Nudge books and stories free download online pdf in Marathi

श्रीगणेशा नवा अध्यायाचा

खूप वर्षांपासून मनातील सुप्त इछेला आज मातृभारतीच्या माध्यमातून वाव मिळतोय त्याबद्दल पाहिले त्यांचे आभार मानतो. साहित्याची आवड तशी पहिल्या इयत्तेपासूनच होती. कितीतरी पुस्तक त्यावेळी वाचून काढली पण साहित्यिक व्हावं किंवा आयुष्य यासाठी द्यावं हा विचार कधी आला नाही किंबहुना तसे मार्गदर्शन पण मिळाले नाही.पण आयुष्यच्या ह्या वळणावर आहे की अस वाटत आत्ता तरी जे मनात आहे ते लेखणीच्या माध्यमातून कुठेतरी उतरावं.सध्याच्या व्यस्त जीवनात प्रत्येक जण म्हणताना दिसत असतो की मला वेळ नाही ,हे करायचय ते करायचय पण माझ्या मते हे पूर्णपणे चुकीचे आहे. वेळ नाही हेच चुकीचं आहे मुळात वेळ हा काढावा लागतो तो कधी मिळत नसतो.कोणाला किती प्राथमिकता द्यावी यावरच सगळं अवलंबून असत.कुणाला टाळायचं असलं तर काहीही कारण देता येत आणि कुणाला लळा लावायचा असेल तर कारणांची गरजच नसते.सगळ्यांची मानसिकता खूपच बदलत चाललीय.हे कलयुग अजून मानवजातीला कोणत्या थराला घेऊन जातंय हा तर संशोधनाचा विषय झाला.परत येऊ आपल्या वेळेच्या मुद्द्यावर, प्रत्येकाने आपल्या आयुष्यात वेळेला सर्वोच्च स्थानी ठेवून आयुष्यचे गणित जुळवावे त्याशिवाय बरोबर उत्तर येणारच नाही.आणि ते उत्तर चुकलं आणि त्या चुकीच्या उत्तराला तुम्ही जर बरोबर मानत गेलात तर समजा येणार प्रत्येक गणित चुकत जाईल आणि आयुष्यात नको असणाऱ्या नैराश्य,द्वेष,मत्सर,विनाकारण भीती यासारख्या भावना वाढत जातील आणि सगळं अंधःकारमय होऊन जाईल.सांगण्याचा मत्यर्थ हाच की जे कराल त्यामागे नियोजन असणं महत्वाचं आहे मग भलेही ते नियोजन चुकेल पण ह्याचा तर आनंद असेल की तुम्ही आयुष्यत एक पाऊल पुढे जाऊन नियोजन करायला शिकताय. अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घायला शिका मग खूप साऱ्या गोष्टी ज्या वाटत होत्या की आपण कधी करूच शकणार नाही त्याही तुम्ही लीलया करू शकाल. ह्याच गोष्टीचा जर वैज्ञानिक गोष्टीने दाखला द्यायचा तर एका संशोधनानुसार सांगितले आहे की जेव्हा तुम्ही स्वतः साठी छोटे छोटे कामे निश्चित कराल म्हणजे स्वतःला एक टार्गेट द्याल आणि तेव्हा ते पूर्ण होईल तेव्हा आपल्या मेंदू मध्ये एक रसायन प्रसारित होईल ज्याचं नाव आहे डोपामीन.डोपामीन तुम्हाला सतत आनंदी ठेवण्यामध्ये खूप महत्वची भूमिका अदा करतो. म्हणून स्वतःला एक टार्गेट देत जा . जस की मी आज 10 मिनिटे व्यायाम करेन, 5 मिनिटे पुस्तक वाचेन इत्यादी. यानंतर तुम्ही एक वेगळीच ऊर्जा अनुभवाल .खुपश्या गोष्टीपन तुमच्या बाजूने व्ह्यायला लागतील. मी ही गोष्ट तुम्हाला एवढ्या आत्मविश्वासाने सांगू शकतो कारण मी खूप छान अनुभव ह्या गोष्टीचा घेतलंय, घेतोय आणि घेतही राहीन. आणि देव करो तुम्हाला ही ह्याचा अनुभव येवो.आयुष्यात वेळेचं नियोजन करता पाहिजे. जो व्यक्ती वेळेचं नियोजन यशस्वीरीत्या करू शकतो तो नक्कीच जीवनात यशाची गोडी चाखू शकतो .तुम्ही जर पालक म्हणून हा लेख वाचत असाल तर तुमच्या पाल्याला लहानपणापासूनच वेळेचे नियोजन करायला शिकवा.म्हणजे त्याला तेव्हापासून ही सवय लागली की नंतर तुम्हाला जास्त त्रास होणार नाही.तुम्ही त्याला काही सल्ला द्यायच्या आधीच त्याच्याकडे त्याच्या वेळेचं नियोजन असेल.तुम्ही जेव्हा वेळेला महत्व द्यायला शिकाल तेव्हा वेळपन तुम्हाला महत्व देईल.सगळ्या गोष्टी तुमच्या कर्मावर चालतात.ज्या गोष्टी तुम्ही द्याल त्या नक्कीच कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तुमच्याजवळ येतील.संयम ठेवायला शिका .प्रत्येक गोष्टीचा हव्यास नका करू.ज्या गोष्टीचे तुम्ही लायक आहात त्या गोष्टी नक्कीच तुम्हाला भेटणार कारण म्हणतात ना देवाच्या घरात देर आहे पण अंधार नाही. गडबड करू नका नाहीतर ज्या गोष्टी स्वतःजवळ आहेत त्यापन गमावून बसाल.आपल्या नशिबात पुढे काय लिहलय कोणीच सांगू शकत नाही फक्त आपल्या कर्मावर आणि जो वर बसलाय त्यावर विश्वास ठेवा. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण  होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो अन तुमचा निरोप घेतो

 

इतर रसदार पर्याय