ashi keli maat books and stories free download online pdf in Marathi

अशी केली मात

अशी केली मात
मुंबई, भारताची आर्थिक राजधानी, आणि महाराष्ट्रची राजधानी, म्हणजे एक स्वप्ननगरी अश्या या मायानगरीत सर्व जाती धर्माचे लोक वेगवेगळ्या प्रांतातून आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आनंदाने राहतात. त्यात कोणाचे स्वप्न पूर्ण होते, तर कोणी प्रयत्न करत असतो. असेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यामधून एक गजानन सावंत नावाची व्यक्ती आपल्या मामाच्या घरी रहायला येते.
काळ 70 ते 80 च्या दशकातील असतो. गजानन मामाच्या घरी येतो तेव्हा त्याचे शिक्षण पूर्ण झालेले असते. गजानन हा खूप हुशार असतो. गजाननचे वडील गावामध्ये मच्छीमार असतात. गजाननचा मोठा भाऊ त्यांना त्या कामात मदत करत असे. पण गजाननला त्यात जराही रस नसतो. म्हणून तो मुंबईत येतो. मुंबईला आल्यावर गजाननला चांगली नोकरी मिळते. नोकरीमुळे पैसे पण बर्‍यापैकी मिळत असतात. म्हणून गजानन मामाच्या मदतीने एक घर विकत घेतो. ते घर मुंबईतील अंधेरी विभागात कैलास नगर या कॉलनीमध्ये असते. कैलास नगर कॉलनीमध्ये एकूण 30 लांब गॅलरीच्या बिल्डिंग असतात. एका बिल्डिंगमध्ये 40 खोल्या असतात. गजानन त्यापैकी बिल्डिंग नंबर 5 मध्ये चौथ्या मजल्यावर एक घर घेतो. नंतर त्याचे लग्न होते. पुढे गजाननला 2 मुले होतात. एक मुलगा, आणि एक मुलगी,
गजानन मुलाचे नाव अजय, आणि मुलीचे नाव सीमा, असे ठेवतो. मुले मोठी होत असतात. अजय इयत्ता आठवीमध्ये असतो. तर सीमा सहावीच्या वर्गात असते. आणि त्याच वर्षी गजाननच्या कुटुंबावर एक संकट येते. ते म्हणजे गजाननची बायको, अजय व सीमाची आई हे जग सोडून निघून जाते. तिला कॅन्सर हा आजार असतो. पण कॅन्सरवर आपल्या भारतात खूप कमी ठिकाणी उपचार होतो. त्यामुळे तिला पण योग्य उपचार मिळत नसतो. म्हणुन ती मरते. दोन मुले आणि चांगला सुरू असलेला संसार असा मधेच सोडून निघून गेलेल्या बायकोच्या आठवणीने गजानन पुरता निराश होतो. पण अजय आणि सीमा त्याला सावरतात. गजाननच्या बायकोची इच्छा असते की तिच्या मुलांपैकी कोणीतरी डॉक्टरची पदवी प्राप्त करावी. आणि म्हणूनच तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी गजानन अजयला डॉक्टर करण्यासाठी प्रयत्न करू लागतो. अजय इयत्ता दहावी पास झाल्यावर गजानन त्याच्या पुढच्या शिक्षणासाठी कर्ज घेतो. दर महिन्याला पैसे थोडे, थोडे, करून फेडू लागतो. साल 2000 च्या नंतर मुंबईत बर्‍याच ठिकाणी पुन: बांधकाम योजना सुरू होते. तेव्हा मुंबईत असलेला अनेक धोकादायक किवा दोन, चार मजली इमारतीच्या पून:बांधकाम करण्यासाठी काही बिल्डर्स समोरून येत असत. अशीच योजना अंधेरीमध्ये पण सुरु होते.
अंधेरी विभागात असलेल्या बर्‍याच दोन, चार मजली इमारती पून:बांधकाम करून देण्यासाठी एक बिल्डर्स कैलाश नगर कॉलनी मध्ये पण येतो. त्यात त्याची नजर गजानन राहत असलेल्या बिल्डिंग जवळ जाते. तो गजाननच्या बिल्डिंग मध्ये पण पुन:बांधकाम करण्यासाठी सर्व सभासदांना एकत्र करून एक मीटिंग घेतो. त्या मीटिंगमध्ये असे ठरते कि, सर्व सभासदांना 5 लाख रुपये अगोदर देण्यात येईल. आणि 3 वर्षासाठी आजच्या मार्केट रेट प्रमाणे भाडे देण्यात येईल. तसेच आता असलेल्या एक रूम किचनच्या बदल्यात, दोन रूम किचन देण्यात येईल. असा ठराव मंजूर होतो. म्हणुन सर्व सभासद तयार होतात. पुढे काही महिनांच्या आत सर्व जण बिल्डिंग खाली करून बिल्डर्सला ताबा देऊन मोकळे होतात. गजानन आपल्या दोन्ही मुलांना घेऊन बाजूच्या कॉलनीमध्ये एक घर भाड्याने घेतो. त्या रूमचे भाडे 15 हजार रुपये असते. बिल्डर्स 20 हजार देत असतो. एक वर्ष असेच निघून जाते. अजय पण मेडिकलच्या शिक्षणात बर्‍यापैकी यश मिळवत असतो. तेवढ्यात एक संकट पुन्हा चालून येते.
गजानन ऑफिस मधून घरी आल्यावर आणि कर्ज, तसेच मुलांच्या शिक्षणासाठी हातभार लागावा म्हणून संध्याकाळी ऑटो रिक्षा चालवत असे. असेच एकदा ऑटो रिक्षा चालवत असताना समोरून येणाऱ्या गाडीचा अंदाज न आल्यामुळे गजाननचा अपघात घडून येतो. आणि त्या अपघातात गजानन हे जग सोडून निघून जातो. अजय आणि सीमासाठी हा खूप मोठा धक्का असतो. अगोदर आई, आणि आता वडील, दोन्ही मुले पोरकी होतात. अजय पूर्ण पणे कोसळून जातो. मग सीमा त्याला सावरायला लागते. दोघेही भाऊ बहीण एकमेकांना मिठी मारून रडू लागतात. पुढे काही दिवस असेच जातात. आणि मग राहत्या घराचे भाडे तसेच बॅंकेचे कर्ज आणि शिक्षण या सर्व गोष्टी गजानन मागे सोडून जातो. ही सर्व जबाबदारी अजयवर येते. कोणत्याही कामाचा अनुभव नसलेल्या अजयला स्वतःचा मेडिकलचा अभ्यास करून या सर्व गोष्टी हाताळणे म्हणजे एक जोखिमचे काम होते. तेवढ्यात एक संकट जात नाही तोवर अजून एक संकट येते ते म्हणजे ज्या बिल्डर्सने बिल्डिंग ताब्यात घेतली असते तो बिल्डर्स एका फसवणुकीच्या आरोपाखाली तुरुंगात जातो. म्हणून बिल्डिंगचे काम पण बंद होते. तसेच ठरविले असलेले भाडे पण मिळत नसते. म्हणून मग अजय राहत असलेले 15 हजार भाडे असलेले घर सोडून देतो. आणि अंधेरी विभागात असलेल्या वर्सोवा झोपडपट्टी मध्ये एक 10 बाय 10 ची खोली 3 हजार भाडेतत्त्वावर घेतो.
संकट आली की एकत्र येतात. पण त्यातून जो मार्ग काढतो तोच खरा योद्धा असतो. ही शिकवण अजय आणि सीमाला त्यांच्या आई वडिलांनी आधीच देऊन ठेवली होती. म्हणून मग अजय त्या संकटातून मार्ग कसा काढायचा याचा विचार करतो. जॉब करून शिक्षण पूर्ण करणे शक्य नसते. म्हणून अजय मेडिकलचे शिक्षण मधेच सोडून देतो. आणि आपल्या आईचे स्वप्नं पूर्ण झाले पाहिजे म्हणून मग आपल्या बहीणला डॉक्टर करण्यासाठी प्रयत्न करू लागतो. सुरवातीला अजय विमानतळ परिसरात लोडरचा जॉब करू लागतो. लोडरचा जॉब 3 शिफ्ट मध्ये असतो. सकाळी 7 ते दुपारी 3, आणि 3 ते 10, आणि 10 ते 7, त्यामुळे मग अजय मधल्या वेळात स्वतः जवळ असलेल्या बाइकने ऑनलाईन बाइक डिलेव्हरीचे काम करू लागतो. असे करून अजय स्वतःच्या बहिणीचे शिक्षण, वडिलांनी घेतलेले कर्ज, घराचे भाडे, आणि घर खर्च चालवत असे. असे करता करता आणखी 1 वर्षे निघून जाते. एक दिवस बाइक डिलेव्हरीचे काम करताना अजयची बाइक सरकून रस्त्यावर पडते. तेव्हा अजयच्या पायाला मार लागतो. पुढे महिनाभर तरी बाइक नाही चालवता येणार, असे डॉक्टर बोललात. आणि ते शक्य नव्हते. कारण मग पुन्हा सर्व घडी विस्कटून गेली असती. म्हणून अजय 8 दिवसांनी पुन्हा कामावर जाण्यासाठी निघतो. लोडरचे काम करताना पायाला खुप वेदना होऊ लागतात. पण अजय दोन्ही हातावर आणि एका पायावर जोर धरून लोडरचे काम करु लागतो. बाइक डिलेव्हरीच्या कामाची एक अट असते ती म्हणजे ऑनलाईन ओपन करण्यासाठी 15 दिवसाचा काळ निघून गेला तर अकाऊंट ब्लॉक होते, हे अजयला माहीत असते. म्हणून मग अजय बाइक डिलेव्हरीचे काम करायला जात असतो. तेव्हा सीमा त्याला नको जाऊ सांगते. पण अजय तिचे ऐकून घेत नसतो. तेव्हा सीमा त्याला बोलते की दादा तू मागे बस, मी चालवते, असे करून पुन्हा बहीण भाऊ त्या संकटातून मार्ग काढतात. रात्री घरी आल्यावर घरात लाइट नसते. आणि सीमाला दुसर्‍या दिवशी कोणत्याही परिस्थितीमध्ये मेडिकलची परीक्षा देण्यासाठी अभ्यास करणे गरजेचे असते. तेवढ्यात मग अजय आपल्या मोबाईलवर टॉर्चच्या लाइटचा प्रकाश करून सीमा जवळ बसून राहतो. सीमा मेडिकल परीक्षा पास होते. आणि डॉक्टर पण होते. पुढे घर पण मिळते. अश्या पद्धतीने अजय आणि सीमा आपल्या आई वडिलांच्या निधनानंतर स्वतःचे घर सावरतात. आणि मग पुढे सीमा डॉक्टर होते एका क्लिनीकची पण मालकीण होते. अजय पण स्वताचे हॉटेल ओपन करतो. सर्व सुरळीत पार पडते.
आलेल्या संकटातून मार्ग कसा काढायचा याचा नीट विचार केला तर यश हे नेहमी मिळते.
अजय आणि सीमाने, ....अशीच केली संकटातून मात.
म्हणूनच म्हंटले आहे ,अशी केली मात,

ही कथा पूर्ण पणे काल्पनिक आहे तसेच काही साम्य आढळले तर तो योगायोग समजावा

लेखक: अमित अशोक रेडकर

इतर रसदार पर्याय