एक सैतानी रात्र - भाग 12 jay zom द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एक सैतानी रात्र - भाग 12

सीजन 2 भाग 1

नोट- सदर कथेत विकृत हत्याकांडांच स्पष्ट अगदी ह्दयाचा ठोका चुकला जाईल अस वर्णन करण्यात आल आहे. ज्याकारणाने ह्दयाचा त्रास असलेल्या स्त्री-पुरुष वाचकांनी ही कथा आपल्या जोखीमेवर वाचावी! 🙏🏼😊..

काल्पनिक कथा.

24-11-2001

रात्रीची वेळ 8:pm

( कालपाडा गाव ) 2001

आकाशात चंद्राचा अर्धा तुकडा चमकत होता. त्याच अर्ध्या चंद्राजवळून काही एकदोन गुंड काळे ढग त्या चंद्राला लूटण्यासाठी म्हंणजेच त्याचा प्रकाश धरतीवर पडण्यापासुन रोखण्यासाठी , त्याच्या अवतीभोवती जमत होते. पन त्या दोन जणांना त्याच्या प्रखर तेजापुढे टिकाव काही धरता येत नव्हता ,ते दोघे गबरु आले तसेच पुढे जात होते. नुकताच हिवाळ्याचा महिना सुरु झाला होता आणि त्यातच आज वर्षाच शेवटच दिवस होत.

हिवाळा असल्याने वातवरण थंड झाल होत, मंद पांढरट धुक हवेत विषारी वायरस प्रमाणे चौहीदिशेना पसरल होत. जमिनीवरच्या हिरव्यागार गवतांना थंडवाफ चिटकून त्या वाफेच रुपांतर पाण्यात होऊन जात , त्या गवतांवर लहान-लहान द्रव बिंदू साचलेले दिसत होते. आज वर्षाचा शेवटचा दिवस म्हंणजेच 31 डिसेंबरची रात्र उजाडली होती. कालपाडा सीटीत!(काल्पनिक नाव ) दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही लास्ट ईयर वीक साजरी होत होती. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात लास्ट वीकमध्ये हेलॉविनप्रमाणे सजावट केली जायची,लहाण मुले-मुली भुतांच वेष धारण करुन चौकलेटस मागायचे आणि आज तर शेवटचा दिवस होता आज तर खुप मोठ वादळ येऊन जाणर होत. कालपाडा गावातल्या रस्त्यांवर लास्ट ईयर लास्ट डे असल्याने हेलॉविनसारख्या डेकोरेशेन्स केल्या गेल्या होत्या. रस्त्यांवर असलेल्या खांबावर कवटी टांगुन त्या कवटी आत खांबावर विजांचे पिवळे बल्ब बसवलेले दिसत होते. त्याच पिवळ्या बल्बच्या उजेडांत लहान मुल मुली भुत खेतांचे वेष धारण करुन हातात भगव्या रंगाचा शिरोळा घेऊन फिरत होते. त्या गोल भगव्या शिरोळ्याला चांदण्यांसारखे दोन डोळे कोरलेले , तर तोंड म्हंणायला काय असेल बर? विचकलेला जबडा आणि धारधार दात .अगदी बरोबर ओळखळत!.दहा वर्षाच्या लहान मुलांपासुन ते वीशीच्या तरुणांपर्यंत

सर्वांनी आप-आपला आवडीचा हॉरर कॉस्ट्यूम घातला होता. कोणी काळ कोट,आत सदरा ,ताठ कॉलर,प्रेतासारखा चेहरा, नी ते धार धार दात ड्रेक्युला बनल होत, तर कोणी लांब नाकाची चेटकीण, मिचेल मायर्स,फ्रँंकेस्टाईन, वंडर वूमन, बैटमेन नाना त-हा. रस्त्यावरुन तीन लहान मुलांचा ग्रुप हातात शिरोळा घेऊन चालला होता. एक स्पाईडर मैन बनला होता, दूसरा आर्यंन स्पाईडर, तर तिसरा वेनम स्पाईडर ! काय दृश्य होत हे .मार्वलचा निर्माता पाहिल तर चक्रावूनच जाईल .नाही का?.असो!

" ए अंडू ! किती चौकलेटस भेटले?" वेनम स्पाईडर मुलाने लाल स्पाईडर मेन अंडू नामक मुलाला विचारल.

" अरे नाही न इतके. पन अजुन फिरु आपण भेटतील खुप! " अस म्हंणतच ते तिघे डाव्याबाजुला वळले . ते तिघेही सरळमार्गी रस्त्यावर होते आणि त्या रस्त्याच्या दोन्ही बाजुला बंगल्याची रांग होती.प्रत्येक बंगल्याच्या बाहेर गार्डनमध्ये हॅलोविन असल्याप्रमाणे वेगवेगळी जातीची भुत उभ करुन, त्यांभोवती लेझर लाईटसची ड़ेकोरेशन केली होती. फारच भयानक दिसतील अशी ड़ेकोरेशन. हे तिघेही डाव्याबाजुला वळताच एक पोलिसांची गाडी सायरन पेटलेल्या अवस्थेत हळुच रस्त्यावरुन पुढे निघुन गेली. त्या गाडीत दोन तरुण पोलिस हवालदार बसलेले. सर्वकाही सुरळीत सुरु आहे ना , नवीन वर्षाच्या दिवशी भांडण वगेरे न होवो ह्यासाठीच पोलिसांची एक गाडी रात्री फेरी मारत होती.

" कुठे काही भांडण वगैरे झालेल दिसत नाही. सगळ निट चालू आहे."

ड्राइव्हसीटवर बसलेला हवालदार मिरर मधुन आजुबाजुला पाहत वॉकी टॉकी मशीनमध्ये उच्चारला.

" हो ! .गाडी थांबव इथ मग!" ड्राईव्हसीट बाजुला बसलेला

तो तरुन हवालदार त्याला उद्देशून बोल्ला. तसे त्या ड्राईव्हकरणा-या हवालदाराने गाडी रसत्याच्या थोडी आडबाजुला थांबवली.

××××××××××××××××××

कालपाडा सीटी कचरा घाट= कालपाडा सीटीमध्ये असलेल्या बिल्डींग्स ,चाळी, बंगलो ह्या सर्व जागेंवरचा जेवढ सुख-ओला कचरा असायचा, तो कचरा गाडीतले कामगार इथे गोल प्लास्टीकच्या डब्यांत जमा करायचे म्हंणुनच ह्या जागेला कचराघाट अस नाव पडलेल. आता त्याच ठिकाणी अंधारात काही हालचाल होत होती. एका कच-याच्या पेटीत, एक भिकारी पोटाची भुक भागवण्यासाठी आपला उजवा हात आत घालून काही खायला मिळत का ते पाहत होता. त्या कच-याच्या पिवळ्या पेटीच झाकण त्याने उघड़ल होत. डाव्या हातात एक पिवळी पिशवी धरुन उजव्या हाताने काही खायला मिळत का ते शोधत होता, जस की उष्ट खाल्लेल पाव, वेफर्स, पामलेल भात, किड लागलेले लॉलीपॉप हे अस कही मिळाल की तो त्या पिशवी टाकत होता.

" खीखीखीखी!" एका पावाचा तुकडा मिळताच तो हसला. त्या नेहमीचंच होत काही खायला मिळाल की तो हसायचा.तसे कधीही न धूतलेले त्याचे पिवळसर दात व किडलेल्या काळ्या हिरड्या, आतली दुर्गंध बाहेर पडायची.आता ही ती दुर्गंध बाहेर पडली होती.

तो भिकारी जिथे उभा होता.तिथे फक्त आणि फक्त कच-याच साम्राज्य होत. एक पिवळा बल्ब तिथे चर्रचर्र करत जळत होता. जणु अंधाराला त्या भिका-यापासुन दुर ठेवण्याची सोय तो करत असावा.किंवा प्रकाश त्या असीम अंधारासमवेत लढा देत असावा. शेवटी चर्रचर्र करणारा तो बल्ब, विझला. कालोखाच्या पडद्याआड विलीन झाला. त्या कचरापेटिंजवळ घुप्प अंधार पसरला, रातकीड्यांची किर्र किर्र ऐकू येऊ लागली. अंधार पसरताच तो भिकारी घाबरला. शेवटी प्रकाश होत तो पर्यंत ती जागा पवित्रच होती जणु जी अंधारामुळे अ-पवित्र झाली असावी. तो भिकारी ही माणुसच होता ना? नाहीतर त्याच्या चेतातंतुना ती धोक्याची चाहूल कशी लागली असती? हातात पिवळी पिशवी पकडून उभा असलेला तो भिकारी आता जागेवरच थिजला होता! अंग बर्फाच्या लादीवर झोपवलेल्या मुर्द्यासारख ताठरल गेल होत. भीतीने पायाच्या टाचेपासुन मेंदूपर्यंत भयमय लाट पसरली होती. डोळ्यांच्या कडा हा हा म्हंणता मोठ्या झाल्या, तोंड उघडलं त्यातल ते पिवळे दात, किडलेल्या हिरड्या, आणि तो अर्धवट खाल्लेला तोंडात असलेला पाव दिसला.त्याच्या मागे कोणीतरी उभ होत! अस त्याच मन सांगत होत.आणि ते जे कोणी होत? कृर होत हे नक्कीच. भिका-याच्या माफे अंधा-या काजळीत एक काळसर आकृतीने आपल पटळ तैयार केल होत.

" हिहिहिहिहिही! मागे बघ रे ये भिका -या ? " एक खर्जातला हुकमी किन्नरी स्वर ऐकू आला. त्या भिका-याने यंत्रवत म्हंणा, की हुकमी आवाजाने म्हंणा? वळुन मागे पाहिल. आणि जस वळुन पाहिल त्याला ते रुप दिसल ! रुप तरी कसल ? अभद्र चांड़ाळ उभा होता. सात फुट उंची, खाली एक भगव्या रंगाची ढगाळ पेंट, शरीराने जल्लाद सारखा जाडा आणि डोक्यावर तो भगवा शिरोळा बसवलेला. ज्या शिरोळ्याच्या डोळ्यांतुन , व जबडा विचकून हस-या थोबाड़ातून तांबडा प्रकाश बाहेर पडत होता. आणि त्याच्या हातात एक धारधार ऑपरेशन, पोस्टमॉर्टमला डॉक्टर वापरतात ती ब्लेड होती. तोच हात गर्रकन वर आला, त्या भिका-याच्या विस्फारलेल्या पांढ-या बुभळांतल्या काळ्या मीरीतल्या पातळसर पडदयात जणु चिखलात हात घुसावा तसा आत घुसला. पातळसर बुभळाला बरोबर मधोमध फाडत थेट कवटीतल्या मांस पेशीना कापत आत घुसला. पाहिलीच एक रक्ताची कारंजी फवा-यासारखी उडाली,

" ए आई,आई,आई !" त्या भिका-याच्या कंठांतुन आत्मा ठणकली, गुद्दाच्या देठापासुन ही अशी कळ निघाली, शब्दांत वर्णन करणे नाही.

" आई आई आई! माxxxत!" त्या भिका-याने पळता पळताच एक शिवी हासडली. एका डोळ्यांतल बुभळ फाडुन त्यात अडकलेल्या त्या ब्लेडमधुन रक्ताची धार त्याच अर्ध तोंड भिजून निघाल होत. तसाच एका डोळ्याने मार्ग काढत तो पुढे पळत होता. ती हाताली पिशवी खाली पडली होती, त्यात कोंबळेल ते पाव,वेफर्स,चिकनचा तुकडा रक्ताच्या ताज्या चटणीने भिजल होत. तो भिकारी पुढे येणा-या कच-याच्या डब्ब्याना दुर फेकत पुढे पुढे जात होता. कण्हत, विव्हल्त मार्ग काढत होता. तेवढ्यात तो एका कच-याच्या डब्याला ठेपाळून खाली पडला. चेह-यावर पडला असल्याने ती डोळ्यात खोवलेली ब्लेड जमिनीवरच्या दाबाने अजुनच आता घुसली,थेट मागची कवटीफाडुन ,रक्ताची चिल्कांडी उडवत त्या वाढलेल्या केसांतुन बाहेर आली.

" आ.आ...ऽऽऽऽऽऽ" तो गुरासारखा ओरडला. हात पाय मुंगल्या आल्यासारखे जड झाले होते.पळून जाण्यासाठी ताकद उरली नव्हती तरीही जिव जाण्याच्या भीतीने तो जमिनिवर हात पाय मारत रेंगाळत पुढे पुढे जात होता.जिव वाचवण्यासाठीक्ष एक निष्फळ प्रयत्न सुरु होता. त्याच्या मागून तो येत होता. त्याच ते शिरोळ्याच हसणा-या बुजगावण्यासारख धड, अंधारात पुढे पुढे येताना दिसत होत.त्याचे ते काळे चकचकीत ढगाळ बुट वाजवत तो येत होता. चालता चालताच त्याने एक हात मागे नेहला , व कंबरेत खोसलेला धार धार च्ंदेरी पातिचा सुरा काढला.

" पळ.पळतोस?मा××त!" त्याने अस म्हंणतच एका पायाचा गुढघा वाकवला, मग उजव्या हातात मूठीत धरलेला सुरा हवेत नेहला आणि तिप्पट वेगाने खाली आणत थेट पाठीच्या मणक्यात घुसवला, गुलाबी कातडीत सूरीच्या टोकदार पातीने अलगद स्प्पक आवाज देत रक्ताच्या चिलकांड्या ऊडवत आत प्रवेश केला होता.

" आऽऽऽऽऽ!..." पुन्हा तो भिकारी ओरडला, त्याच्या वासलेल्या मुखातुन रक्ताची गुलनी ते पिवळसर दात,काळे ओठ गुलाबी जीभ सर्वकाही ताज्या रक्ताने रंगवत बाहेर पडली. चेह-यावर डोळ्यांत बुभळ फोडुन आत रुतलेली धार धार ब्लेड त्यातून रक्ताची पिचकारी उडाली.

तोच पाठीतला सुरा त्याने वेगात उपसुन काढला, मग पुन्हा हवेत नेत खाली आणला, असच त्याने तीन वेळा स्प्प,स्प्प वार केले. खालची जमिन त्या भिका-याच्या देहातुन निघणा-या लालसर रक्ताची रांगोळी काढुन गेली होती.पाठीवर इतके वार झाले होते.की तो पाठीचा मणका, लाल रक्ताच्या मिश्रणाने! आतील मांसामध्ये चिकटलेला स्पष्ट दिसत होता. त्याने तो सुरा आता पाठणातुन बाहेर काढला,काहीवेळा अगोदर त्या सू-याची पात चंदेरी रंगातली होती जी आता ह्या क्षणाला रक्ताचा आभिषेक करुण आली होती.

" हं,हं,हं,हं,हं! " त्या विकृत मानवाने किन्नरी हसत त्या भिका-याच्या हाताच कोपरा पकडला, आणि कोंबडी कापावी तस तो कोपरा त्या सुरीने कापला, क्च,कच,कच विशीष्ट आवाजाने रक्ताच पाठ वाहवत तो कोपरा त्याने कापून बाजुलाच फेकला. मग पाय धरला , एक दोनवेळा त्या पायाला डावि-उजवीकडे हळवल.कट,कट हाड तुटल्याचा आवाज झाला.

" आऽऽऽऽऽऽऽऽऽऽ" एक भयंकर वेदनादायक किंकाळी.नी पुढ़च्याक्षणाला त्या भिका-याच पाय मांडीपासुन पेंटसहितच रक्त मांस, जस कुल्फीतुन आईस्क्रीम वितळत सांडाव तस जमिनिवर सांडत वेगळ झाल. त्याने हात पाय तोंडून तसंच बाजुला फेकल. त्या तूटलेल्या पायातुन आतल्या काळ्या,लाल,मांसपेशी पबाहेर आलेल्या दिसत होत्या.इतक्या सर्व वेदनां होऊनही त्या भिका-याच्या देहातुन प्राण गेला नव्हता..उलट विकृत हात,पाय तुटलेल,रक्ताने माखलेल ते देह भयाण भासत होत. आणि त्या विकृत अवस्थेतही रेंगाळत तो भिकारी अद्याप जिव वाचवण्यासाठी जमिनीवरुन सरपटत पुढे जात होता. तेवढ्यात त्या विकृत ध्यानाने आपले दोन जाड जुड हात वाढवुन त्या भिका-याच डोक धरल. रक्ताने पुर्णत चेहरा माखला होता, एक डोळ फुटल होत तर दुसर मात्र व्यवथित होत.फुटलेल्या त्या डोळ्यांत घुसलेली ती ब्लेड हाताच्या बोटांची चिमटून बनवुन चिबी चिबिक मांसाला आजुबाजुला ढकलत त्याने बाहेर काढली. मग त्या भिका-याच डोक जास्त वेळ न घालवता, वर आकाशात केल , नी धारधार ब्लेड गळ्यावरुन उजवीकडून थेट,डावीपर्यंत एका रेषेत, अलगद लाल मांस चिरत, रक्ताची पिचकारी रप,रप,रप बाहेर पाडत फिरवली. त्या ब्लेडने गळा चिरला होता. त्या चिरलेल्या भागातुन आतला नरडीतला हाड साफ साफ दिसत होता. तो विकृत ध्यान अद्याप त्या भिका-याचा गळा कापतच होता.शेवटी शिर देहापासुन विलग झाल तेव्हाच तो थांबला. त्या भिका-याच कापलेल शिर हातात घेऊन तो जागेवर उभा राहिला.

रक्ताने माखलेला चेहरा , एक बुभळ फुटल होत, त्यातून मांस व रक्त बाहेर आलेल, तर दूसरा डोळा व्यस्थित होता. तोंडाचा आ मरतावेळेस भयाण पाहिल्यासारख विचकललेच होत.

" टिंग,टींग, टिंग..!" त्या पोलिसांच्या गाडितला फोन वाजला. तसा ड्राइव्हसीटवर बसलेल्या त्या हवालदाराने तो उचलून कानाला लावला.

" हेल्लो हवालदार मोहीते, " फोन उचलून तो हवालदार आपल नाव सांगत म्हंणाला. तसा पुढुन आवाज

"कालपाडा पोलिस स्टेशनमधुन सब इंस्पेक्टर बी.के.पाटील बोलतोय. " अगदी घाइघाइने उच्चारला जाणारा स्वर."आताच मिळालेल्या माहीतीनुसार जेलमधुन सायकॉ किलर रेंन्चो डिकोस्टा फरार झालाय. आणि आम्हाला पुर्णत

खात्रि आहे की तो तूम्ही असलेल्या लॉकेशन्स जवळच कुठेतरी आहे. म्हंणुनच रसत्यावर हॅलोविन साठी भटकणा-या मुलांना आणि त्याच्या पालकांना सतर्क रहायला सांगा.! तो पर्यंत आम्ही टीमने तिथे पोहतोच."

फोन ठेवल गेल.आणि ही न्यूज ऐकून हवालदार मोहीते व बाजुला असलेला कोंन्सटेबल चंद-या चटका बसल्यासारखे पुढील कृती करु लागले." व्यां,व्यां,व्यां,व्यां" प्रथम सायरन वाजल गेल. आणि गाडी सुसाट वा-याने रस्त्यावरुन पळू लागली. गाडीला असलेल्या भोंग्यातुन कोंन्सटेबल चंद-या पुढील सूचना देऊ लागला.

" कालपाडा जेलमधुन सायकॉ किलर रेंन्चो डिकोस्ट फरार झाला आहे.

लहान मुलांनी -मोठ्या थोर सर्वांनी आप-आपल्या घरात बसा ! "

क्रमश :