आधार - भाग 2 Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आधार - भाग 2

आधार कादंबरी भाग दोन

गुरुला आठवत होता तो गतकाळातील प्रसंग. ज्यावेळेस त्यानं विनोद केला होता व त्यानंतर त्याच्याच जीवनाचा विनोद झाला होता. कारण तसा विनोद जरी त्यानं कोणाला उद्देशून केला नसला तरी ती गोष्ट ज्या मुलीसोबत केली होती. तिचं मन दुखावलं गेलं होतं. ज्यातून ती त्याला वाईटच बोलली होती.
विनोद हा कोणाला केव्हा दुखवेल ते काही सांगता येत नाही. विनोद जो करतो, त्याचा कोणाला दुखविण्याचा हेतू नसतोच आणि तो कुणाला दुखवत नाहीच. त्याचा एकमात्र उद्देश असतो, ते केवळ इतरांचं मनोरंजन करणं. परंतु नाण्याला जशा दोन बाजू असतात. तशाच दोन बाजू विनोदाच्याही असल्यानं ज्याच्याशी विनोद केला जातो. त्याच्या मनात नक्कीच संभ्रम निर्माण होतो व संबंध तुटू शकतात. म्हणूनच कोणताही विनोद न केलेला बरा.
विनोदाचे अनेक प्रकार आहेत. शाब्दिक विनोद (कोट्या), शारीरिक विनोद (अंगविक्षेपातून होणारे), प्रासंगिक विनोद वगैरे वगैरे. विनोदबुद्धी कमी असण्याला दोन कारणे आहेत. एक म्हणजे वाचनाचा अभाव आणि दुसरे म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याकडे झालेले पूर्ण दुर्लक्ष. यातूनच विनोदातून समस्या निर्माण होत असतात.
विनोद.......विनोद करणं काही वाईट नाही. विनोदात एवढी ताकद आहे की विनोदानं बऱ्याचशा आजारावर नियंत्रण करता येवू शकतं. तसंच आजाराचं पानीपत करता येवू शकतं. त्यातच दुःखावर मात करुन विजयही मिळवता येवू शकतं. याबाबतीत एक प्रसंग सांगतो.
गुरु.........गुरु आजपर्यंत तरी गंमत करीत करीत जीवन जगत आला होता. त्याला कळलं नव्हतं की जीवनात विनोदाला किंचीतही स्थान नाही. जो विनोद करतो. त्याचाच विनोद होवून जातो.
त्याला एक प्रसंग आठवत होता. तो प्रसंग होता. त्यानं एका मुलीशी विनोदी शैलीत बोलणं. त्याला वाटत होतं की आपण जर विनोदी शैलीने बोललो तर दुसऱ्यांना मजा येते व तेवढाच आनंद मिळतो. त्यालाही आणि आपल्यालाही. परंतु तो त्याचा भ्रम होता. त्याच्या विनोदीपणाचा दुसऱ्यांना रागच येत होता. काय कारण होतं त्यात. ते त्याला कळत नव्हतं.
गुरुचीही ती एक मैत्रीण होती की जी पार्लर चालवत होती. तिला त्यानं विनोदी शैलीने म्हटलं होतं की किती नवरदेवांना आज सजवून दिलं. त्यावर तिला राग आला होता व एवढा राग आला होता की ती म्हणाली होती,
"आता आपले विद्यार्थी जीवन राहिलेले नाही. आता आपण पालक झालो आहोत आणि आपली मुलं ही आता विद्यार्थी आहेत. म्हणून मेसेज करतांना मर्यादेच भान ठेवावे. जसे मेसेज मला करतो ना, तसे तू वहीनीशी बोल किंवा मेसेज कर. तुला गृहस्थ जीवन चांगल कळेल. मी काही नवरदेवच सजवत असते का? या तुझ्या बोलण्यावरुन तुझी काय मानसिकता आहे हे समजायला येते."
विनोद.........विनोद हा कधी कधी अंगाशी येत असतो याचं ते उदाहरण आहे. महाभारतात असाच विनोद झाला. त्या घटनेला विनोदच म्हणता येईल. कोणी त्याला विनोद मानत नाहीत. परंतु तो प्रसंग म्हणजे एक प्रकारचा विनोदच होता.
महाभारताचं युद्ध सुरु होतं. सर्वच रथी महारथी एकमेकांवर बाणांचा वर्षाव करीत होते. प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने एकमेकांशी युद्ध लढत होते. कोणीही कमजोर वाटत नव्हता व कोण युद्ध जिंकेल हेही काही सांगता येत नव्हतं. गुरु द्रोण तर एवढे शक्तीशाली वाटत होते की ते जर जीवंत राहिले तर उद्या आपला निश्चितच पराभव होईल. असं पांडवांना वाटत होतं. अशातीलच तो महाभारतातील एक प्रसंग. महाभारतात एक प्रसंग असा की त्या प्रसंगात पांडवांनी एक योजना बनवली व योजनेनुसार ठरवलं. आपण विनोद करायचा. विनोद हा की आपण अश्वत्थामा मारला गेला हे ओरडून सांगायचं. मग गुरु द्रोण शस्त्र टाकेल. त्यानंतर तो जेव्हा शस्त्र टाकेल. तेव्हा त्यांची हत्या करायची.
तो विनोदच होता. परंतु त्या विनोदात युद्धाच्या योजनेची झालर होती. अश्वत्थामा मारला गेला हे कळताच गुरु द्रोणाचार्यनं आपले शस्त्र त्यागले व ते प्रत्यक्ष सत्य बोलणाऱ्या युधिष्ठिराकडे आले व त्यांना विचारलं की प्रत्यक्ष कोण मरण पावलं. माझा मुलगा अश्वत्थामा की प्रत्यक्ष हत्ती अश्वत्थामा? तद्नंतर युधिष्ठिर बोलले, 'नरो वा कुंजरवा' अर्थात नर आहे की कुंजर आहे हे मला माहीत नाही. परंतु अश्वत्थामा मरण पावला ही बाब सत्य आहे. मग काय, गुरु द्रोणांना वाटलं की प्रत्यक्ष माझाच मुलगा मरण पावलेला आहे. आता शस्त्र हातात ठेवून काय उपयोग? ते शस्र हातात न घेता विलाप करीत राहिले. त्याच संधीचा फायदा घेवून पांडवाच्या पक्षातील धृष्टधुम्ननं गुरु द्रोणाचार्यची हत्या केली. यात महत्वाची गोष्ट ही की विनोदानं नेमकं काय होवू शकतं याची कल्पनाच येते.
विनोद हा आनंददायी जीवन जगण्याची शैली आहे. विनोद जर जीवनात नसेल तर आनंद मिळवता येत नाही. आनंदानं जगता येत नाही. परंतु कधी कधी त्याचा एवढा अनर्थ होतो की अर्थाचे बेअर्थ होतात. विनोद करणाऱ्याला काय बोललो ते कळत नाही. मग चांगले नातेही संपुष्टात येतात. चांगले मित्र तुटतात. कारण त्यांना रागच आलेला असतो. कोणाची विनाकारण हत्याही होते. एकंदरीत सांगायचं झाल्यास माणसाची अवस्था नरो वा कुंजरवा अशीच होवून जाते. कारण एकाच शब्दाचे दोन अर्थ निघत असतात. जसे नभ या शब्दाला अनेक अर्थ आहेत. नभाला कोणी ढगही म्हणू शकतात. कोणी त्याला आभाळही म्हणू शकतात. धरणीला कोणी धरा, कोणी जमीन, कोणी पृथ्वी देखील म्हणतात. तसंच विनोदाचं आहे. विनोदाचेही असेच अनेक अर्थ निघू शकतात. समोरचा जसा अर्थ काढेल तसा. मग त्यावर पुढच्यानं जरी तशा अर्थानं विनोद केला नसेल, तरी ज्याचेवर तो विनोद केल्या गेला, तो त्याला असलेला अपेक्षीत अर्थ काढून संतापतो. तो विनोद न समजल्यानं त्याचा परिणाम मग जो विनोद करतो, त्याची गाथापेढी काढण्यात होतो.
विशेष सांगायचं म्हणजे विनोद हे आपल्या जगण्याची जीवनशैली आहे. ते आपल्या जीवनात मनोरंजन निर्माण करीत असतं. मनोरंजन करण्यासाठी आपण टिव्ही पाहतो. मोठमोठ्या हास्याच्या कार्यक्रमाला जातो. कितीतरी पैसा खर्च करतो असा विनोद ऐकण्यासाठी व आपलं मनोरंजन करुन घेण्यासाठी. परंतु कधीकधी निःशुल्क मिळत असलेले विनोद आपल्याला पचत नाही व त्याचा बाऊ होतो. ज्यातून नातं संपतं. कारण जो विनोद निर्माण होतो. त्यात काही असेही शब्द असतात की जे शब्द........त्याचे दोन अर्थ निघत असल्यानं ते बोचतात किंवा बोचू शकतात.
महत्वपुर्ण गोष्ट ही की विनोद हा समजून घेण्याची गरज आहे. तो समजून घ्यावा व त्यानुसार आपण वागावं. त्याचा बाऊ करु नये. तरच सुखशांतीनं जगता येवू शकतं. नाहीतर विनोद न समजल्यानं आपल्याच मनात संभ्रम निर्माण होवून आपलंच सुख हरवतं. तसं होवू नये म्हणून विनोदाशी संगत केलेली बरी. विनोदात्मक जगलेलं बरं. तसंच विनोदातूनच स्वतःच मनोरंजन केलेलं बरं. कारण तसं केल्यानं जे सुख प्राप्त होतं. ते सुख मोजता येत नाही. तेच सुख आपल्याला अनेक असाध्य अशाच रोगांपासून वाचवत असते. हे तेवढंच खरं आहे. म्हणूनच विनोदावर विश्वास केलेला बरा. त्याला गुन्हा ठरवू नये व तो करणाऱ्यालाही गुन्हेगार ठरवू नये. याचाही विचार करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे विनोद हे एकप्रकारे जगण्याचं साधनच आहे नव्हे तर तत्वज्ञानच. याबद्दल न बोललेलं बरं. ते तत्वज्ञान समजून घेण्याची गरज आहे व अंगीकारण्याची गरज आहे यात शंका नाही.
ज्योतीचं जीवन. किर्तीचं जीवन तसंच गुरुचं जीवन यात काहीशी समानता होती. ज्योतीला एकच मुलगी होती. ती एकच मुलगी त्यांनी स्वखुशीनं ठेवली होती. दुसरं अपत्य त्यांनी होवूच दिलं नव्हतं. ती सक्षम व सशक्त होती. किर्तीची मुलगी दिव्यांग होती आणि गुरुचीही. तिलाही प्रॉब्लेमच होताच.
त्या मुली. ज्योतीची एक मुलगी सोडली तर बाकी दोघांच्याही मुली समस्याग्रस्तच होत्या. तरीही त्यांनी एकच अपत्य ठेवून नियतीचं स्वागतच केलं होतं. नियतीला दोष दिला नव्हता तर एकाच अपत्याला सर्वतोपरी सुख मिळालं या भावनेनं त्यांनी एकच अपत्य ठेवलं होतं आणि हे एकच अपत्य ठेवत असतांना त्यांनी भविष्याचाही विचार केला होता. भविष्यात त्यांनाही दुःख वाटू नये तर त्यांच्याही वाट्याला अपार सुख यावं असंच वाटत होतं त्यांना.
ज्योतीला तिच्या बालपणात झालेल्या वेदना, किर्तीला तिच्या बालपणात झालेल्या वेदना ऐकून गुरुला आठवत होतं त्याच्या पत्नीचं जीवन. त्याची पत्नीही त्या दोघींसारखीच बदनशिबीच होती. त्याच्या पत्नीचं नाव आरती होतं.
आरती जेव्हा दहावी झाली, तेव्हा तिच्या आईची दृष्टी गेली होती. ती आंधळी झाल्यावर तिच्याही डोक्यात फरक पडला होता. वडीलही अपंगच होते. ते चालक होते व त्याच दरम्यान एकदा झालेल्या अपघातात त्यांच्या पायाला लागलं होतं. ते जास्त गाडी चालवू शकत नव्हते.
आईची दृष्टी जाणं, त्यातच बाबांचा झालेला अपघात. शिवाय सुदैवानं दहावी पास होणं. परंतु जवळ पैसा नसल्यानं काय करावं हा विचार आरतीला होता. घरात एक मोठा भाऊही होता. त्याचा विवाह झाला होता व आलेली गंभीर परिस्थिती पाहून तो आपली पत्नी व मुले घेवून किरायाच्या घरी राहायला गेला होता. अशातच घरी उपासमार होत होती व ती उपासमार पाहून आई बडबड करायला लागली होती.
आरती ही मधली मुलगी होती त्या घरातील. अशातच मोठ्या भावानं वेगळी चूल मांडल्यानं घराची सर्व जबाबदारी आरतीवर येवून ठेपली. त्यातच लहान बहिण. ती बहिण नुकतीच आठवीत गेली होती. तिचंही शिक्षणपाणी होतंच. शिवाय घरात खायला लागणारा पैसा. त्यातच घरातील कपडे लत्ते.
ज्योतीचं ठीक होतं. कारण तिच्या बहिणीला म्हणजे पुजाला दहावीतच असतांना रेल्वेमध्ये सरकारी नोकरी लागली होती. किर्तीच्याही घरी तिची आई कामाला जात असे. त्यातच आता बहिणही. परंतु आरतीच्या घरी मात्र कामाला जाणारं कोणीच नव्हतं. अशातच ती दहावीही पास झाली होती.
आरतीचे मायबाप दोघंही जिवंत होते. परंतु दोघंही घरीच बसलेले होते. अशातच आरती हिंमत हारली नाही. ती लढत होती परिस्थितीशी. त्यानंतर तिनं तिच्याच वडीलाच्या एका मित्राच्या एसटीडी वर नोकरी पकडली.
आरतीनं एस टी डी वर नोकरी पकडली. त्यानंतर तिनं अकरावीचा फॉमही भरला व तिनं महाविद्यालयात जाणं सुरु केलं. मात्र या धुमश्चक्रीत तिला फारच त्रास झाला. आता ती सकाळी स्वयंपाक करुन दिवसभर महाविद्यालय करीत असे व रात्रीला एस टी डी वर राहात असे. त्यानंतर एस टी डी वरुन घरी येवून स्वयंपाक करीत असे. कधीकधी सायंकाळचा स्वयंपाक तिची बहिण करुन घेत असे.
आरती दिवसरात्र खपत असे. कधीकधी तिला रडूही कोसळत असे. परंतु ती आपलं रडू कोणाला दाखवत नव्हती. ती शोषत होती त्या वेदना. परंतु ना कोणासमोर हतबल होत होती. कधीकधी तिला एस टी डीत नोकरी देणारा तिच्या वडीलाचा मित्र तिला मदत करीत असे. तो तर एवढा तिचा बॉडीगार्ड बनला होता की तिच्या तारुण्यावर कोणी शिंतोडेही उडवू शकत नसत.
सहा महिने झाले होते. वडील कसेबसे दुरुस्त झाले. त्याचबरोबर ते थोडेसे चालायला लागले होते. घाव पुर्ण भरले नव्हतेच. अशातच त्यांनी गाडीवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी एक गाडी पाहिली व ते एका ट्रकवर आरुढ झाले.
आरतीचे वडील पुर्ण बरे झाले नव्हतेच. अशातच त्यांनी एका गाडीवर नोकरी पकडली. त्याचं कारण होतं घरची नाजूक परिस्थिती. त्या परिस्थितीनं त्यांना कामासाठी मजबूर केलं होतं. अशातच ते आपल्या पायाच्या जखमेला बँडेज करीत व कामाला जात असत.
त्या सर्व भानगडी पोटासाठीच होत्या. त्याचा परिणाम हा झाला की ते घाव पुर्णतः बरे होण्याऐवजी ते चिघळत गेले. परंतु आरतीच्या वडीलांनी त्याची तमा बाळगली नाही. अशातच आरतीच्या आईला एका गंभीर आजारानं घेरलं. परंतु त्याही परिस्थितीत आरती शिकत होती आणि तिची बहिणही शिकत होती. घरची सर्व कामं करुन. आरती आताही एस टी डी वर जात होती.
आरती शिकत होती. हळूहळू आरती शिकून शिक्षीका बनली व एका शाळेत रुजू झाली. परंतु दैव काही तिचं खुललं नव्हतं. शाळेच्या संस्थाचालकानं आश्वासन दिलं होतं की तो तिला सरकारी नोकरी देणार. परंतु सरकारी नोकऱ्या काही झाडाला लागल्या असतात का की तिला लगेच नोकरी मिळेल.
आरती ज्या शाळेत लागली. तिथं तिला फक्त पाचशेच रुपये वेतन मिळायचं. ज्या वेतनातून तिचा स्वखर्च चालायचा. अशातच काळानं गिरकी घेतली व पुन्हा तिच्या वडीलांच्या पायाची जखम मोठी झाली. आता वडील कोणतंच काम करु शकत नव्हते.
वडील कोणतंच काम करु शकत नव्हते. आता पुन्हा एकदा सर्व जबाबदारी आरतीवर आली. घरची परिस्थिती पुन्हा एकदा नाजूक झाली. पोटाचा प्रश्न खऱ्या अर्थानं निर्माण झाला. पोटासमोर आईच्या औषधाचा खर्च बंद झाला. मग काय, जे व्हायचं तेच झालं. औषध न मिळाल्यानं एक दिवस आई मरण पावली व आरतीसह संपुर्ण परीवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. याच दरम्यान आरतीची बहिण स्टॉप नर्सच्या प्रशिक्षणाला लागली होती. तिला महाविद्यालयात स्टॉयफन मिळत असे व तिच्या शिक्षणाचा खर्च त्यावर भागत असे.
आरतीची आई मरण पावली होती. लाचार असलेली आरती आपलं दुःख कोणाला सांगू शकत नव्हती. काळजावर तिच्या पहाडच कोसळला होता. परंतु त्या दुःखाचा तिनं बाऊ केला नाही. अशातच तिची मुलाखत गुरुशी झाली.
गुरु तिच्याच शाळेत असलेला एक गृहस्थ. तोही शिक्षक होता. सर्वसाधारण कुटूंबातून आलेला गुरु. गुरुला सुरुवातीला तिची परिस्थिती दिसलीच नाही. परंतु तरीही त्यानं तिला विवाहासाठी ऑफर दिली होती. परंतु ती आपला विवाह कसा करणार? तिला प्रश्न होता की येणारा तिचा पती तिच्या वडीलाची सेवा करेल काय? तसा प्रश्न तिनं ना गुरुशी बोलून दाखवला. फक्त एवढंच म्हटलं की मी सध्याच विवाह करु शकत नाही आणि गुरुही किती दिवस तिची वाट बघणार. त्यानं आपला विवाह केला होता व तो मोकळा झाला होता.
गुरुचे काही दिवस बरे गेले. काही दिवसानंतर गुरुच्या संसारात वितुष्ट आलं. त्याची पत्नी म्हणजे मायबापाची लहान कन्या. तशा त्या मुलीच होत्या. शिवाय ती सर्वात लहान असल्यानं जास्त लाडाची. मग काय, तिचं म्हणणं होतं की तिच्या सासूला वृद्धाश्रमात टाक व तिच्या माहेरी राहायला चाल. तशी ती भलतीच अट. मग काय, गुरुनं ते ऐकलं नाही. त्यामुळंच की काय, ती त्याला सोडून गेली व इथंच गणित जुळलं.
गुरु आपल्या पत्नीला आणण्यासाठी बराच प्रयत्न करु लागला. परंतु ती येईल तेव्हा ना. तशी त्याला तिची फारच आठवण यायची. जीव कासावीस व्हायचा. परंतु उपाय नव्हता. अशातच तीन चार महिने गेले.
ते तीन चार महिने झाले असतील. पत्नी जी माहेरी जावून बसली. ती यायला खाली नव्हती. गुरुनं सारे प्रयत्न करुन पाहिले. परंतु सारे व्यर्थ गेले. ते पाहून गुरुला अचानक आठवली आरती. जिला त्यानं विवाहापुर्वीच विवाह कर म्हटलं होतं. तशी तिची परिस्थितीही आठवायला लागली होती. ती मृत झालेली आई व तो लंगडा असलेला बाप. ती दयनीय परिस्थिती. त्यातच भाऊ भावजेचं तिला सोडून जाणं. सारं काही आठवत होतं. शेवटी त्यानं उपाय काढला व एक दिवस हिंमत करुन गुरु तिच्या घरी गेला.
गुरु आरतीच्या घरी गेला होता. त्यानंतर त्यानं तिची विचारपुस केली व आपलं रडगाणं सांगीतलं व म्हटलं की त्याला आता सारखी त्याच्या पत्नीचीच आठवण येते. घरी करमत नाही. घर खायला धावते. काय करावे.
आरतीही तेच बोलत होती. शेवटी आरती म्हणाली,
"नसेल करमत तर याल माझ्या घरी. मलाही घरी करमत नाहीच."
आरती व गुरु. दोघंही दुःखीच होते. तसं दोघांचंही सुत जुळलं होतं. मग काय, गुरुला तिची गरज वाटली व तिला गुरुची गरज वाटली. त्यानंतर गुरु तिच्या घरी यायला लागला. तिला मदत करायला लागला. तिही त्याचे घरी जायला लागली व तिही त्याला मदत करायला लागली व अचानक त्यांच्यात प्रेम निर्माण झालं. मग प्रश्न निर्माण झाला विवाहाचा. विवाह करणार कसा? आपला तर घटस्फोटच झालेला नाही. शेवटी ठरवलं की लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचं.
लिव्ह इन रिलेशनशीप. विवाह न करता? ते शक्य वाटत नव्हतं. शिवाय प्रश्न होता की तिच्या वडीलाला पोषणार कोण? गुरुनं पोषण्याचं आश्वासन दिलं. परंतु तरीही लिव्ह इन रिलेशनशीप मंजूर नव्हती तिला. जर विवाह न करता मुलं झाली तर..........त्याला समाज कसा स्विकार करेल. प्रश्न मोठा गंभीर होता. राजरोषपणानं विवाह करताच येत नव्हता. शेवटी ठरलं, लपूनछपून विवाह करायचा. मग लपूनछपून विवाह झाला. परंतु आता विवाह झाला असला तरी प्रश्न संपलेला नव्हता. प्रश्न होता गुरुच्या आईचा. कारण गुरुची आई सध्या जिवंत होती व ती असतांना आरतीचे वडील त्याच्याकडे येवून राहायला तयार नव्हते. काय करावं हा विचारच होता. अशातच गुरुची पहिली पत्नीही त्याचेवर पाळत ठेवून होती व एक दिवस तिला कळलं. तिला कळलं की गुरुनं दुसरा विवाह केलाय. मग काय, तिची तारांबळ उडाली. ती विचलीत झाली व विचार करु लागली की मी असतांना हा विवाह झालाच कसा? तशी ती त्याचेकडे आली. म्हणाली,
"आपण विवाह केलात."
"होय."
"मी असतांना?"
"तुला यायला कोणं मनाई केली?"
"म्हणजे?"
"म्हणजे आताही तू येवू शकतेस."
"तू छप्पन बायका केल्या तरीही."
"छप्पन काय, तू सत्तावनवी समज."
"तेच काम आहे का?"
"मग नसेल जमत तर जा इथून. सुरुवात काय मी केली होती का. तुला मी जा म्हटलं होतं काय?"
शब्दावर शब्द वाढत जात होते. अशातच शेवटी ती म्हणाली,
"मला आता तुमच्याकडे राहायचं नाही. मला घटस्फोट हवाय."
"ठीक आहे. तू जसं म्हणशील तसं."
तिनं घटस्फोट मागीतला व रितीरिवाजानुसार गुरु तिच्या बंधनातून मोकळा झाला. परंतु दुर्भाग्यानं गुरुला सोडलं नाही. दुर्भाग्य असं की ते त्याच्या मुलीच्या जीवावर बेतलं. घटस्फोटाच्या पुर्वीच त्याला मुलगी झाली होती. ती जेव्हा गर्भात होती. तेव्हा नाना तऱ्हेचे विचार त्याच्या मनात होते. त्यातच काही विचार त्याच्या पत्नीच्याही मनात असतीलच. तेच विचार शुभद्रेच्या गर्भात असलेल्या अभिमन्यूसारखे आरतीच्या पोटात असलेला गर्भ ऐकत होता. तसं पाहता शाळेतील मुख्याध्यापकही बरोबर नव्हता. त्यानं आरतीला आरामाची संधीच दिली नव्हती. त्यामुळंच संपुर्ण नऊ महिने आरामच झाला नव्हता.
आरतीची नोकरी सुरुच होती. अशातच एके दिवशी पोट दुखून आलं व तिला मुलगी झाल्याचं डॉक्टरांनी सांगीतलं. परंतु काही क्षणातच दिसलं की तिची आतडीच तिच्या छातीच्या कप्प्यात गेलेली आहे व तिला श्वास घ्यायला अडचण येत आहे. मग काय, वेळीच ऑपरेशन केलं तर ठीक. नाहीतर ती केव्हाही प्राणास मुकू शकते.
विचारांचा अवकाश. तो काळ असा होता गुरुसाठी की त्याचेजवळ पैसाच नव्हता. लोकं म्हणत होते की खाजगी इस्पितळात ऑपरेशन करावं. परंतु कमीतकमी दोन लक्ष तरी रक्कम लागेल. साळभाऊ म्हणत होता. घर विकून टाक. परंतु सगळा विचार गुरु करीत होता. प्रसंगी घरही विकलं आणि नाहीच वाचली मुलगी तर.......तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती धुपाटणं यायचं. नाही, नाही. आपण सरकारी रुग्णालयात हिचं ऑपरेशन करायचं.
गुरुनं ऑपरेशनची दिशा ठरवली. सरकारी रुग्णालयात ऑपरेशन करायचं ठरवलं. परंतु ते सरकारीच रुग्णालय. तिथं लवकर उपचार होईल तेव्हा ना. त्याला दिरंगाई लागत होती. डॉक्टरांचं म्हणणं होतं, एवढं लहान वय. वय नव्हे तर दिवस. ऑपरेशन केलं तर बाळ मरुन जाईल आणि गुरुचं म्हणणं होतं, जेही होईल, ते नशिबानं होईल. आधी ऑपरेशन करावं.
गुरुची दाणाखिचडी मचत होती. मुलगी सरकारीत भरती होती व तिची आई खाजगीत. मुलगी वर शिक्यावर होती लटकलेली. जिथं गुरु होता. सलाईन लावली होती पायाला. डॉक्टरचं म्हणणं होतं, पाय हलू द्यायचा नाही. पकडून ठेवायचा. काय करावं सुचत नव्हतं. सलाईन जर ब्रेक झाली तर मुलगी जगणार नाही. परंतु त्याही काळात ते इवलंसं बाळ त्याला हिंमत देवून गेलं. त्या सलाईन मधून डॉक्टर इंजेक्शन देत होते इतर बाळांना. तेव्हा ती बाळं रडत होती आणि गुरुचं बाळ रडत नव्हतं. तीच हिंमत. त्याच हिंमतीच्या भरवशावर गुरु त्यावेळेस तब्बल सहा दिवस झोपलाच नाही. दैवानं आणि देवानं त्याची झोप पळवून नेली होती लक्ष्मणासारखी. लक्ष्मणाकडे निद्रादेवी जेव्हा आली. तेव्हा तिनं म्हटलं की मला जागा दे. लक्ष्मणानं सरळ उत्तर दिलं होतं की आता मला प्रभू श्रीरामाचे काम करायचे आहे. मी जर तुला जागा दिली तर प्रभू श्रीरामाचे काम मला करता येणार नाही.
ते सहा दिवस अजुनही गुरुला आठवत होते. ते आठवले की गुरुच्या अंगावर आजही रोमांच उभे राहत होते. ते त्याच्या शाळेतील मुख्याध्यापकाचे बोलणे आठवत होते त्याला. तो म्हणत असे की त्या शाळेतील मुलांचे नुकसान होत आहे. ते आधी पाहा. ही जगणार तरी आहे का? अन् मरण पावलीच तर दुसरी पैदा करता येईल. परंतु विद्यार्थ्यांचं जर नुकसान झालंच तर ते कधीच भरुन निघणार नाही. तेव्हा अतिशय राग यायचा. परंतु गुरु तेव्हा ते आपलं प्रारब्धच आहे असं समजून त्या गोष्टी सोडून द्यायचा.
दिवसामागून दिवस जात होते. रात्र अन् दिवस एकच वाटत होता. ना शौचालयात जाता येत होतं. ना जेवन नीट करता येत होतं. अन्न गोड वाटत नव्हतं. काय करावं सुचत नव्हतं. अशातच सहा दिवस निघून गेले व त्याची पत्नी तिथं आली. आता मात्र त्याला थोडीशी विश्रांती मिळाली होती.
ते रुग्णालयातील दिवस. ते फार कठीण जात होते. अशातच त्याच्या मुलीला आज एकवीस दिवस पुर्ण झाले होते व तो आज ड्युटीवर गेला होता. त्यानंतर त्याला यायला नेहमीप्रमाणेच आजही दोनच वाजले होते. अशातच तो जेव्हा रुग्णालयात आला. तेव्हा आरतीनं पुर्ण पिशव्या भरुन ठेवल्या होत्या. कारण विचारताच ती म्हणाली होती की आता आपली मुलगी जगूच शकणार नाही. डॉक्टर म्हणतात की तिला सलाईन लागत नाही. तीनदा डॉक्टरांनी सलाईन लावली. मग काढून ठेवली. सकाळपासून सलाईन गेली नाही बाईच्या पोटात. तशी ती सलाईनवरच जगते. काय करावं. दूध सुद्धा पीत नाही ती. तसं पाहिल्यास ती लहान असल्यानं व डॉक्टरांनी नकार दिल्यावर तिला दूधही पाजता येत नव्हतं.
तो वार मंगळवार होता. दूध बंद. सलाईन बंद. जगण्याचं साधन पार बंद. तसं ते लहानसं बाळ. वरणभात तोंडातून द्यावं तर तेही बंदच. काय करावं सुचत नव्हतं. अशातच त्या मंगळवाऱ्या दिवशी प्रत्यक्ष एक परिचारिका देवीचं रुप घेऊन आली. म्हणाली,
"का बसलात असे उदास? मी मगापासून बघतेय. दररोज आनंदात असता अन् आज?"
त्या परिचारीकेचं ते बोलणं. तशी ती बोलत होती. तोच आरतीनं हळूच डोळ्यातून अश्रू काढले. तशी ती परिचारीका म्हणाली,
"रडू नका. काय झालं ते सांगा. मी प्रयत्न करुन बघते. लागली तर लागली. देवाची इच्छा. जे काम डॉक्टरांना जमलं नाही. ते काम मला जमते का म्हणून बघते. परंतु कोणाला सांगाल नको."
गुरुनं त्या परिचारीकेला आपली सर्व कैफियत सांगीतली. तशी ती आपले प्रयत्न करायला तयार झाली. गुरुनं तशी ती गोष्ट गुप्त ठेवण्याचं आश्वासन दिलं. तशी त्या परिचारीकेनं सलाईनची सुई लावून दिली व भाग्य खुलले. ती सलाईनची सुई प्रत्यक्ष देवीनंच लावल्यासारखी लागली व त्याच दिवसापासून भाग्य खुलले. आता ती सुई भरपूर दिवस चांगली होती व तेथूनच हाता पायाच्या सर्व नसा खुलल्या होत्या.
आज एक महिना झाला होता. जुना डॉक्टर बदलून नवीन डॉक्टर आला होता. गुरुनं त्याला आपली समस्या सांगीतली होती व म्हटलं होतं की मला एक महिना होत आहे. शिवाय मी कोणत्याही परिणामाला तयार आहे. आपण ऑपरेशन करावं. त्यावर डॉक्टरांनी म्हटलं, "आधी दोन बाटलीत रक्त गोळा करा. मग ऑपरेशन करतो. कारण रक्ताची आवश्यकता आपल्या मुलीला पडू शकते. त्यावेळेस गुरुनं पहिल्यांदाच रक्तदान केलं होतं आपल्या बाळीला वाचवायला. त्यावेळेस फार भीती वाटत होती. कारण त्यावेळेपर्यंत त्यानं कोणालाच रक्तदान केलेलं नव्हतं.
गुरुच्या मुलीचं ऑपरेशन झालं होतं. तिला काही टाके पडले होते. तशी आरती काही दिवस घरी होती. परंतु काही दिवसांनी ती नोकरीवर जाईंड झाली. दोन पैसे पुढे मिळतील. आपणालाही कायम स्वरुपाची नोकरी लागेल या हेतूनं. परंतु गणित चुकलं. संस्थाचालक फारच त्रास देणारा होता. त्यातच मुख्याध्यापकही. तो काम करुन घेत होता. परंतु बदल्यात तो तिला काहीही देत नव्हता. उलट आस दाखवत होता की तिला तो कायम करेल व कायम स्वरुपाची नोकरी लागेल. परंतु ते पोकळ आश्वासनच होतं. मागील दहा वर्षापासून मिळत असलेलं. तसंही त्याच्या मुलीचं मोठंच ऑपरेशन असल्यानं ते टाके थोडेफार दुखत होतेच. तिला आपल्या आईची सक्त आवश्यकता होतीच. शेवटी गुरुनं ठरवलं की आता नोकरीची आस बाळगायची नाही. नोकरीवर पाणी फेरायचं. मग काय, तसा विचार त्या दोघांनीही पुर्णपणे केला व ती नोकरी सोडली.
काही दिवस बरे गेले. त्यानंतर गुरुनं विचार केला. आपल्या मुलीनं फारच त्रास भोगलाय तिच्या आयुष्यात. आता तिला जास्त दुःख होवू द्यायचं नाही. शिवाय तिचं प्रेमही विभाजीत होवू द्यायचं नाही. आपण एकच अपत्य ठेवायचं. दुसरं होवू द्यायचं नाही. तसा विचार करुन गुरुनं एकच अपत्य ठेवलं. शिवाय दुसरं एक कारण होतं. ते म्हणजे मुलीचा विवाह करतेवेळी लागणार असलेला हुंडा. परंतु आज त्याला कळलं होतं की हुंड्याचा मुकाबला आपण सहजपणे करु. कारण हुंडा घेणारा जसा दोषी. तसाच दोषी असतो देणाराही. अलिकडे जी एस टी प्रकार आल्यानं हुंडा देत असतांना जी एस टी बिलं लागतात. त्यामुळंच आपणही हुंडा मागणाऱ्याला जी एस टी बिलासह हुंडा देवू. जर त्याला मंजूर नसेल तर हुंडा द्यायचाच कशाला?
मुलीच्या विवाहाची चिंता ही त्याला आधीपासूनच सतावत होती. माहीत नव्हतं की काळ बदलणार आहे व मुलींना किंमत येणार आहे. परंतु काळ अगदी झपाट्यानं बदलला होता. भ्रृणहत्येनं शेकडो मुलींची हत्या झाली होती. त्यामुळंच अगदी सहजपणे मुली कमी झाल्या आणि मुलांची संख्या वाढली. आता वाढती मुलांची संख्या पाहून मुलींना भाव आला. हुंडा पद्धती कालबाह्य ठरली व गुरुच्या मुलीच्या विवाहाचा प्रश्न मिटला. मध्यंतरीच्या काळात एक वेगळीच समस्या उद्भवली होती गुरुच्या मुलीला. तिही कालांतरानं दूर झाली. मात्र हा गुरु भोगत असलेला काळ. या काळात गुरुला मार्गदर्शन करायला कोणी आलं होतं. ना कोणी मदतीला आलं होतं. तो स्वतःच आपली पावले टाकत होता आणि स्वतःच स्वतःच्या जीवनाचा रस्ता बांधत होता. आज सगळेच येतात. सगळे त्या बांधलेल्या रस्त्यावरुन चालू पाहतात. कारण आता तो जीवनाचा रस्ता हा भव्यदिव्य बनलेला आहे. त्यावर आता कोणी घसरत नाही. ना त्या रस्त्यावर आता दगडधोंडे आहेत. आज तो रस्ता एकदम गुळगुळीत झालेला आहे.
काही लोकांना सवय असते, नुसते उपद्रवी कारनामे करायची. आपल्या बुद्धीचा वापर ते अशाही पद्धतीनं करीत असतात. परंतु बुद्धी आहेच तर नुसते उपद्रवी उद्योग करण्याऐवजी कामधंदे करावे. असे काहींचे मत आहे. जेणेकरुन कामात लक्ष लागून सुकार्य कार्य घडेल. उपद्रवी कार्य घडणार नाही. परंतु कधीकधी उपद्रवी कार्य करणंही शुभ लक्षण ठरु शकते. उदाहरणार्थ थॉमस अल्वा एडीसन.
थॉमस अल्वा एडीसन हे असे व्यक्तीमत्व होते की त्यांनी आपल्या शेतीतच असलेल्या धानाच्या गंजीला आग लावली होती. ते उपद्रवीच कार्य होतं. दुसऱ्या त्यांच्या कार्याबाबत बोलायचं झाल्यास त्यांनी रेल्वेत केलेले प्रयोग. त्या प्रयोगानंतरही रेल्वेगाडीला आग लागली होती. परंतु ते जरी उपद्रवी कार्य असलं तरी त्यातून वीज निर्माण होणं हे उपयोगी कार्य घडलं. त्यामुळंच कोणत्याही कार्याला उपद्रवी कार्य म्हणताच येत नाही.
कार्य कोणतंही असो, मग ते उपयोगी असो की उपद्रवी असो, कार्य कार्यच असतं. कधी त्या कार्याला कोणी वाईटही ठरवतात तर कोणी त्या कार्याला चांगलंही मानतात. काल वाईट असलेली कृती कदाचीत प्रदीर्घ कालावधीनंतर चांगलीही वाटू शकते आणि काल चांगली असलेली कृती कोणाला प्रदीर्घ कालावधीनंतर वाईटही वाटू शकते. तसं पाहिल्यास आज राजालाही शिव्या हासडणारे भरपूर आहेत. जरी त्याचं कार्य चांगलं असलं तरी. उदाहरण द्यायचं झाल्यास हापकिन या शास्रज्ञाचं देता येईल. ज्यावेळेस पुण्यामध्ये प्लेग पसरला होता. त्यावेळेस हापकिन या शास्रज्ञाने प्लेगवर अथक परिश्रम करुन प्लेगची लस शोधून काढली होती. मग ती लस कोणीच घेईना. कारण लोकांचा त्या लसीवर विश्वास नव्हता. मग काय, आपण सुरक्षीत लस तयार केली आहे, हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी सार्वजनीकरित्या आधी स्वतःला इंजेक्शन टोचून दाखवले. ही हापकिनची कृती उपद्रवीच होती. परंतु तद्नंतर तीच कृती जगाच्या दृष्टीनं कल्याणकारी ठरली. दुसरं उदाहरण कैकेयीचं देता येईल. तिनं रामाला वनवासात जा म्हणणं ही कृती उपद्रवीच होती. परंतु त्यातून चांगलं कार्य घडत गेलं. ते कार्य म्हणजे जगाला त्रास देणाऱ्या तमाम घटकाला नष्ट करता आलं. महाभारताचंही तेच उपहासात्मक विनोदाचं उदाहरण म्हणजे नरो वा कुंजरवा. तिही उपद्रवीच कृती. परंतु त्यानं द्रोणाचार्यसारखा व्यक्ती मारला जाणं हे पांडवांच्या दृष्टीनं चांगलं कार्य होतं.
एक महान व्यक्ती जेव्हा घडतो. त्याच्या विचारांची पुनर्बांधणी होते, तेव्हा त्याला बऱ्याच कृती कराव्याच लागतात. कधी कधी त्याला समाज रोषाला समोरे जावे लागते. परंतु तसं जात असतांना जरी त्याचं काही चूकत असेल तर चूक मानून पुढचं पाऊल टाकावंच लागतं. जर ते टाकलं नाही तर कार्यभाग संपतो. समाजात असेही घटक असतातच की जे कोणी पुढे जात असेल तर त्यांची पावले थांबवतात. कोणी जीवंत समाधी घ्यायला भाग पाडतात. नंतर त्यांचा उदोउदो करतात. कोणी इंद्रायणीत संबंध गाथाच बुडवतात. मग तीच गाथा पाण्यावर तरंगत होती हेही सिद्ध करतात.
एक शास्त्रज्ञ वा महान व्यक्ती तोच बनू शकतो की जो समाजाचा रोष सहन करतो. स्वतः संकटं झेलतो. लोकांचे बोलणे ऐकतो आणि आपली वाटचाल करीत असतो. सावित्रीबाईंनी ज्यावेळेस महिला वर्गाला पुण्यात शिकवलं, तेव्हा तिच्यावर शाळेत शिकवायला जात असतांना शेणाचा व धसकटाचा मारा झाला व तो त्यांना सहन करावाच लागला. याचाच अर्थ महान जर बनायचं असेल तर 'कुत्ते भोके हजार, हाथी चले बाजार' असं वागायलाच हवं महान बनणाऱ्यांनी. कारण कधी कधी कुणाचे समज हे गैरसमज ठरु शकतात. कोणी स्वतःला श्रेष्ठ समजण्याच्या नादात दुसऱ्यांना कनिष्ठ समजत असतात. वैचारीक स्वतंत्र्यता असूनही त्यानं असं वागावं, त्यानं तसं वागावं असं सांगीतलं जातं. मग विचारांच्या फैरी व वादाच्या फैरी झडत असतात. त्यामुळंच त्या गोष्टीचा विचार जास्त न केलेलाच बरा. महाभारतातील युद्धादरम्यान नरो वा कुंजरवा या प्रसंगाच्या विनोदात्मक लेखनावर एक मित्र म्हणतो,
"विनोद म्हणजे निखळ मनोरंजन. समोरच्याला न दुखवता, वाईट न वाटू देता त्याच्या चेहर्‍यावर हास्य फुलविणे म्हणजे विनोद होय. पण या लेखात विनोदाची सांगड तू चुकीच्या प्रसंगाशी जोडली आहे. कोणाचा मुत्यू किंवा त्याची बातमी हा विनोद असूच शकत नाही. रणांगणावर अश्वत्थामाचा मृत्यू झालेला आहे, हा विनोद नसून ती अफवा होती. हवं तर ते पांडवांनी रचलेलं षड्यंत्र होते. कारण त्यांना माहिती होतं की आचार्य द्रोणाचार्य हे सर्वश्रेष्ठ योध्दा आहे, पण त्याही आधी ते एक वडील आहेत. कारण कोणत्याच पित्याला त्याच्या मुलाच्या मृत्यूची अथवा विरहाची बातमी ऐकून आंनद अथवा विनोद होणारच नाही. तेव्हा तू दिलेला संदर्भ, उदाहरण हे विनोद या शब्दाच्या व्याख्याला अनुसरून नाही. हवं तर तू दुसरं समर्पक असं उदाहरण दे, जेणेकरून ते या लेखाला उचीत न्याय देईल."
विनोदात्मक भाषेत सांगायचं झाल्यास विनोद हे पाहात नाही की पुढील व्यक्ती हा मृत्यू पावलेला आहे की जीवंत आहे. कधीकधी मृत्यूच्या वेळेसही लोकं विनोद करुन जातात. मग म्हणावं लागतं की चूप बसा, नाहीतर कोणी ऐकून घेईल. विशेष म्हणजे मृत्यू हा घटक सुखदता देणारा असो वा नसो विनोद हा अगदी सहजच घडून येत असतो.
महत्वाचं सांगायचं म्हणजे कोणत्याही गोष्टीला दोन बाजू असतात. आपण फक्त एकच बाजू समजून घेतो. दुसरी बाजू लक्षातच येत नाही. तसेच कोणतेही प्रसंग कुणासाठी थांबत नाही. जर एखादा वाईट प्रसंग घडलाच तर लागलीच त्यावर दोन पाऊल मागं टाकून पुढची वाट धरावी लागते. त्याचा बाऊ करीत कार्य करणं सोडून द्यावं लागत नाही. तरंच जीवनात यशाच्या शिखरावर जाता येतं. पश्चातापाचे अश्रू निरंतर रडत वा गात बसावे लागत नाही. कारण काळ हा कुणासाठीही थांबत नाही. तो पुढे पुढे सरकत असतो. म्हणूनच कार्य करतांनाही माणसानं हेच लक्षात घ्यायचं असतं. मग ते कार्य उपयोगी का असेना वा ते कार्य उपद्रवी का असेना. त्याची समीक्षा समाज करेलच. कारण विधात्यानं बरंवाईट म्हणणाऱ्यांचाही एक वर्ग बनवला आहे. तो वर्ग वाईट म्हणणारच नसेल तर बरंवाईट कसं कळेल. त्यामुळंच कोणी काहीही म्हणोत. आपलं बोलणं, आपलं वागणं, आपलं हसणं, आपलं लिहिणं संपवायचं नसतं. कारण ही सृष्टी आहे. या सृष्टीतही एक दिवस कोणीतरी मरणार आहे आणि कोणीतरी नवीन जन्म घेणारच आहे. म्हणूनच समाजाच्या कोणत्याही कृतीचा बरावाईट परीणाम स्वतःवर होवू देवू नये. कार्य निरंतर करीत राहावे. मग ते कार्य चांगले असो वा नसो. समाज आहे त्याची समीक्षा करायला. तो समाज बरेवाईट म्हणणारच आहे. त्याचा एवढा विचार करु नये व कधीच मनाला लावून घेवू नये. कारण काल रामाची कृती जरी चांगली असली तरी आज त्या रामावरही लांच्छन लावणारे जगात कमी नाहीत. यात शंका नाही. म्हणूनच कार्य करीत राहावे. स्वतःला कार्यात गुंतवून ठेवावे व पुढे जाण्याची दिशा ठरवावी. मागचे काही घडलेले बरेवाईट विसरावे. जेणेकरुन पुढची पायरी चढता येईल. यशस्वीपणानं आणि तेवढ्याच ताकदीनं पाऊलही टाकता येईल हेही तेवढंच खरं आहे.
गुरुच्या मुलीला आलेली ऑपरेशनची वेळ. ही वेळ त्याच्या शाळेतील मुख्याध्यापकामुळंच आली होती. त्यानं आरती व गुरुला एकाच पाळीत नोकरीची शिप दिली नव्हती. ती एकाच पाळीत देता आली असती. परंतु त्यानं जाणूनबुजून गुरुला त्रास व्हावा म्हणून तशी योजनाच तयार केली होती. शिवाय आरतीलाही आस होती की आपल्याला नोकरी लागेल. आपल्यालाच आधार होईल. परंतु तद्नंतर तिला कळलं की तो आधार नव्हता तर ते एक विघ्न होतं आपल्या आयुष्यात येवू घातलेलं.
ती सकाळी होती आरतीची शाळा व गुरुची शाळा दुपारी होती. शिवाय तो मुख्याध्यापक जेव्हा गुरुची बाळी भरती होती. तेव्हा येवून म्हणायचा,
"ही काय वाचणार आहे का? हिला सोडा व विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान सांभाळा."
असं त्या मुख्याध्यापकानं म्हणताच गुरुला अतिशय राग यायचा. परंतु त्याला तो ज्योतीसारखाच प्रारब्धच समजून त्यावर कानाडोळा करायचा. आज विशेष सांगायचं झाल्यास जो मुख्याध्यापक गुरुच्या मुलीबाबत असे म्हणायचा. तो आज जिवंत नव्हता. आज गुरुची मुलगी जिवंत होती.
तो महिलादिनच होता की गुरुला मुलगी झाली होती. आज तब्बल त्या गोष्टीला सोळा वर्ष झाली होती व ती बाळी, ते रुग्णालय, त्या रुग्णालयात मिळालेली ती देवीरुपातील परिचारीका व तो गुरुनं केलेला सर्व संघर्ष, गुरुला आठवत होता व हेही आठवत होतं की ज्या काळात बाळंतिणीला मेव्याचे लाडू खायला मिळायला हवे होते, ज्या बाळंतिणीची त्या काळात काळजी वाहायला हवी होती. ज्या बाळंतिणीला जमीनीवर नाही तर पलंगावर आराम करणं भाग होतं. त्या काळात तिला तिचे अख्खे दिवस रुग्णालयात काढावे लागले, तेही जमीनीवर. ती थंड फरशी अंगाला भेदत होती. तसंच कोणी काळजी घेतली नव्हती आणि काळजी घेईल तरी कोण? ना त्या काळात सासू होती तिला, ना तिची आई. सासू आणि तिची आईही तिला सोडून केव्हाच्याच देवाघरी निघून गेल्या होत्या. त्यातच कोणी तिचे वा त्याचे नातेवाईकही त्या काळात त्यांना मदत करायला आले नव्हते. जसे आज मधमाशासारखे नातेवाईक पोळ्याला चिकटलेले दिसत होते. ते फक्त गोळा झालेल्या परागकणाचा लाभ घेत होते. ते मात्र याचा विचार करीत नव्हते की ते परागकण कुठून आलं असावं? कोणं आणलं असावं? कसं आणलं गेलं असावं? फक्त खाण्यातच मश्गुल होते.
आरतीही एक आईच होती की जिनं मातृत्व जपलं होतं. मातृत्वासाठी ती घरी सुख भोगत राहिली नव्हती. ती आली होती आपल्या बाळीची काळजी घेण्यासाठी. त्यातच तिनं पाहिलं होतं की तिथं बऱ्याचशा महिला अशा होत्या की ज्या महिला बाळाची काळजी घेत नव्हत्या. अशातच कितीतरी बाळ मातृत्वापासून बेदखल झाली होती. अर्थात मरण पावली होती.
आई जेव्हा क्रूर होते? तेव्हा असेच काहीसे प्रसंग घडत असतात. म्हणूनच आई व आईपणाला जीवनात फार महत्त्व आहे आणि आई कितीही कठीण प्रसंग येवो. ती क्रूर होत नाही वा आपलं मत बदलवीत नाही. ती आपल्या बाळाप्रती अतिशय कर्तव्यदक्ष राहाते. ती आपल्या मुलाचं दुःख पाहू शकत नाही. असं नेहमीच घडतं. वडील हे मुलाशिवाय राहू शकतील. परंतु आई नाही. याबाबतीत एक उदाहरण आहे. एक मुलगी गरोदर होती. तिच्या गर्भात बाळच होतं, अशावेळेस तिच्या पतीनं तिला सोडून दिलं. मग काय, ती आपल्या बाळाचा जीव घेवू शकत नव्हती गर्भाशयात. कारण वेळ निघून गेली होती भ्रृणहत्येची आणि भ्रृणहत्येची भीतीही वाटत होती. मग तिनं ठरवलं की मुलीला जन्म द्यायचा आणि अशी मुलगी कोणाला तरी दत्तक द्यायची. ते बाळ दत्तक द्यायचं ठरवताच तिनं एक ग्राहक शोधला व त्याच्याशी करार केला. करार केला की आपल्याला जेही बाळ होईल. ते त्याला देणार. तसंही त्या दांपत्याला बाळ नव्हतंच. त्यामुळंच ते त्या आईच्या गर्भातील बाळ विकत घेणार होते. कालांतरानं ती मुलगी प्रसूत झाली. तिनं एका गोंडस बाळाला जन्माला घातलं. मग काय, तिला बाळ दाखवण्यात आलं. ते बाळ तिच्या हातात देण्यात आलं. त्यानंतर तिनं ज्या दांपत्याशी करार केला होता. ते आले. परंतु तिनं आपलं बाळ देण्याचं नाकारलं. कारण तिनं बाळाला जन्म देताच तिच्यात मातृत्व भरुन आलं होतं. हे झालं मातृत्वाचं मुर्तीमंत उदाहरण. परंतु असेही काही लोकं असतात की जे बाळाला कचऱ्यात फेकतात. विहिरीत टाकतात. नदीत टाकतात. कधीकधी नवजात अर्भकाला कचऱ्यात कुत्रे छिन्नविछिन्न करतांना दिसतात की त्याची कल्पनाच करता येत नाही. अशावेळेस मातृत्व कुठं हरपतं ते कळत नाही. वरवर गोष्टी सांगणारे भरपूर असतात. मी माझ्या गर्भातील बाळ जेव्हा होईल, तेव्हा देणार. परंतु प्रत्यक्षात बाळ होते, तेव्हा ते देता येत नाही. याला कारण आहे निर्माण झालेली मातृत्व भावना. ती भावना उन्मळून येते. मग बाळ देण्याची इच्छा होत नाही. प्रत्यक्षात जेव्हा वेळ येते. तेव्हा निर्णय काहीसे वेगळेच असतात. कालचा हाच इतिहास, काल कोणतीच आई आपलं बाळ द्यायला कुचराई करायची. मग तिला कितीही बाळ होवोत. तेव्हा मात्र तिच्या पतीनं सोडल्यानंतरही ती कोणाला आपलं बाळ देत नसे आणि आज आपल्याला कचऱ्यात सापडतात बाळ. मोकाट...... कुत्री छिन्नविछिन्न करीत असतांना. अशी बरीच उदाहरणं आहेत. यालाही काही उदाहरणं अपवाद आहेतच. हे विसरुन चालत नाही.
तो महिलादिन होता व त्या महिलादिनी एका पक्षाचं लहानसं पिल्लू रस्त्यावर सापडलं. ते तिथं कसं आलं, कसं नाही हे काही मला माहीत नव्हतं. आजुबाजूला कोणतं झाड नव्हतं ना घरटं. कदाचीत त्या पक्षानं आपल्या पिल्लाला सुरक्षीत ठिकाणी हलवीत असतांना ते पिल्लू त्याच्या चोचीतून सुटलं असेल. त्यानंतर त्या पक्षाला तिथं काही माणसं दिसली असतील व तो पक्षी पळाला असेल, त्या पिल्लाला तसंच मरणाच्या दारात सोडून. म्हणतात की पक्षाच्या पिल्ल्याला हात लावल्यास तो पक्षी त्याला मारुन टाकतो. परंतु सत्य काही वेगळंच आहे. सत्य हे आहे की पक्षी तर सोडा साधी चिमणी देखील आपल्या पिल्लाला मारत नाही. कारण यापुर्वी अशीच दोन पिल्लं सापडली होती व मी त्या पिल्लालाही हात लावला होता. परंतु त्यांना मी जसे दाणे चारत होतो. तसेच दाणे त्या पिल्लांचे मायबापही चारत होते व काही दिवसानंतर ते मोठे होताच त्यांना ते मायबाप घेवून गेले.
ते लहानगं पिल्लू. तसा मला पिल्लं मोठी करण्याचा अनुभव आहेच. परंतु विचार असा येतो की ही तर पक्षी आहेत की ज्यांची मुलं अशी अनवधानानं सुटतात. भीतीनं सुटतात. परंतु माणसाचं पिल्लू? ते का सुटावं भीतीनं? परंतु ते बाळ जेव्हा गर्भाशयात सामावतं. तेव्हा ते मायबापाला, तिला आणि तिच्यावर प्रेम करणाऱ्या त्या मित्रालाही माहीत नसतं. फक्त ऐषआराम व मौज म्हणून ते प्रेम असतं. त्यातच काही दिवसानं जाणवतं की आपण गरोदर राहिलेलो आहोत व त्या गोष्टीला आज तीन चार महिने झालेले आहेत. त्यानंतर ती मुलगी ज्याचेवर प्रेम करते, त्याचेजवळ जाते व त्याला आपली वेदना सांगते की ती गरोदर आहे. त्यानं तिच्याशी विवाह करावा. परंतु तो प्रेमी नकार देतो. अशावेळेस तिला काही सुचत नाही. ती बराच प्रयत्न करते भ्रृणहत्या करायचा. परंतु ती भ्रृणहत्या यशस्वी ठरत नाही व इथंच सारं बिघडतं. मग आपली बदनामी होईल. लोकं काय म्हणतील ही देखील एक प्रकारची भीतीच असते. शेवटी त्याच भीतीनं ती त्या बाळाला जन्म देताच त्याची विल्हेवाट कचऱ्यात लावते व त्याबद्दल त्याची आई मातृत्वाचा विचारच करीत नाही. ती आई क्रूर होते. यात तिला भीती वाटणं साहजीकच आहे. कारण यात बदनामी, त्यानंतर आपला विवाह, आपल्या बहिणभावाचा विवाह हे सारे प्रश्न असतात. त्यामुळंच त्यांच्याबद्दलचा प्रश्न नाही. परंतु आज असं निरीक्षणात येतं की चांगल्या चांगल्या घरच्या विवाह केलेल्या महिलाही पळून जातात दुसऱ्याच बरोबर. तेव्हा विचार येतो की हे मातृत्व कुठं जातं. कुठं हरवतं. काही पोलीस स्टेशन डायरीत कधी असा पती बेपत्ता तर कधी महिला बेपत्ता झाल्याची उदाहरणं नोंदीत दिसतात. विवाहानंतर कुठं जातात त्या आपल्या लेकरांना सोडून. तेच कळत नाही. मग पोलीस स्टेशनला नोंद केल्यावर ती सापडते व तिचं उत्तर असतं की मी स्वखुशीनं आली. मुलांचा ठेका काय मीच घेतला काय? तिचा पतीही कुणाला तरी घेवून पळून गेलेला असतो. तोही सापडतो व म्हणतो. मुलांचा ठेका काय मीच उचलला काय? आता यावर विचार येतो की दोघंही तेच उत्तर देतात. मग मुलांनी जावं कुठं? आज शेल्टर होम असल्यानं ठीक आहे. काल तर ते नसल्यानं हीच लहान मुलं रस्त्यावर भीक मागायची. परंतु ती मोठी असली तर......अन् नवजात अर्भक असले तर.......त्यानं कुठं जायचं? कचऱ्यात? कुत्र्यांचे शिकार होत मरायचं? इत्यादी प्रश्न अनाकलनीय आहेत. याचा विचार होण्याची गरज आहे.
लोकांनी मोठ्या थाटामाटात महिला दिन साजरा केला. स्री स्वातंत्र्याच्या गप्पा मारण्यात आल्या. मुक्त जीवनाचा पुरस्कार करण्यात आला राजा हिंदुस्थानी चित्रपटासारखा. परंतु हे जे मुलं सोडण्याचं विदारक सत्य होतं. याबाबत कोणीच बोललं नाही. हेच का महिला स्वातंत्र्य?
काल चांगोला नावाच्या राणीचं ऐकलं होतं की एका भिक्षुकाला तिनं आपल्या मुलांच्या मस्तकाचं जेवण चारलं होतं. मुलप्राप्तीसाठी वचनबद्ध झाली होती म्हणून. आज मात्र अशा अनेक चांगोला समाजात वावरत असतांना दिसतात की ज्या आपल्या मुलांच्या संपुर्ण शरीराचंच भोजन कुत्र्यांना करवतात. तेही विवाहापुर्वी आणि विवाहानंतरच्या चांगोला आपल्या मुलाचे हाल किती होतील? याचा विचार न करताच पळतात व विवाहबद्ध होतात. काही पहिला पती आवडत नसेल तर दुसरा पती करतात. आपल्या मुलांना घेवून. ज्या मुलांना तिनं केलेला दुसरा पती अजीबात आवडत नाही. ती मुलं वाम मार्गाला लागतात. परंतु आईला त्याचं काहीच लेणदेण नसतं. तिला लेणदेण असतं तिच्या नव्या पतीचं. तो कसाही वागत असला तिच्या लेकरांशी तरी चालतं. त्यामुळं तिला फरक पडत नाही.
समाजाची अशी मानसिकता. जो चांगला असतो, त्यालाच वाईट म्हणणारा हा समाज. त्याचीच मानसिकता रस्त्यावर काढून समाज पावले टाकत असतो व अशी पावलं टाकत असतांना तो समाज महिलादिनही साजरा करतो. परंतु वरील बाबींवर विचार करीत नाही. खरंच महिला सक्षम झाली की अधिकच सक्षम झाली हा विचारच येतो. जर महिला अशा स्वरुपाची सक्षम होत असेल, जिला आपल्या लेकरांचाही विचार करता येत नसेल तर तिला महिलादिन साजरा करण्याचा अधिकार असावा काय? नक्कीच नसावा. परंतु महिलादिन साजरा करणाऱ्यांच्या यादीत अशाच स्वरुपाच्या महिला आघाडीवर असतात हेही न सांगीतलेलं बरं.
महत्वाचं सांगायचं झाल्यास महिलांनी सक्षम व्हावं. चंद्र सुर्यावर जावं. आपला विकास नक्कीच करावा. परंतु आपल्या लेकरांचाही विचार करावा की त्यांच्यावर माझ्यामुळं आपत्ती तर ओढवणार नाही. जर आपत्ती ओढवत असेल तर तिनं वेडवाकडं पाऊल टाकूच नये. त्यावर बराच विचार करावा. अन् विचार करता येत नसेल तर मुलं जन्मासच घालू नये हे तेवढंच खरं. जेणेकरुन कोणाला म्हणावे लागणार नाही की आई जेव्हा क्रूर होते तेव्हा.......
आरतीचा त्याग आजही गुरुला आठवत होता आणि ज्यावेळेस तो आठवायचा. तेव्हा त्याला कसंबसं वाटत होतं. त्याचा जीव कासावीस होत होता.

************************************************

तो होळीचा दिवस होता. ज्योती होळी खेळत होती. तिनं आमंत्रीत केलं होतं गुरुला व ठरल्याप्रमाणं गुरुही तिच्या घरी होळीच्या फराळाला गेला होता तर पाहतो काय, ज्योती नशेत धृतराष्ट्र होती. त्याला आश्चर्य वाटत होतं की ज्योती एक स्री असून नशेची धृतराष्ट्र बनलीच कशी? तसं त्याला वाटलं की आपण काहीही बोलण्याऐवजी नाश्ता करुन परत यावं. मग विचारु. काय विचारायचं ते. त्यानंतर तो माघारी फिरला. तसे दोन तीन दिवस झाले होते.
दोन तीन दिवस झाले होते. तशी गुरुला परत ज्योतीची आठवण झाली व तो तिला म्हणाला,
"ज्योती, मी तुला त्या होळीच्या दिवशी पाहिलं की तू नशा केलेली होती. मला तर ते पाहून आश्चर्यच वाटलं की महिलाही नशा करतात. हं, महिला नशा करतात हे मी ऐकलंय आणि त्याचे व्हिडिओ देखील पाहिले. त्यात मला असं जाणवलं की नशा करणाऱ्या महिला ह्या काही संस्कारी नसतात. आता मला सांग की तू होळीचा दिवस होता, म्हणून नशा केली होती की नेहमीच अशी नशा करतेय?"
त्याचा तो प्रश्न. तसं ज्योतीनं उत्तर दिलं.
"अरे, आता नशा करणं ही बाब सामान्य बाब झाली आहे. तशी नशा आजकाल कोणीही करत असतं. त्यात आश्चर्य वाटण्यासारखं कारण नाही. आता तुझ्या दुसऱ्या प्रश्नांचं उत्तर. ते उत्तर असं आहे की मी नेहमीच पिते. परंतु बाहेर नाही. आपल्या पतीसोबत आणि मी बेवडी नाही की जास्त पिते. फक्त थोडीशीच पिते. आपल्या पतीसोबत एन्जॉय करते. आपल्या पतीला आनंद देते. त्यात वावगं काय? आपला पती बाहेर पिवू नये हाच यात माझा उद्देश आणि तेही बाहेर पितच नाहीत. घरीच पितात माझ्यासोबतच."
तिचं ते त्या नशेला धरुन समर्पक उत्तर. परंतु ते योग्य उत्तर न वाटल्यानं तो परत म्हणाला,
"अगं परंतु याचा परिणाम? याचा परिणाम तुझ्या मुलीवर होईल ना. मग? मग काय करणार?" त्यानं चिंता व्यक्त केली. तशी ती म्हणाली,
"मी मुलीबद्दलही चिंता करीत नाही. माझ्या मुलीनंही माझ्यासारखंच मोकळं जीवन जगावं. तिला जसं वाटेल, तसंच जीवन जगावं." तिनं तिच्या जगण्याला व जीवनाला धरुन समर्पक उत्तर दिलं.
गुरुला तिची होळीला केलेली नशा पाहून जेवढं आश्चर्य वाटलं नव्हतं, त्यापेक्षा कितीतरी वेगळं तिच्या त्या उत्तरांनी आश्चर्य वाटलं. तशी ती बालपणापासूनच मोकळा श्वास घेणारी होती. तिला बाईक सुद्धा चालवता येत असे. तिनं जीवनाला आपल्या मनात बंदीस्त केलं होतं व त्यातूनच ती जगणं शिकली होती. परंतु ती आपल्या मनाची बंदीस्त स्री बनली नव्हती. आजही ते मन तिच्या ताब्यात होतं. ती आपल्या मनाच्या ताब्यात नव्हती.
हसत खेळत जगलेली ज्योती....... तिचं पुर्णच आयुष्य जरी दुःखदायी गेलं असलं तरी तिनं आपल्या दुःखाला दुःख दुःख करीत बसली नाही. त्यातून मार्ग काढला. तशीच काहीशी परिस्थिती गुरुचीही होती. गुरुची साळीही अशीच कोणतीही चिंता न करता आनंदीत जीवन जगत होती आणि गुरुची पत्नी आरती आजही सामान्यच जीवन जगत होती. त्यामुळंच गुरुला वाटत होतं की ज्योतीची बहिण पुजा, ती अतिशय साधं भोळं जीवन जगत असेल, ती नशाही करीत नसेल आणि मोकळा श्वासही घेत नसेल. कारण दोन भाऊ व दोन बहिणीमध्ये बरंच अंतर असतं.
गुरुला आठवत होतं ज्योतीचं जीवन. ज्योतीचा जसा पुजाच्या विवाहापुर्वीच विवाह झाला होता. तसाच विवाह आरतीच्या बहिणीचाही तिच्याच विवाहापुर्वी विवाह झालेला होता. त्याचं कारण होतं जबाबदारी. पुजा संपूर्ण जबाबदारीतून मोकळी होताच तिनं विवाह केला होता. त्यासाठी तिनं भरपूर वाट पाहिली होती. जेव्हा तिला सगळे सुखी झालेले दिसले. तेव्हाच तिनं मोकळा श्वास घेतला व आपला विवाह साजरा केला. परंतु जसा तिनं ज्योतीचा विवाह जेवढ्या थाटामाटात साजरा केला. तेवढा थाटमाट तिच्या विवाहात नव्हता. तीच गत आरतीचीही होती.
किर्ती या दोघांतूनही वेगळीच होती. तिचा विवाह साजरा झाला होता. परंतु जिनं जबाबदारी स्विकारली होती. त्या बहिणीनं आपला विवाह साजरा केला नव्हता. तिनं विवाहच केला नव्हता. इतर भावा बहिणींचे संसार बसवता बसवता वेळ निघून गेली होती आणि आज एवढं वय झाल्यानंतर आपला विवाह करण्याची तिची इच्छाच नव्हती.
आज किर्ती व ज्योती आपआपल्या वडील बहिणींची सेवा करीत होत्या. त्यांचं ऐकत होत्या. त्यांना त्रास देत नव्हत्या. कधीकाळी त्यांना काही झाल्यास त्या धावून जात होत्या. कारण त्यांचे उपकारच होते त्यांच्यावर. त्यामुळंच त्या जणू उपकाराची परतफेड करीत होत्या.
'रहे ना रहे हम, महका करेंगे हम, बनके वफा......' अशा गाण्याचा एक अल्बम. ममता नावानं तो अल्बम गाजला होता सन १९६६ ला. हे गाणं मजरुह सुलतानपुरीनं लिहिलं होतं. म्युझिक रोशनचं होतं व गायक स्वर लता मंगेशकरचे होते. ज्योतीच्या बाबतीतही अशीच गोष्ट. तिचं मोकळं वाटणारं जीवन. तिच्यापासून खरंच प्रेरणा घेण्यालायक होतं. संकटं कितीही येवू द्या. ते येणारच. त्यामुळं घाबरायचं नाही. जगत राहायचं आनंदाचं जगणं. बंधन विरहीत जगणं. बंदीस्त जगणं जगून स्वतःच्या आयुष्याला बंदीस्त करुन टाकू नये. खरंच त्या गाण्याशी समर्पकच बसत होतं तिचं आयुष्य. तसं पाहता त्या गाण्याप्रमाणे तिही प्रामाणिकच होती आणि त्या गाण्याप्रमाणेच तिचं स्वप्नही होतं की ती जरी जगात नसेल, तरी तिचं वागणं जगाला प्रेरणा देणारंच असेल.
किर्तीही त्याच स्वभावगुणानुसार होती. तिलाही वाटत होतं की दुःख करुन काय सुख प्राप्त होणार आहे काय? मग ते जर सत्य नाही तर, दुःख का बरं करायचं? जे मिळालं, ते आपल्या प्रारब्धानंच मिळालं व जेही काही मिळणार, तेही प्रारब्धानंच मिळणार. मग ही चिंता का बरं करायची. चिंता सोडायची.
आज किर्तीही आनंदातच जीवन जगत होती ज्योतीसारखी आणि गुरुची मेव्हणीही. मात्र त्यांना आधार देणाऱ्या त्यांच्या बहिणी त्या आजही चिंता करीत होत्या गुरुसारख्याच. जसा गुरु आजही चिंता करायचा. भविष्याची पावलं टाकत असतांना. कारण आजही त्याचेवर जबाबदारी होती लेकराची. तसा तो विचार करीत होता की पुजाचंही तेच हाल असतील. ती आपल्या लेकराची चिंता करीत असेल आणि सोबतच आपल्या भावंडांचीही चिंता करीत असेलच. कारण त्याच भावंडांची जबाबदारी तिनं भविष्यात पेलवली होतीच.
************************************************
ते सर्वचजण हळूहळू वार्ध्यक्याकडे जावू लागले होते. तसा त्यांच्याही मनात विचार होताच. तो विचार म्हणजे आपलं म्हातारपणात काय होईल? आपले म्हातारपणातील जीवन कसे जाईल याचा.
ज्योती आज मोकळेपणानं जगत होती. तसं पाहता तिच्या जीवनात दुःख येत असलं तरी तिला त्याचेशी काही सोयरसुतक नव्हतं आणि ती त्याची चिंताही करीत नव्हती. त्यावर ती विश्वासही करीत नव्हती. तिचा पतीवर विश्वास होता. जर पती जगलाच आणि तिला त्यापुर्वी मृत्यू आलाच तर त्यानं दुसरा विवाह करुन टाकावा असं तिला वाटत होतं आणि ती जर जगली तर तिही दुसरा विवाह करणार असं निश्चित होतं. असं एकंदर तिच्या वागण्यावरुन दिसून येत होतं.
गुरुची तर अवस्था सोने पे सुहागा अशीच होती. त्याची पत्नी तर त्याला ती जिवंत असतांनाच त्यानं दुसरा विवाह केला तरी चालेल असं म्हणत होती आणि किर्ती? तिला मात्र आपल्या पतीचा दुसरा विवाह नको होता. तेच मत होतं सुरेखाचंही. अशातच वार्धक्य आलं व नियती ते सगळं पाहात होती.
ज्योती आज म्हातारी झाली होती व तिच्या मुलीचाही विवाह झाला होता. तिला जावई चांगला मिळाला असला तरी तिची मुलगी आज विदेशात होती. ती मुलगी तिच्याचसारखी निघाली होती व तिला मायबाप नको होते. शिवाय मायबापाला जास्त दिवस तिच्याकडे राहता येत नव्हतं. त्यामुळंच ते देशातच राहात होते.
ज्योतीचा पती तिच्या मुलीच्या विवाहानंतर लवकरच निवृत्त झाला. त्यांना पेन्शन मिळत असल्यानं परिस्थिती शेवटपर्यंत चांगलीच राहिली. परंतु तो शेवटचा काळ. त्या शेवटच्या काळात त्यांच्यानं कामंच जमत नव्हतं. हात थरथर कापत होते. मुलीची सारखी आठवण यायची. परंतु मुलगी काही जवळ नव्हती. कधीकधी ते बोलून घेत मुलीशी व्हिडिओ कॉलवर. परंतु मुलगी आता बोलायचं टाळायची. ती आपल्या मुलाबाळांवर खुश झाली होती. तिला आपल्या मायबापाशी बोलणं जड वाटत होतं. शिवाय तिला आपल्या मायबापाशी बोलायला कंटाळा येत होता.
ज्योतीची मुलगी तिच्या मायबापाशी बोलत नव्हती. त्याचं कारण होतं तिची नोकरी. तिच्या मुलीला नोकरी होती. तिची मुलगी नोकरी व घरचे काम करुन थकत होती. मग कुठून वेळ मिळणार?
ज्योती म्हातारी होती व आता तिला कधीकधी आपल्या आईची आठवण येत असे. तिला वाटत असे की तिनं आपल्या आईची सतत सेवा केली व सेवा करतांना तिचा स्वार्थही नव्हता. परंतु आपली मुलगी. आपली मुलगी आपल्याच कर्तृत्वामुळं आपल्याजवळ नाही. आपण काल तिच्यावर संस्कार करतांना केवळ तिच्या संसाराकडे लक्ष दिलं. तिनं फक्त आपलं पाहावं असंच वाटत होतं मला. परंतु आज वाटतंय की आपण त्यावेळेस चुकीचं पाऊल टाकले होते.
आज ती आपल्या जवळ नाही. याला जबाबदार आहोत आपणच. ती आपल्याजवळ असती तर कदाचीत आपली सेवा तिला करता आली असती आणि तिनं नाईलाजानं तरी आपली सेवा केली असती.
काही दिवस गेले होते. आता ज्योती संपुर्णपणे म्हातारी झाली होती व तिचे हात थरथरायला लागले होते. अशातच एके दिवशी तिचा पती गेला व तिला आठवायला लागलं, तो तिचा भूतकाळ. तिनं तिच्या पतीला म्हटलं होतं की मी गेल्यावर त्यांनी दुसरा विवाह करावा. परंतु ते तर माझ्याच पुर्वी गेले मला सोडून. ज्या पतीवर मी अगाढ प्रेम करायची व तेवढाच विश्वास आणि तेवढीच मायाही. म्हणायची की मी जाताच तुम्ही विवाहबद्ध व्हावे आणि तुम्ही जाताच मिही विवाहबद्ध होणार. परंतु ते धांदात खोटं ठरलं व ते गेले आणि या वृद्धापकाळात माझ्याशी तरी विवाह कोण करेल.
ज्योतीजवळ आज भरपूर काही होतं. गाडी, बंगला व सर्वकाही. हाती नोकरही होते. परंतु नोकरांनी तिला मदत केली, ती तिचा पती जिवंत असेपर्यंत. परंतु जसा तिचा पती मरण पावला. तसे सारेच नोकर गेले तिला हळूहळू सोडून. त्या बंगल्यात ती आता एकटीच राहात असे. आता तिला तो बंगला अगदी खायला धावत होता एखाद्या स्मशानागत. तिथं करमत नव्हतं आणि रात्रीची झोपही येत नव्हती.
ज्योती जगली होती पुर्ण आयुष्य अगदी निवांतपणानं. तिच्या आयुष्यात भरपूर दुःखाचे प्रसंग आले होते व दुःख म्हणजे काय? हे तिला चांगलंच माहीत होतं. परंतु ते दुःख तर येणारच. ते प्रारब्धच, असं म्हणत ती आतापर्यंत जगली होती. आता तिच्याच्यानं ते एकाकी आयुष्य सहन होत नव्हतं. अशातच तिला आधाराची आवश्यकता वाटत होती. परंतु आधार देईल कोण? शिवाय आत्महत्या करुन आपला जीव संपवावा तर ती त्यातील नव्हतीच. ती हिरीरीनं जगत होती तेही एकाकी आयुष्य. मग कोणी आधार देवो अगर न देवो. अशातच कोणीतरी सांगीतलं तिला की तिनं वृद्धाश्रमात जावं. तशी तिला ती युक्ती आवडली व ती वृद्धाश्रमात गेली.
ते वृद्धाश्रम........ते तिच्यासारख्या समवयस्क व्यक्तींसाठीच बनवलेलं एक आधारगृह होतं. तिथं तिच्या वयातील बरीच मंडळी होती. ज्यांची मुलं त्यांच्या मायबापाची सेवा करीत नव्हते. तीच मंडळी तिथं होती. तशीच ज्योतीसारखीही मंडळी त्याच वृद्धाश्रमात होती. ज्यांची मुले विदेशात होते. जे आपल्या मायबापाला आपल्यासोबत नेवू शकत नव्हते.
ज्योती त्या आश्रमात गेली होती. काही दिवस राहिली होती. आता तिला अगदी हायसं वाटू लागलं होतं.
तिची मुलगी तिच्या संसारात रममाण झाली होती. ती आता तिला फोन करीत नव्हती. तशी महिन्यातून एखादा फोन उचलून म्हणत असे की आई, तू खुश राहा. मी तुला माझा फावला वेळ देवू शकत नाही. कारण माझ्याकडे भरपूर कामं आहेत. माझ्याकडे तुझ्याशी बोलायला वेळच नाही. मग काय, ते मुलीच्या तोंडून ऐकताच तिला फार वाईट वाटत असे. वाटत असे की काश! माझ्या मुलीला कमीच शिकवले असते तर......हा तिला शिकविण्याचा व तिचा विवाह विदेशात करून देण्याचाच परिणाम आहे.
गुरुचीही हालत ज्योतीसारखीच होती. त्यानंही मुलीला राबराब शिकवलं होतं. त्याचीही मुलगी शिकून मोठी झाली होती आणि तिचाही विवाह झाला होता. परंतु ती काही विदेशात गेली नव्हती. ती देशातच होती. परंतु तिही आपल्या आईवडीलांची सेवा करीत नव्हती. अशातच ते दोघंही वृद्धाश्रमात राहात होते. मात्र किर्तीचं तसं झालं नव्हतं. तिची मुलगी दिव्यांग असली तरी आजही तिच्यासोबत होती. ती आपल्या मायबापाची सेवा करीत होती. त्यांच्या सुखदुःखात मदत करीत होती.
आज किर्तीला आपल्या मुलीचा हेवा वाटत होता. कारण ती एक प्रसिद्ध नृत्यांगणाच नाही तर प्रसिद्ध सुसंस्कारी मुलगीही बनली होती. जिचा संसार तर होताच. परंतु संस्काराव्यतिरीक्त तिच्यात सुसंस्कारही होते. ज्या सुसंस्काराच्या भरवशावर तिनं भवसागर पार केला होता.
आज गुरु व त्याची पत्नी वृद्धाश्रमात होते. त्याच वृद्धाश्रमात की जिथं आधीपासूनच ज्योतीही दाखल झाली होती. थोडासा चेहरा बदल झाला होता. तसे तेवढे ठसेही चेहर्‍यावर नव्हते. कारण चेहर्‍याची पुर्ण ठेवण बदलली होती.





गुरु आपल्या मुलीच्या त्रासानं वृद्धाश्रमात आला. तशी ज्योतीही त्याच वृद्धाश्रमात होतीच. तिही त्याच्या समोरासमोर आली. दोघांनीही आजपर्यंत कधीही लहानपणापासूनच एकमेकांना पाहिलेलं नव्हतं. तशी दोघांचीही नजर एकमेकांना भेटली. मनात असंख्य विचार घोळू लागले. हं, बोलणं होतं थोडसं. परंतु प्रत्यक्षात पाहिलेलं नसल्यानं चेहर्‍याची ओळख नव्हतीच. तसं एकमेकांचा चेहरा पाहताच आधी ज्योतीच उत्तरली.
"तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय. जरा परिचय सांगता काय?"
"मलाही अगदी तसंच वाटतंय. कोण तुम्ही?"
"मी ज्योती. मी अमूक अमूक विद्यालयात शिकले."
"हं, आठवलं तर......."
"काय आठवलं?"
"आठवलं........ ती शाळा, ते तुमचे डबे, अन् तो मोकळा श्वास. परंतु सारंच बदललं."
"काय बदललं?"
"तुझा चेहरा आणि त्यावर आलेल्या सुरकृत्याही. आता तुझा चेहराच अजिबात ओळखायला येत नाही."
"हो का?"
"होय."
"परंतु तू कोण रे ? आधी तुझा तर परीचय सांग बरं ?"
"मी.......मी गुरु. तुझ्याच शाळेत शिकणारा मुलगा. आपण दहावीपर्यंत एकाच वर्गात होतो. आठवलं का ?"
"होय, आठवलं. अन् तुला कोण ओळखणार नाही रे."
ज्योतीनं त्याला ओळखलं व तशी ओळखल्याची पुष्टीही दिली. आता गतकाळातील विचारांचं काहूर त्याच्या डोक्यात माजलं होतं व ते संवाद करु लागले होते. तिचा चेहरा पार बदलला होता. तरीही परीचय सांगताच ज्योतीला गुरुनं ओळखलं. चेहरा पुसटसा ओळखीचा वाटत होताच. तशी तोंडओळख झाली व गुरुनं विचारलं की ती कशी काय वृद्धाश्रमात आली?
गुरुचा तो प्रश्न. तशी ज्योती म्हणाली,
"मी माझ्या मुलीला भरपूर शिकवलं. लहानाचं मोठं केलं. कोणत्याही गोष्टीची कमी केली नाही. तिच्या सर्व इच्छा पुरवल्या. परंतु माझा नाईलाज झाला. माझी मुलगी विदेशात आहे. चांगल्या पोष्टींगवर आहे. भरपूर पैसाही कमवते. परंतु माझ्याकडे वेळ द्यायला तिच्याकडे वेळ नाही. साधी ती फोनवर बोलतही नाही. एवढी सवड नाही तिला."
ज्योती बोलून गेली. तसं तिच्या डोळ्याला पाणी आलं व ते नकळत जाणवलंही. तसा तो म्हणाला,
"ज्योती डोळे पुस. या जगात तू एकटीच नाही तर, तुझ्यासारखे भरपूर आहेत की ज्यांची मुलं आजही वृद्धाश्रमात आहेत. ती मुलं त्याच मायबापामुळं वर चढली व नोकरीच्या आकाशात उंच भरारी मारायला लागलीत. उडू दे त्यांना. कारण त्यांना पंख फुटलेत. त्यांनाही उत्तूंगभरारी मारु दे व आनंद व्यक्त करु दे. हं, एक सांगतोय. या वृद्धाश्रमात आहे ना. मग हाही काळ बरा की ही माणसं पैसे घेतात आणि पैशासाठी सेवा करतात. यांना जास्त पैसा मिळत नाही सेवेचा. परंतु जो आशीर्वाद मिळतो ना. तो उच्च कोटीचा आहे. हीच माणसं पुढील जन्मी आपल्याच पोटाला यावी अशी आशा बाळग. ज्योती, आपण काय मिळवलं जीवनात असा जर विचार केलाच तर आठवतं फक्त पैसा नि पैसाच कमवला. सुख नाही कमवू शकलो. तू त्या सुखाला नशीब समजली आणि आम्ही त्याच सुखाला भवितव्य. तुझी मुलगी तर विदेशात आहे. म्हणूनच ती आज बोलत नाही परंतु माझी मुलगी? माझी मुलगी इथंच आहे की जी माझ्याच मालमत्तेवर ताबा घेवून बसली. परंतु ती तरी काय करणार?"
गुरु थोडासा थांबला. तशी ज्योती म्हणाली,
"म्हणजे?"
"अगं, आज आपल्या देशात म्हणतात की मुलगी सक्षम आहे. तिला कोणताच त्रास नाही. ती कमवू शकते व आपल्या पायावर उभी राहू शकते. त्यानंतर ती आपल्या मतानं चालू शकते. वागू शकते. परंतु ते सगळं खोटं आहे. त्या बोलायच्याच गोष्टी आहेत."
ज्योतीला त्या गोष्टी समजल्या नव्हत्या. त्यामुळं ती पुन्हा म्हणाली,
"गुरु, मला समजलं नाही, तुला काय म्हणायचं ते? आता तरी असा कोड्यात बोलू नकोस. जरा स्पष्टपणे बोल."
"अगं, मी माझ्या मुलीचा विवाह करुन दिलाय व ती सासरी गेली. परंतु सासरचे लोक एवढे हरामखोर आहेत की ते माझ्या मुलीच्या मनानं वागत नाहीत. हिला कवडीचंही स्वातंत्र्य नाही. बिचारी राब राब राबते. तसा वेळही नसतोच तिला. भरल्या कुटूंबातच आहे ना. सकाळपासून घरची कामं करते व दुपारी नोकरीवर जाते. सायंकाळी पुन्हा स्वयंपाक. मग कुठे वेळ मिळते तिला. तसं पाहिल्यास आम्ही तिचे मायबाप. आमचा तेवढा हक्कं नाहीच तिच्यावर. आम्ही जर तिच्यावर आपला हक्कं दाखवत बसलो तर, तिचा संसार तुटेल. शेवटी आम्ही निर्णय घेतला. निर्णय घेतला की जेव्हापर्यंत आपल्यानं आपली स्वतःची पोळी भाजता येते. तेव्हापर्यंत भाजायची स्वतःच्या हातानं पोळी. ज्यावेळेस थकलो. त्यावेळेस वृद्धाश्रमात जावून बसायचं. म्हणूनच आलोय आता आम्हीही वृद्धाश्रमात. काय करणार. आता शरीर साथ देत नाही. हातपाय थरथरतात. डोळ्यांना नीट दिसत नाही. पायानं नीट चालणं होत नाही. घरी कामं करुन घेण्याची सोय उरलेली नाही. परंतु आम्हाला तेवढं दुःख नाही. ना मुलीची आठवण येत आम्हाला, ना जावयाची, ना कोणत्याच नातेवाईकांची. जे नातेवाईक पोटभरु असतात."
गुरु बोलत होता व ज्योती ऐकत होती. ती काय समजायचं ते समजली. तिलाही वाटत होतं की गुरुला आपल्या मुलीची आठवण कशी येणार? त्याच्यासोबत त्याची पत्नी आहेच एक प्रकारची ढाल बनून. परंतु माझं काय? माझ्यासोबत कोण आहे माझी ढाल बनायला.
तिचा विचार रास्तच होता. कारण पत्नी ही पतीची ढाल असते व पती पत्नीची. अगदी वृद्ध अवस्थेत देखील. जेव्हा त्या जोडीतील एखादा जातो ना. तेव्हाच कळतं की सत्य काय असतं ते आणि तेव्हाच त्याचं महत्व कळत असतं. ज्योतीला तिचा पती जिवंत नसल्यानं त्याचं महत्व अधिक वाटत होतं. मात्र त्याबद्दल गुरुला त्याचं काहीच वाटत नव्हतं.
आरती, गुरु आणि ज्योती.......ते तिघेही जण त्याच वृद्धाश्रमात राहात होते. तिघांचे कमरे वेगवेगळे होते. गुरु आणि आरतीला एकच कमरा होता तर ज्योतीला वेगळा कमरा होता. आरती थोडी वयानं लहान होती. त्यामुळंच ती रोज सकाळी उठत असे. ती परीसरातील झाडांची सकाळीच फुलं तोडत असे व सकाळीच आंघोळ करुन देवाला चढवीत असे. तशी लवकरच ती आपली पुजा पाठ आटोपवीत असे. त्यानंतर ती सर्व वृद्ध स्रियांच्या व माणसांच्या कमऱ्यात जात असे. त्यांना दोन दोन फुलं देत असे व सांगत असे की त्यांनी खुश राहावं फुलांसारखंच. घरची आठवणही अजिबात करु नये. कधी एखाद्याला आठवण आलीच तर ती आठवण दूर करीत असे ती. परंतु ती त्यांच्या घरची आठवण असायची. जी सतत यायचीच. कधीकधी त्यांच्यात चर्चाही होत असत. त्या चर्चा संस्काराविषयीच्या असायच्या.
************************************************

संस्कार, संस्कार, संस्कार? संस्कार म्हणजे नेमका काय हो? एका स्रिनं विचारलेला प्रश्न. तसं पाहिल्यास संस्कार म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न साहजीकच कोणालाही पडू शकतो.
संस्कार हे बिरुद कोणी आपल्या संसारालाही लावू शकतात. म्हणतात की संस्कार म्हणजे चांगला संसार. ज्या व्यक्तीचा संसार जर चांगला चालत असेल, तर त्या व्यक्तीला संस्कारी पुरुष समजतात व त्याच संसाराला संस्कारमय संसार समजतात.
तसं पाहिल्यास आज बर्‍याच लोकांचा संसार चांगला चालतो. त्याला संस्कारमय संसार म्हणता येईल काय? यावर कोणी नक्कीच म्हणतील की होय तर कोणी नक्कीच म्हणतील की नाही. होय, याचा अर्थ आजच्या काळात पती पत्नीचं चांगलं पटणं. तसं पटणं हे चांगल्या भाग्याचं लक्षण आहे. ते चांगलं पटतं ना. मग ते चांगले संस्कार आणि नाही याचा अर्थ पती पत्नीचं चांगलं पटून उपयोग काय? असं मानणं. यात पुढं त्याला काही लोकं पुष्टी लावतात. ती म्हणजे पती पत्नीचं चांगलं पटणं हा संस्कार नाही तर ते आपल्या मायबापाची सेवा करतात काय? ते पाहुण्यांचं आदरातिथ्य करतात काय? ते इतर लोकांशी वर्तणुकीतून कसा वर्तनबदल करतात? हे मानणं वा समजणं चांगल्या संस्काराचं उत्तम उदाहरण आहे.
संस्काराबाबतीत सांगायचं झाल्यास संस्काराचे सोळा प्रकार आहेत. ते संस्कार धार्मीक बाबींना धरुन आहेत. ते सोळा संस्कार खालीलप्रमाणे आहेत.
(१) गर्भाधान संस्कार, (२) पुंसवन संस्कार, (३)सीमन्तोन्नयन संस्कार, (४)जातकर्म संस्कार, (५)नामकरण संस्कार, (६)निष्क्रमण संस्कार, (७)अन्नप्राशन संस्कार, (८)मुंडन संस्कार, (९)कर्णवेधन संस्कार, (१०)विद्यारंभ संस्कार, (११)उपनयन संस्कार, (१२)वेदारंभ संस्कार, (१३)केशांत संस्कार, (१४)सम्वर्तन संस्कार, (१५)विवाह संस्कार (१६)अन्त्येष्टी संस्कार.
हे सर्व संस्कार धार्मीक ग्रंथात आहेत. परंतु या गोष्टींना खरं म्हणजे संस्कार मानावे काय? काही लोकं याही बाबतीत मते मतांतरे व्यक्त करतील. याला संस्कार म्हणता येईल काय? तर याचं उत्तर नाही असंही देता येईल आणि हो असंही देता येईल. नाही असं देतांना त्यात धार्मीक रंग जो भरला जातो. तो लोकांना मान्य नाही. शिवाय आजच्या पुरुषत्ताक कुटूंब पद्धतीत पुरुष मंडळी कान टोचून घेत नाही.
संस्कार हे आपल्या परीसरातील लोकं रुजवत नाहीत. तसेच संस्कार आपले परीजनही करुन घेत नसतात. ना शाळा रुजवून घेत. मग संस्कार कोण रुजवत असतं असाही एक प्रश्न पडतो. संस्कार हे शाळा, परीसर, समाज रुजवून घेत असतात. परंतु त्यासाठी खुद्द आपले आईवडील त्या संस्काराला स्विकार करणारे असावेत. त्यांचा त्या गोष्टीला आक्षेप नसावा. ते बदलाला स्विकार करणारे असावेत. संस्कार रुजवायला प्रतिसाद देणारे असावेत. तरच संस्कार घडतात. जर आपले आईवडील बदलाचा स्विकार करणारे नसतील तर संस्कार मुळात रुजणारच नाहीत. शिवाय आपल्या मुलाचं भवितव्य कसं घडवायचं हे मायबापांनीच ठरवायचं असतं व मायबापांनीच त्यासाठी प्रयत्न करायचा असतो. याबाबतीत आतिशयोक्ती न केलेली बरी.
आपले मायबापच आपल्यावर संस्कार करीत असतात. ते फुलवीत असतात. याबाबतीत एक उदाहरण देतो. आपण थॉमस अल्वा एडीसनचं नाव ऐकलं असेलच. म्हणतात की थॉमस शाळेतच गेला नाही. मग तो शास्रज्ञ कसा झालाय? त्याचं अस्तित्व की त्याच्या आईला त्याला प्रेरणा देण्यासाठी थोडसं खोटंही बोलावं लागलं. यातील थॉमसची कथा अशीच.
थॉमस शाळेतच जात होता. तो शाळेतील शिक्षकांना प्रश्न विचारायचा. ते प्रश्न ऐकून शाळेतील शिक्षकांना आश्चर्य वाटायचं. तसे ते टाळाटाळ करायचे. शेवटी त्याचे ते प्रश्न विचारुन ते कंटाळले व त्यांनी एका चिठ्ठीत काहीतरी लिहून ती चिठ्ठी थॉमसला देवून म्हटलं की ही घेत व आपल्या आईशिवाय कोणालाही देवू नकोस. ती चिठ्ठी घेवून थॉमस घरी आला. त्यानं ती चिठ्ठी आईच्या हातात दिली. त्यानंतर त्याने आपल्या आईला विचारलं, "आई, असं काय लिहिलं आहे चिठ्ठीत?"
ते मुलाचं बोलणं. तशी आई रडली. तिनं आपल्या बाळाला कवटाळून म्हटलं,
"बाळ, त्या चिठ्ठीत असं लिहिलं की आपला थॉमस विलक्षण बुद्धीमत्तेचा धनी आहे. आम्ही शिक्षक त्याला शिकवू शकत नाही. आपणच त्याला शिकवावं. कारण आम्ही तेवढ्या मोठ्या व्यक्तीमत्वाला शिकविण्याच्या लायक नाही."
थॉमसनं ते ऐकलं व त्यानं आपल्या आईवर विश्वास ठेवला. त्यानंतर तो आपल्याच आईजवळून शिकू लागला. आता विचार हा की त्याच्या आईनं त्याला काय शिकवलं असेल? एबीसीडी की एखादं अंकगणित की अ आ इ ई. याबाबतीत सांगतांना एवढंच म्हणता येईल की त्या आईनं त्याला वरीलपैकी काहीच शिकवलं नाही. मग काय शिकवलं असेल आईनं? आईनं त्याला शिकवली जिद्द, चिकाटी, निरीक्षण क्षमता, पराभव, कितीही वेळेला का होईना, हार न मानणारी वृत्ती, तसेच प्रयत्नांची पराकाष्ठा. याच गोष्टीच्या आधारे थॉमस अल्वा एडीसन शिकले व त्यांना विजेचा शोध लावता आला. तसंच त्यांना जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ बनता आलं. मात्र त्याच्या आईनं ती चिठ्ठी सांभाळून ठेवली होती संदूकात. जेव्हा त्याची आई मरण पावली. त्यानंतर काही वर्षानं जेव्हा संदूक उघडलं गेलं आणि ती चिठ्ठी उघडली गेली होती शिक्षकांनी दिलेली. तेव्हा त्या चिठ्ठीत लिहिलं होतं.
'थॉमस हा एक मुर्ख स्वरुपाचा मुलगा असून त्याला आम्ही शिकवू शकत नाही. त्याची स्वतःची बुद्धीमत्ता तर चालत नाही. व्यतिरीक्त तो आमच्याही बुद्धीमत्तेला सुरुंग लावतो. त्यामुळंच त्याला आम्ही शाळेतून काढून टाकत आहोत.'
आई........आई बाळाची ती प्रेरणा असते की त्या बाळाला ती शुन्यातून शतकापर्यंत नेते. ती आई आपल्या बाळाला झिरोतून हिरोही बनवते. जसं थॉमसच्या आईनं थॉमसचं केलं होतं. ती संस्कारही शिकवते बाळाला. त्याला आपल्या स्वतःचा संसार व्यवस्थीत चालवता यावा यासाठी. ती खोटीही बोलते कधीकधी. ते बोलणं खोटं नसंतच. परंतु मुलं चांगल्या संस्कारी गोष्टी शिकत नाहीत. ते शिकतात वात्रट गोष्टी. माहीत नसतं मायबापांना ते कोणाची संगत धरतात ते. मग त्याच कुसंगतीचा परिणाम म्हणून एक दिवस ते आपल्या स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी करीत असतात.
अलिकडील काळ हा कलिकाळ आहे. थॉमसची आई नक्कीच खोटी बोलली होती. परंतु ती खोटी बोलली आपल्या बाळाचं भवितव्य बनविण्यासाठी आणि ते बनलंही. परंतु अलिकडच्या कलिकाळात चांगल्या गोष्टीसाठी खोटं बोलणारे आईबाप नाहीत. अलिकडच्या काळात आपल्या मुलांवर कुसंस्कार करणारेच मायबाप आहेत, असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. मला मुलगाच हवा. मुलगी नाही आणि मुलगी झालीच तर सुनेला घरातून हुसकावून लावणारे मायबाप आज आहेत. शिवाय एखाद्या मुलीला बाळ झालं नाही आणि ती जर वांझ असेल तर चक्कं सोडचिठ्ठी मागावयास भाग पाडणारे मायबाप आहेत. याही पलीकडे जावून मुलानं आपलंच ऐकावं, म्हणून त्याचेवर अंधश्रद्धेच्या आहारी जावून भानामती करणारे मायबाप आहेत आणि पुत्रवधू आवडली नसल्यानं पहिल्याच दिवशीपासून तिच्यावर अत्याचार करणारे व करायला लावणारे मायबाप आहेत. शिवाय आपली मुलगी, आपली मुलगी व आपली सुन, परायाची मुलगी असा भेदभाव करणारेही मायबाप आहेत.
सुसंस्कार फुलत असतांना कुसंस्कार फुलविण्यासाठी सदैव तत्पर असणारे जसे मायबाप या कलिकाळात आहेत. तशीच मुलंही त्याचप्रकारची कलिकाळात आहेत. अशी मुलं मायबापाचं ऐकून स्वतः विचार न करता जबरदस्तीनं आपल्या पत्नीला विष देतात वा तिच्या गळ्याला गळफास लावून तिचा जीव घेतात. शिवाय या सर्व भानगडीत सुनाही मागं नाहीत. काही ठिकाणी संधी मिळताच सासवांना घराच्या बाहेर काढणाऱ्या सुनांची या जगात वानवा नाही. तसंच आपल्या पतीच्या कधी कानाशी लागून लाडी गोडीनं वा कधी धमकीनं आपल्या सासू सासऱ्यांना वृद्धाश्रमात पाठवणाऱ्या सुनांची काही कमी नाही. खरंच याला संस्कार म्हणता येईल काय? संसार तरी? आजच्या काळात मी, माझी पत्नी आणि माझी मुलं यालाच संसार मानल्या जातो व त्यांचं चांगलं पटत असल्यानं त्याला संस्कारासह चांगला संसारही समजल्या जातो. परंतु तो संस्कार नसतो, तर कुसंस्कार असतो. तो संसारही नसतो, तर कुसंसारच असतो. कारण त्यांचे मायबाप हे वृद्धाश्रमात असतात. ही मंडळी, त्याच विभक्त कुटूंब पद्धतीलाच संस्कारही मानते आणि मायबाप वृद्धाश्रमात पाठवते. जिथं मायबाप कुढत कुढत मरण पावतात. ना कोणी त्यांच्याकडे फिरकत ना कोणी त्यांच्या मयतीलाही जात. मग मरण पावल्यावर सारेच दाहसंस्कार. तेच ते कावळ्याला घास चारणे व तेच ते पिंडदान. कावळा येतोही व सुग्रास अन्न खावून जातोही. तद्नंतर समजलं जातं की मी जरी सेवा केली नसेल, तरी मी टाकलेल्या पात्रातील अन्न कावळा येवून खावून गेला. माझ्या मातापित्यानं मला आशीर्वादच दिला. याही व्यतिरीक्त काही लोकांचं म्हणणं. काही काही लोकं असे असतात की जे हिंदू धर्मातील सोळाही संस्कार करतात. अतिशय शास्त्रोक्त पद्धतीनं करतात आणि मायबाप कुठं? तर ते वृद्धाश्रमात असतात. खरंच अशा महाभागांना संस्कारी माणसं तरी म्हणता येईल काय?
महत्वाचं सांगायचं झाल्यास एखादी मुलगी प्रसंगी देवधर्म पुजत नसेल, डोक्यावर सेव जरी घेत नसेल, केस मोकळे सोडून गावभर फिरत असेल. ती लाली लिपस्टिक लावत असेल. शिवाय अर्धनग्न कपड्यातही फिरत असेल, तर तिला आपण दुषणे देतो. 'काय वाह्यात मुलगी आहे. हिला तिच्या मायबापानं साधे संस्कारही शिकवले नाहीत. महाविद्यालयातही ती तशाच अवस्थेत आली. ही शिक्षण करायला आली की आपले रुपडे दाखवायला' असे सहज उद्गार आपल्या तोंडातून बाहेर पडतात. परंतु ती जर मायबापाची सेवा करीत असेल, म्हाताऱ्या माणसांची सेवा करीत असेल वा अनाथ, अपंगांची ती दया घेत असेल तर तिला तिनं मॉडर्न जरी कपडे परिधान केले वा मॉडर्न पद्धतीनं जरी ती वागली तरी तिला संस्कारी मुलगी म्हणता येईल आणि मानताही येईल. याऊलट जर एखादी मुलगी मॉडर्न जरी वाटत नसली, रोज मंदीरात जात असली, पुजापाठ करीत असली, डोक्यावर पदर (घुंगट) घेवून राहात असली, भांगात कुंकू भरत असली तरी ती जर आपल्या मायबापाची, आपल्या सासूसासऱ्याची, वयोवृद्ध माणसांची तसेच अपंग, अनाथांची सेवा करीत नसेल तर ती संस्कारी नसते आणि तसं समजण्याचं कारणही नाही. तिचा संसार जरी चांगला होत असला तरी ती संस्कारी होवूच शकत नाही यात दुमत नाही.
विशेष सांगायचं झाल्यास संस्कार व संसार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जर या दोन्ही बाजू सुसंगत असल्या तरच तो व्यक्ती सुसंस्कारी ठरतो आणि त्या दोन्ही बाजू जर परस्पर विरोधी ठरल्या तर तो व्यक्ती तेवढाच कुसंस्कारी ठरतो. आता आपल्याला ठरवायचंय की आपण साधेभोळे राहून कुसंस्कारी बनायचे की मॉडर्न राहून सुसंस्कारी. हे मात्र आपल्याच हातात आहे. आपण नेहमीच कुसंस्कारानेच वागतो आणि ज्यावेळेस आपल्याला शहाणपण येते व आपण सुसंस्काराने वागायला लागतो, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. म्हणूनच अशी वेळ निघून जाण्याच्या पुर्वीच आपण सावधान झालेलं बरं. आपली मॉडर्न जरी वागायची इच्छा असली तरी सुसंस्कार सोडू नये आणि आपली साधी भोळी पद्धत जरी आपल्याला आवडत असली तरी कुसंस्कार धरु नये. शिवाय हिंदू धर्मात सांगीतलेले सोळा प्रकारचे संस्कार हे जरी खरे असले तरी त्याचा केवळ दिखावा करुन प्रदर्शन मांडू नये. त्या पद्धतीनं वागावे, तरंच खऱ्या संस्काराला महत्व प्राप्त होते व संसारही चांगला फुलतो, बसतो. कारण त्याला थोरामोठ्यांचा, पुर्व पिढीचा आशीर्वादच लाभलेला असतो यात शंका नाही.
ज्योती वाटत होती एक संस्कार नसलेली मुलगी. तसं तिच्या पोशाखावरुन दिसून येत होतं. कारण ती आधुनीक स्वरुपाची वस्र परिधान करायची. शिवाय तिच्या केसाची केससज्जाही आधुनीक स्वरुपाची होती. वागणं बोलणंही आधुनीकच. त्यामुळंच तिच्या एकंदरच त्या गोष्टीवरून तिच्यावर संस्कार नसलेलेच वाटायचे. परंतु तिही संस्कारी होती. तिचे संस्कार वाखाणण्याजोगेच होते.
ज्योती आज वृद्धाश्रमात होती. तिला त्या वृद्धाश्रमात तिच्या तरुणपणातील घरची परिस्थिती आठवत होती. तसं पाहिल्यास तिची जशी घरची परिस्थिती बेताचीच होती. तसं पाहता त्या बेताच्या परिस्थितीनं ज्योतीला कसं वागायचं व कसं नाही याची जाणीव झाली होतीच. त्यानंतर ती त्याच बेताच्या परिस्थितीनं सासरी गेली. तेव्हा तिच्या सासरची परिस्थितीही बेताचीच होती. शिवाय तिचा पती म्हणजे तीन भावंडं होती व ज्योती ही मधली स्नुषा होती.
ज्योतीनं विवाहापुर्वी विचार केला होता की सासरी गेल्यानंतर तिला भन्नाट सुख येईल. कारण ती मधली स्नुषा आहे. परंतु तो तिचा आशावाद होता. तिला सुरुवातीपासूनच सासरच्या माणसांची सेवा करावी लागली होती. तिचे सासरे व सासू ती मधली असूनही तिच्यातच होते. जवळपास तिच्या विवाहाच्या अठरा वर्षपर्यंत ते तिच्याकडेच होते व तिच्या हातून आपली सेवा करुन घेत होते. तिही माहेरी तिनं जी परिस्थिती भोगली होती, त्याच परिस्थितीनुसार ती आज सासरीही वागत होती नव्हे तर वागायला लागली होती. ती सासू सासऱ्यांची सेवा करीत असे. अशातच तिला एक पुत्ररत्न प्राप्त झालं होतं.
ते पुत्ररत्न. ती पुत्रीच होती व ती मुलगी लहानपणापासूनच आपल्या आईचं वागणं पाहू लागली होती. ज्योतीची मुलगी ज्योतीचं सासू सासऱ्यांची सेवा करणं पाहात होती. तेच संस्कार पडत होते तिच्यावर.
ज्योतीच्या मुलीचं नाव सायली होती. सायली आपल्या आईवडीलांपासून सुसंस्कारी गोष्टी शिकलीच होती. शिवाय त्याही गोष्टी शिकली होती. ज्या आयुष्याच्या वळणावर मोकळा श्वास घ्यायला अडथड्याच्या ठरणार नाहीत. तिनं काळानुसार कसं वागायचं? ह्या गोष्टीचाही बोध घेतला होता.
सायली मजबूर होती. म्हणूनच ती आपल्या आईची सेवा करु शकत नव्हती, जरी तिच्यावर संस्कार चांगले असले तरी. तिलाही आपल्या आईची आठवण यायचीच. परंतु ती तरी काय करणार? कामाच्या व्यस्ततेनं तिला साधं आईला फोन करणंही जमत नव्हतं. शिवाय ती विदेशात असल्यानं तिच्यावर बंधनही तेवढंच होतं. तिला आपल्या पतीचं ऐकणं भाग होतं.
ज्योती वृद्धाश्रमात होती. तशी ती वृद्धाश्रमात सुखीच होती. कारण ती कोणत्याच दुःखावर विचारच करायची नाही, तर दुःखाला प्रारब्धच समजून ते तर येणारच. मग त्याचा बाऊ का करावा? अशाचप्रकारचे तिचे विचार होते.
आज वृद्धाश्रमातही असतांना ती आपल्या मुलीच्या कर्तृत्वाला दोष देत नव्हती, ना आपल्या प्रारब्धालाही दोष देत होती. उलट गुरुला, आरतीला व इतर वृद्धाश्रमातील लोकांना मार्गदर्शन करायची. म्हणायची की दुःख तर येणारच आहे. मग त्यावर रडत बसून काय उपयोग? त्या दुःखाला दुःख न मानता त्याचा तेवढ्याच ताकदीनं सामना केलेला बरा. म्हणजेच कोणत्याही दुःखाची वा दुःखदायक घटनांची तीव्रता कमी होईल.
ते अनमोलच विचार होते तिचे. आलेल्या संकटांवर मार्ग काढण्याचे. अगदी सहजपणे त्यातून कोणालाही मार्ग काढता येईल. तसं पाहिल्यास त्या संकटांवर ती मार्ग काढण्याचा जणू उपाय सांगत नव्हती, तर प्रत्यक्ष वागून दाखवत संकटांचा सामना कसा करायचा? याचं प्रात्यक्षीकही दाखवत होती. ती वृद्धाश्रमात राहात असतांना तिनं केलेलं मार्गदर्शन सर्वांना पटत होतं. तसं पाहिल्यास तिचा स्वभाव गोड होता.
तिचा स्वभाव गोड असणे ही एक आश्चर्याचीच गोष्ट वाटत होती गुरुला. तशी आश्चर्याचीच ती गोष्ट वाटल्यानं तिचा स्वभाव कसा गोड आहे? ती काय खाते? काय पिते? हे पाहण्यासाठी एकदा गुरुनं तिला काही प्रश्न केले होते, ज्यात तिनं जी उत्तरं दिली होती. ती उत्तरंही आश्चर्यच करणारी होती.
एकदा गुरुनं तिला विचारलं,
"तुला सर्वात जास्त काय आवडतं?" त्यावर तिनं रबडी असं उत्तर दिलं होतं. ते उत्तर ऐकून वाटलं होतं की तिला कदाचीत राग येत नसेल. परंतु एकदा कोणतीतरी वस्तू तिला कमी पडल्यानं ती रागावलीही होती. तसा त्यानं तद्नंतर तिला दुसरा प्रश्न केला होता. तो म्हणजे तिला तिखट खाणं आवडतं का आणि ते तिखट कितपत खाणं आवडतं? त्यावर ती म्हणाली की तिला तिखट खाणं फार आवडतं व ते तिखट खाणं तिच्या पतीलाही आवडत होतं. त्यांना तर रसदार तिखट आवडायचं.
तिखट हा एक स्वभावगुणांचा भाग होता. तो तामसी गुणांचा एक घटक होता. तो घटक व्यक्तींमध्ये राग जास्त पसरवत होता. मग गुरुला आश्चर्य वाटलं की ती आणि तिचा पती जर जास्त तिखट खात होते, तर तिचा स्वभाग गोड बनलाच कसा? त्यावर ती कदाचीत गोडच वस्तू खात असेल असा निष्कर्ष गुरुनं काढला होता.
आरती जशी उत्साही होती. तशीच उत्साही होती ज्योतीही. आरतीला ज्योतीच उत्साही ठेवत असे. वृद्धाश्रमात दररोज सकाळ सायंकाळ प्रार्थना होत असे. ती प्रार्थना झाली की त्यानंतरच जेवनखावण मिळायचं. शिवाय ज्योती आणि आरतीनं सकाळी सकाळीच सर्वांना फुले देण्याची पद्धत सुरु केलेली असल्यानं सर्वांचा दिवस आनंददायी जात असे. रात्रीला जेवन झाल्यावर दोन चार दिवसाच्या आडमध्ये मनोरंजनाचे कार्यक्रम असायचे. कधी त्यात किर्तन तर कधी भारुड, कधी पोवाडे तर कधी भक्तीगीते असायची. कधीकधी कवीसंमेलनही व्हायचं. या सांस्कृतिक कार्यक्रमात कधी बाहेरील वक्ते बोलावले जायचे.
वृद्धाश्रमातील ते सांस्कृतीक कार्यक्रम. त्या सांस्कृतीक कार्यक्रमात कधीकधी त्या वृद्धाश्रमातील ती म्हातारी माणसंही भाग घ्यायची. त्यामुळंच तो कार्यक्रम अगदी रोचक बनायचा. शिवाय त्या वृद्धाश्रमात वयोवृद्ध व्यक्तींच्या अभिव्यक्तीला वाव असल्यानं ते वृद्धाश्रम वृद्धाश्रमासारखं वाटत नव्हतं तर ते अतिशय मनोरंजक वाटत होतं. मनोरंजक बनलं होतं. याशिवाय वयोवृद्ध मंडळींना औषधं सुद्धा वेळोवेळी व वेळेवर दिली जात असत.
ते वृद्धाश्रम....... त्या वृद्धाश्रमात खाण्यापिण्याचंही नियोजन असायचं. वयोवृद्ध मंडळींसाठी जास्त तेलकट, जास्त तिखट पदार्थ मिळायचे नाहीत. ज्यामुळं कोणत्याही स्वरुपाचे आजार वाढतील. ज्योतीला तर सुरुवातीला ते पदार्थ खाणंच होत नव्हते. कारण तिला जास्तीत जास्त तिखट खाण्याची सवय होती. तिला गोडही तेवढंच आवडत असे. तिच्या खाण्यात दररोज एखादा तरी गोड पदार्थ असायचाच. परंतु वृद्धाश्रमात दररोज गोड पदार्थ नसायचा. शिवाय गोड द्यायचंच झालं तर फक्त राष्ट्रीय सणाच्या दिवशीच दिलं जायचं. त्यामुळंच वृद्धाश्रमातील वयोवृद्धांना तऱ्हेतऱ्हेच्या खाण्यावर बंधन ठेवावंच लागत होतं. कधीकधी एखादा समाजसेवक वृद्धाश्रमात येई व तो एखाद्या वेळेस फळवाटप करुन जाई. कधी अंथरुण पांघरुणही दानात मिळत होतं.
ते तिचं म्हातारपण. तशी एकाकी असलेली ती. तिला आता जगावंसंच वाटत नव्हतं. आयुष्य संपल्यागत तिचं जगणं व जीवन होतं. पती होता, तेव्हापर्यंत तिला आधार तरी होता. परंतु पती मरण पावताच तिचा आधार संपला होता. ती इतर वृद्धाश्रमातील लोकांना आधार द्यायची आपल्या विचारानं. परंतु ती स्वतः असहाय्य होती, ती स्वतःला असहाय्य समजत नसली तरीही. आता ना तिला तिच्या मुलीचे फोन येत होते. ना ती आता मुलीला फोन करीत होती. मध्य॔तरी एकदा लावून पाहिला होता तिनं आपल्या मुलीला फोन. परंतु व्यस्तच दाखवत होता.
सायली अशी कशी व्यस्त होती, ते कळत नव्हतं. तसा सायलीच्या फोन न उचलण्यावरुन काळजी न करणारी ज्योतीही काळजी करायला लागली होती. आयुष्याच्या त्या उतारवयात. ती आधार शोधत होती सायलीचा नव्हे तर सायलीच्या बोलण्याचा. परंतु सायलीचा एवढाही आधार नव्हता की तिच्याशी मनमोकळेपणानं गप्पा मारता येतील. अशातच ती आजारी पडली. ती एवढी आजारी पडली की ती त्यातून सावरलीच नाही.
ज्योती आजारी होती त्या उतारवयात. तसं पाहता तिचं आजारपण वाढत चाललं होतं. गुरु आपण पत्नी आरतीसह तिला दररोजच भेटायला जात असे. तिचे हालहवाल विचारत असे. तो तिला भेटायला येताच तिला थोडं बरं वाटत असे. कोणी माहेरचा व्यक्ती आपल्याला भेटायला आला असंही जाणवू लागलं होतं.
दिवसेंदिवस तिचा आजार वाढतच चालला होता व तसा तोही एक दिवस उजळला. त्या दिवशी आरती सकाळीच उठून नित्यनेमानं तिच्या कमऱ्याकडे गेली. तशी ती दररोजच फुलं देत असे ज्योतीला. आजही ती तिला फुलं द्यायलाच गेली होती. तिनं तिला फुल देण्यासाठी बराच आवाज दिला. परंतु सगळा प्रयत्न फोल झाला. ते पाहून तिनं दार उघडलं तर पाहते काय, ती पलंगावरच निपचीत पडली होती. तिचं अंग गारगार झालं होतं. तिला चिरविश्रांतीची झोप लागली होती. जिनं आजपर्यंत जणू सर्वजणांना दुःख म्हणजे काय? याविषयी मार्गदर्शन केलं होतं. ती ज्योती ज्योत बनून केव्हाच देवाघरी निघून गेली होती.
तिचं नाव ज्योती होतं व तिनं आपल्या ज्योती नावानं ज्ञानज्योतच लावली होती. जगाला तिनं दुःख कधीच करायचं नाही, असं सांगून जणू दुःख निर्वाणाचाच मार्ग सांगीतला होता. दुःख आलंच तर हरळून जावू नये नव्हे तर त्याचा प्रतिकार करावा असं तत्वज्ञान तिनं आपल्या संबंध आयुष्यात मांडलं होतं. ती आपल्या तत्वज्ञानानं जगाची धात्री बनली होती.
आज ज्योती जगात नव्हती. परंतु तिचं तत्वज्ञान जगात होतं. ते जगात प्रत्येकाच्या श्वासात होतं. त्याचबरोबर ते प्रत्येकांच्या ह्रृदयातही होतं. शिवाय प्रत्येकांच्या ह्रृदयातून ओसंडून वाहात होतं.
************************************************

आरतीनं ज्योतीला निपचीत पडलेलं पाहिलं. तसा तिनं हंबरडा फोडला. तो हंबरडा एवढ्या मोठ्या प्रमाणात होता की तो आवाज आजुबाजूला पसरला. तसं काय झालं म्हणून त्या वृद्धाश्रमातील मंडळी तिथं गोळा झाली. ते भिरिभिरी पाहायला लागले. ज्यात गुरुचाही समावेश होता. सर्वजणं पाहात होते की ज्योती पलंगावर निपचीत पडली आहे.
आरतीसह सर्वजणांनी तिला पाहिलं. प्रत्येकांनी हरहळ व्यक्त केली. ज्योती मरण पावली आहे याची शहानिशा झाली. त्यानंतर कोणीतरी म्हटलं की तिची मुलगी सायली विदेशात आहे. जरा तिला बोलावणं पाठवावं. ठरल्याप्रमाणे सायलीला आधी फोन करुन पाहिला. परंतु फोनवर काहीही जबाब आला नाही. त्यानंतर मेल करण्यात आला व त्याचं उत्तर लगेच आलं. 'मी फार लांब असून मला यायला उशीर होईल. आपण प्रत्यक्षात मरण आटोपवून टाकावं. मात्र अस्थीरक्षा विसर्जन करु नये. मी येत आहे.'
सायलीचा आलेला मेलवरचा संदेश. तो माहीत होताच त्या वृद्धाश्रमातील प्रशासनानं हळहळ व्यक्त करीत ज्योतीच्या मृतदेहाला अग्नीच्या स्वाधीन केलं. त्यानंतर सायलीनं म्हटल्यानुसार तिच्या मृतदेहाला अग्नी दिल्यानंतर ती रक्षा व त्या अस्थी ती येईपर्यंत ठेवून राखल्या. तशी सायलीही लवकरच देशात परत आली. ती वृद्धाश्रमात गेली व तिनं अस्थीकलश आपल्या ताब्यात घेतला व तिनं त्यावर योग्य संस्कार करुन त्या अस्थी व रक्षा नदीत शिरवून टाकल्या. त्यानंतर तिनं निर्णय घेतला. निर्णय हा होता की तिचं घर. ते घर तिनं वृद्धाश्रमातील लोकांना राहण्यासाठी वृद्धाश्रमाला दान दिलं होतं.
ज्योतीचं ते घर आज दिपवून जात होतं. ती केवळ नावानंच ज्योती नव्हती तर जणू इतरांना प्रकाशमान करणारीच एक ज्योत होती.
आज सायलीनं दान दिलेल्या त्या ज्योतीच्या घरात शेकडो वृद्ध माणसे राहात असत. त्या वृद्ध माणसांना तिनं ते घर हक्काचं घर म्हणून दिलं होतं. कधीकधी तिला जेव्हा जेव्हा सवड मिळत असे. तेव्हा तेव्हा ती देशात येत असे आणि ती त्या घराला आवर्जून भेट देत असे. त्यातच ती जेव्हा त्या वृद्ध व्यक्तींना पाहात असे. तेव्हा तिचंही मन उचंबळून यायचं. ती ओक्साबोक्सी रडायची. तेव्हा त्याच वृद्धाश्रमातील एखादी म्हातारी तिच्या खांद्यावर हात ठेवायची आणि रडू नको बाळ म्हणायची. तेव्हा आपलं रडणं थांबवून वर पाहताच तिला त्यात आपली आई दिसायची.
ज्योती गेल्यानंतर गुरु आणि आरतीही जास्त दिवस जगले नाहीत. तेही काळाच्या ओघात निघून गेलेत आपला संसार संपवून. परंतु ते जेव्हा जिवंत होते. तेव्हा त्यांची मुलगी त्यांना भेटायला यायची. परंतु तिनं ते गेल्यानंतरही आपली जागा ना कोणाला दान दिली होती सायलीसारखी, ना कोणाला राहू दिलं होतं. ती जागा तिनं स्वतः आपल्याच ताब्यात ठेवली होती. आईवडीलांची सेवा न करता. मात्र त्या मकानाला तिनं नवीन नाव दिलं होतं आरतीप्रभूंचा आधार. त्या मकानात आता ती वाचनालय चालवीत होती व त्या वाचनालयातून आतापर्यंत शेकडो मुलं ऑफिसर होवून बाहेर पडले होते.
ते वृद्धाश्रम म्हणजे आधारच होतं ज्योती, गुरु आणि आरतीसाठी. वृद्धाश्रमापुर्वी ज्योतीला तिच्या पतीनं आधारच दिला होता. परंतु ते गेल्यानंतर ती घाबरली नाही. दुःख येणारच होते असं म्हणत तिनं वृद्धाश्रमाला आपला आधार बनवले होते आणि दिशा आखल्या होत्या जगण्याच्या. गुरुही त्याची मुलगी आपली आपल्या उतारवयात सेवा करीत नाही म्हणून चलबिचल झाला नाही वा डगमगला नाही. त्यानंही सायलीसारखीच आपली मुलगी असहाय्य समजून स्वतःच्या दिशा आखल्यात व त्यावर तो चालत राहिला. शेवटी अंतिम समयी डोळेही मिटलेत. परंतु ज्योतीसारखीच त्यानंही आपल्या मुलीबद्दल कुरकूर केली नाही. कारण तो गुण ज्योतीनंच त्याला दिला होता.
आज गुरु जिवंत नव्हता ना आरती अन् ना ज्योती. परंतु त्यांच्या आठवणी आजही जिवंत होत्या. त्या आठवणी केवळ सायलीच्याच आणि गुरुच्या मुलीच्याच नाही तर जगाच्या प्रेरणा झाल्या होत्या. आता जग त्यांच्या विचारावर किंबहूना चालत होतं नव्हे तर कोणत्याही स्वरुपाच्या संकटाच्या वेळेस दिशा ठरविण्यासाठी त्यांनी प्रसवलेल्या तत्वज्ञानाचा उपयोग केल्या जात असे नव्हे तर वापरच. ते तत्वज्ञान आज जणू जगाची गरजच झालं होतं नव्हे तर आयुष्याचा आधारच. असंच तत्वज्ञान ज्योती आणि गुरुनं साक्षात मांडलं होतं, आपल्या मुलांसाठी नाही तर जगासाठीच. जे तत्वज्ञान जगाला प्रेरणाच देत होतं आणि तेवढाच प्रकाशही तद्वतच आधारही..........

*******************************************************************************समाप्त ***********