Want to change school timings? books and stories free download online pdf in Marathi

शाळेची वेळ बदलवायचीय काय?

शाळेची वेळ बदलवावी काय?

शाळा नऊ नंतर भरवायची का? हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आता प्रत्येक जनमाणसात निर्माण झाला आहे. तसं पाहता त्यावर मा. शिक्षण मंत्र्यानंही आपलं मत मांडलं आहे. त्यावर प्रत्येकजण आपापलं मत मांडत आहेत. कोणी कोणी काहीही उलटंसुलटं बरळत आहेत.
आज वेळ बदलवायलाच हवी असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. तसं आवाहन मा. शिक्षकमंत्री दिपक केसरकर यांनी केले आहे. त्यातच त्यांनी म्हटलं आहे की असं केल्यानं त्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होवू शकतो. तसं पाहिल्यास तसं त्यांचं म्हणणं बरोबर असून तो त्यांचा निर्णय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने रास्त आहे.
वरील दृष्टिकोनातून विचार केल्यास झोप.......माणसाची झोप ही अतिशय महत्वपुर्ण गोष्ट आहे. जर पुरेशी झोप झाली नाही तर माणसानं मन चिडचिडं होत असतं. माणसाला दिवसभर बेचैनी वाटत असते. त्यातच कोणत्याही कामात बरोबर लक्ष लागत नाही. काम करायला आवडत नाही. झोपच घ्यावीशी वाटते. याचाच अर्थ असा की जिथं घरची कामंच करायला आवडत नाही. तिथं शाळेतील अभ्यास करायला कसं आवडणार. तरीही सकाळी सकाळी मुलं स्वतःच्या मनातून नाही तर मायबाप म्हणतात म्हणून किंवा शिक्षकांच्या धाकाने शाळेत जात असतात. अशावेळेस मुलं शाळेत जात असतांना त्यांना शाळेत शिकावंसं वाटत नाही. शिक्षकांच्या शिकविण्याकडं लक्ष नसतं त्यांचं. त्यामुळंच मुलं शिकत नाहीत. शिकता येत नाही.
शिक्षण.....अलिकडील काळातील देशाच्या विकासाच्या बाबींमधे सर्वात महत्वाची बाब आहे. या बाबींचं महत्व लक्षात घेवून शासनानं भविष्यवेधी शिक्षणाचा अभ्यासक्रम बनवला. त्याच शिक्षणाचा एक भाग म्हणून शाळेची वेळ वाढवणे हाही भाग अतिशय महत्वपुर्ण भाग आहे. त्यानुसार ती वेळ वाढविण्याचं ठरवलं आहे. परंतु याही गोष्टीला काही लोकांचं म्हणणं असं आहे की जर ही वेळ वाढवली तर मुलांमध्ये आळशी वृत्ती वाढीस लागेल. त्यातच सकाळी वातावरण हे शुद्ध असतं व त्या वातावरणात असलेला शुद्ध ऑक्सिजन मुलांना मिळणार नाही. जो आता सकाळी शाळा असल्यानं मिळत असतो. ज्यातून आरोग्याच्या समस्याच निर्माण होवू शकत नाही असं लोकांचं म्हणणं.
शालेय वेळ. त्या वेळेबाबत विचार केल्यास व दुसरी बाजू पाहिल्यास तशी बदलवणंही योग्य वाटत नाही कारण प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतातच. तसाच प्रत्येक गोष्टीचा फायदा तोटा असणारच. तसं लोकांचं म्हणणंही बरोबरच आहे की वातावरणातील शुद्ध ऑक्सिजन शरीराला मिळणार नाही. जे ऑक्सिजन शरीराला अतिशय आवश्यक आहे. ज्यानं आरोग्य चांगलं असतं. दिर्घायुष्य लाभू शकतं. तसा सकाळी उठण्याला इतिहासही आहे. पुर्वीचे लोकं सकाळी उठायचे. सडा सारवण करायचे. या सडा सारवणानं व्यायामही व्हायचा. आताच्या काळासारखा वेगळा व्यायाम करण्याची गरज राहायची नाही. ते मुलांनाही सकाळी उठवायचे. ज्यातून मुलं उत्साही राहायची. ज्यातून आरोग्याच्या समस्या असायच्या. परंतु तेवढ्या समस्या नसायच्या. ज्यातून दिर्घायुष्य लाभायचं. तसं पाहता पुर्वीचे लोकं रात्रीला लवकरच झोपायचे. कारण रात्रीला लाईट नसायची. त्यामुळं उजेडही नसायचा. तसाच मोबाईलचा शोध लागलेला नव्हता.
आज काळ बदलला. बदलत्या काळानुसार स्मार्टफोन आला. त्या स्मार्टफोनच्या नादात लोकांचा रात्री झोपण्याचा वेळ वाढला. त्याच नादात मुलंही जागायला लागली. मोबाईलमुळं सकाळी झोपेतून उठण्याची वेळ वाढली. त्यातच मुलांच्या झोपून उठण्याची वेळ वाढली. म्हणूनच वेळ वाढविण्याची गरज आहे असं वाटतं. परंतु यातून पुढील जीवनात गंभीर समस्या नक्कीच निर्माण होवू शकतात हेही तेवढंच खरं आहे. यावर विचार व्हायला हवा.
महत्वाची गोष्ट ही की वेळ शाळेची बदलवावी की बदलवू नये. हा प्रश्न नाही. प्रश्न आहे विद्यार्थ्यांना सवय लावणे. ही सवय विद्यार्थ्यांच्या लहानपणीच लागू शकते अन् ती लहानपणापासूनच लावायला हवी. याच अनुषंगाने सकाळी शाळा असणे गरजेचे आहे. परंतु त्यावर जनमत ती गोष्ट जरी आरोग्यदायी असली तरी ती स्विकारायला तयार नाही. त्यातच मंत्रीमंडळात असलेली मंडळी उगाचंच आपलं मोठेपण कसं सिद्ध करता येईल याकडे जास्त लक्ष देत असतात. ते आपलं मत मांडत असतात. काही मतं स्वागताची असतात. याचाच अर्थ असा नाही की मा. शिक्षण मंत्र्यांनी मांडलेलं मत स्वागताचं नाही. तेही स्वागताचं आहे. परंतु प्रत्येकाला संविधानातील आर्टीकल चौदानुसार स्वतंत्र मत मांडण्याचा अधिकार असला तरी आपलं मत कोणावर लादू नये म्हणजे झालं. वेळेबाबतचा निर्णय त्या त्या परिक्षेत्रातील लोकांना त्यांच्या त्यांच्या गरजेनुसार घेवू द्यावा. जेणेकरुन विद्यार्थ्यांची, पालकांची फसगत होणार नाही. विद्यार्थीही उत्साही राहतील. पालकही उत्साही राहतील व संबंधीत यंत्रणाही उत्साहीत राहील यात दुमत नाही. मात्र आपला निर्णय भोळ्याभाबड्या जीवांचं नुकसान करणारं ठरु नये. कारण शिल्पकारांना दगडाला घाव दिल्याशिवाय देवरुपात आणता येत नाही. तसंच विद्यार्थ्यांचंही आहे. त्यांनाही ते शिकत असतांना थोड्याफार यातना झाल्याशिवाय परिस्थितीशी लढणं समजणार नाही. त्यालाच शिक्षण असंही नाव देता येईल. सकाळी शाळा असणं वा उठणं हेही एकप्रकारचं शिक्षणच आहे. त्याचा बाऊ करु नये म्हणजे झालं. हं, शाळेची वेळ बदलविण्यापेक्षा विद्यार्थ्यांची शाळेत येण्याची वेळ बदलवा. जसे. ज्या विद्यार्थ्याला ज्या वेळेला शाळेत यायचे असेल. तेव्हा तो येवू शकेल. त्याचा अभ्यास व्हायला हवा. अलिकडील भविष्यवेधी शिक्षण अभ्यासक्रम तेच सांगतं. विद्यार्थ्याला स्वतः शिकू द्या. त्यावर आवर घालू नका. बंधन अजिबात देवू नका. वेळ वाढवणे हे एक प्रकारचं बंधनच आहे. विद्यार्थ्यांच्या विकासाला कुंटविण्यासाठी. तसाच त्याच्या शरीराला होणारा शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा कायमचा बंद करण्यासाठी.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

इतर रसदार पर्याय