मला झालेलं पहिल प्रेम - भाग 1 Ashu द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला झालेलं पहिल प्रेम - भाग 1

हि गोष्ट आहे 2013 ची, ज्या मी 10 वित होतो. मुळात मी खेडे गावातला, त्या वेळेस आमच्या गावात शाळा फक्त 7 वि पर्यंत होती. त्या नंतर कोणी तालूका कोणी जिल्हया सारख्या ठिकाणी जायचे, माझ्या घरची एवढी परिस्थिती नव्हती कि मला घरचे तालक्यात किंवा जिल्हयाला पाठवतील, म्हणून माझ्या घरच्यांनी माझ्या गावा शेजारी 10 पर्यंत शाळा होती पण तिथे जास्त सूविधा नसायची माझ्या सारखी बरेच मूल ज्यांची घरची परिस्थिती बिकट पण शिक्षणाची आवड असणारी मुले हॉस्टेल वर होती
अरे हो सांगायचं विसरलो मला ज्या शाळेत टाकलं होत ति एक बोर्डींग शाळा होती. सातवित म्हणजे खूप लहान होती मी तेव्हा अस वाटायचं शनिवार आणि रविवार कधी एकदाचा येतो की कारण मी त्या दिवशी गावाकडे चालतं जायचो पैसे तर सोबत राहायची नव्हती शिवाय त्या गावात वाहनाची सोय पण नव्हती. माझ्या गावातील फक्त एक मुलगा होता पण तो कधी तरी शाळेत यायचा म्हणून तेवढी काय आमच्या मध्ये मैत्री नव्हती, म्हणून मी दुसऱ्या मुला सोबत जास्त राहायचो ते पण माझ्या सारखी शनिवार रविवार कधी येईल याची वाट बघायची. असेच कसे तरी 2 वर्ष काढली दहाविच लास्ट वर्ष होत त्या वेळेस नेमकच कॉपी मुक्त केंद्र झालं होत म्हणून खूप दबाव होता घरच्यांना वाटायचं मुलगा दहावी पास झाल तर काही पुढे चालून पुढच शिक्षण घेता येईल मला पण वाटायचं मला निघेल का दहावी ज्या वेळी माझा थोडा इंग्लिश आणि मॅथचा प्रॉब्लेम होता. म्हणून थोडी मनात भीती होती. बघत बघत परीक्षा जवळ आली आमच्या सर्व शिझकांनी आमचा सेंड ऑफ ठेवला होता. त्या दिवशी सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणि मनात खूप दुःख होत.त्याच सगळ्यांनी आम्हाला जेवणाची पार्टी दिली होती पण त्या अगोदर प्रत्येकजण स्वतःच मनोगत शाळेतल्या आठवणी सांगून रडत होते, माझी तर उठण्याची देखील हिम्मत होत नव्हती. कसा बसा उठून थरथरत्या अंगाने आणि ओल्या डोळ्याने उठून 2 वाक्य बोलून खाली बसलो. सगळ्यांच मनोगत बोलून झाल्यावर सगळे हॉस्टेल कडे, जेवण करायला निघालो. त्या वेळेस मागून मला कोणी तरी आवाज दिला, मागे वळून बघितल तर माझ्या वर्गातिल सगळ्यात हुशार असलेली मुलगी पूजा होती. जे कि माझ्या सोबत पहिल्यांदा बोली , मला ह्या गोष्टी वर विश्वास बसत नव्हता की ती मला बोली कारण ती खूप शांत स्वभावाची मुलगी होती, ति जास्त कोणाला बोलायची नाही म्हणून मी थोडा आश्चर्यचकीत झालो मला शब्द सुचत नव्हते तिला काय बोलू तर पुढे होऊन तिनेच मला विचारलं की तुझ्या कडे इंग्लिशच गाईड आहे का माझ्या कडे त्या वेळेस एक पण गाईडस नव्हत पण मी तिला नकार देऊ शकलो नाही काही न बोलता मी फक्त मान हलवली तर ती म्हणाली जेवण झाल्यावर मला दे तर मी हो बोलुन माझ्या मित्रां सोबत जेवणासाठी गेलो पण काय माहित माझ्या मनातून ती जात नव्हती सारखा तिचा विचार येत होता. मला असं वाटत होत एवढ्या मुलां पैकी हिने मलाच का विचारलं असेल बाकी तर किती हुशार आहेत मुल शिवाय तिच्या गावातील पण आहेत. तरी कसा बसा जेवण करून उठलो माझ्या गावातील जो मुलगा होता रवि त्याच्या कडे गाईडस होते आणि त्याच्या पेटीची चावी पण माझ्या कडे असायची म्हणून मी जाऊन पेटी उघडली आणि त्यातील इंग्लिशच गाईड काढल. आता मी फक्त वाट पाहात होतो कधी ती एकदाची येईल आणि मला बोलल म्हणून बराच वेळ मी तिची वाट पाहत होतो,असे करत करत 4 वाजून गेले होते