तीने सहज म्हणून त्याचा फोन हातात घेतला, .त्याच्या वॉलपेपर वर दोघांचा लग्ना आधीचा फार जुना फोटो होता, ते जेव्हा पहिल्यांदा भेटले होते तेव्हाचा, फोटो पाहताच तिच्या डोळ्या समोरून चार वर्षांपूर्वीचा काळ झळकू लागल.
***********************************************************************************************************************************
किती सुंदर दिवस होते ते अशोक आणि अपर्णा घरच्यांचा विरोध पत्करून पळून जाऊन लग्न केल, अशोकच्या एका मित्राने त्यांना भाड्याने जागा मिळवून दिली. .त्याच्या डिपॉजिट चे पैसे आणि पुढचं तीन चार महिन्याचं भाडं देखील त्यानच दिल, नशीब दोघाचे जॉब होते म्हणून निदान जेवत तरी होते ते दोन वेळ पण घरखर्च , पाणीबिल, लाईटबील दोघांच्या तुटपुंज्या पगारात भागत न्हवत त्यातच अशोकला एक नवीन नोकरीची संधी मिळाली पगार दुप्पट होता पण त्याच्या कामाचा वेळही दुप्पट वाढणार होता.. पण तरीही ह्या हलाखीच्या दिवसात त्याला हि संधी स्वीकारणं गरजेचं झाल,
दिवसाचे पंधरा -पंधरा तास अशोक नवीन कामात खपत होता अपर्णा मात्र आठ- नऊ तास काम करायची आणि घरी यायची रोजची रुटीन काम झाली कि उरलेला बराच वेळ तिला खायला उठायचा , टीव्ही पाहणं, वाचन करणं, हे तर चालूच होत पण फार एकटं एकटं वाटत राहायचं.
अशोक घरी आला कि खूप थकलेला असायचा तो जेऊन लगेच झोपायचा, अपर्णाला खूप वाईट वाटायचं ती त्याला खूपदा म्हणाली नको करुस हि नोकरी आपण राहू सुखी छोट्याशा संसारात मला काही नको अशोक, फक्त तू हवायस …”
"असं कस म्हणतेस अपर्णा .. आपल्याला आपलं घर नको का घ्यायला किती दिवस असं भाड्याने राहणार आपण..."
अपर्णा पुढे काहीच बोलू शकत न्हवती, कारण अशोकच म्हणणं पण खरं होत, त्यांना त्यांची हक्काची जागा हवी होती.
अशोकने तीन वर्षांत बरीचशी रक्कम जमा केली, आता त्यांना त्यांचं स्वतःच घर घेता येणार होत...
ते दोघे दर रविवारी. जागा बघायला जात असत...
आणि त्यांना एक फ्लॅट पसंतही पडला पण तो त्यांच्या बजेटच्या बाहेरचा होता, फ्लॅटचा मालक चांगला होता त्याने फ्लॅटची चावी देखील त्यांच्या हातात दिली पण उरलेले पैसे मात्र त्यांना सहा महिन्यांच्या आत फेडायचे होते, कारण त्या मालकाला कायमच दुबई सेटल व्हायचं होत.
अशोक नाही म्हणत होता पण अपर्णाला मात्र तो फ्लॅट मनापासून आवडला होता त्याला तिला नाही म्हणवत न्हवत., त्यांनी तो फ्लॅट हो - नाही करतच घेतला.
उरलेल्या पैशांचं काय….कुठून आणायचे पैसे...
दोघेही सतत ह्याच विचारात होते त्यांचं शिफ्टिंग झालं, त्यांनी फ्लॅट मध्ये राहायला सुरुवात देखील केली, फ्लॅटचा मालक दर पंधरा दिवसांनी आठवण करून द्यायला फोन करायचा.
अशोकने त्यांच्या सर्व मित्रांना विचारून झालं पण कुणाकडेच इतकी मोठी रक्कम न्हवती...
अपर्णा देखील टेन्शन मध्ये होती. तिने देखील तिच्या बॉसला विचारलं कामातल्या इतर सहकार्यांना विचारून पाहिलं, .पण कुणा कडूनही तिला मदत काही मिळाली नाही.
पैसे परत करायला आता फक्त एक महिन्याचा अवधी शिल्लक होता, अपर्णाचं दुसरं कशातच लक्ष न्हवत.. तिला कोणत्याही परिस्थिती हा फ्लॅट सोडायचा न्हवता, विचार करतच रस्ता क्रॉस करत असतानाच एका गाडीने तिला ठोकलं तिची शुद्ध हरपली..
गाडी वाल्याने तिला उचलून हॉस्पिटल गाठलं .. अपर्णाला जास्त लागलं न्हवत पण घाबरल्यामुळे तिला भोवळ आली होती, थोड्या वेळात ती शुद्धीवर आली..
"हॅलो.... आता कस वाटतंय" तो गाडीवाला अनोळखी इसम तिला विचारत होता...
"मी,..मी...इथे कशी आले." अपर्णाने आसपास पाहत त्या इसमाला विचारलं...
"तुम्हाला माझ्या गाडीमुळे छोटासा अपघात झाला तुमची शुद्ध हरपली होती पण डॉक्टर म्हणाले कि आता तुम्ही एकदम नॉर्मल आहात, आपल नाव? ”
"मी अपर्णा ….. अपर्णा अशोक काळे." अपर्णाने कसबस चेहऱ्यावर हसू आणत उत्तर दिल.
"मी सोहम….. सोहम म्हात्रे" इतक बोलून सोहमने हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला.
अपर्णा ने काहीस चाचरत स्वता:चा हात त्याच्या हाती दिला
. "चला मी तुम्हाला घरी सोडतो.." सोहम ने अगदी सहज विचारव तस विचारल.
" नको नको, तुम्ही का त्रास घ्याल, मी माझ्या नवर्याला घेते बोलावून"
" अहो मिसेस काळे , कशाला उगाच मिस्टरांना त्रास देताय , ते कामावर असतील त्यांना काळजी लागेल तुमची"
अपर्णा ला देखील वाटल आधीच अशोक ला किती टेन्शन आहे ह्या घराच्या पैशाचं अजून त्यात माझी भर नको.
" मिसेस काळे, कुठे हरवलात , निघुयात ना आपण" अस म्हणून सोहम तिला आधार देऊ लागला,
अपर्णाने मानेनेच नाही म्हणत स्वत: सावकाश सावकाश पाऊले टाकू लागली, सोहम तिच्या पासून काहीस अंतर राखून चालत होता , दोघां मधील शांततेचा भंग करत त्याने अपर्णाला विचारल.
"बायद वे.इतका कसला विचार करत होता तुम्ही रस्ता क्रॉस करताना"
अपर्णा गप्प होती , टी काहीच बोलली नाही.
"मिसेस काळे बोला , कदाचित मी काहीतरी मदत करू शकेल तुमची"
सांगू का ह्याला ह्याच्या आत्ता पर्यंतच्या वागण्यावरून तरी हा इसम मला सभ्य
वाटतोय…...अपर्णा मनातल्या मनात विचार करत होती.
अपर्णाने सांगायला सुरुवात केली.
क्रमशः