A chicken criminal books and stories free download online pdf in Marathi

एक कोंबडी गुन्हेगार

एक कोंबडी गुन्हेगार निर्माण करु शकते

अलिकडेच नाही तर पुर्वीपासून कोंबडे बकरे पालनाचा व्यवसाय आहे. त्यातच कित्येक वर्षापासून कोंबड्या बक-यांना कापून लोकं आपल्या जीभेचे चोचले पुरवीत असतात. कोंबड्यांना कापणारा वा बकरीला कापणारा गृहस्थ, त्यांना कापतांना त्या मुक्या जीवांनाही जीव असतो हे विसरतो आणि करकर कापत असतो. अशी ही कोंबडी गुन्हेगार निर्माण करीत असते असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.
कोंबड्या बक-याला कापणारा हा गुन्हेगार असतो. कारण ज्याप्रमाणे माणसाचा खुन करणे हा गुन्हा आहे. तसं कोंबडी बकरी कापणंही गुन्हाच आहे. परंतू असा गुन्ह्यात माणूस मरण पावला, तर त्याची नोंद होते. तशी कोंबड्या बक-याचा जीव घेणा-यांची नोंद होत नाही. आज सर्रासपणे ही जीवं कापली जातात.परंतू त्याचा कोणीही विरोध करीत नाही. याबाबतीत काही लोकं म्हणतात की जर आपण त्यांना कापलं नाही तर उद्या त्यांची संख्या वाढेल व ते माणसावर भारी होवून माणसालाच मारुन खातील. म्हणून नाईलाजानं कापावं लागतं.
आज कोंबड्या बक-यांना कापण्यासाठी विकून लोकं भरमसाठ पैसा कमवीत आहेत. काही लोकं यात धंदाही करीत आहेत. परंतू यात काही लोकं वेगळ्याच स्वरुपात कोंबड्या बक-यांचा वापर करुन धंदा करतात. ते स्वरुप वेगळं असतं. परंतू त्यामुळं कोंबड्या बक-यांच्या हत्येची नोंद होत असते.
रस्ता.......रस्त्यावरुन दिवसरात्र रहदारी सुरु असते. अशी रहदारी सुरु असतांना काही लोकं आपल्या कोंबडीला लोकांच्या गाडीच्या खाली फेकतात व त्यातून माझ्या कोंबडीच्या अंगावर गाडी चढवली. मी तुमची तक्रार पोलिस स्टेशनला टाकतो. अशी धमकी देत अशा स्वरुपाचे लोकं जाणा-या येणा-यांकडून पैसा उकळत असतात. अशी टोळी ब-याच ठिकाणी आता सक्रीय झालेली असून ती एक कोंबडी जो गुन्हेगार नाही, त्याला गुन्हेगार बनवीत असते. कारण यामध्ये जर त्या गाडीचालकाचा गुन्हा असो वा नसो, तो घाबरुन पैसे देत असतो. काही लोकं असे पैसे देत नाहीत. नव्हे तर ते पैसे द्यायला मनाई करतात.यातून मग मारामा-याही होतात. त्यातच खूनही होवू शकतात. अलिकडे हा प्रकार जास्त प्रमाणात वाढत चाललेला असून एक लहानशी कोंबडी तिचं प्रकरण निपटवीत असतांना फुकटचं लचांड आपल्या मागं लागू नये म्हणून काही लोकं त्या कोंबडीवाल्याला त्या कोंबडीच्या रकमेएवढे पैसे देवून देतात व पुटपुटत निघून जातात. समजा यामध्ये त्या कोंबडीचे पैसे मिळाले नाही आणि कोंबडी मरण पावली. तसेच कोंबडी ज्यांच्या गाडीत आली. त्या गाडीवाल्याची आपल्याच ओळखीची काही माणसं साक्षीदार पकडून तक्रार केली जाते. त्यातच जो गाडीवाला गुन्हेगार नसतो. त्याला जबरदस्तीनं गुन्हेगार ठरवलं जातं.
एक प्रकरण सांगतो. गोष्ट जुनी आहे. आमच्या गावाकडील एक गोष्ट. त्या व्यक्तीचं नाव रमेश होतं. तो रोजच त्या रस्त्यानं जायचा. रोजच यायचा. व्यक्ती श्रीमंत होता. त्यातच त्या रस्त्यावरील एका व्यक्तीनं ठरवलं. आपण याच्याकडून पैसे उकळायचे. जसं त्या व्यक्तीनं मनात विचार केला. तशी त्यानं ती योजना कार्यान्वीत केली. एक दिवस त्यानं कोंबडीला धागा बांधला. त्या धाग्याचं एक टोक आपल्याजवळ ठेवून त्यानं ती कोंबडी त्याच्या गाडीखाली जावू दिली. त्यातच दोनचार घराजवळचे साक्षीदार पकडून त्याची कथाकार पोलिसस्टेशनला करतो म्हणून त्याचेकडून पैसे उकळले.
ती कोंबडी. त्याचे पैसे कमवायची साधनच ठरली. त्याला पैसे मिळताच त्याची हिंमत वाढली व तो आता ब-याच लोकांना अशाप्रकारे त्रास देवू लागला. काहीजणं अगदी घाबरुन जावून कोंबडीचे पैसे देवू लागले. तर काही मुजोरीही करु लागले. त्यातच ते प्रकरण व त्यातील सत्य माहित असलेला तो रमेश नावाचा गावाकडील व्यक्ती. त्याच्याही असंच घडलं. त्यातच आमच्या गावाकडील व्यक्तीला राग आला व त्यानं त्या व्यक्तीचा खून केला.
जाणा-याचा जीव गेला. कोंबडी जागच्या जाग्यावर राहिली. हे असे का घडले असावे? सर्वजण विचार करु लागले. त्यातच कोणीतरी म्हणाला, 'जी कोंबडी तो फेकायचा. तिला अतिशय वेदना होत. ती घाबरायची. कधी कधी तिला यात लागतही असेल. त्यातच तिच्या तोंडातून शापही निघत असेल. ती म्हणत असेल, मरो जावो बकरा.' ती मुकी होती. शेवटी जे व्हायचं तेच झालं. ज्या कोंबडीचा छळ झाला. ती कोबडी जगली आणि ज्यानं छळ केला. तो मरण पावला. परंतू तो मरण पावला खरा. पण त्यानं त्या कोंबडीला हाताशी धरुन एक निर्दोष गुन्हेगार निर्माण केला होता. ती कोंबडीच आज त्या गुन्ह्याला घडविणारी नायक ठरली होती.
समाजात अशी अनेक मंडळी असतात की जी अशी कोंबडी फेकण्यासारखं वर्तन करीत असतात. आपण जरी भांडखोर नसलो तरी ते भांडायला मजबूर करीत असतात. त्यातच त्यांच्या भांडणातून आपल्यासारखी निर्दोष माणसंही गुन्हेगार बनत असतात. म्हणून वेळीच सावध झालेले बरे!

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

इतर रसदार पर्याय