How to determine the amount to invest. books and stories free download online pdf in Marathi

गुंतवणूकीसाठी रक्कम कशी ठरवावी.

गुंतवणुकीसाठी आवश्यक रक्कम कशी ठरवावी?

स्टार्टअपच्या सुरुवातीच्या टप्प्यात फक्त पैसाच महत्वाचा नसतो, तर तुमच्या मार्गदर्शन करणारे गुरू आणि सल्लागार शोधणे देखील महत्वाचे असते.

तुम्ही मोठ्या प्रेक्षकांसाठी समस्या सोडवणारे उत्पादन किंवा सेवा तयार केल्यास, तुमचे ग्राहक स्वतःच तुमच्या गुंतवणुकीचा सर्वोत्तम स्रोत बनतात. परंतु, जर तुम्हाला तुमची सर्जनशीलता वापरायची नसेल, नवीन कौशल्य विकसित करायची नसेल आणि केवळ यशस्वी व्यवसाय मॉडेल, उत्पादन किंवा सेवा कॉपी करायची असेल ज्यांची आधीच स्पर्धा असेल, तर तुम्हाला गुंतवणूक आवश्यक नसू शकते.

आजच्या बातम्यांमध्ये, तुम्ही वारंवार स्टार्टअपला कोट्यावधी डॉलर्स गुंतवणूक मिळाल्याचं ऐकत असाल, पण स्टार्टअप म्हणजे गुंतवणूक हा विचार पूर्णपणे बरोबर नाही. जर तुम्ही आज यशस्वी उद्योजक बनू इच्छिता, तर हलक्या गुंतवणूकीचा व्यवसाय मॉडेल स्वीकारा, तुमची सर्जनशीलता आणि कौशल्यं वापरा, स्वतःमध्ये नवीन कौशल्य विकसित करा आणि तंत्रज्ञान आणि साधनांचा वापर करा. असं केल्यास, तुम्हाला कदाचित गुंतवणूकही लागणार नाही.

गुंतवणूक मिळवण्यासाठी काय कराल?

१) व्यवसाय नियोजन: निधी सुरक्षित करण्यासाठी, पहिली पायरी म्हणजे तुमच्या स्टार्टअपसाठी व्यावसायिक व्यवसाय योजना तयार करणे. या योजनेमध्ये तुमच्या व्यवसायाचे सर्व तपशील समाविष्ट असले पाहिजेत, जसे की महसूल मॉडेल, उत्पादने आणि सेवा, विपणन धोरण, निधीच्या गरजा, निधी वापर, ग्राहक संपादन मॉडेल, नोंदणी आणि प्रमाणपत्रे, संघ तपशील, अंदाजित आर्थिक आणि बरेच काही.

२) गुंतवणूक स्त्रोत: नंतर, तुम्ही विविध गुंतवणूक पर्याय शोधले पाहिजेत. यात बँक कर्ज, गुंतवणूकदारांकडून खासगी भांडवल मिळवणे किंवा स्टार्टअप उद्योगक्षेत्र वाढवणारे (accelerators) किंवा भागीदारीसारखे पर्याय समाविष्ट असू शकतात. तुमच्या गरजेनुसार सर्वात योग्य पर्याय निवडण्यासाठी विविध पर्यायांचे फायदे, तोटे आणि अटींची विश्लेषण करणे आवश्यक आहे.

३) नेटवर्किंग: त्यानंतर, तुम्ही संबंधित व्यावसायिक समुदाय, गुंतवणूकदार, देवदूत गुंतवणूकदार आणि स्टार्टअप प्रवेगक यांच्याशी संपर्क स्थापित केला पाहिजे. एक सहाय्यक नेटवर्क तयार केल्याने तुम्हाला आर्थिक संसाधनांमध्ये प्रवेश करण्यात मदत होऊ शकते.

४) सरकारी योजना: विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय, सरकारी आणि गैर-सरकारी संस्था गुंतवणूक सहाय्य प्रदान करतात. तुमच्या स्टार्टअपला पाठबळ देण्यासाठी कोणत्या योजना उपलब्ध आहेत हे तपासण्यासाठी तुम्ही तुमच्या स्थानिक उद्योग मंत्रालय किंवा उद्योजकता विभागामध्ये चौकशी करू शकता.

*श्रावण गुरव- (फाउंडर एस.जी क्रिएशन इंडस्ट्री कंपनी प्रायव्हेट लिमिटेड,इडीपी प्रोग्राम हेड ब्लाॅगर,लेखक, बिझनेस डेव्हलपमेंट कोच, स्टार्टअप ॲडव्हायझर, संपर्क-+919322567546)*

*अयशस्वी होण्याची भीती बऱ्याचदा आपल्याला नव्या गोष्टी आजमावण्यापासून रोखत असते .. बरोबर ना ?*

 

मग आपल्याकडे यश आणि अपयश दोनच पर्याय असताना आपण एवढे घाबरतोच का ??

 

कारण , आपल्याला कंफर्ट झोन सोडायलाच नकोय ..

 

असलेलं उत्पन्न आणि पैसे जातात कि काय या भीतीने आपण नव्या गोष्टी टाळायला लागतो .

 

पण नव्या गोष्टीआड लपलेली संधी मात्र आपल्याला कधीच दिसत नाही .

 

आणि

 

यातून कधीही न संपणारा आणि तोच तोच प्रवास सुरु होतो .

 

सुरुवातीला कितीही इंटरेस्टिंग वाटणारा धंदा किंवा नोकरी नंतर मात्र कंटाळवाणी वाटायला लागते .

 

भरपूर पैसे मिळूनही काम नकोस वाटत .

 

हे होत न घेतलेल्या नव्या निर्णयाने ..

 

न घेतलेल्या रिस्क ने ..

 

न स्वीकारलेल्या संधीने येणार आयुष्य कंटाळवाणं होत हे कळायला वेळ जातो .

 

म्हणून अपयशाला घाबरू नका .

 

अपयश हा मोलाचा अनुभव देत .

 

आणि

 

भविष्यासाठी तुम्हाला घडवतो ..

 

मग काय कराल ना नव्या गोष्टी ट्राय ??

 

यश मिळेलच जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर ..

 

    धन्यवाद!!!

*श्रावण गुरव- (फाउंडर एस.जी क्रिएशन इंडस्ट्री कंपनी प्रायव्हेट लिमिटेड,इडीपी प्रोग्राम हेड ब्लाॅगर,लेखक, बिझनेस डेव्हलपमेंट कोच, स्टार्टअप ॲडव्हायझर, संपर्क-+919322567546)*

*1. उद्या करायच्या कामांची यादी आदल्या रात्री करा.* 

 

कारण ?

 

 *↳* तसं केल्याने आपल्या मनाची उद्या काय काय करायचं आहे यासाठी पुर्वतयारी होऊन जाते. 

 *↳* अस्वस्थता कमी होते किंवा निघुन जाते. 

 *↳* त्यामुळे तुम्हाला उद्याची सुरुवात आजच मिळते आणि तीसुद्धा उत्साहाने. 

 

अशी यादी छोटी आणि आटोपशीर असावी. 

 

*2. यादी केलेल्या कामांचा प्राधान्यक्रम लावणे.* 

 

त्यासाठी 80/20 तत्व अतिशय उपयुक्त ठरते.

 

 *↳* यादीतली 20 टक्के अशी कामे निवडा कि जी अत्यंत महत्वाची आणि जास्त फायदेशीर आहेत.

 *↳* त्यांना यादीत सर्वात वर घ्या.

 

बाकीच्या छोट्या बाबींची आताच काळजी करू नका.

 

 *3. प्रत्येक कामाला अंदाजे किती वेळ लागेल ते त्यापुढे लिहा.* 

 

यात वास्तववादी राहा.

 

ज्या कामाला 1 तास लागेल असं तुम्हाला वाटते त्यासाठी दीड तास ठेवा.

 

*कारण ?* 

 

 *↳* त्यामुळे आकस्मिक आलेल्या बाबींसाठी वेळ राहतो.

 *↳* वेळ उरला तर चालतो पण वेळ पुरला नाही तर काम अपुर्ण राहते.

 *↳* त्यामुळे अस्वस्थता कमी होते. 

 

*4. काम करताना खालील तंत्र वापरा.* 

 

25 मिनिटे सलग काम करा.

 

त्यानंतर 5 मिनिटाचा ब्रेक घ्या.

 

असे सलग 4 वेळा करा.

 

त्यानंतर एक 15-30 मिनिटांचा लॉन्ग ब्रेक घ्या.

 

*कारण ?* 

 

 *↳* छोट्या काळात माणुस अधिक उत्साहाने काम करतो

 *↳* चालढकल करण्याच्या वृत्तीवर आपोआप नियंत्रण येते 

 *↳* मानसिक व शारीरिक थकवा येत नाही. 

 

*5. सारख्या कामांचा एक गट करा.* 

 

समान प्रकारची कामे एकत्रित केल्याने वेळेची बचत होते.

 

तुम्ही एकाच झोन मध्ये एकावेळी असतात.

 

वारंवार गिअर्स बदलावे लागत नाहीत.

 

*6. ब्रेक घेणे आवश्यक आहे.* 

 

थकलेले मन आणि मेंदु यांची कार्यक्षमता कमी होत जाते.

 

त्यामुळे ब्रेक घेणे अत्यावश्यक आहे.

 

प्रत्येक तासाला 5-10 मिनिटांचा ब्रेक घ्या.

 

तुमचं मन प्रसन्न होऊन जाते. 

 

*7. डिस्ट्रॅक्शन्स वगळा/ दूर करा.* 

 

कोणत्याही बाबीकडे लक्ष न देता सलग 25 मिनिटे काम करा.

 

फोन, पीसी, लॅपटॉप, आयपॅड वरील नोटिफिकेशन्स बंद करा .

 

काम करताना वेबसाईट, ऍप्स ब्लॉक करा.

 

काम करताना शांतता असेल असं वातावरण निर्माण करा.

 

*8. रात्री दिवसभराचा आढावा 5 मिनिटात घ्या.* 

 

आज आपण नियोजित केलेली कोणकोणती कामे केली नाहीत याची यादी वाचा.

 

स्वतःला विचारा कि हि कामे का राहुन गेलीत ?

 

तुम्हाला त्याची भरपुर कारणे सापडतील पण ती कामे न करताना तुमची मानसिकता काय होती? याचा शोध घेणे अत्यंत महत्वाचे आहे. उदा. आयत्यावेळी दुसरेच काहीतरी आले, मित्राशी गप्पा मारत बसलो, थोड्यावेळाने करूया असा विचार केला मग नंतर वेळच मिळाला नाही, यादीच वाचायची राहुन गेली, सहज म्हणुन सोशल मेडिया बघायला गेलो तर त्यात वेळ कसा गेला ते कळलं नाही, आपल्याने होईल कि नाही याच्या धाकधुकीने हातच लावला नाही इत्यादी. 

 

*9. तुमच्यात जी सुधारणा झाली आहे त्याबद्दल आनंद साजरा करा.* 

 

जी कामे नियोजनाप्रमाणे पुर्ण झाली आहेत त्याबद्दल स्वतःला शाबासकी द्या.

 

त्यामुळे मेंदुत डोपामाईन रिलीज होते.

 

आणि त्याने तुमचा उत्साह, आत्मविश्वास वाढत जातो.

 

*10. तुम्हाला अधिक प्रभावी आणि हमखास यशस्वी करणारा या प्लॅनची समरी पुन्हा खाली देत आहे :* 

 

↳ रात्री यादी करणे 

↳ प्राधान्यक्रम ठरवणे 

↳ त्याला वेळेचे वाटप करणे 

↳ ठराविक वेळ काम मग ब्रेक घेण्याचे तंत्र 

↳ कामांचा गट बनविणे 

↳ ब्रेकचे महत्व 

↳ डिस्ट्रॅक्शन वगळणे 

↳ रात्री कारणमीमांसेसह आढावा घेणे

↳ यश साजरे करणे

 

निव्वळ कामांची यादी करून फारसा उपयोग होत नाही. प्राधान्यक्रम ठरवून त्यांना निश्चित वेळ नेमुन देणे. कामना घड्याळाच्या वेळेप्रमाणे स्केड्युल केल्याने ती प्रत्यक्ष अस्तित्वात येतात. त्याचा आढावा घेणे. कोणत्या वृत्तीने कोणती कामे करण्यापासून आपण स्वतःला थांबविले याचे मनन करणे. यासारख्या सर्व बाबी करणे आवश्यक आहे. 

आवडल्यास/ उपयुक्त वाटल्यास शेअर करा.⏰⏲️🕰️⌛⏳

 

   *श्रावण गुरव- (एस.जी क्रिएशन इंडस्ट्री कंपनी प्रायव्हेट लिमिटेड,इडीपी प्रोग्राम हेड ब्लाॅगर,लेखक, बिझनेस डेव्हलपमेंट कोच, स्टार्टअप ॲडव्हायझर, संपर्क-+919322567546)*

इतर रसदार पर्याय