Navnath Mahayogi Machindra Nath Arambh books and stories free download online pdf in Marathi

नवनाथ (महायोगी मच्छिंद्रनाथ आरम्भ)

नवनाथ

महायोगी मच्छिंद्रनाथ

महायोगी मछिन्द्रनाथ
मच्छिंद्र नाथा च अतिशय जागृत देवस्थान औरंगाबाद जवळ मिटमिटा इथे आहे, तर नाथांच्या गादीवर माधवनाथ महाराज ह्यांची नेमणूक बाल वयात झालेली, माधवनाथ महाराज समाधिस्थ झाले. मिटमिटा येथील योगिराजांची मूर्ती अत्यंत देखणी व अनुभूती देणारी अशी आहे. जे औरंगाबाद येथे रहाणारे असतील त्यांनी ह्या स्थानी जरूर जावं कारण ते बाबा पेट्रोलपंप पासून अतिशय जवळ अस आहे
रडण्याच्या आवाजाने कामिक गोन्धळला होता. रोजच्या परिपाठा प्रमाणे तो मासे पकडण्यास यमुनेच्या तीरी आला होता, अचानक आलेल्या
रडण्याच्या आवाजाने तो दचकला होता... घाबरत घाबरत तो आवाजाच्या दिशेने आला. आता भीती ची जागा आश्चर्याने घेतली होती अतिशय सुंदर
गोरपान तान्ह मुल रडत होत....बाजूला अंड्याची शकल पडलेली होती, पक्षांचा किलबिलाट .... कामिकाच्या अचानक येण्याने झालेली बगळ्यांची
धावपळ ....... !!!! कामिकाने जाळ बाजूला ठेवल आणि त्या लहानश्या बाळाला उचलून घेतल.... छातीशी धरल....कामिकला मुल बाळ नव्ह्तच ...
त्यान इकडे तिकडे बघितल पण दूर पर्यंत कोणी हि दिसत नव्हत... यमुनेच्या तीरी इतक्या तान्ह्या मुलाला टाकणारे किती निर्दय असतील सहज त्यच्या
मनात येऊन गेल....अचानक तिथे एक साधू प्रकट झाला.... कामिकाच्या हातात बाळ होत त्याने मान लववून त्याला नमस्कार केला.
साधू म्हणाला
"कामिका.... भाग्यवान आहेस तु ... ह्याला निश्चिंत मनाने घरी घेऊन जा...!!! ह्याच नाव तु मछिन्द्र अस ठेव... ह्याचे हातून लोकोत्तर कार्य घडेल...",
इतक बोलून तो महात्मा जागेवरच अदृश्य झाला.

मासे न पकडता तसाच तो घरी परतला होता....आपला पती लगेच परत आलेला बघून शारद्वते स आश्चर्य वाटल होत....कामिका ने बाळ
शारद्वते च्या हातात दिल... त्यान तिला सगळी हकीगत सांगितली.... शारद्वते च्या आनंदाला पारावार च राहिला नाही. मछिन्द्र गोरापान होता,डोळे
अतिशय तेजस्वी होते... हातापायांना गोलाई होती... दिवस जात होते कामिकाच लहानस घर मछिन्द्र च्या बाल लीलानी भरून गेल..... काळ
कोणासाठी थांबत नाही... बघता बघता मछिन्द्र पाच वर्षाचा झाला... आता कामिक त्याला घेऊन यमुनेच्या तीरा वर मासे पकडण्यास घेऊन जात
असे... मछिन्द्र ला माश्यांची तडफड बघवत नसे , एके दिवशी त्यान जळ्यात पकडलेले सगळे मासे परत यमुनेच्या जळात सोडून दिले.... कामिका चा
अतिशय संताप झाला होता... संतापाच्या भरात त्यान मछिन्द्र च्या कानशिलात भडकवून दिली होती.
"अरे ... हेच त आपल उदर निर्वाहाच साधन...., मासे पाण्यात सोडून दिलेस तर पोटाला खाशील काय ?"
"हे कसल भिकेचे डोहाळे ....????", "समजतय का ..तुला ...?", कामिकाची संतापाच्या भरात बडबड चालू होती.....
रागा रागा ने त्याने मछिन्द्र ला होडीतून उतरवल आणि तो पुन्ह: यमुनेच्या प्रवाहात मासे पकडण्यास शिरला
मछिन्द्र न यमुनेला नमस्कार केला आणि सरळ जंगलाची वाट धरली....
कामिक परतला मछिन्द्र कुठे दिसत नव्हता शारद्वता ला तर वेड लागण्याची पाळी आली होती .... खूप शोध घेऊन मछिन्द्र सापडला नव्हता...
मछिन्द्र आधी काशी क्षेत्री आला पण त्याला हवा तसा एकांत मिळत नसल्याने त्याने उत्तर दिशा पकडली आणि शेवटी बद्रिकाश्रमात येऊन पोहोचला
तेव्हा त्या प्रदेशात घनदाट जंगल होत हिंस्त्र श्वापदे होती .... माणसांची वस्ती अशी नव्हतीच ....
जेव्हा सिद्ध किंवा महात्मे हे पृथ्वीवर अवतरतात किंवा प्रकट होतात .... तेव्हा त्यांना नेमून दिलेलं कार्य इ० ची त्यानं स्मृती असते मछिन्द्र ह्याला
अपवाद नव्हता... यमुनेच्या तीरी देवाधिदेव महादेव व पार्वती ह्यांचा संवाद त्यान ऐकलेला होताच.
"बाळा मछिन्द्र ... बद्रीकाश्रमी आपण भेटूच.....!!!" हे भगवान शिवा चे शब्द त्याच्या आठवणीत होतेच.
त्या आधी द्वापर युगाचे शेवटी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बरोबर झालेला संवादा ची त्याला स्मृती हि होतीच आपण नव नारायणा पैकी कवी
नारायण आहोत हि जाणीव व त्यांच्याकडून अपेक्षित असलेल्या कार्याची जाणीव त्याला होतीच.
त्या मुळे आज पर्यंत होऊन गेलेले सिद्ध महात्मे त्यांच्यावर आलेली संकट किंवा त्यांना झालेला त्रास, त्यांनी घेलेले कष्ट ,त्यांनी केलेल्या साधना
ह्याच ज्ञान त्यांना जन्मत: असत आणि ते त्या नुसार त्याचं आयुष्य जगत असतात.... थोडक्यात माणसाचे वय वाढल कि त्याच्या बुद्धीत प्रगल्भता येत
असते पण सिद्ध महातमे अंश अवतार पूर्ण अवतार हे जन्मत: च ज्ञान युक्त असतात उपजत त्यांना आपल्याला नेमून दिलेल्या कार्याची जाणीव हि
असतेच. म्हणून विष्णू सहस्त्र नामात जन्माला येणे , मोठे होणे , वाढणे, अभ्यास शिक्षण इ० कशाचीही गरज नसलेला असा ||ओम स्वयभूवे नम:||
ह्या नावाने ईश्वराचा गौरव करण्यात आलेला आहे... अर्थात ह्या गोष्टी किंवा असे खुलासे हे महात्म्यांच्या सहवासात होतात किंवा समजतात एरवी अश्या
कथा वाचताना आपला गोंधळ तरी होतो किंवा मनात असंख्य शंका तरी निर्माण होतात.
महायोगी गोरक्ष नाथां नी लिहिलेल्या गोरक्षकिमयागीरी ग्रंथाच्या आधाराने मालू कवी ने नवनाथ भक्तिसार लिहील हि अतिशय प्रासादिक पोथी
असून ह्यांचा अनुभव येतोच. उत्तरभारतात तील नवनाथ नावे वेगळी आढळतात... पण नाथ संप्रदाय ह्यावर संशोधनात्मक भरपूर ग्रंथ उपलब्ध आहेत
त्याच सखोल वाचन केल तर किंमयागिरी तील संदर्भ त्यात आढळतात...पण नवनाथाची कृपा महत्वाची की नक्की नाथ कधी झाले...?. मग खरच
कबीर व गुरु गोरक्षनाथ ह्यांची भेट झाली का ?..... इ० प्रश्न मह्त्वाचे हे ज्याने त्याने ठरवावे ....
अक्कलकोट यथे वटवृक्ष मठात नवनाथ वावर अनेक लोकांनी अनुभवला आहे. ज्या ठिकाणी नाथांच्या संजीवन समाध्या आहेत तिथे देखील
नाथांचे वास्तव्य अनुभवाला येते इतकच काय तर सगुण रुपात दर्शन सुधा होत पण त्या करता गिरनार येथे गोरक्षधुनी ,आळंदी ,डूडूळ, मढी , त्र्यंबकेश्वर
येथील निवृत्ती नाथ महाराजांची संजीवन समाधी .... कर्नाटकातील हलसिद्धनाथ स्थान , विटे येथे रेवणसिद्ध अश्या सिद्ध ठिकाणी तुम्हाला मूळ
मालुकवी ह्यांची नवनाथ पोथी वाचून स्वत: च अनुभव घ्यावा लागेल..... शेवटी हे चर्चा करण्याचे विषय नसून अनुभवाचे शास्त्र ज्याने त्याने अनुभवायचं आणि त्या करता साधना हि हवीच ........ असो (विषयांतर झाल्या बद्दल क्षमस्व)
बद्री वनात मछिन्द्र न पंचवटी शोधली आणि साधनेस आरंभ केला.... आता मछिन्द्र स्वत: कविनारायण असल्याने काय साधना करायची हे
सांगण्याची गरज नव्हतीच.
गिरनार हून स्मर्तृगामी दत्तात्रेय त्यांच्या नेहेमची च्या परिपाठा प्रमाणे काशी क्षेत्रात स्नानास निघाले होते.... बद्री वनात न जाताना दत्त प्रभूना शिवालय
बघून देवाधिदेव महादेव ह्यांची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही....
नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय....|
नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नम: शिवाय ||
दत्त प्रभूंची स्तुती कैलासा पर्यंत पोहोचल्या शिवाय कशी राहिली असेल......!!!!!! क्षणार्धात दक्षजामात अपर्णानायक कामांतक आदिपुरुष दानवान्तक
त्रिपुरांतक पंचवक्त्र देवाधिदेव महादेव भगवान दत्तात्रेया समोर प्रकट झाले ....
दोन अपरमपार महिमा असलेल्या दैवतांची बद्रीवनात शिवालयात झालेली भेट ज्यांना बघायचं भाग्य ज्यांना लाभल असेल ते तर भाग्यवंत असतील
च आणि ज्यांना हे वाचण्याच भाग्य आणि कल्पनेत रमून जाण्याच भाग्य लाभल असेल ते देखील तीतकेच भाग्यावान !!!!!!!!!!
एकमेकांचे क्षेमकुशल विचारून झाल .... दोघ सत्य त्रेता द्वापार युगात घडून गेलेल्या विविध विषयावर बोलत बोलत वनातून चालत गंगेच्या किनारी
आले ... त्या वेळेस पंच वाटिकेत तपश्चर्या करणारा मछिन्द्र त्यांनी बघितला .
"हे अत्री आत्मजा तु हा कोण हे विचारून यावस अस मला वाटत आणि हि तपश्चर्या कश्या करता .....", भगवान शंकराचे वचन एकूण दत्त प्रभू मछिन्द्र जवळ आले, त्याला समाधीतून जाग केल.... मछिन्द्र न डोळे उघडले आधी दत्त प्रभुना त्यांनी ओळखल च नाही....पण मछिन्द्र न दत्तात्रेयांना वंदन केले आणि म्हणाला
"इतक्या निबिड अरण्यात .....पहिल्यांदाच मी माणूस बघीतला आहे ... आपण नक्कीच कोणी तरी दैवी पुरुष दिसतात....?"
दत्तप्रभू हसले आणि म्हणाले , "अरे मी अत्री ऋषींचा पुत्र,मला दत्त म्हणतात", मिस्कील पणे हसत भगवान दत्तात्रेय म्हणाले. घळा घळा अश्रू वाहू लागले ,अष्टसात्विक भाव जागृत होऊन मछिन्द्र न प्रभूंच्या पायावर डोक ठेवल
"कृपा ......S ", इतकेच शब्द मछिन्द्र च्या तोंडून फुटू शकले,
भगवान दत्तात्रेयांनी त्याला उठवल वरदहस्त मछिन्द्र च्या डोक्यावर ठेवला क्षणात मछिन्द्र समाधी लागली दत्त प्रभूनी पुन्हा त्याला स्पर्श केला मछिन्द्र भानावर आला... दोघ देवाधिदेव महादेवा पाशी आले .... मछिन्द्र ला आपण कवीनारायण आहोत हि पूर्ण स्मृती आता झाली होती मछिन्द्र ब्रम्ह स्वरूप झाला होता. महादेवानी त्याला हृदयाशी धरल... नाथपंथा ची सुरुवात झाली होती..... मछिन्द्र चा मछिन्द्रनाथ झाले होते .... अश्या रीतीने आदिनाथा भगवान शंकर ह्यांनी नाथपंथा ची स्थापना केली व त्याच गुरुपद भगवान दत्तप्रभु कडे दिल ........ तो काल
अश्या महायोगी मछिन्द्रनाथांची आपल्या वर कृपा असो
अलक्ष निरंजन !!!
ओम नमो आदेश , गुरुजीको आदेश !!!!!!!!!!
@स्वामी@

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पाठभेद , संदर्भ इ०

मच्छिंद्रनाथ : (सु. दहावे शतक). नाथ संप्रदायाच्या ऐतिहासिक आचार्यांमधील पहिला आचार्य आणि कौलमार्गाचा आद्य प्रवर्तक असलेला एक विलक्षण प्रभावी असा भारतीय योगी. तो मत्स्येंद्रनाथ, मच्छेन्दपाद, मच्छघ्न, मच्छन्द, भृंगपाद, अनिमिषदेव इ. नावांनीही ओळखला जातो. ⇨नाथ संप्रदायानुसार तो आदिनाथ शिवाचा शिष्य, ⇨गोरखनाथाचा गुरू व जालंधरनाथाचा गुरूबंधू होता. तो विष्णूचा, शिवाचा वा कविनारायणाचा अवतार मानला जातो. नेपाळातील बौद्ध त्याला ⇨अवलोकितेश्वर बोधिसत्त्व मानतात. त्याचे मीननाथाशी व बौद्ध सिद्ध लुईपा याच्याशी ऐक्य मानणाऱ्या परंपराही आढळतात.

हजारीप्रसाद द्विवेदींच्या मते मच्छिंद्राचा जन्म आसाममध्ये कामरूपाच्या आसपास, तर डॉ. बागचींच्या मते बंगालमध्ये झाला. एका मतानुसार तो दक्षिणेतील तुळुभाषिक तौलवी देशाचा राजा होता. त्याने मच्छिंद्रगड (जि. सांगली) येथे चैत्र वद्य पंचमीला समाधी घेतली असे मानले जाते. त्याचा नेपाळशी निकटचा संबंध होता असे दिसते. एका भृगुवंशीय ब्राह्मणाचा पुत्र म्हणून तो जन्मला परंतु गंडातरयोगावर जन्मल्यामुळे त्याला समुद्रात फेकण्यात आले तेथे शंकराने पार्वतीला सांगितलेले गूढ ज्ञान त्याने मासा बनून वा माशाच्या पोटातून ऐकले इ. दंतकथा आहेत (ज्ञानेश्वरी अ. १८). हरप्रसाद शास्त्रींच्या मते तो कैवर्त (कोळी) जातीतील होता. प्रयागचा राजा मरण पावल्यावर परकायाप्रवेशाने त्या राजाच्या राण्यांबरोबर आणि पुन्हा एकदा सिंहल देशातील राणीबरोबर त्याने संसार केला त्याच्या दोन पुत्रांनीच पुढे जैन धर्माची स्थापना केली इ. कथाही आढळतात.

शंकर वा पार्वती यांच्या शापामुळे तो आपले ज्ञान विसरला तसेच त्याला स्त्री, अपत्य, सुवर्ण इत्यादींचा मोह झाला होता व गोरखनाथाने तो दूर केला इ. कथांवरून त्याच्या जीवनात तत्त्वज्ञान व जीवनविषयक दृष्टीकोन यांबाबतीत काही स्थित्यंतरे झाली होती, असे दिसते. तो प्रारंभी योगमार्गाचा अनुयायी होता, नंतर वाममार्गी साधनेकडे वळून त्याने कौलमार्ग प्रवर्तित केला आणि गोरखनाथाने प्रबोधन केल्यानंतर तो पुन्हा नाथपंथी योगमार्गाकडे वळला, असे काही विद्वानांचे मत आहे. डॉ. बागचींच्या मते तो बौद्ध तांत्रिक होता. आपले मूळचे मत सोडून त्याने योगिनींचे प्राबल्य असलेलेजे योगिनीकौलमत स्वीकारले, ते बौद्ध तंत्राशी संबंधित नसून हिंदू शाक्त तंत्राशी संबंधित होते तसेच त्याचा स्वीकार करण्यापूर्वी तो ‘सिद्धामृत’ नावाच्या कौल (शाक्त) मताशी संबंधित असावा, असे रा. चिं. ढेरे मानतात. त्याने कौलमतावर लिहिलेले कौलज्ञाननिर्णय, अकुलवीरतंत्र, कुलानंद व ज्ञानकारिका हे ग्रंथ डॉ. बागची यांनी संपादित केले आहेत. मत्स्येंद्रसंहिता इ. ग्रंथ व काही स्फुट पदेही त्याच्या नावावर आढळतात.

तो सुफलतेचा देव होता असे दिसते. नेपाळात त्याचा रथ पोडे तोले या ठिकाणी आल्यावर त्या रात्री त्या परिसरातील स्त्रिया नग्न झोपतात मोठा दुष्काळ दूर करून त्याने पाऊस पाडला त्याच्या उत्सवाच्या वेळी हमखास पाऊस पडतो तो कृषिदेव असून सर्प हे त्याचे दूत आहेत नेपाळात त्याला माता म्हणून संबोधले जाते अर्धनारीनटेश्वराप्रमाणे त्याच्या ठिकाणी पुरूषत्वाबरोबरच स्त्रीत्वाचेही काही गुणधर्म मानले आहेत त्याने भस्मातून गोरखनाथाची निर्मिती केली इ. विविध समजुती व दंतकथांमधून त्याचे स्वरूप वर्णिले आहे.

भारतभर त्याच्याविषयी असलेला आदर, त्याच्याविषयीच्या दंतकथा व लोककथांची व्याप्ती, नेपाळतील त्याच्या रथजत्रांची भव्यता, नेपाळची रक्षकदेवता म्हणून त्याचे असलेले माहात्म्य, नेपाळातील एका जातीचे ‘मत्स्येंद्री’ हे नाव, कृष्णाकाठच्या शाळूचे ‘मच्छिंदरी शाळू’ हे नाव इत्यादींवरून भारतीय जनमानसात त्याला महत्त्वाचे स्थान असल्याचे स्पष्ट होते.

इतर रसदार पर्याय