Information about dowry books and stories free download online pdf in Marathi

हुंड्याविषयी माहिती

हुंडा देणे घेणे घटस्फोटाचे पर्यायी कारण नाही?

वाहनचालक देशाचे आधारस्तंभ. मग ते कोणतेही वाहनचालक असो. साधा विमानाचा चालक हा जगभरात आपलं विमान नेतो व जगाचं नातं आपल्या देशाशी जोडून ठेवतो. आगगाडीचा चालक एका राज्यातून आपली गाडी दुसऱ्या राज्यात नेतो व राज्याराज्याचे संबंध जोपासतो. जहाजाचा चालकही आपलं जहाज जलमार्गानं एका देशातून दुसऱ्या देशात नेतो व सागर तीरावर असलेल्या देशांचे संबंध सुरळीत ठेवतो. एवढंच नाही तर अंतराळ यान चालविणारा चालकही आपल्याला अंतराळातील उपग्रह, ग्रह तशीच अंतराळातील माहिती अद्ययावत करुन देतो. तो चालक आहे म्हणूनच आपल्याला आजच्या काळात बऱ्याच गोष्टीची माहिती एका झटक्यात मिळू शकते. कारण हे सॅटेलाईटही अवकाशात पाठवणं म्हणजे एका संशोधक नावाच्या चालकाचंच काम आहे असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.
चालक......मग तो कोणताही चालक असो, तो चालक अगदी महत्वाचा घटक आहे. मग तो सृष्टी निर्माण करणारा चालक असो वा अन्य कोणताही चालक असो. त्याची भुमिका ही विकास होतांना अतिशय महत्वाची आहे. चालक जर बरोबर नसेल तर अपघात होतो. ज्यात विमानाचा चालक बरोबर नसेल तर विमान अपघात होतो. आगगाडीचा चालक बरोबर नसेल तर आगगाडीचा अपघात होतो आणि अवकाश यानाचा चालक बरोबर नसेल तर अवकाशयान ध्वस्त होते. तसं पाहता अपघात टाळण्याच्या बऱ्याचशा गोष्टी ह्या चालकांच्या हाती असतात.
चालक हा अतिशय महत्वपुर्ण घटक. मग तो कोणताही का असेना. तो जेवढा चांगला, तेवढं वाहन चांगलं चालतं. चालक..... तो जर चांगला नसेल तर वाहनातही बिघाड येत असतोच.
चालकांचे बरेच प्रकार आहेत. जसे आगगाडीचे चालक, विमानाचे चालक, ट्रकचे चालक, दोन चाकी वाहनाचे चालक, तीन चाकी वाहनाचे चालक, चार चाकी वाहनाचे चालक, जहाजाचे चालक, सृष्टीचे चालक, तसेच काही प्रकार असेही पडतात. ते म्हणजे संस्थेचे चालक. एखादी संस्था नावारुपाला आणण्यासाठी संस्थेला चांगला चालक हवा असतो. तो संस्थाचालक म्हणून काम करीत असतो. तो महत्वाचाच असतो. तसाच एक अतिशय महत्वाचा चालक असतो. ज्याच्यावर संस्कार आधारलेला असतो. ज्याच्यावर संसारही आधारलेला असतो. तो चालक म्हणजे संसारातील चालक. हा घटक प्राचीन काळापासून तर आताच्या अर्वाचीन काळापर्यंतचा महत्वाचा घटक आहे. मग तो एका जगाचा संसार असेल, एका देशाचा संसार असेल, एका राज्याचा संसार असेल वा एका घरातील संसार असेल, तो चालक महत्वाचा. काल काही विकसीत राजे होवून गेले की त्या त्या राजांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर राज्यविस्तार केला. राज्य वाढवलं. ते राजे म्हणजेच त्या त्या काळातील त्या त्या राज्यांचे चालकच होते. जो राजा चांगला असायचा. त्याचं राज्य चांगलं असायचं. तो जर राजा चांगला नसेल तर त्याचं राज्य चांगलं टिकत नव्हतं. आता देश स्वतंत्र्य झालेला आहे. देशातील राज्यपद्धती संपलेली आहे. संघराज्य पद्धती देशात आलेली आहे. तसेच या संघराज्य पद्धतीत देशात राज्याची पद्धती नष्ट झालेली आहे. आता देशात लहान लहान राज्य जरी असले तरी त्याचे राजे नाहीत. कारण सत्ता लोकांच्या हातात आहे व जनताच आपला योग्य प्रतिनिधी निवडून आपला राज्यकारभार करीत असते. त्याचं कारण म्हणजे जनताच आज राज्यकारभाराची चालक आहे.
अलिकडील काळात अशा चालक प्रकारात संसाराचा चालक प्रकार आला आहे. तो कालही अस्तित्वात होता आणि आजही अस्तित्वात आहे व उद्याही अस्तित्वात राहिलच. परंतु काल जसा संसाराचा गाडा थोडा बरा होता. तसा आज तेवढ्या स्वरुपात बरा नाही. त्याचं कारण आहे अलीकडील काळात विस्तारीत चाललेली हुंडा पद्धती. तसं पाहिल्यास कायद्यातील १९६१ च्या तरतुदीनुसार कलम ३ अन्वये हुंडा देणे व घेणे हा दंडनीय अपराध आहे व कलम ४ नुसार हुंड्याची जाहीरात करणे हा देखील अपराध आहे. त्याबद्दल त्याची शिक्षा व दंडाचे प्रावधान ठरलेले आहे.
आज संस्कार दूर पळालेला आहे. त्याचं कारण आहे आजच्या जोडप्यांचं व्यवस्थीत न पटणं. आज संसारातील पती पत्नी नावाचे दोन्ही घटक स्वतःला एक महान चालक समजत असल्यानं वाद होतात. पत्नी पतीचं ऐकत नाही वा समजून घेवून वागत नाही आणि पतीही पत्नीचं अजिबात ऐकत नाही. तिला समजूनच घेत नाही व वाद होतात. ते वाद एवढे विकोपाला जातात की त्यातून घटस्फोटासारखे प्रसंग उद्भवतात व घटस्फोट होतात. कारण या संसारचक्रातील चालक मग ती पत्नी असो किंवा पती असो, ते काही बरोबर नसतात. म्हणूनच वादं होतात.
वाद हे घटस्फोटाचे मुळ आणि महत्वाचं कारण. वादाची मुळ कारणं बरीच आहेत. एक कारण सांगतो. ते सांगणं गरजेचं समजतो.
पतीपत्नीचे जेव्हा विवाह होतात. तेव्हा पत्नी नावाच्या घटकाला वाटत असते की माझा परीवार मोठा. माझ्या परीवाराला कोणी काहीही म्हणू नये. दुषणं देवू नये. तसंच त्यालाही वाटत असते की माझा परीवार महत्वाचा. माझ्या परीवाराला कोणी काहीही म्हणू नये. यातूनच या दोन्ही घटकांपैकी एखाद्याच्या परीवारानं दुसऱ्याच्या परीवाराबाबत कुरघोडी केली वा स्वतः त्यांनी एकमेकांवर ताशेरे ओढले तर मतभेद होतात व संबंध तुटतात. मग एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असतात. आरोपात मुख्य आरोप असतो. हुंडा मागणे.
हुंडा........हुंडा मागणे व देणे हा गुन्हा असतो. कधीकधी वरपक्ष हुंडा मागतही नाही. तरीही हुंड्याचा आरोप केला जातो. पत्नी हुंडा मागीतलाच म्हणते. परंतु असे म्हणतांना ती हा विचार करीत नाही की जसा हुंडा घेणे गुन्हा ठरतो. तसाच गुन्हा हुंडा देणेही ठरतो. तो वरपक्षास दिला कसा? यावरुन हुंडा जर तिच्या वडीलानं वा तिनं दिला तर तिही तेवढीच गुन्हेगार आहे. त्याबद्दल तिला वा तिच्या पक्षाला आधी शिक्षा व्हायला हवी. शिवाय ती हुंडा देते. परंतु तो दिल्याची ना रितसर पावती दाखवू शकत ना कोणता पुरावा? शिवाय अलिकडील काळात हुंड्याबद्दल बोलायचं झाल्यास हुंड्याचं बिल हवं आणि तेही अठ्ठावीस प्रतिशत जी एस टी कापून. मग तेही नसतंच. यावरुन ही हुंड्याची केसच बनत नाही. परंतु न्यायालयात या गोष्टी संबंधीत आरोपीला कळत नसल्यानं व वकीलही त्यांना कळत असलेल्या गोष्टी संबंधीत लोकांना न सांगत असल्यानं पत्नी या घटकानं हुंड्याचा आरोप लावलेल्या गोष्टीवर पतीला न्यायालयात राहत मिळत नाही. पती या घटकांची गळचेपी होते. शिवाय वकील काही हे कोणाचेच आपले नसतात. एका वकीलांचे प्रश्न दुसऱ्या वकीलाला माहीतच असतात. शिवाय त्याची उत्तरेही त्या वकीलांनाच माहीत असतात. खटले किती दिवस चालवावे, किती दिवस नाही याचं गणित वकीलांजवळच असतं. खटल्यात कोणत्या पक्षाला कितीनं लुटावं? कसं लुटावं? याचं गणित वकीलांजवळ असतं. कारण ते एकमेकांचे मित्रच असतात. फक्त ते वरवर दिखावा करतात की आम्ही वकील एकमेकांच्या विरोधात आहोत. तसंच पक्षकाराला कळत नसल्यानं खटल्यात संभ्रम नसतांना सर्व प्रकारचा संभ्रम निर्माण केला जातो व भीती दाखवली जाते. आरोपी असलेला पती त्याला कायद्याचा अभ्यास नसल्यानं तो दबतो व वकीलांच्या म्हणण्यानुसार वेळोवेळी चालत असतो. कारण त्या खटल्यात वकील हेच चालक असतात व त्या दोन्ही पक्षकाराचे चालक वकील हुशार असतात. तो खटला आपल्या पद्धतीनं कसा फिरवायचा हे त्याना माहीत असते. ते त्या खटल्याला आपल्या पद्धतीनं हवा तसा फिरवतात. जरी हुंडा देणे हा गुन्हा असला तरी. महत्वाची गोष्ट ही की हुंडा हा घटस्फोटाचे पर्यायी कारण ठरु शकत नाही. कारण हुंडा जर मागीतला तर वधू पक्षानं विवाहच करु नये अशांशी. जर विवाह करतांना हुंडा जर मागीतलाच आणि तो न देता विवाह झाला वा देवून विवाह झालाच तर वरपक्षाआधी वधूपक्षच जास्त गुन्हेगार असतो यात दुमत नाही. कारण संविधानातील सन १९६१ च्या कलम तीन ही सर्वांना सांगत असते की ज्याप्रमाणे हुंडा घेणे गुन्हा आहे, त्याचप्रमाणे हुंडा देणे देखील गुन्हा आहे आणि अलीकडील काळात हुंडा द्यायचाच असेल तर जी एस टी कापून द्यावा. कारण जी एस टी कर हा एक खाजगी कर नाही तर तो एक सरकारचा कर आहे. कोणताही व्यवहार करायचा असल्यास त्याची जी एस टी कापावीच लागते. त्याची रितीसर पावती घ्यावीच लागते. मग ती जी एस टी कायद्यानुसार अलीकडील विवाहात का कापू नये? हा विचार अलीकडील घटस्फोटाच्या खटल्यात व्हावा. जेणेकरुन हुंड्याचा आरोप लावून पती पत्नी एकमेकांना छळणार नाहीत वा त्या कारणावरुन तरी घटस्फोट थांबवता येतील. हे तुर्तास बरोबरच.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED