Baalveer - 2 books and stories free download online pdf in Marathi

बालवीर - भाग 2

बालवीर भाग दोन
फतेहसिंह व जोरावर सिंह........ते वीरच होते. त्यांचा जन्म वीरगतीच प्राप्त करण्यासाठी जणू झाला होता असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. अगदी अल्प अल्प वयातच चारही भाऊ औरंगजेब बादशाहाचे शिकार झाले होते.
शिख धर्म गुरु नानक यांनी स्थापन केला होता. हा धर्म हिंदू आणि मुस्लीम धर्माहून वेगळा होता. हिंदू धर्म व शिख संप्रदाय यातील महत्वपुर्ण फरक सांगायचा झाल्यास हिंदू धर्मात अनेक आत्म्याला मानलं जात होतं. परंतु शिख धर्म एकाच आत्म्याला मानत होता. आजही तसंच आहे. त्या धर्मात म्हटलं आहे की दहाही गुरुत एकच आत्मा आहे. त्यासाठी त्यांनी गुरुमतची रचना केलेली आहे. तसंच मुस्लीम आणि शिख या दोन्ही धर्माची तुलना केली तर मुस्लीम धर्म हा गैरमुस्लीम असलेल्या लोकांशी दुर्व्यवहार करायला लावतो. परंतु शिख धर्म हा इतरही धर्मातील लोकांबद्दल सहिष्णूता बाळगतो. त्याचाच अर्थ असा की शिख धर्म हा दोन्ही धर्माशी मिळता जुळता धर्म असून दोन्ही धर्माचा मध्यबिंदू आहे असंच तत्वज्ञान शिख धर्मानं सांगीतलं आहे. त्यामुळंच तो सरस असा धर्म झाला आहे. या धर्माची स्थापना गुरुनानक यांनी केली. त्याचं कारण होतं, त्यांना आध्यात्मिक आलेली प्रचिती.
एकदा नानक एका नदीत अंघोळ करायला उतरले. हे लोकांनी पाहिलं. त्यावेळेस ते नदीतून बाहेरच आले नाहीत. त्यामुळंच लोकांना वाटलं की नानक नदीतच बुडून मरण पावले असावे. परंतु ते तीन दिवसानं बाहेर आले आणि ना हिंदू ना मुसलमान असं काहीतरी बडबडत आले.
गुरु नानकाचं तीन दिवसानंतर नदीतून बाहेर येणं तो लोकांना चमत्कारच वाटत होता. त्यातच त्यांनी ना हिंदू ना मुसलमान असं बडबडणंही लोकांना आश्चर्यात टाकणारं होतं. त्यामुळंच लोकं त्यांच्याकडे आकर्षीत झाले व ते सांगत असलेल्या गोष्टी ऐकू लागले व त्या गोष्टी आत्मसात करु लागले. कारण नानकांच्या त्या गोष्टीत तत्थ्यांश होता.
नानक हे लहानपणापासूनच धार्मीक स्वभावाचे होते. त्यांचे वडील जेव्हा त्यांना गाय चारण्यास सांगत असत, तेव्हा ते गाईला पाहण्याऐवजी ध्यान लावून बसत असत. त्यावेळेस ती गाय दुसऱ्याच्या शेतात जावून त्या शेतातील भरलं पीक खावून टाकायची व नानकांच्या वडीलांना त्या लोकांचं बोलणं खावं लागायचं.
नानकांच्या जीवनात असे बरेच प्रसंग घडले. असाच दुसरा एक प्रसंग नानकांच्या जीवनात घडला. एकदा नानकांच्या वडीलांनी त्यांना काहीतरी वस्तू आणायला पाठवले व त्यांना काही पैसे दिले. परंतु त्यांनी ते सर्व पैसे रस्त्यातील गोरगरीबांना वाटून दिले व ते खाली हातानं परत आले. त्यावेळेस तर त्यांच्या वडीलांचा अवतार पाहण्यासारखाच होता.
नानकाचे वडील चिंताग्रस्त होते नानकांपासून. कारण नानकांच्या क्लुप्त्या वाढत चालल्या होत्या. तसा आणखी एक प्रसंग आहे. तोही बालपणातीलच. त्यावेळेस लोकं आपल्या अकरा वर्षे वयाच्या मुलाला जाणवं घालायला लावत असत. परंतु नानकांनी ते जाणवं घालण्यास नकार दिला व जाणवं घातलं नाही. तसा त्यांचा साधू व मौलवींवर विश्वास नव्हता. ते म्हणायचे की इश्वर हा एकच असून आपण प्रयत्न केल्यास तो प्रत्यक्षात भेटतो. त्याला माध्यम लागत नाही. हिंदू धर्मातील पुरोहित वा मुसलमान धर्मातील मौलवी हे इश्वराला भेटविण्यासाठी निर्माण केलेले माध्यम आहेत. तसं माध्यम इश्वराला भेटण्यासाठी लागत नसल्यानं हे साधू वा मौलवी लोकांना मुर्ख बनवीत आहेत. हेच तत्वज्ञान सांगत होते नानक आणि त्यानंतर आलेले गुरु. त्यामुळंच ते तत्वज्ञान ना हिंदूना पटत होते ना मुसलमान लोकांना. कारण त्यावेळेस तथाकथीत राजे महाराजे यांच्यावर साधू व मौलवींचा रुतबा होता. ते जसे राजांना सांगत. तसा राजा भडकत असे.
औरंगजेब असाच राजा झाला. त्याचं मुसलमान धर्माबाबत कट्टर धोरण होतं. त्याला शिख धर्म आणि इतर धर्म पटत नव्हते. तो म्हणत असे की भारतात हिंदू मुसलमान हे फक्त दोनच धर्म असून मी ह्या दोन्ही धर्माचं रुपांतर एकाच धर्मात करेल. परंतु शिख धर्माचे गुरु त्यात तिसरा धर्म शिख असल्याचं सांगत होते. इथंच पाल चुकचूकत होती व धर्मवेड्या औरंगजेबाच्या मनात तीच गोष्ट ठणकत होती.
औरंगजेब बादशाहा धर्माच्या बाबतीत सहिष्णू नव्हता. त्यानं विचार करुन आधीच ठरवलं होतं की देशातील जेवढ्या लोकांना मुसलमान बनवता येईल, तेवढ्या लोकांना मुसलमान बनवावं. त्यासाठी साम, दाम, दंड भेद वापरावा लागला तरी चालेल. त्यानं काही लोकांना बळजबरीनं मुसलमान बनवलं होतं. काहींना बक्षीसे व जहांगीऱ्या देण्याचं आश्वासन देवून मुस्लीम बनवलं होतं. मुसलमान बनताच त्यानं काहींना जहांगीऱ्याही दिल्या होत्या. तसं पाहता प्रेम त्यांच्या अधिकोषात नव्हताच. तरीही काही जणांवर प्रेम दाखवलं होतं. त्यानं धर्माबाबतही अभ्यास केला होता, असंच वाटतं. त्याचा अर्थ असा की तो सर्वप्रथम देशातल्या राजे महाराजांना मुसलमान बनवीत होता. त्यासाठी बळजबरी करीत होता. त्यात त्याचं मानणं असेल की जर राजा मुसलमान झाला तर प्रजा आपोआपच मुसलमान होईल व आपोआपच धर्म वाढेल. त्यासाठीच त्यांनी महाराष्ट्रातील राजे असलेल्या संभाजींना पकडून त्यांच्यावर जबरन धर्म बदलविण्याबाबत दबाव टाकण्यात आला. त्यानंतर त्यांनी धर्म न बदलल्यानं राग येताच त्यांनी संभाजी महाराजांना मारुन टाकलं. तसंच त्यांचं मस्तक भाल्यावर सजवून त्यांची रस्त्यारस्त्यावर मिरवणूक काढली होती. त्याचा अर्थ असा होता की लोकांनी त्याला घाबरुन आपला हिंदू धर्म बदलवून टाकावा व मुसलमान बनावं. परंतु त्याला माहीत नव्हतं हिंदू कसे आहेत ते. ते प्राण देतील. परंतु आपला कधीच धर्म बदलविणार नाहीत अशाच स्वभावाचे होते.
औरंगजेब एकीकडे हिंदूंना मुसलमान बनवायला लागला होता साम, दाम, दंड, भेद यांचा वापर करुन. त्यानं कित्येक काश्मिरी पंडीतांना छळलं होतं मुसलमान बनविण्यासाठी. तसाच तो अख्ख्या हिंदूंनाच छळत होता मुसलमान बनविण्यासाठी तर दुसरीकडे तो शिखांनाही छळत होता की त्यांनी मुसलमान बनावं. त्याला वाटत होतं की जसं संभाजीला धर्मासाठी मारलं. गुरु तेगबहाद्दूर यांना धर्मासाठी मारलं. तसंच आपण गुरु गोविंद सिंहांनाही जिवंत वा मृत पकडावं. जर मृत पकडलंच तर नेताच ज्या धर्माला नाही, तो धर्म टिकणार नाही व आपोआपच शिख लोकं मुसलमान बनतील वा जिवंत पकडून बळजबरी करुन गुरु गोविंद सिंहाला मुसलमान बनवता येईल व गुरु गोविंद सिंह मुसलमान बनताच बाकी सगळा शिख समुदाय मुसलमान बनेल. आपलाच धर्म वाढेल. तसंच संपुर्ण हिंदुस्थानवर मुस्लीम धर्माचा एकछंत्री अंमल सुरु होईल. परंतु ते त्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं. ना त्याला महाराष्ट्रातील संपुर्ण मराठ्यांना मुसलमान बनवता आलं ना पंजाबातील शिखांना मुसलमान बनवता आलं. ना हिंदुस्थानातील विविध कमी अधिक प्रमाणात असलेल्या इतर धर्मियांना वा इतर लोकांना. त्यानं धर्मातीत स्वप्न नक्कीच पाहिली होती. परंतु ती स्वप्न स्वप्नच राहिली होती. ती स्वप्न पुर्ण झाली नव्हती.
गुरुनानक यांनी हिंदू आणि मुसलमान या दोन्ही धर्मातील चांगल्या तत्वांना आपल्या धर्माची सुत्रे बनवली. परंतु सर्वच सुत्र काही त्यांनी हिंदू मुस्लीम धर्मातून घेतली नव्हती. काही काही नियम त्यांनी आपल्या मतानुसारही बनवले होते. जसे गैर धर्मातील लोकांना सहिष्णू भावनेने वागवणे. भेदभाव न मानणे न पाळणे. ते सुत्र वा नियम उपदेशाच्या तसेच कवीत्व शैलीनं त्यांनी लोकांना पटवून दिले होते. म्हणतात की गुरु नानकांचा जन्म हिंदू परीवारात झाला होता. त्यांनी अगदी कमी वयातच हिंदू आणि मुस्लीम धर्माचा अभ्यास केला होता. तोही मोठ्या प्रमाणावर. त्यांना संबंधीत धर्मातील वाईट रुढी, प्रथा, परंपरा माहीत झाल्या होत्या. त्यांना वाटत असे की जानवे वापरण्यासारख्या गोष्टी ह्या दिखाव्याच्या गोष्टी आहेत. तशा वरपांगी दिसणाऱ्या गोष्टी दाखविण्याऐवजी ज्या गोष्टी दिसत नाहीत, त्याच गोष्टी लोकांनी अनुसराव्यात. त्याच चांगल्या गोष्टींना वाढवावं.
शिख धर्म हा हिंदू मुसलमान धर्मात सामंजस्य निर्माण करण्यासाठी समोर आला होता. त्यांनी इश्वराला ओंकार समजलं होतं. तसंच त्यांनी सांगीतलं होतं की इश्वरप्राप्तीसाठी साधू मौलवीसारख्या माध्यमांची गरज नाही तर होम, हवन करण्याची गरज आहे. शिवाय त्यांचं म्हणणं होतं की याच होमहवन जाप आणि भक्ती द्वारे पुनर्जन्माच्या पापातून वा फेऱ्यातून वाचता येतं.
शिख धर्म हा मुळातच शांतीवादी होता. परंतु तो एवढाही शांत नव्हता की कोणी त्यांची मान कापेल व ते चूप बसतील. तसंच घडलं होतं शिखांसोबत. शिख गुरु अर्जुनदेव यांची हत्या धर्मावरुनच झाली. म्हणणं होतं की त्यांनी आपल्या धर्माचा प्रसार करु नये आमच्याच धर्माला मानावं. त्यानंतर झालेली गुरु तेगबहाद्दूर यांची हत्या. ही देखील धर्मासाठीच होती. म्हणूनच गुरु गोविंद सिंहांना खालसा दल स्थापन करावं लागलं नाईलाजास्तव. तसंच एक कुशल योद्धा म्हणून त्या धर्माला पुढं यावं लागलं. ज्यांना आपली कर्तबगारी दाखवतांना मुगल सेनापती नाहरखानची हत्या करावी लागली व औरंगजेब बादशाहाला आपल्या कर्तबगारीनं निक्षून सांगीतलं की मी केवळ शिखांचा आध्यात्मिकच गुरु नाही तर एक वीर योद्धाही आहे. तशीच आमच्या धर्मातील माणसं. आमच्या धर्मातील सर्वच माणसं कुशल योद्धेच आहेच की जे आपलं प्राण देवू शकतात. परंतु वचन मोडत नाहीत. गुरु गोविंद सिंहानं जो खालसा दल स्थापन केला. त्यानुसार सर्वांना स्वतःचं रक्षण करण्यासाठी पाच गोष्टी सांगीतल्या. पहिली आणि महत्वपुर्ण गोष्ट सांगीतली. ती म्हणजे कृपाण. कृपाण एक दुधारी लहानशी तलवार. ज्याला कट्यार म्हणतात. वेळ आली की त्या कट्यारीनं कोणाचीही हत्या नक्कीच करता येईल. तशीच दुसरी महत्वाची गोष्ट सांगीतली, ती म्हणजे कडा. तोही स्टीलचा असतो. तो एवढा जाड असतो की त्यानं जोरदार मुठ्ठीचा वार करुन डोकं फोडता येतं. तिसरी गोष्ट सांगीतली, ती म्हणजे केसं करण्यासाठी स्टीलचा कंगवा. ज्या कंगव्यानं दुसऱ्याच्या मानेवर वार करुन त्याला ओरबाडून टाकता येतं वा इतर ठिकाणी ओरबाडून टाकण्यासारखा वार करता येतं. जशी एखादी मांजर आपलं संरक्षण करीत असतांना ओरबाडून टाकते तशी. चवथी गोष्ट सांगीतली. ती म्हणजे लांब केसं. लांब केसाचा अर्थ असा होता की जर शत्रू पक्षानं डोक्यावर वार केलाच तर तो वार सहजासहजी डोक्यावर लागणार नाही. लांब असलेल्या केसानं अडवता येईल. पाचवी गोष्ट सांगीतली, ती म्हणजे कच्छा. कच्छा एक प्रकारचा पायघोळ होता. या पाचही गोष्टी व्यक्तीचा प्राण वाचवू शकत नव्हत्या. मात्र संरक्षण नक्कीच करु शकत होत्या. कारण लहान दोन्हीकडे धार असलेली तलवार शिखांकडे कमरेला लटकलेली पाहून भल्याभल्यांची बोबडी वळत असे. शिवाय मोजक्याच शिखांनी केलेलं चमकौरचं युद्ध व त्यात केवळ मोजक्याच शिखांनी मारलेले मुगलांचे लाखो सैनिक. त्यातूनच शिखांच्या युद्ध कौशल्याची धडकी शत्रूला भरत होती व शत्रू वाट्याला जात नव्हता.
शिखांचा देवांवर विश्वास नव्हता असे नाही. फक्त ते इश्वर एकच आहे असे मानायचे. मात्र देव देव करीत जाप करीत राहाणं या गोष्टीला प्राधान्य न देण्यापेक्षा कर्माला जास्त प्राधान्य द्यावं असं शिख धर्माचं तत्वज्ञान आहे. देव हा आत्मा म्हणून वावरतो व तो आत्मा सर्वश्रूत आहे असं त्यांचं म्हणणं.
देव जगात आहे वा नाही यावरुन नेहमीच वाद होत असतात. कोणी म्हणतो देव जगात आहे. देव जर जगात नसता तर ही सृष्टी निर्माणच झाली नसती. आकाशात चंद्र, तारे व सुर्य दिसले नसते. पृथ्वीवर जैवीय घटक दिसले नसते. माणसं जन्माला आली नसती. प्राणीही जन्माला आले नसते. हवा नसती. पाणी नसतं आणि तेच नसतं तर जीवसृष्टी नसतीच.
जीवसृष्टी.......जीवसृष्टी कोणं निर्माण केली? असा प्रश्न माणसाच्या मनात आलाच तर ती विधात्यानंच निर्माण केली असं काही लोकांचं म्हणणं तर काही लोकं म्हणतात की ही जीवसृष्टी नर आणि मादीच्या संक्रमणातून तयार होते. पाणी सुद्धा हायड्रोजन व ऑक्सिजनच्या संप्रेरकातून तयार होते. हवा देखील वातावरणातील चुंबकीय बदल आहे, त्या बदलातून तयार होत असते. शिवाय चंद्र, सुर्य व तारे यासारखे घटक आगीच्या तप्त गोळ्याचं असलेलं रुपांतरणच आहे.
काही लोकं म्हणतात की सृष्टी ही प्रत्यक्ष परमेश्वरानंच निर्माण केली. त्यानंच चंद्र बनवला. त्यानंच पृथ्वी बनवली व त्यानंच ब्रम्हांड बनवलं. पृथ्वीवरील हवा, पाणी, आग ही त्या परमेश्वराचीच देण आहे असंही त्यांचं म्हणणं.
प्रत्येक गोष्टीचे दोन पैलू असतात. दोन घटकच. एक असतो चीत आणि दुसरा असतो पट. तसंच सृष्टी निर्माण झाली यावरुनही दोन मतभेद आहेत. पहिला हा की ती परमेश्वरानंच निर्माण केली व दुसरा म्हणजे ती वातावरणातील बदलानं निर्माण झाली. पहिला घटक अंधश्रद्धाळू लोकं मानतात व दुसरा घटक वैज्ञानीक मानत असतात. तसं पाहता वैज्ञानिकांचंही बरोबरच आहे. कारण त्यांनी दगडालाही वाचा फोडली आहे. आजची स्थिती पाहता एक साधा स्मार्टफोन. कितीही लांब असलेल्या माणसांशी संपर्क साधून देतो. यावरुन वैज्ञानिकाचं कौशल्य वाखाणण्याजोगं आहे. तसंच लोकं दगडाला देव मानत आहेत हे काही वैज्ञानिकांना पटत नाही. त्याचं म्हणणं असं की दगडाचा देव काहीही करीत नाही आणि ते त्यांनी पदोपदी सिद्ध करुन दिलं.
देव आहे हे सिद्ध करणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत. बरीच उदाहरणं आहेत. याबाबतीत एक उदाहरण आहे. अफजलखान जेव्हा वाईला आला. तेव्हा सरळसरळ न येता पंढरपूर व तुळजापूर मार्गानं आला. त्यावेळेस त्यानं तुळजापूरची भवानी शिवरायांना ताकद देते असा विचार करुन त्यानं तुळजापूरच्या शिल्पात असलेल्या भवानीच्या दगडाच्या मुर्तीला आदळून तिचे अक्षरशः तुकडे केले व लोकांना सांगीतले की पाहा, मला या भवानीच्या पाषाणी मुर्तीनं काहीच केलं नाही. परंतु त्या अफजलखानाच्या तसे करण्यानं शिवरायांच्या भावना दुखावल्या व त्यानं ठरवलं आणि मनात विचार केला की हे खाना, फक्त तू आमच्या भागात ये. अर्थात प्रतापगडाच्या पायथ्याशी ये. मग तुला दाखवतो व खान प्रतापगडाच्या पायथ्याशी येताच धिप्पाड अशा खानाचा कोथळाच बाहेर काढला.
वरील उदाहरणात एक महत्वाची बाब म्हणजे शिवराय लहान होते. खान धिप्पाड होता. शिवराय तर खानाच्या बगलेत दबत होते. मग ते घडलंच कसं? यावर वैज्ञानिक म्हणतील की युक्तीनं घडलं. शिवरायांजवळ युक्ती होती. मग शिवरायांजवळ युक्ती होती तर त्यांना ती युक्ती वेळेवर सुचलीच कशी? आता वैज्ञानिक म्हणतील की ते बुद्धिमान होते. ठीक आहे. ते बुद्धिमान होते. मग त्यांच्यात एवढी बुद्धीमत्ता आली कुठून? तर त्यात काही म्हणतील की ती त्यांच्या मायबापांकडून अंनुवांशीकतेनं आली. काही म्हणतील की ती अनुभवानं आली. अशी बरीच संभ्रमाची उत्तरे येतील की ज्या उत्तरानं प्रश्न संपणारच नाही. शेवटी पर्याय येईल की ही बुद्धीमत्ता प्रत्यक्ष परमेश्वरानंच दिली. जिथं विज्ञान संपतं. तिथं परमेश्वराचीच सुरुवात होते. आता कोणी म्हणतील की निसर्गातील कोणताही जिवंत घटक नर आणि मादींच्या संक्रमणातून तयार होतो. मग यात देव कुठून आला. तर त्याचं उत्तर आहे. प्रत्यक्ष विधात्यानं त्याचं काम करण्यासाठी काही माध्यमं वापरली. ती माध्यमं म्हणजेच नर आणि मादी. आता लोकं म्हणतील की स्मार्टफोन तर वैज्ञानिकानं बनवला. ते तर विज्ञान आहे. त्यात माध्यमाचा प्रश्न कुठून आला? तेही बरोबरच. परंतु ते विज्ञान जरी असलं तरी विधात्यानं वस्तू निर्माण करण्यासाठी वैज्ञानिकांना माध्यम बनवलं. त्यांच्यात तेवढी कल्पकता भरली की ते नवनवीन शोध लावू शकतील. यात वैज्ञानिक हेच माध्यम आहे. तसं पाहता वैज्ञानिक सर्वच लोकं बनत नाहीत. एखादाच बनतो. कारण त्याचेवरच विधात्याचीच कृपादृष्टी असते. तो माध्यम असतो परमेश्वराचा. म्हणूनच खान मरण पावला. प्रत्यक्ष शिवरायांसारख्या लहानशा व्यक्तीमत्वानं त्याला मारलं. कारण त्यानं भवानीची मुर्ती तोडून प्रत्यक्ष परमेश्वराचाच अपमान केला होता. म्हणूनच तो शिवाजीसारख्या लहानशा व्यक्तीमत्वाकडून मारल्या गेला. कारण तशी बुद्धीच भवानीनं शिवरायांना प्रदान केली असेल ही शक्यता नाकारता येत नाही. याचा अर्थ भवानीच्या पाषाणी मुर्तीत देव होता असं नाही. देव जर असता तर ती मुर्ती अफजलखानाला फोडताच आली नसती. आता लोकं म्हणतील की मग शिवरायांना एवढी ताकद कुठून मिळाली? पुन्हा 'कुठून' चा प्रश्न उद्भवला. तर त्याचं उत्तर आहे, ती ताकद आली देवाच्या भक्तीनं व विश्वासानं. शिवरायांनी प्रत्यक्ष मुर्ती चमत्कार करेल असा अगाढ विश्वास मनात बाळगला होता व त्वेषानं ते पेटून उठले होते. त्यांनी त्याचं ज्ञान जिजामाता लहानपणापासूनच घेतलं होतं की प्रत्यक्ष खांबातही देव असतो. हिरण्यकक्षपूची कथा जिजाबाईनं शिवरायांना लहानपणीच सांगीतली होती. हिरण्यकक्षपूला भक्त प्रल्हादाने खांबात देव आहे असं म्हणताच त्यानं खांबाला आपल्या पायानं ध्वस्त केलं होतं व त्यातून देव निर्माण झाला होता. हे ऐकलं होतं शिवरायांनी. त्यामुळंच त्यांच्यात श्रद्धा व भक्ती निर्माण झाली व तसाच आत्मविश्वासही. त्याच जोरावर त्यांनी भवानीच्या पाषाणी मुर्तीवर विश्वास केला व ते कार्य करीत गेले व सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यामुळं चांगलं कार्य घडत गेलं.
विशेष बाब ही की देव हा दगडातच आहे असं माझं म्हणणं नाही. तो आहे चराचरात, अनुभवात, कर्तव्यात, चांगल्या कर्मात, भक्तीत, श्रद्धेत व विश्वासात. त्यासाठी अगाढ आत्मविश्वास हवा. तरच देवाची प्राप्ती होते. अन्यथा नाही होत. देव काही एवढाही स्वस्त नाही की कुणालाही तो मिळेल. त्यासाठी आपण त्याच्या लायक असलो पाहिजे. आपले कर्म वाईट असेल तर आपण कितीही चांगल्या गोष्टीचे प्रदर्शन केले तर देव पावत नाही. याचाच अर्थ असा की कितीही पैसे लावून आपण पाषाणी देवाच्या मुर्तीची पुजा केली वा तिर्थयात्रा केल्या वा भागवताचं आयोजन केलं वा सत्संग, किर्तनाचं आयोजन केलं, तरी ते लाभदायक ठरत नाही. शास्र सांगतं की पाप घडलं असेल तर त्यापासून मुक्ती म्हणून भागवत करा. किर्तन करा. गरुड पुराण वाचन करा. पारायण करा. लाभ होतो. परंतु ते सर्व थोतांड असून ते निव्वळ काही लोकांच्या पोट भरायचं साधन आहे. पाप कधीही नष्ट होत नाही. कितीही तीर्थयात्रा होम हवन व सत्संग भागवत केले तरी. पाप जर घडलं असेल अचानक तर त्याचं क्षालन करण्यासाठी पश्चाताप करावा आणि त्यानंतर पुण्य कर्म करावे. जेणेकरुन पुण्याचं पारडं जड होईल व पापाचं पारडं हलकं. त्यानंच आपले पाप धुतले जावू शकतात. ते पाप नष्ट जरी झालं नसेल तरी पुण्य कर्मातून पापाचं क्षालन होत असते. मात्र आपलं पुण्यकर्माचं पारडं जड असायला हवं.
पापकर्म....... पाप कर्माचे दोन भाग पडतात. एक म्हणजे अनवधानाने घडलेलं पाप. जसं रस्त्यावरुन जात असतांना अचानक एखादा प्राणी रस्त्यावर येणे व आपल्या गाडीनं मरणे. जसे साप, मुंग्या, माकोडे वा इतर किडे. दुसरं पाप हे जाणूनबुजून घडत असते. ते घडवत असतो आपणच. जसे. एखाद्याला मारायची वा त्याची हत्या करायची सुपारी घेणे. अफजलखानाने तुळजापुरच्या मुर्तीची विटंबना करणे. औरंगजेबाने संभाजीची हत्या करणे. फतेहसिंह व जोरावर सिंह या लहान जीवाला जिवंत भिंतीत दफन करुन ठार मारण्याचा प्रयत्न करणे. मुक्या प्राण्यांना त्रास देणे. हे आपले आपल्या हातून घडलेले जाणूनबुजून झालेले पाप कर्मच असतात. काही पापकर्म आपण जाणूनबुजून केले असले तरी त्यात आपली मजबुरी असते. परंतु पाप ते पापच असतं. त्याची शिक्षा परमेश्वर देतोच. मग तो मोठा भक्त असेल आणि मोठी पुजापाठ करीत असेल, सत्संग, किर्तन, भागवत, पारायण करीत असेल तरीही. हे शत प्रतिशत खरं आहे.
देव आहे व तो दगडात अजिबातच नाही. हे लोकांना माहीत आहे. तरीही लोकं त्याला पुजतात. कारण तो दगड म्हणजे परमश्वरानं लोकांना चांगला रस्ता दाखविण्यासाठी उभारलेलं माध्यम आहे. ज्यातून ते स्वतःत सुधारणा करण्याचा प्रयत्न करतात. कोणी स्वतःत सुधारणा घडवून आणण्यासाठी पुस्तकाला माध्यम करतात व त्यातून चांगल्या गोष्टी अंगीकारुन आपल्यात सुधारणा घडवून आणतात. कोणी भागवत, किर्तन, संत्सग, पारायणाचा आधार घेवून स्वतःत सुधारणा घडवून आणतात. तर कोणी इतर बर्‍याच काही गोष्टी करतात की ज्यातून स्वतःत सुधारणा करता येतील.
महत्वाचं सांगायचं म्हणजे प्रत्येक धर्मात इश्वराचं स्वरुप हे पाषाणात नाही. काहीच्या इश्वरांची माध्यमं वेगवेगळी आहेत. कोणी कबरेला माध्यम बनवलं तर कोणी आत्म्याला, कोणी क्रॉसला माध्यम बनवलं तर कोणी तत्वांना. प्रत्येकाचा देव वेगवेगळा आहे व देवाला पुजण्यासाठी वापरली गेलेली माध्यमही वेगवेगळी आहेत. परंतु हे जरी खरं असलं तरी देव काही वेगवेगळा नाही. आत्म्येही काही वेगवेगळे नाही. देव एकच आहे. कोणी त्याला भगवान म्हणतात. कोणी त्याला वाहे गुरु म्हणतात. कोणी त्याला अल्ला म्हणतात तर कोणी त्याला गॉड म्हणतात. शिवाय प्रत्येक धर्माची सुत्रं व नियम वेगवेगळे आहेत. जरी देव एकच असला तरी. कोणताही देव वा कोणाच्याही धर्माचा देव हा पाषाणात वा कबरीमध्ये नाही. ना कोणाचाही देव तत्वात आहे. ते सर्व देवाला समजून घेण्यासाठी वा देवाचं अस्तित्व मान्य करण्यासाठी वापरलेली माध्यमं आहेत. तिर्थयात्रा, भागवत, किर्तन, सत्संग, पारायण वा इतर धार्मिक गोष्टी या गोष्टी माणसात सुधारणा घडविण्यासाठी आहेत. पापातून मुक्ती मिळविण्यासाठी नाहीत. जर आपण भागवत, संत्सग, किर्तन कितीही ऐकले वा पारायण कितीही केले आणि आपण सुधरलोच नाही तर आपल्या ते ऐकण्याला काहीच अर्थ उरत नाही. तसाच देव दिसतो जर आपण चांगले कर्म केले तर......ज्याचे कर्मच वाईट त्याला देव दिसत नाही. मग पावायचा प्रश्नच वेगळा. म्हणूनच चांगले कर्म करावे. देव त्याच्यातच आहे. त्याला पुजण्याची वा पुजण्याचा आव आणण्याची काहीही गरज नाही. तो एकच आहे. मग त्याची प्रत्येक धर्मात वेगवेगळ्या माध्यमाच्या स्वरुपात पुजा होत असली तरी आणि कुणी त्याला अल्ला, भगवान, गॉड वा वाहे गुरु अशा वेगवेगळ्या नावानं संबोधत असले तरी. तसंच त्याचं अस्तित्व हे आहेच. कोणी नाकारत असलं तरी. तो अनंत, अखंड आणि अशाश्वत आहे. चिरंतन आहे. नर, मादी, माती, हवा, पाणी, आकाश, आग व वैज्ञानिक हे उपज करणारे घटक फक्त माध्यम आहेत, जीवसृष्टी निर्माण करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण करण्यासाठी देव आहे. म्हणूनच कोणी कोणताही अनियंत्रीतपणा करु शकत नाही. कोणी कोणत्याही अनियंत्रीतपणाचं साधन निर्माण करु शकत नाही आणि झालाच तर तो सृष्टीनिर्माता, ज्याला आपण देव संबोधतो. तो त्याला नष्ट केल्याशिवाय राहात नाही हे तेवढंच खरं. महत्वपुर्ण गोष्ट ही की देव माना अगर नका मानू. परंतु देव आहे. कोणाला तो पुस्तक रुपानं अनुभूती देतो. कोणाला पाषाण रुपानं अनुभूती देतो. मग आपण त्याचं अस्तित्व मानो अगर न मानो यात शंका नाही.
गुरु नानकदेव यांनी शिख धर्म स्थापन करुन ज्या तत्वाचं बीजारोपण केलं, ते तत्वज्ञान राखण्यासाठी पुढं शिख संप्रदायातील बऱ्याच लोकांनी बलिदान दिलं. आपला धर्म आणि आपला स्वाभिमान त्यांना अतिशय प्रिय होता. त्यांनी गुरुंनाच इश्वर मानलं. त्यातच चांगल्या कर्माला स्थान दिलं. ज्यातून पाप घडलं नाही. हेच बोचलं मुगलांना आणि त्याच्या पुर्ण वारसांना. आपला धर्म वाढावा व संपुर्ण देशात आपल्याच धर्माचा बोलबाला निर्माण व्हावा यासाठी त्यांनी जे जबरदस्तीनं धर्म वाढविण्याचं तत्व अवलंबलं. ते पाहता त्यांचा आकस दिसून येतो.

************************************************

फतेहसिंह व जोरावर सिंह यांना वजीरखानानं पकडलं होतं व तुरुंगात टाकलं होतं. तसेच त्यांच्यावर अत्याचार सुरु होते. त्याचं कारण होतं, शिख धर्म मिटवणं. वजीरखानाला वाटत होतं की जर फतेहसिंह व जोरावर सिंह यांनी धर्म बदलवलाच तर आपोआपच शिख धर्म मिटून जाईल. हाच वजीरखानाचा डाव होता नव्हे तर तो डाव औरंगजेबाचाही होता.
थंडीचे ते दिवस.........बाहेर कडाक्याची थंडी होती. शरीरात असलेल्या रक्ताचा बर्फ बनेल अशीच स्थिती होती शरीराची.
ती थंडी सहन होत नव्हती पशुपक्षांना. पशुपक्षीही त्या थंडीच्या गारठ्यानं मरत होती. अशातच वजीरखानानं फतेहसिंह व जोरावर सिंह यांना कैद केलं. त्यानंतर त्यांना त्या कडाक्याच्या थंडीत थंड कमऱ्यात ठेवलं गेलं. त्यांच्यावर धर्म सोडण्याबाबत दबाव टाकल्या गेला. परंतु त्या इवल्या बाळांनी ती जीवघेणीथंडीसहन केली. परंतु धर्म बदलवला नाही. त्यानंतर त्यांना भिंतीत दाबलं. तेव्हाही धर्माबाबत विचारलं गेलं होतं. परंतु त्यावेळेसही त्या लहान बालकांनी नकारच दिला होता. शेवटी त्यांनी मरणाला मिठीच मारली.
धर्मासाठी बलिदान पत्करलेला त्यांचा आजोबा गुरु तेगबहाद्दूर सिंह. तसाच धर्मासाठी बलिदान पत्करलेले फतेहसिंह व जोरावर सिंह आणि स्वाभिमान टिकविण्यासाठी शहीद झालेले अजीत सिंह व झुंजार सिंह. ते चारही साहेबजादे मृत होताच वजीर खानाला अतिशय आनंद झाला. आता पुर्ण पृथ्वीच आपल्या कवेत आली असं त्याला वाटायला लागलं होतं. तसा त्यानं निरोप माता गुजरीलाही पाठवला होता.
माता गुजरीनं आपल्या नातवांबद्दल ऐकलं. त्याचा तिला जबर धक्का बसला. तो धक्का एवढा तीव्र होता की ती सहन करु शकली नाही. जी कडाक्याची थंडी तिनं सहन केली होती. माता गुजरीला तो तिच्या नातवंडाचा जबर धक्का सहन न झाल्यानं ती धाडकन खाली कोसळली. त्यानंतर ती उठलीच नाही.
सर्व साहेबजादे व माता गुजरी मरण पावताच औरंगजेबाला वाटलं होतं की आता संपूर्ण शिख संप्रदाय संपला. आता त्याचा कोणी वाली नाही. आता नक्कीच संपूर्ण शिख संप्रदायातील लोकांना मुस्लीम बनवता येईल. परंतु ते त्याचं स्वप्न ते स्वप्नच राहिलं. त्यानंतर गुरु गोविंद सिंहानं त्याला समजुतीची बरीच पत्र लिहिली. ती पत्र जफरनामा म्हणून प्रसिद्ध आहेत. ज्या पत्रानं म्हणतात की औरंगजेबाचे मन परीवर्तन झाले व तो शांत झाला. त्यानंतर तो पश्चातापाच्या अग्नीत जळत जळत मरण पावला होता. हा त्या जफरनाम्याचा एक चमत्कारच होता.
बालवीर म्हणून मरणाला मिठी मारलेले चारही साहेबजादे मरण जरी पावले असले तरी औरंगजेबाची इच्छाशक्ती मावळली नव्हती. त्यानं गुरु गोविंद सिंहाचा नाद काही सोडला नव्हता. तो त्याला जिवंत वा मृत बंदी करायची स्वप्न पाहातच होता. परंतु गुरु गोविंद सिंह त्याला सापडत नव्हतेच. त्यांचं संरक्षण संपूर्ण खालसा दल करीत होतं. म्हणूनच ते वाचत होते प्रत्येक ठिकाणी. अशातच वापरलेली जफरनाम्याची युक्ती. ती युक्ती गुरु गोविंद सिंहाच्या कामात आली होती.
लेखनात दम असतोच. लेखणी अशी गोष्ट आहे की ते लेखन चांगल्या चांगल्या लोकांना धराशायी करीत असते. तसंच लेखन चारचौघात बसवीत असते तर कधी कधी लेखन चारचौघातून उठवत असते.
लेखकाचं लेखन म्हणजे एक विचारच असतो. मनातून आलेलं व कागदावर प्रतिबिंबीत झालेलं. लेखक लेखन करतो, त्याला आनंद होतो म्हणून नाही तर तो एक समाजाचे देणं लागतो म्हणून. ते आपल्या लेखनीतून समाजाची एक प्रकारे सेवाच करीत असतात. तो ऋणकर्ताच असतो समाजाचा आणि आरसाही. त्यानुसार तो लोकांना चांगुलकीची वाट दाखवीत असतो. त्याच्यासमोर शब्द हात जोडून उभे राहतात. म्हणत असतात की माझा वापर करा. परंतु लेखक प्रत्येक शब्दाला वापरेल तेव्हा ना. त्याच्यासमोर बंधन असतं शब्द मांडण्याचं. तो शब्द मांडतो. परंतु ते शब्द मांडत असतांना कोणते शब्द त्या ठिकाणी योग्य बसतात. याचा विचार करुनच तो शब्द मांडत असतो. ते शब्द चपखल बसताच तो पुढची वाट धरतो.
लेखन केल्या जातं हे अगदी विचार करुनच. लेखनाचे दोन भाग पडतात. एक भाग म्हणजे चांगलं लेखन. चांगलं लेखन म्हणजे सुवाच्य हस्ताक्षर असलेलं लेखन नाही तर चांगल्या विचारांचं लेखन. यात धार्मीक विचारांना जास्त महत्व दिलं जातं. संस्काराची भाषा यात कुटकूट भरलेली असते. ते लेखन मनातून आलेलं असतं. हे लेखन लपूनछपून केलं जात नाही.
लेखनाचा दुसरा भाग म्हणजे वाईट विचारांचं लेखन. ह्या लेखनात क्रांतीकारी विचार असतात. वात्रटही लेखनाचा समावेश होतो यात. हे लेखन लपूनछपून करावं लागतं. कारण या लेखनातून केव्हा उद्रेक होईल याची शाश्वती नसते. जसं लेखन भारताला स्वातंत्र्य मिळवीत असतांना केल्या गेलं.
लेखन दोन्ही प्रकारचं सरसच असतं. त्या लेखनाला अर्थगर्भतेचा साज असतो. दोन्ही लेखनात श्रृंगाराचीच भाषा असते. त्यामुळंच ते लोकांना आवडतं. जर भाषा श्रृंगार व शब्द श्रृंगारीक नसेल तर ते लेखन निरस व कंटाळवाणं वाटत असतं. वाचायला अवघड होवून जातं. असं लेखन गेल्या काही दशकात अजिबात झालेलं नाही. अलीकडील काळात तर विभत्स स्वरुपाचं लेखन झालेलं दिसून येत आहे. ज्यात किंचीतही अर्थगर्भता दिसून येत नाही.
सामान्यतः बरेच लोकं लेखन करतात व त्या लेखनातून लेखक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करतात. हळूहळू अशा चांगल्या संदेशाच्या संस्करणानं त्या लेखकाची अनुभूती वाढते. त्याचबरोबर त्या लेखकांच्या लेखनाचं मोलंही वाढतं. तसंच लेखनाचं महत्वही. जेव्हा असं वाढलेलं त्या लेखकाचं महत्व समाजाला दिसतं. तेव्हा आपोआपच त्या लेखकांचे आणि त्या लेखकांच्या लेखनीचे शत्रू तयार होतात. काही समाजकंटक त्याच्या लेखनीला जळत असतात. मग काही लपूनछपून विरोध करतात तर काही खुल्यापणानं विरोध करतात. काही लोकं तर असे असतात की जे मनातून जळतात. परंतु गोड गोड बोलत असतात. काहींचा विरोध दिसून येत असतो. काहींचा विरोध दिसून येत नाही.
लेखकांची लेखनी जेव्हा चांगले चांगले विचार प्रस्तुत करीत असते. तेव्हा निर्माण झालेली व द्वेष करणारी मंडळी, ते त्यांच्या लेखनीबाबत कुरघोडी करतात व वेळप्रसंगी त्यांच्या विचारांची हत्या करण्याचा प्रयत्न करतात. अशी हत्या करतांना ते संबंधीत लेखकाचीही हत्या त्यात होईल याचाही विचार करीत नाहीत.
काही लेखन खरंच चांगलं असतं. पण लोकांना संस्कार देणारं असतं. परंतु ते लेखन बाजारात येत नाही वा त्याला तेवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळत नाही. परंतु अशा स्वरुपाचं लेखन जेव्हा बाजारात येतं, तेव्हा ते चिरकाल टिकतं. त्याची समाजाला नेहमीच गरज भासत असते. ते लेखन पाहिजे त्या प्रमाणात संपुष्टात येत नाही. मात्र वात्रट स्वरुपाचं लेखन लवकर बाहेर येतं व त्याला प्रसिद्धीही लवकरच मिळते व ते लेखन लवकर संपुष्टातही येते. महत्वाचं सांगायचं झाल्यास चांगली वस्तू ही कधीच बाजारात खपत नाही. तसं पाहता एका कवीनं म्हटलं की चिंध्या पांघरुन जो सोनं विकतो. त्याचं सोनं खपत नाही. तसं साहित्याचं आहे. साहित्यही चांगलं असेल, परंतु ते चांगलं साहित्य खपत नाही. तसंच एखादी माती जर एखादा सोनं पांघरुन विकत असेल तर ती खपते. तसंच साहित्याचं आहे. आज असं वात्रट साहित्यही बाजारात खपत आहे व चांगलं साहित्य बाजारात प्रसिद्धीस नाही. असंच चित्र दिसून येत आहे. विशेष बाब अशी की आज चांगलं साहित्य बाजारात उपलब्ध होत नसल्यानं नक्कीच वाचकांची संख्या रोडावली आहे. शिवाय येणारे वात्रट स्वरुपाचे साहित्य बाजारात टिकत नसल्यानं त्यावर चिंतन करण्याची आज गरज आहे. लेखकानंही त्याचं चिंतन करुन चांगलं साहित्य निर्माण करण्याची गरज आहे. तसे काही लेखक करतातही. परंतु ते चांगलं साहित्य बाजारात खपत नसल्यानं बाजाराचा कल पाहून जे लेखक चांगलं लेखन करतात. तेही चांगलं लेखन करणं सोडून व चांगलं साहित्य निर्माण करणं सोडून वात्रट साहित्य निर्माण करण्याकडे कल झुकवत आहेत. तसेच प्रकाशकही चांगल्या साहित्याला भाव नसल्यानं अशा वात्रट स्वरुपाचंच साहित्य प्रकाशित करीत आहेत. यातूनच चांगले साहित्य, चांगले साहित्यीक व चांगलं लेखन संपते की काय? ही भीती आज निर्माण झाली आहे. होत आहे.
महत्वपुर्ण गोष्ट ही की चांगले लेखन करणारे लेखन संपू नये. चांगले साहित्य संपू नये. चांगल्या साहित्याची आजच नाही तर भविष्यातही गरज आहे. अशा प्रकारचं साहित्य नक्कीच निर्माण व्हावं. जेणेकरुन भविष्यात त्याच विचारावर आधारीत समाजाची घडी बसविण्यास या साहित्याचा उपयोग होवू शकेल. तसंच आज साहित्यीकांनी याच साहित्याचा वापर करुन भविष्यात चांगला समाज निर्माण होवू शकेल नव्हे तर करता येईल याचा विचार करुन लेखन करावं. तशाच लेखनाची आज गरज आहे यात शंका नाही. जेणेकरुन त्यातून भविष्यातील चांगले विचारवंत निर्माण करता येतील. वात्रट स्वरुपाच्या लेखनातून अशा चांगल्या स्वरुपाचे विचारवंत निर्माण होणार नाहीत. यासाठी तरी चांगल्या स्वरुपाचं लेखन व्हावं. वात्रट स्वरुपाचं लेखन नाही. हे तेवढंच खरं.
आज जगात सुरु आहे आनंद भोगण्याची स्पर्धा. आनंद भोगण्यासाठी आजचे लोकं प्रसंगी दुसऱ्याचा जीवही घेतात. त्यात त्यांना निर्भेळ आनंद मिळतो. साधी एक फुट जागाही आपण सोडत नाही. कारण आपल्याला ती जागा सोडल्यानं आनंद मिळत नाही. ती गोष्ट सारखी आपल्याला कुटकूट खात असते. वाटतं की ती जागा आपली आहे. आपल्या मालकीची आहे. ती कोणी घ्यायला नको.
ज्याप्रमाणे आपल्याला आपल्या जागेचं महत्व वाटते. तसंच वाटतं एका राजाला. एक राजाही आपल्या प्रदेशातील सीमेवरील एक फुट जागा सोडत नाहीत. कारण त्यात त्याच्या एकट्याचा स्वार्थ नसतो. स्वार्थ असतो सर्वच देशातील लोकांचा. ज्यांनी त्याला राजा बनवलं असतं. आपला एक प्रतिनीधी म्हणून त्याला नियुक्त केलेलं असतं. पर्यायानं सांगायचं झाल्यास त्याला काळजीवाहू बनवलेलं असतं व तो काळजी वाहतोच. म्हणूनच जगात जेही कोणी राजे वा गुरु झालेत. त्यांनी त्यासाठीच आपलं बलिदान दिलं.
जगाचा हा इतिहास पाहता पुर्वीचे राजे सम्राट चंद्रगुप्त, सम्राट अशोकापासून तर राजा दाहिरपर्यंत आणि त्यानंतरही पृथ्वीराज चव्हाणपासून तर आजच्या काळातील महात्मा गांधीपर्यंत सर्वांनीच समाज सुधारण्यासाठी बलिदान दिलं. आता कोणी त्यांच्यावर ताशेरे ओढतात. कारण तो आताचा काळ आहे आणि ताशेरे कोण ओढतात? जे काहीच करु शकत नाहीत.
काल झालेले संतही त्याच विचारांचे होते. काल होत असलेल्या अत्याचारावर वाचा फोडण्यासाठी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी वदली. त्याच परंपरेत संत एकनाथ, संत तुकाराम, संत नामदेव, संत चोखामेळा, संत जगनाडे यांनी कार्य केले. यात काही संतांना जलसमाधी मिळाली तर काही संतांना भुमीसमाधी. याचा अर्थ बलिदानच दिलं त्यांनी. याच परंपरेत संभाजी महाराज यांचं धर्मासाठी झालेलं बलिदान. गुरु तेगबहाद्दूर सिंह यांचं धर्मासाठी झालेलं बलिदान. त्याच परंपरेत फतेहसिंह, जोरावर सिंह आणि त्यांच्या भावाचं बलिदानी कर्तृत्व हेही वाखाणण्याजोगं होतं. याच श्रेणीत महाराष्ट्रात महाराणी अहिल्याबाई, महाराणी ताराबाई, कर्नाटकातील राणी चेन्नमा, झाशीची राणी लक्ष्मीबाई या महिलांनीही राण्या बनून आपआपल्या राज्याची अस्मिता वाचवली. त्याच श्रेणीत येतात गुरु गोविंद सिंह, शिवराय व इतर अनेक थोरपुरुष. ज्यांनी आपल्या राज्यासाठी, आपल्या अस्मितेसाठी आपल्या प्राणाची आहूती दिली. फतेहसिंह व जोरावर सिंह या गुरु गोविंद सिंहाच्या इवल्या इवल्या मुलांनी चक्कं धर्मासाठी नकार देत हसत हसत आपलं मस्तकही कापू दिलं. परंतु त्यांचं वय लहान असतांनाही त्या इवल्या वयात त्या तिक्ष्ण असलेल्या समशेरीसमोर ते डगमगले नाहीत. ही गोष्ट आश्चर्य करणारी व आपल्याला थक्कं करुन सोडणारी वाटते. महत्वपुर्ण गोष्ट ही की फतेहसिंह व जोरावर सिंह वा संभाजी व तेगबहाद्दूर सिंह यांनी धर्मासाठी केलेलं बलिदान चिल्लर होतं काय? नाही. ती शुल्लक बाब नव्हती व ते फालतूचं बलिदान नव्हतं. ना ते त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केलं होतं. ना ते त्यांच्या आत्मीक सुखासाठी. त्यांनी ते बलिदान केलं लोकांसाठी व स्वराज्यासाठी. आमच्या पुढच्या पिढीतील कोणीही आपला धर्म अजिबात बदलवू नये म्हणून त्यांनी बलिदान दिलं होतं.
गुरु गोविंद सिंहांचं ते कार्य. फतेहसिंह व जोरावर सिंहाचं ते बलिदानी वागणं. ते कशासाठी होतं? संभाजी व गुरु तेगबहाद्दूर सिंह. यांनी धर्मासाठी दिलेलं बलिदान. ते कशासाठी? ते भारतीय क्रांतिकारकांचे बलिदान? तेही कशासाठी होते? एवढ्या भारतीय राजांनी आपला देश वाचविण्यासाठी केलेल्या लढाया. कशासाठी? शिवरायांनी केलेली स्वराज्यासाठी धडपड. तिही कशासाठी होती? एवढंच नाही तर देशातील तमाम भागात झालेल्या संतांनी केलेलं कार्य. ते कार्य कशासाठी होतं? ते सर्व कार्य त्यांच्या स्वतःच्या आनंदासाठी नव्हतं. ती धडपड त्यांच्या स्वतःच्या जगण्यासाठी नव्हती तर ती होती आपली भावी पिढी सुखी राहायला हवी. समाधानी राहायला हवी. त्यांनी आनंद भोगायला हवा यासाठी.
आज आपण काय करतो? महापुरुषांवरच व्याभिचाराचे ताशेरे ओढत असतो. महापुरुषांना बदनाम करीत असतो. महापुरुषांचे वाभाडे काढतो. महापुरुषांची टिंगल टवाळकी करीत असतो. तसं कोणी करु नये. महापुरुषांची आपण बदनामी करु नये. महापुरुष हे आपले आधारस्तंभ आहेत. ते होते, म्हणून आपण आज आनंदात आहोत. ते जर झाले नसते तर आपण आज कोणत्यातरी राजसत्तेचे गुलामच असतो. जी राजसत्ता आजही आपल्यावर राज करीत राहिली असती. ती राजसत्ता आजही आपला कोंबड्या बकऱ्यासारखा बळी घेत राहिली असती. कोणतीतरी राजसत्ता धर्मासाठी बळी घेत असती तर कोणती राजसत्ता भेदभावात्मक अत्याचार करुन. कोणत्या राजसत्तेनं आपल्याला बोलायलाही मनाई केली असती तर कोणत्या राजसत्तेनं आपल्याला लिहायलाही मनाई केली असती. हे तेवढंच खरं. म्हणूनच आपण त्या महापुरुषांनी केलंलं कार्य विसरु नये. त्यांचा आदर करावा. त्यांच्या विचारांचा आदर करावा. जेणेकरुन तीच त्यांना श्रद्धांजली ठरेल यात शंका नाही.
गुरु गोविंद सिंहांची चारही मुलं मरण पावली होती. औरंगजेबानं अतिशय निर्घृणपणे त्यांच्या दोन मुलांची म्हणजेच फतेहसिंह व जोरावर सिंह यांची हत्या वजीरखानामार्फत घडवून आणली होती तर अजीत सिंह व झुंजार सिंह यांना चमकौरच्या युद्धात मारुन टाकलं होतं. त्याबद्दल गुरु गोविंद सिंहांना दुःख झालं होतं. अतिशय वाईट वाटत होतं त्यांना. परंतु ते डगमगले नाहीत. त्यांनी आपलं कार्य नेटानं पुढं सुरुच ठेवलं. शिवाय औरंगजेबाच्या माध्यमातून गुरु गोविंद सिंहाचे चारही मुलं संपली असली तरी औरंगजेब खुश नव्हता. त्याला गुरु गोविंद सिंहाला संपवायचं होतं. त्यासाठीच त्याचा फतवा होता की मृत वा जिवंत. गुरु गोविंद सिंहांना माझ्या सेनापतींनी पकडावं व माझ्या समोर सादर करावं. बदल्यात मोठी जहांगीरी वा वतनदारी घ्यावी.
लालसी वतनदार नव्हे तर लालसी सेनापती त्याच लालसेनं गुरु गोविंद सिंहांच्या मागावर होते. त्यातच गुरु गोविंद सिंह त्यांना जफरनाम्यासारखी पत्र पाठवीत होते.

************************************************

औरंगजेब आज म्हातारा झाला होता. तसा तो बऱ्याच दिवसांपासून आजारीच होता. त्याचा पाय मोडला होता मराठ्यांसोबत झालेल्या एका युद्धात.
सुमारे तीनशे वर्षांपुर्वीचा काळ. तीनशे वर्षांपुर्वी माण नदीला महापूर आला होता. त्या वेळी औरंगजेब मराठा स्वराज्य काबीज करण्याच्या ध्येयाने पिसाळला होता. त्यावेळेस स्वराज्याचा एक एक मावळा अखेरची खिंड लढत होता. याच काळात औरंगजेब सातारा सांगली परिसरात होता. नेमका या वेळी कृष्णा, वारणा आणि माण नद्यांना महापूर आला आणि औरंगजेबाचे न भरुन येणारे नुकसान झाले.
इस १७०० मध्ये औरंगजेबाने सातारा जिंकला. त्यानंतर तो मिरजेकडे येण्यासाठी निघाला भूषणगड, कलेढोण, झरे, आटपाडी मार्गे तो १२ सप्टेंबर रोजी खवासपूर येथे पोहचला. या भागात त्याचा मुक्काम होता. सैनिक, हत्ती, घोडे, उंट, मोठ्या प्रमाणात शाही सामान असा औरंगजेबाचा लवाजमा त्याच्या सोबत होता. ऑक्टोंबर १७०० च्या दरम्यान या परिसरात असताना माण नदीला अचानक महापूर आला. या महापूरात औरंगजेबाच्या छावण्या वाहून गेल्या. खुद्द औरंगजेब या महापूरात अडकला. इतका अडकला होता की त्याला पूराच्या पाण्यात बुडण्यापासून वाचताना त्याचा पाय मोडला. या प्रसंगात त्याला कायमचे अपंगत्व आले. आज माण नदीला पाणी आले होते असे सांगितले तरी ती मोठ्ठी धक्कादायक बातमी ठरु शकते. पण इतिहासात माण नदीला पूर आला होता आणि त्यात हिंदुस्तानाचा सम्राट म्हणून संपुर्ण हिंदुस्थान काबीज करण्याची स्वप्न रचणाऱ्या औरंगजेबाचा पाय माण नदीच्या पूरात मोडला होता हे पचवणं जरा जडच जातं.
दुसरी एक घटना अशीच होती. ते साल होतं १७०२ आणि विशेष म्हणजे पुन्हा या महापूरात औरंगजेब अडकला. जून १७०२ मध्ये औरंगजेबाने विशालगड जिंकला आणि तो कराडकडे येण्यासाठी निघाला. या दरम्यान परिसरात मोठ्ठा पाऊस सुरु होता. औरंगजेबाचे सैन्य वडगाव जवळ आले, तेव्हा नद्या नाले दुथडी भरुन वाहत होते. मुसळधार पाऊस सुरु होता. याच पुरामध्ये औरंगजेबाचा खजिना नदीपार करताना वाहून गेला. सोन्याची सुमारे तीन हजार नाणी वाहून गेली. ही नाणी शोधण्यासाठी औरंगजेबाने पुन्हा पगारी सैनिक कामाला लावले होते. पण हा खजिना हाती लागलाच नाही. नदीची प्रत्येक लाट म्हणजे प्राणसंकटच. एकेका नावेत माणसे तरी किती भरावीत. एका शवपेटीकेत हजार मुडदे अशी अवस्था होती. ओढ्याच्या काठाकाठावर पावलापावलावर माणसे आणि जनावरे मरुन पडली होती. त्यांची इतकी दुर्गंधी सुटली होती की जिवंत माणसांना जीव नकोसा झाला होता. खुद्द औरंगजेबास कृष्णा, वारणा आणि माण नद्यांचा फटका बसला होता. या महापूरातच त्याला कायमचे अपंगत्व आले. त्याकाळाच्या महापूराचे वर्णन वाचले तर यावर्षी देखील सन १७०० च्या महापुराप्रमाणे लोकांचे हाल झाले होते हे लक्षात येतं.
माणदेश हा कायम दुष्काळी पट्टयातला प्रदेश, माण नदीच्या आसपासचा परिसर मिळून जो प्रदेश बनतो, त्याला माणदेश म्हटलं गेलं. खटाव, माण, खानापूर, सांगोला तालुक्‍यांचा काही भाग मिळून आज माणदेशाची ओळख निर्माण झाली आहे. या दुष्काळी भागाला मोठा इतिहास लाभला आहे.
काबूलपासून बंगालपर्यंत पसरलेल्या प्रचंड मोठ्या साम्राज्याचा शहेनशहा औरंगजेबापुढे अनेक राजे महाराजांनी आपल्या समशेरी म्यान केल्या आणि त्याची चाकरी पत्करली. मात्र त्याच्या समोर धिप्पाडपणे उभे होते रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचे स्वराज्य. स्वराज्यावर मोगलांनी अनेक हल्ले केले. मात्र औरंगजेबाला स्वराज्यावर विजय मिळवता आला नाही.
छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर मोगल बादशहा औरंगजेबाला स्वराज्यावर विजय मिळविणे सहज शक्‍य होईल असे वाटले होते. मात्र त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी मोगलांसह इतर शत्रूंना जोराची टक्कर देत स्वराज्यापासून दूर ठेवले. त्यामुळं औरंगजेब दिल्ली सोडून मोठ्या फौजफाट्यासह स्वतः स्वराज्यावर चालून आला. त्याने संभाजी महाराजांना फितुलीनं पकडून हाल हाल करुन मारले. त्यानंतर औरंगजेबाला वाटलं की आता तरी आपण स्वराज्य सहज काबीज करु, मात्र संभाजीराजांच्या मृत्यूचे निखारे मावळ्यांच्या रक्तात फुलत होते. मावळे चवताळून उठले होते.
छत्रपती संभाजींच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज गादीवर आले. त्यांनी दक्षिणेतील जिंजी किल्ल्यावरुन राज्यकारभार सुरु करत मोगलांशी लढा सुरु ठेवला. मात्र २ मार्च १७०० साली त्यांचा मृत्यू झाला. त्यांनतर त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई यांनी स्वराज्याची सुत्रे हाती घेतली. ताराबाईही मोठ्या जिद्दीने मोगलांना तोंड देत होत्या. त्याचं कारण होतं मावळे. मावळे गनिमी काव्याने डाव साधून ते मोगल सैन्यावर हल्ला करत अन वाऱ्याच्या वेगाने अदृश्य होत. मुठभर मावळे कधी येत आणि कधी हल्ला करत अन कधी निघून जात, याचा थांगपत्ताही मोगलांना लागत नसे. त्यातच वीर होते संताजी व धनाजी. संताजी-धनाजीच्या भितीने तर मोगलांना झोपही लागत नव्हती. औरंगजेबही मोठ्या त्वेषानं मराठा सैन्याशी लढत होता. तोरणा, सिंहगड, विशाळगड, अजिंक्‍यतारा, परळीचा सज्जनगड असे महत्वाचे किल्ले मोगलांनी ताब्यात घेतले होते. दरम्यानच्या काळात पाऊस, नद्यांना आलेले पुर यामुळे मोगल सैन्याचेही मोठे नुकसान झाले होते. तरीही औरंगजेब एक एक किल्ला ताब्यात घेत होता. पावसामुळे औरंगजेबाच्या सैन्याचे मोठे नुकसान झाले होते. सैन्य, जनावरे यांची अतोनात हानी झाली होती. खजिना रिकामा होत चालला होता. सैन्याचा पगारही वेळेवर होत नव्हता. त्यामुळे सैन्यावर उपासमारीची वेळ आली होती. असे असताना २१ जून १७०० रोजी सध्याच्या सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्‍यातील भुषणगडाकडे औरंगजेबाच्या सैन्याने कूच केली. पावसामुळे बादशाही फौजेचे मोठे नुकसान झाले होते. अनेक जनावरे दगावली होती. जी शिल्लक होती ती म्हणायलाच जिंवत होती अशी त्यांची अवस्था होती. बादशहाच्या अनेक उमरावांना मुसळधार पावसात सोसाट्याच्या वाऱ्यात पायी चिखल तुडवीत प्रवास करावा लागत होता. मुगल सैन्यावर निसर्गाचे एक प्रकारे अस्मानी संकटच कोसळले होते. दिवसाकाठी केवळ तीन मैलाचा प्रवास मोगल सैन्य करत असत.
राजाराम मरण पावताच व महाराणी ताराबाईनं आपल्या लहानशा चार वर्षाच्या मुलाला म्हणजेच दुसऱ्या शिवाजीला गादीवर बसवताच त्याला लहान समजून व ताराबाईला एक स्री समजून बळ आलेला औरंगजेब स्वतः लढण्यासाठी त्या उतार वयात रणमैदानात आला. त्यावेळेस त्यानं आपल्या वयाचाही विचार केला नाही. फक्त विचार एकच होता नव्हेतर ते त्याचं स्वप्न. आलमवीर बनणं. त्यात अडचण होती ती म्हणजे मराठ्यांची. तीच अडचण आपण लवकरात लवकर दूर करु असं त्याला वाटत होतं. तसंच लवकरच आपण स्वतः ताराबाई आणि तिच्या बाळालाही संपवू असंही त्याला वाटत होतं. म्हणूनच तो स्वतः लढाईच्या मैदानात आला होता.
परळीवरुन भुषणगडाचे साधारण पंचेचाळीस मैलाचे अंतर. ते अंतर कापायला साधारण पस्तीस दिवस लागले. भुषणगड ताब्यात घ्यायला मोगलांना जवळपास एक महिना गेला. महिनाभरानंतर मोगल सैन्य भूषण गडाकडून छत्तीस मैलाचे अंतर कापून तीस ऑगस्ट रोजी माण नदीजवळील खवासपूर येथे आले. तेथे कोरड्या नदीत मोगल फौजांनी छावणी टाकली. मोगल सैन्याची महिनाभर खवासपूरजवळ नदीत छावणी होती. एक ऑक्‍टोंबर १७०० रोजी रात्री आजूबाजूच्या परिसरात अचानक मुसळधार पाऊस पडला. यामुळे अचानक माण नदीला पूर आला. या पुरात मुगलांचे अनेक सैन्य, खजीना, जनावरे, वाहून गेली. मध्यरात्री काळोखात पुराचे पाणी अचानक छावणीत घुसल्यामुळे मुगल छावणीत हाहाकार माजला. अचानक छावणीत गोंधळ सुरु झाल्यामुळे औरंगजेबाला जाग आली. मराठ्यांनी छावणीवर हल्ला केल्याचा त्याचा समज झाला. दचकून बिछान्यातून औरंगजेब पळायला लागला, मात्र अडखळून त्याचा तोल गेल्याने तो जोरात आपटला. यात त्याचा गुडघा निखळला. कसाबसा स्वत:ला सावरत तो सुरक्षीत ठिकाणी गेला. पुढे वैद्य, हकिमांनी अनेक उपचार करुनही औरंगजेबाचा पाय सरळ झाला नाही. तो कायमचाच अधू झाला. या घटनेनंतर बादशहाचे खुशमस्करे बादशहाला बरे वाटावे म्हणून त्याची तुलना तैमुर लंग याच्याशी करु लागले. कारण तैमुर लंग हाही एका पायानं लंगडाच होता. या पुरात मुगली सैन्याची मोठी हानी झाली होती. त्यानंतर औंरंगजेबाला नवीन घोडे, सैन्य भरती करावी लागली. मात्र पायला आलेले अपंगत्व अखेरपर्यंत कायम राहिले होते.
औरंगजेब सम्राट असताना मुघलांनी जवळजवळ संपूर्ण दक्षीण आशियामध्ये पसरलेल्या त्यांच्या प्रदेशासह सर्वोच्च सत्ता गाठली होती. शेवटचा प्रभावी मुघल शासक मानला जाणाऱ्या औरंगजेबाने फतवा 'आलमगिरी' संकलीत केला होता. संपूर्ण दक्षीण आशियामध्ये शरिया आणि इस्लामिक अर्थशास्त्र पूर्णपणे लागू केलेल्या मोजक्या राजांपैकी तो एक होता. तैमुरी घराण्यातील असलेल्या औरंगजेबाचे सुरुवातीचे जीवन धार्मीक कार्यांनी व्यापलेले होते. वडील शाहजहान याच्या हाताखाली औरंगजेबाने एक कुशल लष्करी कमांडर म्हणून ओळख मिळवली. औरंगजेबाने १६३६ ते १६३७ मध्ये दख्खनचा सुभेदार आणि १६४५ ते १६४७ मध्ये गुजरातचा राज्यपाल म्हणून काम केले होते. त्याने १६४८ ते १६५२ मध्ये मुलतान आणि सिंध प्रांतांचे संयुक्तपणे प्रशासन केले आणि शेजारच्या सफाविद प्रदेशांमध्ये मोहीमा चालू ठेवल्या. सप्टेंबर १६५७ मध्ये शाहजहानने त्याचा सर्वात मोठा आणि उदारमतवादी मुलगा दारा शिकोहला त्याचा उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केले. परंतु औरंगजेबाने हे नाकारले आणि फेब्रुवारी १६५८ मध्ये स्वतःला सम्राट म्हणून घोषीत केले. एप्रिल १६५८ मध्ये औरंगजेबाने धर्मात येथील युद्धात शिकोह आणि मारवाड राज्याच्या सैन्याचा पराभव केला. मे १६५८ मध्ये समुगढच्या लढाईत औरंगजेबाच्या निर्णायक विजयाने त्याचे सार्वभौमत्व मजबूत केले आणि संपूर्ण साम्राज्यात त्याचे वर्चस्व मान्य केले गेले. जुलै १६५८ मध्ये शहाजहान आजारातून बरा झाल्यानंतर, औरंगजेबाने त्याला राज्य करण्यास अक्षम घोषीत केले आणि त्याला आग्रा किल्ल्यात कैद केले.
औरंगजेबाच्या राजवटीत मुघल हे जवळजवळ संपूर्ण दक्षीण आशियामध्ये पसरलेल्या त्यांच्या प्रदेशासह सर्वात मोठ्या सत्तेवर पोहोचले. वेगवान लष्करी विस्तार हे त्याच्या कारकिर्दीचे वैशिष्ट्य होते आणि अनेक राजवंश व त्यांची राज्ये मुघलांनी उलथून टाकली. त्याच्या विजयांमुळे त्याला आलमगीर 'विजेता' ही शाही पदवी मिळाली. मुघलांनी जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि सर्वात मोठी उत्पादन शक्ती म्हणून छिंग चीनलाही मागे टाकले होते. मुघल सैन्यात हळूहळू सुधारणा होत गेली होती आणि ती जगातील सर्वात मजबूत सैन्यांपैकी एक बनली.
एक कट्टर मुस्लीम असलेल्या औरंगजेबाला असंख्य मशिदी बांधण्याचे आणि अरबी कॅलिग्राफीच्या संरक्षक कामांचे श्रेय दिले जाते. त्याने साम्राज्याची प्रमुख नियामक संस्था म्हणून फतवा अल-आलमगीर हा यशस्वीपणे लादला आणि इस्लाममध्ये धार्मिकरित्या निषिद्ध असलेल्या गोष्टींना प्रतिबंधित केले. औरंगजेबाने अनेक स्थानिक विद्रोहांना दडपून टाकले असले तरी, त्याने परदेशी सरकारांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवले होते.
औरंगजेबाला सामान्यतः इतिहासकारांनी मुघलांच्या महान सम्राटांपैकी एक मानला आहे. समकालीन स्त्रोतांमध्ये औरंगजेबाची काही गोष्टींसाठी प्रशंसा केली जाते, तर राजकीय हत्या आणि हिंदू मंदिरे पाडल्याबद्दल त्याच्यावर टीका केली जाते. शिवाय त्याने या प्रदेशाचे इस्लामीकरण, जिझिया कर लागू करणे आणि गैर-इस्लामिक प्रथा बंद केल्याने गैर-मुस्लिमांमध्ये तो तिरस्करणीय आहे. औरंगजेबाचे स्मरण मुस्लिमांनी फक्त ११ व्या व १२ व्या इस्लामिक शतकातील शासक आणि शताब्दी पुनरुज्जीवनकर्ता म्हणूनच केले आहे.

************************************************

औरंगजेबानं गुरु तेगबहाद्दूर सिंह यांची हत्या करवली. त्या हत्येबाबत कोणी म्हणतात की धर्मामुळं हत्या केली गेली. गुरु तेगबहाद्दूर यांनी मुस्लीम धर्म स्विकारला नाही. शिवाय बहुसंख्य काश्मीर पंडीतांचा धर्म बदलवू नये अशी बतावणी केली तर दुसरीकडं म्हटलं जातं की गुरु तेगबहाद्दूर सिंह यांची हत्या त्यांनी कायदा मोडला यामुळंच केली गेली. परंतु सत्य हे होतं की औरंगजेब हा धर्मद्रष्टा होता. त्यामुळंच त्यांनी गुरु तेगबहाद्दूर सिंह व त्यानंतर फतेहसिंह व जोरावर सिंह यांचीही हत्या केली.
औरंगजेबाचा मोडलेला पाय. त्यातच त्याचं आजारपण. शिवाय जफरनामा. ते पाहून औरंगजेबाचे विचार बदलत चालले होते. चमकौर युद्धादरम्यान आनंदपूर साहिब या ठिकाणाला औरंगजेबाचा सेनापती वजीर खानाने वेढा घातला होता. तो वेढा बरेच दिवस चालला. त्यामुळं अन्नसाठाही संपत आला होता. खालसा दलातील बरेच सैनिक मरण पावले होते. त्यामुळं चिंता सतावत होती. अशातच वजीरखानानं त्यांना किल्ला सोडून जायला लावलं व सुरक्षेची हमी दिली. त्यामुळंच गुरु गोविंद सिंहानं आनंदपूर सोडलं व ते सरसा नदी पार करुन जावू लागले. परंतु शत्रूनं धोकेबाजी केली व त्यांना चमकौर इथे गाठलं. त्यावेळेस मुठभर शिखांनी पराक्रम केला असं म्हटलं जातं.
तो चाळीसचा आकडा गुरु गोविंद सिंहासाठी घातकच होता. कारण चमकौर युद्धामध्ये होत असलेली हार लक्षात घेवून त्या चाळीस शिखांनी वजीरखानाला शरणागत जाण्याचं आव्हान केलं. ती गोष्ट गुरु गोविंद सिंहांना माहीत झाली. त्यानंतर त्यांना राग आला. परंतु ते सर्वांचे गुरु असल्यानं त्यांना सर्वांच्या इच्छा पुरवणं भाग होत्या. त्यामुळं त्यांनी म्हटलं,
"जायचंच आहे तर खुशाल जा. परंतु एक करारनामा लिहून द्या की आम्ही स्वखुशीनं जात आहोत. कारण त्यानंतर समाजानं माझ्यावर लांच्छन लावायला नको."
गुरु गोविंद सिंहाचे ते बोल. त्यावर ते चाळीस शिख तयार झाले. त्यांनी त्या करारनाम्यावर स्वाक्षऱ्या केल्या व ते मुगलांना मिळाले.
त्या चमकौर युद्धात गुरु गोविंद सिंहाचे दोन पुत्र मरण पावले. त्यानंतरही गुरु गोविंद सिंह हाती न लागल्यानं चिडलेल्या वजीर खानानं फतेहसिंह व जोरावर सिंह यांचीही हत्या केली. त्यानंतर वजीरखानानं तशी बातमी औरंगजेबास पाठवली.
औरंगजेब त्यावेळेस दक्षीणेत होता. जशी फतेहसिंह व जोरावर सिंहाच्या मृत्यूची बातमी बादशाहा औरंगजेबाला समजली. तसा बादशाहा औरंगजेब नाचायला लागला. त्याच्या आनंदाला सीमाच उरली नाही. तोच एक दूत लखोटा घेवून औरंगजेबाच्या दरबारी हजर झाला. त्यानं औरंगजेबाला तो लखोटा दिला. त्यात एक संदेश होता.
"बादशाहा औरंगजेबा, तू खुश होवू नकोस. हा तुझा विजय नसून हा तुझा पराजय आहे. तू माझे चारही पुत्र मारले असतील. परंतु ते सिंहाचे छावे आहेत. सिंह अजून जिवंत आहे आणि हा सिंह तेव्हापर्यंत जिवंत असेल. जेव्हापर्यंत तुझं साम्राज्य अजिबात नष्ट होणार नाही. हा सिंह केव्हा तुझ्यावर गरुडासारखी केव्हा झेप घेईल हे सांगता येत नाही. यांचा तूच अंदाज बांध. तू आतातरी शरण ये किंवा तुझा आलमवीर बनण्याचा असलेला नादच सोडून दे."
ते गुरु गोविंद सिंहाचे जफरनाम्यात लिहिले गेलेले बाणेदार उत्तर. औरंगजेबाचा आनंद तो लखोटा पाहून क्षणातच विरघळला. त्याच्या आनंदावर पाणी पडलं. तो तसा फारच चिडला व पुन्हा लढाई करण्यासाठी त्यानं मुक्तसर इथे सैन्य पाठवले व मुक्तेसरची लढाई झाली.

************************************************

सन १७०४ ला मुगल सेना व पहाडातील सरदारांची सेना यांनी आनंदपूरची घेरावबंदी केली होती. त्यानंतर शिख खालसा पंथातील लढवय्ये सैनिक झाडावर त्या मुगली सेनेला न दिसता राहू लागले होते. ह्यातच गुरु गोविंद सिंहाचे चाळीस लढवय्ये सैनिक मुगलांना मिळाले होते. शिवाय गुरु गोविंद सिंहाचे चारही पुत्र मरण पावले होते. त्यामुळं शिखांना जोराचा धक्का बसला होता. तसाच जबर धक्का बसला होता गुरु गोविंद सिंहांना. तेही डगमगले होते. परंतु आपले हे निराशपण जर आपल्या शिख लोकांना दिसलं तर आज चाळीस सैनिक मुगलांना मिळाले, उद्या संपुर्ण शिख खालसा दलातील सैनिक मुगलांना मिळतील. असाच विचार करुन त्यांनी पुन्हा नव्या जोमानं कार्य करण्याचा विचार केला. त्यासाठी त्यांनी आधी आपल्या खालसा दलात आपल्या विचारानं बळ आणलं. ज्या बळानं एक स्री भारावली होती. त्या स्रीचं नाव होतं माई भागो.
माई भागो ही गुरु गोविंद सिंहांच्या विचारानं भारावलेली स्री. तिला चाळीस शिख सैनिक गुरु गोविंद सिंहांना सोडून जावून मुगलांना मिळालेले माहीत होते. त्यानंतर ती युद्धकला शिकली व ती गुप्त रुपात वेषांतर करुन मुगलांना मिळालेल्या चाळीस शिखास भेटू लागली. त्यांना गुरुजींच्या उपदेशाची माहिती देवू लागली. सांगू लागली गुरुजींबाबत. ती म्हणत असे,
"गुरुजींनी आपले चारही पुत्र गमावले. कोणासाठी तर शिख समाज सुखी व्हावा. सांगू लागले की हाच काळ आहे गुरुजींना बळ देण्याचा. त्यांचे हात मजबूत करण्याचा."
तिची ती करुण वाणी. ती वाणी ऐकून ते गुरु गोविंद सिंहाला सोडून गेलेले चाळीस सैनिक भारावले व ते परत येणार असं त्यांनी आश्वासन दिलं व म्हटलं,
"जर आम्ही परत आलो तर गुरुजी आम्हाला स्विकारणार काय?"
त्यांचा तो प्रश्न. तशी ती म्हणाली,
"जर तुम्ही काही पराक्रम करुन दाखवला तर नक्कीच गुरुजी तुमचा स्विकार करतील."
माई भागोचं ते बोलणं. ते बोलणं ऐकताच त्या चाळीस शिखांनी होकार दर्शवला. अशातच ती मुक्तेसरची लढाई झाली व त्या लढाईत बदल्याच्या भावनेनं व त्या पत्राच्या उत्तरादाखल मुघली सेना मुक्तसर इथं नव्या जोमानं लढाई करायला आली होती.
ती निकराची लढाई. त्या निकराच्या लढाईत ते मुगलांकडे गेलेले चाळीस शिख सैनिक गुरु गोविंद सिंहांना मदत करण्यासाठी मदतीला आले. त्यांनी गुरु गोविंद सिंहांच्या बाजूनं लढाई केली. ज्यात तब्बल एकोणचाळीस सैनिक मरण पावले.
मुक्तसरचं ते युद्ध. ते युद्ध जिंकलं होतं. त्यानंतर त्या मृत सैनिकांचा दाहसंस्कार करायचा होता. ते युद्ध समाप्त होताच गुरुजी हालहवाल माहीत करुन घेण्यासाठी फिरत होते. अशातच त्या चाळीस सैनिकांपैकी एक सैनिक त्यामध्ये जिवंत सापडला. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच्या अंगावर अनन्वीत जखमा झाल्या होत्या. त्याला बरोबर उठताही येत नव्हते. परंतु तरीही तो कसाबसा उठला व गुरु गोविंद सिंहाच्या पायावर नतमस्तक झाला. म्हणाला,
"गुरुजी, मला माफ करा. मी चुकलो."
तो रक्ताच्या थारोळ्यातील सैनिक. ते त्याचं विव्हळणं. तरीही त्याची हात जोडून विनंती. ती करुणा पाहून गुरु गोविंद सिंहांच्या डोळ्यातून पाणी आलं. त्यांचं ह्रृदय भरुन आलं. ते ओक्साबोक्सी रडायला लागले. ते आपल्या पुत्राच्याही वेळेस ते मरण पावल्यावरही जेवढे रडले नव्हते. तेवढे ते आज रडत होते. त्यानंतर त्यांनी तो करारनामा काढला व तो फाडून त्या सैनिकांना आलिंगण दिलं व म्हटलं,
"हे शिख विरा, मी तुम्हाला केव्हाचंच माफ करुन टाकलंय. कारण ज्याचा कोणी नसतो, त्याचा परमेश्वरच असतो. परमेश्वरच आपलं कार्य स्वतः करीत असतो. आपण फक्त एक माध्यम असतो त्यांचं. परमेश्वरच वावरत असतो सर्वत्र. तो कधी पाषाणात तर कधी तो मानवी शरीरात दिसतो."
गुरुजीचे ते बोल. त्या बोलण्यानं भारावलेला तो सैनिक गदगद झाला. गुरुजी रडताच तोही रडायला लागला. त्याचे अश्रू ओघरायला लागले. त्या अश्रूचे थेंब गुरुजींच्या पायावर पडले. तसं त्याचं पाप पुर्णतः धुवून गेलं होतं.
त्या सैन्याचं नाव मान सिंह होतं. गुरुजींनी त्याला वैद्याच्या स्वाधीन केलं. त्यानंतर ते पुन्हा फिरु लागले त्याच रणमैदानात. ज्या रणमैदानात आणखी एक सैनिक सापडला. तोही जिवंत आणि तोही रक्ताच्या थारोळ्यातच होता.
गुरुजींनी त्या सैनिकाकडे पाहिलं. त्याचं निरीक्षण केलं. तो सैनिक म्हणजे दुसरा तिसरा कोणी नव्हता तर ती माई भागो होती. जी पुरुषी वेष धारण करुन त्या रणमैदानात लढली होती. चांगली त्वेषानं लढली होती. ज्यातून ती आज रक्तबंबाळ झालेली दिसत होती.
ती माई भागो. तिलाही उचललं गुरु गोविंद सिंहांनी. तिलाही वैद्याकडं पाठवलं. तिच्यावरही उपचार झाले व ती खणखणीत बरी झाली. त्यानंतर ती गुरु गोविंद सिंहाची शिष्याच नाही तर एक संरक्षिका बनून कार्य करु लागली.
ते मुक्तसरचं युद्ध. त्या युद्धात माई भागोनं मृत्यू सहन करण्याची शपथ घेतली होती. ती गुरु गोविंद सिंहाच्या बाजूनं पुरुष सैनिकांसारखी लढली व अनेक मुस्लिम सैनिकांचा धुव्वा उडवला. तिनं दहा हजार मुघल सैनिकांना धूळ चारली होती. त्यामुळंच मुगल सैनिकांना मागे हटण्यास भाग पडलं. कारण या युद्धात मुगलांचं भरपूर नुकसान झालं होतं.
ते चाळीस शिख. त्यांना समाज भागूबाई म्हणू नये. म्हणूनच ते माई भागोने विश्वास देताच गुरु गोविंद सिंहाकडे परत आले व त्यांनी तो पराक्रम करुन दाखवला की त्या पराक्रमानं मुक्तसरचं युद्ध जिंकता आलं. ते युद्ध मुक्तसर युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे. ते युद्ध गुरु गोविंद सिंह जिंकले. तसंच त्या युद्धातून औरंगजेबाला शिकवण मिळाली. शिकवण मिळाली की त्यानं शिखांच्या वाट्याला जावू नये. शिख लढवय्ये असून त्यांची जरी कमी संख्या असली तरी ते अति आत्मविश्वासाच्या भरवशावर युद्ध करतात व जिंकतात. शिवाय त्यात आपलंच जास्त नुकसान होत असतं.
औरंगजेब तसं पाहता शेवटी हताश झाला होता. त्यानं शिखांवर विजय मिळविण्याचं स्वप्न सोडून दिलं होतं. तसं पाहता त्याचे सैनिकही थकले होते. त्यांना उपासमारीचे चटके मिळत होते. सततचे युद्ध होत असल्यानं औरंगजेबाचे सैनिकही कंटाळले होते. ते आता तेवढ्याच ताकदीनं युद्ध करीत नव्हते. त्यामुळंच पराभव होत होता. ही स्थिती सगळीकडंच होती. महाराष्ट्रातही ताराबाईनं शिकंजे कसले होते. त्यातच गुरु गोविंद सिंहदेखील त्याच्या आलमवीर बनण्यात अडथडाच बनले होते. शेवटी हताश झालेला औरंगजेब. त्यानं आपले आलमवीर बनण्याचे स्वप्न सोडून दिले. तशी त्यांची प्रकृतीही बरी राहात नव्हतीच. त्यामुळंच आलमवीर बनायचं स्वप्न सोडून द्यावं लागलं व तो १७०७ मध्ये महाराष्ट्रात अहमदनगर इथे मरण पावला.
मुक्तसरच्या युद्धानंतर गुरु गोविंद सिंह हे महाराष्ट्रात आले. ते नांदेड इथं आले असता त्यांनी औरंगजेबाची भेट घेवू पाहिली. परंतु त्यांना कळलं की ते रस्त्यात असतांना औरंगजेब मरण पावले होते. त्यानंतर त्यांनी नांदेड इथं बराच काळ मुक्काम ठोकला.
औरंगजेब मरण पावताच त्यांच्या वारसात धुमचक्री निर्माण झाली. सत्तेसाठी होत असलेली भांडणं विकोपाला गेली. याच संधीचा लाभ घेण्याचा विचार करीत गुरु गोविंद सिंहांनी मुगलांशी संधान बांधून टाकलं. त्यातच गुरु गोविंद सिंहांनी बहादूर शहाशी जवळीक साधली.
बहादूर शहाला गुरु गोविंद सिंहानं औरंगजेबाच्या मृत्यूनंतर बादशाहा बनायला मदत केली होती. हेच खुपलं सरहदचा वजीर खानाच्या डोळ्यात. त्यानं गुरु गोविंद सिंहांना ठार करायला दोन पठाण पाठवले होते. ते पठाण नांदेडच्या गोदावरी तटावर येवून गुरु गोविंद सिंहाची वाट पाहात होते. अशातच तो काळा दिवस उजळला. ज्या दिवशी गुरु गोविंद सिंहाची हत्या होणार होती.
गुरू गोविंद सिंह, त्यांच्या आयुष्यात औरंगजेबाला कधीही समोरासमोर भेटले नाहीत. परंतु गुरु गोविंद सिंहाने त्यांच्यावर औरंगजेबाने पाठवलेल्या इतर राज्यकर्त्यांशी युद्ध केले. त्याबद्दल गुरु गोविंद सिंहांनी जफरनाम्यात तसं लिहिलेलं आहे. गुरु गोविंद सिंहांनी औरंगजेबाला जाणीव करुन दिली. बादशाहा औरंगजेब सत्तेसाठी किती क्रूर झाला आहे, त्याने हजारो निरपराध हिंदूंना, शिखांना कसे मारले? हजारो लोकांचे बळजबरीने कसे धर्मांतर केले? लाखो लोकांची मोठी जीवहत्या कशी केली? हे सर्व जफरनाम्यात गुरु गोविंद सिंहांनी लिहिलं होतं.
औरंगजेब बादशाहा हा पंच्याशी वर्षांचा होता, त्यावेळेस त्यानं जफरनामा वाचला. तो हळू हळू वाचत असतांना तो जफरनामा त्याच्या हातातून निसटून त्याच्या सिंहासनावरुन खाली पडला आणि शेवटी त्याला एक शब्दही उच्चारता आला नाही, तेव्हा त्याची मुलगी झैबुनिशा आली आणि त्याला म्हणाली, "वाहेगुरु जी का खालसा? वाहेगुरु जी की फतेह?"
तिचं ते बोलणं. ते बोलणं अतिशय रागाचं होतं. ती तशी ओरडतच व राग दाखवतच म्हणाली होती.
याचा अर्थ असा होता की गुरु गोविंद सिंह जिंकले नसून त्यांचे खालसा दलही जिंकलेलं नाही असंच तिला वडीलांना सांगायचं होतं.
गुरु गोविंद सिंहानं जफरनाम्यात जे लिहिलं. त्यात त्यांची मुलं, आई व वडील यांची औरंगजेबानं हत्या कशी केली? याचं वर्णन केलं होतं. परंतु जो राग झैबुनिशात धुमसत होता.
तो जफरनामा. तो सफरनामाच होता. त्यात आणखी लिहिलं होतं, बादशाहा औरंगजेबानं आपल्या चार मुलांना, आपल्या आईला, आपल्या वडिलांना कसे मारले? अर्थात तडपत तडपत मारले याचं वर्णन केलं होतं. त्यानंतर गुरु गोविंद सिंहानं लिहिलं होतं की मी तरीही जिंकलो. कारण लाखोंच्या सैन्याने तुम्ही माझ्यावर अगदी सहज विजय मिळवू शकला असता. परंतु तसा विजय तुम्हाला मिळवता आला नाही, माझे चार मुले तुम्हाला मारावी लागली. माझ्या वडीलांना तुम्ही मारलं, माझ्या आईला तुम्ही मारलं तरी तुम्ही जिंकले नाही. जर तुम्ही जिंकले असते तर तुम्ही अशा हत्या केल्याच नसत्या. हाती शस्र नाही हे लक्षात न घेता आणि लहान वय आहे हेही लक्षात न घेता. जिंकतो तोच. जो समोरासमोर युद्ध करतो. तुम्ही भागूबाईसारखं मारलं माझ्या मुलांना. त्यांचे हात बांधून. तुम्हाला भीती होती की ती लहानशी मुलंही तुम्हाला नष्ट करतील. हे लक्षात घ्या आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, माझा पाचवा मुलगा माझा खालसा दल आहे आणि तो सदैव जिवंत आहे. मी त्याला सदैव जिवंत ठेवले आहे. त्यामुळे अनेक वर्षांच्या मुघल राजवटीत माझा खालसा दल जिवंतच राहिला. अनेक लढाया लढल्या गेल्या तरी. पण खालसा आजही जिवंतच आहे. अजरामर आहे.
गुरु गोविंद सिंह एक महान कवी होते आणि त्यांच्या शब्दांनी लाखो लोकांना पराभूत करणारा खालसा निर्माण केला होता. त्यांची बाणी “चंडी दी वार” ऐकून तब्बल मुठभर शिखांनी लाखो सैन्याचा पराभव केला होता. जणू गुरु गोविंद सिंह हे मानव नव्हते तर ते सर्वशक्तिमान देवच होते वा सर्वशक्तीमान देवाचा अवतार होते असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.
गुरु गोविंद सिंह यांच्या मुगलासोबत चौदा लढाया झाल्या होत्या. त्यांनी पंजाबमध्ये औरंगजेबाचा पराभव केला. ते जमिनीसाठी किंवा देशाला स्वतंत्र्य करण्यासाठी लढले नाही, तर ते अन्यायाविरुद्ध लढले, म्हणूनच जेव्हा औरंगजेब मरण पावला, तेव्हा त्याने बहादूर शाहशी युती केली, ज्याला प्रत्यक्षात एका शिख सैनिकाने मारले होते.
तो काळा दिवस. असाच तो काळा दिवस उजळला. बहादूर शहाला गुरु गोविंद सिंहानं केलेली मदत पाहून सरहदचा वजीर खान चिडला व त्यानं गुरु गोविंद सिंहाला मारायला दोन पठाण पाठवले होते. तसं पाहता वजीर खान गुरु गोविंद सिंहाच्या मागावरच होता.
मारेकऱ्यांचं नाव जमशेदखान व वसीद बेग होतं. म्हटलं जातं की औरंगजेबाचा मोठा मुलगा आझमखान याला मारण्यात व त्याचाच भाऊ बहाद्दूर शहाला गादीवर बसविण्यात गुरु गोविंद सिंहाचा हात होता. त्यातच बहाद्दूरशहानं गुरु गोविंद सिंहाला भेटीला बोलावलं होतं. ते पाहून आता औरंगजेब बादशाहा मरण पावताच शिख पंथ जोमानं वाढेल व गुरु गोविंद सिंहाचंही महत्व वाढेल असं सरहदच्या वजीरखानाला वाटलं व त्यानं आपले दोन साथीदार गुरु गोविंद सिंहाची हत्या करण्यासाठी पाठवले. त्यानंतर ते गुरु गोविंद सिंहाची हत्या करण्याची संधी शोधू लागले. अशातच तो काळा दिवस उजळला. जमशेदखान व वसीद बेग गुरु गोविंद सिंहाच्या कक्षात शिरले. त्यानंतर संधी पाहून जमशेदखानने गुरु गोविंद सिंहावर चाकूनं वार केला. तो वार काळजावर लागला. तशीच डोळ्याची पापणी झपकण्याची वाट न पाहता गुरु गोविंद सिंहानं जमशेदखानवर वार केला व त्याला जागीच ठार केले. ते पाहून त्याचा साथीदार असलेला वसीद बेग पळायला लागला. कक्षात तशी खळबळ उडाली आणि पळत असलेल्या वसीद बेगला शिख सैनिकांनी पकडलं व त्यालाही त्यांनी जागीच ठार केलं. कोणी म्हणतात की जमशेदखान व वसीद बेग यांना सरहदचा गव्हर्नर वजीर खानने पाठवलं होतं तर कोणी म्हणतात की त्यांना मुगल सैनिकांनी पाठवलं होतं. तेही गुरु गोविंद सिंहाच्या मृत्यूनंतर शिख पंथ संपेल असा विचार करुन. परंतु गुरु गोविंद सिंह जमशेदखानच्या चाकूच्या वारानं ताबडतोब मरण पावले नाहीत. ते काही दिवस जिवंत होते. तसा तो घाव तिक्ष्ण होता व तो घाव काळजावर लागला होता गुरु गोविंद सिंहांच्या. त्यामुळं तो घाव सुधारणारा नव्हताच. परंतु आपण मरण पावणार हे गुरु गोविंद सिंहाला वाटत होतं. त्यामुळं त्यांनी नांदेडमध्येच राहात असलेल्या बंदासिंहला आपला शिष्य बनवले व सांगीतलं,
"आता शिख समुदायाचा तोच एक उत्तराधिकारी असून त्यानं शिखांना मार्गदर्शन करावं. गुरुग्रंथसाहेब हा ग्रंथ पुर्ण झाला आहे. यानंतर शिखांनी गुरुग्रंथसाहेबलाच गुरु मानावं व आपलं कार्य पुढंही असंच नेटानं सुरु ठेवावं."
ते गुरु गोविंद सिंहाचे अखेरचे बोल. त्यानंतर ती रात्र गेली व दुसरा दिवस उजळला. ती तारीख होती ७ ऑक्टोबर १७०८. घाव काळजावर होता. तो जास्तच चिघळला होता. अंगातील दुखणं वाढलं होतं. काही शिख गुरु गोविंद सिंहाजवळ बसलेच होते. गुरुजीचा श्वास भरुन येत होता. तसे गुरुजी काहीतरी बोलले व शेवटी म्हणाले,
"बोले सो नेहाल सत श्री अकाल."
ते त्यांचे शेवटचे शब्द. ते शेवटचेच शब्द ठरले. त्यानंतर गुरुजींनी इकडे तिकडे पाहिलं व त्यानंतर त्यांची प्राणज्योत विझली. ज्यावेळेस त्यांची प्राणज्योत विझली. त्यावेळेस ते नांदेडमध्येच होते. त्यानंतर त्यांचं तिथंच नांदेडमध्येच मोठ्या शाही थाटात दफन करण्यात आलं.
गुरु गोविंद सिंहांनी एकच नारा दिला होता. 'बोले सो निहाल, सत श्री अकाल ' तो नारा त्यांनी सत्य करुन दाखवला होता. तसंच गुरु गोविंद सिंहाच्या मृत्यूनंतर शिख पंथ संपणार असं मुगलांना वाटत होतं. परंतु ते त्यांचं स्वप्न होतं. ते स्वप्नच उरलं होतं.
गुरु गोविंद सिंहांच्या मृत्यूनंतर शिख संप्रदाय संतापला होता. गुरु गोविंद सिंहानं जो सामोपचाराचा प्रश्न चालवला होता. त्यावर विरजण पडलं होतं. गुरु गोविंद सिंहाला हिंदू मुसलमान व शिखांनी सामोपचारानं वागावं असं वाटत होतं. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर शिख समुदाय एवढा संतापला होता की मुगल व शिख यांच्यात कमालीची दरी निर्माण झाली होती. जी आजही अस्तित्वात आहे.
आज गुरु गोविंद सिंह नाहीत. नाहीत ते तेगबहाद्दूर सिंह आणि नाही ती माता गुजरी व नाहीत ते बालवीरही. परंतु त्यांचं ते बलिदान आज अस्तित्वात आहे. बिचाऱ्या इवल्या इवल्या जिवांनी धर्मासाठी दिलेलं बलिदान हे सतत आबालवृद्धांनाच नाही तर इवल्या इवल्या जिवांना प्रेरणा देत आहे. देशातील कोणतंही बलिदान आठवलं की आठवतात फतेहसिंह व जोरावर सिंह. ज्यांनी वयाच्या अगदी अल्प काळात मृत्यूला किंचीतही न घाबरता हसत हसत मृत्यूला कवटाळले व हसत हसत मरणाला मिठी मारली. म्हणूनच त्यांना बालवीर म्हटलं जातं. तेच पहिले वीर होवून गेलेत की ज्यांनी वयाच्या अगदी अल्प काळात बलिदान दिलं होतं. तोच धागा होता गुरु गोविंद सिंहाजवळ की ज्यांनी त्याच बालविरांच्या हत्येचा धागा पकडून व त्यावरच आधारीत जफरनामा लिहून शेवटच्या अंतिम समयी आलमवीराचे स्वप्न पाहणाऱ्या नव्हे तर आलमवीरच समजणाऱ्या औरंगजेबालाही रडवलं होतं. जणू त्यांच्यावर त्यांच्या मृत्यूच्या अंतिम समयी पश्चातापाची वेळ आणली होती.
************************************************

आज आपण इतिहास आठवतो. कशासाठी? तर तशा चुका आपल्या हातून होवू नयेत यासाठी. आपल्यात सुधारणा घडवून याव्यात यासाठी. परंतु तो इतिहास आठवून त्या इतिहासाच्या आधारे वाद वा दंगे करण्यासाठी नाही. तसे दंगे वा वाद जर करायचे असतील तर आपला इतिहासच आठवून नये.
आपल्याला समृद्ध असाच इतिहास लाभला आहे. आपला इतिहास समृद्ध व वैभवशाली जरी असला तरी तेवढाच रक्तरंजीतही आहे. तो रक्तरंजीत झाला. त्याला कारण आहे आपलीच फितुरी. आपल्याच माणसांनी द्वेषातून आपल्याच माणसांबद्दल केलेली फितुरी. ज्यातून असा रक्तरंजीत इतिहास घडला.
आपण आपला इतिहास आठवतो. मग तो चांगल्यासाठी आठवावा. द्वेषभावना जर असा इतिहास आठवून वाढत असेल तर कधीच असा इतिहास आठविण्याची आवश्यकता नाही. गरजही नाही. गुरु गोविंद सिंहाबाबत सांगायचं झाल्यास पहिला इतिहास बालवीरांची हत्या करणारा तर दुसरा इतिहास बालविरांच्या हत्येचा बदला. म्हणूनच वजीरखानाची हत्या, त्यातच त्याच्या प्रेताचं विटंबन आणि वजीरखानाची हत्या केली म्हणून बंदा सिंह बहादूरची हत्या. त्यातच त्याच्याही प्रेताचं विटंबन. बदल्यावर तेवढ्याच ताकदीनं बदला. हाच इतिहास आजपर्यंत घडत आलाय. आज ना ते बालवीर आहेत. ना गुरु गोविंद सिंह ना बंदा सिंह बहादूर. ना गुरु तेगबहाद्दूर सिंह ना ते शिखांचे दहा गुरु. फक्त आहे गुरुग्रंथसाहेब हा शिखांचा ग्रंथ. तोच दिशा देतो खऱ्या जगण्याला. माणसानं जगावं कसं? कसं जगू नये? याचं अभिसरण करणारा ग्रंथ. त्या ग्रंथनिर्मीतीनंतर शिख गुरु, गुरु गोविंद सिंहानं शिखांच्या गुरुपदाला मर्यादा आणली. कारण शिख पंथ निर्माण झाला होता. पुढे इंग्रज भारतात आले. त्यांनी येथील परिस्थिती पाहिली. तसाच इतिहास पाहिला. तो हिंदू व मुसलमानांचा इतिहास रक्तरंजीत होता. त्यानंतर त्यांनी ठरवलं. ठरवलं की या देशातील हिंदू मुसलमानात दंगे निर्माण करावे, शिख व मुस्लीमात दंगे लावावे व त्या दंग्यांना थोडी हवा दिली की बस, आपल्याला चांगलं राज्य करता येईल. याच विचारांनी त्यांनी या देशात हिंदू मुसलमानांना वेगवेगळ्या स्वरुपानं भडकवून दंगे निर्माणच केले नाही तर ते धुमसवतही ठेवले.
शिख हा पुर्वी धर्म नव्हता. तो पंथच होता. परंतु इंग्रजांनी त्यांना धर्माचं स्थान दिलं. त्याचं कारण होतं. हिंदू एकतेला तोडणं. शिख ह्या संप्रदायातील लोकं हे आधीपासूनच लढवय्ये होते. याचाही अभ्यास केला होता इंग्रजांनी. तसं पाहता शिख संप्रदाय हा हिंदू धर्मातूनच तयार झाला होता. हेच पाहिलं इंग्रजांनी व शिख संप्रदायाला धर्माचं नाव दिलं आणि स्थानंही. तेव्हापासून शिख नावाचा भारतात स्वतंत्र्य धर्म उदयाला आला. त्यानंतर शिखांच्या रक्तरंजीत इतिहासाचाही अभ्यास केला होता इंग्रजांनी. त्यांनी फतेहसिंह व जोरावर सिंह हे आपल्याच माणसांनी फितूरी केल्यामुळं मारले गेले असं लोकांना न सांगता त्यांनी दंगे भडकविण्यासाठी त्यांना मुस्लीमांनी मारलं असं सांगीतलं व त्याचाच प्रसार केला. संभाजींनाही पकडून देतांना आपल्याच माणसांनी फितुरी केली हे न दाखवता मुस्लीमांनी मारलं असं दाखवलं व तमाम देशात हिंदू मुसलमान, शिख मुसलमान असे दंगे भडकवले.
आज भारत स्वतंत्र्य आहे. भारतात पुर्वी हिंदू मुसलमान युद्ध चालायचे. मग दंगे चालायचे. आज तसं नाही. आता फक्त चालतो द्वेष. आताही द्वेष चालतो आणि रागही तेवढ्याच स्वरुपाचा. कारण आहे इंग्रजांनी प्रसवलेली राजनीती. लोकांच्या मनात बिंबवलेल्या इतिहासातील घडलेल्या गोष्टी. त्यांचा उलटाच अन्वयार्थ लावून त्यांचं एकत्रीकरण होवू नये म्हणून प्रसवलेली नीती व ध्येयधोरणे. जी ध्येयधोरणं येथील नांदत असलेल्या संस्कृतीला तडा देणारी होती. मुगलांनी केलेली संभाजीराजांची हत्या. तसे संभाजी हिंदूंचे राजे होते तर शिख समुदाय मुसलमानांचा आज द्वेष करतो. त्याचंही कारण आहे मुघलांनी केलेली फतेहसिंह व जोरावर सिंह यांची हत्या. कारण गुरु गोविंद सिंह हे शिखांचे गुरु होते आणि फतेहसिंह व जोरावर सिंह ही गुरु गोविंद सिंहांची मुलं. त्या बालवीरांचं बलिदान सतत आठवण देत असतं की आम्हाला मुगलांनी नाही तर मुसलमान धर्मानं मारलं. तसंच संभाजींचंही बलिदान मुस्लीम धर्मानं मारलं अशीच आठवत देत राहातं. यावरुनच वाद होतात. वाद कधीकधी एवढे विकोपाला पोहोचतात की भांडणं होतात व दंगे भडकतात. मग देशातील निरपराध माणसं मरतात. तेवढ्याच प्रमाणात देशातील मालमत्तेचंही नुकसान होत असतं.
धर्माधर्मातील ही भांडणं. आजही याच धर्मावरुन वाद होत आहेत. वाद एवढे विकोपाला जात आहेत की ज्या वादाला अंत उरत नाही. संभाजी राजे हिंदूंचे होते व त्यांची हत्या औरंगजेबानं केली. जो एक मुस्लीम होता. गुरु तेगबहाद्दूर, फतेहसिंह व जोरावर सिंह हे शिख संप्रदायातील होते. ज्यांची हत्या औरंगजेबाच्या आदेशानं सरहिंदचा गव्हर्नर वजीरखान यानं केली. जो एक मुस्लीम होता. यात महत्वपुर्ण गोष्ट ही की जरी वरील हत्या या मुस्लीम शासकानं केल्या असल्या आणि तो हत्या करणारा एक मुसलमान असला तरी समस्त मुस्लीमांनी हत्या केलेल्या नाहीत. त्या हत्या त्या मुस्लीम शासकांच्या व्यक्तीगत दोषांनी केल्या. धर्मानं नाही. तसं पाहिल्यास त्या हत्या झाल्या. त्याचा दोष फितुरीला देता येईल. आपल्याच धर्मातील व जातीतील माणसांनी फितुरी केली नसती तर आज त्यांच्या हत्या झाल्या नसत्या हे विसरता येत नाही. जसं म्हटलं जातं की महाराज संभाजीला त्याच्या मेव्हण्यानं फितुरी करुन पकडून दिलं. जो एक हिंदूच होता. म्हणूनच राजे संभाजी मुगलांना सापडले व मारले गेले. यातही व्यक्तीगत दोषच कारणीभूत आहे. तसेच फतेहसिंह व जोरावर सिंह यांनाही फितुरीनं मारलं गेलं यातही आतिशयोक्ती नाही. कारण गंगू नावाच्या नोकरानं माता गुजरी व जोरावर सिंह व फतेहसिंह सिंह यांना संरक्षण देतांना गुरु गोविंद सिंहांना वचन दिलं होतं की तो त्यांना कधीच दगा देणार नाही. संरक्षण देईल. परंतु त्यानंच धोका दिला होता त्यांना. जो गंगू एक शिख होता. तसंच गुरु तेगबहाद्दूर यांनी आपलं बलिदान दिलं. त्यालाही कारण होतं आपल्याच धर्मातील माणसांचे प्राण वाचविणे. जे हिंदू काश्मीरी पंडीत होते.
महत्वपुर्ण गोष्ट ही की महाराज संभाजी महाराज वा फतेहसिंह व जोरावर सिंह वा गुरु तेगबहाद्दूर सिंह, यांच्या हत्या झाल्या. त्या मुस्लीम असलेल्या एका नावाच्या मनोवृत्तीने झाल्या, इतर मुसलमान लोकांच्या मनोवृत्तीनं नाही. कारण त्याच्याही फौजेत मुस्लीम होते. तसंच गुरु गोविंद सिंहाच्या खालसा दलातही काही मुसलमान होते. एव्हाना जेव्हा चमकौरचं युद्ध झालं. त्यावेळेस गुरु गोविंद सिंह युद्धातून निघून गेल्यानंतर त्यांना गनीखान व नबीखान यांनी मदत केली. तेही दोघं मुसलमानच होते. त्यामुळं आज मुस्लीम हिंदू, मुस्लीम शिख असा वाद होत आहे. तो होवू नये. त्या वादावर विरजण पडावं. तसा तो आपला इतिहास असला तरी आज तसा इतिहास घडविण्याची इच्छा ठेवू नये. तिन्ही धर्मांनी आज एकमेकांबाबत आकस बाळगू नये. राग वा द्वेष मनात ठेवू नये. आजपर्यंत जे घडलं. घडत आलं, त्याची पुनरावृत्ती आज होवू नये. पुनरावृत्ती करु नये. कारण इतिहासात घडलेली धर्मातीत भांडणं ही केवळ औरंगजेबाच्या मनोवृत्तीनं झाली. इतर मुस्लीम लोकांच्या मनोवृत्तीनं नाही. औरंगजेबाला आलमवीर बनायचं होतं. म्हणूनच त्यानं धर्माला मध्यबिंदू करुन आपलं आलमवीर बनायचं स्वप्न पुर्ण करण्याचा प्रयत्न केला त्यानं. त्यासाठीच फतेहसिंह व जोरावर सिंह व गुरु तेगबहाद्दूर सिंह यांच्या हत्या घडवल्या. तशी संभाजीचीही हत्या घडवली हे तेवढंच खरं आहे. आपण मात्र त्याचाच बाऊ करुन इतर लोकांना दोष देवू नये म्हणजे झालं. कारण त्यात दोष इतरांचा मुळीच नव्हता यात तीळमात्रही शंका नाही. इतिहास हा ध्येयधोरणं ठरविण्यासाठी असतो. शुल्लकचे वाद करण्यासाठी नाही.

************************************************

बंदा सिंह बहादूर. गुरु गोविंद सिंहाचा एक शिष्य. तो तसा सेनानायकच होता. त्यानं आपल्या पंधराव्या वर्षीच आपलं घर सोडलं होतं. त्यात त्यांचा उद्देश होता तपस्वी बनणं. त्यात त्यांनी माधो दास बैरागी नाव धारण केलं होतं.
सन १७०७. याचवर्षी बंदा सिंह बहादूर यानं गुरु गोविंद सिंहांना भेटीचं निमंत्रण दिलं. त्यातच ते भेटीचं निमंत्रण स्विकार केलं होतं गुरु गोविंद सिंहांनी. ते त्यानंतर महाराष्ट्रात आले. ते साल होतं सन १७०८. सन १७०८ मध्ये ते बंदा सिंह बहादूरला भेटले. मग चर्चा झाली व चर्चेतून गुरु गोविंद सिंहानं बंदा सिंह बहादूर यांच्या मनात असलेला भ्रम तोडला. त्यातच त्याला बहादूर नाव दिलं. त्यानंतर बंदा सिंह यांना गुरु गोविंद सिंहानं खालसा राजचा कारभार सोपवला होता.
गुरु गोविंद सिंहानंतर बंदा सिंह बहादूरनं गुरु गोविंद सिंह व गुरु नानक यांच्या नावाचे शिक्के बनवले. त्यानंतर त्यानं जाटांना जमीनीचे मालक बनवले.
बंदा सिंहानं पंधरा वर्षाच्या वयात एका गर्भवती हरीणीला मारलं. परंतु तिला मारल्यानंतर त्याला अतिशय दुःख झालं. त्यातूनच त्यानं त्यापासून बोध घेतला. त्यानंतर त्यानं आपलं घर त्यागलं.
बंदा सिंहने आपलं घरदार त्यागल्यानंतर जानकी दास यांचं शिष्यत्व स्विकारलं. त्यानंतर ते रामदास यांचेही शिष्य बनले. त्यानंतर ते रामदाससोबत पंचवटी इथे राहिले. त्यानंतर तेथेच राहून त्यांनी ओघडनाथ यांच्याकडून योगाच्या बद्दल शिक्षा घेतली. त्यानंतर त्यांनी पंचवटी हे ठिकाण सोडलं व ते नांदेड इथे आले. त्या ठिकाणी येवून त्यांनी एक आश्रम तिथं स्थापन केला होता. तसंच माधोदास नाव धारण केलं.
सन ३ डिसेंबर १७०८ उजळलं. गुरु गोविंद सिंहांनी बंदा सिंह बहादूर यांची किर्ती फार ऐकली होती. तशी त्याला भेटायची गोविंद सिंहाची तीव्र इच्छा होती. त्यांनी तशी भेट घ्यायची इच्छा बंदा सिंह बहादूर यांना कळवली होती. त्यानंतर ते ३ डिसेंबर १७०८ ला त्यांना भेटायला नांदेड इथं आले. त्यानंतर त्यांनी बंदा सिंह बहादूर यांना उपदेश दिला व माधोदासचं रुपांतर बंदा सिंह बहादूर मध्ये केलं. तशीच खालसा दलाची कमान गुरु गोविंद सिंहांनी त्यांना दिली. त्यानंतर आपली मुले सरहिंदच्या वजीरखानामार्फत कशी मारली गेली. तसाच आपल्या शिख परीवारावर मुगलांनी कसा अत्याचार केला हेही गुरु गोविंद सिंहानं त्याला सांगीतलं. आपले वडील तेगबहाद्दूर सिंह व आपली आई माता गुजरीला कोणं मारलं हेही बंदा सिंह बहादूर यानं ऐकलं. त्यानंतर खालसा दलाची कमान बंदा सिंह बहादूर याने स्विकारली होती. त्यानंतर गुरु गोविंद सिंह मरण पावले होते.
गुरु गोविंद सिंह मरण पावताच बंदा सिंह बहादूर यांना गोविंद सिंहाचे ते बालवीर आठवायला लागले. तसेच आठवायला लागले गुरु तेगबहाद्दूर सिंह व माता गुजरी. त्यांच्या हत्या व मृत्यू. त्यात दोष होता मुगलांचाच. त्यातच आठवत होती त्याला गुरु गोविंद सिंहाची हत्या. ती मुगलांनीच नांदेड इथे केली असल्याचे स्पष्ट माहीत होते. तसा तो त्याचा प्रत्यक्षच साक्षीदार होता. त्यांनी खालसा दलाची कमान स्विकारताच ते त्वेषानं पुढं आले होते. त्यानंतर सन १७१० मध्ये त्यांनी सरहिंदच्या वजीरखानाला गाठलं व त्याला बंदी बनवून त्याची हत्या केली. त्याच्या प्रेताचीही विटंबना केली. त्यातच त्यांनी फतेहसिंह व जोरावर सिंह यांच्या हत्येचा बदला घेतला. जे बालवीर होते. तसाच बदला घेतला गुरु तेगबहाद्दूर सिंह व माता गुजरीच्या मृत्यूचा. परंतु दुर्दैव हे की ज्या बंदा सिंह बहादूर यांनी बालवीरांच्या हत्येचा बदला घेतला. त्याच बंदा सिंह बहादूर यांना सन १७१५ ला मुगलांनी बंदी बनवलं. त्याला लोखंडाच्या पिंजऱ्यात कैद केलं व त्याच्या अजय नावाच्या मुलाला त्याच्याच समोर ठार केलं. त्याचे तुकडे तुकडे केले व त्या मुलाचे काळीज त्याच्या जबरदस्तीनं तोंडात टाकलं व त्यानंतर त्याच मुगलांनी बंदा सिंहलाही मारुनही टाकलं.
मुगलांनी शिखांचे एकापाठोपाठ एकेक मोहरे संपवले होते. त्या गोष्टीनं शिख संपणार व त्यांची ताकद संपणार असं मुगलांना वाटत होतं. परंतु तसं काहीच घडलं नाही. शिखांचे जरी एकापाठोपाठ एक मोहरे संपले असतील, तरी शिखांचे मोहरे संपले नाहीत. कारण त्या मोहऱ्यांना जन्म देणारा गुरुग्रंथसाहेब केव्हाच लिहून पुर्ण झाला होता आणि जो शिखांचा गुरु बनला होता. त्याच गुरुच्या आधारानं पुढं शिखात रणजीत सिंह नामक असा व्यक्ती निर्माण झाला की ज्यानं शिखांना एक सन्मान मिळवून दिला. आजही शिखात सन्मान दिसतो. आनंद प्रत्येक ओठावर दिसतो आणि दिसतो तेवढाच स्वाभीमानीपणा. ते शौर्यही दिसतं. ती मंडळी आजही मृत्यूला घाबरत नाहीत. त्याचं कारण आहे त्या गुरु गोविंद सिंहांच्या सहा वर्षाच्या फतेहसिंह व आठ वर्षाच्या जोरावर सिंहानं केलेलं बलिदान. शिख मंडळी आज विचार करतात की ती लहानशी बालकं धर्मासाठी जराही न कचरता बालवीर ठरलीत. आपण तर मोठे आहोत. तसाच विचार करुन ते आपलं निर्भीडपणे शौर्य दाखवतात. आजही ते देशाच्या सैन्यात शौर्यानं लढतात. त्यांचं देशाच्या सैन्यातही आज उच्च पदावर नाव आहे. आज त्यांच्याच नावाची सैन्यातही फौज आहे. जी शिख बटालियन म्हणून ओळखली जाते. हे घडलं त्या बालवीरांमुळंच. ज्या बालवीरांनी २६ डिसेंबर १७०४ ला आपल्या धर्माच्या स्वाभीमानासाठी बलिदान दिलं होतं. परंतु धर्म बदलवला नव्हता.
ती विरगती. तसं पाहता त्या विरगतीनं औरंगजेब जिंकूनही हारला होता. त्याला त्या बालकांच्या विरगतीनं पश्चाताप करायला भाग पाडलं होतं नव्हे तर त्याचे आलमवीर बनण्याचे स्वप्न धुळीस मिळवले होते.
आज देशात असे बरेच फतेहसिंह व जोरावर सिंह आहेत की जे देशाच्या स्वाभीमानासाठी आपल्या प्राणांचं बलिदान देतात. जराही कचरत नाहीत. मग त्यांचं वय कितीही लहान का असेना. ते आहेत. म्हणूनच देश स्वतंत्र्य आहे. सुजलाम सुफलाम आहे आणि तेवढाच मलयज शितलामही. हे सगळं घडतं आहे बालवीरांमुळं. त्या फतेहसिंह व जोरावर सिंहमुळं. यात शंका नाही. त्यांच्यासारखे वीर देशात देश गुलाम असतांना निर्माण झाले होते व स्वातंत्र्याची लढाई लढत होते. कारण प्रत्येक आई आपल्या बाळास बालविरांचीच कहाणी सांगत होती. त्यांचा इतिहास शौर्य सांगत होती व आपल्याही मुलांना बालवीर बनवू पाहात होती.

********************************************************************************समाप्त **********

इतर रसदार पर्याय