My Cold Hearted Boss - 5 saavi द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

My Cold Hearted Boss - 5

" आई म्हणाली की तिला आवडेल तुमच्यासाठी जेवण बनवायला... ", आदित्य म्हणाला... तसं तिकडे वेदांशीचे डोळे आनंदाने मोठे झाले...


" खरंच...???", तिने उत्साहाने विचारलं...


" हो.. ", आदित्य हलका हसून म्हणाला...


" ओके... मग.. ", ती पुढे म्हणाली.. आणि तिचं ऐकून इकडे आदित्यने कपाळाला हात मारून घेतला...


....


" आदित्य... ऐकलंस ना..?? मी म्हंटल मला माझं आज रात्रीचं जेवण पाहिजे तुझ्या आईच्या हातचे.. आणि रात्री आठला माझं जेवण घेऊन माझ्या घरी ये... ", ती पुन्हा एकदा ऑर्डर सोडला..


आणि आदित्य ने दात घासून मोबाईलकडे पाहिले...


" हो बॉस.. ओके बॉस.. ", तो म्हणाला.. आणि फोन ठेवून दिला...


" केवळ ऑर्डर सोडायची माहीत आहे यांना..!! हे कर.. ते कर.. असं नाही की आधी विचारावं.. की आदित्य तुला जमेल का रे या वेळेला यायला..??
यांच्या आईला नाही जमत का स्वयंपाक..??
कदाचित नसेल जमत.. शेवटी पिढ्यान पिढीची श्रीमंती घरात नांदत असेल ना.. म्हणून असेल कदाचित..!!

आता काय.. करा डब्बा.. आणि नेऊन द्या... पेट्रोलचा खर्च काढणार आहे मी त्यांच्याकडून...!! ", आदित्य तोंड वाकडं करत म्हणाला...


" आई.. चल आपण बाहेर फिरून येऊ थोड्यावेळ... तुला छान पाणीपुरी खायला घालतो..", आदित्य आईला हाक देत म्हणाला... तसं आईही होकार देते..



दोघेही गाडीवर बसून बाहेर जातात... थोड्यावेळ मार्केट मध्ये फिरतात... आणि मग तिथेच एका पाणीपुरीच्या टपरीवर पाणीपुरी खातात...


आई अगदी खुश असते.. आणि आदित्यही..!!!


जवळ जवळ तासभर दोघेही फिरत होते... आणि येताना दोघेही भाजीच्या मार्केट मधून भाजीपाला घेऊन येतात..!


काहीवेळ तर असाच निघून जातो... आई स्वयंपाक करायला घेते.. तर आज आदित्यलाही बऱ्याच दिवसांनी मोकळा असा वेळ भेटला होता... म्हणून तो मोबाईल वर मनाप्रमाणे टाईमपास करत बसला होता...


शेवटी थोड्याच वेळात आई सगळा स्वयंपाक बनवते... सवा सात वाजून गेलेले असतात...


" आदित्य जेवण भरले बघ डब्यात.. जा जाऊन देऊन ये ... ", आई म्हणते... तसं आदित्यपण डबा पिशवीत भरतो आणि गाडीची चावी घेऊन आईला बाय करत निघतो...



....


" वेदांशी मॅडम... तुम्ही शेफला जॉबवरून का काढून टाकलं...?? नाही आवडत का त्यांचं जेवण..???", वेदांशीच्या एका सर्वन्ट ने विचारलं...


वेदांशी.. जी तिच्या प्रशस्त घराच्या लिविंग हॉलमध्ये बसून कार्टून पाहत बसली होती.... तिचं लक्ष त्या सर्वन्ट कडे गेले...


" मला तो शेफ नको... मी माझ्या जेवणाची व्यवस्था केली आहे... तुमचं काम झालं असेल तर तुम्ही जाऊ शकता... आणि जाताना गार्ड्स ना सांगा जर कोणी आदित्य नावाचा मुलगा येईल तर त्याला सरळ आत पाठवा.. ", वेदांशी थंडपणे म्हणाली.... तसं त्या सर्वेंट ने मान डोलावली.. आणि निघून गेली...


वेदांशीने तिचा काम करणारा स्टाफ फक्त दिवसापूरता ठेवला होता... ती घरी आल्यावर तिला कोणी लागायचे नाही... तिला एकटीला राहायला आवडायचे...


तिच्या घरात कोणीच राहत नव्हते रात्रीला... त्या मोठ्या आलिशान बंगल्यामध्ये ती एकटीच असायची..


रात्रीला गार्ड्स तेवढे बाहेर गेटजवळ असायचे.. तेवढीच काय ती तिची सेफ्टी...!!


आताही ती कार्टून लावून बसली होती हॉल मध्ये.. पण एवढे कॉमेडी सीन पाहून पण तिच्या चेहऱ्यावर हसू येत नव्हतं...!! ती कार्टूनही अगदी निर्विकारपणे पाहत होती...


तिची नजर सारखी घड्याळावर जात होती...


" कधी येईल आदित्य डब्बा घेऊन..!! एवढा वेळ लागतो का त्याला..?? ", ती मनातच काहीसं चिडून म्हणाली....


पण घड्याळात मात्र आताशी साडे सात वाजले होते...


ती अगदी आतुरतेने वाट पाहत होती आदित्यची..!


थोड्याच वेळात दरवाज्याची बेल वाजली.. तसं तीने घड्याळ्यात पाहिले तर बरोबर आठ वाजले होते...


तसं तीचे डोळे चमकले... तीने जवळ जवळ पळत जात दरवाजा उघडला...


पण दरवाजा उघडताच... आदित्यने जेव्हा वेदांशीला पाहिले... तेव्हा मात्र त्याचे डोळे आश्चर्याने मोठे झाले...





वेदांशीने असा नाईट सुट घातला होता.. आणि वर अगदी क्युट वाला हेयर बँड..!


तिला या अश्या अवतारात आदित्य पहिल्यांदा पाहत होता.. म्हणून तो शॉक झाला होता...


" actual मध्ये जिला डरकाळी फोडणारी वाघीन समजत होतो.... ती तर क्युट वाली सशीन निघाली.. ", आदित्यच्या मनात विचार आला तिला पाहून आणि तो स्वतःच हसला तिच्यावर पण तेही मनातच..!


तिच्या चेहऱ्यावरील एक रेषही हलली नव्हती.. म्हणून तो काही जास्त बोलला नाही... त्याला त्याची नोकरी जान से भी ज्यादा प्यारी थी..!


" किती उशीर केला आदित्य..!! जरा लवकर येत जा उद्यापासून..! नाहीतर तुझा पगार कट करेन..!", ती त्याच्या हातून डब्बा जवळ जवळ हिसकावून घेत म्हणाली..!


तसं त्याने मनातच रागात पाहिलं तिला.. पण actual मध्ये तिच्याकडे रागात पाहायची हिम्मत नव्हती त्याच्यात... आखिर बॉस होतो ती त्याची..!!


" सॉरी बॉस.. उद्यापासून साडे सात ला येईल.. ", तो ओठांवर खोटं हसू आणत म्हणाला.. पण मात्र बराच चरफडला होता...


" एक तर त्यांनीच मला टाइम सांगितला.. आणि मी अगदी वेळेवर आलो आहे.. तरीही बोलणी खातोय... बोलणी तर खातोच आहे.. पण धमक्याही खातोय... म्हणतात कश्या...?? पगार कट करेन म्हणे... श्या... लाईफ झंडवा... फिरभी घमंडवा..!!",🥲 आदित्य मनातच विचार करत होता...


पण चेहऱ्यावर अजिबात हे भाव दाखवले नाही की त्याला वैताग आलाय...


" मग मी जाऊ आता..???", त्याने चेहऱ्यावर शांत हास्य ठेवत विचारलं...


" मला माझी जेवणाची प्लेट कोण रेडी करून देईल...???", ती त्याच्यावर नजर रोखत म्हणाली... तसं त्याच्या कपाळावर आठ्या पसरल्या...


" एवढं मोठं घर आहे.. मग काय सर्व्हेंट्स नाहीत का या घरात..!!!", त्याच्या मनात प्रश्न आला...


" बॉस.. घरात स्टाफ असेल ना.. ते तुम्हाला सर्व्ह करून देतील... ", तो अदबीने म्हणाला..


" घरात कोणी नाहीये... त्यांच्या जाण्याची वेळ झाली..", ती शांतपणे म्हणाली....


तसं तो बुचकळ्यात पडला...


" एवढं मोठं घर... घरात कोणी परिवार तरी आहे की नाही तिचा.. हा प्रश्न पडला आता त्याला..", पण त्याने विचारलं नाही...


" follow me.. ", ती म्हणाली... आणि डब्बा छातीशी धरून पुढे चालू लागली... तसं तो पण पाय आपटत तिच्या पाठी गेला...



....


दोघेही तिच्या किचन मध्ये आले... एवढं मोठं किचन पाहून तर त्याचे डोळेच बाहेर यायचे बाकी राहिले...


" यार..!! हे किचन आहे की काय..?? आमचं संपूर्ण घर होईल.. किंवा त्यापेक्षा अधिक मोठा केवळ किचन आहे यांचं..!! ", तो मनातच म्हणाला एवढं मोठं किचन पाहून...


" माझी प्लेट तयार कर.. मला भूक लागली आहे..!! ", तीने तिथेच असलेल्या डायनिंग टेबल च्या एका खुर्चीत बसत ऑर्डर झाडला...


" येस बॉस.. ", तो नेहमीप्रमाणे म्हणाला...


पण त्या एवढ्या मोठ्या किचन मध्ये.. कुठे काय ठेवले आहे.. हे मात्र त्याला कळले नाही...


" बॉस... प्लेट्स कुठे आहेत...?? मला भेटत नाहीयेत..", तो म्हणाला...


" I don't know.. Find yourself... And fast.. I am hungry... ", ती पुन्हा एकदा म्हणाली आणि आदित्यने वैतागून तिला खाऊ की गिळू नजरेने पाहिले..!!


" काय माणूस आहे...!! स्वतःच्याच घरातल्या किचनबद्दल माहीत नाही यांना.. की कुठे काय ठेवले आहे...", आदित्य वैतागून मनात म्हणाला... आणि तिथे असलेले सगळे खण चेक केले...


" आदित्य लवकर ना..!!!", ती काहीशी चिडून म्हणाली....


" यांच्या तर डोस्क्यातच घालतो डब्बा आता... चोवीस तास काम करणारा नोकर बनवून ठेवले आहे... तिकडे ऑफिसमध्ये पण जीवाला चैन नाही... आणि आता तर घरीही नाही..!", आदित्य तोंड वाकडं करून मनात म्हणाला...



" येस बॉस.. झालं... शोधलं.. ", तो तरीही शांतपणे म्हणाला.. आणि जेमतेम प्लेट आणि वाटी चमचे शोधून घेऊन परत डायनिंग टेबल जवळ आली...


ती अजूनही डब्बा पकडून होती... खोलला नव्हता तीने... कारण तिला खोलताच आला नव्हता ...काहीतरी डिफीकल्ट वाटले तिला...


" बॉस.. डब्बा... ", तो म्हणाला.. तसं तीने पटकन डब्बा त्याच्याकडे सरकवला...


त्यानेही मग एक एक करून डबा उघडला.. एका मध्ये डाळ... भात... दोन भाज्या... पोळी... शिरा.. सलाड... लोणचे... सगळं काही पाहून तिचे डोळे पुन्हा एकदा चमकले... जे आदित्यच्या नजरेतून सुटले नाही.... त्याला मात्र हसू आलं...
पण त्याने कंट्रोल केलं...


त्याने प्लेट अगदी नीट सर्व्ह केली तिच्यासाठी... आणि प्लेट तिच्या समोर केली... तसं ती लगेच जेवणार इतक्यात...


" बॉस हात धुतले का..??", अचानक आदित्य ने आठवण करून दिली...


तसं ती थांबली.. आणि दोन्ही हात डोळ्यांसमोर धरले... आणि नाही मध्ये मान डोलावली...
किती निरागस वाटली ती त्या क्षणी...


" क्युट..", तो मनातच म्हणाला...


" जा माझ्यासाठी बाउल मध्ये पाणी घेऊन ये हात धुवायला... मी उठणार नाही आता इथून.. ", तीने पुन्हा एकदा त्याच्याकडे पाहत सरळ ऑर्डर सोडली...


तसं..." No..!! She's not cute at all..!! She's just HITLER !! ", तो मनातच दात ओठ खात म्हणाला... आणि एका बाउल मध्ये पाणी घेऊन आला....


आणि तिच्या समोर ठेवले.. तसं तीने पाणी मध्ये हात बुडवत हात धुतले... आणि लगेच जेवायला सुरवात केली..!!


" च्यायला..!!! हे सगळं तर माझ्या बायकोने माझ्यासाठी प्रेमाने करावं अशी इच्छा होती माझी... पण इथे तर सगळं गणितच चुकीचं आहे..!!

इथे आम्ही बॉस एम्प्लॉई कमी... आणि नवरा बायको जास्त वाटत आहेत... फक्त carector बदलले आहेत... त्या माझा नवरा.. आणि मी त्यांचा गोगलगाय बायको वाटतो आहे..!!

हाय रे माझं फुटकं नशीब..!! ", तो बाऊल बाजूला नेऊन ठेवत मनात म्हणाला...


बिचारा पुरता वैतागला होता...


ती मात्र मस्त मिटक्या मारत जेवणाचा आस्वाद घेत होती..


तो मात्र तसाच पाठीमागे घुटमळत उभा होता...


बरोबर वीस मिनिटाने तिचं जेवण पूर्ण झालं... तसं ती जागेवरून उठली... आणि तिथेच असलेल्या बेसिन मध्ये हात धुवून घेतले...


" नशीब त्यांनी त्यांचे उष्टे हात नाही धुवायला सांगितले मला... नाहीतर तेही करायला मागे पुढे बघणार नाही त्या..", तो मनातच बडबडला आणि सगळे प्लेट जमा करून बेसिन मध्ये ठेवले... आणि धुणार इतक्यात वेदांशीने त्याला हाक मारली...


" हा बॉस..??",



" भांडी राहू दे तिथेच..!! उद्या मेड येईल ती धुवेल... आणि टिफिन मी उद्या तुला परत देईल ... ", ती म्हणाली.. म्हणजे ऑर्डर दिला.. म्हणून मग त्यानेही जास्त काही म्हंटले नाही.. केवळ ओके बॉस म्हंटले...



" बॉस.. मी निघतो आता... ", तो म्हणाला.. तसं तीने पुन्हा एकदा थांबायला सांगितलं...


आणि तीने किचन मधला फ्रिज उघडला...
आणि तिथून काहीतरी काढून घेऊन आली...


" take this... One for you.. And another for your aai..! आणि काळजी करू नको... तुझ्या पेट्रोलचा भाडा पण तुझ्या अकाउंट मध्ये जमा होईल महिन्याच्या अखेरीस..", ती म्हणाली... तसा तो मनोमन खुश झाला...


" थँक यू बॉस... ", म्हणत तीने ऑफर केलेले मोठे चॉकलेट डेरी मिल्क घेतले...


तसं तीने पण शांतपणे मान डोलावली...



तो बाहेर आला... तसं ती पण दरवाज्यापर्यंत आली....



" गुड नाईट बॉस... उद्या भेटू.. ", तो तिला ग्रीट करत म्हणाला... तसं तीने मान डोलावली...



तो तसाच खुशीत निघून गेला...


ती मात्र त्याला जाताना पाहत होती....






क्रमश :



कथा आवडत असल्यास कमेंट नक्की करा....