एक सैतानी रात्र - भाग 20 jay zom द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एक सैतानी रात्र - भाग 20

सिजन 2 भाग 9

भाग 20 all स्टोरी
# ******
xo :com

विजय इनामदारने आपल्या उजव्या हातात काळ्या रंगाची मॉडर्न रिव्हॉलव्हर पकडली होती एका मोठ्या झाडाच्या खोडामागे तो लपला होता, आणि त्याच्या मागेच गोडमारे उभा होता. आजुबाजुला ही जंगलातली मोठ-मोठाली झाडे उभी होती, त्या झाडांच्या शेंड्यावरुन अर्ध्या चंद्राची पांढरी दुधाळ कोर चमकतांना दिसत होती. तीचा निळ्सर करडा प्रकाश झाडांच्य गर्दीतुन वाट काढत जमिनीवर पडायचा निष्फळ प्रयत्न करत होता.

" सायेब! " गोडमारे हळुच पुटपुटला.

" काय ?" पुढे शैडोकडे पाहतच विजयने विचारल.

" तुम्हाला माझी शप्पत आहे, नेम चुकवु नका! नाहीतर ह्या जागेवरन

आपल नेम चुकवील तो !"

" लावली, लावली घाण मागे तु भें××××त! आता नक्कीच नेम चुकणार!" विजने जरास तिरकसपणे गोडमारेकडे रागीटनजरेन पाहिल.

" असं नका न बोलू सायेब!" गोडमारे रडवल्या सुरात म्हंणाला.

" शुश्श्श्श , !" विजय गोडमारेवर खेकसला. " आता गप्प बस्स हां! नाहीतर त्याच्या आधी तुलाच ठोकतो! " विजयच्य वाक्यावर गोडमारेची हवा लिक झाली, हाताची घडी घालून तोंडावर बोट ठेवून गोडमारेने मूग गिळले. तस विजयने पुन्हा समोर पाहील.

समोर वीस फुट अंतरावर काहिश्या मोठ-मोठाल्या-लहानसर गोल पांढ-या दगडी दिसत होत्या, तिथून नक्कीच पावसाळ्यात एक वहळ वाहत असाव, कारण खाली तपकीरी रेती पडलेली होती, आणि त्याच रेतीवर लहानसर दगडांच ढिग रचून तिथे एक शेकोटी शैडोने पेटवली होती,त्या शेकोटीतल्या आगीवर आत्मारामच नग्ण प्रेत तंदूर स्टाईलने भाजत ठेवल होत . त्या शेकोटीपुढेच साडे सहा फुट, बळदंड देहाची पाठमोरी शैडोची आकृती उभी होती! शैडोच्या शरीराची कातडी निलसर रंगाची होती, खप्पड चेहरा, दाट काळसर भुवया, आणि बेधक पिवळसर डोळे, नाक चेटकीणीसारख मोठ होत, दातांना जंगली आदीवास्यांसारखे धारलावुन कोरुन घेतल होत-ज्याकारणाने शैडो एक जिवंत रक्तपिपासु निशाचार भासत होता. त्याच्या अंगात हाफ सफेद रंगाची मळलेली टी-शर्ट जी की खांद्यांपर्यंत फाटली होती. पाठिवर फाटलेल्या त्या टी-शर्टमधुनच त्याची ती निळसर भयान कातडी आणि धनुष्यबाणाची दंडगोल झोळी,ज्यात रानटी देशी बाण भरुन ठेवले होते. खाली पायांत एक चौकलेटी पेंट होती,जी फाटून बरमुड्या सारखी झाली होती, पायांत बुट वगेरे काही नव्हत, त्यामुळे त्याच्या वाढलेल्या पायांची ती काळसर मोठाली नखे दिसत होती. बाजूचा एक सुरा त्याने आपल्या हातात घेतला. चंद्राच्या उजेडात ती चंदेरीपात चमकली,तीचा उजेड विजय,हरचंद दोघांच्या चेह-यावर पडला. हातातली सुरी घेऊन शैडो आत्मारामच्या प्रेताजवळ आला त्याने तो भिंगणारा रॉड हाताने थांबवल, आणि सुरा असलेला हात आत्मारामच्या गुढघ्यांवरच्या मांडीच्या दिशेने घेऊन जात , भाजलेल्या मांडीच मांस कच्च कच्च करत कापल, कापुन वेगळ केलेल गरम गरम वाफाळत मांस त्याने आपल्या चेटकीनी नाकाजवळ आणुन एक मोठा श्वास घेतला.

" स्स्स्स्स हाऽऽऽऽऽऽ!" प्रेताच्या मांसातुन निघणारी गरम वाफ त्याच्या नाकातुन देहात शिरली, तस त्याने जिभळ्या चाटून तो अर्धा मांसाचा पावशेर तुकडा कच्चकन धार धार दातांनी तोडून खायला सुरुवात केली.

" व्याऽऽ" विजयच्या तोंडून उलटी निघणार तोच, गोडमारेने आपला हात त्याच्या तोंडावर ठेवला! शैडोला तो आवाज आला, त्याच्या सशासारख्या कोरलेल्या कानांनी तो आवाज हेरला, तस त्याने गर्रकन वळुन हे दोघे लपलेल्या झाडाकडे पाहिल. त्याचे पिवळे डोळे अंगार ओकत होते. ह्या दोघांची किस्मत चांगली जोरावर होती की शैडोला त्या झाडाजवळ कोणिही दिसल नाही, तसे त्याने पुन्हा त्या प्रेताची चिरफाड करत खायला सुरुवात केली.

" सायेब , ठिक आहत का तूम्ही?" गोडमारेने विजयकडे पाहिल. त्याच्या चेह-यावर जरासे अस्वस्थ भाव होते.पोटात अद्याप मळमळतच होत. काहीवेळ सब इंन्सपेक्टर विजय असेच गप्प बसले.

" बस्स !" काहिवेळाने त्याचा आवाज आला . तसे गोडमारेने फ़क्त त्याच्याकडे पाहिल." आता ठोकतोच ह्याला!" म्हंणत विजयने मॉडर्न रिव्हॉलव्हर असलेला हात झाडाच्या खोडापासुन जरासा बाजुला आणला, व एक डोळा बंद करुन नेम धरला.व धाड आवाज करत गोळी निघाली....... ssssssssssssssssss

असती!

××××××××××××××××××

जनार्दन ने आपलाकाळ्या रंगाचा वॉकी टॉकी मशीन हातात घेतला.

एका चौकोनी पावाएवढी साईज होती त्या मशीनची, त्या मशीनच्या वरच्या भागावर एक कलंगडी एवध्या साईजची नेटवर्क स्टीक होती,

खाली एक पासुन ते नऊ- आणि शुन्य पर्यंत चिन्ह होते. वर एक छोठीशी हिरव्या रंगाची पेटती स्क्रीन दिसत होती. जनार्दनने वॉकी टॉकी तोंडा जवळ नेहला.

" हैलो..हैल्लो विजय सायेब ! सायेब मी जनार्दन बोलतोय! " विजय इनामदार घाई गडबडीत आपला वॉकि टॉकी टेबलावरच विसरुन गेला होता. ज्या टेबलावर भालचंद्र आणि तो काहीवेळा अगोदर दारुपीत बसले होते. त्या लाकडी टेबलावर तो वॉकी टॉकी जसच्या तसा पालथा पडलेला दिसत होता-आणि त्या वॉकि टॉकीपासुन पुढे खुर्चीवर पेंगत बसलेला भालचंद्रही दिसत होता. की अचानक वॉकी टॉकीवर असलेला एक सेव्ह मॉड बटन ऑटोमेटिक रित्या (टिक) आवाजासहित दाबल गेल , व सर्वकाही रिकोर्ड होऊ लागल.

" सायेब इथ काहीतरी आहे ! त्या दोघांमधला कोणीतरी एक इथ आलाय सायेब, तो नक्कीच रेंचो आहे. तूम्ही लवकर या इकड सायेब ! नाहीतर तो मला मारुन टाकेल सायेब!" जनाचा आवाज त्या वॉकी टॉकी तुन बाहेर पडत होता. पन त्या आवाजाला प्रतिउत्तर द्यायला तिथ उपस्थीत होत तरी कोण! भालचंद्र? अहो तो तर निद्राशय्येत गेला आहे नाही का ? मग आता ?

×××××××××××××

" थांबा सायेब !" गोडमारेने विजयला ट्रिगर खेचत असतांनाच मध्येच थांबवल.

"गोडमारे काय बोलतोयस तु? हे बघ ह्या असल्या हरामखोरांवर दया दाखवायची नसते ! मला माझ काम करुदेत ." विजय.

" अहो सायेब मी दया दाखवत नाही आहे ! उलट आपल्याच भल्याच बोलतोय."

" व्हॉट ? ह्यात आपल्या भल्याच काय आहे ?" विजयने एकक्षण रिव्हॉलव्हर खाली घेतल.

" सांगतो सायेब , सांगतो ऐका! त्या शैडोच दात बघा , धारधार आहेत की नाही ?" गोडमारेच्या वाक्यावर विजयने फ़क्त होकारार्थी मान हळवली.

" सायेब ते दात कोरलेल आहेत! आणि असे दात फ़क्त जंगली दुर्मीळ आदिवासीच कोरु शकतात.जे मांणसांना खातात. "

" हो मग!" विजय न समजुन म्हंणाला.

" अहो सायेब त्या शैडोची कातडी बघा." गोडमारेच्या वाक्यावर विजयने एकवेळ शैडोकडे पाहिल, त्याची निळसर रंगाची कातडी, चंद्राच्या उजेडात विषासारखी भासत होती.

" ती कातडी म्हंणजे त्या शैडोच चिळखत आहे सायेब! त्याच्या अंगावर तुमच्या ह्या गोळ्यांचा काय बी फायदा होणार नाही! "

" ओह अच्छा! मग कोणत हत्यार काम करु शकत? आपण ते मागवूयात!" विजयच्या वाक्यावर गोडमारे एकक्षण विचार करत बसला. व अचानकच म्हंणाला.

" एक आहे सायेब !"

" काय ?"

" ती नाय का ती बंदूक , मोठी हिरव्या रंगाची असती! शिनीपर लोक वापरतात ."

" व्हॉट?यू मिन स्निपर, ए:डब्ल्यु:एम!"

" हा हा सायेब तीच !"

" नॉ गोडमारे . ती बंदूक आपण पोलिस नाही वापरत! "

" मग " गोडमारे पुन्हा विचारांत गुंतला व म्हंणाल" बुलेट चालल की! सायेब !"

××××××××××××××××××××

" सायेब , तुम्ही लवकर या सायेब !" जनाची पाचावर धारण बसली होती, अंधारात गुढपणे वावरणा-या भीतीने तीच गुढ उकळल होत. जनाच काळिज भीतीने फ़ाटून बाहेर यायचं बाकी राहिल होत. आजुबाजुला पसरलेला धूका आता जिव खात सुटला होता. जनाच्या डोक्यावर त्या चिकूच्या झाडाची एक फांदी दिसत होती,आणि त्या फांदीवर प्रेताड कातडीच ते ध्यान दोन पाय फांदीवर टाकुन वेताळासारख उलट लटकल होत. त्याच्या डोक्यावरचे वाढळेले काळे केस खाली जमिनीच्या दिशेने लोंबत होते. कमरेखाली वेताळाप्रमाणेच काळ दोन झापांच धोतर नेसल होत. आणि त्या पिरताड चेह-याच्या फाटलेल्या ओठांवर एक छद्मी हास्य पसरल जात त्या गारगोटी डोळ्यांत हवरटपणा भरला होता. तपकीरी रंगाचे डोळे एकटक जनाकडे पाहत होत.

" कसला आवाज येतोय! " खुर्चीवर पेंगत बसलेला सब इन्स्पेक्टर भालचंद्र रावत नशेतच उद्दारला. समोर टेबलावर ठेवलेल्या त्या वॉकी टॉकीमधुन येणा-या खर्रखर्रत्या आवाजाने त्याच्या निद्राशय्येत विघ्न निर्माण होत-होत.

" -सायेब -सायेब मी जना बोलतोय!" जनाने सब इंन्स्पेक्टर भालचंद्रचा आवाज ऐकला, तो आवाज ऐकून जनाला खरच खुप आनंद झाला. भालचंद्रने नशेतच आपला एक हात वाढवुन टेबलावर असलेला वॉकी टॉकी हातात घेतला आणि

" सायेब अहो!" जनापुढेकाही बोलणार तोच त्याच्या नरडीभोवती

दोन पांढुरक्या हातांचा सापळा येऊन गच्च बसला गेला.-त्या ध्यानाने आपल्या दोन्ही हातांनी साडे पाचफुट जनाच्या मानेला आपल्या दोन्ही हातांनी गच्च आवळून धरल होत. त्याच्या हाताची पौलादी नख ,जनाच्या मानेच मांस फाडून रक्ताच पाट बाहेर काढत आतल्या -आत घुसु लागली होती. फांदीवर पाय ठेऊन प्रेताड काटकुळ देह खाली टाकुन दोन हात खाली वाढवुन त्याने जनाचा गळा असाकाही पकडला होता-जस अजगराच्या शेपटीत सापडलेला वासरु.

" सौर ,सोड ,सोड ,मला सोड हरामखोर !" जनाच्या तोंडून निघणा-या प्रत्येक शब्दासरशी , त्या ध्यानाची जनाच्या गळ्यावरची पकड घट्ट घट्ट होत चालली होती, तस ती नख -( साधी सुधी नाही विषारी नख,) सापाच्या विषाने माखवलेली, जनाच्या नरडीत, जखमेवर मीठ टाकल्याप्रमाने सळू लागली होती.

" आऽऽऽ..आऽऽऽऽऽ!" जनाचा श्वास घशात अडकू लागला . पाण्यात गचकांड्या खाल्ल्यासारखे तो हातपाय झाडू लागला.

" हिहिहिही, खिखिखि, म्हीहिहिही हम्म! कस वाटतंय झग्या?

मस्त वाटतंय ना? सर्गात जायचं ना ? हम्म्म,म्हिहि! "त्या ध्यानाच्या भसाड्या किन्नरी आवाजाने जनाच्या कानांचे पडदे फाटले.पाहता-पाहता जनाच्या डोळ्यांसमोर मृत्युची अंधारी यायला लागली, आ-वासलेल्या तोंडातून फेस बाहेर येऊ लागला. शेवटी काहीवेळातच जनाच खेळ खल्लास झाल, तस त्या ध्यानाने त्याच्या मानेवरचीपकड सैल केली, त्याचवेळेस जनाच्या हातातला वॉकी टॉकी खाली पडला, वॉकी टॉकी खाली पड़ताच चुकून दोन नंबर दाबल गेल .

×××××××××××××

"गोडमारे कसलाही आवाज करु नको!" विजय आणि गोडमारे हळुच

शैडोच्या तावडीतून आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत होते.

झाडाच्या खोडामागुन दोघेही चोरपावलांनी पुढे पुढे चालत निघाले होते.तेव्हाच विजयने गोडमारेला हे वाक्य दबक्या आवाजाने म्हंटल होत.

ह्या दोघांपासुन साठ मीटर अंतरावर शैडो होता-त्या प्रेतावर ताव मारत बसला होता. गोडमारेच्या हातात अद्याप वाटेत भेटलेल्या आत्मारामचा वॉकी टॉकी पकडलेला होता-की तोच त्या मशीन मधून- एक विशिष्ट ध्वनी बाहेर पडल.

" टीटी,टींटी,टींटी,टींटीऽऽऽऽऽऽ" त्या आवाजाची तीव्रता कमीच होती. पन रात्रीच्या स्मशान शांततेत त्या आवाजाला कसलही बंधन उरल नव्हत. रात्रीच्या स्मशान वातावरणातल्या थंड हवेने तो आवाज मोठ्याने

गुंजवला होता.विजय -गोडमारे दोघांनी एकाचक्षणाला मागे वळून पाहिल. त्या अभद्र ध्यानाने (शैडोने)ह्या दोघांनाही पाहिल होत. आणि त्याच्या हदित बिनपरवानगीने घुसलेल्या ह्या दोन्ही चेंड्यांना तो खाऊ की गिळु ह्या नजरेने पाहत होता. त्याची ती भेदक रक्ताळलेली नजर ह्या दोघांच्या काळजात रुतली गेली होती.

" गोडमारेऽऽऽऽऽऽ! पऽऽऽऽऽळ " विजयचा मोठा आवाज .

" पन सायेब !" गोडमारेने पाहिल , की विजयने आपल्या हातातली रिव्हॉलव्हरपुढे ताणून धरली आहे.

" गोडमारे तू जा!"

" पन सायेब तूम्ही !"

" गोडमारे ही माझी ऑर्डर आहे जा तू?" विजयने अस म्हंणतच, एक डोळा बंद केला, उजव्या हातातल्या रिव्हॉलव्हरची पुढची बाजु एफ:पी:पी मॉडने दिसत होत आणि समोरच साडे सहा फुट उंच धिप्पाड शैडो गुरगूरत ह्या दोघांकडे पाहत होता. कोणत्याहीक्षणी तो हल्लाबोल करणार होता.बेसावध असुन चालणार नव्हत.

" गोडमारे जा? आणि माने सायबांना सांगुन ती बंदूक सुद्धा मागवुन घ्या! गो फास्ट क्विक !" विजय पुढे पाहतच उद्दारले.तसे गोडमारेने डोळ्यांतून अश्रु गाळत विजयकडे पाहील, आणि त्या भयाण मृत्युधारी परिस्थितीत ही " जय हिंद सायेब !" म्हंणत एक रुबाबदार अखेरचा सेल्यूट ठोकला- विजयने फ़क्त एकक्षण गोडमारेकडे पाहिल, व फ़क्त होकारार्थी मान हलवली. गोडमारेने एकक्षण मागे शैडोकडे पाहायल व धावायला सुरुवात केली. दोन्ही सावजांतला एक सावज पळाला हे पाहून शैडोच रक्त खवळल .

" ये ये ये ह्याय,ह्याया,ह्या !" विचीत्र स्वरात ओरडत तो गरजला हाता-पायांवर एका कुत्र्यासारख धावत विजयच्या दिशेने येऊ लागला. धवतावेळेस त्याच्या हातापायांखाली येणारा पाळापाचोळा चर्रचर्र करत वाजत होता-लहाणसर दगडी हाताला भरत होत्या, पन त्या ध्यानाला त्याच काहीच नव्हत.विजय पहिल्यापासुनच तैयार होता - वीसफुटांवर जवळ आलेला शैडो आणि इकडे ट्रिगर खेचला गेला होता-

" धाड " असा एक मोठा आवाज झाला , हवेला कापत गोळी निघाली . पुढुन जमिनीवरुन पिसाळलेल्या कुत्र्यासारख्या धावत येणा-या शैडोच्या खांद्याला लागली, त्याक्षणाला खांद्यावर खरचटल्याप्रमाणे थोडस रक्त बाहेर आल. गोडमारेच भाकित खर ठरल, ती चामडी ह्या साधरण गोळ्यांनी फाटणार नव्हती. वार होताच शैडोने हातापायांच्या सहाय्याने

एका भुकेल्या रानटी श्वापदाप्रमाणे जागेवरुन उडी घेतली, हवेतच त्या शैडोच्या मुखाचा जबडा वासला,ते धारधार कोरलेले निशाचारी दात, आणि बटारलेले विस्तवी डोळे. विजयने हे असल ध्यान इतक्या जवळून पाहताच त्याची हिम्मत गळुन पडली. विजयच्या तीन फुटांवर शैडोचा चेहरा पोहचला होता - तेव्हाच डोळे मिटले , ते कायमचे !

" आऽऽऽऽऽऽऽऽ" विजयची एक आर्त किंकाळी अंधारलेला आसमंत हादरवुन गेली.त्या किंकाळीसरशी गोडमारेने धावता धावताच मागे वळुन पाहिल, त्याच्या चेह-यावर शोकहिंत भाव पसरले होते!

"सायेब ऽऽऽ" शेवटी तो इतकच म्हंटला व पुढे पुढे जात धुक्यात नाहीसा झाला.

××××××××××××××××

" हा आवाज?" अमृताबाई काळजीच्या स्वरात उद्दारल्या. एक कटाक्ष त्यांनी सर्वांच्या चेह-यावर टाकला. त्या सर्वांच्या उपस्थीतीत खोलीत एक भीतीचा स्फोट झाला होता. सर्वांच्या मनात भयंकर विचारांनी काहूर माजवायला सुरुवात केली होती!

" हा आवाज तर विजयचा आहे!" माने साहेब बोल्ले.

त्यांच्या वाक्यासरशी अमृताबाईंनी त्यांच्याकडे पाहिल.

" म्हंणजे, तुमचा सहकारी!" माने साहेबांनी फ़क्त होकारार्थी मान हलवली.

" बापरे ! म्हंणजे ते दोघे इथे आले असले तर? आणि त्यांनी विजयला?" अमृताबाईंच्या वाक्यावर बळवंतरावांनी एक थरथरता कटाक्ष अमृताबाईं मग माने साहेबांवर टाकला.

" बापरे मग तर हे खुप भयानक आहे ! आणि त्यांना थांबवायला , हे पाचजण पुरेसे नाहीत! मी आताच मदत मागवतो !" माने साहेबांनी अस म्हंणतच घाईतच आपला फोन बाहेर काढला व ते जरा आडबाजुला आले.

" बाबा चिंता करु नका , सर्व ठिक होईल ! " सुर्यांशने आपल्या पित्याला धीर दिला.तसे एकक्षण बळवंतराव फक्त त्याच्याकडे पाहतच राहिले

" बळवंते!" माने साहेबांचा आवाज " हे पहा कोणिही घाबरु नका! मी आताच माझ्या टीमशी बोललो आहे , आर्ध्या तासात इथे पोलिसांची सेक्युरीटी मदत येइल. तो पर्यंत काळजी घ्या बस्स !"

सेक्युरीटी यायला अद्याप अर्धातास बाकी होता! आणि आता ह्या घटकेला वेळ अगदी मंद गतीने पुढे सरसावत होती! भिंतीवरचा वेळचक्र

नी त्या चक्रावळीतला सेकंद काटाच तास काट्याप्रमाणे वागु लागला होता. वेळ कशी मंद मंद पुढे सरसावत होती,

जणुऽऽऽऽऽऽऽऽ जणु ऽऽऽऽऽऽऽऽ ह्या द्रुष्टचक्राला अंत नव्हता ?

क्रमश :