वल्डकप फायनल - भाग १ व २ Ankush Shingade द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

वल्डकप फायनल - भाग १ व २

वल्डकप फायनल या पुस्तकाविषयी

वल्डकप फायनल ही पुस्तक वाचकांपुढे देतांना मला नेहमीसारखाच आनंद होत आहे. ही एका कलाकाराला वाहिलेली पुस्तक असून यातील पात्र व कल्पना ह्या काल्पनीक आहेत.
ही पुस्तक लिहिण्यामागं माझ्या कल्पनेत होता देशातील सैनिक. सैनिक हा देशासाठी लढतो. अन् लढता लढता एखाद्या गोळीनं तो अपंग होतो. मग तो लढू शकत नाही. त्याला पेन्शन सुरु होते व तो जगतो. मला युद्धभुमी दाखवायची होती व परिस्थितीही दाखवायची होती त्या सैनिकाची. मात्र ही पुस्तक लिहिण्यासाठी जी कल्पना केली होती. त्यात पेन्शन द्वारे मिळणारा पैसा आड आला. म्हणूनच मी या माझ्या पुस्तकात एक क्रिकेटर उभा केला. अशातच भारत वल्डकप फायनल हारला होता. तीच थीम मला पटली व साकार झालं वल्डकप फायनल नावाचं पुस्तक.
ही माझी चौऱ्यांशिवी पुस्तक प्रकाशित होणारी पुस्तक असून छप्पनवी कादंबरी आहे. आतापर्यंत माझ्या अडतीस कादंबऱ्या ऑनलाईन झालेल्या असून माझं नाव जरी गुगलवर टाकलं तरी कादंबऱ्या उघडतात. त्यामुळं ई साहित्य प्रतिष्ठाणचं आभार. त्यांनी माझ्या पुस्तका ऑनलाईन केल्या.
या पुस्तकाबाबत लिहितांना जसं मी इतर पुस्तकातील कथानक सांगतो वा मांडतो. तसं या पुस्तकाचं मांडत नाही. ते आपण स्वतः वाचावं आणि समजून घ्यावं वल्डकप व वल्डकपमधील थरार. कथानक सुंदर आहे. मांडणी चांगली आहे. पुढं काय होईल असं कादंबरी वाचतांना नक्कीच वाटेल. तेच सांगण्यासाठी मला फोन करावा. जेणेकरुन मी आपणासाठी दुसरी कादंबरी नक्कीच लिहू शकेल.
आपला नम्र
अंकुश शिंगाडे नागपूर
९३७३३५९४५०

वल्डकप फायनल भाग १
अंकुश शिंगाडे

वर्ल्डकप भारताची शान आहे असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण देशीय खेळाडू वल्डकप खेळत असतांना पाहणाऱ्या प्रेक्षकांना काहीही मिळत नाही. तरीही ते वल्डकपचा सामना पाहण्यासाठी प्रसंगी कामाला बुट्ट्या मारतात. परंतु वल्डकपचा सामना पाहतातच.
नुकताच वल्डकप झाला होता व त्या वल्डकपमध्ये एक संघ वल्डकप जिंकला होता. त्यातच त्या संघाला वल्डकप दिला. त्यानंतर त्या संघानं तो वल्डकप घेतला. ते ड्रेसींग रुममध्ये गेले. त्यातच त्यांनी कप खाली ठेवला व त्या संघातील एका खेळाडूनं एका हातात दारुचा पॅक घेतला. तसा तो पॅक पिवू लागला. तसा पॅक पीत असतांना त्यानं आपला एक पाय त्या वल्डकपवर ठेवला व देशीय संघाचा एकप्रकारे अपमानच केला होता. त्यानंतर त्या खेळाडूला देशात खेळण्यास बंदी घातली होती. त्यानंतर त्याच्या प्रतिक्रिया आल्या होत्या. वल्डकपवर पाय ठेवला तर बिघडलं कुठं?
तो जुना काळ. त्या जुन्या काळात वर्ल्डकपचा सामना देशानं जिंकला होता. तेव्हा देशीय खेळाडूनं तो कप चक्कं डोक्यावर उचलून धरला होता आणि आताच्या संघानं त्याला पायात ठेवून पायदळी तुडवीत असल्याचे सिद्ध केलं होतं.
पराभव.......पराभव होतच असतात आणि त्या पराभवातून हानीही होतच असते. पराभव हा काही सांगून होत नाही तर तो आकस्मीकपणे होत असतो. त्यानंतर सारंच नुकसान होतं.
पराभव.........पराभवानंतर जो जिंकतो. तो पराभवी व्यक्तीला चांगली वागणूक देईल हे काही सांगता येत नाही. काही राजे चक्कं पराभवी व्यक्तींना गुलामाचीच वागणूक देत असत. उदाहरण द्यायचं झाल्यास पृथ्वीराज चव्हाणचं देता येईल. पृथ्वीराज चव्हाणचा झालेला पराभव. ज्यावेळेस पृथ्वीराज चव्हाणचा मोहम्मद घोरीनं पराभव केला. तेव्हा पृथ्वीराज चव्हाणला त्यानं आपल्या राज्यात नेलं. तिथं त्यानं पृथ्वीराजला चांगली वागणूक दिली नाही तर त्यांचे डोळेही फोडले होते.
विश्वकपातील तो एक प्रसंग असाच. एका संघातील तो क्रिकेटपटू. क्रिकेटपटू........तो चक्कं जिंकलेल्या कपावरच पाय ठेवून बसला होता. त्यानंतर समाजमाध्यमावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. त्या संघानं वल्डकपवर पाय ठेवला. त्याचं कारण होतं, त्यांना आलेला उन्माद. तो संघ सहाव्या वेळेस जिंकला होता. तो सहाव्यांदा जिंकल्याचं त्या संघानं सिद्ध केलं होतं. त्याचबरोबर सिद्ध झाली होती त्यांची महत्वाकांक्षा. ही त्यांची कृती म्हणजे त्यांनी देशीयांना हरवलं. त्यानंतर तो जगजेत्ता असल्यानं व त्यांनी कप जिंकल्यानं त्या कपाचं ते काहीही करो. तुम्ही बोलणारे कोण? अशी त्या संघाची कृती होती. तो देशीय संघाचाच नाही तर तो वर्ल्डकपचा अपमानच होता. तसाच अपमान होता त्या क्रिकेट खेळाचा. खरं तर त्या कृतीबद्दल बी सी सी आयनं त्या संघावर कोणत्याही संघासोबत खेळायची काही काळासाठी बंधनं घालायला हवी होती. परंतु त्यांनी तसं केलं नव्हतं. मग बी सी सी आय वर दबाव आला. तसं तद्नंतर बंधन घातलं गेलं.
ती कृती.....ती कृती हे दर्शवीत होती व भारतीयांना वारंवार खुणावत होती की तुम्ही आम्हाला जिंकूच शकत नाही. आम्ही जगज्जेते आहोत. तशीच ती कृती वारंवार सांगत होती की जर तुमच्यात दम असेल तर आम्हाला पुढील हंगामात जिंकून दाखवाच. त्या संघाची ही कृती. त्यांना जिंकल्याचा उन्माद चढल्याचं सिद्ध करत होती व सर्व संघांना खुणावत होती की हे इतर तमाम देशांनो, तुमच्यात दम नाही की तुम्ही सहावेळा जिंकाल वा जिंकू शकाल.
या बाबीतून जिंकणाऱ्या संघांचा उन्माद जरी दिसत असला तरी देशाने हे विसरु नये की आपण हारलो. आपण हारलो. परंतु देश मैदानावर हारला असला तरी तो मनातून हारलेला नव्हता. कोट्यवधी देशीयांची मनं त्या संघानं जिंकलेली होती. थोड्याशा चुका झालेल्या होत्या. त्या सुधरवणं बाकी होतं आणि नंतरच्या वर्षी देशानं त्या चुकांमध्ये नक्कीच सुधारणा करुन वर्ल्डकपला गवसणी घालण्याची आणि जगजेत्या त्या संघाला आला असलेला उन्माद तोडून मगच दम घेण्याची गरज होती.
देशीय संघ.......देशीय संघ मनातून हारला नसला तरी मैदानावर हारला होता. त्यांच्या काही चुका झाल्या होत्या. त्या चुका सांगणं होत्या. त्यात पहिली चूक झाली होती ती सर्व खेळाडूंचा संयम. ओपनींगला आलेला खेळाडू संयम न बाळगता खेळत होता. जशा दोन विकेटा गेल्या तरी तडाखेबाज खेळी खेळत तो खेळत होता. त्यातच त्यापुर्वी संघाकडून दोन कॅचही सुटल्या होत्या. त्यावरुन कल्पना येत होती की उन्माद चढलेल्या संघाची फिल्डींग तगडी आहे. आपण बाद होवू शकतो. तरीही कप्तान असून देशीय संघातील खेळाडू संयमी खेळी खेळला नाही व बाद झाला. तो जर थोडा संयम बाळगून खेळला असता तर तो बादही झाला नसता अन् संघ जिंकला असता. तसं पाहता ओपनरचं वर्ल्डकप फायनलमध्ये फलंदाजी करतांना टिकणं अतिशय आवश्यक होतं. कारण एक ओपनर आधीच बाद झाला होता.
कप्ताननं काही केलंही नाही तरी चालेल. तो टिकून राहाणं गरजेचं असतं. तसा एक ओपनर बाद झाला होता. तडाखेबाज खेळाची पाहिजे त्या प्रमाणात आवश्यकता नव्हती. काही वेळानंतरही तडाखेबाज खेळी खेळता आली असती. परंतु नाही, रोहीतनं ती जाणीव न ठेवता व संयम न राखता तडाखेबाज खेळी खेळली व त्याच खेळण्यातून तो बाद झाला. शेवटी तशी तडाखेबाज खेळी खेळून व कमी चेंडूत जास्त धावा काढून आपण काय मिळवलं होतं? तर याचं उत्तर काहीच नाही असं होतं. मग तशी खेळी खेळून आपला काय उपयोग? तर त्याचंही उत्तर काहीच नाही असं होतं. तसेच याच श्रेणीत इतरही खेळाडू गणले जात होते. त्यांनीही आपली खेळी संयम न बाळगता खेळलेली होती. तसं पाहता कधीही एक खेळाडू बाद झाल्यास दुसऱ्यानं काहीवेळ तरी संयम राखत डोकं शांत ठेवून खेळावं लागतं. तशी वर्ल्डकपची खेळी खेळली गेलेली नव्हती.
दुसरी चूक झाली होती जास्त संयमाची. एक खेळाडू तर जरा जास्तच संयम राखत खेळत होता. त्यानंतर जेवढे चेंडू, त्यापेक्षा निम्म्या धावा केलेल्या फलकावर दिसत होत्या. यात महत्वपुर्ण गोष्ट ही होती की एवढाही संयम राखणं बरं नाही की धावा बनणार नाहीत व आपण मागे येवू.
देशीय संघ हारला. त्याचा काही अंशी दोष एका खेळाडूवर लावला जात होता. कारण तो बाद झाला होता. तसं पाहता तोच एक खेळाडू चांगला खेळला होता मोसमात. परंतु तो अनावधानाने बाद झाला होता. त्यात त्याची चूक नव्हती. तो बाद होणं एक अपघातच होता. तसं पाहता त्यात तिसरी चूक झाली ती क्षेत्ररक्षणाची. उन्माद दाखविणाऱ्या संघानं ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षणावर भर दिला होता. तसा भर त्याप्रमाणात देशीय संघानं दिला नव्हता. अगदी सुरुवातीलाच जो उन्माद दाखविणाऱ्या संघातील एका खेळाडूचा झेल देशीय खेळाडूनं सोडला होता व त्यात तो खेळाडू बाद होता होता वाचला. तो चौकार गेला होता व त्यानंतर तोच खेळाडू नंतर देशाची डोकेदुखी बनत त्यानंच देशीय संघाविरुद्ध विराट विजय साकार केला व एकतर्फी आपल्या संघाला जिंकवले. अशी होती फिल्डींग. या तीन महत्वपुर्ण देशीय संघाच्या चुका. त्यात चवथीही एक चूक झाली. ती म्हणजे विकेट न पडणं. बाकी इतर दहा खेळीत देशीय गेंदबाजानं चांगली खेळी खेळली अन् त्यादिवशीच काय झालं होतं कुणास ठाऊक की एकही गेंदबाज चालला नाही. एव्हाना दरवेळेस चालणारा व विकेट घेणाराही त्या दिवशी चालला नाही. या चार चुका जर त्या दिवशी झाल्या नसत्या तर नक्कीच देश जिंकला असता. यात काही चुकीचं नव्हतंच. आपण याच चुका जर आगामी काळात सुधरवल्या तर देशीय संघ उन्माद दाखविणाऱ्या संघापेक्षा बलाढ्य ठरु शकतो. तसेच या जर चुका देशीय संघाकडून झाल्या नसत्या तर आपला देशीय संघ खरंच वर्ल्डकप सामन्यात विजयी ठरला असता. परंतु आता गेली गोष्ट पार पडली. आता त्या चुका आठवून काय करायचं आहे. काहीच नाही. काही उपयोगही नाही. परंतु त्याच चुका आठवून येणाऱ्या चार वर्षात त्या चुकांवर वारंवार सराव करुन पाहायचा आहे. मग यश आपल्याच पाठीशी आहे. हे आपण विसरु नये. तसेच ज्या वल्डकपला आपण देव समजतो, त्याच कपला उन्माद दाखविणाऱ्या संघानं पायाखाली तुडविल्याची किंमतही आपल्याला वसूल करायची आहे. हे तेव्हाच होईल जेव्हा आपण येणारा आगामी वर्ल्डकप जिंकू. तशी तयारी आपल्याला करायची आहे. हे तेवढंच खरं आहे. असं सर्वच खेळाडूंना वाटत होतं.
आगामी वल्डकप जिंकू असं सर्व देशीयांना वाटत होतं. परंतु त्या चुका कोणीच लक्षात घेत नव्हता आणि त्यावर कोणीच लक्ष केंद्रीत करीत नव्हतं. त्यामुळंच की काय, वल्डकप खेळतांना खेळाडू फायनलपर्यंत तर जात होते. परंतु फायनलला हारत होते. अशाच या संघात आज सुरेशही खेळाडू होता, जो त्या भीमरावचा लहान मुलगा होता.
सन १९८३ चा तो वल्डकप. कपिलपाजीनं तो कप जिंकला होता व त्या वल्डकपला सर्वोच्च स्थान देत त्याला डोक्यावर ठेवलं होतं. त्यातच त्यानं त्याचा मान केला होता. याचा साक्षीदार तो त्यावेळचा क्षण होता. तसं पाहता वल्डकप भारताची शान होती. परंतु १९८३ चा वल्डकप सोडला तर अद्यापही वल्डकप जिंकता आला नव्हता भारतीयांना. तसा एकदा प्रयत्न झाला होता २००३ मध्ये की सौरव गांगुलीच्या नेतृत्वात भारतीय संघ फायनलला आला होता. परंतु त्यावेळेस वल्डकप जिंकण्याचे स्वप्न ते स्वप्नच राहिले होते. फायनल भारताला जिंकता आली नव्हती. कारण आस्ट्रेलियन संघानं चांगलं प्रदर्शन करुन भारताचं स्वप्न धुळीस मिळवलं होतं.
सुरेश साधारण शेतकऱ्यांचा मुलगा होता. तसं पाहता सुरेश व महेश भीमरावची मुलं. ती गरीब घरची होती. महेश हा मोठा होता. त्याला क्रिकेटमध्ये आवड नव्हती. तो जेव्हा वयात आला, तेव्हा तो आपल्याच बापासारखा शेती करु लागला होता. त्याला काय माहीत होते की क्रिकेट हा खेळ लोकांच्या मनावर राज्य गाजवू शकतं. तसं पाहता आज क्रिकेट एवढा लोकप्रिय खेळ बनला होता की शेतकरी देखील वल्डकप क्रिकेटचा सामना असतांना क्रिकेट पाहात असत. त्याचं कारण होतं, तो चित्रपट. तो चित्रपट होता लगान.
काही वर्षापुर्वीची गोष्ट. देशात आमीर खानचा लगान चित्रपट प्रदर्शित झाला होता. तो चित्रपट क्रिकेटवरच आकारला होता व त्या चित्रपटात इंग्लंड व भारत यात सामना रंगवल्याचं चित्रप्रदर्शन केलं होतं. दाखवलं होतं की भारत जर क्रिकेट जिंकले तर नक्कीच लगान माफ होईल आणि इंग्लंड जर क्रिकेट जिंकले तर नक्कीच त्या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या सर्व जमिनी इंग्लंडला द्याव्यात. सामन्याचा तो नियमच. सामना अटीतटीचा होता. ते आव्हान आमीर खाननं स्विकारलं होतं. त्यानं शेतकऱ्यांची भुमिका साकार केली होती चित्रपटात.
भारत आणि तो इंग्लंडचा सामना. त्यात ती एक अट की जर भारतीय सामना जिंकले तर लगान माफ होईल आणि जर इंग्लंड सामना जिंकले तर आपल्या जमिनी इंग्लंडला द्याव्या आणि ते आव्हानही भारतीय शेतकऱ्यांनं स्विकारलेलं. त्यानंतर भारताला आपला संघ बनवणं आवश्यक होतं व आव्हानानुसार भारतानं आपला संघ बनवला. परंतु तो बनवीत असतांना आमीरला शेतकरी भुमिकेत फार त्रास सहन करावा लागला.
आमीरनं आपले काही मित्र पकडले. त्यांच्यात आत्मविश्वास जागा केला व सांगीतलं की ते जसा विटीदांडू खेळतात. तसाच खेळ असतो क्रिकेट. आपण जशी विटी मारतो. तसाच चेंडू मारायचा असतो व ज्या दांडूनं ती विटी मारतो. ती आपली बॅट असते. फरक एवढाच की विटीदांडू खेळात अकरा खेळाडू नसतात आणि क्षेत्ररक्षण नसतं. यात क्षेत्ररक्षण आहे व अकरा खेळाडू आहेत. तसं पाहता आपल्याला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकायचा आहे व या इंग्लंड संघावर मात करायची आहे. कारण आपलं लगान माफ होणार आहे. समजा आपण नाही जिंकलो तर आपलीच यात रोजीरोटी जाईल व आपण इंग्रजांचे गुलाम बनू व आपल्याला रस्त्यावर यावं लागेल. भीक मागावी लागेल.
तोच आत्मविश्वास. त्याच आत्मविश्वासाच्या बळावर भारतीय संघ लगान चित्रपटात खेळला व अंतिम समयी त्या संघानं इंग्लंडला नमवले व सामना जिंकला. तसा तो चित्रपट शेतकऱ्यांसाठीच बनवला असल्यानं तो चित्रपट शेतकऱ्यांनी पाहिला होता. त्यामुळंच की काय, त्या सामन्यावर शेतकरी फारच खुश झाले होते व आता त्यांनाही क्रिकेट या खेळाबाबत आवड निर्माण झाली होती. आता तर देशातील निव्वळ शेतकरीच सर्वच भारतीय क्रिकेट पाहात होते. खासकरुन वल्डकप. कारण वल्डकप हा भाग देशाची शान होती. आता वल्डकप सामन्यादरम्यान रस्त्यावर लोकं दिसत नव्हते तर ते लोकं टिव्हीसमोर टक लावून पाहात बसलेले दिसायचे. तसं पाहता काही काही ठिकाणी तर मोठमोठे पडदे उभारण्यात येत असत व क्रिकेटचे सामने लावले जात असत.
**********************************************

शेत पीकत नव्हतंच. जमीन तशी चांगली नव्हतीच. तसं त्या शेतात भीमराव धान्य पीकवीत होता. कारण त्याच्याजवळ काहीच उपाय नव्हता. शेवटी पोट महत्वाचं होतं.
भीमरावला एक भाऊही होता. त्याचं नाव श्यामराव होतं. भीमराव सक्रीय होता तर श्यामराव आईशी होता. भीमरावला पोट म्हणून लहानशी एक खळगी होती. ती सकाळ सायंकाळपर्यंत खाली व्हायची. ती भराविशी वाटायची. त्यासाठीच तो कमवायचा. शेती असल्यानं शेतात काम करायचा. तसाच तो आपली मुलं, आपली पत्नी व भावाला पोसायचा. भावाचं अद्याप लग्न झालं नव्हतं.
भीमरावला दोन मुलं होती. दोन्ही मुलं आज शाळेत शिकत होती. तसा शिक्षणाला पैसा नव्हताच. त्यामुळंच भीमरावनं त्याला जिल्हा परीषदेच्या सरकारी शाळेत टाकलं होतं. ज्या शाळेत जास्त मुलं नव्हती. मुलं दूरच्या कॉन्व्हेंटच्या शाळेत गाड्यांनी जात होते. तसं पाहता त्या दूरच्या शाळेत पैसेही भरावे लागत असत. तेवढे पैसे भीमरावजवळ नव्हते. म्हणूनच की काय, त्याची मुलं जिल्हा परीषदच्या शाळेत शिकत होती.
भीमरावच्या मोठ्या मुलाचं नाव महेश होतं व लहान मुलाचं नाव सुरेश होतं. तसं पाहता भीमराव हा जातीनं अस्पृश्य जातीचा होता. परंतु आता गावात जातीभेद उरला नसल्यानं भीमरावच्या मुलाला शिक्षण शिकता येत होतं.
भीमराववर डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा प्रभाव होता. त्याला माहीत होते की चवदार तळ्याची केस डॉ. बाबासाहेबांनी जिंकली होती, ती शिक्षणाच्याच भरवशावर. त्या खटल्यानंतर पिण्याचं पाणी अस्पृश्यांसाठी मुक्त झालं होतं. डॉ. बाबासाहेबांनी तसं पाहता नवी क्रांतीच केली होती की काय, चवदार तळं आंदोलनातून पाणी मुक्त झालं होतं. तसा हा बदल शिक्षणानं झाला असा ठाम विश्वास भीमरावला होता.
डॉ. बाबासाहेबांचं नाव भीमरावच होतं आणि त्याचंही नाव भीमरावच. त्याचा भिमरावला अभिमान होता. एरवी डॉ. बाबासाहेब शिकलेच होते आणि हा भीमराव एकही अक्षर शिकला नव्हता. त्याचा आता त्याला पश्चाताप वाटत होता. तसं त्यानं ठरवलं की मी माझ्या मुलांना डॉ. बाबासाहेबांसारखंच उच्च शिक्षण देईल. ते प्राप्त करताच माझाही मुलगा तळागाळातील लोकांच्या उद्धारासाठी काम करु शकेल बाबासाहेबांसारखाच. भीमरावनं हाच दृष्टिकोन हेरुन आपली दोन्ही मुलं शाळेत टाकली होती.

***********************************************

नुकतीच पावसाची एक सर येवून गेली होती व भीमराव कडेला बसला होता विचार करीत. तसं पाहता भीमरावच्या घरी जास्त शेती नव्हती. तसा तो अल्पभूधारकच होता.
भीमराव विचार करीत होता त्या पावसाचा. कारण तो अवकाळी पाऊस होता व भीमरावच्या शेतात कापूस होता. कापसाला बोंड पकडली होती. तो विचार करीत होता त्या पावसाचा. कारण पावसासोबत वादळही थैमान घालत लागलं होतं.
तो अवकाळी पाऊस. तो अवकाळी पाऊस जर चार आठ दिवस आला तर कापसाचं बीज अंकुरीत होईल याची चिंता त्याला होती. त्यातच वाऱ्यानं अख्खा कापूस खाली पडून मातीत मिसळून जाईल असंही त्याला वाटत होतं. तसं पाहता त्यात अतीव नुकसानही होईल असंही त्याला वाटत होतं. म्हणूनच तो विचार करीत होता. पाऊस उघडायची आस होती त्याच्या मनात. परंतु पाऊस काही उघडत नव्हता. तो सारखा विचार करीत करीत होता. विचार करता करता त्याला झोप केव्हा आली ते कळलंच नाही.
दोन तीन दिवस झाले होते. पाऊस उघडायची वाट भीमराव पाहात होता. परंतु पाऊस काही केल्या उघडायचं नावच घेत नव्हता. त्यातच तो दोन तीन दिवस त्या भरल्या पावसात आपल्या शेतात गेला नव्हता. तसा आज रात्रीला पाऊस थांबला होता व तो सकाळ व्हायची वाट पाहू लागला.
सकाळ झाली होती. सकाळ होताच भीमराव सकाळी उठला व तो सरळ शेताकडे निघाला होता. सकाळी तो शेतात जाताच त्यानं पाहिलं की कापूस पाण्यानं पुर्णच भिजलेला आहे. काही कापूस बोंडातून निघून खाली पडलेला आहे. ज्याला माती लागलेली आहे. तसं पाहता कापूस मातीत भिजल्यानं ते खराब झालेलं आहे.
त्याला विचार आला. तसं अपरिमित त्याचं नुकसान झालं होतं. अख्खं पांढरं सोनं मातीत मिसळलं होतं. त्यात पांढऱ्या सोन्याची आज माती झाली होती. अख्ख्या मेहनतीवर पाणी फिरलं होतं. शेतात पीक होतं. परंतु त्या हिरव्या पिकात आता कापूस नव्हता.
वेदनेत विव्हळत असलेला भीमराव. त्यावेळेस त्याच्या घरी अवकळा आली होती. अवकाळी पावसानं अवकळा आणली होती त्याच्या जीवनात. तसं पाहता आता आपलं पोट कसं भरता येईल याचा विचार त्याला येत होता.
एकीकडं शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालं होतं. त्याची अख्खी चिंता देशातील शेतकऱ्यांना लागली होती. त्याची शहानिशा करायला कोणी आला नाही. त्या शेतकऱ्यांची कोणीही विचारपूस केली नाही. तर दुसरीकडे देशात वल्डकप झाला होता. ज्या वल्डकपमध्ये स्वतः प्रधानमंत्री जातीनं हजर होते. त्यांना वाटत होतं की देशातच राहणारे हे क्रिकेटचे खेळाडू वल्डकप जिंकतील व आपल्या देशाची शान वाढवतील. तसं पाहता सुरुवातीला सामना चांगला रंगला होता. वाटत होतं की देश वल्डकप जिंकेल. परंतु झालं उलटच. देशातील चांगले क्रिकेट खेळणारे खेळाडू वल्डकप स्पर्धेत फायनलपर्यंत गेले होते. परंतु फायनलला ते हारले होते. त्यातच कित्येक क्रिकेटप्रेमींना निराश केलं होतं त्यांनी. त्यांना लागणारा पैसा हा जनतेच्या करातूनच गेला होता.

************************************************

ते साल होतं सन १९८३. भारतानं वल्डकप जिंकला होता, तेव्हा भीमराव लहान होता. तेव्हा तो गावात राहात होता. गावात तेव्हा टिव्हीही पोहोचला नव्हता. तसं पाहता त्याचं गाव होतं धारगाव. त्या गावात एका पाटलाच्या घरी १९८३ ला टिव्ही आला. तो त्यानं कदाचीत वल्डकप सामनाच पाहण्यासाठी घेतला असावा असं वाटत होतं. तशी जाहिरातच त्यानं गावात केली होती. कारण तोच गावचा सरपंच होता.
क्रिकेट म्हणजे काय? हे गावाला अद्यापही समजत नव्हतं. परंतु पाटलाचा एक मुलगा होता बाबूराव. त्याचं शहरात शिक्षण झालं होतं. त्याला क्रिकेट हा खेळ आवडत होता. त्याच मुलाच्या इच्छेसाठी त्यानं १९८३ ला टिव्ही घरी आणला आणि आपल्या मुलासोबत त्यानं अख्ख्या गावाला क्रिकेटचा सामना दाखवला.
तो क्रिकेटचा सामना. तो सामना पाहण्यात तशी गावाला उत्सुकता नव्हतीच. ते तेव्हा उत्सुकतेनं टिव्ही पाहात होते. मात्र गावात पहिल्यांदाच टिव्ही आला ना, मग त्याचा आनंद घेत होते ते. तसं पाहता टिव्हीवर आपल्यासारखीच दिसणारी माणसं हालतांना डुलतांना पाहून गावातील लोकांना विस्मयता वाटायची व ते त्याच विस्मयजनक व उत्सुकतेनं टिव्हीवरील प्रदर्शन पाहात असायचे.
पाटलाच्या घरी टिव्ही आलेला पाहून पाटलाला अतिशय चांगलं वाटलं. तसं गावातील लोकांनीही. पाटलाच्या मुलासह गावातील लोकांनीही सामन्याचा मनमुराद आश्वाद घेतला व सामना जिंकल्याचा आनंदोत्सव साजरा केला.
तो १९८३ चा सामना. तो सामना ज्याप्रमाणे गावातील लोकांनी पाहिला. तसाच तो सामना भीमरावनंही पाहिला. त्यावेळेस त्यांचं वय तेवढं मोठं नव्हतं. परंतु निश्चितच मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करणारं होतं व मनाला प्रेरणा देणारंही होतं. तो सामना श्यामरावनंही पाहिला, परंतु त्याच्या मनात सामन्याची आवड तेवढ्या प्रमाणात निर्माण झाली नाही. परंतु भीमरावमध्ये त्याची आवड फार मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली होती.
भीमरावचं वय लहान होते. गावच्या मातीत खेळत होता तो आपल्या सवंगड्यांसोबत. मातीतच रमत होता तो. तसं पाहता त्याच गावच्या मातीत पाऊस उघडताच त्यांच्या विटीदांडवाचा खेळ रंगत होता. साधारणतः १९८० पर्यंत गावात लहान मुलांनी विटीदांडूच खेळला होता. परंतु जसा पाटलाचा मुलगा १९८० ला गावात आला. त्यानं गावात विटीदांडूच्या खेळाऐवजी क्रिकेटचा खेळ आणला व आता लहान लहान मुलं पाटलाच्या मुलासोबत विटीदांडूऐवजी क्रिकेट खेळायला लागले होते व ते चांगला क्रिकेट खेळू लागले होते व त्यांना क्रिकेट हा खेळ आवडूही लागला होता.
सन १९८३ चा वल्डकप, जसा गावानं पाहिला. तसा बाबूराव व भीमरावनंही पाहिला व तो खेळ पाहताच त्यांच्या मनात पाल चुकवून गेली व ठरलं की आपणही अशा संघात खेळ खेळावा व देशाला वल्डकप मिळवून द्यावं.
ते बालवय. त्या बालवयात वल्डकप म्हणजे काय? हेही त्या अबोध वयात कळत नव्हतं. भीमरावला शेतीत आवड होती तर श्यामरावला कोणत्याच गोष्टीत आवड नव्हती. परंतु भीमरावच्या मनात क्रिकेटबाबतही आवड होती. त्याच्या मनात क्रिकेटबाबत थोडीशी आवड निर्माण झाली होती. तसं पाहता सायंकाळी शाळेला सुटी होताच भीमराव पाटलाच्या घरी जायचा व त्याला विनवणी करुन तो मैदानात काही मित्रांना सोबत घेवून रात्री अंधार पडेपर्यंत क्रिकेट खेळत बसायचा. त्यातच त्या क्रिकेटमध्ये तो एवढा पारंगत झाला की क्रिकेटच्या स्पर्धेत तो भाग घेवू लागला होता.
आज भीमराव क्रिकेट खेळत खेळत मोठा झाला होता. तो शेतीही करीत होता. तसं पाहता त्याला जी दोन मुलं होती. त्यापैकी मोठा मुलगा महेश शेती करु लागला होता तर लहान मुलांमध्ये जाणूनबुजून भीमरावनं क्रिकेट भरवला होता व त्याच्या मनात लहानपणापासूनच क्रिकेटची आवड निर्माण केली होती. मात्र त्याचा वल्डकपमध्ये नंबर लागला नाही व तो वल्डकप खेळला नाही. परंतु त्याचा मुलगा होता सुरेश. अशातच वल्डकप झाला व त्या वल्डकपमध्ये देशाला दुसऱ्याच देशानं धूळ चाखली होती. ज्या संघात सुरेश होता. त्यातच त्या देशातील एका खेळाडूनं वल्डकपवर पाय ठेवल्यानं त्याचा पारा पार भडकला होता. तसा त्याला अतिशय राग आला होता त्या गोष्टीचा. त्याचं दुःख होतं त्याच्या मनात व त्याच गोष्टीचा आपण बदला घ्यावा असा विचार त्याच्या मनात जन्म घेत होता. मात्र आज तो अपंग झाला असल्यानं तो बदला घेवू शकत नव्हता. तर तो बदला घेता यावा म्हणून तो आपल्या मुलांना तयार करीत होता नव्हे तर त्याची पायाभरणी करीत होता.

************************************************

सुनील व अनिल दोन मुलं होती सुरेशची. ती आता लहान होती. मात्र लहानपणी भीमरावनं सुरेशच्या मनात जे क्रिकेटबाबत भूत शिरवलं होतं. तसा महेश हा शेती करीत होता व सुरेश क्रिकेट खेळत होता. सुरेशला क्रिकेटची आवड होती. तसं पाहता सुरेशला त्याचा भाऊ महेश समजंवायचा की त्यानं आपल्या करीअरकडे लक्ष द्यावं. हा क्रिकेटचा नाद सोडावा. क्रिकेट खेळणं हे गरीबाचं काम नाही. आपण एक साधा चेंडूही विकत घेवू शकत नाही. तिथं बॅट कुठून घेणार! परंतु सुरेश काही ऐकत नव्हता. कारण त्याच्या डोक्यावर क्रिकेटचंच भूत आरुढ झालं होतं.
सुरेशच्या मनात आरुढ झालेलं क्रिकेटचं भूत उतरत नव्हतं. शेवटी ते भूतच आहे असं समजून त्याच्या भावानं म्हणजेच महेशनं अंधश्रद्धेकडंही लक्ष दिलं. त्यानं ते भूत त्याला लागलं असावं म्हणून मांत्रीकाकडंही धाव घेतली. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शेवटी महेशला चूप बसावंच लागलं. ही गोष्ट जेव्हा त्याच्या बापाला भीमरावला माहीत झाली, तेव्हा मात्र त्याला त्या गोष्टीवर वैषम्यता वाटत होती.
तो क्रिकेटचा जुनून. आज विटीदांडू जावून क्रिकेटचा खेळ वाढायला लागला होता. सुरेशचा हा व्यासंग पाहून हळूहळूच त्याचं नाव वाढू लागलं होतं व त्याच्यातील गुण पाहून त्याचं नाव आता तालुकास्तरावर गेलं होतं. कधीमधी क्रिकेटच्या स्पर्धाही रंगत होत्या. त्यातच त्याचा क्रिकेटचा खेळ पाहून त्याची निवड हमखास संघात व्हायची. त्यातच त्याचं नाव त्याच्या क्रिकेट प्रदर्शनामुळं शहर स्तरावर गेलं. त्यानं त्यातही चांगलीच कामगिरी दाखवल्यानं हळूहळू त्याचं नाव शहरापाठोपाठ राज्य व पुढं देशापर्यंत गेलं व शेवटी त्याची भारतीय संघात वर्णी लागली.
सुरेश एक गरीब शेतकरी मुलगा. सुरेशची भारतीय संघात निवड होताच भारतीय संघात असलेले सर्व लोकं सुरेशची टिंगल टवाळकी करीत असायचे. त्याची भारतीय संघात निवड तर झाली होती. परंतु बरेच दिवस त्याला भारतीय संघाच्या प्रदर्शन संघात निवडलं नव्हतं. त्यामुळंच तो कसा खेळतो व कसा नाही हेही कळायला मार्ग नव्हता. अशातच भारताचा एक सामना झाला. तो सामना पाकिस्तानशी होता.
भारतीय संघानं १९८३ चा वल्डकप जिंकला होता. त्यानंतरचा वल्डकप आस्ट्रेलियन संघानं जिंकला होता व पुढं पाकिस्ताननं. परंतु याही वल्डकप दरम्यान भारतीय संघानं पाकिस्तानला वल्डकप स्पर्धेत आमोरासमोर आले असता हारवलं होतं. तो वल्डकप होता १९९२ चा. परंतु या १९९२ च्या क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ वल्डकप फायनलपर्यंत पोहोचला नव्हता. तर तो मागेच राहिला होता. तसं पाहता १९९२ चा वल्डकप हा पाकिस्ताननं जिंकला होता व शेखी बगारणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूंना चूप बसावं लागलं होतं. त्यानंतर भारतानं अनेक स्पर्धा खेळल्या होत्या व २०११ चा वल्डकपही जिंकला होता.
सुरेशच्या गरीबीची टिंगल टवाळकी करणारा संघ. तसा तो पहिलाच सामना होता सुरेशसाठी. सुरेश मैदानात उतरला होता व त्यानं पहिल्यांदाच भारतीय संघासाठी खेळतांना बऱ्याच धावा कुंटविल्या होत्या. आज त्या पहिल्याच सामन्यात सुरेशनं असं प्रदर्शन केलं होतं की आपल्या इतर टिंगल टवाळकी करणाऱ्या मित्रांना त्यानं चूप बसवलं होतं. त्यानुसार तो सामना भारतीय संघ जिंकला होता व त्या सामन्यात सुरेशला मॅन ऑफ द मॅच मिळाली होती. त्यातच त्या सामन्यात त्याला काही पैसेही मिळाले होते, जे पैसे त्याच्या परिस्थितीला लाभदायक झाले होते.
भारतीय संघाकडून खेळत असतांना सुरेश करीत असलेलं चांगलं प्रदर्शन. त्याला सतत विकासाच्या टप्प्यात विराजमान करीत होतं. त्याचा खेळ हळूहळू विस्तारायला लागला होता. त्याचं नाव वाढत चाललं होतं. अशातच बुकींची संख्या वाढली होती. कधीकधी बुकी येत. कधी विनवणी करीत की त्यानं चांगलं प्रदर्शन करु नये. कधीकधी धमक्याही देत की त्यानं जर चांगलं प्रदर्शन केलं तर त्याचे हातपाय तोडले जाईल. त्याचा जीवही घेतला जाईल. कधीकधी त्यांच्या लेकरा बाळांना ठार करण्याची धमकी देत तर कधी पत्नीलाही ओलीस करण्याची धमकी देत. या धमकीला घाबरुन सुरेश कधीकधी आपल्या प्रदर्शनात सातत्य ठेवत नसे.
जीव घेण्याची बुकीनं धमकी देताच कोणताही खेळाडू घाबरुन जायचा. कारण ही धमकी जिवावरची असे. जिवावर बेतणारी असे. कधी पत्नीचा जीव घेण्याची धमकी असे तर कधी मुलांचा. मग मनात इच्छा असुनही सुरेशला चांगलं खेळता येत नव्हतं. खेळावं लागायचं बुजगावण्यासारखं आणि आपण आपल्या देशासाठी खेळतोय. याचं भानही विसरावं लागायचं.
काळ हळूहळू सरकत होता. भारतीय संघानं बरेच वर्ष निराशाजनक कामगिरी केली होती. त्याचं कारण होतं बुकी. बुकी अर्थात ते गुंड की जे आंतरराष्ट्रीय स्तरावर सट्टा लावत. ज्यांच्या मनात ज्या संघाला विजयी करावं असं वाटत असे. ते त्या संघाला विजयी करीत असत. ते लोकांचा कल लक्षात घेवून अशा संघाकडून पैसे लावत की जो संघ जिंकणार नाही. जिंकूच शकणार नाही. त्यातच विजय कोणता संघ मिळवू शकतो. याचा अंदाज खेळाडूंच्या प्रदर्शनातून आलेला असल्यानं लोकंही अशाच संघाकडून सट्ट्यामध्ये पैसे लावत की जो जिंकू शकतो. परंतु ऐन वेळेस भ्रमनिराशा पदरी येत असे. कारण भलताच संघ जिंकलेला असे व भलताच संघ हरलेला असे. जो जिंकणार असं वाटायचं. त्यात लोकांचे सट्ट्यावर लावलेले बरेच पैसे बुडत. मात्र बुकी कितीतरी पैसा कमवून जात. असे बुकी खेळाडूंशी हातमिळवणी करतांना त्यानं चांगलं प्रदर्शन करु नये, म्हणून कधीकधी त्याला धमकी देत तर कधीकधी त्याला त्यानं आपलं प्रदर्शन चांगलं करु नये म्हणून त्या खेळाडूंना पैसेही देत.
अलिकडील काळात बुकींवर शिकंजे कसले आहेत खेळाडूंना वापरायला दिलेले फोन आज टॅपिंग केले जात आहेत. खेळादरम्यान त्यांचेजवळ फोन ठेवले जात नाहीत. ते कोणाला भेटतात. कोणाला नाही तेही पाहिलं जाते. तसंच तो ज्याला भेटतो, तो काय बोलतो? हेही पाहिलं जातं. त्याचा बँक बॅलेन्स तपासला जातो आणि शहानिशा केली जाते की एवढा पैसा कुठून आला? त्यामुळं शक्यतोवर आता कोणताही खेळाडू मॅच फिक्सिंगमध्ये फसत नाहीत.
एकदा असंच झालं. सुरेश चांगले प्रदर्शन करीत होता. अशातच त्याच्या प्रदर्शनावर व डावावर जास्त सट्टा लावला जात होता. त्याच्या प्रत्येक चेंडूवर सट्टा लागत होता अशातच त्यानं चांगलं प्रदर्शन करताच बुकींचे पैसे जास्त जात होते. त्यात सामान्य लोकांनाही पैसा मिळत असे व त्या प्रदर्शनातून सामान्य लोकांचा चांगला फायदा होत असे. परंतु त्यात होत असलेलं नुकसान पाहून एक दिवस एक बुकी त्याच्याकडे आला. तेव्हा ना फोन टॅपींग केलं जात असे ना कोणत्याही व्यक्तीला भेटण्याची मनाई. तसा तो बुकी त्याचेकडे येताच म्हणाला,
"आपण आगामी मॅचमध्ये चांगलं प्रदर्शन करु नये अशी आमची विनंती आहे."
बुकीचा तो प्रश्न. त्यावर सुरेश म्हणाला,
"का बरं?"
"आम्ही तुमच्या प्रदर्शनावर करोडो रुपयाचा सट्टा लावला आहे. आमचा पैसा निघायला हवा."
"त्यात माझा रोल काय?"
"वाटल्यास आम्ही तुम्हाला मालामाल करु. तुम्हाला या क्रिकेटमधून जेवढे पैसे मिळणार नाहीत, तेवढे पैसे देवू आम्ही. वाटल्यास भरपूर पैसा कमवा व खुश राहा."
"अन् तुमचं नाही ऐकलं तर......."
"तर आम्ही तुमचा जीवही घेवू शकतो. तुमच्या मुलांचं अपहरणही करु शकतो अन् तुमच्या पत्नीचंही अपहरण करु शकतो. त्यांचाही जीव घेवू शकतो. हे लक्षात ठेवा व विचार करा. विचार करा की तुम्हाला मालामाल व्हायचं आहे की आपल्यासह आपल्या परीवाराचा जीव गमवायचा आहे. येतो आम्ही."
बुकीनं त्याला दिलेली धमकी. तसा बुकी चालला गेला व सुरेश विचार करीत बसला.
तो दिवस....... सुरेशला आता खेळता येत असूनही तो खेळू शकत नव्हता. त्या गोष्टीचा त्याला फार राग येत होता. तसा तो विव्हळत होता. परंतु तो विवश होता. त्यानं मॅचफिक्सींग केली नव्हती. परंतु त्याला विचार येत होता की कदाचीत आपण जर चांगलं खेळलो तर हेच बुकी आपल्या लेकराचा जीव घेतील व आपलाही. आपल्याला काहीही मिळणार नाही. व्यक्तीरिक्त कधीमधी अपहरणही करतील आपल्या पत्नीचे व मुलाबाळाचे.
विचार करता करता तो क्रिकेट खेळायचा. परंतु मैदानावर असतांना सतत त्याचे मनात तेच विचार चाललेले असायचे व त्यातच तो बादही व्हायचा.
सुरेशचा संघातील फॉम बरोबर चालला नव्हता. तो सतत बाद होत होता. खराब प्रदर्शनानं त्याच्या निवडीवर शंका व्यक्त केली जात होती. मात्र तरीही तो केवळ त्यानं केलेल्या आधीच्या प्रदर्शनावर टिकला होता संघात. अशातच तो एक दिवस उजाळला. त्या दिवशी अचानक एका वर्तमानपत्रात एक बातमी छापून आली. मॅचफिक्सींग प्रकरणात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे काही खेळाडू सापडले. त्यानंतर त्या खेळाडूंना संघाबाहेर काढलं गेलं. त्यांची सखोल चौकशी केली गेली व विचारणा केली गेली व सांगीतलं की जेव्हापर्यंत मॅचफिक्सींगचा निकाल लागत नाही. तेव्हापर्यंत त्या खेळाडूंनी स्पर्धेबाहेर राहायचं.
मॅचफिक्सींग........त्या मॅचफिक्सींगनं सुरेशवरही शंका व्यक्त करण्यात आली होती. कारण तोही चांगलं खेळत नव्हता. परंतु जशी ती वर्तमानपत्रातून बातमी झळकली. तसा त्याला आनंद झाला. त्यालाही वाटलं की आता बुकी काही दिवस का असेना, चूप बसतीलच व आपण चांगलं प्रदर्शन केल्यास आपल्याला कोणी रोखणार नाही. त्यानंतर तो चांगला खेळू लागला होता.
सुरेश चांगला खेळू लागला होता. तो चांगला खेळू लागताच इतर लोकांमध्ये जास्त जोश निर्माण झाला. चाहते म्हणायला लागले की आता सुरेशचा फॉम चांगला परत आलेला आहे. तो चांगला खेळतो आहे. तसं पाहता सुरेशच्या या प्रदर्शनानं चाहते चांगलेच आनंदी झाले होते व आता मॅचमध्ये चांगलीच भीडही दिसू लागली होती.
सुरेशचं मॅचमध्ये होत असलेलं चांगलं प्रदर्शन. अशातच ते साल उजळलं व पुन्हा नेहमीप्रमाणेच त्या वर्षाचा तो वल्डकप भारत खेळू लागला. ज्यात सुरेशचा समावेश होता. तो चांगले प्रदर्शन करु लागला होताच. तसा या वर्ल्डकपमध्ये त्याचं प्रदर्शन चांगलंच होतं. तसे याही वल्डकप दरम्यान पुन्हा बुकी सरसावले. शेवटी त्याच्या प्रदर्शनावर पुन्हा बुकींचा सट्टा लावणे सुरु झाले. ते पुन्हा त्याचेकडे आले. त्यांनी त्याला मागे जशी धमकी दिली होती. तशी धमकी दिली व म्हटलं की नसेल पैसे घ्यायचे तर नको घेवूस. परंतु निदान प्रदर्शन तरी चांगलं करु नकोस. नाहीतर आम्ही तुझा नाही तर तुझ्या परीवाराचा तरी नक्कीच जीव घेवू.
ती वल्डकपची मॅच. ती मॅच देशाची होती. देशाला १९८३ सारखं मानांकन मिळवून देणारी होती. तसा सुरेश भारतीय संघाकडून खेळत होता. तो विचार करु लागला.
'यावेळेस आपण बुकीचं काहीएक ऐकायचं नाही. चांगलं प्रदर्शन करायचं. देशासाठी खेळायचं. चांगलं खेळायचं.'
शेवटी चांगलं खेळायचं असा विचार करताच त्यानं बुकींचं काहीएक ऐकलं नाही. तसा तो चांगला खेळायला लागला होता.
सुरेश चांगला खेळत आहे व सामने जिंकत आहेत हे पाहून बुकी संतापून गेले होते. त्यातच तो जर असाच चांगला खेळत राहिला तर उद्या फायनलही भारत जिंकेल असं बुकींना वाटत होतं. बुकी देशातच राहणारे होते. तसा आपला देश जिंको की न जिको, त्यांना फक्त पैशाशीच देणंघेणं होतं. देशाशी काही घेणंदेणं नव्हतं. कारण ते एका आंतरराष्ट्रीय गिरोहात काम करीत होते. जे सट्टा खेळण्यात माहीर होते. अशातच भारत फायनलपर्यंत पोहोचला होता सुरेशच्या प्रदर्शनानं. त्यानं कोणत्याच बुकीचं ऐकलेलं नव्हतं आणि आता फायनल होणार होती.
भारत फायनलपर्यंत पोहोचला होता. तसा आस्ट्रेलियन संघ यावेळेस फायनलला आला होता. त्याही संघानं अतिशय मेहनत केली होती. कोण जिंकणार हे माहीत नव्हतं. कारण दोघांचेही पारडे जडच होते. अशातच लोकांना वाटत होतं की आपला देश जिंकणार. तर बुकींना वाटत होतं की दुसऱ्या संघानं जिंकावं. कारण भारत जिंकणार असा विश्वास करुन जास्त पैसा सट्ट्यामध्ये लागला होता तर अतिशय नाहीच्या बरोबरचा पैसा आस्ट्रेलियन संघाकडून लागला होता. त्यातच बुकींचं होणार असलेलं नुकसान विचारात घेवून.
बुकी विचार करीत होते की आता फायनल होणार व आपण करोडो रुपयानं बुडणार. कारण लोकं विशेषकरुन आस्ट्रेलियन संघाकडूनच पैसे लावणार नाहीत. भारतीय संघाकडून पैसे लावणार व नेहमीप्रमाणेच सुरेश चांगलं प्रदर्शन करणार. असा विचार करुन बुकीनं त्याच्या शरीरावरच घाव घातला. फायनलला तीन दिवस वेळ आहे याच दरम्यान काहीतरी करायला हवं असा विचार करणाऱ्या बुकीनं एक दिवस त्याला एकट्यात पकडलं व एका अज्ञात वाहनानं त्याचा अपघात केला व बिचारा सुरेश देशाच्या फायनल मॅचमध्ये खेळू शकला नाही. त्यातच या सामन्यात त्याच्या देशाचे गडी वरचेवर बाद झाले होते. एकही देशीय फलंदाज इतर गोलंदाजांसमोर टिकू शकला नव्हता व देशालाही जास्त धावा बनवता आल्या नव्हत्या. त्यातच देशाला या वर्षाच्या फायनलमध्ये तो फायनलमध्ये जरी पोहोचला असला तरी फायनलचा सामना जिंकता आला नव्हता.
बुकीला माहीत होते की जर सुरेश फायनलच्या क्रिकेटमध्ये असेल तर ती फायनलही देश जिंकेल. म्हणूनच की काय, त्यांनी सुरेशला क्षय पोहोचवायचं ठरवलं. त्यातच एक दिवस त्याचा अपघात झालाच व तो अपंग झाला होता.
रस्ते अपघात.......ते खरंच टाळता येवू शकतात हे खरं आहे. कारण आपण जर गाडी चालवत असलो तर रस्त्यावर गाडी चालविण्याचे काही नियम ते आपण पाळायला हवे. तर आपला रस्त्यावरचा अपघातच होत नाही. परंतु काही काही अपघातच जाणूनबुजून करवले जातात. जे अपघात नैसर्गीकरित्या होत नसतात.
अपघात हे साधारणतः होत नाहीत. कारण त्याचे नियम असतात. ते पाळले की अपघात होत नाहीत. परंतु काही काही अपघात असे असतात की ज्या अपघातात नियम पाळा की नका पाळू. ते होतातच. कारण ते घडवले जातात.
सुरेशचा अपघात असाच झाला होता. बरं झालं की त्याचं नशीब बलवत्तर होतं. तो वाचला. संकट फक्त त्याच्या पायावर निभावलं होतं व तो अपंग झाला होता.
रस्ते अपघात. ही एक गंभीर बाब आहे. ते टाळता येवू शकतात काय? तर याचं उत्तर होय असंच आहे. परंतु त्याचे काही सरकारनं नियम घालून दिले आहेत, ते नियम पाळले तर........
अलिकडे घराच्या बाहेर पडणारा कोणताही व्यक्ती घराच्या बाहेर पडल्यावर तो केव्हा परत येईल? परत येणार की नाही? हे प्रश्न संभ्रमाचे ठरतात. कारण नेहमी रस्त्यावर अपघात घडत असतात. त्यातच बसचेही अपघात घडत असतात. समृद्धी महामार्गावर असे कितीतरी अपघात घडलेले आहेत. त्यामध्ये बसचेही अपघात सहभागी आहेत.
होणारे हे अपघात लक्षात घेता ते टाळण्यासाठी महाराष्ट्रातील एस टी महामंडळाकडून एक निर्णय घेतला होता. चालकाला त्यांनी ती गाडी चालवत असतांना मोबाईलवर बंदी घातली होती. त्याचं कारण होतं, अपघात टाळणं. हा निर्णय योग्य व स्तुतीस्पद होता. कारण मोबाईलवर बोलत असतांना एक लक्ष दुसरीकडून मोबाईलवर बोलणाऱ्या व्यक्तीकडे असायचं तर दुसरं लक्ष त्याचं वाहन चालविण्यात. अशावेळेस कधीकधी फोनवरुन आडवे तिडवे बोलणे ऐकायला येत. त्यावेळेस चालकाचं डोकं खराब होत असे व त्याचं बसवरुन नियंत्रण सुटत असे व अपघात होत असे. व्यतिरिक्त तसंही बोलणं मोबाईलवर नसलं तरी बोलतांना लक्ष विचलीत झाल्यास चालकाचं नियंत्रण तुटतं. म्हणूनच एस टी महामंडळाचा तो निर्णय स्तुत्य होता.
आज तसं पाहता एस टी महामंडळाकडून जसा मोबाईलवर न बोलण्याचा निर्णय घेतला होता. तसेच निर्णय सरकारनंही इतर वाहन चालकांसाठी घ्यावेत. त्यातच अपघात टाळण्यासाठी आणखी बरेच नियम लावावेत. ते बंधनकारक करावेत. जेणेकरुन अपघात टाळता येतील.
अलिकडे दारु पिणे वा नशा करणे व दारु पिवून वाहन चालविणे वा नशा करुन वाहन चालवणे ही सामान्य गोष्ट वाटते लोकांना. असे बरेचजण आहेत की जे दारु पिवून व नशा करुन वाहन चालवीत असतात. तसं वाहन चालवितांनाही नशेतून मेंदूचं लक्ष विचलीत होतं. त्यातच अलिकडील काळात पॉवर स्टेरींग आलंय. त्यामुळं तर निश्चितच अपघात होत असतात. याबाबतीत एका वाहनचालकाच्या अपघाताचा प्रसंग आहे.
एकदा चार मित्र फिरायला निघाले. ते एका इनोवा गाडीत गेले. ज्या गाडीला पॉवरस्टेरींग होतं. ती गाडी ते मित्र चालवीत होते. ते जेव्हा परत फिरले. तेव्हा त्या मिंत्रांनी रस्त्यावर दारु ढोसली. त्यानंतर त्या मित्रांपैकी एकजण गाडी चालवायला लागला. त्यातच सायंकाळची वेळ होती. बाहेरची थंडी हवा लागत होती. त्यातच ती नशा हळूहळू वाढली. ती एवढी वाढली की चालकाला गाडी कशी नियंत्रीत करायची ते कळेना, त्यातच त्याचं गाडीवरचं नियंत्रण तुटलं. तशी गाडी वेगातच होती. अशातच पुढे एक वळण आलं. आता चालकानं त्या वळणावरुन गाडी वळवत असतांना ब्रेकवर पाय ठेवला. परंतु तो पाय ब्रेकवर न पडता थेट एक्सीलेटरवर पडला व गाडी सुसाट वेगानं धावायला लागली. आता त्या गाडीच्या वेगानं व अंगातील दारुच्या नशेनं चालकाला सुचतच नव्हतं की ब्रेकवर पाय ठेवून गाडीला नियंत्रीत करायला हवं. त्यातच गाडीला पॉवर स्टेरींग असल्यानं तर आणखी समस्या. मग काय अपघात होणारच. तसा त्याचा अपघात झालाच. गाडी झाडाला ठोकली. एअरबॅग निघाल्या व चालक आणि त्याच्या बाजूलाच बसलेला मित्र वाचला. मागचेही वाचले. मात्र एअरबॅग निघाल्यानं चालकाची खुर्ची मागं सरकली व ती खुर्ची मागं सरकल्याने मागच्या खुर्चीवर जो पाय लांब करुन बसलेला होता. त्याच्या पायाला अपघात झाला. तो एवढा अपघात तीव्र होता की त्याचं पायाचं हाड तुटलं. बरं झालं की चारही जण वाचले होते. नाहीतर चारही जण मरण पावले असते ही शक्यता नाकारता येत नाही. असे होतात अपघात.
अपघात टाळण्यासाठी बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. परंतु चालक त्या गोष्टी करीत नाहीत. म्हणूनच अपघात होतात. अशा गोष्टी केल्यास अपघात टाळता येतो.
अपघात.......अपघात टाळण्यासाठी काही गोष्टी सांगणे गरजेचे आहे. त्यातील मुख्य गोष्ट करावी, ती म्हणजे वेगावर नियंत्रण. वेगावर नियंत्रण ही अशी गोष्ट आहे की जी हमखास अपघात टाळू शकते. जी सिस्टीम बसमध्ये वापरली जाते. गाडी जर वेगात असेल तर गाडीला नियंत्रीत करणं कठीण जातं. म्हणून गाडी कमी वेगातच असावी. अन् सरकारचाही वाहन चालविण्याचा परवाना देतांना तोच नियम आहे. परंतु लोकं ऐकतील तेव्हा ना. लोकं वाहनाचे नियम न पाळता आपल्याच मनमर्जीनं गाड्या चालवत असतात. आपली वाहने व अपघात घडवून आणतात. आपणही मरतात अन् दुसऱ्या निरपराध व्यक्तीलाही मारतात.
दुसरी महत्वाची गोष्ट आहे पाहणे. चालकानं आपली गाडी पुढे पाहातच चालवावी. त्यातच गाडी वळवायची असल्यास आरशातून वा स्वतः मागेपुढे पाहात वळण घ्यावे. तेही कोणाशी न बोलता चालता. त्यातच पुर्ण होशहवासात. जर चालक पुढे पाहात नसेल व इकडच्या तिकडच्या भागाकडे लक्ष देत असेल वा गोष्टी करीत असेल आणि त्याचवेळेस अचानक एखादा व्यक्ती वा गाडी वा प्राणी पुढे आल्यास चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटतं व अपघात घडतो. जर तो गोष्टी करीत नसेल वा पुढेच पाहात असेल वा तो गाडी चालवत असेल, त्यातच त्याचा वेगही नियंत्रणात असेल तर त्याला दुरुनच संभाव्य संकट दिसतं व अपघात होत नाही. तो टाळता येतो. हे नियम दोन्ही पक्षानं पाळायची असतात. हे नियम जर एकच पक्ष पाळत असेल तरही अपघात होत असतो.
महत्वाचं सांगायचं झाल्यास आज एस टी महामंडळाकडून मोबाईल बंदीचा वटहुकूम आला आणि पर्यायानं अपघात टाळण्यासाठी तो एक उत्तम पर्याय आहे. कारण त्या बसचालकाच्या हातात सत्तर अंशी प्रवाशांचं भविष्य असतं. तसाच नियम सरकारनंही सर्व वाहनचालकांसाठी लागू करावा. कारण तेही देशाचेच भविष्य असतात. तसंच बसचालकांसाठी वा इतर वाहन चालविणाऱ्यांसाठी कमी वेगात गाड्या चालवणे, दारु वा नशा करुन गाड्या न चालवणे, झोप वा झोपेची धुंदी येत असेल तर गाडी न चालवणे, कुणाशी बोलत चालत गाड्या न चालवणे, होशहवासात व पुर्णतः लक्षपुर्वक गाड्या चालवणे व विशेष सांगायचं म्हणजे मनात इतर कोणतेही विचार न करता गाड्या चालवणे महत्वाचे आहे. असे नियम हे सर्वांनीच पाळावे. हे नियम काही सरकार सांगणार नाही.
अपघात टाळण्यासाठी मनात कोणतेही विचार न करता गाड्या चालवणे ही अतिशय महत्वाची बाब आहे. बरेचसे अपघात यामुळंच होत असतात. तसं पाहिल्यास हा नियम सरकारही लागू करु शकत नाही. कारण मन तुमचं आहे. सरकार कसं जाणेल तुमचं मन. त्यामुळं ते तुमच्या मनातील विचारांच्या बाबतीत कोणते नियम बनवणार. कोणतेच नाही. ती गोष्ट आपल्यालाच पाळायची आहे. तर कोणताही अपघात होणार नाही.
विशेष म्हणजे आपण आपल्या स्वतःचा व इतरांचाही जीव वाचवू शकतो हे तेवढंच खरं आहे. परंतु आपण वरील नियम स्वतः पाळू तेव्हा ना. आपण ते पाळत नाही, म्हणूनच अपघातही होत असतात. तसेच आजचा हा धकाधकीचा व वाढत्या लोकसंख्येचा काळ पाहिला तर आपला वा आपल्यामुळं इतर कोणाचा अपघात केव्हा होईल ते सांगता येत नाही. म्हणूनच वाहन चालवतांना वरील प्रकारचे नियम पाळून वेळीच काळजी घेतलेली बरी. जेणेकरुन अपघात टाळता येईल. तसेच आपला वा इतरांचाही जीव वाचवता येईल हेही तेवढंच खरं आहे.
अपघात होत नाहीत, जर आपण वाहन चालवितांना योग्य काळजी घेतली तर........योग्य काळजी घेतली तर आलेल्या यमालाही दूर पाठवता येतं. जरी तो अपघात कोणी जाणूनबुजून करण्याचा प्रकार करीत असला तरी. सुरेशचं असंच झालं होतं. तो वल्डकप फायनल खेळू नये, म्हणून बुकीनं जाणूनबुजून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचं नशीब जोरदार होतं. म्हणूनच तो वाचला.
अपंग झालेला सुरेश.......त्याचं विश्वकप फायनल खेळण्याची फार इच्छा होती. यावर्षी तो जर खेळला असता तर कदाचीत वल्डकपाला देशानं गवसणी घातली असती. ते त्याचं स्वप्न होतं. परंतु ते स्वप्न स्वप्नच राहिलं होतं. तो वल्डकप खेळू शकत नव्हता. तसा त्याला फार पश्चाताप येत होता.
एक सैनिक...... एक सैनिक, ज्याला युद्धात लढतांना मरण आलं तर बरं वाटतं. कारण त्याची नियुक्तीच त्या गोष्टीसाठी झालेली असते. परंतु ते सहजासहजी निवृत्त झाले तर ते त्याला बरे वाटत नाही. अगदी तसंच घडलं होतं सुरेशच्या आयुष्यात. ते खेळायचं वय व त्या वयात मनात असलेली खेळण्याची उत्तूंग इच्छा. देशासाठी काही करण्याची गरज. तशी गरज मनात ठेवून तो या वल्डकपमध्ये देशासाठी खेळला होता.
आज तो अपंग झाला होता व त्यावेळचा वल्डकप खेळला नसल्यानं देशाला वल्डकपपासून मुकावं लागलं होतं. तसाच तो फायनल न खेळल्यानं जो देश फायनल जिंकला होता. त्या देशाच्या एका खेळाडूनं वल्डकपवर पाय ठेवला होता. हा अपमान होता देशाचा. त्यामुळंच तो अपंग होवूनही त्यानं प्रणव केला होता की जेव्हापर्यंत तो त्या अपमानाचा बदला घेणार नाही. तेव्हापर्यंत तो स्वस्थ बसणार नाही. तो अपंग झाला होता. परंतु त्यानं जिद्द सोडली नव्हती व त्याच जिद्दीच्या भरवशावर तो आगामी काळात आणखी एका वल्डकपच्या पायाभरणीची पावलं उचलीत होता.

*****************************

वल्डकप फायनल भाग २

सुरेश अपंग झाला होता व तो आता वल्डकपच नाही तर कोणत्याही खेळात खेळू शकत नव्हता. तशीच त्याची वल्डकप जिंकायची इच्छा ही इच्छाच राहिली.
सुरेश जसा वल्डकप खेळू शकत नव्हता. तसा त्याला त्याच्या घरीही त्रासच होता. तो अपंग होताच तो रात्रंदिवस घरी राहात होता. तशी आता त्याची बायको त्याला त्रासच द्यायला लागली होती. तसं त्याला त्याचं प्रेम आठवायला लागलं. त्याच्या पत्नीचं नाव सरु होतं.
सरुशी त्याचं प्रेम झालं होतं. ती सरु त्याची प्रेमाची पत्नी होती. ती पत्नी त्याचेवर प्रेम करीत होती. परंतु ते प्रेम आज त्याला परायासारखं वाटत होतं. तशी त्याच्या मनातील जिद्द उन्मळून पडत होती. आज त्याच्या मनात असलेली ती जिद्द. ती उन्मळून पडतांना पाहून त्याच्या मनात विचार येत होता, तो विवाहाचा. त्याला वाटत होतं की त्याला तसा प्रेम विवाह करावा नसता लागला तर बरे झाले असते.
अलीकडील काळात शिक्षणाला फारच महत्त्व प्राप्त झालं आहे व त्यानुसार विद्यार्थ्यांना शिकवले जात आहे. याचा अर्थ असा की विद्यार्थी हा सर्वगुणसंपन्न व्हायला हवा. मग पुर्वी काय शिकवीत नव्हते काय? पुर्वीही शिकवीत होतेच व पुर्वीही विद्यार्थी सर्वगुणसंपन्न बनत होतेच. मात्र बव्हंशी पुर्वीच्या शिक्षणात आणि आताच्या शिक्षणात बराच फरक आहे.
आजपर्यंत आपण पाहिलं की शिक्षण शिकवितांना ते शिक्षण कसं शिकवायचं हेच आपल्याला कळत नव्हतं. सगळं माहीत होतं. कधीकधी त्याचा वापरही करीत होतो आपण. परंतु त्या पद्धतीचा वापर सातत्यानं करीत नव्हतो. त्या पद्धती कोणत्या? असा विचार नक्कीच आपल्या मनात येईल.
आपण शिकवीत होतो त्या पद्धती होत्या. भीती, बक्षीस, प्रेरणा आणि स्वयंप्रेरणा. या चार पद्धतीत पहिली जी पद्धत आहे भीती. तीच जास्त वापरत आलो आजपर्यंत शिकवीत असतांना. कधीकधी आपण आदरयुक्त भीती दाखवली तर कधी आपण भीतीयुक्त आदर दाखवला. यातूनच आपण जेव्हा जेव्हा वस्तीत जायचो. तेव्हा आपली मुलं आपल्यासमोर यायची नाहीत. ती जर कंचे वा इतर खेळ खेळत असतील तर पडून लपून जायचे. आज तसं नाही. आज जर आपण वस्तीत गेलोच. तर मुलं जवळ येतात. नमन करतात व बोलून संवाद साधतात. तसं पाहता अलीकडील काळ तर डिजीटल काळ आला आहे.
भीती, बक्षीस, प्रेरणा व स्वयंप्रेरणा या अलीकडील काळातील शिकविण्याच्या पायऱ्या आहेत. काल भीती ही पायरी प्रत्येकजण वापरत होता. कधी कधी बक्षीस ही देखील पायरी वापरत होतो आपण. परंतु प्रेरणा वा स्वयंप्रेरणा ह्या गोष्टी आपण वापरत नव्हतो.
अलीकडील काळात शिकवितांना भीती हा पर्याय कालबाह्य झाला आहे नव्हे तर करायचा आहे. कारण भीतीनं राग मनात कुटकूट भरला जातो. तसंच बक्षीस हा पर्यायही एखाद्याच वेळेस वापरायचा आहे. कारण बक्षीस हा पर्याय वापरल्यानं विद्यार्थ्यांच्या मनात लोभ निर्माण होतो. शिवाय राग व लोभ या गोष्टी षडरिपुतील घटक आहेत. त्यानंतर येणारा घटक आहे प्रेरणा. परंतु प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येकवेळा कोण प्रेरीत करेल ही संभावना नाकारता येत नाही. तशीच ती त्यावेळेस प्रेरणा देतांना ती कशी द्यावी हेही आठवायला हवं. ती प्रेरणा ऐनवेळेस आठवत नाही. हं, एखाद्या वेळेस या तिन्ही पर्यायाचा वापर करता येईल. मग शिकवायचा आणखी एक पर्याय आहे स्वयंप्रेरणा. होय, स्वयंप्रेरणाच. विद्यार्थ्यांना शिक्षकानं असं मार्गदर्शन करायचं आहे की तो स्वतःच एखाद्या गोष्टीवर प्रेरीत होईल व तो स्वतःच शिकेल.
आजचं शिक्षण हे डिजीटल आहे. या काळात निराशा लवकर पदरी येते. साधा व्हिडीओ बनवला. तो फेसबुकवर टाकला आणि त्याला लाईक आल्या नाहीत तर मुलं आत्महत्या करतात असा हा काळ आहे. त्यामुळंच या काळात मुलं निराशच होणार नाही तर त्यांना निर्माण झालेल्या शंकेवर ते स्वतःच तोडगा काढू शकतील असं शिक्षण त्यांना द्यायचं आहे.
महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांचा जर खऱ्या अर्थानं विकास साधायचा असेल तर त्यांना आता जास्त शिकवायची गरज नाही. जास्त बोलायचीही गरज नाही. थोडंसंच शिकवायची व बोलायची गरज आहे. तर विद्यार्थ्यांना असं सांगायची गरज आहे की ते स्वतःच शिकतील. स्वतःच प्रश्न निर्माण करतील व स्वतःच त्याची उत्तरं शोधतील. आता त्यांच्या मनातील पुर्ण स्वरुपात भीती नष्ट करायची आहे. तशाच त्यांच्या शिकण्याच्या वेळाही. शिवाय त्यासोबतच त्यांच्या बैठक व्यवस्थाही. त्यांनी बाकावरच बसायला हवं. शांतच बसायला हवं. खालीच बसायला हवं असंही बंधन नको. ते कुठेही बसू शकतात. खाली चटईवर वा बेंचवर वा उभेही राहून शिकू शकतात. वर्गात कुठंही फिरु शकतात. अर्थात मुक्त विहार करु शकतात. हा बदलाव आला आहे नवीन शिक्षणात. कारण आपला भारत सर्व गोष्टीत निपुण करायचा आहे.
विशेष म्हणजे देशाला निपुण करण्यासाठीच हा शिक्षणातील बदलाव. तो बदल कोण करतो तर शिक्षक. कारण जसा विद्यार्थी हा देशाचा कणा आहे, तसाच शिक्षकही कणाच आहे देशाचा. जर शिक्षक नसेल तर देशाला चालविण्यासाठी कोणीच मिळणार नाही. म्हणूनच शिक्षणाच्या बाबतीत शिक्षकांवर भर दिला जात आहे. त्यानुसार शिक्षकानंही स्वतःच तसा बदलाव करुन त्यांना आलेली पठारावस्था झटकायची आहे व विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास करणे हे आपले आव्हान समजून ते आव्हान त्यांना पुर्ण करायचे आहे यात शंका नाही.
अलिकडील काळ हा जास्त वाईट काळ आला आहे. आता वातावरण एवढं खराब झालं आहे की आईबाप आपल्या मुलाला ओळखत नाही व मुलं आपल्या मायबापाला. त्यामुळंच मुलांवर कसे संस्कार टाकायचे? याचा विचार मायबापाला पडल्याशिवाय राहात नाही. आजची मुलं शिकविणाऱ्या शिक्षकांचंही ऐकत नाहीत. याला जबाबदार कोणता घटक असावा? असा विचार केल्यास नक्कीच विद्यार्थ्यांवर असणारा शिक्षकाचा पुर्वीचा धाक. पुर्वी शिक्षक विद्यार्थ्यांचं भविष्य घडवीत असायचे. त्यासाठी ते बालपणापासूनच विद्यार्थ्यांना शिक्षा करायचे. घरी वडीलांचाही धाक असायचा. वडील शिक्षकाला म्हणायचे,
"गुरुजी, मारा पिटा, काहीही करा. परंतु माझा मुलगा शिकला पाहिजे, त्याच्यात संस्कार फुलले पाहिजेत."
वडीलांचं ते म्हणणं असायचं. त्यातच घरीही आईवडील चांगले मारायचे. म्हणून मुलांवर चांगले संस्कार घडण्याचे प्रमाण पुर्वी जास्त होते. मुलं अगदी बालवयापासूनच आईवडीलांच्या आज्ञेत वागत असत. परंतु काही दिवसानं लक्षात आलं की यात लहान मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून त्यांचा हक्कं मारला जातोय. त्यानंतर मुलांना मायबापानं मारणं बंद केलं. त्यातच लोकसंख्या वाढीवर मर्यादा घालण्यासाठी लोकांनी कुटूंबनियोजन केलं व एक किंवा दोनच मुलं ठेवली. या कुटूंबनियोजनातूनच ती मुलं नंतरच्या काळात लाडाची बनली. त्यानंतर लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत काही नियम आले. त्याचाच फायदा आईवडीलांनीही घेतला व विद्यार्थ्यांना एखाद्या शिक्षकाने मारल्यास त्या शिक्षकाला तासायला आईवडीलांनी मागंपुढं पाहिलं नाही. यातूनच संस्कार नावाचा व शिस्त नावाचा जो घटक होता, तो साहजीकच दूर पळाला. आता मुलं ना घरी कोणत्याच मायबापाला ऐकत. ना शाळेतील कोणत्याच शिक्षकाला. ते सर्वांनाच ब्लॅकमेल करीत असतात. याबाबत सुरेशचा प्रसंग.
सरु नावाची ती एक मुलगी. ती दहावीला होती व तिनं सुरेशशी त्याच वर्गात असतांना प्रेम केलं. त्यानंतर ते प्रेम त्याच वर्गात असतांना तिच्या आईवडीलाला माहीत झालं व त्यांनी तिच्या वयाचा विचार करता तिला रागावणं सुरु केलं. परंतु ते मायबापाचं रागावणं तिला पटलं नाही व तिनं आपल्याच जन्मदात्या मायबापाची तक्रार पोलिस स्टेशनला केली. म्हटलं की तिचे मायबाप तिला फारच त्रास देतात.
ती मुलगी.......त्या मुलीचं दहाव्या वर्गातच होणारं सुरेशवरील प्रेम. आपण प्रेम का करतो? हा मुलगा आपल्याला जीवनभर सोबतीला राहील का? याची पुसटशी कल्पना नसणारं ते वय आणि त्याच वयात तिचं प्रेम. त्यातच तिला असणारं कायद्याचं अभय. खरंच तिला संस्कारापासून दूर ढकलत होतं. बरं झालं की ती अठरा वर्षाची नव्हती. नाहीतर तिनं आपल्या मायबापालाच तुरुंगाची हवाच खायला लावली असती. तसं पाहता वय वर्ष अठरा जरी झाले तरी मुलांना आवश्यक गोष्टी कळतात का? तर याचं उत्तर नाही असंच येतं. मुलं जवळपास पंचवीस तीस वर्षाचे होत नाहीत, तेव्हापर्यंत त्याला निर्णय घेण्याच्या गोष्टी कळत नाहीत. काहींना तर तेही वय पार करावं लागतं. त्यानंतरचंही वय पाहावं लागतं.
मायबाप......... त्यांचा कोणता गुन्हा असतो, मुलं अठरा वर्षाची झाली की त्यांची तक्रार ते विनाकारण पोलीस स्टेशनला टाकतात. ते आपल्या मुलाला लहानाची मोठी करीत असतात. कशासाठी? तर त्याचंच जीवन फुलावं. ते जरी वाह्यात निघाले तरी ते वाईट नसतात आपल्या मायबापासाठी. ते मायबाप फक्त आपल्या मुलाचं भविष्यातील सुख शोधत असतात. म्हणूनच ते विरोध करतात काही काही गोष्टीत. ते प्रेमविवाहाला विरोध करीत असतात. जे प्रेमविवाह करीत असतात तेही आणि जे असा विवाह करीत नाहीत तेही. कारण त्यांना प्रेमविवाहाचे परिणाम माहीत असतात.
प्रेमविवाह.......प्रेमविवाहाचे फायदे कमी व नुकसानच जास्त असतात. हो, मनासारखा जोडीदार नक्कीच मिळतो की जो सुरुवातीच्या काळात प्रलोभन जास्त देतो. परंतु एकदा का संसारात पडलं की सारं ब्रम्हांड आठवतं. जो जोडीदार प्रलोभन देतो, मोठमोठी आश्वासन देतो, तोच जोडीदार वयाच्या अगदी शेवटच्या काळापर्यंत सोबत करेल असं सांगता येणं कठीणच असतं. अपवाद दोनचार जणांचा प्रेमविवाह करुन संसार चांगला होणे याला चांगला प्रेमविवाह म्हणता येत नाही. प्रेमविवाहाच्या फायद्यापेक्षा नुकसानाचेच प्रमाण जास्त आहे. म्हणूनच सर्वसाधारण मायबाप मुलांचा प्रेमविवाह करायचं टाळतात. परंतु कायद्यात अलिकडील काळात मुलांना अठरा वर्षानंतर अभय दिलं गेल्यानं मुलं प्रेमासाठी आपल्या मायबापांना तुरुंगात टाकायलाही मागेपुढे पाहात नाही. त्यावेळेस ते असा विचारही करीत नाहीत की याच मायबापानं आम्हाला लहानाचं मोठं केलेलं आहे.
मुलांच्या उभ्या आयुष्याचं नुकसान होत असतांना त्यांची अडवणूक करणारे मायबाप. अन् त्यांच्या घरात डोकावून न पाहणारे कायदे प्रेमविवाहाचं समर्थन करतात. ठीक आहे. परंतु भोगावं कोणाला लागतं? त्या मायबापाच्याच मुलांना की नाही. परंतु ही गोष्ट मुलं जेव्हा प्रेमविवाह करतात, तेव्हा कळत नाही. ते कळतं, ती वेळ निघून गेल्यावर. ज्यावेळेस असा प्रेमविवाह होतो, त्यानंतर असा प्रेमविवाह करणाऱ्या कोणत्याच मुलामुलींना समाज स्विकारत नाही. मायबापही स्विकारत नाही. काही दिवसानं पती पत्नीतही किंतू परंतु कारणानंतर खटके उडतात. असे खटके उडतात की त्या खटक्यावर विरंजण घालणारं कोणीच नसतं. समजावून सांगणारं कोणीच नसतं. मग आत्महत्येचे विचार मनात घोळत असतात. त्यातून कोणी डिप्रेशनमध्ये जातो. कोणी नक्कीच आत्महत्या करतो तर कोणी एकमेकांना सोडूनही जातात व असे सोडून गेल्यानंतर एकाकी जीवन जगावं लागतं. कोणी तर अशा भोळ्या भाबड्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून वेश्याव्यवसाय करायलाही भाग पाडतात. बळजबरीनं वेश्याव्यवसायात ढकलतात.
हाच प्रेमविवाह. असा असतो प्रेमविवाह. आयुष्यभर काबाडकष्ट करुन मुलांना मोठं करणारे मायबाप. परंतु मुलं त्यांच्या कोणत्या अपेक्षा पुर्ण करतात? कोणत्याच नाही. शिवाय ते त्रास देत असतात मायबापांना. प्रेमविवाहानंतर एवढे भयंकर गंभीर परिणाम निघतात की जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे त्याप्रमाणेच त्याचे परिणाम जेव्हा पाहायला व अनुभवायला मिळतात की मग वाटतं, प्रेमविवाह हा बरा नाही. आम्ही प्रेमविवाह नसता केला तर बरं झालं असतं. असा प्रेमविवाह करणारे जेव्हा पश्चाताप करीत असतात व लोकांना मार्गदर्शन करीत असतात. तेव्हा त्यांचंही कोणी ऐकत नाही. कारण प्रत्येकाच्या मनावर प्रेमाचं भूत आरुढ झालेलं असतं. जे भूत पदोपदी सांगत असतं. प्रेमविवाह कर आणि फस. जेव्हा व्यक्ती प्रेमविवाह करुन फसतो. तेव्हा अशा प्रेमाच्या भुतांना अतिशय आनंद होत असतो. जो आनंद मुल्यात मोजताच येत नाही. मात्र प्रेमविवाह झाल्यानंतर जेव्हा त्याचे गंभीर परिणाम दिसायला लागतात. तेव्हाच हे भूत उतरतं. पश्चातापाची वेळ येते. परंतु तेव्हा आयुष्याच्या बनावटीची वेळ बरीच दूर निघून गेलेली असते. म्हणून प्रेमविरांनो, प्रेम करा. त्यानंतर प्रेमविवाहही करा. प्रेम करायला व प्रेमविवाह करायलाही कोणाचीच कोणतीच मनाई नाही. परंतु त्याचे गंभीर परिणाम लक्षात घ्या व होणाऱ्या नुकसानीपासून वाचा आणि तसं वाचायचंच असेल तर प्रेम वा प्रेमविवाह नक्कीच टाळा. त्या बदल्यात त्याच वयात आपल्या करीअरचा विचार करा. त्या करीअरला उध्वस्त होवू देवू नका. ते बनवा. ते बनवाल तर खरंच तुमचाच भाग्योदय होईल. तुमचंच आयुष्य घडेल आणि त्याचा फायदाही तुम्हालाच होईल. मग त्याचा फायदा समाज, मायबाप व इतरांनाही होवू शकेल यात शंका नाही.
सुरेश हा असा मुलगा की त्यानं आपल्या मायबापाला न विचारता आपला विवाह केला होता. आतापर्यंत तो करीअरनं बाहेर होता. तशीच आतापर्यंत त्याला आपल्या मायबापाची आठवण येत नव्हती. कारण त्याचं सगळं बरोबर होतं. परंतु जसा तो अपंग झाला, तशी त्याला त्याच्या मायबापाची आठवण येवू लागली. कारण त्याच्यावर त्याची पत्नी जुलूम करायला लागली होती.
सुरेशला दोन मुलं होती. त्या मुलांपैकी मोठा मुलगा चांगला होता. तो हुशार होता व त्याला त्याच्या वडीलांसारखीच सवय होती. तोही क्रिकेट प्रेमीच होता व त्याला वाटत असे की आपणही आपल्या वडीलांसारखं चांगलं काम करावं. आपणही आपल्या वडीलांसारखीच उत्कृष्ट कामगीरी करुन आपण वल्डकप जिंकावा. तसं पाहता वडीलांची इच्छा पुर्ण करण्याचं स्वप्न होतं त्याचं. ते स्वप्न पुर्ण कसं करता येईल याचा विचार तो करीत होता. त्यासाठी तो आपल्या वडीलांचं मार्गदर्शन मागत होता. परंतु त्याचे वडील सुरेश हे त्याला कसं मार्गदर्शन करतील? ते तर अपंग होते. तसा अनिलही आज क्रिकेट खेळायला लागला होता.
तो एक दिवस. त्या दिवशी निराशेनं सुरेश एका मैदानात झाडाखाली बसला असतांना सहज त्याला त्याच्या गावचं मैदान आठवलं. ते मैदान, ज्या मैदानातून त्यानं क्रिकेटची सुरुवात केली होती व आज तो वल्डकप खेळण्यापर्यंत पोहोचला होता. ते गावचं मैदान होतं आणि त्या गावच्या मैदानात असंच एक डेरेदार आंब्याचं झाड होतं. त्याच आंब्याच्या झाडाला ती मुलं स्टंप बनवायचे. आज ते झाड गावाकडं होतं की काय, ते त्याला माहीत नव्हतं. परंतु तो इतिहास त्याला आठवत होता.
ते मैदानातील डेरेदार झाड. त्या झाडाखाली तो बसला असतांना जसं त्याला गावचं मैदान व आंब्याचं झाड आठवलं. तसंच आठवलं त्याला त्यानं केलेला विवाह. त्यानं प्रेमविवाह केला होता. त्यामुळं मायबापाशी त्याचं सुरुवातीला पटलं नाही व त्यांनी त्याला आपल्या घरातून हाकलून दिलं. तसा करीअरचा प्रश्न होताच. परंतु जसजसा काळ गेला. तसंतसं त्याचं जीवन बदललं व काही दिवसानंतर त्याच्या मायबापानं त्याचा व त्याच्या पत्नीचा स्विकार केला होता.
सुरेशनं प्रेमविवाह करताच मायबापानं सुरेशचा त्याग केला होता. तसा तो घराच्या बाहेर राहून वल्डकप खेळत होता नव्हे तर देशाचं नाव उज्ज्वल करीत होता. तसं पाहता तो आता मागं वळून पाहात नव्हता.
सुरेशचा जेव्हा अपघात झाला. त्यानंतर त्याला त्याच्या मायबापाची आठवण आली. तो कमावता नसल्यानं व घरचेही कोणी कमाईदार नसल्यानं त्याला त्याच्या शिल्लक पैशावरच जगावं लागत होतं. अशातच त्याला जसे त्याचे मायबाप आठवले. तसा तो आपल्या मायबापाच्या घरी राहायला आला. तसा तो आपल्या मायबापाच्या घरी राहायला येताच त्याच्या मायबापानंही आपला रुसवा फुगवा सोडला होता. तसं पाहता त्याच्या विवाहाला बरेच दिवस झाले होते.
सुरेश मायबापाचा आधार होईल म्हणून गावाला आला खरा व गावच्या मातीत रुळला खरा, तशी त्याची आई वयोवृद्धही झाली होतीच.
ते सुरेशचं प्रेम. त्या प्रेमातून मिळविलेली त्याची पत्नी सरु. तिचं जास्त दिवस त्याच्या आईसोबत पटलं नाही. त्याची पत्नी, तिची मजबूरी असूनही ती त्याच्या आईला फार त्रास देत होती. तिला बरोबर जेवायला खावायला देत नव्हती. यातच कधीकधी सासू सुनेचे खटके उडत असत व रात्री झोपतांना ती सुरेशला नित्य म्हणायची,
'मला इथं कशाला आणलं. मी शहरातच ठीक होती.'
सरुची सारखी कुरकुर. तसं पाहता सुरेश विचार करीत होता. त्याला वाटत होतं की आज आपण अपंग आहो. आपण कामाला जावू शकत नाही व आपल्या घरी कोणीही कामाला जात नाहीत. त्यातच सर्वजण बसून खात असतांना व सर्वांना आयतं मिळत असतांना ही आपल्या पत्नीची सारखी कुरकुर. आपण तिला एखाद्या दिवशी समजावून सांगावं.
सुरेशचा पत्नीला समजावून सांगण्याचा विचार. तसा विचार येताच तो तिला समजावून सांगण्यासाठी संधी शोधतच होता. तोच आज एक ठिणगी पडली. कसल्यातरी कारणावरुन आजच सकाळी सासू सुनेचं भांडण जुंपलं. चांगलं जोराचं भांडण. सरुनं तर घरच डोक्यावर घेतलं होतं. तशी तिची सासूही बोलली होती तिला व तिला घरुन निघायला म्हणत होती. त्यातच ती आज दिवसभर घरुन निघून जाण्याचाच विचार करीत होती. तशी रात्र झाली.
रात्र झाली होती. सर्वजण झोपायला गेले होते. सरु आणि सुरेशही झोपायला गेले होते. सरुनं अंग टाकलं होतं. परंतु सरुला आता अंथरुणावर झोप येत नव्हती. त्याचं कारण होतं. सकाळी झालेली सासुसोबतची भणभण. तसा सुरेशही झोपला नव्हताच. तशी ती सुरेशला म्हणाली,
"मला इथं राहाणं आवडत नाही. तुमची आई सारखी भणभण करीत असते. आपण शहरात राहायला जावूया."
सरु बोलून गेली खरी. ते तिचं बोलणं तसं पाहिल्यास वायफळच होतं. त्याचं कारण होतं तिनं मनात न केलेला विचार. आज तो विचार तिनं तोंडावर आणला होता. तसा तो म्हणाला,
"अगं तुला कसं कळत नाही. मी काही आता कमावता राहलो काय? अगं आता आपल्याला आपल्या आईबापाच्याच आसऱ्यानं राहावं लागेल. आपले आईबाप जे काही करतात, ते योग्यच असते. तू त्यांना समजून घेत नाही. जरा समजून घेत जा. तसं पाहता आपण शहरात जावून कोणता तीर मारु. शहरात सर्वच वस्तू विकत घ्याव्या लागतात. आपल्याजवळ जेवढं गोळा आहे की नाही. तेही पुरणार नाही. जेव्हापर्यंत आपली मुलं कमावती होत नाहीत. तेव्हापर्यंत आपण कसे जावू शकतो शहरात. ती आपली मुलं लहान आहेत अगदीच. शिवाय मी तर आता कोणतंच काम करु शकत नाही. मी अपंग आहे यावेळेला. कमीतकमी वेळ पाहून तर वागत जा."
सुरेशनं सरुला ज्ञान पाजलं. परंतु सरु त्याचं ऐकेल तेव्हा ना. ती म्हणाली,
"तुम्हाला कामावर जाणं नाही जमत असेल तर ठीक आहे. मी कामाला जात जाईल शहरात. परंतु आपण शहरातच राहायला जावं."
सरुचे ते शब्द. त्यावर सुरेश म्हणाला,
"तू वेडी झाली आहेस. तुला कळत नाही की यावेळेला आपण काय करावं. आपण यावेळेस काहीही करायची ऐपत नाही. आपली अवस्था यावेळेस एक उंदीर डोंगर जसा पोखरायला जातो ना. अगदी तशीच आहे."
"मी जात जाईल शहरात कामाला. अजून काही. परंतु मला इथं राहावत नाही आणि मी जास्त दिवस इथं राहूही शकणार नाही."
"कशी करतेस. आपल्याला राहावंच लागेल इथं. आपली मजबुरी आहे."
सुरेशचं ते तिला समजावून सांगणारं बोलणं. परंतु ते बोलणं तिला काही पटलं नाही व ती म्हणाली,
"ठीक आहे. तुम्हाला नसेल यायचं तर नका येवू. मी उद्यालाच शहरात निघून जाते."
सुरेश तिला बोलून गेला व तिनंही आपलं उत्तर त्याला सांगीतलं. तसा दुसरा दिवस उजळला. सरु लवकर उठली. तिनं घरची कोणतीच कामं केली नाही व तिनं आपले कपडे भरले व सकाळीच ती शहराकडे रवाना झाली. मात्र त्या गोष्टीचं त्याच्या मायबापांना व भावालाही आश्चर्य वाटत होतं. नेमकं घडलं काय असावं तेही त्यांना समजत नव्हतं.
सुरेशनं विवाह केला. तो त्याच्या प्रेमाचा विवाह होता. तसा त्यानं विवाह करतांना कोणताच विचार केला नव्हता आणि तो विवाह बंधनात अडकला होता.

****************************************

विवाह करताय, मग चांगला विचार करावा. कारण अलिकडे न्यायालयात घटस्फोटाचे खटले दाखल होत आहेत. खटले वाढत असून निकालाच्या मानानं खटल्याची संख्या जास्त आहे. या खटल्यातील वादाचा विषय असते सासू. सासू मोठी खास्ट आहे असं कारण पुढं करीत न्यायालयात खटले दाखल होत असतात. तसं पाहता अलिकडील काळ बदललेला आहे व काही काही घरात सासवांना बराच त्रास सहन करावा लागत आहे.
पुर्वीचा काळ असा नव्हता. त्या काळात सासवा बदमाश असत असं आजच्या काळातील लोकांचं म्हणणं. परंतु त्या काळातीलही अपवादात्मक दोनचार जर सोडल्या तर काही सासवा खऱ्याच चांगल्या होत्या. मग सासवा खास्ट असतात. त्या चांगल्या नसतात. असा बदनाम करणारा सासवांचा इतिहास का पुढे आला असावा? त्याचं कारण होतं बालविवाह.
आई......आपली आई आपल्याला प्रिय असते. कारण ती आपली आई असते. त्यातच तिनं आपल्याला कितीही त्रास दिला तरी तो त्रास आपल्याला त्रास दिल्यासारखा वाटत नाही. कारण ती आपली आई असते. एखाद्या वेळेस आपण आपल्या आईचं एखादं काम जर केलं नाही तरी आई रागावते व आपल्याला मारते. तेव्हा आपल्याला तिचा तात्पुरता राग येतो. मग काही वेळानं तो राग आपण विसरुन जातो. त्याचा राग आपण आपल्या मनात धरुन ठेवत नाही. परंतु त्याचवेळेस जर ती आपली आई नसेल, दुसरं कुणीही असेल आणि ती व्यक्ती आपल्यावर कितीही प्रेम करीत असेल तरी त्या व्यक्तीचा आपल्याला राग येतो. तीच गोष्ट पुर्वी आपल्याला सासवाच्या बाबतीत घडून आलेली दिसते.
पुर्वी बालविवाह व्हायचे. ते बालवय असायचं आणि त्या बालवयात विवाह व्हायचे. तसं पाहता त्या बालवयात तसे बालविवाह झाल्यानंतर ते खेळण्या बागडण्याचं वय असतांना सासू तिला घरची कामं सांगायची नव्हे तर ती कामं करीत असतांना जर ती चुकलीच तर तिला ती समजावून सांगायची. त्यातच ती अशी कामं करीत असतांना ती सारखी चुकत असेल तर तिला ती रागवायची. तसं त्या सुनेचं वय लहान असल्यानं तिला ती मारायचीही. जशी आजची आपली आई आपल्याला मारते तशी. तसं पाहता त्या सासुनं तसं मारताच तिला राग यायचा. जसा आजच्या काळात आपल्याला कोणी मारत असेल तर राग येतो तसा. याच रागावरुन व मारण्यावरुन पुर्वीच्या काळी सासू बदनाम झाली. काही दिवस जाताच हे मारणे जेव्हा ती समजदार होत असे. तेव्हा लक्षात येत असे व तेव्हा तीव्र राग मनात राहात असे.
आज काळ बदलला. या बदलत्या काळानुसार सासू सुनेच्या व्यवहारात बदल झाला. सासू सून झाली व सून सासू. आता सासूवर सून अत्याचार करती झाली. परंतु ज्या घरातील मुलगा आपल्या आईवर आपल्याच पत्नीकडून होणारा अत्याचार सहन करु शकला नाही. तेव्हा वाद झालेत व असे वाद झालेत की ज्याचं रुपांतरण चक्कं घटस्फोट व न्यायालयातील खटल्यात झालं. कारण कायद्याचं अलिकडील काळात पत्नीला अभय दिल्या गेलं.
कायदे बनले हे अभ्यास करुनच. परंतु ते कायदे बनवितांना कदाचीत घराघरातील परिस्थिती लक्षात घेतलेली नसावी. वरवर परिस्थिती पाहून कायदे बनले असावेत. कारण प्रत्येक घरातील परिस्थिती सारखी नसते. काही घरात प्रेम असतं तर काही घरात प्रेम, जिव्हाळा याला थारा नसतो. उदाहरणार्थ एखादी सावत्र आई एखाद्या बाळाला स्वतःच्या मुलासारखी वागणूक देवू शकते तर काही सावत्र आई काही काही बाळांना सावत्रपणाचीच वागणूक देत असतात. हे नाकारता येत नाही. तेच घडलं असेल कायदे बनवितांना. कायदे बनले, देशातील विपरीत परिस्थिती पाहूनच. त्याचा सखोल अभ्यास केला त्यांनी. परंतु असा सखोल अभ्यास करीत असतांना प्रत्येक घरातील वातावरण वेगळं असते याची जाणीव न ठेवून कायदे बनल्यानं आज घराघरातील वातावरण तंग अशा स्वरुपाचं आहे व आज अशाच तंग वातावरणातून आलेल्या गैरसमजुतीतून न्यायालयात खटले दाखल होत आहेत व त्या खटल्यात वाढ होत आहे.
महत्वपुर्ण गोष्ट ही की प्रत्येक सुनेनं आज आपल्या सासूला समजून घेण्याची गरज आहे. तिनं तिला आपली आईचं मानावं. तिला बदनाम करु नये. कारण आज तो काळ गेला आहे की ज्या काळात बालविवाह होत असत व अगदी अल्पवयात घरी आलेल्या मुलीला सर्व करतब शिकविण्याचे काम सासू नावाची त्या काळातील आई शिकवीत असे. ती तिला सर्व गोष्टीत पारंगत करीत असे. जो साधारण आजच्या काळातील महिलांना अत्याचार वाटत असतो. आज त्याच महिलेनं समजून घ्यावं आपल्या सासूला. तसं पाहता आज काळ बदललेला नाही. काळ तोच आहे. फरक एवढाच आहे की आजच्या काळात महिलांचे बालविवाह होत नाहीत व आजच्या काळात जे विवाह होतात. ते विवाह ती उपवर मुलगी समजदार झाल्यावरच होतात. त्यामुळं सासू जर एखादी चांगली गोष्ट सांगत असेल तर ती आपल्याला सहजासहजी स्विकारता येत नाही. स्विकारण्यात समस्या निर्माण होतात. म्हणूनच घटस्फोट, अत्याचार ह्या साऱ्या कटकटी वाटतात. कारण आजच्या काळात वय वाढलेले आहे विवाहाचे व या वाढत्या वयात आपलं काहीही चुकत असल्यास वा त्यावर कोणीही काही सुचना करीत असल्यास त्या सुचना आपल्याला आवडत नाहीत. त्या सुचना वारंवार केल्यास आपल्याला राग येतो व तशी आपल्याला आपल्याच हितासाठी कोणी अक्कल सुचविलेली आवडत नसल्यानं आपली भांडणं होत असतात.
नवीन सुन, मग ती कितीही वयाची का असेना, घरामध्ये नवीनच नांदायला येतांना तिला तसा फारसा अनुभव नसतोच. तो अनुभव सासूला नक्कीच असतो. शिवाय नवीन घर. नवनवीन व्यक्ती, नवीन परीसर, नवीन शेजारी, रोजच नवनवीन लोकांशी येणारा संपर्क हा नवीनच असतो व त्या लोकांशी जुळवून घेणे ह्या गोष्टी काही एकाच दिवशी शक्य होत नाहीत. त्यासाठी बराच कालावधी जावा लागतो. परंतु आपला स्वभाव हा उतावीळ असतो. तो उतावीळ बनलेला असतो. कारण आपल्या मायबापानं आपले फारच लाड पुरविलेले असतात. शिवाय अशा उतावीळ स्वभावाने त्या नवीनच वातावरणात आपण स्वतःला दिडशहाणे समजत असल्यानं व आपल्या मायबापानं तसं आपल्याला सांगीतलं असल्यानं आपल्यासमोर नवीन लोकांनी काही सुचविलेलं आपल्याला खपत नाही व ती सुचना करणे म्हणजे आपल्याला अत्याचार वाटतो. त्यातूनच घटस्फोटासारखे प्रसंग निर्माण होत असतात.
विशेष सांगायचं म्हणजे आपले वय जरी वाढले असेल अन् वाढत्या वयात आपण समजदार जरी झालो असेल तरी आपण स्वतःला शहाणे समजू नये. तरच संसार टिकतो. आपण समजदार असल्यानं आपल्यावर कोणीही आजच्या काळात अत्याचार करु शकत नाहीत. काही जण सुचनाही करतात. त्या सुचना समजून घ्याव्या. त्याचा बाऊ करु नये. तरच संसार टिकेल. तसा तो टिकवावा. अन् ज्याला तसं वागायचं नसेल. संसार टिकवायचा नसेल, तर त्याचा त्यांनी आधीच विचार करावा. त्यानं विवाहही करु नये व संसारात पडू नये. व्यतिरिक्त संसारात पडून कुणाचं जीवन उध्वस्त करु नये म्हणजे झालं.
सरु सोडून गेली होती सुरेशला. सुरेश काही तिच्या मागोमाग गेला नाही. त्यातच त्याची मुलंही आईपाठोपाठ आईबरोबर निघून गेली नाहीत. ती आपल्या वडीलांजवळंच होती.
आज सुरेशची त्रेधातिरपीट उडत होती. त्याची मुलं त्यांना आई असूनही ती मुलं अनाथाचं जीवन जगत होती. त्यातच तो आता सरुअभावी आपल्या मुलांची आई व वडील बनला होता. शिवाय शिक्षणाची होती ती मुलं.
सरु शहरात राहात होती. तर तिची ती मुलं गावच्या मातीत लहानाची मोठी होत होती. ती आता आपल्या मायबापाच्या घरी राहू लागली होती. तर तिची मुलं गावच्या मातीत तिच्या पतीकडेच राहात होती. तिच्या वडीलानं तिनं विवाहाआधी केलेल्या चुकीबद्दल माफ केलं होतं. शेवटी मुलगी होती ती त्यांची.
सरु मायबापाजवळ राहात होती. आता तिला आपल्या मुलाची सारखी आठवण येत होती. त्यांना जवळ आणावं वाटत होतं. त्यांच्याशी बोलावसं वाटत होतं. परंतु त्यात तिचं इगोपण आड येत होतं. अशातच तिला आपलं जीवन जगणंही कठीण जात होतं.
सुरेशची मुलं गावच्या मातीत रुळली होती. तसा सुरेश त्यांना सकाळीच उठवायचा. त्यांची आंघोळ करुन द्यायचा. त्यांना खाऊपिऊ घालायचा व त्यांना शाळेत पाठवूनही द्यायचा. तोच त्यांची तयारी करुन द्यायचा.
दिवसामागून दिवस जात होते. रोज त्याचा असा नित्य नियम चालत असे. मुलांची तयारी करुन देणे. त्यांना खाऊपिऊ घालणे व शाळेत पाठवणे. हा त्याचा दररोजचा नित्यक्रम होता.
आजही त्यानं तेच केलं होतं. मुलं शाळेत गेली होती. आज त्यानं लवकर मुलांना शाळेत पाठवलं होतं. तसं पाहता मुलं शाळेत जाताच त्याला त्याच्या पत्नीची आठवण यायची. त्यानंतर तिच्याच आठवणीत तो दिवसभर व्यस्त राहायचा. ती आठवण तेव्हाच जायची. जेव्हा ती मुलं शाळेतून यायची. तसा तो दररोज घरी उदासच राहायचा.
सुरेश उदासच राहात होता मुलं शाळेत जाताच. ते त्याच्या आईलाही दिसत होतं. परंतु ती त्याला काही म्हणत नव्हती. कारण तिनं त्यालाही आपल्या पोटातून बाहेर काढलं होतं. तसं त्याचं उदासपणच पाहून त्याची आई त्याला एक दिवस म्हणाली की त्यानं दुसरा विवाह करुन टाकावा.
ते त्याच्या आईचं बोलणं. तसा तो विचार करु लागला. आपण दुसरा विवाह करावा. विचार चांगला आहे. परंतु मी जर दुसरा विवाह केला तर मला पत्नी मिळेल. परंतु बाळांना आई? आई मिळणार नाही. ती तशीही आज अनाथच आहेत आणि उद्या मी विवाह केल्यावरही अनाथच होतील. शिवाय माझी दुसरी पत्नी त्यांना सांभाळून घेईल कशावरुन? ती त्यांना बराच त्रास देईल. शिवाय पत्नी जर करतो म्हटलं तर तिला पोसायचं कसं? हाही प्रश्न त्याच्यासमोर होता. शेवटी त्यानं निर्णय घेतला. आपण विवाहच करु नये.
त्याचा तो निर्णय. तसा निर्णय घेताच तो विचार करायचा. तशी त्याची आईही वयोवृद्ध असल्यानं त्याचं काम करता करता थकायची. त्यातच ती त्याला विवाह करण्याविषयी आग्रह करायची. भावजंही त्याच्या मुलावरुन कुरकूर करायची. तेव्हा त्याच्या आईला वाटायचं की आपलं जीवन आपल्या मोठ्या मुलाकडे कटू शकतं. परंतु लहान मुलगा असा अपंग असल्यानं आपल्याला त्याच्यामध्ये राहावं लागत आहे.
सुरेशची आई तसा विचार करु लागताच तिनं त्याला एक दिवस म्हटलं की त्यानं एकतर दुसरा विवाह करावा. नाहीतर वेगळी चूल मांडावी आपल्या मुलासोबतची. शेवटी आपले तसे प्रारब्धच वाईट असं समजून सुरेश आपल्या मायबापापासून वेगळा निघाला. आता तो वेगळी चूल मांडून आपल्या मुलांना लहानाचं मोठं करु लागला होता.
सुरेशला आताही पत्नीची आठवण येत असे दिवसभर. परंतु ती शहरात निघून गेली होती राहायला. त्यातच आता त्याची वेगळी चूल झाली होती. तसं स्वयंपाक बनवितांना त्याला फार कंटाळा वाटत असे.
दिवसभर ते पत्नीचे विचार. तशी त्याची मुलं आता मोठी झाली होती. ती महाविद्यालयात जायला लागली होती. तशातच त्याला आठवलं. आपण आपल्या मुलांमध्ये क्रिकेटची आवड निर्माण केली तर......आपली वल्डकप जिंकायची इच्छाही पुर्ण होईल. विचारांचा अवकाश. तसा विचार करताच तो सायंकाळी मुलं घरी यायची वाट पाहू लागला. तशी सायंकाळ झाली. त्याचबरोबर रात्रही.
मुलं आपल्या बापाला जिवापेक्षा जास्त जपत असत. ते आपल्या बापाला जीव की प्राण समजत. आता ती बरीच मोठी झाली होती. समजदारही तेवढीच झाली होती. त्यांनी परिस्थिती पाहिली होती. तसे ते लहान असतांना त्यांची आई त्याच्या अपंग बापाला सोडून गेली होती तेही त्यांनी अनुभवलं होतं. शिवाय तसं अनुभवत अनुभवत ते लहानाचे मोठे झाले होते व आता आपल्या वडीलाच्या पुर्ण गोष्टी ते ऐकत असत व त्यावर अंमल करीत असत.
सायंकाळी मुलं घरी आली होती. तशी थोड्या वेळातच रात्र झाली व तो स्वयंपाकाला बसला. तसा तो आपल्या मुलांना म्हणाला,
"बाळांनो, मी तुमच्या सर्व इच्छा पुर्ण केल्या. आपल्या प्राणापेक्षाही जास्त जपलं तुम्हाला. लहानाचं मोठं केलं तुम्हाला. तुम्ही आता समजदार झाला आहात."
एक बाप आपल्या बाळासमोर बोलत होता. आपली कैफियत मांडत होता. मुलं ऐकत होती सुरेशची. बाप काय बोलत आहे ते बरोबर कळत नव्हतं. तसा मोठा मुलगा सुनील म्हणाला,
"काय झालं बाबा?"
"मी तुम्हाला लहानाचं मोठं केलंय. परंतु माझीही एक इच्छा आहे बऱ्याच दिवसांपासून. ती माझी इच्छा आजपर्यंत तरी पुर्ण झालेली नाही."
"इच्छा? कोणती इच्छा आहे? जरा सांगा आम्हाला."
"माझीही एक इच्छा आहे व ती इच्छा म्हणजे क्रिकेट."
मुलांना त्यांचे वडील काय बोलत आहेत. ते कळत नव्हतं. तशी मुलं म्हणाली,
"क्रिकेट? अन् त्यात इच्छेचा प्रसंग कोणता आला?"
"माझीही एक इच्छा होती. इच्छा होती की मी वल्डकप जिंकावा. परंतु ती माझी इच्छा. इच्छाच राहिली. मी बुकींचा शिकार झालोय."
"बुकींचा शिकार?"
"होय, बुकींचा शिकार. ती फार मोठी कहाणी आहे."
"म्हणजे?"
"जावू द्या बाळांनो, ती फार मोठी कहाणी आहे. कधीतरी सवड भेटल्यावर सांगेन. परंतु आज मी काय सांगतो ते नीट ऐका."
सुरेशनं म्हटलं व तो पुढील कार्यभाग सांगू लागला आपल्या मुलांना. त्याला तसं सांगतांना भीतीही वाटत होती की कदाचीत हेच बुकी, जसं त्या बुकींनी त्याला अपंग करुन टाकलं. तसंच अपंग आपल्या मुलांनाही करुन टाकतील वा त्यांचा जीव घेतील. अन् तसा आपल्या मुलांचा जीव गेला तर......परंतु तसा विचार न करता व कसलीही भीती न बाळगता सुरेश आपल्या मुलांना सांगू लागला.
"माझी इच्छाच आहे की तुम्ही क्रिकेट खेळावं. कोणासमोर लोटांगण न घालता चांगलं प्रदर्शन करावं व एकतरी वल्डकप जिंकून आणावा की जेणेकरुन आपल्याच देशाचा मान वाढेल. काय खेळणार काय क्रिकेट?"
तो क्रिकेटचा प्रस्ताव. तो प्रस्ताव वडिलांकडूनच आला होता. त्यातच त्यांना आठवलं. ते जेव्हा लहान होते, तेव्हा तो बापच त्यांना क्रिकेट खेळण्याविषयी मनाई करायचा. म्हणायचा की क्रिकेट फार वाईट गोष्ट आहे. तो खेळ खेळू नये. अन् आज स्वतःच तो खेळ खेळा म्हणून सांगतात आहेत. त्यांना त्या गोष्टीवर आश्चर्य वाटत होतं.
सुरेशच्या तोंडून निघालेला प्रस्ताव. त्यातच ती मुलं तयार झाली होती क्रिकेटचा खेळ खेळायला. परंतु त्याची सुरुवात करायची कुठून? कोण शिकवणार? आदि प्रश्न त्या मुलांच्या मनात होतं.
सुरेशचा तो विचार........ नव्हे तर तो निर्धारच. तसा विचार येताच व मुलं तयार होताच सुरेश दुसऱ्याच दिवशी मुलांना घेवून मैदानात गेला. ज्या गावच्या मैदानात त्यानं क्रिकेटचे धडे बालपणात गिरवले होते. अजुनही ते झाड शाबूत होतं की ज्या झाडाला त्याचे बा स्टंप बनवीत होते. आज तेच झाड थोडं डेरेदार झालं होतं.
सुरेशनं आपल्या मुलांना त्या मैदानात नेताच सांगीतलं, 'हेच ते मैदान की ज्या मैदानानं मला शिकवलं. अन् हेच ते झाड की ज्या झाडाला आम्ही स्टंप बनवलं होतं. मीच तो अभागी व्यक्ती की जो एका काळात क्रिकेटचा भगवान होतो. अन् आज मला कोणी कुत्रही विचारत नाही. तुमची आई देखील आज मला विचारत नाही. मला त्यांनी वाळीत टाकलंय. अन् वाळीत टाकलंय तुमच्या मोठेबाबांनी अन् तुमच्या आजीआजोबांनी. आज तुम्हालाही माहीत आहे की माझ्याशी कोणीच बोलत नाहीत. माझे स्वतःचे मायबाप अन् माझा भाऊदेखील. अन् समाजही बोलत नाही माझ्याशी. परंतु तुम्हाला ते करुन दाखवायचं आहे. तुम्हाला असं काही करुन दाखवायचं आहे की हा समाज तुम्हालाही उद्या भगवान समजेल. तुमची पुजा करेल. नव्हे तर तुम्हाला ओळखायला लागेल. जेव्हा तुम्ही या देशासाठी वल्डकप जिंकाल. कारण वल्डकप हा आज संबंधीत जगाचाच देव बनलेला आहे. तुम्हाला बदला घ्यायचा आहे त्या अपमानाचा. ज्या देशाच्या वल्डकपपर एका देशातील एका खेळाडूनं स्वतःचे पाय ठेवले होते.'
सुरेश बोलत होता आपल्या मुलांशी. तो काय बोलतो, ते काही त्याच्या बापाला कळत नव्हतं. परंतु त्यांनी होकार दिला होता.
आज ती मुलं शिकत होती तो क्रिकेटचा खेळ. दिवसभर शाळा केल्यानंतर सांजच्याला बर्‍याच रात्रीपर्यंत त्याच गावच्या त्या मातीत ती दोघंही सुरेशची मुलं शिकत होती तो क्रिकेटचा खेळ. तसे ते त्या क्रिकेट खेळातील बारकावेही शिकत होते. अन् त्यांना सुरेश अपंग का होईना, हिरीरीनं शिकवीत होता.

************************************

आज महाविद्यालयात क्रिकेटच्या स्पर्धा होत असत. त्या स्पर्धात अनिल व सुनील दोन्ही सुरेशची मुलं हिरीरीनं भाग घेत असत. तसा जोश त्यांच्यामध्ये सुरेशनं निर्माण केला होता. त्यातच ती दोन्ही मुलं महाविद्यालयात तो क्रिकेटचा खेळ गाजवत. आज अशीच एक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा होती व त्या स्पर्धेत आपल्याच महाविद्यालयाकडून अनिल व सुनीलनं भाग घेतला व पहिल्या क्रमांकाचं मानांकन महाविद्यालयाला जिंकून दिलं. त्यावेळेस अनिलला मॅन ऑफ द मॅच मिळाली होती आणि मुलाखतीदरम्यान विचारलं होतं की त्यांचा गुरु कोण? त्यावर त्यांनी चक्कं आपल्या वडीलाचं नाव सांगीतलं होतं. तसं पाहता सुरेश हा मुलांच्या शाळेत जातच नव्हता. कारण तो अपंग होता.
ते महाविद्यालय....... क्रिकेटच्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत सुनील व अनिल जोडीनं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळवताच व महाविद्यालयानं त्यांचा गुरु कोण असं विचारताच व मुलांच्याही उत्तरादाखल ते महाविद्यालय सुरेशला भेटण्यासाठी तयार झाले व एक दिवस संधी साधून सवड मिळताच ते अनिलच्या घरी आले होते.
महाविद्यालयातील काही लोकांनी सुरेशची भेट घेतली. तशी त्याची भेट घेताच त्यातील एकानं त्याला ओळखलं.
सुरेश हा पुर्णतः बदलला होता. तो ओळखू येत नव्हता. तसा तो अपंग झाल्यापासून फारच खजील झाला होता. त्याचं स्वप्न पुर्ण न झाल्यानं तो एवढा निराश झाला होता की त्यानं आपलं स्वतःचं त्यानंतर नावही बदललं होतं.
आज सुरेशला जसं महाविद्यालयातील लोकांनी ओळखलं व पुष्टी केली. तसा सुरेश त्यांना म्हणाला,
"आपण माझी ओळख कोणालाही सांगू नये. माझी इच्छा माझी ओळख व्हावी ही नाही तर माझी इच्छा या देशाला वल्डकप मिळवून द्यायची आहे. तशी इच्छा पूर्वीपासूनच होती. परंतु ती इच्छा पुर्ण झाली नाही व माझं स्वप्न ते स्वप्नच राहिलं. आता जेव्हा ह्या देशाला मी वल्डकप मिळवून देईल. तेव्हाच मी माझी ओळख सांगणार. तेव्हापर्यंत तरी मी माझी ओळख कोणालाही दाखवू इच्छीत नाही."
सुरेश बोलून गेला. तसं त्या महाविद्यालयातील त्या लोकांनी तो सुरेश नावाचा पुर्वीचा प्लेअर आहे याची ओळख दर्शवली नाही.
दिवसामागून दिवस जात होते. सुरेश तयारी करीत होता वल्डकप जिंकण्याची. त्याला वाटत होतं की मी नाही जिंकलो तरी ठीक. परंतु माझी मुलं तरी वल्डकप जिंकून आणतीलच. तोच विश्वास होता त्याचा व त्याच विश्वासाच्या भरवशावर तो आपल्या मुलाची तयारी करुन घेत होता एक तो वल्डकप जिंकण्यासाठी. कारण तेच वल्डकप म्हणजे देशातीलच नाही तर जगाची शान होती.
सुरेशची मुलं महाविद्यालयातील शिक्षण शिकत होती. त्यातच शिकत होती ती क्रिकेट. त्या क्रिकेटचा सराव करीत होती. बापाच्याच पावलावर पाऊल टाकत होती ती. ती आता हळूहळू स्पर्धा गाजवत व त्यात कामगीरी करीत लहानाची मोठी झाली होती ती आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भर्ती झाली होती.

****************************

सरु सुरेशला सोडून गेली होती त्या लहानग्या बाळांनाही सोडून. त्या इवल्याशा बाळाचीही तिला तमा नव्हती. ना तिला आठवण येत होती निकडीची. तशीच ती वागत होती. तिला जेव्हा पतीची आठवण यायची. तेव्हा तिच्या डोळ्यासमोर सुरेशचा अपंग चेहरा यायचा व कानाला ठणठणी बसायच्या. असा राग यायचा की तिचा जीव कासावीस व्हायचा.
काही दिवस असेच गेले. इकडे सुरेश मुलांचं शिक्षण करीत होता. त्यानं आपल्या आईशी अबोला केला होता. परंतु त्याच्या आईच्या म्हणण्यानुसार त्यानं आपला विवाह केला नाही तर तो तसाच राहिला संबंधीत आयुष्यभर आणि त्यानं मुलाला घडवलं होतं. परंतु सरुनं मात्र दुसरा विवाह केला व ती विवाह करुन मोकळी झाली. त्यावेळेस तिनं आपल्या मुलांचाही विचार केला नाही.
सरुचा नवीन पती. तो पती तिच्यावर शक करणारा होता. शिवाय तिला त्यानं आयुष्यभर कोणतीच मोकळीक दिली नाही. तो तिला फारच त्रास देत होता. तसं पाहता तो तिच्या जीवनातील करार होता, ते तिचं लग्न नव्हतंच.
सुरेश बरा होता. परंतु तो अपंग झाल्यानं तिला आवडेनासा ठरला होता. त्यातच तिनं दुसरा विवाह केला. अन् आयुष्यभर आयष्याशी जुळवत राहिली ती. तिनं केलेला तो दुसरा विवाह. त्या दुसऱ्या पतीला ती सोडू शकत नव्हती. कारण तो शकानं नेहमी म्हणायचा की जर तिचं कोणतंही त्याला वाकडं पाऊल दिसलंच तर तो तिचा जीवच घेवून टाकेल. त्यावेळेस तिला आपल्या लेकरांची आठवण यायची व आपला पती आठवायचा तिला. तशी ती कुढत कुढत त्याचे घरी राहात होती. ती परत येवूही शकली असती. परंतु आता तिच्यासमोर कोणताच उपाय नव्हता.
सरुचा तो पती. तिला त्याचेपासून गर्भही राहिला नाही, ना तिला कोणतं मुल झालं नाही. तसं तिचं वय वाढत चाललं होतं. अशातच तिच्या त्या पतीचा मृत्यू झाला होता.
संबंध आयुष्य तिचं त्या दुसऱ्याच पतीच्या घरी गेलं. तिनं विवाह केला होता दुसरा. परंतु तो विवाह तिला जाहीर करता येत नव्हता. ना तिनं तो विवाह जाहीर केला. अशातच हळूहळू तिचे मायबापही मरण पावले व ती एकुलती एक असल्यानं तिच्या मायबापाच्या मालमत्तेची ती मालकीण झाली. आता तिच्यासमोर पैशाची काहीच कमी नव्हती. परंतु आता तिला तिचं एकटेपण सतावत होतं. त्यातच त्या एकटेपणात तिला सतावत होतं तिच्या एकटेपणात होणार असलेलं पालनपोषण. तिला आता वाटत होतं की आता आपलं वय झालं. आता म्हातारपण येईल. आपली काळजी घेणारा आता कोणी नाही. कोण घेईल आपली काळजी?
ती काळजीची तक्रार. त्यातच तिला पडलेले म्हातारपणातील म्हातारपणाच्या समस्येचे प्रश्न. आता तिला विचार येत होता, काश! आपला तो सुरेश नावाचा
पती आपल्याजवळ असता तर.........तो स्वभावानं चांगला होता आणि त्यानं आपल्याला आज अंतर दिलं नसतं आणि आपली मुलं. आज आपल्या मुलांनी आपली काळजी घेतली असती.
तिचा तो विचार. तो विचारच तिला तिच्या एकटेपणात स्वस्थ बसू देत नव्हता. काय करावं सुचत नव्हतं. तसं पाहता पती सोडून तिला बरीच वर्ष झाली होती. आता आपण असेच गेलो पतीजवळ तर आपला पती आपल्याला स्विकारणार नाही असं तिला वाटत होतं. त्यातच आपली मुलंही आपल्याला स्विकारणार नाही असंही तिला वाटत होतं. तिला कोणत्याही प्रकारे सुरेश हवा होता. परंतु सुरेश भेटणार कसा?
सरुचा कालचा काळ बरा होता. काल तरुणपण होतं, तेव्हा तिनं आग ओकली होती. सुरेश अपंग होताच तिनं त्याला त्रास दिला होता फारच. ती एवढ्यावरच थांबली नव्हती तर तिनं सुरेशलाही सोडून दिलं होतं, तो अपंग आहे म्हणून आणि आपल्या मुलांनाही सोडून दिलं होतं. त्यांची काळजी केली नव्हती. तसा तिनं विवाह केला होता. परंतु आज तिला सुरेशची आणि तिच्या मुलाबाळाची गरज वाटत होती व ती विचार करीत होती.
सरु विचार करु लागताच अचानक तिला आठवलं, आपण खटला टाकावा सुरेशवर. म्हणजे सुरेश घाबरुन आपला स्विकार करेल. तसा विचार येताच तिनं कायद्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा विचार केला.
एक दिवस तिनं विचार केला की आपण सुरेशच्या घरी जावं. तसा विचार करताच तिनं एक नोटीस न्यायालयातून सुरेशला पाठवला. त्यात लिहिलं होतं,
'अमूक अमूक ही त्याची पत्नी असून तिच्या पतीने तिला सोडलेलं आहे व तो तिला न्यायला आलेला नाही. त्यामुळंच ती आली नाही. परंतु आता तिची तिच्या पतीकडे यायची इच्छा असून त्यानं न्यायालयातून तिला न्यावं आणि जर न्यायचं नसेल तर त्यानं एक मुलगा तिला द्यावा.'
तो न्यायालयातून आलेला नोटीस. पोष्टमेन म्हणाला की न्यायालयातून नोटीस आहे. तसा तो घाबरला. कारण पहिलंच तो अपंग होता. तो न्यायालयाची पायरीही चढू शकत नव्हता. त्यामुळंच तो घाबरणारच. शेवटी एक सोपस्कार म्हणून त्यानं तो न्यायालयातून आलेला नोटीस घेतला.
सायंकाळ होत आली होती. तसा सुरेश विचार करु लागला होता. मुलांना नोटीसबाबत सांगावं की नाही याचा. कारण आता मुलांचं करीअर घडत होतं आणि तो नोटीस सांगताच मुलं डिस्टर्ब होतील असं त्याला वाटत होतं. तसा विचार करु लागताच त्याचं एक मन म्हणत होतं की आता मुलं अठरा वर्षाची झाली. त्यांना कोणाकडे राहायचं व कोणाकडे नाही ते चांगलंच कळतं. तेव्हा घाबरुन जावू नये. ते प्रारब्धावर ठेवावं. शिवाय नुकसानच कितीसं होईल करीअरचं. आज ना उद्या कधीतरी ती गोष्ट आपल्या मुलांना माहीत होईलच. तेव्हा जास्त प्रॉब्लेम निर्माण होईल. तसा प्रॉब्लेम निर्माण होण्यापेक्षा आजच त्या मुलांना सांगावं व त्यांची सहानुभूती मिळवावी. जेणेकरुन ती सहानुभूती जास्त सराहनीय ठरेल.
विचारांचा अवकाश. सायंकाळी मुलं घरी आली. ती येताच सुरेश जरा गंभीर अवस्थेत असलेला दिसला त्यांना. तसे ते विचार करु लागले. तोच त्याच्या एका मुलानं विचारलं,
"काय झालं बाबा? असे उदास का?"
मुलानं विचारलेला तो प्रश्न. तसा धीरगंभीरपणानं सुरेश म्हणाला,
"बाळांनो, घात होण्यासारखा दिसतोय."
"म्हणजे?"
"न्यायालयातून नोटीस आलाय."
"कुणाचा?"
"तुमच्याच आईचा."
"आता काय म्हणते ती?"
"ती म्हणतेय की तिला न्यायला या. नाही तर एक मुलगा तिला द्या."
"मग बाबा, तिला सांगा की तू आतापर्यंत मेली होती का म्हणावं."
"म्हणजे?"
"बाबा, ज्यावेळेस आम्ही लहान होतो आणि आम्हाला तिची गरज होती, तेव्हा ती सोडून गेली आम्हाला. अन् आज आम्हाला तुम्ही मोठं केलंय. तेव्हा ती येतो म्हणतेय. याचा अर्थ असा की झाड तुम्हीच लावा. तुम्हीच राखा अन् फळांनाही जपा. मात्र फळं पिकल्यावर खाण्यासाठी तिनं जातीनं हजर राहावं. हा कुठला न्याय? परंतु तुम्ही घाबरु नका. आम्ही कुठंच जाणार नाही. अगदी न्यायालयानं सांगीतलं तरी. अन् न्यायालयही तसं काहीच सांगणार नाही. कारण मी ऐकलंय की मुलं अठरा वर्षाची होताच त्यांना स्वतंत्र्य निर्णय घेता येतात. मग त्यांना कुठं आणि कोणाकडे राहायचं ते सारं कळतं व ते आपल्या मनमर्जीनुसार कुठेही राहू शकतात. बाबा, तुम्हीच आमची आई आहात अन् तुम्हीच आमचे बाबा. त्यामुळं घाबरुन जावू नका."
सुरेशनं कोणतं पुण्य केलं होतं की काय कुणास ठाऊक. परंतु त्याच्या मोठ्या मुलानं तशी हिंमत देताच त्याला स्फुरण चढलं व तो नव्या दमानं उभा राहू शकला. लवकरच त्यानं तिला एका वकीलातर्फे नोटीस पाठवला व लिहिलं की तिच्या जाण्याला अमूक अमूक एवढे वर्ष झालेले असून मुलांचं वय नाबालिग होतं. त्यानंच स्वतः त्या बाळाची आई व बाबा बनून त्यांना सांभाळून घेतलं. त्यांच्या इच्छा पुरवल्या. हट्ट पुरवले व लहानाचं मोठं केलं. आज ते मोठे झाले. अठरा वर्षाच्या वरच्या वयाचे झाले. ज्यांच्यावर तोच हक्कं गाजवू शकत नाही तर ती कशी हक्कं गाजवणार. शिवाय आता त्याला तिची गरज नसून तिनंही स्वतंत्र्य जीवन जगावं. कारण तिनं एवढे दिवस बाहेर राहून पत्नीपणाची मर्यादा पार केलेली आहे.
सुरेशनं पत्नीला पाठवलेला नोटीस. तो नोटीस पाहताच तिचे धाबे दणाणले. तिला त्याचा पुन्हा एकदा राग आला व आता त्याला धडाच शिकविण्याचा उद्देश घेवून तिनं ती केस कोर्टात दाखल केली.
सुरेशवर सरुनं टाकलेली केस. त्यातच फैरीवर फैरी झडू लागल्या होत्या. प्रतिपक्ष वकील आपली बाजू मांडत होते. त्याचबरोबर सुरेशचा वकीलही आपली बाजू मांडू लागला होता.

*****************************

दिवसामागून दिवस जात होते. सुरेशच्या दोन्ही मुलांनी क्रिकेट खेळणं सुरु केलं होतं. त्यांचा नंबर आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात लागला होता. दोघंही भाऊ हिरीरीनं ओपनिंग बॅटिंग करीत होते. त्यांचा रनरेटही चांगलाच असायचा. तसं पाहता ते सुरुवातीपासूनच मैदान गाजवत असायचे. आज सुनील व अनिलचं जगाच्या इतिहासात नाव गाजत होतं. अशातच तो वल्डकप जवळ येवू लागला होता. सुनीलचा फॉम चांगला होता. तसा फॉम चांगला आहे असं पाहून क्रिकेट संघानं सुनीलला कप्तान बनवलं होतं. आगामी वल्डकप त्याच्याच हस्ते खेळला जाणार होता. सुनीलच्या नेतृत्वात संघ वाटचाल करीत होता. तसा वल्डकप आलाच व त्या वल्डकपमध्ये सुनीलसह अनिलचीही निवड झाली. तसा संपुर्ण संघ निवडला गेला होता.
सुरेश विचार करीत होता. आपल्या पत्नीच्या उच्चतम पराक्रमाचा. जी त्याला सोडून निघून गेली होती. त्यावेळेस त्याला घरी करमत नव्हतेच. शिवाय त्याची दोन्ही मुलं शाळेत जावू लागली होती. ती सायंकाळीच शाळेतून घरी यायची. तसं पाहता ती मुलं शाळेतून घरी येईपर्यंत बराच अवकाश असायचा. त्यामुळं बराच वेळ मिळायचा. त्यावेळेस तो विचार करायचा. विचार करायचा की आपण काय करावं. शेवटी विचारांती त्याच्या मनात एक विचार आला. आपण आपल्या परिस्थितीवर लिहावं. जे काही आपल्या आयुष्यात घडलं. त्यावरच लिहावं. याच विषयाला अनुसरुन त्यानं आपल्या परिस्थितीवर लिहिणं सुरु केलं होतं. आज तो साहित्यिक बनला होता व मोठमोठ्या वृत्तपत्रात त्याचे लेख छापून येत होते.
साहित्यिक.......तसं पाहिल्यास देशाचे आधारस्तंभ असतात. परंतु त्यांनाही परिस्थितीनं सोडलेलं नाही. त्यांनाही कित्येक वेदनेतून जावं लागतं. तसा विचार केल्यास प्रत्येकच साहित्यीकाला भयंकर वेदनेतून जावं लागतं. त्याशिवाय खरं साहित्यही जन्माला येत नाही. सुरेशचंही तसंच झालं होतं. बिचाऱ्याचा संसार चांगलाच चालला होता. परंतु खेळण्यातून उत्तम खेळी त्यानं करु नये म्हणून जुगारवाल्यांनी त्याची तशी अवस्था केली होती आणि आता तर त्याची पत्नीही त्याची तशी अवस्था पाहून निघून गेली होती. तेही त्याच्या मागं दोन मुलं ठेवून. त्या यातना त्यानं भोगल्या होत्या व त्यावरच त्यानं एक पुस्तक लिहिलं होतं व ते पुस्तक खुप गाजत होतं. नाव होतं वल्डकप.
साहित्यिक हा जसा देशाचा आधारस्तंभ आहे. तसाच तो जगाचाही आधारस्तंभ आहे. त्याचबरोबर सृष्टीचाही निर्माता नव्हे तर भाग्यविधाता आहे. साहित्यिकाचे तसं पाहिल्यास दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे काल्पनिक साहित्य निर्माण करणारा तर दुसरा प्रकार म्हणजे वास्तविक साहित्य निर्माण करणारा. वास्तविक साहित्य तसं कल्पनेतूनही निर्माण होवू शकतं. कधीकधी एखादं साहित्य निर्माण होतं. ते वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होतं व त्यानंतर फोन येतात. त्या फोनवरुन पुढील व्यक्ती बोलतो. तो व्यक्ती सांगतो की संबंधीत लेख वा कथानक त्याच्या परिस्थितीशी जुळलेलं आहे. त्या कथानकात असलेली परिस्थिती त्यानं स्वतः भोगलेली आहे. हे साहित्य वास्तविक साहित्य असतं. परंतु या साहित्याला खऱ्या अर्थानं वास्तविक साहित्य म्हणता येत नाही. कारण खरं वास्तविक साहित्य हे संबंधीत लेखकानं आपल्या जीवनात ज्या वेदना भोगलेल्या असतात, त्या वेदनेतून निर्माण होत असतं. तेच वास्तविक साहित्य असतं. त्याला अजिबातच कल्पनेची जोड नसते.
साहित्य हे जन्माला येतं कधीकधी वेदनेतून. हे जरी खरं असलं तरी कल्पनेतूनही साहित्याची दर्जेदार निर्मीती होत असते. जशी छावा, संभाजी वा मृत्यूंजय वा इतर अनेक कादंबऱ्या. ज्यात लेखकांनी त्या कादंबऱ्या लिहितांना त्या काळाची परिस्थिती अनुभवली नाही. केवळ वाचनातून कल्पनाविस्तार करुन त्या कादंबऱ्या लिहिण्यात आल्या. मात्र अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली फकीरा ही कादंबरी वास्तविक जीवनाचा बोध देते. तशीच माणूस म्हणून लिहिल्या गेलेली मनोहर तल्हार यांची कादंबरी, ही देखील त्यानं भोगलेलं वास्तविक जीवन दाखवते. सुरेशचीही ती पुस्तक वेदनेतूनच जन्माला आली होती. जी आता गाजत होती.
अलिकडील काळात वास्तविक कादंबऱ्या कोणी लिहित नाही. कारण वास्तविक परिस्थिती भोगणारी मंडळी, हे काही लेखक नाही आणि जे वास्तविक परिस्थिती भोगतात. ते जर लेखक असले तर ते कादंबरी लिहित नाही. ते आत्मचरीत्र लिहितात. आत्मचरीत्र ही काही कादंबरी नसते. ते आत्मकथन असते. जे साहित्य लोकांना त्या लेखकाची स्तुती वाटते व ते आत्मचरीत्र लोकांच्या पचनी पडत नाही. म्हणूनच ते आत्मचरीत्र साहित्य जरी असलं तरी साहित्य होवू शकत नाही.
साहित्याच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास लोकांना कादंबऱ्या जास्त आवडतात. त्याही वास्तविक कादंबऱ्या आवडत नाहीत. कारण त्यात कादंबरी रुपात का असेना, वास्तविक जीवन साकारलेलं असतं लेखकाचं. त्या कादंबऱ्या खऱ्या असल्या आणि त्याला वास्तवाची जोड असली तरीही. लोकांना आवडतात कल्पना करुन लिहिलेल्या कादंबऱ्या. ज्यात पाल्हाळ असते व कल्पनेचा विस्तार असतो. खरी परिस्थिती नसते. जशी 'सुर्य मावळलेला. त्यातच सांजवात झालेली. अशातच कुत्रीही भुंकायला लागलेली.' आता यात सुर्य मावळताच कुत्र भुंकतं का कधी? नाही. परंतु तो कल्पनेचा विस्तार आहे आणि हा विस्तार करीत असतांना लेखकाला आपण काय लिहितो, याचं भानच नसतं. परंतु वाचणाऱ्याला काय? ती कादंबरी सरस वाटते. अव्वल व दर्जेदार वाटते. जीवंत अनुभूती देते. वाचणाऱ्यांचं मनोरंजन करते. मग ती कादंबरी सरस वाटणार नाही तर काय? शेवटी अशाच कादंबऱ्यांना पुरस्कार मिळतात. काही पुरस्कार तर लेखक विकत सुद्धा घेत असतात.
पुस्तक लेखनात निर्देशीत करीत असतांना समजा एखादा शेतकरी असेल आणि त्यानं शेतीवर कादंबरी लिहिली तर ती कादंबरी पुरस्कारासाठी योग्य ठरु शकते. कारण त्या लेखकानं ती परिस्थिती स्वयं भोगलेली असते. परंतु त्या शेतकऱ्यांच्या त्या शेतीविषयक कादंबरीला अलिकडे पुरस्कार मिळत नाही. पुरस्कार मिळतो, ज्यानं कधीच शेतीचं जीवन अनुभवलं नाही. तरीही इतरांचं साहित्य वाचून वा इतरांकडून तसे बोल ऐकून ती पुस्तक लिहिली. त्याला पुरस्कार देण्यात येतो की जी वास्तविक जीवनाची अनुभूती नसते. केवळ कल्पनेची जोड असते.
वास्तविक कादंबऱ्यात गारंभीचा बापू व गारंभीचा बापू नावाची कादंबरी साकारणाऱ्या लेखकाच्या सर्वच कादंबऱ्यांचा समावेश होवू शकतो. कारण त्यांच्या सर्वच कादंबऱ्यात त्यांच्या गावाकडील वर्णन येतं. परंतु पुरस्कार त्यांना मिळत नाहीत. पुरस्कार हे ठरलेले असल्यानं केवळ लेखकांचा चेहरामोहराच पाहून मिळत असतात. तो लेखक किती प्रसिद्ध आहे? त्याचे कपडे भरजरी आहेत की खेडवळ स्वरुपाचे आहेत? तो किती रुपये संस्थेला दान देतो? तो कुठे राहतो? त्याचं घर कसं आहे? जर तो शहरात वा खेड्यात चांगल्या टुमजली घरात राहात असेल तर पुरस्कार पक्का. जर तो भरजरी कपड्यात वावरत असेल तर पुरस्कार पक्का आणि तो जर पुरस्कार देणाऱ्या संस्थेला जास्तीतजास्त रक्कम दान देत असेल तर पुरस्कार पक्का. मग ती कादंबरी कल्पनाविस्तार करुन लिहिलेली जरी असली तरी, त्या लेखकानं ती परिस्थिती भोगलेली जरी नसली तरी, ती कादंबरी वास्तविक जीवनाचं अनुमोदन करीत आहे. असा देखावा केला जातो व पुरस्कार दिला जातो.
महत्वाचं सांगायचं झाल्यास आज साहित्य लेखनात कल्पनाविस्तार करुन जर साहित्य निर्माण केलं गेलं असलं तरी ते साहित्य सरस ठरु शकेल काय? तर याचं उत्तर नाही असंच आहे. परंतु ते कोण लक्षात घेणार. कारण आजचं जग भपकेबाज स्वरुपाचं आहे. पैसे फेक तमाशा देख या स्वरुपाचं आहे. तसंच भरजरी पोशाखात वावरणाऱ्यांचं जग आहे. त्यातच त्याचं घरही भपकेबाज स्वरुपाचं असावं.
वरील प्रकारानुसार आजच्या काळात चांगल्या लेखकाला व त्याच्या कसदार लेखनाला किंमत नाही. जो पैसे फेकतो वा तशा स्वरुपात लोकांना दिसतो. तोच पुरस्कार मिळवतो व त्याचं साहित्यही दर्जेदार गणतीत येतं. त्यालाच पुरस्कार मिळतात. परंतु जो लेखक गबाळ राहतो, परिस्थितीनं गरीब असतो. घरही झोपडपट्टीत असतं वा घरही झोपडीच असतं. अशा साहित्यीकाला त्याचं साहित्य दर्जेदार जरी असलं तरी पुरस्कार मिळत नाही. तसंच पुरस्कार जर संस्था देणगी घेवून देत नसेल तर ती संस्था असा विना देणगीनं पुरस्कार देतांना त्या पुस्तकाचा दर्जा (कागद, प्रिंटींग व इतर गोष्टी), त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ, त्या पुस्तकाचा आय एस बी एन क्रमांक पाहते. त्यानंतरच पुरस्कार प्रदान करते व या सर्व गोष्टी सामान्य लेखकाला जमत नाहीत. सामान्य लेखकाला आय एस बी एन क्रमांकही समजत नाही. त्याला फक्त कळतं, लिहिणं व कसंतरी प्रसिद्ध करणं. ज्या लेखनात त्यानं आपला जीव ओतलेला असतो व जे लेखन खरंच कसदार स्वरुपाचंच असतं.
विशेष सांगायचं झाल्यास 'आम्हालाही पुरस्कार द्यावा' त्या लेखकाचं म्हणणं असतं. परंतु त्यांना पुरस्कार कोण देणार? जरी त्यांचं साहित्यलेखन कसदार स्वरुपाचं असलं तरी. कशीतरी ते, आपल्याही साहित्याचं पुस्तक निघावं म्हणून आय एस बी एन क्रमांक न टाकता पुस्तक काढत असतात आणि प्रसिद्ध करीत असतात. खरं तर त्या पुस्तका कसदारच असतात. परंतु आजच्या भपकेबाज काळात त्या साहित्याकडे पुरस्कार देणाऱ्या संस्थेचं दुर्लक्ष होतं. त्याचबरोबर दुर्लक्ष होतं सरकारचंही. ज्या सरकारकडे अशी लेखक मंडळी आपलं साहित्य पाठवीत नसतात. कारण त्यांना तशी पुस्तक सरकारचा पुरस्कार मिळविण्यासाठी पाठवावं लागतं हेही माहीत नसतं. तसंच ते कसं पाठवायचं? याचाही मार्ग माहीत नसतो. तसा मार्ग कोणी सांगतही नाही. मग त्या साहित्यात कितीही मुल्य असलं तरी ते साहित्य आपोआपच मागं पडतं. त्यात कितीही दर्जेदारपणा असला तरी तो दर्जेदारपणा आपोआपच फोल ठरतो व त्या लेखनाची गणती दर्जेदार लेखनात होत नाही. असं साहित्य व असा लेखक हा प्रभावशाली ठरत नाही. तो आपोआपच काळाच्या ओघात मागचा मागंच राहतो. त्याचं साहित्य कितीही दर्जेदार असलं तरी. हे तेवढंच खरं आहे.
महत्वपुर्ण गोष्ट ही की पुरस्कार त्यांनाही द्यावा. ज्यांचं साहित्य चांगलं आहे. परंतु ज्यांचं साहित्य उजेडात येत नाही. जे वास्तविक जीवन भोगत आहेत व वास्तविक साहित्य निर्माण करीत आहेत, परंतु वास्तविक जीवनाशी लढत असतांना ज्यांना कल्पनेच्या जीवनाचा प्रवास करता येत नाही. कारण त्यांना वास्तविक जीवनाशी लढत असतांना वेळच मिळत नाही. अशाच साहित्यिकांचं लेखन कसदार असतं. दर्जेदारही असतं. त्यांना पुरस्कार नाही मिळाला तरी, ते पुरस्काराचा विचार करीत नाहीत. ते लिहित असतात सतत आणि तसं जीवन भोगतही असतात सतत. जेव्हा एखाद्या वेळेस त्यांचं साहित्य एखाद्या सामान्य वाचकांच्या हातात गवसतं व ते वाचून त्या लेखकांना छान साहित्य असल्याबाबत फोन करतात. तोच त्यांच्यासाठी मानाचा वा अभिमानाचा पुरस्कार असतो. जो पुरस्कार भारतरत्न पुरस्कारपेक्षाही मोठा असतो. तो पुरस्कार एखाद्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा वल्डकप मिळविल्यासारखाच असतो. यात शंका नाही.
वल्डकप ही कादंबरी दर्जेदार अशीच कादंबरी होती. तिला वास्तवाची जोड होती. तिला पुरस्कार मिळायला हवे होते. परंतु पुरस्कार मिळत नव्हता. तसा तो वर्तमानपत्रातून बरेच लेख लिहित होता. तो नावानं प्रसिध्दही होत होता. तसं पाहता वर्तमानपत्रातून छापून आलेल्या बऱ्याचशा लेखावर त्याला वाचकांचे फोन येत. ते हाय हॅलो करीत. चांगलं लेखन असल्याची पुष्टी देत. तसं पाहता त्याच वर्तमानपत्रातून येणाऱ्या लेखनावरुन त्याला बरेच लोकं ओळखत. परंतु त्याला पुरस्कार मात्र मिळत नसे. कारण काल जरी तो वल्डकप खेळला असला आणि त्याचेजवळ काल जरी चांगला बक्कळ पैसा असला तरी आज त्याचेजवळ तेवढा पैसा नव्हता. तो पैसा तो अपंग असल्यानं व काहीही करु शकत नसल्यानं वापरावा लागला. त्यातच तो हळूहळू खर्च झाला. त्यामुळं त्याला आज गरीबच राहावं लागलं होतं.
आज तो गरीब होता. त्याचेजवळ पैसा नव्हता. मुलाबाळाचं शिक्षण होतं. शिक्षणाला पैसा हवा होता. त्यातच त्याला खायलाही पैसा लागतच होता. परंतु तो पैसा नसल्यानं काय करावं असा विचार त्याला येत होता. त्यातच त्याला आपलं साहित्यही प्रकाशीत करायचं होतं वर्तमानपत्रातून. त्यासाठी बराच पैसा लागत होता. शेवटी पोटंही तेवढंच महत्वाचं होतं.
आज त्याचेजवळ पैसा नव्हता. मग तो विचार करु लागला. पैसा उपलब्ध करायचा कसा? शेवटी त्यानं विचार केला. विचार केला पैसे कमविण्याचा. परंतु पैसे कमवायचे कसे? तो तर अपंग होता आणि आता त्याला कामंही करता येत नव्हतं मेहनतीचं. त्यानंतर त्यानं विचार केला. विचार केला पैसे कमविण्यासाठी काम करायचा. कोणतेही काम. तो काम करायला निघाला. परंतु तो अपंग असल्यानं त्याला कोणीही काम देत नव्हतं. शेवटी एका व्यक्तीनं उपहासानं म्हटलं, 'लंगड्या माणसाले काम कोण देईल? भीक मांग भीक.'
त्या माणसाचं बोलणं. ते बोलणं ऐकून फारच राग आला होता त्या माणसाचा. वाईट वाटत होतं. परंतु प्रारब्धच शेवटी ते. काय करणार? उपाय नव्हता. तसा तो विचार करु लागला त्या भीकेवर. तसं कोणीच आपल्याला काम देत नाही हे पाहून त्यानं ठरवलं. आपण भीक मागावी.
सुरेश एक वल्डकप खेळलेला मातब्बर खेळाडू. परंतु आज त्याची अवस्था नियतीनं भीक मागण्यासारखी करुन टाकली होती. त्यालाही कळत नव्हतं की आपल्यासोबत काय होतंय आणि परिस्थिती आपल्याला काय काय करायला लावतेत. परंतु स्वतःला परिस्थितीचा एक प्याधा म्हणून तो नशिबाची वाट चालत होता आणि त्याही परिस्थितीत तो स्वतःला धन्य समजत होता.
'भीक मागावी, जर पैसे कमवायचे असेल तर......' त्यानं विचार केला. तसा विचार करताच त्याला सुरुवात करण्याआधी स्वतःची लाजही वाटत होती. परंतु पैसे जगायला हवेच आहेत तर भीक मागावीच लागेल. असा विचार करुन तो गावात भीक मागू लागला. त्यातही त्यानं वेळापत्रक बनवलं होतं. भीकेची वेळ वेगळी अन् लिहिण्याची वेळ वेगळी. आता तर बऱ्यापैकी पैसा मिळत होता व मुलांनाही अन्न, पाणी व शिकवता येत होतं.
एकदाचा तो दिवस उजळला. एक दिवस त्याची मुलं लवकर शाळेतून आली होती. घराला कुलूप होता व ती मुलं बापाला शोधायला बाहेर पडली होती. तशी त्यांची नजर बापावर पडली. त्यांचा बाप भीक मागत होता व बापाचा लोकं अपमान करीत करीत त्याला भीक देत होते. ते दृश्य पाहताच मुलांना वाईट वाटलं. त्यानंतर ते घरी आले. घरी आल्यावर मुलांनी वडीलांना म्हटलं,
"बाबा तुम्ही भीक का मागता?"
मुलांचा तो प्रश्न. त्यावर सुरेशनं डोळ्यातून अश्रू काढले. तसा तो म्हणाला,
"बाळांनो, मी अपंग. होते नव्हते ते सारे पैसे संपले. कसं जगावं हा प्रश्न आहे आपल्यासमोर. कामाचं विचारुन पाहिलं लोकांना. तेव्हा लोकं काम देईनात. तेव्हा एकजण म्हणाला, 'भीक मागावी, जर पैसे कमवायचे असेल तर. मग ठरवलं, आपण भीक मागावी. काम मिळत नाही तर काय करावं. शेवटी विचार करुन निर्णय घेतला आणि भीक मागायला सुरुवात केली. सुरुवातीला लाज वाटत होती. परंतु काय करु. उपाय नव्हता. आता काही वाटत नाही."
"परंतु बाबा, आमच्या शाळेतील मुलं काय म्हणतील आम्हाला?"
"ते खरं आहे बाळ. परंतु जर मी भीक मागीतली नसती तर आपल्याला पोटही भरता आलं नसतं. मी जे काही केलं, ते तुमच्याच भल्यासाठीच की नाही आणि तुमचं शिक्षण देखील या भीकेनंच केलं हे लक्षात घ्या."
"हो, पण आम्ही आमच्या मित्रांना काय उत्तर द्यावं?"
"म्हणावं की आमचा बाप अपंग आहे. त्याला कोणी काम देत नाही. म्हणूनच भीक मागतो. शेवटी तो काय करणार म्हणावं."
ते बापाचे बोल. ते बोल खरे होते. ते ऐकून मुलांच्याही डोळ्यातून अश्रू निघाले होते.

******************************************

तो वल्डकपचा खेळ. तो खेळ युद्ध करण्यासारखाच होता. युद्धात जसा सैनिक शत्रूंशी लढतो. त्यानंतर तसा तो शत्रूंशी लढत असतांना कधी कधी घायाळ होतो व असा घायाळ झाल्यावर त्याचे पायही कापावे लागतात. त्यानंतर जर त्याची पत्नी तो अपंग झालेला असतांना त्याला सोडून जात असेल तर त्यानं काय करावं? परंतु त्यात त्याला वेतन असतं, पेन्शन म्हणून. परंतु सुरेश वल्डकप खेळला होता. त्यातच त्याचा वल्डकपमुळंच अपघात झालेला होता. तशी त्याला पेन्शनही नव्हती. त्यामुळं आज त्याचे जे हालबेहाल होत होते. ते हाल बघवत नव्हते नजरेनं. वडील सुरेश. त्यानं आपल्याच बाळांना सफाई देताच ती मुलं चूप बसली व त्यांच्या मनात आपल्या बापाबद्दल मोठी आस्था निर्माण झाली होती.
काळ असाच पलटला होता जीवनाचा. मुलं आज वल्डकप खेळण्यालायक झाली होती व आगामी काळात वल्डकप येणार होता. सुरेशची मुलं तयारी करीत होती वल्डकपची. तसा वल्डकप सुरु होणारच होता व मुलं वल्डकप खेळायला लागणार होती. परंतु त्यापुर्वी सराव सामने सुरु झाले होते.
ते सराव सामने. तसे त्या सराव सामन्यात सुनील व अनिलच्या जोडीनं चांगला पराक्रम केला व चांगल्या धावसंख्या उभारुन स्वतःची वाहवा करुन घेतली होती.
तो क्रिकेटचा खेळ. त्या क्रिकेटच्या खेळातून आता भरपूर पैसा मिळत होता. त्यामुळं घरी पैसा मुबलक येत होता. शेवटी एवढा पैसा आता उपलब्ध होत होता की त्या पैशातून सुरेश आपलं व त्या तिनही लेकराचं पोट भरु शकत होता. त्याला भीक मागायची आता गरज उरली नव्हती. तसं त्यानं आपली भीक मागणं बंद केलं होतं.
सुरेशनं आज जरी भीक मागणं बंद केलं असलं तरी त्याला जुन्या गोष्टी आठवत होत्या. सुरेशला सुनील व अनिलचा खेळ बहरतच चालला होता की एवढ्यात त्याच्या पत्नीचा सरुचा नोटीस त्याला आला होता. जवळ पैसा नव्हता व भीक मागण्याशिवाय पर्याय नव्हता. त्या भीकेतूनही जास्त पैसे मिळत नव्हते. अशा अवस्थेत असतांना सुरेशला त्याच्या पत्नीचा नोटीस येणं काही साधारण गोष्ट नव्हती. त्यामुळं त्याच्या समोर त्याही गोष्टीनं प्रश्नचिन्हं उभं राहिलं होतं.
सुरेशचं कार्य महान होतं. आज वल्डकप हे पुस्तक गाजत होतं. तसं पाहता त्याचे लेखही निरनिराळ्या वर्तमानपत्रातून सातत्यानं छापून येत होते. तसं पाहता त्याला पुरस्कार हवा होता. परंतु त्याला पुरस्कार मिळत नव्हते. त्यातच ज्यांचे कार्य सुरेशएवढे नव्हते. त्यांना पुरस्कार मिळत होते. परंतु सुरेशला नाही. त्यामुळंच सुरेशच्या मनात विचार येत होता. तसा तो विचार करु लागला होता.
आज दिखाव्याचं जग आहे. आजच्या काळात दिखाव्याला फारच महत्त्व आहे. या काळात जे दिसतं. ते वास्तविक दृष्ट्या सत्य नसतं व जे सत्य नसतं, ते सत्य असल्याचा दिखावा केला जातो.
मानसन्मानातही तसंच आहे. मानसन्मानामध्ये ज्या लोकांचा मानसन्मान व्हायला नको, त्यांचा मानसन्मान होतो व त्यांना मानसन्मान मिळतं आणि ज्यांचा मानसन्मान व्हायला हवा, त्यांचा मानसन्मान आजच्या काळात होत नाही. असं हे जग आहे. खरं सांगायचं झाल्यास आजचं जग हे दिसतं तसं नसतं, अशाच स्वरुपाचं आहे.
आज त्यांच्यातीलच उत्तूंग गुणवत्ता दाखविणाऱ्या व्यक्तीचा सत्कार होत नाही. उलट सत्कार होतो एखाद्या नेत्याचा. जो सतत निवडून आला व मंत्री बनला. परंतु एक विचार केल्यास काय करतो तो? कोणती अंगमेहनत करतात ते? तरीही त्याचा मानसन्मान होत असतो. इथं सत्कार होतो वल्डकप जिंकणाऱ्यांचा. त्यांना तर डोक्यावरच बसवलं जातं या देशात. तसा विचार केल्यास ते कोणती अशी मेहनत करतात बरं? त्यांच्या मेहनतीच्या भरवशावर देशाला पोषता येतं का? याचंही उत्तर नाही असंच येतं. तसाच मानसन्मान मिळतो एखाद्या सेलिब्रेटींना. परंतु त्या सेलिब्रेटींचा तरी सन्मान कशाला करावा? असं कोणतं चांगलं काम करीत असतात ते? ते तर स्वार्थ साधत साधत भरपूर पैसा कमवीत असतात व स्वतःची मालमत्ता वाढवत असतात.
कोणी कोणी शिक्षकांच्या चांगल्या कामाची पावती म्हणून त्याचा सन्मान सोहळा करतात. तसं पाहिल्यास हा सोहळा व्हायलाच हवा असं म्हणतात. कारण हा शिक्षकच लोकांना मार्ग दाखवतो. दिशा ठरविण्यासाठी प्रयत्न करतो. तो नसेल तर कोणालाच शेती करता येणार नाही. तो नसेल तर कोणत्याच मजूराला एखाद्या वस्तूंचं उत्पादन करता येणार नाही. अन् तोच नसेल तर सेलिब्रेटीही घडणार नाही. अन् तोच नसेल तर कोणी क्रिकेट वा कोणताच खेळ कोणालाच खेळता येणार नाही. तसं पाहिल्यास इथे आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळतात. परंतु कोणाला? जे त्या पुरस्काराचे लायक नसतात. ज्यांचं काहीही कार्य नसतं. याबाबत एक प्रसंग सांगतो. एक शिक्षक एकदा एका सामाजीक कार्य करणाऱ्या संस्थाध्यक्षाला म्हणाला,
"मला आपल्या संस्थेअंतर्गत घेतलेल्या कार्यक्रमाचं सहभाग प्रमाणपत्र द्यावं. वाटल्यास पैसे घ्यावेत."
त्या शिक्षकानं म्हटलेले शब्द. तशी ती सामाजीक संस्था तसं सहभाग प्रमाणपत्र देणार नव्हती. परंतु फुकटचे पैसे मिळतात म्हणून त्या संस्थेनं त्याला कार्यक्रम नसतांनाही मागील तारखेचे बरेच प्रमाणपत्र दिले. ज्यात त्याचा सहभाग नव्हता. शेवटी न राहवून त्याला उत्सुकतेनं विचारलं,
"हे प्रमाणपत्र कशासाठी हवेत?"
माझा तो प्रश्न. त्यावर तो म्हणाला,
"मला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवायचाय."
त्याचं ते म्हणणं बरोबर ठरलं. कारण काही दिवसानं त्याला खरोखरच आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
अलिकडं असंच आहे. दिसतं तसं राहात नाही. प्रत्यक्ष शहानिशा करुन पुरस्कार मिळत नाही. कारण कोणत्याही पुरस्कार देणाऱ्या संस्था वा शासनही त्या व्यक्तीच्या घरापर्यंत येत नाहीत. त्यातच सर्व बनावट कागदपत्रानं सगळं तयार करता येतं. एवढंच नाही तर बनावट मागील तारखेच्या वर्तमानपत्रातील बातम्यांची कात्रणंही तयार करता येतात. हे सगळं कशासाठी? तर फक्त खोटा सन्मान मिळविण्यासाठी. ज्या सन्मानात मानमरातब असतो. तो इतरांसाठी. स्वतःसाठी तो मानमरातब नसतो. कारण तो सन्मान खोट्यातून मिळविल्यानं आपण स्वतः आपल्याच नजरेतून उतरुन गेलेले असतो.
सन्मान प्रकारात साहित्यीक माणसांचाही सन्मान होतो. जो व्हायला नको. परंतु लोकांना वाटतं की साहित्यीक माणसांचा सन्मान केल्यानं त्याच्या हातून बरंच नवीन साहित्य निर्माण होत असतं. ठीक आहे. नवीन साहित्याची निर्मीती साहित्यीकांकडून होते. परंतु महत्वाचं म्हणजे त्याचं लिहिणं हे जगासाठी नसतं. जगाला फक्त वाचनाचा आनंद मिळतो. अन् त्याला त्यातून पैसा मिळत असून तो पैसा त्याच्या स्वतःसाठी असतो. ज्यातून समाजाला पोषले जात नाही वा समाजाचा विकास होत नाही.
मानसन्मान........ मानसन्मानाचा विचार केल्यास मानसन्मान हा शेतकरी वर्गाचा व्हायला हवा. समजा एखाद्या शेतकऱ्यांकडून उत्तम प्रतीचं उत्पादन निघालं तर मानसन्मान व्हायलाच हवा किंवा त्यानं एखादा नवीन प्रयोग आपल्या शेतात केला तरही त्याचा मानसन्मान व्हायला हवा. कारण तो शेतकरी जगाला आपल्या मेहनतीच्या भरवशावर पोषतो. तसाच मानसन्मान हा एखाद्या कामगारांचा व्हायला हवा की जो आपल्या मेहनतीच्या भरवशावर आपल्या देशाला पोषतो. बदल्यात हे घटक पैसे घेतात. परंतु पाहिजे तेवढे घेत नाहीत. कारण ते देशाचे सेवक आहेत व फक्त सेवाशुल्क घेतात. उत्पादन शुल्क घेत नाहीत. हे प्रत्यक्षदर्शी दिसतं.
महत्वाचं सांगायचं म्हणजे आज पुरस्काराचं पीक अतिशय जोमात आलेलं दिसतंय. जशा दररोज वर्तमानपत्रात अपघाताच्या बातम्या येतात. तशाच आजच्या काळात पुरस्काराच्याही बातम्या येवू लागल्या आहेत. तसं पाहिल्यास आजच्या काळात पुरस्काराचे स्वरुप चिल्लर वाटायला लागले आहे. देशात बरेचसे असे पुरस्कारार्थी आहेत की त्यांच्याकडे पाहिलं तर असं वाटतं की यांना कशाला पुरस्कार दिले असावेत? कारण तसं पडताळून पाहिल्यास त्या व्यक्तीवरुनही महान कार्य करणारे देशात असतात. ज्यांनी कधीच पुरस्काराची अपेक्षा केलेली नसते. फक्त कार्य करणे हा त्यांचा स्वभाव असतो व ते तेवढं कार्य करीत असतात. तसाच गीतेतील एक संदेश पदोपदी वसवतात की फळाची अपेक्षा करु नये. फक्त कार्य करीत राहावे.
विशेष सांगायचं झाल्यास आज सर्वच क्षेत्रातील पुरस्कार बंद करावे. कारण त्या सर्व पुरस्कारार्थींचं कार्य हे त्यांच्या स्वतःचा विकास करण्यासाठी असतं. लोकांचं मनोरंजन करण्यासाठी असतं. यात जास्त पैसे व श्रम वाया जात असतात. तसंच जे श्रम वाया जातात, जो पैसा वाया जातो. तोच पैसा व श्रम देशकार्य करण्याच्या कामी लावावे. जेणेकरुन देशाचा विकास होईल व देश आत्मनिर्भर बनू शकेल. अन् पुरस्कार द्यायचाच झाला तर तो शेतकरी व मजूरांनाच द्यावा की जे या देशाचे खरे आधारस्तंभ असतात. तसेच ते सृष्टीचेही आधारस्तंभ असतात. सृष्टीनिर्मातेही असतात. तसं पाहिल्यास शिक्षकांनाही पुरस्कार देवू नयेत. कारण शिक्षक व मायबाप हे लोकांसाठी देव असतात व कोणतेच मायबाप जसे पुरस्कार घेत नाहीत. तसाच पुरस्कार शिक्षकानंही घेवू नये. कारण तसा पुरस्कार घेतल्यानं शिक्षकांचा विद्यार्थ्यांप्रतीचा जो दर्जा असतो. तो खालावतो व त्याला मुल्य उरत नाही.
महत्वपुर्ण बाब ही की पुरस्कार म्हणजे मनोरंजन नाही की कोणालाही देवून मनोरंजन करुन घेतात येईल. त्याचं एक मुल्य आहे. विशेष असं मोल आहे त्यात. त्यात कोणालाही तो देवून चिल्लरपण आणता कामा नये. असं जर वारंवार घडत गेलं तर त्याला मुल्यच राहणार नाही व तो चिल्लर प्रतिचा होईल यात शंका नाही.
आज सुरेश पुरस्कारासाठीही तळपत होता. परंतु त्याला पुरस्कार मिळत नव्हता. तसं पाहता त्यातच आता त्याच्या पत्नीचाही खटला उभा झाला होता. ते पाहून त्याला जास्तच विचार येत होता.