Ti Anokhi Ratra - 1 books and stories free download online pdf in Marathi

ती अनोखी रात्र - 1

रात्री जेव्हा मला जाग आली तेव्हा घड्याळात २ वाजले होते. यावेळी मला जाग येणे काही नवल नव्हते. मी किचन मध्ये गेले पाणी प्यायले आणि थोडी फ्रेश झाले. पुन्हा आपल्या रूम मध्ये परत आले. पूर्ण घरात मी एकटीच होते. माझ्याकडे फोनही नव्हता. कॉलेजला सुट्ट्या लागल्या होत्या म्हणून मी माझ्या आत्या च्या घरी गावी आले होते. माझी आत्या आणि तिचा मुलगा अचानक काम आल्यामुळे मुंबईला गेले होते. माझी झोप पूर्णपणे उडाली होती त्यामुळे आता एक-दोन तास तरी काही झोप येणे शक्य नव्हते. म्हणून मी माझ्या आवडीचे काम करत बसले होते. मला वेगवेगळ्या ठिकाणांची, वस्तूंचा विचार करायला खूप आवडत होते. माझे कोणीही मित्र-मैत्रिणी नव्हत्या, त्यामुळेच विचारांशी माझी चांगली मैत्री होती. मला माझ्या रूममधील खिडकी जवळचे दृश्य खूप आवडते कारण तिथून खूपच सुंदर निसर्ग दिसतो. ती खिडकी घराच्या मागच्या बाजूला होती. तिथे बसल्यावर जणू काही स्वर्गात असल्यासारखे वाटते. त्या खिडकीत मी बसून मी माझ्या विचारांत बुडाले होते. इतक्यात जोरात काहीतरी पडल्याचा आवाज आला. आवाज एवढ्या जोराचा होता की, त्या आवाजाने मी खूप घाबरले होते. घरी एकटीच होते त्यामुळे कोणाची मदतही घेता येत नव्हती. मी घाबरतच बाहेर आले. त्या आवाजाच्या दिशेने जाणार इतक्यात लाईट गेली. आतापर्यंत जो निसर्ग मला सुंदर वाटत होता तो अचानक भयंकर वाटू लागला होता. त्या भयानक अंधारातच मी पुढे गेले आणि कपाटावरचा टॉर्च शोधू लागले. टॉर्च घेऊन मी हॉलमध्ये आले तर टॉर्चही बंद झाला. कारण टॉर्च चार्ज करायला मी विसरले होते. मला माझाच राग येत होता. इतकी कशी मी वेंधळी आहे. तेवढ्यात अचानक माझ्या मागून एक सावली गेली. मागे वळून पाहिले तर मला काहीच दिसले नाही. हा माझा भास नाही याची तर मला खात्रीच होती. मी पुहा समोर मागितले तर माझ्यासमोर एक ५ फूट उंच माणूस उभा होता. बाहेर जोराचा वारा आणि पाऊस चालू होता पण मात्र घामाने पूर्णपणे भिजले होते. त्या माणसाने काळ्या कलरचा टी-शर्ट घातला होता. त्याचे केस विस्कटलेले होते आणि थंडीने तो थरथर कापत होता. त्याला बघून मी पूर्णपणे ब्लँक झाले होते. मला काहीच सुचत नव्हते. तेवढ्यात तो माणूस शायरी म्हणू लागला. ती शायरी ऐकून मी भारावून गेले. कारण ती शायरी तर माझीच होती. माझ्याशिवाय ती दुसऱ्या कोणालाच माहित नव्हती. मला काहीच समजत नव्हते. तो माणूस एका नजरेने माझ्याकडेच बघत होता. मी खूप घाबरले होते. घाबरतच मी त्याला विचारले, कोण आहेस तू? तो माणूस मला म्हणाला. तू मला ओळखत नाहीस, पण मी तुला चांगलच ओळखतो. तो माणूस जे म्हणाला ते मला काहीच समाजलले नाही. मी विचारले, म्हणजे! आणि तू माझ्या घरात कसा आलास? त्याने मला इशारा करून बसायला सांगितले. मी एका खुर्चीवर बसले आणि त्याच्याकडेच बघत होते. तो म्हणाला, असं माझ्याकडे बघत राहशील तर माझ्या प्रेमात पडशील. त्याच्या या बोलण्यावर मला त्याच्या डोक्यात काहीतरी घालेन असे वाटत होते. पण मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे अजून मिळाली नव्हती, म्हणून मी शांत बसले. मी म्हणाले, जे काही सांगायचं आहे ते लवकर सांग. तुझ्या याच अटीट्युड वर मी त्यादिवशी फिदा झालो होतो तो म्हणाला. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले... त्याने सांगायला सुरुवात केली.... ७ ऑगस्ट ची ती रात्र होती. दीड १.१७ च्या ट्रेन मध्ये मी चढलो तर सर्वजण आपापल्या सीटवर झोपले होते. म्हणून मी जाऊन माझ्या सीटवर बसलो. माझी नजर समोरच्या सीटकडे गेली, तिथे तुझा तो निरागस चेहरा, स्वतःच्या जगात हरवलेली तू झोपली होतीस. तुझ्या चेहऱ्यावरची माझी नजर हटतच नव्हती. तेवढ्यात तू थोडी कुशीवर परतलीस आणि मी भानावर आलो. तुझ्याकडे असं बघणं मला बरोबर वाटले नाही. मी झोपायचा खूप प्रयत्न केला पण ते शक्य झाले नाही. सकाळी सहा च्या दरम्यान मला झोप लागली आणि जेव्हा जाग आली तेव्हा समोरच्या सीटवर तू नव्हतीस. एक वेळ असे वाटले की तू आता कधीच दिसणार नाहीस. पण इतक्यात तू परत आलीस हे पाहून मला आनंद झाला. तो जे सांगत होता ते ऐकून मला त्याचा खूप राग येत होता. कारण तो खूप वेळ झाला तरी माझीच तारीफ करत होता. मी रागातच त्याला म्हणाले, मला माझी कोणीही तारीफ केलेली आवडत नाही. थोड्याच वेळात सकाळ होणार होती. तसं तो माणूस मला म्हणाला. आता पुढची स्टोरी उद्या रात्री सांगतो. तोपर्यंत स्वतःची काळजी घे. गुड मॉर्निंग 😊अचानक लाईट आली आणि बघते तर तो माणूस गायब होता. सकाळचे ४ वाजले होते आणि मला खूपच झोप येत होती. मी झोपले आणि ७ ला उठून घरातल्या कामांना लागले. आंघोळ, पूजा झाल्यानंतर अंगणात बसले होते. थोड्या वेळाने तिथं शेजारच्या ताई आल्या आणि सांगितले, रात्री एक रानटी कुत्रा गावात घुसला होता. खूप लोकांना तो चावला. इकडे तिकडे पळून सर्व उध्वस्त करत होता. ताई हे बोलत असताना मला तो रात्रीचा आवाज आठवला. तो कुत्रा अजून पकडला गेला नाही, म्हणून पूर्ण गाव भयबीत आहे. पोरी, तू घरीच राहा आणि दरवाजा खिडक्या नीट लावून घे. एवढं सांगून ताई निघून गेल्या. अंगणातच बसल्या बसल्या मला त्या माणसाची आठवण झाली. अचानक माझ्या मनात एक प्रश्न आला "तो माणूस घरात कसा आला?" "तो कोण होता?" आणि माझ्या मागे का लागला आहे? असे खूप प्रश्न माझ्यात मनात होते पण त्यांची उत्तरे नव्हती. त्यामुळे रात्र होण्याची वाट बघण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. रात्री झोप पूर्ण झाली नसल्यामुळे मी दिवसाची पण झोपले. ४ वाजले होते. घरातील थोडी कामे करून मी हॉल मधेच बसले होते. इतक्यात आमच्या नात्यातील एक आजी मला भेटायला आली. "नंदू, कुठे होतीस? मी दुपारी आले होते, आवाज दिला पण काहीच उत्तर मिळाले नाही. तुझी तब्बेत ठीक आहे ना! आजीने काळजीने विचारले. हो आजी. रात्री लाईट गेली होती त्यामुळे झोप झाली नाही म्हणून दुपारी झोपले होते. मी चहा बनवते. किचनमधून एक कप चहा आणि बिस्किटे घेऊन आले आणि आजीला दिले. कारण मी चहा

पीत नाही. तेवढ्यात आत्या आली. कशी आहेस नंदू? काही त्रास नाही ना? म्हणतच आत्या थोडा वेळ बसली. आजीला नमस्कार केला. नात्याने तर आत्या लागते पण माझ्यापेक्षा छोटी आणि माझी खास मैत्रीण आहे. ती स्वभावाने खूप गोड आहे. आम्ही बोलायला लागलो की, खूप वेळ गप्पा मारतो. ठीक आहे आत्या असे म्हणून मीही बसले. माझ्यासारखाच आत्याही चहा पीत

नाही. त्यामुळे तिने दोन बिस्किटेच खाल्ली. चहा झाल्यावर आजी निघून गेली आणि आम्ही दोघी गप्पा मारू लागलो. नंतर गाणी लावलीव नाचलोही. थोड्या वेळाने आत्याही निघून गेली. माझ्या मनात आले होते की, रात्रीची घटना आत्याला सांगावी पण मी विचार केला, ही बातमी गावात पसरली तर खूप चर्चा होईल. मी टीव्हीवर गाणी लावली आणि जेवण बनवायला गेले. रात्रीचे जेवण झाल्यावर मी थोडा वेळ टेरेसवर फिरायला गेले. पावसाचे दिवस होते त्यामळे बाहेर गार हवा सुटली होती. मी ढगांच्या मधून चांदण्यांना शोधायचा प्रयत्न करत गुणगुणत होते. आणि अचानक...

Friends, कथेचा पुढचा भाग.....लवकरच घेऊन येईन.

इतर रसदार पर्याय