Janm mruyuchya chakratun corona vaachvel ka books and stories free download online pdf in Marathi

जन्म मृत्यूच्या चक्रातून कोरोना वाचवेल का?

8. जन्म मृत्यूच्या चक्रातून कोरोना वाचवेल का?

कोरोना दहशत रान माजवल्यासारखी भावना. सगळे घाबरलेले. कोणी कोरोना गो म्हणतात. पण कोरोना जा म्हटल्यास जावू शकते का?तर याचं उत्तर नाही असंच आहे. कोरोना कधी जा म्हटल्याने जाणार नाही. ये म्हटल्यानं येणार नाही.

कोरोनावर लसी काढणं हमखास सुरु आहे. इटलीनं दावा केलाय. अमेरिकेला टेस्टींग साठी पाठवलाय. नव्हे तर लस शोधण्याचे प्रयत्न सर्वतोपरी होत आहेत. पण असे असतांना हा कोरोना लोकांची सुटका जन्ममृत्यूच्या फे-यातून करेल काय? की बस सर्वांनाच यमसदनी पोहोचवेल. हा प्रश्न जनमाणसासमोर उभा ठाकलेला आहे.

जन्म आणि मृत्यू ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून जो जन्म घेईल, तो मरणार असा नियमच आहे. मग तो प्राणी असो की जीवजंतू. सगळा नशिबाचा खेळ. कोणी म्हणतात. कोरोना विधीलिखीत होता. तो येणार होता. त्याची दहशत माजणार होती. त्याच्यानं माणसं मरणार होती. हे सगळं लिहिलेलं होतं. जन्माच्या सहाव्या दिवशी येवून सटवीनं नशिबात जे अक्षर लिहून दिले, ती अक्षरे कोणी मिटविणार नाही. ते घडेल ते घडेलच. कोरोनान मरणं असेल तर मरेलच. बरोबर आहे त्यांचं मत एका अर्थानं विचार करता.

जन्म आणि मरण हे सटवीनं लिहिलेली अक्षरे. मग कोरोनाच्या साथीत लोकं मरणार हेही सटवीनं जर लिहिलं तर लोकांनी खुशाल बाहेर पडावं. लाकडाऊनची गरज नाही. लोकांना उपासमारीनं मरण्याचीही गरज नाही. तसेच लोकांसाठी जेवनाची व्यवस्था करण्याची गरज नाही.

डॉक्टर बाबासाहेबांनी जर विचार केला असता की आम्हा दलितांचा जन्म हा सटवाईनं लिहिलेला असून तो जन्म बदलविण्याची आम्हाला गरज नाही. तर ते समाजसुधारणा करुन अस्पृश्यता निवारण करु शकले नसते.

आज कोरोनाचे रुग्ण वाढत चाललेले असून लाकडाऊन जरी असला तरी लोकं सुरक्षीत अंतर पाळत असलेले दिसत नाहीत. एकमेकांना हाथ लावतात. एकमेकांच्या घरी जातात जाणूनबूजून पाहुणे म्हणून नव्हे तर या माध्यमातून कोरोना पसरवतात. कोरोनाची साथ जरी महाभयंकर असली तरी ह्या कोरोनाला रोखता येत असतांना आम्ही त्याला रोखण्याचा विचार न करता वाढविण्यास मदत करीत आहोत. काय होते? म्हणत तसेच नशिबाचा खेळ म्हणत आमचं असं वागणं. त्यातच प्रचंड गर्दी करणं हे कुठतंरी आम्हाला विचार करायला लावणारी बाब आहे असंच जर सुरु राहिलं तर कोरोना आमच्यावरही वार करेल. मग सटवीनं आमचं कितीही चांगलं नशीब लिहिलं तरी जाणूनबूजून च्या आमच्या वागण्यानं आम्ही जन्ममृत्यूच्या फे-यात सापडून मरुन जावू हे विसरता कामा नये.

मस्तकावर कोणतीही सटवाई अक्षर टाकत नसून कोरोनाच्या लढाईत तसं समजण्याची गरज नाही. असं जर असतं तर आजही त्याच जुन्या परंपरा रुढी सुरु राहिल्या असत्या. लोकांनी आपरेशन न करता दहा दहा बारा बारा मुलं पैदा केली असती. बालविवाह झाले असते व कित्येक लहान मुलींना लोकांनी सती म्हणून पतीच्या चितेवर पाठवलं असतं.

कोरोनाला हद्दपार करायचे आहे. सामुहिक ताकद लावून. निव्वळ कोरोना गो म्हटल्यानं कोरोना जाणार नाही. त्यासाठी कोरोना गो चे सर्व नियम पाळावे. जेणे करुन अल्पावधीतल्या मृत्यूपासून तरी आपली सुटका होईल.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED