Dharmantaran - 2 books and stories free download online pdf in Marathi

धर्मांतरण - भाग 2

धर्मांतरण भाग दोन

कमलची परिस्थिती नाजूक होती. त्यानं त्यासाठी तृतीयपंथी बनून भीक मागायचं ठरवलं. ती भीक नव्हती तर तो रोजगारच होता त्याचेसाठी. ते सर्व पोटासाठी होतं. परंतु त्याहून महत्वाचं होतं त्याला कळलेलं तत्वज्ञान. त्याला वाटत होतं की आर्य भारतातीलच. त्यामुळंच तो त्या तत्वज्ञानाबाबत सांगत होता,
"हिंदूस्थानातील सर्व लोकं हिंदूच होते. मुळचा वैदिक धर्म हिंदू धर्म असून ह्या हिंदूपासून अनेक धर्म उदयास आले होते. मुळच्या हिंदूवर विदेशातील आलेल्या सर्वच लोकांनी अति प्रमाणात अत्याचार केले. धर्मपरीवर्तनाचा ध्यास मनात ठेवून. असंख्य हिंदूंची कत्तल केली, त्यांनी धर्म बदलवायला नकार दिला म्हणून. त्यातच त्यांची संस्कृतीही मिटवण्यात आली. त्यातच त्यांचा इतिहासही.
संस्कृती माध्यम म्हणून देवळाला सर्वप्रथम प्राधान्य देण्यात आलं. देवळाजवळ लोकं जमायचे व सल्लामसलत करायचे. त्यातच एखाद्या कठीण प्रसंगावर तोडगा काढायचा असेल तर देऊळ हेच माध्यम होतं. तसा सल्लामसलत करण्याची परवानगी गावातील सर्वांनाच होती. सर्व लोकं मंदीराजवळ गोळा होत. तिथं सल्लामसलत करतांना लिहिलेल्या पुस्तकाचाही आधार घेतला जात असे. हेच पाहिलं विदेशी लोकांनी व त्या पुस्तकांचा आधारही घेतांना पाहिलं. तद्नंतर त्यांनी हिंदूस्थानात प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम देवळं तोडली. त्यानंतर त्या परीसरातील झाडं तोडली. तशीच पुस्तकंही जाळली व काळजी घेतली की कोणीही तिथं गोळा होवू नये. त्यानंतर त्यांनी जोरजबरदस्तीनं आपल्या धर्माचा प्रसार करता यावा म्हणून हिंदूंच्या कत्तली केल्या. त्यात कोणी घाबरल्यानं त्यांनी विदेशी धर्म स्विकारला. आज जे कोणी देशात दिसतात. ते मुळचे हिंदूच आहेत. कारण आज असलेले देशातील धर्म पुर्वीच्या काळात नव्हते. त्यामुळंच आज तमाम देशातील हिंदूप्रणीत लोकं दिसतात. त्यांचं कौतूकच करायला हवं की बिचाऱ्यांनी मरण पत्करलं. अत्याचार सहन केले. परंतु त्यांनी आपला धर्म बदलवला नव्हता. आज सर्वजण हिंदू आहेत. ती आपल्या पूर्वजांचीच कृपा. आपणही आपल्या पुर्वजांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपला धर्म बदलवू नये. आपल्या धर्माबाबत अभिमान बाळगावा व आपला धर्म वाढवावा. तसंच इतरही धर्म आपल्याच धर्मातून झालेली उपज असून त्यांचाही अभिमान बाळगावा. त्यांनाही त्रास देवू नये. कारण ते जरी आज वेगवेगळ्या धर्माचे असले तरी मुळचे हिंदूच आहेत.
आर्य हे पुस्तकात लिहिल्यानुसार विदेशातील सांगीतले आहेत. ते सर्वात आधी ज्या कोणी प्रसवलं. त्याचा त्यात स्वार्थ होता. तो स्वार्थ म्हणजे हिंदू मुस्लीमांचं भांडण लावणं. त्यानुसार आर्य कुठून आले ते लिहिण्यात आलं.
कालमीतीचा इतिहास पाहतांना असं आढळतं की ज्या कोणी लेखकांनी आर्य विदेशातून आले असं लिहिलं. एकतर त्यानं तसं लिहावं असा दबाव टाकण्यात आला असेल त्यांचेवर. शिवाय राजाधिकारी प्रशासक असल्यानं राजाच्या अनुरुप लेखन झालं असावं.
आर्याच्या मुळ अस्तिवाच्या इतिहासाचीही काही साधनं असावी. ज्याला आज लिखीत साधनं म्हणता येईल. जी जाळण्यात आली व नष्ट करण्यात आली. त्यानंतर खोटा इतिहास प्रसवण्यात आला व जाणूनबुजून सांगण्यात आलं असावं की आर्य विदेशी असावेत. महत्वपुर्ण गोष्ट ही की येथील राज्यकर्त्याला वाटलं की मुस्लीम जर विदेशी आहेत तर मग आर्य इथले कसे? ते ही विदेशीच अशा स्वरुपाचा इतिहास इतिहासकारांना तत्कालीन समुदायानं मांडायला लावला. तो प्रसवला गेला व मुळ असलेल्या हिंदू अर्थात वैदिक संस्कृतीला नष्ट करण्याचे पवित्रे घेण्यात आले. त्यातच त्यांनी येथील हिंदू संस्कृती पुसतांना ज्यांनी इतर धर्म स्विकारले नसेल. त्यांचे अनन्वीत हाल केले. ज्यातून पोट भरण्यासाठी लाकडंही मिळू दिली नाही. त्यामुळंच लोकांना पोट भरण्यासाठी आपल्याच घरच्या पोथ्यांचा वापर करावा लागला. काहींनी त्यांना मुस्लीम शासकांनी मारु नये म्हणून स्वतः जाळली. परंतु जाळण्यापुर्वी मुखोदगत केली. याबाबतीत संदर्भ देतांना दहाव्या शतकाचा संदर्भ देता येईल. महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंटप स्थापन केला होता. तिथं चर्चा होत असे. त्या चर्चेतील गोष्टी लिखीत होत्या. परंतु जेव्हा त्या मंटपावर आक्रमण झालं, तेव्हा ते अनुभव मंटपच जाळण्यात आलं. त्यामधून काही लोकं पळून गेले व त्यांनी तेथील काही ग्रंथ नेले. त्यानंतर ते ग्रंथ लोकांनी मुखोदगत केले व नंतर जाळले. याबाबतीत दुसरी घटना अशी की नालंदा विश्वविद्यापीठ जेव्हा जाळण्यात आलं. त्यावेळेस बख्तियार खिलजी या शासकानं हिंदूंना धमकी दिली होती की कोण्याही हिंदू माणसाच्या घरी मला अशी ग्रंथसंपदा मिळायला नको. मिळाल्यास त्याला मारुन टाकण्यात येईल. त्याही वेळेस लोकं घाबरले व त्यांनी काही ताम्रपटं जमीनीत गाडली. काहींनी ती मुखोदगत करुन स्वतः जाळली. त्यानंतर आर्य भारतातील नाही अशाच स्वरुपाचा इतिहास तत्कालीन इतिहासकारांनी मांडला. कारण त्यांच्यावर आर्य भारतातीलच नाही ते विदेशी आहेत असंच लिहा असा दबाव टाकून लेखन करायला लावलं गेलं असावं ही शक्यता नाकारता येत नाही.
मुघलकालीन इतिहास पाहता तो फार रक्तरंजीत अशा स्वरुपाचा आहे. धर्मासाठी आपल्या पुर्वजांनी एवढं बलिदान दिलं की त्या बलिदानी संख्येची गणतीच करताच येत नाही. लाखो लोकं मरण पावली या बलिदानाच्या हत्याकांडात. गावंची गावं नष्ट झालीत धर्मपरीवर्तनात. मुगल शासकांनी येथील संस्कृती मिटविण्यात काहीच कसर सोडली नाही. त्यांनी तर देवळं व विहारं नष्ट केलीत आपली संस्कृती वसविण्यासाठी. परंतु त्यांनीही पाहिलं की हिंदू लोकं कट्टर आहेत. एक मारला तरी दुसरा मरायला तयार होतो. असंच जर मारत गेलो तर उद्या याच हिंदुस्थानात आपल्याला राज्यच करता येणार नाही. म्हणून त्यांनी थोडं नमतं पाऊल घेतलं."
कमलचा तो विचार. तो विचार चांगला होता. लोकं प्रतिसादही देत होते. कारण त्यांना तो तृतीयपंथी बनून भिक्षा मागतो हे माहीत नव्हतं. तसाच त्यात असलेला स्वाभिमान माहीत नव्हता. धर्मपरीवर्तनाबाबत विचार मांडतांना तो म्हणत असे,
"धर्मपरीवर्तनाबाबत विचार करतांना गोव्यातील कातरी खांब याची साक्ष नक्कीच देत असतो आजही. त्या खांबाला धर्मवेडे लोकं हिंदूंनी आपला धर्म स्विकारावा म्हणून बांधत असत. त्यानंतर प्रश्न विचारत असत की त्याला तसा धर्म स्विकार आहे काय? नाही म्हटल्यास कोणाचा हात कापत. कोणाचा कान वा कोणाचा एखादा शरीर अवयव. जास्तीत जास्त हातच कापले गेले त्या खांबाला बांधून. म्हणूनच त्याला हातकातरी खांब असं नाव पडलं आहे आणि ते हातं गोव्यातील पोर्तुगीजांनी कापलेले आहेत. त्या हात कापण्याचा प्रयोग तमाम हिंदू जातीवरच केलेला आहे व त्यांनी ख्रिश्चन बनावं म्हणून केलेला आहे. तो हातकातरी खांब त्याची साक्ष देत आहे की ख्रिश्चन धर्मवेड्या लोकांनी हिंदू लोकांना ख्रिश्चन बनविण्यासाठी त्याचा वापर केला होता.
हेच घडलं होतं मुगल शासक जेव्हा भारतात आले होते तेव्हा. त्यांनीही आपला धर्म व आपली संस्कृती या देशात प्रसविण्यासाठी येथील कित्येक गावंची गावं धर्माच्या बळजबरीनं नष्ट केली. तसंच ज्यांनी ज्यांनी धर्म स्विकारले नाहीत. त्यांना त्यांना अक्षरशः त्यांनी कापूनच काढलं. त्याच्या घरच्या स्री पात्रावर बलत्कार केलेत. त्याचे गुप्तांग कापलेत. तसेच इतर अवयवही कापलेत. शिवाय हे कृत्य होत असतांना आपले पुर्वज घाबरले नाहीत. त्यांनी ते सगळे अत्याचार सहन केले. परंतु धर्म बदलवला नाही. प्रसंगी तडपत तडपत प्राण दिला. परंतु झुकले नाहीत. त्यामुळंच आज आपण ज्या हिंदू धर्मात आहो, ती कृपा आपल्या पुर्वजांची की त्यांनी असला अतीव अत्याचार सहन केला. बलिदान दिलं. परंतु आपला धर्म, आपली संस्कृती अबाधीत ठेवली. त्यांनी ठरवलंच असेल त्याकाळात की ही मंडळी मारतील, मारतील तरी किती? कधी ना कधी तसं मारणं थांबवतीलच. ते झुकले नाहीत. म्हणूनच मारले गेलेत. असं इतिहास पुराव्यावरुन दिसतो. विदेशातून आलेल्या लोकांनी जुना हिंदूंचा व बौद्धांचा इतिहासच बदलवून टाकला. नालंदा सारखी कित्येक ग्रंथालये जाळून जुना इतिहास मिटवला व नवीन इतिहास सादर केला. ज्यातून आर्य म्हणजेच आजचे हिंदू विदेशी ठरलेत व जेव्हा येथीलच लोकांच्या हातात लेखनी आली, तेव्हा एक बदल दिसला. त्यांनीही सांगीतलं की आर्य हे विदेशातीलच असावेत. ज्यात डॉ. अविनाश चंद्र दास आणि संपुर्णानंद यांनी आर्य सिंधूच्या प्रदेशातून आले असावेत असं सांगीतलं. अर्थात उत्तर पश्चिम भागातून आले असावेत. असं वर्णन केलं. पंडीत गंगाराम झा ने म्हटलं की आर्य हे ब्रम्हदेशातून आले असावेत. स्वामी दयानंद सरस्वतींनी म्हटलं की आर्य हे तिबेट वरुन आले असावेत. बाळ गंगाधर टिळक यांनी म्हटलं की आर्य उत्तर धृवीय प्रदेशातून आले असावेत. तसाच पश्चिमी विचारवंत मैक्समुलर म्हणतात की आर्य मध्य आशियातून आले असावेत. तसेच डॉ. एल डी कल्ला ने म्हटलं की आर्य काश्मीर व हिमाचल प्रदेशातून आले असावेत. त्यावेळेस त्यांनी तशा स्वरुपाचं मत मांडतांना मुगल शासकांनी नालंदासारखी विश्व विद्यापीठं का जाळली असावी? शिवाय येथील देवळं नष्ट का झाली असावीत? मुर्तीचं विद्रूपीकरण का केलं गेलं असावं? हा इतिहास विचारात घेतला नसावा."
कमलचं सांगणं अगदी बरोबर होतं. त्याच्या सांगण्यावरुन व तसे विचार वदण्यावरुन त्याचं हिंदू धर्मावर असलेलं प्रेम दिसून येत होतं. त्याची हिंदू धर्मावर असलेली आस्थाही दिसून पडत होती. तसे त्याचे विचार महान वाटत होते. तो म्हणायचा,
"कोणताही सत्ताधीश विदेशी बाहेरुन येतो. जसा आक्रमण करतो. तो आक्रमण केल्यानंतर व संबंधीत देशाला जिंकल्यानंतर तेथील संस्कृती आधी मिटवतो आणि ती संस्कृती मिटवीत असतांना सर्वात प्रथम वार करतो तो तेथील प्रार्थनास्थळावर. कारण प्रार्थनास्थळात ती ताकद आहे की ते प्रार्थनास्थळ आधीपासूनच लोकांना प्रेरीत करीत आलंय. त्या प्रार्थनास्थळावर आधी सल्लामसलत केली जात असे. ही महत्वपुर्ण बाब आधी लक्षात घेण्यासारखी आहे. याचाच अर्थ असा की तो त्या देशातील संस्कृती मिटवत असतांना त्या देशातील महत्वाची गोष्ट नष्ट करतो. ती म्हणजे प्रार्थनास्थळ. त्याचबरोबर नष्ट करतो प्रार्थनास्थळासभोवतालची जागा. त्यानंतर धर्मपरीवर्तन केलं जातं जबरदस्तीनं. जर मिटलं तर लोकांच्या ह्रृदयातून आपोआपच कालांतरानं संस्कृती निघून जाईल व तो त्या विदेशी सत्ताधीशांचा धर्म आपोआपच स्विकार करेल. यात शंका नाही. ते केवळ प्रार्थनास्थळच मिटवत नाही तर तो त्या लोकांना असलेलं त्यांच्या संस्कृतीचं ज्ञानही मिटवतो. जर ते लिखीत स्वरुपात असेल तर ते आधी मिटवतो नालंदासारखं. ज्यातून आर्य हिंदुस्थानातील नाही तर विदेशातून आलेले आहेत हेच साकार करता येतं आणि त्याला पाठबळ देणारी मंडळीही तशाच इतिहास लिहून जातात. तशीच विस्मृती माणसात असल्यानं जेव्हा काही मंडळी धर्मपरीवर्तन करतात. तेव्हा मुखोदगत असलेल्या गोष्टीही विसरतात. तेच घडलं विदेशी संस्कृती स्विकारतांना. आधी देवळं नष्ट झाली व मग देवळाशेजारी असलेला संस्कृती दर्शविणारा परीसर.
आज त्या त्या लोकांनी आठवायला हवं त्यांना की ज्यांनी आजपर्यंत धर्म टिकवून ठेवला. मरण पत्करलं. परंतु आपला धर्म बदलवला नाही. म्हणूनच त्याच पुर्वजांच्या कृपेनं भारत स्वतंत्र्य होईपर्यंत हिंदू राहता आलं. धर्म बदलविण्याची गरज नव्हती. तसं पाहता बरेचसे धर्म हे हिंदूंचेच उपप्रकार असून त्याच धर्मापासून त्यांची उत्पत्ती झालेली आहे. याचाच अर्थ असा की वैदिक धर्म हा इतर धर्माचा जनक आहे. जनक याचा अर्थ पिता. मग तो धर्म पिता जर आहे तर आपल्या पित्याला कोणी शिव्या देत असतील तर लेकरं शिव्या देवू देतील काय? तर त्याचं उत्तर नाही असंच येतं. प्रसंगी काल जरी आपल्याला वैदिक धर्माची संस्कृती पसंत न पडल्यानं दुसरा नवीन धर्म स्थापन झाला असला तरी तो नवीन धर्म जुन्या वैदिक धर्माचं लेकरुच आहे व अशा लेकरानं बापस्थानी असलेल्या वैदिक धर्माचा आदर करायलाच हवा. शिवाय कोणी वैदिक धर्माचा आदर करीत नसेल तर त्यांना धडाही तेवढाच शिकवायला हवा. परंतु आज तसं होत नाही. ज्याप्रमाणे एक मुलगा आपल्या बापाला तो वेगळं निघाल्यावरही शिव्या हासडतो. तेच घडत आहे आजही. आज त्याच वैदिक धर्मातून निघालेले इतर सर्व धर्म वैदिक धर्मालाच नावबोटं ठेवत आहेत. त्यातही काही भ्याड ठरले आहेत की ज्यांनी धर्म बदलवला.
आजही धर्माचं परीवर्तन होत आहे. ते धर्माचं परीवर्तन दोन प्रकारे होत आहे. पहिला प्रकार म्हणजे काही प्रलोभणे देवून. तर दुसरा प्रकार अंधश्रद्धा पसरवून. मध्यंतरीच्या काळात लोकांनी भीतीनं धर्म स्विकार केला. आज भीतीला कोणीच घाबरत नाहीत. म्हणूनच आज धर्मपरीवर्तनाबाबत नवीन प्रयोग करण्यात येतो, तो म्हणजे अंधश्रद्धा व सांगीतलं जातं की आमच्या धर्मात या. फुकटात औषधी मिळते. अंगारा लावा, रोग दूर पळतो. मात्र रोग देवाच्या अंगाऱ्यानं दूर पळत नाही तर तो वैज्ञानिक कारणानं दूर पळतो. कारण राखेत पोटॅशियम आहे व पोटॅशियम रोगाच्या जंतूंना मारण्याचं कार्य करतं हे विज्ञान सांगतं.
महत्वाचं सांगायचं झाल्यास आज जेही कोणी इतर धर्माचे आहेत. ते सर्व मुळचे हिंदूच आहेत. कारण पुरातन काळात या देशात कोणताच इतर धर्माचा व्यक्ती राहात नव्हता आणि कोणीही स्वतःला इतर धर्माचा समजू नये. फक्त त्याचा पुर्वीच्या काळात जबरदस्तीनं धर्म बदलला गेला हे तेवढंच खरं आहे आणि ते मानणंही गरजेचं आहे. त्यामुळं आपल्या माणसानं आपल्याच माणसांवर, आपल्याच माणसांच्या धर्माबाबत ताशेरे ओढू नये. त्यांना वाईट बोलू नये व वाईट बोलून दंगली घडवून आणू नये. त्यामुळं आपलंच नुकसान होतं. आपल्याच देशाचंही नुकसान होतं. जे नुकसान कधीच भरुन निघणारं नसतं. यात शंका नाही."
धर्मपरीवर्तनाबाबत कमलला चीड यायची. कारण त्याला त्या धर्मात माणूसपण दिसायचं. गोडवा दिसायचा. परंतु त्याही धर्मात काही वाईट गोष्टी घडत. त्याला कारणीभूत होती मानवी प्रवृत्ती. जी प्रवृत्ती धर्मपरीवर्तन घडवून आणायची. ज्यातून हिंदू धर्म नेस्तनाबूत होईल की काय असं वाटायचं.
कमलनं धर्माचा अभ्यास केला होता. त्याला खुप साऱ्या ज्ञानाची प्राप्ती झाली होती. तसा तो सांगत होता ते ज्ञान. काही लोकं ऐकत होते तर काही लोक ते तत्वज्ञान ऐकत नव्हते. अशातच पोटाचा एक बिकट प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला.
कमलला आठवत होता तो बालपणीचा इतिहास. ते त्याचं साडी घालणं. परंतु ते बालपण होतं. तो आता मोठा झाला होता. आता साडी नेसणं म्हणजे लाजीरवाणी गोष्ट वाटत होती त्याला. परंतु पोटाचा प्रश्न. तो सारखा सतावत होता. ती त्याची बायकापोरं उपाशी राहात होती. त्यामुळंच त्यानं ठरवलं की आपण साडी नेसावी. लोकांना सांगावं की आपण तृतीयपंथी आहोत. त्यानंतर भिक्षा मागावी. आपणही जगावं आणि आपल्या परीवारालाही जगवावं. कमलनं तसा विचार करताच त्यानं साडी परिधान केली व तो रस्त्यावर आला. त्याला अक्षरशः लाज वाटत होती. परंतु त्याचा त्यानं विचार केला नाही. ना ही लाज बाळगली आणि तो नव्या उमेदीनं निघाला भिक्षा मागायला.
कमल रस्त्यावर आला होता. त्यानंतर तो रस्त्याच्या आजूबाजूस टाळी वाजवत दिदी ताई, दादा, असे म्हणत भिक्षा मागत होता.
कमल आज तृतीयपंथीय नसला तरी तो तृतीयपंथीय म्हणून वावरु लागला होता. त्यानं आपलं नाव कमला ठेवलं होतं. लोकं त्याला कमला नावानं ओळखू लागले होते व तो आता सर्वांच्या परिचयाचा होवू लागला होता. त्याची वागणूक चांगली होती.
काही दिवस असेच गेले. त्याचं बोलणं ऐकून लोकं त्याला मान देत असत व आवर्जून त्याला पैसेही देत असत. कोणी कोणी त्याला आवर्जून बोलावून चायही पाजत असत. जसा तो आपल्या परीवारातील एक सदस्य बनला होता.
आज परीवाराचं पोट भरलं जात होतं. ट्रकचालकाच्या धंद्यापेक्षा हा धंदा बरा चालला होता. तसं पाहता या धंद्यावर जे त्याचं पोट अवलंबून होतं. ते भरलं जात होतं. तसंच त्याच्या बायकापोरांचंही पोट भरत होतं. तो धंदा चांगलाच चालला होता. तोच त्या धंद्यावर कुणाची तरी दृष्ट लागली.
ती वस्ती. त्या वस्तीत तो महिन्यातून एकदाच यायचा. तसा तो एका वस्तीत महिन्यातून एकदाच यायचा. त्याचं कारण होतं त्याचं घाबरणं. तसा तो टाळीही वाजवायचा नाही. पैसे मागताना जास्त दबाव टाकायचा नाही. त्यामुळंच तो एक सज्जन तृतीयपंथी वाटायचा. ज्या वस्तीत तो महिन्यातून एकदा यायचा. त्याच वस्तीत तृतीयपंथीयांचे समूह देखील यायचे. ते लोकांना परेशान करायचे. ते लोकांकडून जबरन पैसे वसूल करायचे. टाळी वाजवायचे.
लोकांनी तृतीयपंथी समूह अनुभवला होता. त्यातच अनुभवलं होतं त्यालाही. तो सतवत नसल्यानं लोकांना तो आवडायचा. परंतु तो सतवणारच कसा? कारण तो तृतीयपंथी नव्हताच तर तृतीयपंथीय असल्याचा बनाव करीत पैसे मागत होता. लोकांना सतवत होता. अशातच काळ ते सगळं पाहात होता
कमल तृतीयपंथी नव्हता. परंतु भूक ही महत्वाची गोष्ट होती त्याचेसाठी. त्याला फक्त ट्रक चालविण्याचंच कौशल्य होतं. बाकीच्या गोष्टी त्याला येत नव्हत्या. त्यामुळंच की काय, त्यानं तृतीयपंथी बनून भीक मागणं पसंत केलं. भीक मागण्याला त्यानं जगण्याचं साधन बनवलं. जगण्याचं साधन त्याला प्राप्त झालं. त्याच काळात तो धर्माचं त्याला असलेलं ज्ञान लोकांना सांगत असे आणि लोकंही त्यानं सांगितलेल्या ज्ञानाच्या गोष्टी ऐकत असत. तेच चुकीचं पाऊल होतं.
लोकं त्याचं तत्वज्ञान ऐकत होते. कारण त्यांना माहीत नव्हतं की तो एक तृतीयपंथी बनून भिक्षा मागतोय. परंतु नशीब फुटायचं होतं केव्हातरी. कारण तो जी गोष्ट करीत होता. ती गोष्ट लपूनछपून करीत होता.
आज कमल एकीकडं तत्वज्ञानी गोष्टी सांगण्यात पटाईत झाला होता. त्याला मार्गदर्शक म्हणून लोकं बोलवू लागले होते. कारण तो सांगत असलेल्या गोष्टी पटण्यासारख्या होत्या. परंतु दुसरीकडे तो पोटाचा प्रश्न सोडवितांना तृतीयपंथी बनून वावरत होता. शिवाय त्यानं त्या गोष्टी सांगत असतांना आपला व्यवसाय सोडला नाही. शेवटी तो पोटाचा प्रश्न होता. त्यातच तो जसजसा प्रसिद्ध होत गेला. तसतसे त्याचे शत्रू त्याच्या मागावर राहू लागले होते. त्याचा पिच्छाही करु लागले होते की तो काय करतोय? कुठं जातोय? ते संधी शोधू लागले होते.

************************************************

जातीप्रथा........ पुर्वीच्या काळातही जातीप्रथा अस्तित्वात होती. ती एवढी होती की लोकं आंतरजातीय विवाह झाल्यास त्या विवाहीत जोडप्यांना आयुष्यभर स्विकारत नव्हते पुर्वीचे लोकं. आजही आयुष्यभर स्विकारत नाहीत असा आंतरजातीय विवाह केल्यास. दुसरी महत्वाची बाजू म्हणजे एखाद्या शुद्र व्यक्तीनं कितीही अगाढ ज्ञान मिळवलं असेल तरी त्याचं ज्ञान स्विकारत नव्हते लोकं. आजही स्विकारत नाहीत. खुद्द डॉक्टर बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाबाबत देशात हेच घडत आहे. जे तत्वज्ञान जगानं स्विकारलं आहे. तेच तत्वज्ञान देशातील काही लोकांना मान्य नाही. मान्य नसल्याचंही कधी कधी दिसतं. जेव्हा संविधानाची चिरफाड केली जाते वा बाबासाहेबांच्या पाषाणी मुर्तीची विटंबना केली जाते. ते वरील गोष्ट प्रकर्षानं जाणवते.
कमलला असलेलं ज्ञान. त्याला वाटायचं की लोकांनी आंतरजातीय विवाह करावे आणि ते आंतरजातीय विवाह लोकांनी स्विकार करावे. त्याचा बाऊ करु नये.
कमल आज एक मोठा विचारवंत बनला होता. त्याला जसा राम आवडत होता. जसा हिंदू धर्म आवडत होता. तसंच आवडत होतं त्याला आंतरजातीय विवाह न करणं. जात आवडायची त्याला अन् जातीशीच होणारा विवाहही आवडायचा. आंतरजातीय विवाहाला तो संस्कृतीचा विनाश समजायचा. आंतरजातीय विवाहाबाबत तो म्हणायचा,
"आज आंतरजातीय विवाह होतात. परंतु त्या जोडप्यांना समाज स्विकारतांना दिसत नाही. पुर्वीही स्विकारत नव्हते. शिवाय त्याच भीतीनं लोकं आपलं असं आंतरजातीय प्रेम लपवून ठेवत असत. त्यापासून जन्मास आलेल्या संततीचाही स्विकार करीत नसत लोक. ती संतती नदीला सोडत असत वा त्याला वेगवेगळ्या उपमा देत असत. आज तशा गोष्टी जर बोलल्या गेल्या तर वाद होतात व वाद विकोपाला जातात. परंतु ही वास्तविकता आहे. कर्णाला माता कुंतीनं नदीला सोडणं हे त्याचंच उदाहरण आहे. तशीच ही कृती सुर्याचं व कुंतीचं प्रेम दर्शवते व यातून दिसतं की कौमार्य अवस्थेत माता कुंतीला पुत्र झाल्यानं तो आपल्या पित्याला वा कोणाला दिसू नये म्हणून तिनं ते बाळ नदीत सोडलं. जेणेकरुन जातीत आपला विवाह व्हावा. कारण त्याही काळात आंतरजातीतील विवाहाचा भेदभाव फार मोठा असेल ही शक्यता नाकारता येत नाही.
काही कृती या दिसल्या व लिहिण्यात आल्या. काही काही कृती पुराणातही दिसत नाहीत. त्यांच्या जन्माच्या कहाण्या दिसत नाहीत फक्त उपमा दिसतात. जसा उपज गोवरीतून झाला, मासोळीतून झाला, कानातून झाला, पायातून जन्मला, डोक्यातून जन्मला व हातातून, छातीतून, बाहूतून जन्मला. जन्माचे अनेक दाखले दिले गेले आहेत. ज्यातून संभ्रम निर्माण होतो व रितसर पद्धतीनं ब्राम्हण मस्तकातून व शुद्र पायातून जन्मल्याचे उल्लेख पुराणात आहेत. परंतु याबाबत महत्वाची वस्तूस्थिती अशी असेल की कोणीही कानातून, मासोळीतून वा मस्तक आणि पायातून जन्मला नसेलच तर सर्वांना एका आई व वडीलांनी जन्म दिला असेल. जे माता पिता आंतरजातीय असावेत. परंतु हे समाजाला मान्य नसेल. म्हणूनच त्या लोकांच्या मायबापाचे नाव लपविण्यात आले व दुसरंच जनस्थान सांगीतलं गेलं. कान, नाक, डोळे इत्यादी. ही शक्यताही नाकारता येत नाही.
मायबाप हे आंतरजातीय का असेना. ते शेवटी मायबापच. परंतु तत्कालीन काळात जातीचा भेदभाव एवढा होता की त्या जातीतील लोकांनी जर आंतरजातीय विवाह केला तर ते मान्य नसायचं. जी जात आजपर्यंत चालत आली व आताही अशा आंतरजातीय विवाहाला परवानगी नाही. आजही आंतरजातीय विवाह केलेले लोकांना मान्य नाहीत. पचनी पडत नाहीत ते विवाह.
जात ही जन्मानुसार मिळत असते असं काही लोकांचं म्हणणं होतं. ज्या माणसाचा जन्म ज्या जातीच्या माणसांच्या घरी झाला, त्याची जात ही त्या जन्म घेणाऱ्या जिवाला मिळत असते. परंतु जात जन्मानुसार मिळत नाही. ती पालनानुसार मिळत असते. त्या व्यक्तीचं पालन कोणं केलं? यानुसार जात ठरत असते. हे पुराणानंही दाखवलं. उदाहरण द्यायचं झाल्यास कर्णाचं देता येईल.
कर्णाचा जन्म हा उच्चकुळात झाला. परंतु माता कुंतीनं त्याला नदीत सोडलं. त्यावेळेस फक्त त्याला कवचकुंडल होती. हीच त्याची निशाणी होती. त्यानंतर तो अधिरथ नावाच्या नावाड्याला मिळाला. जो एक भोई समाजाचा होता. पुढे कर्ण त्याच भोई माणसांच्या घरी लहानाचा मोठा झाला व त्या भोई व्यक्तींची जात त्याला मिळाली. त्यानंतर जेव्हा माहीत झालं की तो उच्चवर्णीय आहे. तरीही एक दुर्योधन सोडला तर त्याला शेवटपर्यंत कोणीही स्विकारलेलं नाही. ही वास्तविकता आहे. आजही तेच घडत असतं.
जातीची पकड समाजात पुर्ण स्वरुपात आहे. म्हणतात की जात जन्मानं मिळते. आता एखाद्या ब्राम्हण कन्येनं एखाद्या ब्राम्हण मुलांशी प्रेम केलं. जी मुलगी श्रीमंत आहे व मुलगा गरीब आहे. त्यानंतर काळानुसार तिला वाटलं की आपले बाबा अशा प्रेमाचा स्विकार करणार नाहीत. तरीही प्रेमाखातर तिनं त्या पुरुषांशी संगनमत करुन मुलाला जन्मास घातलं आणि तोच मुलगा आपल्या मात्या पित्याच्या आंतरीक भीतीनं मंदीराच्या दारासमोर ठेवला आणि तो ज्या कुणाला सापडला आणि त्यानं मोठा केला तर त्या मुलाची जात बदलतेच. ब्राम्हण राहात नाही. यावरुन तो मुलगा इतर जातीचा कसा होवू शकतो? यात संभ्रम आणि तेवढीच शंका वाटते. कारण जन्म जर जातीनुसार पकडला तर.....त्या मुलाला अस्पृश्यानं नेलं तर त्या मुलाची जात अस्पृश्य ठरेलच. यात शंका नाही. त्यावेळेस जन्मानुसार मिळणारी जात कुठं जाते? जसं कर्णाचं झालं. यात दोष कोणाचा? समाजाचा की त्या लोकांचा. ज्यांनी जन्म देताच आपल्या बाळाला समाज स्विकारणार नाही म्हणून नदीत टाकलं. म्हणतात की कर्णाचं प्रेम होतं द्रोपदीवर. परंतु विवाह करतांना तिनं त्याला सुतपुत्र ठरवलं व विवाह करायला नकार दिला. यात स्विकार करणाऱ्या गोष्टीला मर्यादा पडलेली दिसते.
आज जातीजातीवरुन असेच भांडण आहे. मी उच्च जातीचा. तो खालच्या जातीचा. परंतु बाळाची खरी जात दिसून तरी पडते का? एखाद्यानं शेल्टर होममधून एखादा मुलगा दत्तक घेतल्यास त्या मुलाची जात तरी आपल्याला माहीत होईल काय? तर त्याचं उत्तर नाही असंच येवू शकते. तो मुलगा कुलीन असू शकतो वा तो मुलगा उच्चवर्णीय देखील असू शकतो. याचाच अर्थ असा की जन्मानुसार जात ठरत नाही. दुसरी गोष्ट अशी की सरचारी रुग्णालयात बाळाला जन्म देतेवेळी मुलं बदलवली जातात. जसा काळ्या रंगाचं बाळ नको आपल्याला म्हणून पुरुषवर्ग सुईनीला जास्तीचे पैसे देवून बाळ परस्पर बदलवला तर त्या बाळाची जात बदलणार. यावरुन त्या बाळाची जात ना त्या बाळाला माहीत होवू शकत ना त्याच्या आईला. सुईनीला माहीत असते फक्त बाळाचा डिस्चार्ज होईपर्यंत. त्यानंतर ती ना त्या बाळाला ओळखत ना त्या बाळाच्या मातापित्याला. अशा प्रकारावरुन जात ओळखता येत नाही. आपल्याला वाटतं की मुलगा आपलाच आहे. परंतु ज्यावेळेस बाळाचा जन्म होतो आणि ते बच्चू धुवायला जातात. तिथेच अदलाबदल होत असते. ते बच्चू धुवायला जेव्हा नेलं जातं. तेव्हा कोणीही पाहात नाहीत. कधीकधी तर जन्माच्या वेळेस मुलगा सांगीतला जातो मातेला आणि धुवून आल्यावर मुलगी दिसते. यावरुन बऱ्याच ठिकाणी वादही झालेले आहेत. त्यानंतर चूप बसलेले आहेत. यावरुन सिद्ध होतं की समाजातील बरेच जण आजच्या काळात खऱ्या निष्ठावंत जातीचे नाहीत. त्यांची जात भेसळ आहे. अशा वेळेस तो अमूक जातीचा, मी अमूक जातीचा अशा प्रकारचा वाद व भेदभाव, त्यातच जातीपातीची भांडणं कशासाठी? महत्वपुर्ण गोष्ट ही की आपली जात जर खरी नाही तर आपला पाळावयाचा व समजावयाचा जातीचा अहंपणा कशासाठी? आपण निष्णावंत जातीचे आहोत हे तरी आपल्या मायबापांना माहीत आहे काय? यावरुन मी अमूक धर्माचा, अमूक धर्म असा, अमूक धर्म तसा? असं समजण्याची गरज नाही वा कोणत्याही जाती वा धर्माला आपण शिव्या देण्याची गरज नाही. खुद्द आपल्या मायबापांनाही माहीत नसतं की आपल्याला जन्म त्यांनीच दिला की इतर व्यक्तीचे आपण अपत्य आहोत. जे अपत्य जन्माच्या वेळेस बदललं जातं. फक्त सुईनीच्या थोड्याशा स्वार्थासाठी. असं बरंच ठिकाणी घडलं आहे. शिवाय हेही घडलं आहे की मला मुलगाच हवा. मुलगी नाही. त्यातूनही सुईनंही बऱ्याच जणांची मुलं बदलविलेली आहेत. शिवाय आजच्या काळात कधीकधी आपल्याला रक्ताची गरज पडते. जे रक्त आपल्याला रक्तपेढीतून मिळतं. रक्तपेढीत गोळा केलेलं रक्त चढवलं जातं. मग ते रक्त जेव्हा आपल्याला दिलं जातं. त्या रक्तावर एखाद्याची जात वा धर्म लिहिलेला नसतो. ते मग अस्पृश्यांचं रक्त असलं तरी आपण घेतो आणि एखाद्या मुस्लीमांचं रक्त असलं तरी आपण घेतो. ते रक्त आपल्याला चालतं व समाजातील प्रत्येक स्री पुरुषांच्या धमणीतून ते रक्त ओसंडून वाहात असतं. यावरुन ते जर रक्त मुस्लीमांचं असेल तर त्या व्यक्तीची जात व धर्म मुस्लीम होईल. जरी तो हिंदू असला तरी. तसाच तो व्यक्ती उच्चवर्णीय असला आणि त्याला जर रक्त एखाद्या अस्पृश्यांचं चढवलं तर तो उच्चवर्णीय कसा राहू शकतो? तो व्यक्ती अस्पृश्यच होईल. परंतु ह्या गोष्टी येथील समाजाला मान्य नाहीत. शिवाय अशा संदर्भीय प्रकरणात निश्चीतच त्याच्या शरीराला पुरवठा झालेल्या रक्तानुसार त्या व्यक्तीची जात व धर्म बदललेलाच असेल. मग आपण का पाळतो जातीजातीतील भेदभाव अन् का करतो धर्माधर्मातील द्वेष. सर्व मानव एकच आहेत. कोणीही मुस्लीम नाही, ना कोणी बौद्ध ना कोणी हिंदू. असं संतांनीही म्हटलं आहे. अन् जो कोणी तसं पाळत असेल तर त्याला माणूस म्हणून जगण्याची गरज नाही. त्यानं पशू म्हणूनच जगावं. शिवाय पुराण लिहिणाऱ्यांनी जरी कानातून, मस्तकातून, पायातून जनस्थान दाखवलं असेल तरी ते मानू नये. त्यांचेही मायबाप होतेच. हे मानावे. कारण आजच्या काळात कुठलाही जीव हा नरमादी शिवाय जीव जन्माला येत नाही ही वास्तविकता आहे. मग ते पशू का असेना.
धर्म व जात या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. लोकं जात जात व धर्म धर्म करीत भांडणं करतात, भेदभाव करतात. तशी आपली जन्मानुसार जात व धर्म खरा आहे का? हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं, तरीही."
कमलनं जात ही जन्मानुसार ठरत नाही हे सांगीतलं होतं. ते लोकांना पटत होतं. अशातच देशात रामाचं मंदिर बांधलं गेलं होतं. तसं पाहता राम जन्मानुसार देशात वाद होता. परंतु देशानं रामललाच्या अस्तित्वाचा वाद मिटवला व मशिद तोडून त्याजागी राममंदीर उभं केलं. रामललाच्या अस्तित्वाचा उत्सव पार पडला. सर्वांनी आपल्या आपल्या घरी रांगोळ्या काढून तो उत्सव पार पाडला. कारण राम येणार आहे याचा आनंद ओसंडून वाहात होता चेहर्‍यावर. परंतु त्या आनंदाचा काही लोकं विपर्यास करीत होते. जणू अंगात आल्यासारखं प्रदर्शन करीत होते. जे शैतानी व रावणी वृत्तीचं प्रदर्शन वाटत होते. काही लोकांनी ज्या शोभायात्रा काढल्या होत्या. त्यात काही लोकं दारु पिवून नाचत होते. शिवाय रस्ता सुद्धा देत नव्हते रहदारीला. त्याचा त्रासच होत होता लोकांना. त्यातच काही लोकांनी डि जे च्या तालावर मोठा आवाज करुन गाणी लावली होती. काहींनी रामाची गाणी लावली होती तर काहींनी इतर वात्रट गाणी जोरजोरात लावली होती. तेही हिंदूच होते. त्या गाण्याचा बऱ्याच लोकांना त्रास होत होता. जे आबालवृद्ध होते. काही विद्यार्थीनीही होत्या की ज्यांना मोठ्या आवाजात लागलेल्या गाण्याचा त्रास होत होता. त्यांचा अभ्यास होत नव्हता आणि दुसऱ्या दिवशी पेपर होता. तसा कमलच्या मुलीचाही अभ्यास होताच. तिचा पेपरही होता. याबाबत म्हटलं असता संबंधीत व्यक्ती ऐकत नव्हता. त्यावर एका व्यक्तीनं त्याला सल्ला दिला की त्याची तक्रारच टाकावी पोलीसस्टेशनला. म्हणजे आवाज बंद होईल. परंतु तक्रार तरी करणार कशी? उत्सव एक दिवसाचा होता आणि संबंध दैनंदिन पडणार होते त्या व्यक्तींशी. कारण तो व्यक्ती वस्तीतच राहणार होता. परंतु त्या व्यक्तीची वाट कमलनं काही वेळ पाहिली. शेवटी राग आल्यानं व संबंधीत व्यक्तीनं गाणं बंद न केल्यानं त्यानं त्याची तक्रार टाकूनच दिली.
धर्म रसातळाला जाण्याचं हेही एक कारणच. तशी धर्म रसातळाला जाण्याची कारणे बरीच आहेत. जसं बळजबरीनं धर्मपरीवर्तन होणं. औरंगजेब व तत्सम मुघली शासकांनी इतर धर्मीयांचं जबरदस्तीनं धर्मांतरण केलं. काही लोकं त्रासानं धर्मपरीवर्तन करतात. जसं रामाच्या उत्सवात झालेला डि जे चा वा रहदारीचा त्रास. काही लोकं स्वार्थानं धर्मपरीवर्तन करतात. जसे काही लोकं पैसे मिळतात, म्हणून धर्म बदलतात. पैसे मिळवणे हा स्वार्थ असतो मनात. काही लोकं अंधश्रद्धेनं धर्मपरीवर्तन करतात. जसे अमूक धर्मात भूत प्रेत छळत नाहीत. जसा परमात्मा एक हा धर्म. काही लोकं आपली जात सुधरावी म्हणून धर्मपरीवर्तन करतात. जसं डॉक्टर बाबासाहेबांनी धर्मपरीवर्तन केलं.
धार्मीकता.......धार्मीकतेचं प्रदर्शन करावंच. करु नये असं नाही. परंतु त्याचा त्रास पशुपक्षांनाही होतोच. वृद्ध माणसांनाही होतोच. त्यावर त्याचा त्रास कुणाला होवू नये असा विचार करण्याची गरज आहे. जर असं प्रदर्शन झालंच तर लोकांचा धर्मावरचा विश्वासच उडून जातो. ज्यातून धर्म रसातळाला जाण्याची सुरुवात होते. असं प्रदर्शन प्रत्येकच धर्मात होतं. आज प्रत्येकच धर्माचे जेव्हा जेव्हा उत्सव साजरे होतात. तेव्हा तेव्हा अशा प्रकारची मोठ्या आवाजात गाणी लावली जाते. तशीच मिरवणूकही काढली जाते भव्यदिव्य. ज्यातून वाहतूक खोळंबते.
आजच्या लोकांच्या धार्मीक जीवनाचा अभ्यास केल्यास असं प्रदर्शन हमखास जाणवतं की ज्यातून लोकांना त्रासच होत असतो. डी जे सिस्टमचा शोध लागल्यानं अशी जोरजोरात गाणी लावली जातात की ज्यातून अभ्यासात व्यत्यय निर्माण होतो. ध्वनी प्रदूषणातून आबालवृद्धांना त्रास होतो याचा कुणीही विचार करीत नाहीत. शिवाय रस्त्यावरच्या रहदारीचा तर विषयच नाही. कोणी मरो की जावो, त्याचं काही घेणंदेणं नसतं कोणाला. ते आपला आनंद साजरा करीत असतात आणि रस्ता अडवून बसतात. परंतु कोणी अकस्मात आजारी पडला असतांना वा कुणाला अटॅक आलेला असतांना त्याला ताबडतोब रुग्णालयात नेत असतांना त्याला ताबडतोब रुग्णालयाची गरज आहे व त्याला ताबडतोब रुग्णालयात पोहोचायचे आहे व आपण जर असा रस्ता अडवून बसलो तर ते सहज शक्य होईल काय? याचा कोणीच विचारच करीत नाहीत. त्यातून लोकांचा जीव जावू शकतो ही शक्यता नाकारता येत नाही व त्यातूनच लोकांच्या मनात धर्माबाबत कलुषता निर्माण होते व लोकं धर्म बदलतात.
महत्वाचं सांगायचं झाल्यास लोकांनी गाणी लावावी. लोकांनी उत्सव साजरा करावा. कारण प्रत्येकाला अभिमान आहे आपल्या धर्माचा. ते उत्सव साजरा करणारच. परंतु बाजूच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास आहे याचा विचार करावा. जेणेकरुन त्या विद्यार्थ्याला अभ्यास करता येईल यात शंका नाही. त्यासाठी गरज लक्षात घेवून गाण्याचा आवाज थोडा कमी ठेवावा. कारण हा महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ नुसार कलम ३६ अंतर्गत गुन्हा ठरतो. त्यानुसार रस्त्यावर मोठ्या आवाजात गाणी वाजवणे. मिरवणूक काढणे. घरात मोठ्या आवाजात गाणी लावणे. या गोष्टीवर बंदी घालण्यात आली आहे. तसंच अशी मिरवणूक काढायची असेल वा गाणे वाजवायचे असेल तर त्याची आधी परवानगी घ्यावी लागते. त्यातच किती डिसीबल रेंजनं गाणी वाजवायची तेही सांगीतलं जातं.
लोकं असे गाणे वाजविल्यास वा रहदारीवर मिरवणूक काढून व्यत्यय आणल्यास तक्रारही करु शकतात. परंतु लोकं समजदारी घेतात की जे आपले दैनंदिन संबंध पडतात. वस्तीतच राहावं लागतं म्हणून तक्रार करीत नाहीत. याचा अर्थ असा नाही की कोणी तक्रार करणार नाही. ते तक्रार करतीलच. त्यासाठी यापुढील कार्यक्रम साजरे करतांना त्याचा विचार प्रत्येकांनी करावा. प्रत्येक धर्मातील व जातीतील व्यक्तींनी करावा. जेणेकरुन सुव्यवस्था धोक्यात येणार नाही. कुणाला ह्रृदय विकारांचा त्रास होणार नाही. प्रत्येकाला अभ्यास करता येईल. तसाच प्रत्येकजण सुखी राहील यात शंका नाही. शिवाय वरील कृती कोणताही धर्म करीत असेल तर तो धर्म रसातळाला जावू शकतो यात शंका नाही. ती अरेरावीची कृती असते. ज्यातून धर्माबाबत असुया वाटू लागते. कलह निर्माण होवू लागतो आपल्याच धर्मातील व्यक्तींच्या मनात. जो कलह निव्वळ यातना देणारा असतो. त्यामुळंच धर्म जर रसातळाला जावू नये असं जर वाटत असेल तर वेळीच सावधान होवून आपले विचार बदलवलेले बरे. धर्म रसातळाला जावू देवू नये म्हणजे झालं.
कमल तत्वज्ञानी बनला होता. एकदा असाच एक प्रसंग घडला त्याच्या जीवनात. तोच प्रसंग त्याच्या अंगलट आला.
कमलच्या मुलीचा पेपर होता. त्यावेळेस तिचा अभ्यास सुरु होता. अशातच देशात रामजन्माचा उत्सव साजरा होत होता. त्यावेळेस उत्सवाची सगळीकडं धामधूम होती. मंदीरात गाणे लावले होते. तशी शेजाऱ्यांच्या घरीही जोरजोरात गाणी सुरु होती. तो शेजारी काही एक ऐकत नव्हता.
कमल हिंदूधर्मीयच होता. त्याला हिंदू धर्म आवडायचा. एवढा आवडायचा की तो जीव ओतून त्यात काम करायचा. त्यावेळेस त्यानं शेजाऱ्यांना म्हटलं की एकतर त्यांनी गाणे वाजवणं बंद करावं वा कमी आवाजात गाणे वाजवावे. परंतु शेजाऱ्यांनी ना गाणे बंद केले, ना गाण्याचा आवाज बंद केला. शिवाय त्यानं गाण्याचा आवाज आणखी वाढवला. तसं त्यामुळंच पेपरच्या त्याच्या मुलीच्या अभ्यासात व्यत्यय निर्माण झाला. ते पाहून राग येत होता कमलला. तसा तो कमी शिकला असला तरी त्यानं एवढी पुस्तकं वाचली होती की त्याला कायद्याचा अभ्यास होताच. तो तसा विचार करीत होता की त्याला शेजारीच राहावं लागतं. एकमेकांच्या तोंडावर तोंड पडतं. तक्रार करु नये. परंतु मुलीचा अभ्यास. तो झाला नाही तर उद्या आपलीच मुलगी नापास होईल. हा विचार मनात होता व शेवटी त्यानं पोलिसांना फोन केला. पोलीस आले व त्यांनी गाणं मुळातच बंद करायला लावलं.
शेजाऱ्यांनी गाणं बंद केले होते. परंतु तो चिडून होता कमलवर. त्याचा काटा केव्हा केव्हा काढतो याचा विचार करीत होता तो. त्यामुळंच की काय? तो संधीच शोधत होता व तोच जास्त लक्ष ठेवत असे कमलवर.
कमलच्या मनात त्या व्यक्तीशी वाद झाल्यानंतर आता धर्माबाबत असुया निर्माण झाली. वाटत होतं की हा धर्म चांगला नाही. तिटकारा येत होता त्या धर्माचा. परंतु त्याला धर्म बदलवासा वाटत नव्हता. हळूहळू आता त्यानं आपलं तत्वज्ञान सांगणं बंद केलं होतं.
कमलच्या आंतरजातीय विवाहाच्या गोष्टी. त्यातच त्यानं पुराणातील वाचलेल्या व त्याचा स्वतः चिकित्सक बुद्धीने विचार करुन त्या गोष्टी पुराणात घडल्या नाहीत हे लोकांना सांगीतल्यावर पुराणातील लिहिलेल्या काही गोष्टींवर लोकांचा अतूट विश्वास असल्यानं लोकांनी त्याच्या जवळील बऱ्याच गोष्टीवर विश्वास करणं बंद केलं होतं. त्यानंतर स्थितंतर घडत गेलं त्याच्या जीवनात.
आपला धर्म आवडत असतो आपल्याला. कारण आपल्या धर्माबाबत आपल्या मनात आदर आहे. आत्मीयता आहे. याचं कारण म्हणजे गतकाळात धर्मात झालेल्या काही चांगल्या गोष्टी. काही वाईटही गोष्टी घडतात. ज्या गोष्टी धर्म सांगत नाही. ते राजकारण असतं.
प्रत्येक गोष्टीत दोन बाजू असतात. पहिली बाजू चांगली जर असेल तर दुसरी बाजू निश्चीतच वाईट असते. जसं कोणी म्हणतात राम झाला तर कोणी म्हणतात राम झालाच नाही. कोणी रामाला मानतात तर कोणी रावणाला. प्रत्येकांची आवडनिवड वेगवेगळी असते.
राम झाला व राम आदर्श व्यक्तीमत्वाचाच होता असं वाल्मीकी रामायणात लिहिलेलं आहे. वाल्मीकीनं रामाचं गुणगान मुळ रामायणात चांगलंच केलं आहे. मग राम भेसळ होता हे कोणं आपल्या मनात वदवलं तर ते रामाला न मानणाऱ्या मानवी प्रवृत्तीनंच. ज्यांना या देशात राजकारण करायचं होतं. मग असं मत मांडणारी मंडळी ही मुस्लीम होती काय? ती हिंदू होती काय? तर याचं उत्तर नाही असंच आहे. त्यासाठी इतिहासाचा अभ्यास करावा लागेल.
मुळ रामायण हे वाल्मीकींनी लिहिलेलं असून ते कोणालाच माहीत नव्हतं. कारण त्याची भाषा ही संस्कृत होती व संस्कृत भाषा ही सर्वसाधारण माणसाला समजत नव्हती. सन पंधराव्या शतकात जेव्हा तुलशीदासानं रामायणावर आधारीत रामचरीतमानस लिहिलं. तेव्हा त्यानं अनेक गोष्टी लिहिल्या की ज्या मुळ रामायणात नव्हत्या. शिवाय रामचरीतमानस लिहिण्याची भाषा ही अवधी अर्थात सर्वसाधारण लोकांना समजणारी होती. त्यानंतर राम लोकांना कळावा म्हणून त्यावर आधारीत रामलीला गावागावात सुरु झाल्या व राम पुर्वी अस्तित्त्वात होता हे साऱ्यांनाच कळलं. ज्या रामलीलांना मुघलांचा विरोध नव्हता. विरोध जर असता तर ती रामलीलाच गावागावात गाता आली नसती. ते त्याचे प्रयोग करता आले नसते. रामलीलेला मुगल शासकांनी विरोध केला नसेल. कारण या देशात रामाला मानणारे हिंदू लोकं त्यांच्या सैन्यात होते. मग रामाला विरोध कोणी केला?
रामाला खऱ्या अर्थानं विरोध केला तो इंग्रजांनी. त्यांनीच लोकांच्या मनात रामाबाबत कलुषता भरवली. तसा रामायणात वर्णीत असलेला राम हा फक्त नि फक्त ब्राम्हण वर्गापुरताच मर्यादीत होता. कारण संस्कृत ही त्यांनाच येत होती. इतरांना वाचता येत नव्हती ती भाषा आणि वाचायचा अधिकारच नव्हता. ज्यावेळेस रामायण तुलशीदासांनी अवधी भाषेत लिहिलं व त्यानंतर रामलीलेचे जे प्रयोग झाले. त्यानंतर सर्व माणसाला राम कळला व त्यांनी तुलशीदासांनी लिहिलेलं रामायण वाचायला सुरुवात केली. जे इंग्रजांनीही वाचलं.
पुढे इंग्रजांना जेव्हा राम कळला. ते कळेपर्यंत सर्वसाधारण लोकांना राम माहीत झाला होता. तसं पाहता हिंदू मुसलमान दंगे होतंच होते. त्याचं कारण होतं शासन करणं व राजकारण करणं. परंतु त्यात राम माध्यम नव्हतंच. रामावर आधारीत ना भांडणं होती ना काही वादग्रस्त वातावरण. परंतु सन १८५७ च्या उठावापुर्वी म्हणजेच साधारणतः सन १८५० च्या काळात इंग्रजांना या देशातील लोकांवर राज करता यावा म्हणून त्यांनी हिंदू मुसलमानात भडकावूपणा आणला व वदलं की बाबरी ही हिंदूंच्या भुमीवर बांधली आहे. जिथं रामाचा जन्म झाला होता. आतापर्यंत रामाचा जन्म कुठं झाला? हे लोकांना माहीत नव्हतं. इथूनच राम अस्तित्त्वाचं भांडण व राजकारण सुरु झालं. त्यानंतर त्याच गोष्टीवरुन हिंदू मुसलमानांचे जास्त वाद सुरु व्हायला लागले. तरीही त्याला खतपाणी न घालता हिंदू मुसलमानांनी वाद सोडवला व समजपुर्वक ठरवलं की हिंदूंनी मजारच्या बाहेरच्या जागेवर रामाची पुजा करावी व आतमध्ये मजार असल्यानं तिथं नमाज मुसलमानांनी पठन करावे. त्यानंतर ती गोष्ट पुन्हा इंग्रजांच्या लक्षात आली की वाद क्षमला. असा जर वाद क्षमला तर उद्या आपल्याला लंगोटी घेवून या भारतातून निघून जावं लागेल. त्याचाच विचार करुन त्यांनी मजार व रामलला यांच्यात एक भिंत बांधून टाकली. ज्यातून वाद आणखी चिघळत जाईल. असं इंग्रजांना वाटलं. परंतु त्यानंतर रामाच्या वादाचा विषय कायमचा बंद झाला. त्यावरुन वाद कधीच झाला नाही. लोकं रामाचीही पुजा करीत होते व मजारचीही. त्यानंतर तो वाद झाला भारत स्वतंत्र्य झाल्यावर. जेव्हा बाहेरील रामाची मुर्ती मजार परीसरात नेवून ठेवली. त्यानंतर वादानं अशी ठिणगी पेटली व हिंदू मुसलमान या दोघांनाही बंदी घालण्यात आली की त्यांनी रामाची पुजा करु नये व मजारमध्येही कोणी जावू नये. जी बंदी सन १९८८ पर्यंत सुरु होती.
हिंदू मुसलमानांची एकता चिरडत चिरडत इंग्रजांनी देशात राज्य केलं. त्यात त्यांनी दोघांना भडकवत ठेवलं. कधी काडतुसावरुन तर कधी इतर कारणानं. परंतु इंग्रज भारतातून गेल्यावरही तेच भांडण सुरु झालं सन १९८८ पासून. एका मुस्लीम स्रीनं हिंदू कोड बिलाचा आधार घेवून खावटी मागीतली तेव्हा. त्याचवेळेस हिंदूंची सहानुभूती मिळविण्यासाठी एका पक्षानं बाबरी मजीद हिंदू मुसलमानांना पुजेसाठी व नमाज पठन करण्यासाठी खुली केली होती. त्यानंतर झालेल्या निवडणुकीतून तो पक्ष भरघोस मतानं निवडून आला होता. तद्नंतर लोकं तो भाग विसरले. हेच ओळखलं इतर राजकारण्यांनी. कारण हाच कळीचा मुद्दा होता.
धर्माचा वापर प्रत्येकवेळेस राजकारणात करता येत असतो. शिवसेनेनं हिंदू मुद्दा आपल्या प्रत्येक निवडणुकीत ठेवला व ते निवडून येत होते व बाळासाहेब ठाकरे हिंदू ह्रृदयसम्राट बनले. परंतु ते राजकारण बाळासाहेबांनी महाराष्ट्रापुरतं सीमीत ठेवलं. त्यानंतर देशातील एका राजकीय पक्षानं राम हा राष्ट्रीय मुद्दा बनवीत गतकाळात बाबरी मजीद हिंदूंना रामाच्या पुजेसाठी खुली केल्यानं तो पक्ष पुर्ण बहुमतानं आल्यानंतर सन १९९२ ला लोकांची सहानुभूतीच मिळविण्यासाठी बाबरी तोडल्या गेली असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. त्यानंतर राजकारणानुसार बदल घडत गेले. रामाचा मुद्दा व राम ह्रृदयाचा मुद्दा करीत राजकारणी डाव साधत गेले व आज राममंदीर बनलं.
राममंदीर अयोध्येत बनलं. अतिशय सुंदर गोष्ट घडली. आज राममंदीर अयोध्येत बनल्यानं रामाचं अस्तित्व सिद्ध झालंय. परंतु त्या रामाचा वापर करुन पदड्यामागचं राजकारण संपायचं नावंच घेत नाही. राम आदर्श होता व त्यांनी आपल्या राज्यात सुव्यवस्था स्थापन केली होती. असं रामायण सांगतं. परंतु रामाच्या नावावर काम करणारे वा राजकारण करणारे आजचे लोकं फक्त रामाचा वापर करतांना दिसतात. फक्त निवडणुकीत निवडून यावं म्हणून. हे प्रत्येकवेळेस घडलं. येथील जनतेवर सत्ता गाजविण्याच्या नादात रामाचा फक्त नि फक्त वापर होत आहे. शिवाय आम्ही रामराज्य बनवू असाच विचार फक्त ओठातून वसतो आहे. खरंच रामराज्य बनेल काय? हाही प्रश्न आजच्या काळात सतावतो आहे. कारण रामकाळात सर्व समाजाला योग्य वागणूक मिळत होती. सन्मानानं वागवलं जात होतं असं वाल्मीकीचं रामायण सांगतं. तशीच वागणूक आजच्याही काळात दिसायला हवी. जेणेकरुन रामराज्याची संकल्पना साकार होईल व आपल्या देशाला विश्वगुरु बनवता येईल. यात शंका नाही. प्रश्न फक्त एवढाच आहे की आजचे राज्यकर्ते आपल्या वागणुकीनं देशात रामराज्य आणणार की नाही? भारताला विश्वगुरु बनवतात की नाही? तसेच लोकांच्या आशा आकांक्षा पुर्ण करतात की नाही की रामाचा वापर राजकारणात करुन रामाला बदनाम करतात हा यक्षप्रश्न आहे.
एकीकडं रामाचं तत्वज्ञान सांगणं तर दुसरीकडं तृतीयपंथीयांचा पोशाख करुन भिक्षा मागणं. तशी ती कमलची मेहनतच होती आपल्या परीवारांना पालविण्यासाठी. तो चोरी करीत नव्हता वा डाकाही टाकत नव्हता. ना कोणाला छळत होता. तसाच कोणी जसे देईल. तसे पैसे तो घेत होता. ना पैसे मागतांना कोणाला जबरदस्ती करीत होता. ना टाळी वाजवत होता. परंतु जेव्हा त्याचं शेजाऱ्याशी भांडण झालं. तेव्हापासून त्याचं नशीब पुन्हा बदललं व त्याच्या नशिबात पुन्हा अंधार निर्माण होवू लागला.
तो शेजारी. तो मागावरच होता त्याच्या. त्याचं कारण होतं राममंदीराच्या जन्माचा उत्सव. त्या दिवशी त्यानं आपल्या मुलीचा अभ्यास व्हावा म्हणून पोलीस बोलावले होते.
त्या शेजाऱ्याचं तसं वागणं व त्याचं त्याच्या मागावर असणं. त्यातच त्या शेजाऱ्याला एक दिवस माहीत झालं की तो साडी नेसून तृतीयपंथी बनतो व तो तृतीयपंथी बनून भिक्षा मागतोय.
ती माहीत झालेली गोष्ट. आता त्या शेजाऱ्याच्या मनात विचार आला. बदला चांगल्यास्वरुपानं घेता येईल. त्यानं पोलिस बोलावले ना. मग त्यावर ही नामी संधी चालून आली. आपण बदला घ्यावा.
बदल्याचा विचार. तो विचार काही त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. त्यातच त्यानं एक तृतीयपंथी पकडला. त्याला सत्यता सांगीतली. सांगीतलं की कमल एक तृतीयपंथी बनून भिक्षा मागतोय. त्यावर आपणाला बदनामही करीत आहे तो.
शेजाऱ्यांचं तृतीयपंथीय लोकांशी झालेला वार्तालाप. त्यातच त्यांना भडकवणं. त्यातूनच तो तृतीयपंथी समूह भडकला व त्यांनी ठरवलं की आपण त्याला रंगेहाथ पकडावं व त्याची नग्न करुन धिंड काढावी.
विचारांचा अवकाश. त्यातच ते तृतीयपंथी त्यांच्या मागावर होते. असाच एक दिवस कमल तृतीयपंथी बनून भिक्षा मागत असतांना त्याला तृतीयपंथीय समुदायांनी पकडलं. त्याचे अंगावरील कपडे उतरवले. त्यानंतर त्याला नग्न करुन त्याला पुर्ण वस्तीत फिरवलं. ज्यावर लोकं त्याच्याबाबत हरहळत होते. कारण त्यानं कोणालाही काहीच म्हटलं नव्हतं. त्यानं कोणाला त्रासही दिला नव्हता. उलट दिदी, ताई बनून त्यानं सर्व लोकांशी चांगले घरगुती संबंध बनवले होते.
तृतीयपंथीयांनी त्याला नग्न केलं. त्याला वस्तीवस्तीत नग्न फिरवलं. ज्यातून त्याची बदनामी झाली. शिवाय त्याला सांगीतलं की आता यानंतर अशी तृतीयपंथी बनून भीक मागायची नाही. त्यानंतर कमलला त्या गोष्टीचा एवढा धक्का बसला की बरेच दिवस बाहेर पडला नव्हता.
काही दिवस गेले होते. कमलला माहीत पडलं होतं की तो तृतीयपंथीय बनून भीक मागतो, ही आग त्याच्या शेजाऱ्यानं लावली. जो एक हिंदूच होता.
कमल आज विचार करु लागला होता की असा हा हिंदू धर्म. ज्या धर्मात अशीही कुरघोडी चालते की जे लोकं चक्कं पोटावरच घाव घालतात. आपल्या पोटाचा प्रश्न आज पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.
त्यानं ठरवलं की लोकं बरे नाहीत. जरी ते माझ्या धर्माचे व जातीचे आहेत. आपण हा धर्म सोडावा. दुसरा धर्म घ्यावा. जो धर्म आपल्याला पसंत असेल.
कमल विचार करु लागला धर्म बदलविण्याचा. त्याचं कारण होतं शेजाऱ्यांशी भांडण होणं. लोकांच्या राम उत्सवाच्या वागण्यातून तो धर्म बदलविणार होता. आता त्याला आवडणारा हिंदू धर्म आज त्या धर्माबाबत त्याच्या मनात तिटकारा निर्माण झाला होता.
कमलनं धर्म बदलविण्याचा विचार करताच त्यानं अनेक धर्माचा अभ्यास केला. त्यानंतर तो एक दिवस उजळला व त्या दिवशी त्यानं अगदी रितीरीवाजानं आपल्या स्वतःचा धर्म बदलवला. त्यानं आता मुसलमान धर्म घेतला होता व नाव धारण केलं होतं मोहम्मद कुलीखान.
कमलचा आज मोहम्मद कुलीखान बनला होता व तो सर्वत्र मोहम्मद कुलीखान म्हणून वावरु लागला होता. त्यानं आपला धंदाही बदलवला होता आणि पुर्वी जसा तो हिंदू तत्वज्ञान वदत होता. आज तो मुस्लीम तत्वज्ञान सांगत होता नव्हे तर एकप्रकारची गरळच ओकत होता.
कमलनं हिंदू धर्मासाठी बरंच चांगलं काम केलं होतं. रोजच त्यानं हिरीरीने हिंदू धर्माची पुस्तकं वाचली होती. लोकांमध्ये धार्मीक दृष्टी वाढावी म्हणून व्याख्यानं दिली होती. शिवाय संघटनात्मकही कार्य केलं होतं. परंतु त्याच्या चांगल्या कामाची किंमत झालेली नाही. असं सारखं त्याला वाटत होतं. तो हिंदू धर्माचंच तत्वज्ञान सांगत होता. परंतु तसं तत्वज्ञान सांगत असतांना त्याचा त्याच धर्मातील व्यक्तीनं द्वेष केला होता. त्यानंच कुरघोडी केली होती की ज्यातून त्याला अपमान सहन करावा लागला. त्यानं तृतीयपंथी म्हणून भीकच मागितली होती. चोरी केली नव्हती. तरीही त्याचेवर डाग लावून त्याला शेजाऱ्यानं त्रासच दिला होता. त्यामुळंच की काय त्यानं धर्म बदलला होता. तसं पाहता चांगल्या कामाची किंमत कधीच होत नसते. तसं त्याला वाटत होतं की चांगल्या कामाला किंमत नाही? याबाबत एक प्रसंग त्याला आठवत होता. तो प्रसंग होता एका शिक्षकाचा. त्या शिक्षकावरही लांच्छन लावलं गेलं होतं. म्हणूनच त्यानं आपल्या चपला त्यागल्या होत्या.
"गुरुजी, आता तरी चपला घालाल काय?"
पत्रकारानं एका गुरुजींना विचारलेला प्रश्न. त्या गुरुजींनी आपली पादत्राणे त्यागली होती. त्याचं कारणही तसंच होतं. ते होतं, त्यांनी केलेलं महान कार्य. जे कार्य त्यांनी केलं होतं, त्या कार्याची दखल जरी घेतली असली तरी त्या शिक्षकाची दखल न घेतली गेल्यानं तसेच त्यांच्यात दोष दाखवून त्यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर संबंधीत शिक्षकानं पादत्राणे त्यागली. शेवटी जेव्हा त्यांना दोषातून मुक्ती मिळाली, त्यानंतर पत्रकारानं त्यांना विचारलेला प्रश्न. त्यावर गुरुजीनं अतिशय शांत राहून उत्तर दिलं,
"नाही, मी अजिबात चपला घालणार नाही. कारण माझ्या विद्यार्थ्यांचं बरंच नुकसान झालंय."
चपला घालणे न घालणे हा त्यावरचा उपाय नाही. मग ते गुरुजी तसं का बोलले? त्याचं कारण होतं त्यांनी केलेलं कार्य. त्यांनी अतिशय निरपेक्षरितीनं आपलं कार्य केलं होतं. विद्यार्थ्यांना केवळ वेतन मिळतं म्हणून तयार केलं नव्हतं तर विद्यार्थी आपल्या स्वतःचीच मुलं आहे असा विचार करुन त्यांना तयार केलं होतं. कारण शिकविण्याचं काम सर्वच शिक्षक करतात. मात्र चांगलं शिकविण्याचं काम कोणताच शिक्षक करीत नाही.
वारे गुरुजी त्यांचं नाव. त्यांनी वाबडेवाडीच्या शाळेत जेव्हा प्रवेश केला. तेव्हा तेथील पटसंख्या जेमतेम होती. त्यावेळेस त्या शाळेत दोनच शिक्षक होते. त्यानंतर त्यांनी विचार केला. आपण आपल्या शाळेची पटसंख्या वाढवावी. असा विचार करताच त्यांनी कल्पना केली की जर या विद्यार्थ्यांना कल्पनांती शिकवलं तर.......त्यांचा तो विचार. विचार करताच त्यांनी तो विचार अंमलात आणला. त्यासाठी लागत होती लागत. ती लागतही त्यांनी लोकसहभागातून मिळवली. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी नवनवीन प्रयोग केलेत. त्यातूनच मुले प्रयोगांती बनली. मुलांनी शिष्यवृत्ती परीक्षेत आपली कामगिरी दाखवली. शिवाय कल्पनाशक्ती वापरुन व लोकांचा सहभाग घेवून त्यांनी शाळेचा विकास केला. एकंदरीत सांगायचं झाल्यास शाळेचा विकास झाला.
वारे गुरुजी चांगलं काम करीत होते. त्यांच्या प्रयत्नातून चांगले विद्यार्थी घडत होते. लोकं सहल आयोजन करुन आपल्या विद्यार्थ्यांना त्या शाळेपासून प्रेरणा देत होते. स्वतः त्या शाळेला भेट देवून व प्रेरीत होवून ते प्रयोग आपल्या शाळेत करीत होते.
ते मॉडेल होते इतर शाळांसाठी. इतर शाळेनही तेच प्रकल्प वापरुन आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा विकास करायला हवा होता. परंतु चांगल्या कामाची कधीच किंमत होत नाही, अन् चांगल्या माणसांचीही लोकांना किंमत वाटत नाही. चांगली माणसं जर अधिकारपदावर आलीच तर त्यांना कसं पदच्यूत करता येईल याचाच विचार होत असतो घडोघडी. कारण आजच्या काळात कोणीच कोणाची प्रगती झालेली पाहू शकत नाहीत. कारण असतं, आपण तशा स्वरुपाचं करु न शकणं. त्यातूनच द्वेष निर्माण होत असतो. हा द्वेष एकदा का मनात निर्माण झाला की बस. पुढील व्यक्ती कसा संपेल यासाठी संधी शोधणं सुरु होतं. काही काही ठिकाणी तर इज्जतीचाही भाजीपालाच केला जातो. मग दोषारोप होतात. निलंबनही. कारण काही लोकं समाजात असेही असतात की जे स्वतःही काही करीत नाहीत व दुसरा करीत असेल तर त्यालाही काही करु देत नाहीत. त्याचंही कारण असतं, त्याला तसं करता न येणं.
वारे गुरुजींबाबत तेच घडलं. त्यांनी शाळेलाच नाही तर संपूर्ण पंचक्रोशीला इज्जत मिळवून दिली. त्या शाळेचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलं. हेच खुपलं काही समाजकंटकांना. त्यातच त्यांच्यावर तथाकथित आरोप प्रत्यारोप झालेत. मग त्यांचं निलंबन झालं व चौकशी लागली. अशी चौकशी की ज्यातून त्यांच्यासारख्या इमानदार व्यक्तीमत्वाला नोकरीवरुन हात धुवावे लागेल. परंतु वारे गुरुजी इमानदार होते. त्यांनी निःस्वार्थ मेहनत घेतली होती वाबडेवाडीतील विद्यार्थ्यांसाठी. हे त्यांनाही वाटत होतं. त्यांना त्यांच्या इमानदारीपणावर विश्वास होता. शेवटी वारे गुरुजी जिंकले. ते आरोपमुक्त झाले. परंतु या आरोपमुक्तीनंतर त्यांना वाबडेवाडीतील शाळा मिळाली नाही. ज्या शाळेत त्यांनी मुलं घडवली होती. ज्या शाळेतून त्यांनी स्वप्न पाहिले होते अन् ज्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा त्यांनी विकास केला होता. आज ते दुसऱ्याच शाळेत आहेत. ती शाळा की ज्या शाळेत तीन विद्यार्थी होते. जी शाळा आदिवासी भागात आहे.
शिक्षक म्हणून काम करीत असतांना काही शिक्षक शाळेतील विद्यार्थ्यांना केवळ शिकवीतच नाही तर त्या शाळेचं नंदनवनच करतात. त्या शाळा कुठेही असल्या तरी. ते शिक्षक त्या शाळेत शिकवायला जातात. तेव्हा पटसंख्याही आपोआपच वाढते. वारे गुरुजी आदिवासी भागातील शाळेत गेले. त्यांनीच इथंही चांगले प्रयोग केले. उपक्रमही राबवले. त्यातच त्या शाळेत जेव्हा ते लागले होते. तेव्हा तीन विद्यार्थी होते. आज एक वर्षात शंभर विद्यार्थी आहेत. ते इमानदार होते. म्हणून त्यांनी पादत्राणे त्यागली. आजही ते पादत्राणे वापरत नाहीत. कारण त्यांना आजही खंत आहे वाबडेवाडीतील शाळेची. त्या विद्यार्थ्यांची की ज्या विद्यार्थ्यांचं समाजातील समाजकंटकामुळं नुकसान झालं. आता ते केव्हा पादत्राणे वापरतील हे निश्चीत नाही.
वारे गुरुजींबद्दल सांगायचं झाल्यास खरं तर त्यांचे प्रयोग शाळेशाळेतून राबवायला हवे होते. त्यांची मुलाखत टिव्ही चॅनलवर गाजवायला हवी होती. परंतु तसं काहीच घडलं नाही.
समाजात असे बरेच लोकं असतात की जे प्रसिद्धीच्या पहिल्या स्तरावर असतात. तेव्हा त्यांच्याबद्दल काहीच वाटत नाही. परंतु जेव्हा ते यशाच्या शिखरावर पोहोचतात. तेव्हा त्यांना वेळोवेळी मदत करणारेही त्यांना मदत करीत नाहीत. वारे गुरुजींबाबत तेच घडलं होतं.
महत्वाचं सांगायचं झाल्यास माणसानं कोणाचाही द्वेष करु नये. कुणी जर समोर जात असेल तर ते त्याचं प्रारब्धच असतं. आपण त्याला जळू नये वा त्याच्यावर दोषारोप करु नये. जर करायचेच असेल तर त्याचं अनुकरण करावे. त्यानुसार त्याच्यातील गुण उपयोगात आणून आपला विकास करण्याचा प्रयत्न करावा. त्यासोबतच आपल्या परीसराचा देखील विकास करावा. जेणेकरुन त्यामुळं आपलाच नाही तर आपल्या देशाचाही विकास होईल. ज्यातून देशाला महासत्ता बनवता येईल यात शंका नाही.

************************************************

कमल आज मोहम्मद कुलीखान बनला होता. परंतु आज त्याही धर्मात जावून तो सुखी झाला नव्हता. तिथंही त्याला दोष देणारे भरपूरच होतं. तसं त्याला आज आठवत होतं त्याच्या पुर्वजांनी धर्मासाठी केलेलं बलिदान. त्याच्या पुर्वजांनी बलिदान दिलं होतं. परंतु कोणताच धर्म स्विकारला नव्हता. शिवाय त्याचा द्वेषही करणारे त्या धर्मात भरपूरच होते. कधी वाटायचं की आपण स्वधर्मात जावं. परंतु कसं जाणार? प्रश्न होता. वाटत होतं कमलला आपलंच चुकलं. आपण आपलं पाऊल चुकीचं टाकलं. ज्या चुकीच्या पावलाचा आपल्याला त्रास होणारच.
कोणताही धर्म वा कोणत्याही गोष्टी ह्या दुरुन चांगल्याच वाटतात. परंतु आपण जेव्हा जवळ जातो ना. तेव्हा त्या धर्मात काय आहे वा त्या गोष्टीत काय आहे हे माहीत पडतं. जसं डोंगरावर गेल्याशिवाय डोंगरावरील खाचखळगे कळत नाहीत वे मंदिरात गेल्याशिवाय त्या मंदिरात देव कोणता आहे ते कळत नाही. तेच धर्माबाबत आहे. धर्मही असाच दुरुन चांगला वाटतो.
कमलला वाटत होतं मुस्लीम धर्म चांगला. परंतु जेव्हा तो त्या धर्मात गेला. तेव्हा त्याला आपल्या लेकरांना जास्त शिकवता आलं नव्हतं व इच्छा नसतांनाही त्याला त्याच्या पत्नीला बुरख्यातच ठेवावं लागत होतं आणि धर्माचा पगडा एवढा होता की अंधश्रद्धेशिवाय जगण्याला महत्व नव्हतं. मनात येईल तसा बोलता येत नव्हतं. सारे हक्कं जणू हिरावले गेल्यागत जगणं होतं. जगावसं वाटत नव्हतं. परंतु जगावं लागत होतं.
कमलला वाटत होतं की यापेक्षा आपला धर्म बरा होता की निदान त्या धर्मात आपल्याला बोलता येत होतं. शिवाय आपल्या स्वतःच्या मनात येईल तसं वागताही येत होतं. मुलांना शिक्षण शिकवता येत होतं. बुरखा पद्धती नव्हती. स्रियांचे हाल होत नव्हते. त्यातच अंधश्रद्धेलाही तेवढ्या प्रमाणात थारा नव्हता.
कमल आज म्हातारा झाला होता. आता त्याची लेकरं मोठी झाली होती. तो आता मोहम्मद कुलीखान म्हणून वावरत होता. त्यानं मुस्लीम धर्म स्विकारला होता. परंतु तो आता खुश नव्हता आणि आनंदीही नव्हता. कारण आज त्याच्या मनासारखं झालं होतं. मात्र कधीकधी त्याला तरुणपण आठवायचं. तेव्हा त्याला खंत वाटायची. वाटायचं की आपण हा धर्म विनाकारणच घेतला. कारण आपण त्याग केलाय हिंदू धर्मासाठी. त्याला हिंदू धर्म आठवत होता आणि तेवढाच आठवत होता त्यानं हिंदू धर्मासाठी केलेला त्याग.
कमलला आठवत होतं त्याचं तरुणपण. तो जेव्हा तरुण होता. तेव्हा त्यानं कारसेवेत सहभागही घेतला होता. त्यानं बाबरी तोडण्यात सक्रीय सहभाग घेतला होता. त्यावेळचा त्याला एक प्रसंग आठवत होता. तो प्रसंग होता. गोळी लागण्याचा. बाबरी तोडायला जेव्हा तो गेला होता, तेव्हा पोलिसांची एक गोळी त्याच्या कानशिलेजवळून गेली होती. ती जर थोडक्यात हुकली नसती तर त्या गोळीनं त्याच्या कानशिलेचाच नाही तर मस्तकाचाही वेध घेतला असता. तोच प्रसंग सतत त्याला चुकीचं पाऊल टाकल्याची आठवण देत होता. परंतु त्याला तेवढाच पश्चाताप होत होता.
समाजात असेही काही शेजारी असतात की जे आपल्याशी वैरत्वानं वागतात. जणू आपण त्याला अतीव त्रासच दिला आहे. ते चांगले वागत नाहीत. जर एखाद्या व्यक्तीला त्यांनी पाहिलं की तो व्यक्ती विकासाच्या क्षेत्रात आघाडीवर गेला आहे की बस, तेच त्यांच्या डोळ्यात खुपतं. त्यांच्या मनात द्वेष निर्माण होतो व ते कुरघोडी करीत असतात. तसं पाहिल्यास प्रत्येकच ठिकाणी असंच घडतं. प्रत्येकाला शेजारधर्म चांगला मिळेलच याची शाश्वती नसते. त्याच शेजाऱ्यांच्या चांगल्या वाईट गोष्टींच्या आहारी जावून आपण कमलसारखं जे पाऊल उचलतो. ते पाऊल आपलं चुकीचं पाऊल ठरतं. जसं कमलचं ठरलं होतं.
आज कमल पश्चातापाच्या अग्नीत जळत होता. त्याचं महत्वपुर्ण कारण होतं धर्मांतरण. धर्मांतरणाचे दोन प्रकार होते. स्वेच्छेने केलेले धर्मांतरण व जबरदस्तीचे झालेले धर्मांतरण. स्वेच्छेचे धर्मांतरण टिकत होते. मात्र जबरदस्तीचे धर्मांतरण कालानुरूप कालबाह्य ठरत होते. धर्मांतरणानं चांगल्या धर्मांनाही उच्छेद दिला होता नव्हे तर धर्मांतरणानं माणूसकीची हत्याही झाली होती. तरीही धर्मांतरण सुरु होतं आणि धर्म बदलवून दुसर्‍या धर्मात गेलेली ती पांथस्थ दुसर्‍या धर्मात गेली की गरळ ओकत होती व विसरत होती की त्याचे पुर्वज वा तेही एकेकाळी त्याच धर्मात होते. मात्र जेव्हा कमलसारखं म्हातारपण यायचं. तेव्हा मात्र पश्चाताप व्हायचा.
कमल जेव्हा मरण पावला आणि मरणाची वेळ आली, तेव्हा त्यानं आपल्या सर्व मुलांना मरतेवेळी सांगीतलं की मी धर्मांतरण करुन चुकीचं पाऊल उचललं आहे. ते चुकीचेच पाऊल आहे. खरंच मी ज्या धर्मात पुर्वी होतो, तोच धर्म चांगला आहे व भविष्यात तुम्हाला जेव्हा संधी मिळेल, तेव्हा तुम्ही नक्कीच स्वधर्मात जावं.
कमलला दोन मुलं होती. ती दोन्ही मुस्लीमच होती. काही कामानिमित्त ती दोन्ही मुलं पाकिस्तानात गेली होती.
कमलनं सांगीतलेली गोष्ट. कमल मरण पावताच त्यांच्या एका मुलांच्या मनात धर्मातरणाचा विचार घोळत होता. त्यानंतर संधी मिळताच त्यातील एकानं आपला धर्म बदलला होता व तो हिंदू बनला होता. त्याचं कारण होतं पाकिस्तानात हिंदू व मुस्लीम धर्मात होत असलेलं स्थित्यंतर. तेव्हा त्यानं पाहिलं होतं की ज्या पाकिस्तानात हिंदूधर्मीय लोकं राहात होते. त्यांना भीतभीतच राहावे लागत होते. त्यांना देवादिकांची पुजा करायला बंदी होती. शिवाय त्यांच्यावर त्यांनी धर्मांतरण करावं म्हणून दबाव टाकण्यात येत होता. तिथं मुस्लीम धर्मात असलेल्यांनाही काही वाव नव्हताच. मुस्लीमांनाही तिथं चांगली वागणूक मिळत नव्हती. मुस्लीम शासकांची भुमिका चांगली नसल्यानं आता त्याला मुस्लीम धर्म आवडत नव्हता. त्याला स्वाभिमान होता हिंदू धर्माचा की ज्या धर्मात त्यांना स्वतंत्रता दिसत होती. मनमोकळेपणाने राहता येत होतं हिंदू धर्मियांना. शेवटी कितीही दबाव होत असला आणि कितीही हाल होत असले तरी काही हिंदू लोकं कट्टर होते की ते धर्मांतरण करीत नव्हते.
कालांतरानं कमलच्या दोन मुलांपैकी एक मुलगा एक दिवस भारतात आला. त्यावेळेस त्याचा पाकिस्तानात असलेला एक भाऊ फोन करायचा, भारतीय असलेल्या आपल्या मुसलमान भावाला. आपल्या देशाची कैफियत सांगायचा आणि त्याचा भाऊही विश्वासच करीत असे त्याचेवर. कारण जेव्हा तो आपल्या भावासोबत पाकिस्तानात राहायला गेला होता. तेव्हा त्यानं पाहिलं होतं की जे हाल तिथं हिंदू भोगत होते. तेच होणारे हाल त्यानंही पाहिले व वाटलं की खरंच आपला भारत देश चांगला आहे की ज्या देशात आपण परधर्माचीही इज्जत करतो. त्यांना अगदी सन्मानानं वागवतो. धर्मांतरणही खुशीनं करु देतो. अडवत नाही.
इथं जबरदस्तीचं धर्मांतरण आहे तर आपल्या भारतात स्वेच्छेचं. त्यानंतर वाटलं की आपणही धर्मांतरण करावं. आपणही हिंदू बनावं.
धर्मांतरणाचा ध्यास त्याला काही स्वस्थ बसू देत नव्हता. तसा त्याला त्याचा बाप आठवत होता, अन् आठवत होतं त्याला त्याच्या बापानं अंतिम समयी बोललेले शब्द. शेवटी संधी मिळताच तोही मुस्लीम धर्म सोडून हिंदूच बनला होता.
आज दोघंही भाऊ एकमेकांना फोन करीत होते. दोघंही एकमेकांबाबत विचारत होते. पाकिस्तानात असलेला भाऊ नित्यनेमानं सांगत असे की बापानं म्हटलेलं धर्मांतरण त्याला मान्य आहे. त्यालाही वाटतं की हिंदू धर्मात यावं. परंतु तो हिंदू धर्म स्विकारु शकत नाही. कारण त्याची मजबूरी आहे. इथं हिंदू बनण्यासाठी धर्मांतरण बंद आहे. फक्त मुस्लीमांसाठीच धर्मांतरण सुरु आहे. तू हिंदू बनला याचा मला अभिमान आहे की जी बापाची अंतिम इच्छा पुर्ण झाली आहे.
कालांतरानं योग आला व कमलचा पाकिस्तानातील तो मुलगा भारतात आला. तो आपल्या हिंदू असलेल्या भावाच्या घरी आला. तसं त्याला त्याच्याच भावानं म्हटलं,
"धर्मांतरण करणार काय? हिंदू बनतो काय?"
तसा त्याचा भाऊ ते ऐकताच क्षणभर थांबला. म्हणाला,
"होय. मी धर्मांतरण करण्यासाठीच मायदेशात आलेलो आहे मला हिंदू बनायचंय."
बस, भावानं ते ऐकलं व रितसर रितीरिवाजानं त्यानं धर्मांतरणाचं आयोजन केलं व आपल्या भावाला हिंदू बनवलं. भावानंही धर्मांतरण करुन हिंदू धर्मात प्रवेश केला होता. आता दोघंही भाऊ हिंदू बनून भारतातच गुण्यागोविंदानं राहात होते. आता त्यांना आपण हिंदू असल्याचा निर्भेळ आनंद मिळत होता. जो आनंद गगनात मावेनासा होता. आता त्यांना हिंदू धर्म प्रिय होता. तसाच रामही प्रिय होता आणि तेवढाच कृष्णही. आपल्या धर्माबाबत त्यांना अभिमान होता आणि तेवढाच स्वाभिमानही. जर ते पाकिस्तानात गेले नसते तर हिंदू धर्म त्यांना कळला नसता ना त्या धर्मातील सहिष्णूता कळली असती, ना त्या धर्माचं महत्व ना तेवढाच स्वाभिमानही कळला नसता. म्हणूनच म्हणतात ना जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. तीच गत त्यांची झाली होती. जबरदस्तीनं केलेलं धर्मांतरण टिकत नाही. परंतु कमलनं केलेलं स्वेच्छेचंही धर्मांतरण टिकलं नव्हतं. त्याचं पानीपत झालं होतं.

****************************************************************************समाप्त *************


इतर रसदार पर्याय