प्रेम हा शब्द ऐकताच क्षणी नाक मुरडणारी प्रिया आज स्वतःच कोणाच्या तरी प्रेमात पडली होती. आजच्या कलियुगात प्रेम म्हणजे फक्त एक खेळ आहे असे म्हणणाऱ्या त्या प्रियालाच प्रेमरोग झाला होता. त्यात तिच्या घरातील मंडळीही स्ट्रिक्ट होती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्या आई चा तिच्यावर असलेला विश्वास तिला तोडायचा नव्हता. तशी ती साधी भोळी होती. तिचा स्वभाव अगदी साधा होता. तिला जास्त कोणाशी बोलायला आवडायचं नाही. तिच्या मित्रमैत्रिणी खूप होत्या पण मित्रपरिवार सोडून ती फारशी कोणाशी बोलायची नाही. अशीही प्रिया जिला या प्रेमरोगाने याडच लावलं होतं.
प्रिया च तसं म्हटलं तर वय कमीच होतं. जरी ती कॉलेज ला जात असली तरी, पण प्रेम कुठं सांगून होत. ती 12वी मध्ये होती. कॉलेज सुरू होऊन काही महिने झाले होते तिची ओळख एका मुलाशी झाली जो तिच्याच वर्गामध्ये शिकत होता. मात्र तो वेगळ्या गावातून होता आणि ते कॉलेज प्रियाच्याच गावात होते.
11वी मध्ये कोरोना मुळे कॉलेज मध्ये मुलं जात नसल्याने नवीन कोणी मित्र मैत्रीण झालीच नव्हती. मोबाईल मुळे त्या दोघांचा संपर्क झाला होता. रोहन असं नाव होत त्याच आणि ते दोघेही एकाच वर्गात असल्याने ओळख करून घ्यावीच लागली.रोहन ही स्वभावाने तसा शांतच होता .ते दोघेही आता एकमेकांजवळ friends म्हणून chat वर बोलू लागले .
ऑगस्ट चा महिना होता आणि 15 ऑगस्ट जवळ आला होता. तेव्हाच वर्गामध्ये मॅडम ने सांगितले ,की आझादी का अमृत महोत्सव या निमित्त रांगोळी स्पर्धा ठेवण्यात आली आहे. मॅडम ने प्रिया ला उठवलं आणि या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला सांगितला. तिला इतकीही सुंदर रांगोळी काढत येत नव्हती. तरीही मॅडम ने सांगितल्यामुळे तिने आणखी दोन मैत्रिणींना घेऊन त्यात भाग घेतला आणि रांगोळी काढली. 15 ऑगस्ट ला सर्वांसमोर त्याचा रिझल्ट सांगितला. प्रिया आणि प्रियाच्या टीम चा एक नंबर आला होता. तिला तर विश्वासाचं बसत नव्हता.
संध्याकाळी रोहन चा लगेच मॅसेज आला congratulations. तो बोलला ही होता प्रियाला की तुझाच नंबर येईल आणि तेच झालं. आता या नंतर त्या दोघांचं रोज बोलणं होत होतं. ते दोघेही एकमेकांविषयी जाणून घ्यायला लागले होते. प्रेमाच्या जाळ्यात न अडकणारी मुलगी 12वी चा अभ्यास टाकून रोहन च्या मेसेज ची वाट बघत असायची. या 15 ऑगस्ट पासून प्रिया आणि रोहन ची love story सुरू झाली होती.
आता जवळजवळ 2 महिने ते दोघेही अगदी कपल सारखेच बोलत होते. मधेच तिने रोहन ला मॅसेज केला पण त्याला वेळ नाही भेटला त्यामुळे तो नाही बोलू शकला. यावर ती रागावली होती. तो sorry ही बोलला होता पण तिने ते फक्त seen करून सोडले होते. दुसऱ्या दिवशी कॉलेज ला सुट्टी मध्ये प्रिया दुकानात तिच्या मैत्रिणी सोबत गेली.
मागे वळताच क्षणी तो समोरून येत होता. आणि त्याचा चेहरा अगदी बघण्या सारखा होता.तो इतरांची नजर चुकवून तिच्याकडेच बघत येत होता आणि तो जणू sorry च बोलत होता असा त्याचा चेहरा सांगत होता. प्रिया त्याच्यावर रागवली नव्हती. तरीही ती मुद्दाम त्याला ignore मारून गेली. संध्याकाळी प्रिया आणि तो अगदी बरोबर बोलायला लागली.
कॉलेज मध्ये एका कार्यक्रमाला जायचं होत आणि प्रियाला साडी नेसायची होती. तिने त्याला फोटो पाठवून विचारलं कोणती नेसु आणि त्यानेही एक साडी chiose केली. दुसऱ्या दिवशी दोघंही एकमेकांना बघत होते. प्रियाला डान्स ची आवड असल्याने ती डान्स करत होती आणि तो ही तिच्याकडेच बघत होता.
त्या नंतर आला तो म्हणजे teacher's day. प्रियाला मराठी हा विषय शिकवायचा होता. तिने त्याला सांगितले तर तो बोलला तू बिनधास्त शिकावं मी आहे ना. तिनेही काहीच विचार न करता मराठी चा विषय शिकवण्यासाठी वर्गावर गेली. प्रिया बोलायला तशी घाबरट होती.त्यामुळे कोणालाच विश्वास बसत नव्हता. पण तरीही तिने त्याच्यासाठी ते केलं होतं. जेव्हा त्या दोघां पैकी कोणीतरी कॉलेज ल नाही यायचं तेव्हा एकमेकांना काय अभ्यास असेल तर तो सांगायचे.
प्रियाने एकदा कॉल ही केला होता रोहन ला आणि अभ्यासाच्या बहाण्याने त्याच्याशी बोलली होती.कारण तिला कॉल वर जास्त बोलायला नाही आवडायचं. त्यावेळी त्याच्या घराचे कॉल उचलतील म्हणून तिने 2 मिस कॉल दिले आणि परत कॉल केला. त्याने उचलला आणि तो थोडा लाजवट होता आणि बाजूला त्याची आई असल्याने तो हळू हळू बोलत होता.त्याच्या आई ने विचारल्यावर मित्राचा कॉल आहे अभ्यासाच विचारायला कॉल केलंय म्हणून सांगितलं.अशी त्यांची दुनिया रंगत चालली होती .
गणपती आले आणि सुट्टी पडली. त्या वेळीही ती साडी नेसली ती ही त्याच्याच choise ने आणि सुट्टी नंतर मग ते वर्गात एकमेकांना बघायचे पण बोलयचेच नाही. ते दोघे फक्त online chat वर बोलायचे.दिवाळी मध्ये काय झालं माहीत नाही त्या दोघांचं छोटंसं भांडण झालं होतं, जसं प्रत्येकामध्ये होतं. त्या वेळी रोहन पटकन बोलला की त्याच्या घरच्यांची काहीतरी अडचण आहे. घरच्यांना त्या दोघांबद्दल माहीत नव्हतं पण पुढे problem होतील असं बोलून आपण आता इथेच थांबुया असं तो बोलला.
त्यामुळं प्रियाला खूप वाईट वाटलं ती अक्षरशः रडायला लागली.कारण ती तिच्या आई चा विश्वास तोडून हे सर्व करत होती ते त्याच्यासाठीच. प्रिया ने त्याला सांगितले आता कधीच माझ्याशी बोलू नको. पण सकाळी तिला राहवलं नाही तिने मॅसेज केला आणि बोलली आपण friends म्हणून राहू शकतो ना. रोहन चा या गोष्टीसाठी विरोध नव्हता.त्यामुळे ते दोघे आता friends म्हणून बोलू लागले. Friends सारखे मस्करी करू लागले.
पण इथेच love story चा end झालेला नाहीय.हा love story चा फक्त trailer होता picture तो अभी बाकी है मेरे दोस्त.......