पाशवी अत्याचाराची शिकार बनली.
ती पश्चाताप करीत होती. तिला आईच्या घरी जावंसं वाटत होतं. परंतू कसं जाणार. कोणत्या तोंडानं जाणार. आपली आई काय म्हणणार. आपण तर पळून आलोय.
तिला तिचाच विचार येत होता. काय करावं सुचत नव्हतं. आता तर रोजच अत्याचार होत होता. सहन न होणारा. जीवन जगणं असह्य झालं होतं. जणू त्यानं तिला वेश्याच बनवून ठेवलं होतं.
ती त्या पतीच्या जोखडातून बाहेर पडू पाहात होती. परंतू तिला तसं बाहेरही आता पडता येत नव्हतं. हा आईचे न ऐकल्याचा परिणाम होता. ज्या आईवर तिनं लांच्छन लावलं होतं. त्या आईचं पाप लागल्यागत घडत होतं.
आई महान असते. प्रत्येकाची आई महान, तेवढीच महत्वाची असते. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. आई म्हटलं तर आई या शब्दातच महान अर्थ दडलेला आहे. आ म्हणजे आधार देणारी व ई म्हणजे ईमानदारी शिकविणारी.
आ चा अर्थ आधार देणे असा लावल्यास खरंच आई आधार देते का? असा प्रश्न पडतो. त्याचं उत्तर होय असंच आहे. आई ही आपल्या बाळाला बापापेक्षा जास्त प्रमाणात आधार देत असते. ती सर्वप्रथम आपल्या बाळाला स्वगर्भात नऊ महिने ठेवते. अन्न पाणी पुरवते. त्याचं नवही महिने संरक्षण करते. त्याला त्रास होवू देत नाही. चांगलं संगोपन करते. त्यानंतर ते बाळ जेव्हा गर्भातून बाहेर पडतं. तेव्हा मात्र तिच आई उन्हातून सावलीत नेल्यागत त्याचं गर्भाबाहेरही संगोपन करते. अगदी त्याचा विवाह होईपर्यंत. एवढंच नाही तर विवाह झाल्यानंतरही ती जेव्हापर्यंत आपले डोळे मिटत नाही. तेव्हापर्यंत आपली आई आपल्याला सांभाळून घेत असते. मग आपल्या कितीही मोठ्या चुका असल्या तरी आपली आई त्या पदरात घेवून आपल्याला माफ करते. हा झाला आधाराचा विषय. आता ई चा विषय. ई या विषयानुसार प्रत्येकच आई ही प्रत्येकाला ईमानदारी शिकवीत असते नव्हे ती ईमानदारीने जगायला लावते.
आपण कितवंही तिचं मुल असलो तरी ती आपल्याला वाढवितांना भेदभाव करीत नाही. ती सर्वांनाच प्रेमानं वाढवते आणि आपली आई जेव्हा जन्म देते ना. तेव्हा तिच्या मनात राग नसतोच आपल्या जन्माबद्दल. आपण तिचं कितवंही मुल असलो तरी. प्रचंड आनंद असतो. त्या आनंदासाठीच ती अतिशय वेदना सहन करते प्रसववेळी आणि आपल्याला जन्म देत असते.
आई आपल्याला आधार देते एखाद्या वृक्षाच्या बुंध्यासारखी. बदल्यात आपण तिला काय देतो. आपण तिला राग द्वेषाची शिकार बनवतो. आपण तरुण झालो की आपल्या वागण्यात प्रचंड चीड निर्माण होते. वाटतं की आपल्या आईनं आपल्याला जन्माला घालून फार मोठी चूक केली. अशावेळेला आपल्या घरात आलेली व जिची ओळख नव्हती, ती मुलगी आपल्याला सर्वस्व वाटायला लागते. मग तिनं जर म्हटलं की तुमची आई जास्त वटवट करते, तिला वृद्धाश्रमात टाकतो नव्हे तर आपण आपल्याच आईला तिचे सर्व उपकार विसरून वृद्धाश्रमात टाकायला तयार होतो. ही आपली वास्तविकता होय. आपण मानावं की आपली पत्नी आपले सर्वस्व आहे. आपल्या आईनंतर तिच जगण्याचं साधन आहे. आपल्याला जीवनात जगण्यासाठी व आपल्या जीवनात विरंगुळा आणण्यासाठी आपली पत्नी आपली माता बनून आपल्या जीवनात बहार आणत असते. याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या आईला आपल्या पत्नीच्या म्हणण्यानुसार वृद्धाश्रमात टाकावे. आपण आपल्या पत्नीच्या म्हणण्यानुसार तिला वृद्धाश्रमात टाकूच नये.
आपली आई ही आपली आई असते. इतरांच्या मातेला कितीही आपण आई म्हटलं आणि कितीही तिच्यावर प्रेम केलं तरी ती आपली आई होवूच शकत नाही. ती कधी ना कधी रंग दाखवतेच. कधी एखाद्या वेळी महाभयंकर संकट आपल्यावर आलं की आपल्या आईला जेवढे दुःख होईल, तेवढे दुःख मानलेल्या आईला होणार नाही. तसंच कोणालाही कोणतीही आई विकत मिळूच शकत नाही. सर्वकाही मिळू शकेल.
आपल्या आईला ईमानदारी आवडते. तसंच कोणत्याही आईला तिचा मुलगा चोर वा गुंडा बनावा असं वाटत नाही. तिचा मुलगा जर असा गुंडा वा चोर बनला तर तिला भयंकर राग येतो. तसंच जर तिचा मुलगा चोर वा गुंडा बनलाच तर तिला जे दुःख होतं. ते दुःख ती विषद करु शकत नाही वा तिला ते दुःख व्यक्त करता येत नाही. याचाच अर्थ असा की आपल्या ब-यावाईट वागण्यावर आपल्या आईचं दुःख वा सुख अवलंबून असतं. मग असं जर आहे तर तिला आपण दुःख का द्यावं? तिचे उपचार असतात आपल्यावर. मग तिला वृद्धाश्रमात का टाकावं? आपल्याला आई जर आवडते, मग आपण गुंड वा चोर का बनावं?
आपली आई आपल्याला जगवते. मग ती प्रसंगी आपल्याला जगविण्यासाठी कोणतंही काम करते. याचा अर्थ असा नाही की ती व्याभीचार करते. ती आपल्याला चोर, बदमाश बनवते? ती आपल्याला योग्य वळण लावत नाही. ती आपल्याला जगविण्यासाठी प्रसंगी चोर, बदमाश बनूही शकते कदाचीत. परंतू ती आपल्याला चोर, बदमाश बनायला शिकवीत नाही. असे असतांना आपण तिच्यापासून चांगला बोध घ्यावा. आपल्या स्वतःत संस्काराचं बीजारोपण करावं. आपल्या आईच्या इच्छा पुर्ण कराव्यात. ती आपल्याला आधार देते लहानपणापासूनच. आपल्यासाठीच कर्तव्य करते. मग आपणही तिच्या कर्तव्याचे देणे लागतो. आपण तिला त्रास देवू नये. तिला वृद्धाश्रमात टाकू नये. तिला वृद्धापकाळी आधार द्यावा. तिच्याकडून ईमानदारी शिकावी व आपलं स्वतःचं कल्याण करुन घ्यावं. हं, पत्नीची गोष्ट अवश्य मानावी. जी आईविरोधी नसेल. जर आपली पत्नी आपल्या आईच्या विरोधात गोष्ट करीत असेल तर त्या गोष्टी ऐकू नये. तिला समजावून सांगावे. यातच तुमचं भलं आहे. तसंच पत्नी बनणा-या महिलेनंही एक गोष्ट लक्षात घ्यावी. ती म्हणजे आपला पती जर आपल्या आईबापाचा उद्धार करीत असेल तर ते ऐकू नये. कारण आपले मायबाप व आपल्या पतीचे मायबाप देवच असतात. त्या दोघांमिळून आपला संसार बनत असतो. तसेच आपला संसार फुलत असतो.
महत्वाचं सांगायचं म्हणजे आपली आई महान असते शिवरायांना घडविणारी. आईनंही तसंच सांगायला हवं की संपुर्ण हिंदवी स्वराज्य निर्माण होईल. याचा अर्थ असा की आईनंही बाळाच्याही कल्याणाचा विचार करावा. तसं ती करतेच. तसंच त्या बाळानंही तिचं जीवन उध्वस्त करण्याचा विचार करु नये.
आज आपल्याला घराघरात पाहायला मिळत असतं सासू सुनेचं भांडण. का होतं? कारण प्रत्येक जण स्वतःला थोर समजतं. सासूला वाटते की मी महान आहे. कारण मी जन्म दिला माझ्या मुलाला व मी लहानाचं मोठं केलं. मग मुलानं माझंच ऐकावं. परंतू मुलगा जेव्हा ऐकत नाही. तेव्हा भ्रमनिरास होतो, निराशा येते व भांडण होतं. कारण मुलगा घरात येणा-या नव्या नवरीचं म्हणजे पत्नीचं ऐकत असतो. तसंच पत्नीलाही वाटत असते की तिच्या पतीनं तिचंच ऐकावं. कारण ती त्याला सांभाळणार आहे शेवटपर्यंत. तिनं त्याला सर्वस्व बहाल केलं आहे. एखाद्या पुरस्कारासारखं. ते पती असलेला व्यक्ती जेव्हा ऐकत नाही. तेव्हाही भ्रमनिरास होते पत्नी. पदरी निराशाच येते. मग सूर निघतो. कशाला केलं लग्न? आपल्या आईलाच ठेवायला हवं होतं. अशावेळेस भांडण होतं. ते भांडण विकोपाला जातं. त्यातूनच घटस्फोटाची प्रकरणं उभी राहतात, मुलगा जर आईचं ऐकत असेल तर. नाही तर आई वृद्धाश्रमात जाते मुलगा जर पत्नीचं ऐकत असेल तर. सर्व इगोचा प्रश्न. माझंच ऐका. मलाच मोठं स्थान द्या म्हणून भांडण. यात सासू आणि सून एकाच नाण्याच्या दोन बाजू. दोघांनीही एकमेकांशी जुळवून घ्यायला हवं. परंतू तसं होत नाही. म्हणून वाद येतो.
विशेष सांगायचं म्हणजे घरात येणा-या सुनंनं आपण मोठे असल्याचा आव आणू नये व त्यावरुन त्यानुसार भांडण करु नये. तिनं हे लक्षात घ्यावं की आपणही उद्या सासू बनू. तेव्हा परमेश्वर आपल्याकडून असाच बदला घेईल. कारण जशास तसं ही आजची पद्धत आहे. जी परमेशालाही आवडते. तो तसाच निकाल देतो याबाबत बरीच प्रकरणं घडली आहेत. आज इथंच करावं लागतं आणि इथंच भरावं लागतं. तसंच सासूनंही लक्षात घ्यावं की आपल्याला आता म्हातारपण येणार. आपले हालहाल होणार. त्यात आपली सूनच आपल्याला सांभाळणार. तेव्हा आपण जास्त वटवट करु नये. म्हातारपण चांगलं जायला हवं. असा जेव्हा विचार सर्वजण करतील. तेव्हाच सासू सुनाचे नातेपण टिकेल. वाद होणार नाहीत व आईपणालाही तेवढीच किंमत येईल. प्रत्येकाची आई महान असते आणि तेवढीच महत्वाचीही. तसःच पत्नीही महान असते आणि तेवढीच महत्वाची हे तेवढंच खरं.
आई आई होती. तिच्या कर्तृत्वाचा पश्चाताप आता विणाला होत होता. परंतू आता पश्चाताप करुन काही उपयोग नव्हता.
विणा सारखी ती चिंतेत राहात असे. तिला सतत वाटत होतं की या जोखडातून निघावं. ती निघालीही असती. परंतू तिला एक लेकरु होतं. त्यामुळं तिला मर्यादा होत्या व बंधनही होतं. ती संधीचीच वाट पाहात होती. तशी एक दिवस तिला संधी चालून आली. त्या दिवशी तिचा पती घरी नव्हता. संधी मिळताच ती घराच्या बाहेर पडली. ती रस्त्यावर आली. त्याचबरोबर ती तो रस्ता चालू लागली.
तो भयाण रस्ता. त्या रस्त्यानं जातांना तिला काही सुचत नव्हतं. कुठं जावू तेही समजत नव्हतं. कारण ना त्या शहरात तिचे नातेवाईक होते ना कोणी ओळखत होतं तिला. ना तिच्या कोणी ओळखीचे. शिवाय भीती होती की जर आपण आपल्या पतीला दिसलो तर.......तर आपला पती आपल्याला घेवून जाणार व त्यानंतर आपण कधीच मरेपर्यंत त्याच्या जोखडातून बाहेर पडणार नाही.
भर उन्हाळ्याचे ते दिवस. विणा चालत होती ती वाट. तिला ते उन्हाचे चटके झोंबत होते. पायात चप्पलही नव्हती तिच्या. पाय भाजत होते. जवळ पैसाही नव्हता. त्यातच ती जीव मुठीत घेवून जिकडे पाय जातील, तिकडे चालत होती. तिचं काहीच ठरलं नव्हतं कुठे जायचं.
विणा चालत होती ती वाट. तसा तिला विचार आला. जायचं कुठं? आपले तर नातेवाईक नाही या शहरात ना कोणी ओळखत आपल्याला. ना कोणी ओळखीचे. काय करावं सुचत नव्हतं. कुठं जावं तेही सुचत नव्हतं. तसं कडेवरचं तिचं बाळ रडायला लागलं. त्याचबरोबर ती एका झाडाच्या सावलीत बसली. तिनं त्याला दूध पाजलं. परंतू ते बाळही दूध घेईना. कारण तिच्यात दूधच नव्हतं. दूध पाजण्याचं त्राण नव्हतं.
ती फार थकलेली होती. तिच्यात चालण्याचं त्राणही नव्हतं. ती फार चालली असल्यानं तिला फारच भूक लागली होती आणि तहानही. तसा ती विचार करीत होती. डोक्याला ताण देत होती. जावं कुठं?
क्षणात विचार करता करता तिला तिच्या आईचं घर आठवलं. आपण आपल्या आईच्या घरी जावं. परंतू विचार आला की आपण आपल्या आईच्या घरी जावं तरी कसं? आपली आई काय म्हणणार? आपण तर पळून आलोय? आपल्याला आपली आई येवू देईल काय? स्विकारेल का आपल्याला? वैगेरे प्रश्न तिच्या मनात आले होते. तशी तिला भूक फारच लागली असल्यानं ती एका दुकानात गेली.
ते दुकान...... भूक फारच लागली असल्यानं तिनं त्या दुकानात खायचं मागायचं ठरवलं. तशी लाज फारच वाटत होती. परंतू तरीही त्या दुकानात तिनं काही खायला मागीतलं. तसं काखेत तिचं लहान बाळही होतं. तिनं खायला मागताच तो दुकानदार म्हणाला,
"निंग येथून. चांगली हट्टीकट्टी दिसतेस. अन् आली मागाले."
ते शब्द...... ते शब्द जहरासमान भासत होते. परंतू उपाय नव्हता. तिच्या पोटात कावळे ओरडत असल्यानं तिनं त्या दुकानदारासमोर हातच पसरलेले होते. तशी ती म्हणाली,
"बाबू, थोडसं दे खायला. लेकरु रडतंय."
ती एका शिक्षीकेची मुलगी. तिच्या घरी काही कमी नव्हतं. तरीही तिची ही अवस्था. ती विचार करण्यालायक गोष्ट होती. परंतू यात कोण सांगणार. तिथं संस्काराची कमी होती. विणानं दुकानदाराला गयावया केला. त्यातच तशी तिची केविलवाणी अवस्था पाहून दुकानदाराला तिची दया आली. तसं त्यानं तिला भाकरीचा तुकडा दिला.
तो भाकरीचा तुकडा. ती त्या भुकेपुढं तो तुकडा कमी पडला. ते चित्र तो दुकानदार पाहातच होता. तो स्वभावानं चांगला होता. तशी त्यानं तिची भूक पाहून आणखी तिला भाकर दिली व विचारलं,
"अगं, तू तं जवान हायेस. अशी भीक का मांगतेस?"
ते शब्द. तसं तिच्या डोळ्यातून अश्रू आलेत. तशी ती आपली कर्मकहाणी त्या दुकानदाराला सांगू लागली. त्यातच शेवटी ती म्हणाली,
"मी फार मोठी चूक केली. आता मला माझ्या आईची माफी मागाविशी वाटते. तिच्या घरीही जावंसं वाटते. परंतू भीती वाटते की आई काय म्हणणार."
''का? ती तुझीच आई आहे ना?"
"होय, ती माझीच आई. का बरं?"
"तुझीच आई ना. मग भीती कशाची? अगं, आई बाळाच्या सर्व चुका माफ करते. तिही मोठ्यात मोठी. तिलाच आई म्हणतात. तू जा आपल्या आईच्या घरी अगदी निःसंकोच होवून. सांग कुठं आहे तुझं घर?"
तिनं घराचा पत्ता सांगीतला. तसा तो म्हणाला,
"तुझं घर तर फार लांब. मी तुला एकटीला जावू देणार नाही. मला काहीही समज तू. घाबरु नकोस. मीच तुला पोहचवून देणार."
ती भुकेली होती. तशी घायाळही. त्यातच थकलेली. कोणावर विश्वास ठेवावा असं तिला वाटत होतं. तसं पाहता तिला भीतीही वाटत होती तिच्या पतीची. त्यापेक्षा या दुकानदारावर विश्वास ठेवलेला बरा. कारण आपण तरुण. दिवसा ठीक आहे. पण आपण रात्रीला कुठे जाणार? वैगेरे प्रश्न तिच्या मनात येत होते. तसा तिनं होकार दिला. त्यानंतर ती त्यावर काहीच बोलली नाही. तसं त्यानं तिचं जेवन होवू दिलं. त्यानंतर त्यानं तिला गाडीवर बसवलं व तो तिला घेवून तिच्या आईच्या घरी निघाला. थोड्याच वेळात घर आलं. तसे ते आत गेले.
विणानं आत प्रवेश करताच तिला तिची आई दिसली. तिची नजरेला नजर भिडली. तशी विणानं आपली नजर खाली केली होती. तशी आई म्हणाली,
"बाळ, ये. जवळ ये."
आईनं म्हटलेले शब्द. तशी तिची सून म्हणाली,
"घ्या आत. तोंड काळं करुन आल्यावरही."
आईनं त्या सुनेच्या तोंडचे शब्द ऐकले. परंतू ती शांत होती. तसे तिला ते शब्द रोजच ऐकावे लागायचे. आज प्रत्यक्ष ती पुढ्यात होती. त्यामुळं तर तिच्या सुनेला जास्तच ताव आला होता.
ते शब्द जसे तिच्या आईनं ऐकले. तसे ते शब्द त्या दुकानदारानंही. परंतू तोही गप्प होता. त्याला बरं वाटत नव्हतं. काही वेळ तो थांबला. तसा तो परत निघाला. परंतू जाता जाता म्हणाला,
"जर तिला काही आणखी समस्या आलीच तर तिनं त्याला सांगावं आणि विश्वास करावा. आपला समजावं व केव्हाही निःसंकोच यावं समस्येचं निराकरण करायला."
तिनं होकार दिला होता. तसा त्याचा पत्ता व फोन नंबर घेतला व त्याला रवाना केलं आणि ती तो गेल्यावर हुंदका देत आपल्या आईच्या खांद्यावर मान ठेवून रडू लागली.

****************************************

ते उन्हाळ्याचे दिवस होते. ती राधाची सून फारच बोलत होती तिला. त्यातच तिच्या मुलीलाही बोलत होती. त्यामुळं राधेला जगावंसं वाटत नव्हतं. परंतू मरावंसंही वाटत नव्हतं. आता तर तिची मुलगी जवळ आली होती. तिचा मुलगा निव्वळ दारुच पिवून झोपला राहायचा. त्याला कुटूंबाशी काही घेणंदेणं नव्हतं.
राधेची मजबूरी होती की ती तिथं राहात होती. राधा दुसरीकडं आपल्या पेन्शनच्या जोरावर राहायलाही गेली असती. परंतू तिला भीती होती की तिची सून कदाचीत तिच्या मुलाला मारुन टाकेल. एकतर मुलगी पळून कुठं गेली ते तिला माहीत नव्हतं आणि आता मुलगाही. त्यामुळं ती घाबरत होती त्या गोष्टीला. म्हणून ती नाईलाजानं आपल्या सुनेचे बोलणे सहन करीत होती. परंतू त्याला सोडून गेली नाही. तिला आता पेन्शन सुरु होती. तिची सून काही कामाला जात नव्हती. ना तिचा मुलगाही. सगळं कुटूंब तिच्याच पेन्शनवर अवलंबून होतं. तरीही तिला विनाकारणच्या गोष्टी ऐकाव्या लागत.
तिची मुलगी राहायला आली. तेव्हापासून ते तिच्या सुनेचे वात्रट बोलणे राधेसह तिच्या मुलीला म्हणजे विणालाही ऐकावे लागायचे. डोकं खराब व्हायचं. राहावंसं वाटायचं नव्हतं. कारण ते तिचं बोलणं व तिची टाँगटिंग ऐकण्यासारखी नसायची.
एक दिवस विणा व तिच्या भावजंचं कडाक्याचं भांडण झालं होतं. त्याच टाँगटिंगवरुन. तशी ती घरी नसतांना विणा आईला म्हणाली,
"आई, तू तुला तर पेन्शन आहे. तू कशाला राहते यांच्या जवळ?"
"कुठं राहू? "
''आपण वेगळे राहू. तुला तर पेन्शन आहे. तू
चांगली खावून पिवून तू मजेलायक राहू शकतेस. मला तिचं बोलणं सहन होत नाही."
आईनं ते बोलणं ऐकलं. तशी ती म्हणाली,
"नाही बाळ. जर मी याला सोडून गेलीच तर ही तुझी भावजंय तुझ्या भावाला मारुन टाकेल आणि दुसरा विवाह करुन मोकळी होईल. आपलं घरही जाईल आणि तुझा भाऊही."
"मग मीच जाणार तिला सोडून आणि तुलाही."
"कुठं जाणार? त्या नराधमाकडे. ज्यानं तुझा दररोजचा सौदा केला. विचारही केला नाही की तू त्याची पत्नी आहेस. अन् दुसरा विचार हाही नाही आला त्याला की त्याला एक मुलगी आहे."
"परंतू आई, मी तुझ्याकडे तरी केव्हापर्यंत राहू? ती लग्नानंतर कोणतीच मुलगी आपल्या आईकडे जास्त दिवस राहू शकत नाही ना."
"मग कुठे जाणार? "
"बघेन मी."
तिचं ते बोलणं. कुणाच्या तरी हिंमतीवर सुरु होतं.
"नेमकी कुठं जाणार? जरा कल्पना तर सांग. मागेही असंच केलं होतं तू आणि तो तसा निघालाय."
"हो ना आई. परंतू जुवा तर खेळावाच लागतो की नाही स्रीजातीला. तू नाही का खेळलाय जुवा. माझे वडील मरण पावल्यावर तू विवाह केला होता ना दुसरा. परंतू तो चांगला निघाला होता का? नाही ना. अगदी तसाच जुवा खेळणार मी. परंतू आता हुशारीनं खेळणार. त्यावेळेसारखी फसणार नाही मी आता. अन् तुझ्याकडं तरी केव्हापर्यंत राहणार. तू जीवंत राहशील तेव्हापर्यंत ना. तू मरण पावल्यावर राहू देतील का हे लोक आपल्याबरोबर. तेव्हा आपण आपला आधार शोधलेला बरा."
"लेकी आता मला खरं खरं सांग. तो राजबिंडा आहे तरी कोण?"
"आई, तोच तो. ज्यानं मला पहिल्यांदा इथं आणून दिलं. खरं तर त्याची ओळख नव्हतीच माझी. परंतू पहिल्या वेळेस त्यानं मी भुकेली असतांना मला जेवन तर चारलं. परंतू त्यानं मला आणून दिलं इमानदारीनं इथं. तो किती चांगला असेल."
"परंतू पहिल्या भेटीत असा विश्वास ठेवू नये."
"आई, माझी पहिलीच भेट नाही. मी बरेचदा भेटलो त्याला. त्याला पारखलं मी. आणखी काय सांगू. "
"पण बाळ कधी कधी आपले डोळे धोका देतात आपल्याला. म्हणून जरा सांभाळून."
"आई, सांभाळूनच आहे मी आणि पहिल्या वेळेसही अगदी सांभाळूनच होते. परंतू कोणीच काही नशीब धुवून पाहात नाहीत, तसंच माझ्या जीवनाचं झालं. तो मोठा आणाभाका टाकत होता. परंतू त्यानं मला फसवलं. मी फसले. परंतू आता अजून हा शेवटचा डाव खेळून पाहते."
"ठीक आहे. परंतू त्याला माझ्याकडे भेटावयास आणल्यावरच बरं का?"
"ठीक आहे." ती म्हणाली व तेथून ती निघून गेली.
तिचं प्रेम सुरु होतं जोरात. ती बोलत होती त्याचेशी. सुरुवातीस मनोरंजन म्हणून, तर नंतर करमत नव्हतं म्हणून. काही दिवस जाताच तिच्या बोलण्यातून तिचं आणि त्याचं प्रेम निर्माण झालं होतं. ती त्याला आपल्या घरची कहाणी सांगत असे.
तोच दुकानदार आज तिचा मित्र बनला होता. दोघांचंही चांगलंच पटत होतं. ते फिरायलाही जात होते एकमेकांसोबत.
तो दुकानदार. त्याचं नाव राज होतं. राज हा विणेच्या प्रेमात पडला होता. तिलाही तो आवडतच होता. त्यातच त्यानं तिच्या मनात प्रेमाचं भूत शिरवलं होतं. तिच्या मनात प्रेमाचं प्रेमअंकूर फुलवलं होतं.
आईला हेही प्रेम माहीत नव्हतं. परंतू यावेळेस तिला वाटत होतं की आपण हे प्रेम आपल्या आईला माहीत करावं. परंतू तिची हिंमत होत नव्हती. अशावेळेस आईच म्हणाली की तिचं जर त्याचेवर प्रेम असेल तर तिनं त्याला भेटायला बोलवावं. मग ती विचार करेल.
आईचं ते बोलणं. तसं तिनं त्याला फोन लावला. ती म्हणाली,
"माझ्या आईनं बोलावलंय भेटायला. येशील का?"
"होय, येईल." तिकडनं आवाज आला.
आईनं बोलावलंय. त्याच्या मनात विचार होता. तो आतून घाबरला होता. कदाचीत तिची आई त्याला झापणार तर नाही. तरीही हिंमत करुन तो राधेला भेटायला तयार झाला. राज तिच्या आईला भेटायला आला. त्याचा आदरसत्कार तिच्या आईनं चांगला केला व म्हटलं,
"महाशय, हिला एक मुलगीही आहे. तरीही तू विवाह करतोस? काय कारण आहे?"
"माझी एक आई आहे म्हातारी. तिची सेवा हा माझा परमधर्म आहे. मला तिची सेवा करायची आहे. मला वाटते की ही तिची सेवा करु शकेल."
"हे कशावरुन वाटते?"
"माझा विश्वास आहे आणि तुमच्या मुलीनं बरंच भोगलं आहे तुमचं न ऐकता. तिला पश्चाताप होतोय कधीकधी. मी पाहिलं आहे अनुभवलं आहे."
"परंतू तुम्हाला माहीत नाही की ती पळून गेली होती."
"त्याचा परिणाम दिसलाच तिला."
"मग आताच करेल कशावरुन?"
"संस्कार. तुमचे संस्कार."
"संस्कार? याचा अर्थ?"
"अहो, तुम्ही शिक्षीका आहात आणि एका शिक्षकाची मुलं कधी वाह्यात निघू शकतात याचा प्रश्नच उद्भवत नाही. तो शिक्षक घरीच नाही. बाहेर संस्कारच फुलवीत असतो यात शंका नाही."
"माझी दोन्ही मुलं वाईट कशी निघाली? कारण सांगाल का?"
"हे बघा, याचं कारण ऐका. जो शिंपी असतो, त्यांच्या कपड्यांना थिगळच असतं. जो चांभार असतो, त्यांच्या पायात चपला फाटल्याच असतात. ज्यांचं मोठं भोजनालय असतं. तो कधीही शिळंच खात असतो. जो खाती असतो, त्याचं घर गळतच असतं सदैव. आपण शिक्षीका होत्या संस्कार देणा-या. मग आपल्या घरी संस्कार कसा दिसेल? दिसणारच नाही."
"तरीही माझी मुलगी मागतो म्हणता. एकीकडे शिक्षकांच्या मुलात संस्कार नाही राहात असंही समजता अन् दुसरीकडं संस्कार असतो असं मानता. हे कितपत बरोबर आहे."
"मी असं कुठं म्हटलं?"
"मग?"
"उदाहरण दिलं मी. तसं होतं असं नाही म्हटलं. होवू शकते असं म्हटलं. उदाहरणं दिली. परंतू एक सांगू?"
"सांगा."
"तसं पाहता ब-याच शिक्षकांच्या घरी संस्कार दिसतोच. आपणही संस्कारी असालच यात शंका नाही."
"मग माझी मुलं?"
"अं, तो एक अपवाद राहू शकतो."
"याचा अर्थ माझी मुलगी करेल तुमच्या आईची सेवा? असं वाटतंय तुम्हाला?"
"होय. नक्कीच करेल. मला वाटते."
"तुम्हाला तिच्या सर्व गोष्टी माहीत आहेत का?"
"होय."
"तरीही तुम्हाला तिच्याशी विवाह करायचा आहे?"
"होय. फक्त तुमचा आशिर्वाद हवा."
"तर ठीक आहे. तुम्ही जर तिचे सारेच प्राॅब्लेम सांभाळून घ्यायला तयार आहात तर मी तुम्हाला मुलगी द्यायला तयार आहे."
राजनं त्या गोष्टी ऐकल्या. तसा त्यानं पुनर्विवाहही केला. तिनंही त्याची सेवा केली. त्यावेळेस तिची मुलगी लहान होती. तिनं ती मुलगीही त्याच्याच नावावर शाळेत टाकली. त्यांचा सुखी संसार सुरु झाला होता.

************************************************************************************************

विणाचा संसार व्यवस्थीत चालला होता. ती त्याच्या आईचीही सेवा करु लागली होती. परंतू तिच्या भावाचा संसार चांगला नव्हता. तो मात्र आजही दारुच्या नशेत राहायचा. ते पाहून राधा आजही पश्चातापच करीत होती. त्यात संस्काराचा दोष नव्हता. दोष होता तिच्या प्रारब्धाचा. तिच्या प्रारब्धातच तसं लिहिलं होतं.
राधा म्हातारी झाली होती. तिनं आपल्या अख्ख्या जीवनात कुणाचं काही वाईट केलं नव्हतं. परंतू तिचं म्हातारपण तिला वेडावून टाकत होतं.
तिला वाटत होतं की ती निवृत्त झाल्यावर तिचे जीवन सुखात जाईल. परंतू तिचं जीवन सुखकारक नव्हतं. तिच्या पालोपावली काटे होते. जणू गुलाबाला असतात तसे. तिनं संस्कार पेरले होते आपल्या विद्यार्थ्यांत. परंतू तिचा मुलगा चांगल्या विचाराचा न निघाल्यानं तिची आबाळ होत होती.
तिची स्नुषा.......तिची स्नुषा तिला नाना त-हेची बोलणं बोलत होती. तिचे वाभाडे काढत होती. त्यामुळं वाटत होतं की आपण कुठंतरी त्याला सोडून निघून जावं.
एकदाचा तो दिवस. त्या दिवशी अशाच काहीतरी कारणानं तिचं आणि तिच्या स्नुषेचं भांडण झालं. तसं सुनंनं तिला म्हटलं की घरातून निघून जा. त्यातच तिला तिच्या मुलानं मारहाणही केली होती.
तो वैताग.......तो वैताग सहन करण्यासारखा नव्हता. फक्त दोनवेळच्या जेवणासाठी तिला ते सगळं सहन करावं लागत होतं. तसा त्या दिवशी तिनं विचार केला व ठरवलं की आता काहीही झालं तरी आपण या मुलाकडं राहायचं नाही. आपण बाहेर पडायचं. रस्त्यावर राहायचं.
राधा घराच्या बाहेर पडली. ती रस्त्यावर आली. तसं तिनं ठरवलं की आपण या शहरात राहू नये. आपल्याला या शहरात ओळखतात.
राधाचा तो विचार. राधानं तसा विचार करताच तिनं शहर सोडलं. ती आता दुस-या शहरात रवाना झाली. तशी ती दुस-या शहरात जातात तिथं ती भिका-यासारखी रस्त्यावर राहू लागली.
राधा निघून गेली होती घरातून. तिचं जीवन दुःखदायी बनलं होतं. तसं पाहता राधा जरी आधीच्या काळात शिक्षीका असली तरी आज रस्त्यावर राहात होती. तसा तिला तो रस्ता खायला धावत होता. तसा एक दिवस उजळला. त्या देशानं निर्णय घेतला.
त्या देशानं विचार केला होता आणि निर्णय घेतला की आपण आपल्या देशातील भिक्षावृत्ती दूर करावी. तसा देशानं विचार करताच त्यांनी रस्त्यावरील भिकारी पकडणं सुरु केलं. त्याच भिका-यांमध्ये भरपूर लोकं सापडले होते. त्यात एक कलावंतही होता.
कलावंत........त्यानं आपल्या संपूर्ण जीवनात अगली उद्बोधन केलं होतं. तो शाहीर होता पट्टीचा. त्यालाही एक मुलगा होता. परंतू त्याचीही सून चांगली नसल्यानं तिनं त्याला हाकलून दिलं होतं. तोही भीकच मागत होता रस्त्यावर. दुसरी एक महिला होती. तिची मोठी इमारत होती. तिचा मुलगा चांगल्या नोकरीवर होता. परंतू तो मुलगा नोकरीवर गेल्यावर तिची सून तिला भीक मागायला लावत असे. म्हणत असे की तिनं एका दिवशीच्या मजूरीचे पैसे भीकेतून गोळा करावे. त्या पैशाचा आकडाही दिला होता. तो आकडा होता तिनशे रुपये. तेवढे पैसे जर भीकेतून गोळा झाले नाही तर त्या म्हातारीला जेवनच मिळत नव्हतं. अशी तिची दुर्दशा.
काही भिकारी पत्नीच्या अत्याचाराचे शिकारी होते. एक भिकारी सरकारी नोकरी करणारा होता. परंतू पत्नीच्या अत्याचाराला कंटाळून त्यानं नोकरी सोडली होती व तो भिकारी बनला होता. आज त्या भिका-यात ती राधाही होती. जी पूर्वाश्रमीची शिक्षीका होती.
ते भिकारी. त्या भिका-यांना पकडताच सर्वांना त्यांच्या पुर्वाश्रमीचा इतिहास विचारण्यात आला. तो इतिहासच मुळात रक्तरंजीत हैता. सारेच भिकारी रडत रडत सांगत होते. कोणी शरमही बाळगत होते. तसा राधेचा नंबर आला.
राधाला सुरुवातीला सांगायला लाज वाटत होती. तसा एकजण अधिकारी म्हणाला,
"यामध्ये लाज कशाची? ही आपल्यावर घडलेली परिस्थीती. आपण थोडच घडवलं आपलं प्रारब्ध आणि सांगितल्यानंतर मन हलकं होतं म्हणतात."
त्यांनी म्हटलेले शब्द. त्यानुसार ती सांगू लागली आपल्या जीवनाच्या व्यथा.
"मी शिक्षीका. माझी दोन मुलं. मला दोन पतीही झाले. पहिला पती फारच छान होता. परंतू तो दैवात नव्हता व एका अपघात प्रसंगानं तो मरण पावला. त्यावेळी मुलं लहान होती.
मी कोणतंही वाकडं पाऊल उचललं नाही असं मला वाटतंय. परंतू माझं एक चुकलं. माझी मुलं लहान होती. त्या मुलांना आधार हवा. म्हणून मी दुसरा विवाह केला. परंतू तो विवाह मला नुकसानदायक ठरला.
मी विवाह केला खरा आधार म्हणून. परंतू तीच चूक झाली. घोडचूकच समजा. तो पती आधाराचा ठरला नाही. उलट त्यानं मलाच लुटलूट लुटलं. पक्का दारुडा होता तो. तोही नंतर मरण पावला. त्यानंतर मी एकाकी जीवन जगत आले.
मी मुलांवर संस्कार केले. त्यात काहीच कमी पडू दिलं नाही. परंतू माझी मुलं कशी बिघडली ते आजही कळलेलं नाही. मुलगा आहे. परंतू तो दारुतच धुन राहतो. मुलगी आहे. तिही अल्प वयातच पळून गेली होती. परंतू जेव्हा तिथं जिवावरचा प्रसंग बेतला, तेव्हा परत आली होती ती. मागील वर्षीच तिचा दुसरा विवाह केला मी. मग मी मोकळी झाले. सून सारखी झगडतेय. मुलगा काहीच म्हणत नाही. म्हणून सोडलंय घर."
"घर सोडायचं मुख्य कारण?"
"त्या दिवशी कडाक्याचं भांडण झालं होतं. सून म्हणत होती घरातून निघून जा आणि मुलानं मारलं या म्हातारपणात मला व हात धरुन बाहेर काढलं. मग मी कशी राहू? मी निघाले बाहेर. रस्त्यावर आले मी व तुम्ही जेव्हा पकडलं मला. तेव्हा आले मी इथं."
त्या अधिका-यानं तिची कहाणी ऐकली. तो भावूक झाला होता. तसं पाहता ती सर्व भिकारी मंडळी. त्यात बरेचसे वृद्धच होते. कोणी कोणतं कारण सांगत होता. कोणी कोणतं. तशातच त्यांना अधिका-यानं विचारलं की जर त्यांना घरी सोडून दिलं तर, ते जातील का? त्यावर एकच सूर उमटला की त्यांना कुठेही पाठवा. हवं तर मोठ्यात मोठी शिक्षा द्या. परंतू ते पुन्हा काही परत आपल्या मुलांकडे जाणार नाही.
काही वेळ गेला. ते वृद्ध तसेच बसून होते. त्यानंतर त्यांच्याविषयी लिहून घेण्यात आलं. त्यानंतर त्यांची रवानगी एका आश्रमात करण्यात आली. जे वृद्धाश्रम होतं.
तो भिका-यांचा विशेष आश्रम होता नव्हे तर वृद्धाश्रमच. या आश्रमात त्यांना निव्वळ बसण्याचंच काम नव्हतं तर त्यांच्या मनानुसार त्यांना वेगवेगळ्या जिनसा बनवाव्या लागत. त्याचं विशेष प्रशिक्षण दिलं गेलं त्या सर्वांना. या आश्रमात सर्वांसोबत राधेचे दिवस अगदी आनंदात जात होते. या आश्रमात बनणा-या वस्तू या आकर्षक असत व या वस्तूंना परदेशात मोठी मागणी असायची. कारण त्या वस्तू सुबक असायच्या. त्या आश्रमातील सर्वांचे जीवन अगदी आनंदात जात होते. त्यासोबतच राधेचंही जीवन आनंदात जात होते. कुणालाच घरपरीवाराची आठवण येत नव्हती.
ते आश्रम खास त्या भिका-यांसाठीच बनविण्यात आलं होतं. तसं पाहता त्यांच्या सतत काम करण्यातून त्यांचं मनोरंजनही होत असे आणि दिवसाचा वेळ कसा निघून जातो हे कळतही नसे.

*****************************
राधा घरातून निघून जाताच घराला घरपण राहिलेलं नव्हतं. तिचा मुलगा आधीपासूनच पीत असल्यानं घरात आधीच पैसा नव्हता. तसं पाहता राधेच्या पेन्शनवरच अख्ख्या घराची भिस्त होती. त्यातच राधा घरातून निघून गेल्यानं ती भिस्त खचली होती. दोन मुलं होती तिच्या मुलाला. त्या मुलांना अन्न, वस्त्र निवारा देणं गरजेचं होतं. त्यामुळंच कधी न कामाला जाणारी तिची सून कामावर जात होती. आता तिला सासूची आठवण येत होती. कारण सासू असेपर्यंत कधीच तिला कामावर जावे लागले नव्हते. परंतू आता उपाय नव्हता.
राधेचा मुलगा काहीच काम करीत नव्हता. त्यातच तो घरातील भांडे विकून टाकायचा दारुसाठी. त्यामुळं त्याची पत्नी चिंतेत राहायची. आता पुढे अशांशी संसार करुन काय उपयोग म्हणून तिही विभक्त होण्याच्या मार्गावर होती. परंतू बंधन होतं. बंधन म्हणजे तिची मुलं होती. ज्यांच्यासाठी बापाचाही आधार महत्वपुर्ण वाटत होता.
विणा आपल्या संसारात खुश होती. तिचा दुसरा पती चांगला होता. तो तिच्यावर जिवापाड प्रेम करायचा. तिही आपल्या सासूची नित्यनेमानं सेवा करायची. हे कार्य करता करता तिला वेळही मिळत नव्हता. त्यामुळेच ती आपल्या आईकडे आली नव्हती. काही दिवसानं तिची सासू आजारपणानं मरण पावली व तिला मोकळीक मिळाली. तशी तिला एक दिवस तिच्या भावाची आठवण आली. तशी आईही आठवायला लागली.
आपली आई कशी असेल याची चिंता असलेली विणा लवकरच आपल्या पतीला घेवून आपल्या आईला भेटावयास आपल्या नंदकडे रवाना झाली.
ते नंदेचं घर. ननद काही घरी नव्हती. मुलं घरी होते. भाऊही घरी नव्हता आणि आई! आईचा भिंतीवर फोटो लावला होता.
आईचा भिंतीवर फोटो! याचा अर्थ आई मरण पावलेली असणार. परंतू आई जर मरण पावली तर या लोकांनी आपल्याला सांगीतलं का नसेल? तो प्रश्न संभ्रमात टाकणारा होता. तसा थोड्या वेळात तिचा भाऊ आला तोही दारु पिवून. त्याला होशच नव्हता बोलण्याचा. त्यानं बहिणीकड पाहिलं. तसं त्यानं म्हटलं.
"केव्हा आली?"
"मगाशीच."
"वहिणी कुठाय?"
"वहिणी कामाला गेलीच."
"अन् तू?"
"बोलायचं काम नाही. "
ते भावाचं बोलणं. वडील भाऊ. ती तरी कशी बोलणार. तशी सायंकाळ होतच आली होती. तशी तिची वहिणी घरी आली. तिनं हातपाय धुतले.
तिच्या वहिणीचं नाव मिरा होतं. मिरा आत आली. तसं तिनं विणाला पाहिलं. तशी ती म्हणाली,
"केव्हा आली विणाताई?"
"मगाशीच."
"कशा आहात?"
"ठीक आहे." विणाचं बोलणं. तशी विणा परत म्हणाली.
"आणि हा. हा सुधरलाच नाही म्हणावं. "
"हो ना विणाताई. आता सुधरवा आपल्या भावाला. मी तर सांगू सांगू थकले."
"हो का?"
"होय आणि एवढंच नाही, आजकाल हे महाशय घरची भांडीही विकायला लागलेय."
"मग मोठं विपरीत काम आहे तर. " विणा म्हणाली.
"मिरा वहिणी, एक विचारु. "
"विचारा. "
"आई दिसत नाही. कदाचीत गावाला तर गेली नाही कोणत्या?"
"हो गावालाच गेली. यांचं असं वागणं पाहून निघून गेली घरातून. रागात बोलले हे. घरातून निघून जा म्हणून. मग निघून गेल्या त्या. त्यानंतर मी सर्व ठिकाणी शोधलं. परंतू मला मामीजी कुठंच सापडल्या नाही."
"अरे, असं कसं झालं म्हणावं आणि ही गोष्ट आपण साधी मलाही सांगीतली नाही. माझ्यापासून सुद्धा लपवून ठेवली ही गोष्ट."
"यात तुमच्या भावाचा दोष. तुमच्याच भावाला विचारा."
विणा चूप बसली. तसा थोड्या वेळानं तिचा भाऊ उठला. त्याची दारु उतरली होती. त्यानं हातपाय धुतले. मग इकडल्या तिकडल्या गोष्टी केल्या. तशी त्याला संधी पाहून विणा म्हणाली,
"आई कुठाय?"
"मला काय माहीत?"
"म्हणजे?"
"घरातून निघून गेली. कुठं गेली मला काय माहीत?"
"परंतू साधं मला कळवायला हवं होतं, तेही कळवलं नाही?"
"तिला शोधण्याच्या चक्करमुळं विसरलो मी."
"अरे पण कधीतरी."
"आठवण नाही आली."
"कशी येणार. दारुमुळं वेळ तरी मिळतो का?" मधातच मिरा म्हणाली.
ती बोलत होती ते शब्द आणि तो निगरगट्ट ऐकत होता. तशी पाॅलिसी झोडत तिची वहिणी म्हणाली,
"विणाताई, आता जावू द्या. आता ती आहे की नाही जीवंत ते. झाली गोष्ट पार पडली. आता बोलून काय उपयोग. जावू द्या आता. दुस-या गोष्टी काढा."
मिरानं त्यावर पदडा टाकला. तशी तिचीच चूक. परंतू ती स्वतःची चूक कशी मानणार. तसं तिनं म्हणताच विणा चूप बसली.
तो दिवस तसा बोलण्यातच गेला आणि विचार करण्यातही. मात्र आपली आई कुठे असेल याचे विचार विणाला पदोपदी येत होते.
रात्रीला जेवणखावण पार पडलं. मिरानं कसातरी स्वयंपाक केला. तसं ते कुटूंब झोपी गेलं. परंतू विणाला काही बरोबर झोप आली नाही. तिला सारखा आईचाच प्रश्न पडला होता.
सकाळ झाली होती. तशी पाखरं किलबिलायला लागली होती. विणा झोपेतून जागी झाली होती.
ती उठली. तिनं लवकरच प्रातःविधी आटोपला व ती घरी जायला तयार झाली. कारणंही त्याचं तसंच होतं. तिच्या पतीचं दुकान होतं व दुकान जास्त काळ बंद ठेवता येत नव्हतं.
ती लवकरच भावाच्या घरुन रवाना झाली. ती गावी पोहोचली व पुन्हा आपल्या संसारात रमली. परंतू आता तिला सारखा आईचा प्रश्न सतावत होता. तसं पाहता तिच्या आईची तिला सारखी आठवण येत होती. त्यातच तिला आईचा शोध घ्यावा असं वाटत होतं.

****************************

ती राधा त्या आश्रमात काम करीत होती. तिचे दिवस आनंदात जात होते. परंतू एक खंत होती. ती हाकलून लावणा-या मुलांची. तिला वाटत होतं की कोणत्याही मुलानं कोणत्याही आई वा वडीलाला वृद्धापकाळी हाकलून लावू नये. आपले प्रारब्ध चांगले होते की आपल्याला एका वर्षातच चांगले दिवस मिळाले. नाहीतर आपण आजही त्या रस्त्यावर भीकच मागत राहिलो असतो आणि मरतांना प्रचंड वेदनांचा सामना करावा लागला असता आपल्याला.
वृद्धापकाळी कुणाला कोणतीही अडचण भासू नये यावर राधा सतत विचार करायची. सतत विचार करता करता तिला वाटायला लागलं की वृद्ध माणसंही सुखी व्हावीत. त्यांनाही कोणताच त्रास होवू नये. यासाठी कायद्यात प्रावधान आहे. परंतू त्यात विसंगती आहे. म्हणूनच आजची मुलं चक्कं हाकलून देतात आपल्या मायबापाला. आपण असं होवू देवू नये. काय करावं. तसा विचारांती तिला मार्ग सापडला. आपण मुकदमा दायर करायचा सरकारवर. त्या याचिकेत म्हणायचं की सरकारनं म्हाता-या मायबापांना पैसा द्यावा. वृद्धापकाळची पेन्शन म्हणून. ती तर सरकार देतेच. ज्यांचं कोणी नाही त्यांना आणि ज्यांची मुलं आहेत, परंतू कमाई कमी आहे त्यांनाही. परंतू आपली याचिका अशी असावी की जो कोणी मायबापाला वृद्धापकाळी हाकलून देईल. त्या मायबापाला सरकारनं पैसा न देता तो पैसा त्यांच्या मुलांकडून जबरदस्तीनं वसूल करावा. तशाच त्यांना सर्व प्रकारच्या सरकारी सुविधांपासून वंचीत करावे. तसं जर झालं तर जगातील सर्वच मुलं सुधारतील.
तिचं विचार करणं बरोबर होतं. कारण ते विचार तिच्या अंतर्मनातून आले होते. तिला वाटत होतं की अशा मुलांना शिक्षा मिळायलाच हव्यात की जे मायबापाची सेवाच करीत नाहीत.
सरकारी सुविधांच्या लाभापासून वंचीत मायबापांना करावं की त्यांच्या लेकरांना असा तिचा प्रश्न. हा प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण आणि जिव्हाळ्याचा होता.
सरकारी सुविधा.......ह्या सरकारी सुविधा सर्वांनाच मिळत असतात. त्या सुविधा देतांना सरकार विचारच करीत नाही की लोकांचं काय चुकतं. काही सुविधा ह्या मताचे राजकारण करण्यासाठी दिल्या जातात.
सरकारी सुविधा मिळायला हव्या. परंतू कोणाला? ज्याला खरंच गरज आहे त्यांना की गरज नाही त्यांना. आज सर्वच जण, त्यांना गरज नसली तरी सरकारी सुविधांची गरज आहे असं भाषवतात व सरकारी सुविधांचा लाभ घेतात. नेमका गरजू कोण? जे अर्ज करतात ते की जे करीत नाही ते. यात जे अर्ज करतात झोनमध्ये जावून. ते गरजू नसतातच. खरे गरजवंत लोकं ओळखण्यासाठी त्या त्या व्यक्तीच्या घरापर्यंत जावे. म्हणजे लक्षात येईल की तो खरंच गरजू आहे की नाही. तसं पाहता आता सर्वच जण स्वतः गरजू समजून सरकारला अर्ज करीत आहेत.
सरकारनं ह्या सरकारी सुविधा त्या लोकांना द्यायला हव्या. जे अर्ज करीत नाहीत. त्यां सुविधा त्यांना त्यांच्या घरापर्यंत जावून व प्रत्यक्ष शहानिशा करुन द्यायला हव्यात. तसेच त्यांनाही द्यायला हव्यात की जी मुलं आपल्या मायबापाची सेवा करतात.
आज तसा विचार केल्यास मायबापाच्या सेवेची वानवा आहे. कोणीही मायबापाची सेवा करायला पाहात नाही. धजत नाहीत. त्यांना त्रास देत असतात पदोपदी. कोणी कोणी तर त्यांना हाकलूनही देत असतात. त्यातच काहीकाही महाभाग आपल्या मायबापांना वृद्धाश्रमातही टाकत असतात. यात गरीब आणि कमी शिकलेलीच मंडळी नाही तर ब-याच शिकलेल्या मंडळींचाही समावेश होतो. आज ज्या वयात म्हाता-या लोकांना नातवंडासोबत खेळावंसं वाटतं. त्या वयात ती मंडळी नातूसुखापासून वंचीत होतात.
म्हाता-यांनाही वाटतं की आम्हाला आमच्या सुनेच्या हातची चटणी रोटी मिळावी. परंतू ती सून जेव्हा घरात येते. तेव्हा सतत भांडणं होत असतात. अशातच त्यांची रवानगी जेव्हा वृद्धाश्रमात होते. तेव्हा ते वृद्धाश्रम त्यांना एका तुरुंगापेक्षा लहान वाटत नाही.
विशेष गोष्ट अशी की यामध्ये सरकार अशा वृद्धाश्रमात राहणा-या लोकांना पेन्शन म्हणून पैसा देतं. वृद्धाश्रमाला अनुदान देतं. कारण की अशा वृद्धांची व्यवस्थीत सोय व्हावी. बरोबर आहे सरकारचं. वृद्धाश्रमाला हातभार लागावा म्हणून ही सोय. परंतू हे अनुदान वा ही पेन्शन त्या वृद्ध लोकांसाठी ठीक आहे. ज्यांना या जगात कोणीच नाही. ही सुविधा त्या लोकांसाठी नसावी की ज्यांना मुलबाळं आहेत.
महत्वाचं सांगायचं म्हणजे ज्यांना मुलंबाळं आहेत व ज्यांनी आपलं कर्तव्य न करता आपल्या मायबापांना घरातून हाकलून दिले. त्यांच्या मुलांकडून अनुदानाचा हा पैसा व त्यांना देण्यात येणा-या पेन्शनचा पैसा जबरन वसूल करावा. तसंच त्यांना कोणत्याही सुविधांचा लाभही देवू नये. असे जर झाले तर उद्या कोणताच मुलगा वा मुलगी आपल्या मायबापांना वृद्धाश्रमात टाकणार नाही वा मायबाप प्रत्यक्षपणे वृद्धाश्रमात राहायला तयार होणार नाहीत.
आज वृद्धाश्रमाची कैफियत पाहता वृद्धाश्रमाची संख्या वाढत आहे. कारण त्या मुलांनी काहीही केले तरी त्यांना माहीत आहे की त्यांचं कोणीही काही बिघडवत नाही. त्यांनी मायबापांना वृद्धाश्रमात पाठवलं तरी त्यांना कोणीही काही म्हणू शकत नाही. सरकार तर नाहीच नाही. म्हणून ते पाठवतात आपल्या मायबापांना सर्रासपणे वृद्धाश्रमात. परंतू जर यामध्ये ज्यां मुलांनी मायबापांना घरातून हाकलून दिले, त्या मुलांना मिळणा-या सरकारी सुविधा बंद झाल्या आणि त्या मायबापांना मुलांनी हाकलून दिल्यावर जर त्यांना मिळणारी पेन्शनही मुलांच्याच खिशातून वसूल केली गेली तर बरीच मुलं सुधरतील व कोणीही मायबापांना हाकलून देणार नाही. वृद्धाश्रमाचीही संख्या कमी होईल. परंतू सरकारही ते ऐकत नाही व अशा मुलांना देत असलेल्या सुविधाही बंद करीत नाही.
महत्वपुर्ण वस्तुस्थिती ही की मुलांना मायबाप जन्म देतात. उन्हातून सावलीत नेतात. मोठे करतात. ते मायबाप आपले कर्तव्य पुर्ण करतात. परंतू मुलं काय करतात. ते आपले कर्तव्य विसरुन आपल्या मायबापांना घरातून हाकलून देतात. ही वास्तवता आहे. म्हणजेच ज्या काळात मुलांनी मायबापांना आधार द्यायला हवा. त्या काळात मायबापांना आधार मिळत नाही. मुलं मी आणि माझी पत्नी व माझी मुलं असा उद्देश धरुन वागतात.
महत्वाचं सांगायचं म्हणजे आपल्या मायबापांनी आपल्याला वाढवलेलं असून जीवन जगण्यासाठी योग्य बनवलं आहे. तेव्हा आज म्हातारपणी मायबापांना आपल्या मदतीची गरज आहे. आपण त्यांचे काही देणे लागतो. त्यांनी तर आपले कर्तव्य केले काल. आज आपल्याला आपले कर्तव्य पार पाडायचे आहे. सरकारी सुविधा मिळो की न मिळो. कारण आपल्याला त्यांनी लहानाचे मोठे करतेवेळी सरकारी सुविधा पाहिल्या नाहीत. तेव्हा आपणही तसा विचार न करता आपल्या मायबापाची सेवा करावी. जेणेकरुन आपले मायबाप कृतार्थ होतील. जर अशी कृती आजचे पाल्य करणार नाहीत तर उद्या काळ बदलायला वेळ लागणार नाही. उद्या काळ बदलताच सरकारही तसे निर्णय घेतील. जे निर्णय प्रत्येक मुलांच्या नाकातूनच पाणी काढणारे असतील यात शंका नाही. कारण मायबाप देवापरसही मोठे आहेत. त्यांनीच आपल्याला देवधर्म आणि दानवधर्मही शिकवलेत. हे तेवढंच खरं आहे.
आज राधानं तक्रार दाखल केली होती न्यायालयात. तिचं म्हणणं होतं की मायबापांना मुलं पसंत करीत नसतील. त्यांचं पालनपोषण करीत नसतील तर त्या मुलांकडून त्यांच्या पालनपोषणाचा मुआवजा मिळावा. तोही मुलांच्या संपत्तीतूनच. ती केस चालत होती. खटल्याला पैसा लागत होता. तो पैसा ती ज्या वस्तू आश्रमात बनवीत होती. त्या वस्तू विक्रीतून काढत होती.
विणाही आपल्या आईला शोधत फिरत होती. तिला वाटत होतं की तिची आई जीवंतच असेल कुठंतरी. त्यामुळंच ती तिचा कसोशीनं शोध घेत होती. तसा एकदाचा तो दिवस उजळला.
तो एकदाचा दिवस. त्या दिवशी एक दानशूर व्यक्ती त्या ठिकाणी आश्रमात आला. त्यानं तो आश्रम चालविणा-या व्यक्तीची भेट घेतली. तसं त्यानं आपलं प्रयोजन सांगीतलं. सांगीतलं की तो काही वस्तू त्यांना दान देणार आहे. त्यामुळं त्याला त्या आश्रमातील लोकांच्या नावाची अनुक्रमणिका हवी.
त्या आश्रमातील लोकांनी त्या दानशूर व्यक्तीला अनुक्रमणिका दिली. त्यानुसार त्यानं ती अनुक्रमणिका वाचली. तसं त्याचं राधेच्या नावाकडं लक्ष गेलं. तसं त्याला नाव ऐकल्यासारखं वाटलं. परंतू त्याला ते नाव कुठं ऐकलं होतं. ते काही आठवत नव्हतं.
तो दानशूर व्यक्ती. त्या दानशूर व्यक्तीनं आश्रमात वाटायला काही फळं व वस्तू आणल्या होत्या. त्या वस्तू तो नावानुसार वाटत होता. तसं त्या दानशूर माणसाच्या समोर तिचा चेहरा आला व त्यानं तिला ओळखलं. ती शिक्षीका. ज्या शिक्षीकेनं त्याला शिकवलं होतं.
तो त्याचा चेहरा. तो चेहरा बदलला होता. तसा तो बदललेला चेहरा राधाला ओळखायला येत नव्हता. परंतू राधा त्याला ओळखू येत होती.
त्या दानशूर व्यक्तीनं तिला ओळखताच तो म्हणाला,
"मॅडम, मला ओळखलं का तुम्ही?"
त्यानं तिला म्हटलं व तशी ओळख दाखवली. त्यानंतर तिच्या चरणावर तो नतमस्तक झाला. त्यानं तिला ओळखलं व तो तो तिच्या चरणावर नतमस्तक झाला. तसं त्यानं विचारलं,
"मैडम, आपण इथं कसे? आपल्याला मुलबाळ नाही काय?"
"..........." ती चूप होती. तसा तो म्हणाला.
"मैडम, आपण गप्प का? आपण बोलत का नाही? "
तो बोलत होता. परंतू ती गप्प होती. ते पाहून तो म्हणाला,
"मैडम, आपली जागा वृद्धाश्रमात नाही. आम्हा विद्यार्थ्यांच्या शिरस्राणावर आहे. माहीत आहे. आपण शिकवलं, म्हणून आम्हाला हा पैसा आडका कमवता आला. आम्ही जर शिकलो नसतो तर हा पैसाही कुचकामाचा होता आणि महत्वाचं म्हणजे आपण आमच्यावर केलेले संस्कार महत्वपूर्ण आहेत. आपण आम्हाला जे संस्कार शिकवलेत. ते आमच्यासाठी कितीतरी मोठे महत्वाचे आहेत. जर आपण ते संस्कार आमच्यावर केले नसते तर आज जो माझ्याकडं पैसा आहे ना, मग तो पैसा टिकला नसता माझ्याकडं. आता आपणाला एकच विनंती आहे की आपली जागा या वृद्धाश्रमात नाही तर आजपासून ती आमच्या घरी आहेे. माझी विनंती आहे की आपण माझ्या घरी चालावं व फक्त बसूनच राहावं. मी आपणाला बसून पोषणार."
राधानं काय ओळखायचं ते ओळखलं. तशी ती बोलकी झाली. म्हणाली,
"नाही बाळ, तू बोलला तेच पुष्कळ झालं. अरे जिथं आभाळच फाटलं, तिथं थिगळाचं कोणतं काम? मी इथं सुखी आहे. बाळ उठ, उठ पायावरुन उठ."
"मी नाही उठणार. कारण मी तुम्हाला माझ्या घरी नेणारच आहे. तेव्हा आपण माझ्या घरी चालण्यासाठी होकार देईपर्यंत मी आपले पाय सोडणार नाही." तो व्यक्ती अगदी बालिशपणे म्हणत होता.
त्याचं नाव अविनाश होतं. अविनाश हुशार होता. त्याला गतकाळात बाईनं शिकवलं होतं. त्याची लहानपणी शिकायची इच्छा नव्हती. तो रडायचा. शाळेत यायचा नाही. परंतू बाई त्याचा लाड करायची. त्याला समजवायची. हळूच त्याचं आणि बाईचं गुरुशिष्याचं नातं तयार झालं व तो शिकला. हुशार झाला. सगळी बाईचीच कृपा. बाईनं त्याला घडविण्यासाठी घेतलेली मेहनत आज रंगात आली होती. आज बाईनं त्याचेवर संस्कार केले होते. तो संस्कारानं पुढं गेला होता व मोठा व्यक्ती बनला होता.
तिची मुळात इच्छा नव्हती त्याच्या घरी जाण्याची. परंतू तो मागेच लागला होता. तसं वृद्धाश्रम प्रशासन ते गुरुशिष्याचं प्रेेम पाहातच होतं. तसं ते प्रशासन म्हणालं,
"राधा, जावून ये या मुलाच्या घरी चार आठ दिवस. तुझा विरंंगुळाही होईल आणि तुला बरंही वाटेल. मग आहेच जीवनात शेवटपर्यंत वृद्धाश्रम."
राधेला ती गोष्ट पटली. तशी ती तयार झाली. त्याचेकडे जायला. तसं तिनं सांगीतलं वृद्धाश्रम प्रशासनाला की ती लवकरच परत येणार आणि त्यांचेमध्ये रमणार.
ते अविनाशचं घर. ते घर फार मोठं होतं. घरात नोकर चाकर होते. त्याचा विवाह झाला होता. त्याला पत्नी होती. तिही सालस आणि सुंदर होती. तसंच दोन मुलंही होती. तो फार श्रीमंत असावा असं वाटत होतं.
ते दोघंही जण गाडीतून गेले होते. हळूच गेट उघडलं व गाडी आत प्रवेशली. तशी त्यानं गाडी आत घेवून थांबवली. तसा त्यानं आधीच घरी फोन करुन सांगीतलं होतं की काय, ती त्याची पत्नी आणि ती मुलं आरती घेवून तयार होते. जणू आपल्यासोबत त्यानं देेवच आणला आहे व त्याची पुजा ती मंडळी करीत आहे असा भास होत होता.
राधा गाडीतून उतरली. तशी ती आतमध्ये गेली. तसं त्या परीवारात तिचंं स्वागतही केलं गेलं. अविनाश आणि त्याची पत्नीही चांगल्या स्वभावाची असल्यानं तिच्या आगमनानं त्यांच्या मनात आनंद दरवळत होता.
राधा त्या अविनाशकडे राहायला लागली. त्यानंतर ती तेथील वातावरणाशी रुळली. तो आणि त्याचे नोकर तिची चांगली काळजी घेत असत. तिला कशाचीही कमी पडू देत नसत. अविनाश एक मोठा सरकारी ऑफीसर होता. तो चांगल्या हुद्द्यावर होता.

************************************************

राधाची ती केस. तिनं सांगीतलं होतं अविनाशला खटल्याबद्दल. त्यावर त्यानं म्हटलं होतं की पैशाची तिनं काळजी करु नये. तिला जे करायचं, ती ते करु शकते. अगदी मनमोकळेपणानं तिनं राहावं.
ती खटला लढत होती. फैरीच्या फैरी झडत होत्या. तशातच तिची केस बोर्डावर आली व काही दिवसातच ती केस निकाली निघाली.
राधा केस जिंकली होती. सर्वत्र तिचं अभिनंदन होत होतं. कारण तो खटलाच त्या पद्धतीचा होता. न्यायालयानं निकाल दिला होता. न्यायाधीश महोदय म्हणाले,
'सर्व युक्तीवाद लक्षात घेवून न्यायालय या स्तराला पोहोचले आहे आणि निकाल देत आहे की ज्या गोष्टींची गरज आजपर्यंत वाटली नाही. ती गरज श्रीमती राधाच्या रुपानं न्यायालयाला दिसली. तसं पाहता आज काळ बदलला आहे. या बदलत्या काळानुसार सर्वच मुलं मी, माझी पत्नी आणि माझी मुलं असा संसार थाटतात. ते फक्त त्यात मायबापांना सहभागी करीत नाहीत हे या रुपानं न्यायालयाच्या निदर्शनास आले आहे. तसंच हेही निदर्शनास आले आहे की मायबाप मुलांना जन्मास घालतात. लहानाचे मोठे करतात. आपले कर्तव्य बजावतात. त्यानंतर ते थकतात. अशा थकत्या काळात त्यांना प्रचंड आधाराची गरज असते. असंच ते वय असतं. परंतू मुलं काय करतात. मुलं अशा वयात आधार देत नाहीत. ते बिनधास्त जगतात मायबापाविना. मायबापांना एकटेच ठेवून. कोणी विदेशात पळतात तर कोणी देशातल्या दूर अशा कोप-यात. ते मायबापाची सेवा तर करीत नाहीत. उलट ज्यावेळेस मायबाप मरतात व वस्तीतील काही संबंधीत माणसं त्यांना फोन करतात आणि सांगतात की तुमचे मायबाप मरण पावले. त्यावर त्यांचं उत्तर असतं की मयत निपटवून टाका. आम्ही चौदावीला येवू. मग चौदावीही निघून जाते. परंतू कोणीही येत नाही. त्यानंतर त्या म्हाता-यांच्या मालमत्तेचा निकाल असतो. ती लिलावात निघते. तेव्हा त्याबद्दल वर्तमानपत्रात जाहिरात गुंजते. तेव्हा मात्र हीच मंडळी कागदपत्रासह तयार असते. ती गोष्ट त्यांना कशी माहीत होते, ते त्यांनाच माहीत. ही वास्तविकता आहे. त्या मुलांना मायबापाची सेवा करायला लाज वाटते आणि मालमत्ता मिळवायला लाज वाटत नाही.
आज अशीच परिस्थिती निर्माण होत आहे. झालीही आहे. मात्र न्यायालयाच्या ही परिस्थिती लक्षात आली आहे या खटल्याच्या रुपानं. मायबाप अशा वेळेस थकलेले असतात. त्यांना आधाराची गरज असते. वाटल्यास मुलांनी त्यांची सेवा करावी. ते त्यांचे कर्तव्य आहे. परंतू तसे घडत नाही. म्हणून न्यायालय या स्तरावर येवून पोहोचले आहे की प्रत्येक मुलानं आपल्या आईबापाची सेवा करावी. तसं जर कोणी करीत नसेल तर त्यांच्याकडून मायबापांना मोबदला म्हणून काही रक्कम द्यावी वा दरमहा महिना बांधून द्यावा. हा पैसा जबरन वसूल करण्याचा अधिकार न्यायालय स्वतःजवळ ठेवत आहे. त्याचबरोबर न्यायालय हा देखील निकाल देत आहे की जो मुलगा अशी सेवा करीत नसेल वृद्धापकाळी मायबापाची आणि त्यांना वृद्धाश्रमात पाठवत असेल तर त्यांच्या मालमत्तेवरील संपत्तीचा अधिकार नाकारत आहे. त्या संपत्तीवर वृद्धाश्रमाचा अधिकार बसेल. तसंच न्यायालय हाही निकाल देत आहे की जो कोणी मुलगा मायबापांना घरातून हाकलून देत असेल, त्यांची संपुर्ण मालमत्ता ही त्यांची वृद्धापकाळात जो कोणी सेवा करेल, त्यालाच मिळेल. त्यावर त्यांच्या मुलांचा कोणताही अधिकार चालणार नाही. मात्र तसं सेवेचं प्रमाणपत्र सेवा कर्त्यानं न्यायालयात दाखल करावं. तसंच ज्याप्रमाणे आपण अनाथालयातील मुले दत्तक घेतो. तसेच प्रावधान म्हाता-या मंडळींना दत्तक घेण्याचे असेल. लोकं म्हाता-या मंडळींनाही दत्तक घेवू शकतील. वयोवृद्धांची संपत्तीही हस्तांतरीत करतांना काही नियम असतील. त्यांचं जर त्यांची मुलं करीत नसतील तर ती संपत्ती स्व मुलाव्यतिरीक्त ते कोणालाही हस्तांतरीत करु शकतात. हाच न्यायालयाचा सक्त आदेश आहे. That is truth and truth is end. as well as results is end.
न्यायालयानं निकाल दिला होता. तशी ती बाब एक जाहिरात बनली होती. तो निकाल दुस-या दिवशी वर्तमानपत्रात छापून आला. तो निकाल सर्वांनी वाचला. त्यातच तो निकाल तिच्या मुलीनंही. त्या निकालात स्पष्टपणे राधेचं नाव लिहिलं होतं आणि ती राहात असलेलं ठिकाणही. तसं तिनं ओळखलं. ही आईच असू शकते. कारण ती तडफडी आहे. विणानं तो निकाल वाचला. तशी ती त्या पत्त्यावर गेली.
राधाच्या याचिकेवर सुनावणी होवून लागलेला तो निकाल. त्यातच या याचिकेनुसार राधाला भेटायला व तिचा सत्कार करायला काही लोकांची गर्दी होती. कारण निकाल महत्वपुर्ण होता. काही लोकं मात्र त्या याचिकेवर शिव्याही देत होते.
काही लोकं तिला भेटायला येत होते. त्यात राधाची मुलगी विणाही होती. ती भेटायला आली. तिनं आईला ओळखलं. आईनंही तिला ओळखलं. तशी विणा बोलती झाली.
सुरुवातीलाच इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या. त्यानंतर विणा मुख्य मुद्द्याकडे वळली. म्हणाली,
"आई, कशी आहेस?"
"ठीक आहे."
"मी बराच शोध घेतला तुझा. तू निघून गेल्याचे माहीत झाल्यावर."
"हो का."
"होय. परंतू तू गवसली नाहीस. "
"मग आताच."
"आई, आता मी तुला न्यायला आलो आहे. चल माझ्याबरोबर."
"नाही बाळ."
"का बरं?"
"मी इथेच सुखी आहे."
"अगं चल. मी मुलगी नाही का आणि यात माझा काय गुन्हा? तू चल ना माझ्याकडे."
"नाही बाळ, तुझा गुन्हा नाही. परंतू आता मी सुखी आहे ना इथं."
"चल ना गं आई, या पराया माणसाच्या घरी का राहतेस?"
पराया माणूस.....त्या मुलीनं म्हणतात तिच्या आईला विणाचा फारच राग आला. तशी ती म्हणाली,
"पराया माणूस. तू याला पराया माणूस म्हणते. तुला माहीत नाही याचं कर्तव्य. हा पराया का असेना, माझा मुलगा आहे. मुलगी? बेटा, स्व मुलापेक्षा पराया मुलगा मोठा असतो. स्व मुलगा मी पाहिला आहे तुझा भाऊ. तुझा भाऊ कसा आहे माहीत नाही का तुला? त्यानं मला सरळ हाकलून दिलं. आता मला कळतं की जर मी तुझ्याकडे राहायला आली तर उद्या तुही मला हाकलून देशील. पराया माणूस म्हणते. त्यापेक्षा मला इथंच राहिलेलं बरं. मी इथंही सुखीच आहे. कोणताच त्रास नाही मला. माझी सेवा करायला इथं बरेच लोक आहे. हा माझा मुलगा नाही. माझा विद्यार्थी आहे. परंतू त्याचेवर संस्कार आहेत माझे. म्हणूनच तो पोषतो. तुम्हाला माझी मालमत्ता पाहिजे. मी नाही. परंतू या माझ्या विद्यार्थ्याला मी पाहिजे. माझी मालमत्ता नाही. मी नाही येत आता तुझ्याकडे. राहू दे सुखानं मला इथं."
विणानं आपल्या आईची भरपूर मनधरणी केली. परंतू तिची आई काही मानली नाही. त्यामुळं ती निघून गेली.
तीच बातमी. तीच बातमी जशी तिच्या मुलीनं वाचली. तशी तिच्या मुलानंही वाचली. त्याला वाटलं की आता आई न्यायालयाच्या कायद्यानुसार आपल्याला काहीच देणार नाही. त्यामुळं तो तिला भेटायला निघाला. त्यालाही वाटलं की आईची आपण मनधरणी करु. निदान आपली आई दया दाखवून आपल्याला आपल्या घरी राहू तरी देईल.
विणाप्रमाणे तिचा मुलगाही तिला भेटायला आला होता. तोही तिला घरी चाल म्हणत होता. तशी राधा म्हणाली,
"बेटा, तू मुलगा आहेस म्हणून तुला माफ करावं असं कोणत्या कायद्यात आहे. ज्यावेळी तू मला मारलं व तुझ्या पत्नीनं मला हाकलून लावलं. तेव्हा तुझा मेंदू कुठं गेला होता. तुझी सहानुभूती कुठू गेली होती. तू सहानुभूतीपूर्वक विचार तरी केला का? नाही ना. मी आता सुखात आहे. जा आता."
राधाचा मुलगा आला तसा निघून गेला. तशी भेटणा-यांची रिघही कमी झाली होती. त्यानंतर काही दिवस असेच गेले.
काही दिवसानंतर राधेला विचार आला की आपण आपल्या मुलाला असंच सोडून का द्यावं. आपला मुलगा का असेना. त्याला शिक्षा व्हायलाच हवी. तसाच त्याला धडाही शिकवायला हवा की त्याचेवरुन इतर कोणीही मुलं मायबापाची अवहेलना करणार नाहीत. तसंच त्याला धडाही शिकवता येईल. शिवाय सुधरवताही येईल.
तिचा मुलगा गरीब होता. परंतू तिला त्याची दया नव्हती. तिनं मुलाला स्वतः जन्म दिला. परंतू तरीही तिनं दया दाखवली नाही. फक्त नियमावर बोट ठेवला. नियमानुसार तिचा उद्देश होता की जर मी माझ्या मुलाला शिक्षा दिली तर उद्या त्यापासून बोध घेवून कोणीही आपल्या मुलांच्या भुलथापांना बळी पडणार नाही.
तिनं विचार केला आपल्या मुलावर खटला दाखल करायचा. कारण तिचं तिनं बांधकाम केलेलं घर होतं. ती तिची मालमत्ता होती. तिनं उभी केलेली. ते घर तिचा मुलगा वापरत होता. तिला वाटत होतं की ते घरही त्याला मिळायला नको. वाटल्यास ते घर ट्रस्टला दान द्यावं.
विचारांती तिनं ठरवलं की आपण खटला दाखल करावा. आज तिनं आपल्या मुलावर खटला दाखल केला. त्याबाबत तिनं नोटीस पाठवला व नोटीसमध्ये लिहिलं की ती त्या मुलाची आई असून तो पोषत नसल्यामुळेच ती दुर्बळ आहे. तसंच ती दुर्बळ असून तिला पैशाची गरज आहे. तेव्हा तिच्या मुलानं एक तर तिला पैसा द्यावा वा तिला तिची मालमत्ता परत करावी. जेणेकरुन ती मालमत्ता विकून ती पैसा उभा करु शकेल.
तिचा तो नोटीस. तो नोटीस प्राप्त होताच तिचा मुलगा पक्का घाबरला. त्यानंतर त्या मुलानं न्यायालयात शपथपत्र दाखल केलं. परंतू पैसा नव्हता त्याचेजवळ. म्हणून की काय, त्याला खटल्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यात न्यायालयानं निकाल दिला.
"सबब पुरावे साक्षीनिशी पडताळून पाहिले असता सदरची मालमत्ता ही श्रीमती राधाची आढळली आहे. न्यायालयीन कायद्यानुसार सदर व्यक्ती ही खटल्याशी संबंधीत व्यक्तीची आई असून त्या आईची सेवा तो मुलगा म्हातारपणी करीत नाहीत. त्याची आई आता वेगळी राहात असून तिला खर्चासाठी पैसा लागत आहे. त्यामुळं सबब पैसा सदर व्यक्तीनं आपल्या आईला मासीकवार द्यावा वा संपूर्ण रक्कम एकदम द्यावी. जर असा पैसा सदर संबंधीत व्यक्तीनं दिला नाही वा मासीकवार पैसा संबंधीत व्यक्ती देण्याचं मंजूर करीत नाही तर संबंधीत मालमत्ता विक्रीला काढण्यात येईल. सबब बाबीसाठी पंधरा दिवसाची मुदत देण्यात येत आहे.
न्यायालयानं काढलेला आदेश. तो आदेश पाहता तिचा मुलगा चक्रावला. त्यानं विचार केला की आपण आपल्या आईची भेट घ्यावी. तिची गयावया करावी. कदाचीत तिला यातून दया येवून ती आपल्याला माफ करेल. नाहीतर आपण रस्त्यावर येवू. असा विचार करुन तिचा मुलगा तिला भेटायला आला. गयावया करु लागला. म्हणाला,
"आई, मी तुझा मुलगा ना. तुला कशी दया नाही. वाटल्यास मला माफ कर. मी तुझा गुन्हेगार आहे."
त्याचं ते बोलणं. तशी आई निर्भीडपणे म्हणाली,
"आता गयावया करुन काय उपयोग. आता गयावया करण्याची गरज नाही. काल जेव्हा मला तू हाकलून लावलं. मारलं पिटलं. तेव्हा कुठं गेली होती तुझी आईपणाची भावना. त्यावेळेस मेली होती का तुझी आईपणाची भावना. अन् आज जेव्हा तुझ्या ताब्यात असलेली मालमत्ता जात आहे. तेव्हा आई आठवते व्हयं आणि आता दिसत आहे स्वतःची गुन्हेगारी. आता माझं ऐक. तू आता कितीही चांगलं वागला, गोडगोड बोलला तरी मी तुला माफीनामा देणार नाही. मग तू रस्त्यावर का येईना."
ते आईचे बोल. तसा तो हिरमुसला होवून परत निघाला. वाटेत जातांना त्याच्या मनात बरेच विचार होते.
आज कोर्टाची तारीख होती. न्यायालयात गर्दी होती. कारण न्यायालयात आज वेगळ्याच विषयाची सुनावणी होती. आज त्या विषयानुसार ती सुनावणी ऐकायला बरेच लोकं उपस्थीत होते. अकरा वाजले होते. वकील मंडळी गोळा झाली होती. पक्षकार आपआपल्या आसनावर बसलेले होते. तसा संवाद सुरु झाला. न्यायाधीश महोदय, प्रतिपक्ष वकीलाला म्हणाले,
"आपल्याला जबाबात काही सांगायचे आहे का?"
त्यावर प्रतिपक्ष वकील म्हणाले,
"मा. महोदय, आम्हाला काही सांगायचं नसून एकच मुद्दा मांडतो. तो म्हणजे निकाल असा द्या की जो जगाच्या उपयोगी पडेल."
न्यायाधीशानं ते बोलणं ऐकलं. तसे न्यायाधीश महोदय बोलले.
"सर्व पुरावे ऐकून न्यायालयात या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात येत आहे. न्यायालयीन निकालानुसार हा निर्णय देण्यात येत आहे की गत पंधरा दिवसापूर्वी न्यायालयानं निर्देश दिला होता की पक्षकार ज्या पक्षाची आई आहे. त्या आईच्या खर्चासाठी मासीकवार पैसा द्यावा वा तो पैसा एकदम द्यावा असं ठरवून यावं. जर तसं देणार नसेल तर मालमत्ता जप्त करण्यात येईल. आता सांगावं व शपथपत्र सादर करावं की आम्हाला ती रक्कम मासीकवार द्यायची की नाही द्यायची वा नेमकं काय करायचं. न्यायाधीश या गोष्टीसाठी आठ दिवसाची मुदत वाढ देत आहे. मात्र आता न्यायालय पुढील तारखेस तारखेसाठी मोहोलत देणार नाही."
न्यायालयानं आपला निर्णय सांगून पुन्हा तारीख दिली होती. तशी त्यांनी प्रतिपक्ष वकीलांना तंबी दिली.
सुनावणीची तारीख यायची होती. तसं प्रतिपक्ष वकीलानं न्यायालयाच्या तंबीनुसार शपथपत्र बनवलं. राधेचा मुलगा ठोस रक्कम देवू शकत नव्हता तिला वा मासीकवार रक्कमही देवू शकत नव्हता. त्यामुळं प्रतिपक्ष वकीलानं शपथपत्रात लिहून घेतलं की ती मालमत्ता त्याची आई जर विकत असेल तर तिला विकता येईल. परंतू त्याला मनोमन वाटत होतं की राधा ही त्याची आई असून तिला आपल्या मुलाची दया येईल. ती मालमत्ता विकणार नाही.
सुनावणीची आज पुन्हा तारीख होती. त्या तारखेवर दरवेळीप्रमाणे आजही गर्दी होती. न्यायालय उघडलं होतं. वकील जमले होते. सर्वजण आपापल्या जागेवर बसले होते. तसे न्यायाधीश महोदय आले. आसनावर बसले. त्यांनी आपला चष्मा सवारला. त्यानंतर इकडंतिकडं पाहिलं. तसं प्रतिपक्ष वकीलाकडं पाहिलं. तसे ते बोलायला लागले.
"शपथपत्र दिलं का?"
"जी माय ऑनर."
प्रतिपक्ष वकीलानं तसं म्हणताच न्यायाधीश महोदयांनी ते शपथपत्र बाबूंकरवी मागीतलं. वाचलं. त्यानंतर बोलते झाले.
"न्यायालयीन प्रक्रियेनुसार न्यायालय या निर्णयावर पोहोचले आहे आणि मत मांडत आहे की पक्षकार वकीलाच्या म्हणण्यानुसार प्रतिपक्ष वकीलाचे पक्षकार हे पक्षकाराला मासीकवार पैसे द्यायला तयार नाही, तसं प्रतिज्ञापत्रात लिहिले आहे. तसंच कोणतीच रक्कमही भरायला तयार नाही असंही प्रतिज्ञापत्रात लिहिलं आहे. तेव्हा सदर पक्षकार ह्या आई जरी असल्या तरी प्रतिपक्ष पक्षकाराच्या ताब्यातील इमारत ही त्यांची स्वतःची असून ती विकण्याचा अधिकार त्यांना आहे. तेव्हा त्या मालमत्ता विक्रीची तारीख काढून सदर मालमत्ता पोलीस संरक्षणात विकण्याची परवानगी न्यायालय देत आहे. This is a court rule.
न्यायाधीश महोदयांनी आपलं बोलणं संपवलं होतं. तशी मालमत्ता विक्रीची तारीख आली. त्या दिवशी राधा व तिचा मुलगा जातीनं हजर होता. तसं पाहता मालमत्तेची बोली लागत होती. चढीवर चढीचे डाव लागत होते. राधेच्या मुलाची लेकरं रडत होती. परंतू राधेला काही दया येत नव्हती. शेवटी मालमत्ता विकली गेली व ते सर्व रस्त्यावर आले.
राधेला पैसा मिळाला होता. तसा तो पैसा तिनं ट्रस्ट स्थापन करायला दिला. तिनं वृद्धाश्रम स्थापन केलं होतं. त्यानुसार त्यानंतर तिनं सांगीतलं की या ट्रस्टमध्ये दोन असे स्थान ठेवावे तसेच दोन कमरेही. एक कमरा माझ्या मुलाचा असेल व एक कमरा माझ्या मुलीचा. ही बाब कोणालाही सांगू नये. परंतू माझ्या मरणानंतर ही बाब घोषीत व्हावी व त्या कम-याच्या किल्ल्या त्यांना देण्यात याव्या व म्हणावं की ही तुमच्या आईचं तुम्हाला दिलेलं बक्षीस आहे.
निकाल लागला होता. तसा तो निकाल वर्तमानपत्रात येवून गेला. एका आईनं कोर्टातील न्यायानुसार आपल्या मुलाला मालमत्तेतून बेदखल केलं. असा मजकूर होता. नाव राधेचंच लिहिलं होतं.
दोन दिवस गेले होते. तशी विणानं ती बातमी इतर लोकांसारखी वाचली. तिनं आपल्या आईचंही नाव वाचलं. तशी ती त्या घरी आली. ती भावाला भेटावयास आली होती. परंतू त्या घराला कुलूप लागला होता. तसं तिनं आजुबाजूला चौकशी केली. त्यानुसार तिला कळलं की तिच्या आईनं ते घर परवाच विकलेलं असून तिनं तिच्या भावालाही घरातून बाहेर काढलं आहे. तो भाऊ आता बाजूच्या फुटपाथवर बस्तान बांधून आहे. पुढं तो कुठं जाईल याची काही शाश्वती नाही.
दिलेल्या पत्त्यावर विणा ताबडतोब गेली. ती तिथं गेली असता तिनं पाहिलं की भाऊ आणि वहिणी त्या फुटपाथवर बस्तान मांडून आहेत भिकारी अवस्थेत. तिनं त्यांना पाहताच तिला रडू आलं. त्यानंतर ती जेव्हा आपल्या वहिणीला भेटली. तेव्हा तिच्या भावजंयकडून तिला माहीत झाली तिच्या आईची कर्मकहाणी. त्यावर तिला तिच्या आईचा भयंकर राग आला होता. परंतू ते तिच्या आईचं ते उचललेलं पाऊल होतं. ते पाऊल बरोबर होतं.
विणाला काहीही सुचलं नाही. तिनं आपल्या भावाला आपल्याबरोबर चालण्याची विनंती केली. सुरुवातीस त्यानं नकार दिला व नंतर त्याला जेव्हा त्याच्या इवल्या लेकराचा वास्ता दिला. तेव्हा तो तयार झाला.
विणानं आपल्या भावाला घरी नेलं. त्याला राहायला जागा दिली. तिनं त्याला आधार दिला. त्याला आपल्या वहिणीसमोरच समजवलं. त्यालाही चूक झाल्याची जाणीव झाली. तसा तो त्या दिवशीपासून सुधरला.
आता विणा व तिचा भाऊ एकत्र राहू लागले होते. आनंदात मजेनं राहात होते. अशातच एक दिवस त्यांना एक पत्र आलं. पत्र कोण्यातरी ट्रस्टचं होतं. पत्रात लिहिलं होतं. सदरील ट्रस्ट ही त्यांच्याच आईची असून त्या ट्रस्टमध्ये तिनं दोन स्थान व दोन कमरे ठेवलेले आहेत. तसं पाहता व्यवहार पाहून ती संपुर्णतः ट्रस्ट तिच्या मुलांचीच होईल. परंतू त्यासाठी निदान पाच वर्ष वाट पाहावी लागेल. सध्या ती ट्रस्ट तिच्या विद्यार्थ्यांच्या नावावर असून पाच वर्षानंतर ती तिची मुलं जर ट्रस्टची चांगली देखभाल कर्ती ठरली तर ती या मुलांच्या नावानं होईल यात काहीच शंका नाही.
त्या ट्रस्टचा मालक तिचा विद्यार्थी होता. त्यानंच तिचा मुलगा सुधरावा म्हणून त्यानं डाव रचला होता. जसे त्याचेवर संस्कार झाले व तो जसा घडला. तशी आपल्या शिक्षीकेचीही मुलं घडावीत म्हणून त्यानं जणू प्रयोग केला होता. त्यानंच तिचं घर विकत घेतलं होतं. ते घर घेवून सुरक्षीत ठेवलं होतं.
विणानं चिठ्ठीत मजकूर वाचला. तो तिनं आपल्या भावालाही सांगीतला. तशी तिनं त्या ट्रस्टची भेटही घेतली. भेटीदरम्यान कोणत्याच गोष्टीचा उलगडा झाला नाही. परंतू समजलं की त्यांची आई ही मरण पावलेली असून त्यांच्या आईनं मृत्यूपुर्वी ही वसीयत तयार केली आहेत मृत्यूनंतर ही वसीयत उघडायला लावली होती. ती उघडली गेली. त्यानुसार आपल्या आईनं कदाचीत ही योजना आपल्याला सुधारायला बनवली असावी.

इतर रसदार पर्याय