एक सैतानी रात्र - भाग 22 jay zom द्वारा भयपट गोष्टी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एक सैतानी रात्र - भाग 22


All स्टोरी ep 22

सीजन 2 भाग 11




" आऽऽऽऽऽऽऽ" विजयची मृत्युमय किंकाळी वा-यासारखी चौहीदिशेना
घुमली होती. बळवंतरावांच्या दुस-या मजल्यावर पियुषच्या खोलीत
तो स्व्त:हा त्याच्या बैडवर झोपला होता. त्याच्या छातीपर्यंत एक तपकीरी रंगाची चादर त्याने अंगावर ओढून घेतली होती. बैड बाजुला असलेल्या चौकोनी टेबलावर तोच तो सप्तरंगी दिवा एक विशिष्ट ध्वनी सोडत सात रंग सोडत ऊजळत बसला होता. त्या खोलीत पियुष व्यतिरिक्त इतर कोणीही दिसत नव्हते.पियुषच्या चेह-यापासुन वर बारा
फुटांवर एक सफेद फैन गोल गोल फिरत होता. तिथूनच पियुष गाढ झोपलेला आपल्या सर्वांना दिसत होता. हळु-हळु कैमरा लेंस पियुषच्या चेह-यावर झुम होऊ लागली. हळके हळके कैमेरा पुढे सरसावु लागला.
खोलीत पेटलेला सप्तरंगी बल्बच्या टिंग,टिंग मंद पाश्वर्य ध्वनी वाजतांना ऐकु येत होता.ठिक काहीवेळाने कैमेरा पियुषच्या निस्तेज चेह-यावर स्थिरावला गेला आणि तितक्यात एक मोठा ओरडणारा कानठळ्या बसल्यासारखा आवाज आला.
" आsssssssऽऽऽऽऽ " त्या आवाजासरशी पियुषने खाडकन डोळे उघडले.क्षणात तो कमरेइतक भाग उचलून बैडवर उठून बसला.
विस्फारलेल्या डोळ्यांनी आजुबाजुला पाहू लागला. आपण स्व्त:च्याच खोलीत आहोत हे पाहून त्याला धीर आला. त्याने बैडवर बसल्या अवस्थेतच डाव्या बाजूला पाहिल, समोर एक चौकोनी दोन झापांची पारर्शक काचेची खिड़की दिसत होती. त्या खिडकीतून आकाशातला चंद्र दिसत होता, पायांवरची चादर बाजुला सरकवून ,दोन्ही पाय पियुषने खाली फरशीवर असलेल्या त्याच्या मऊशार चपलींवर ठेवले.हळुच काचेच्या खिडकीच्या दिशेने निघाला.पियुषची पाठमोरी आकृती पुढे पुढे जातांना दिसत होती, त्याच्या अंगावर ब्ल्युनाईट शर्ट खाली तशीच नाईट पेंट होती.काचेच्या खिडकीसमोर पोहचताच पियुषने प्रथम काचेच्या खिडकीवर हात ठेवल, आणि एक नजरखाली टाकली.तस त्याला दिसल. शुभ्र धुक्याच्या वळयांनी जमिनीला केव्हाच मिठीत घेतल होत. जमिनीवरुन तीन फुटांपर्यंत धुक्याच्या मंद लाटा फिरतांना दिसत होत्या, त्यातच त्याच्या नजरेस एक झाड दिसुन आल. सुकलेल चिकूच झाड, त्या झाडावर एकही पान नव्हत- झाडाची साल्टी-फांद्या सर्वकाही फिकट पांढ-या रंगाने रंगवल्यासारख्या भासत होत्या. व त्याच चिकूच्या झाडाच्या एका फांदीला साडेपाच फुट आकाराची बिनधडाची मानवी आकृती एका झोपाळ्यासारखी मागे पुढे झुळतांना दिसत होती. त्या ध्यानाने जनाच मस्तक हातानेच उपटून काढल होत- उर्वरीत देहाची अशी खेळण्यासारखी अवस्था केली होती. एका पांढरट दोरीने त्याच्या खांद्यांना विळखा घालून तीच दोरी फांदीला टांगली होती. व ते जनाच प्रेत झोपाळ्यासारख मागे पुढे होत-होत. पियुष त्या प्रेताला तस पाहून हळकेच हसला! का बर ?इतक भयाण दृष्य पाहुन तो का हसला होता? त्याला भीती वाटत नव्हती का? की त्याच्या लहाणग्या बुद्धीने समोर दिसणार ते दृष्य हेलॉविनची चित्र-विचित्र सजावटीतलच काहीतरी हे सुद्धा तसंच एक असाव असं मानल असाव? नक्कीच! लहानग्या मुलांना लवकर भीती वाटत नसते हेच खर! जनाच प्रेत एकटक मागे पुढे झुळत होत-सभोवतालून धुक्याच्या वळयांनी घेराव घातला होता.
एकक्षणाला खुपसार धुक त्या प्रेताभोवताली येऊन जमल. जनाच ते प्रेत पियुषला दिसत नव्हता! तसं तो हळकेच खिडकीच्या अजुनच जवळ आला, त्याचा गोरापान चेहरा त्याने काचेला चिटकवला. बाहेरुन पाहता खिडकीवर पियुषच नाक चपट झाल होत-गोबरे गाल दबले होते. पियुष एकटक खाली पाहत होता.आकाशातले काळे ढग जसे चंद्राजवळून हळुच पुढे निघुन जावे, तसंच तो धुका हळकेच जनाच्या प्रेताजवळून पुढे निघुन गेला, तसं पियुषच्या डोळ्यांना जनाच्या प्रेता व्यतिरिक्त आणखी काहीतरी दिसल. जे पाहून त्याचे डोळे विस्फारले- तोंडाचा आ वासला.जनाच्या प्रेताबाजुलाच धुक्यात ते हाडकूल साडेचार फुट ध्यान उभ होत. खप्पड चेहरा,मृत पांढरट त्वचा, डोक्यावरचे काळे केस दोन्ही हाडकूल्या खांद्यांवर सोडले होते. डोक्यापासुन ते पायापर्यंत पुर्णत त्वचा थंडगार मुर्दाघरातल्या प्रेताड प्रेतासारखी दिसत होती, खाली एक काळसर दोन झापांच धोतर घातल होत.तो खप्पड चेहरा ,ते तपकीरी खवचट भेदक डोळे पियुषला एकटक पाहत होते,आणि खालचा जबडा विचकून ते काळसर दात दाखवत ते ध्यान पियुषकडे पाहून छद्मी हसत होत. लहानग्या पियुषची त्याच ते अभद्र रुप, छद्मी हास्य पाहून पाचावर धारण बसली.भीतीने त्याची दोन्ही पाऊले माघारी वळली आणि खाडकन तो उंदीर जस सापाच्या धाकाने बिळात घुसावा तसा बैडवर असलेल्या चादरीत घुसला, पुर्णत चादर त्याने अंगावर घेतली. त्यात दडुन बसला.

XXXXXXXXXXXX

धुक्यातून वाट काढत गोडमारे कसातरी बळवंतरावांच्या पुढच्या बाजूस आला, येताच त्याला समोर अंगणात एक गोळ्सर टेबल व त्या टेबला पुढे असलेल्या लाकडी खुर्चीवर पेंगत बसलेला भालचंद्र दिसला. गोडमारेची घाईघाइतच भालचंद्रजवळ पोहचला.
" सायेब-सायेब !" दोनवेळा त्याने प्रथम आवाज दिल.परंतू नशेच्या आधीन गेलेला भालचंद्र जशास तसा पडुन होता.
" ओ सायेब, ओ सायेब!" दुस-यावेळेस त्याने भालचंद्रच्या खांद्यांना धरुन त्याला गदा गदा हळवल. तसा तो उठला परंतू अर्ध्याझोपेतच.
" ए गोडमारे झोपू देना रे! काय तूम्ही पन नुस्त ?"
" ओ सायेब ,ओ सायेब !तूम्ही पन म्हंणजे? काय बोलताय काय तूम्ही?"
गोडमारे न समजून उद्दारला.त्याने एकदोन वेळेस पुन्हा भालचंद्रचे खांद्यांना गदागदा हलवत पुन्हा तेच विचारल.
" अरे तो जना पन तुझ्यासारखाच फोनवर नुस्ता किच घालत होता. " भालचंद्रने आपल्या हाताची तर्जनी पुढे टेबलावर ठेवलेल्या वॉकी टॉकीवर दाखवली. गोडमारेनेही तिक्डे पाहील.
" अरे बापरे ! ओ सायेब , अहो तो फोन नाय वॉकी टॉकी आहे. अहो तो नक्कीच मदत मागत असणार बघा पन तूम्ही काय केल हे !"
गोडमारे म्हंणाला. परंतू त्याचे शब्द ऐकायला, भालचंद्र जागा थोडीना होता.
" म्हंजी! त्या राक्षसांनी आत्मारामला पन मारल , विजय सायबांना पन मारल , आणि आता तर जना पन गेला. बापरे ! आणि हे सायेब तर असं दारु पिऊन बसलेत! आता तर फ़क्त एकच मार्ग उरलाय ! मोठ्या सायबांना हे सगळ सांगाव लागल." गोडमारे स्व्त:शीच म्हणाला.
" सायेब तूम्ही इथंच थांबा मी आलो." गोडमारेने भालचंद्रला वळसा दिला व तो सरळ दिशेने चालत निघाला.समोर बळवंतरावांच्या बंगल्याच मुख्य काचेच द्वार दिसत होत. दरवाज्यापाशी पोहचून गोडमारेने त्या काचेच्या दरवाज्यावर ठोठावल, मग हळुच बाजुला असलेला बेलच दोन तीन वेळा बटण दाबल." टिंग,टोँग,टिंग,टोँग" असा विशिष्ट पद्धतीने आवाज झाला. बंगल्यात हॉलमध्ये सोफ्यावर अमृताबाई सुजाताबाई, आणि लाकडी खुर्च्यांवर मानेसाहेब, त्यांच्या बाजुलाच बळवंतराव बसले होते. सुर्यांश ,सना दोघेही वरच्या मजल्यावर गेले होते.
" कोण आल असेल?"सुजाताबाईंनी मानेसाहेब मग बळवंतरावांकडे पाहिल.
" पाहाव लागेल ! " माने साहेब.
" अहो पन बाहेर धोका आहे ! " अमृता पटकन म्हंटल्या, त्यांच्या स्वरात काळजी जाणवत होती.
" अमरीता धोका आहे पन जाव लागेलच ! बाहेर कोणाला मदत हवी असली तर ? " माने साहेब खुर्चीवरुन उठले. उठताच त्यांनी कमरेमागून आपली रिव्हॉलव्हर बाहेर काढून हातात घेतली.
" बलवंते दरवाजा उघडा!" बलवंतरावांनी समोर असलेला दरवाजा उघडला. समोर उजव्या बाजुला एक कोरिडॉर सारखी अंधारी गल्ली दिसत होती- आणि कोरिडॉर वजा गल्ली संपताच शेवटला समोरच एक काचेच दरवाजा दिसत होता, त्या दरवाज्याच्या काचेजवळुन पांढरट धुक वाहत होत! पन दरवाज्याजवळ कोणिही उभ असेल तर ते साफ दिसेल अशी काच दरवाज्याला लावली होती-पन त्या दरवाज्यासमोर धुक्या व्यतिरीक्त काहीही नव्हत. मग गोडमारे कुठे गेला बर? त्यानेच तर ती बेल वाजवली होती ना ?
" कोणीच नाही! पन बेल तर वाजली होती ना ? की भास झाला होता? नाही नाही! भास नक्कीच नव्हता ! बेलचा आवाज तर सर्वांना ऐकला होता ? म्हंणजे नक्कीच बाहेर कोणीतरी असाव! " माने साहेबांनी हातात रिव्हॉलव्हर धरली होती, तर्जनी ट्रिगरवर ठेवली होती. समोरुन जर घातक अस काही अंगावर आलच , ते कोणीही असो ट्रिगर खेचला जाणार होता. मानेसाहेबांच्या काळे बुट घातलेले पाऊल पुढे पडत होते तसे त्या स्मशान शांततेत मानेंच्या बुटांचा टॉक-टॉक मंद जीवघेणा आवाज होत होता.

××××××××××××××××××××

सुर्यांश सना दोघेही दुस-या मजल्यावर पोहचले होते.
सुर्यांशने आपल्या खोलीच दार उघडण्यासाठी हात वाढवला होता.
तोच मध्ये सना उद्दारली.
" सुर्याश!" सुर्यांशने सनाकडे पाहील" मला वाटत आपण पियुषजवळ असायला हव तेवढीच त्याला सोबत, तसंही तो एकटाच आहे! "
सनाचे विचार सुर्यांशला पटले. त्याने होकारार्थी मान हलवली.
सुर्यांशच्या खोलीपासुनच दहा पावलांपुढे पियुषची खोली होती. सुर्यांश सना दोघेही चालत त्या खोलीजवळ आले. पियुष लहान असल्याने त्याच्या खोलीच दार उघडच असायचं. सुर्यांशने हळकेच दार पुढे ढकल्ल दरवाजा कर्रकर्रत उघडला.आणि जस दरवाजा उघडला त्या दोघांनाही समोर पियुषऽऽऽऽ .. दिसला नाही.

××××××××××××××××

क्रमश: