एक सैतानी रात्र - भाग 24 jay zom द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

एक सैतानी रात्र - भाग 24

S 2 13


भाग 24



माने साहेब बंळवंतरावांच्या बंगल्याची चौकट ओलांडून बाहेर आले होते

त्यांना आपल्या नजरेसमोर एक खुर्ची दिसत होती.त्या खुर्चीत एक

पाठमोरी आकृती मानखाली घालून बसली होती -जणु झोपलीच

असावी अशी! माने साहेबांनी हातात पकडलेली रिव्हॉलव्हर त्या

आकृतीवर ताणून धरली होती,त्याच अवस्थेत माने साहेबांनी त्या

खुर्चीला वळसा घातला व पुढे आले. तसे त्यांना दिसल.

खुर्चीमध्ये सब इंन्स्पेक्टद भालचंद्र रावत खाली मान घालून होते.

त्यांची नजर पुढे असलेल्या टेबलावर पडली- एक दारुची बाटली आणि दोन ग्लास दिसले.

" इंन्स्पेक्टर रावत!" रिव्हॉलव्हर डाव्या हातात घेऊन उजवा हात त्यांनी भालचंद्रच्या खांद्यावर ठेवला.

" रावत शुद्धीवर आहेस का ?" माने साहेबांचा आवाज ऐकून भालचंद्र रावतने मोठ्या कष्टाने डोळे उघडले.

" तुझा जोडीदार विजय कुठे आहे? आणि बाकीचे तीन कोंनस्टेबल्स?

कुठे आहेत.. कुठे ..ते ? "

" त...त्त...ते गे.... गेले "

" काय? कु..कुठे गेले? "माने साहेबांनी भालचंद्रला विचारल.

" आ...अप....अपल्या..जागेवर !" भालचंद्रची नशा अद्याप उतरली नव्हती. डोक जड झाल होत-डोळ्यांच्या पापण्या तर मोठ्या कष्टाने

उभ्या राहत होत्या. एका बेशुद्धीत असलेल्या मांणसाप्रमाणे तो बोलत होता.

" आप आपल्या जागेवर म्हंणजे? ए बाबा काय बोलतोयस तू? जरा निट सांग मला !"

" गो..गो...गो..डमारे -आ.आ.आ..त्माराम ब ..ब बंगल्याच्या मागे ! आणी.." भालचंद्रने अस म्हंणतच डोळे मिटले व मान खाली घातली. तसे माने साहेबांनी पुन्हा एकदा त्याची मान वर केली-गालावर थोपटत ते म्हंणाले.

" अजुन दोघे कुठे आहेत? हवालदार जना व इंन्स्पेक्टर विजय? कुठे आहेत ? सांग -सांग मला ? " एक जुनी पुराणी खटारा गाडी जशी मध्ये मध्ये गचके देत चालू बंद होत अंतर कापावी तसा भालचंद्र मध्ये मध्ये अडकत बोलत होता. आणि माने साहेब त्याला विचारत होते.

" विजय गेला त्याला आ..आ..अवाज आला! "माने साहेबांना काहीच कळल नाही पन तरी सुद्धा ते विचारमग्ण होऊन विचार करत राहिले व काहीवेळाने म्हंणाले.

" बर ..बर मग जना ? जना कुठे आहे!"

" तो ..तो...तो...!" भालचंद्र स्व्त:शीच वेड्यासारखा हसला व हलूच एक हाताच बोट टेबलाच्या दिशेने ठेवलेल्या वॉकी टॉकीच्या दिशेने केल.

"तो त्या वॉकी टॉकीत आहे!ह,ह,ह,!" भालचंद्रने एवढ वाक्य संपवून

गालात हसत पुन्हा मान खाली टाकली.माने साहेबांनीही त्याला पुन्हा जाग केल नाही! तसंही काही विचारण्याच्या मनस्थितीत ते नव्हतेच त्यांच लक्ष फ़क्त वॉकी टॉकीवर होत. आणी तेवढ्यात त्यांच्या खांद्यांमागुन बळवंतरावांच्या बंगल्याच उघड दार दिसत होत, व त्या उघड्या दारातुन पुढे अंधारी गल्ली होती ज्या गल्लीतुन आत सहाफुट उंच असा धिप्पाड शैडो जातांना दिसत होता.

X X X X X X X X X X

बंगल्यात पहिल्या हॉलमध्ये सोफ्यावर बळवंतराव बसले होते. त्यांच्याबाजुलाच सुजाताबाई बसल्या होत्या. आणि बाजुलाच एक लाकडी खुर्ची होती त्यावर अमृतबाई बसल्या होत्या. बळवंतरावांची नजर शुन्यात अडकून राहीली होती-त्या नजरेत शेकडो प्रश्णांची , चांगल्या-वाईट आठवणींची धुळीकण तरंगत होती. आपल्या आई-वडिलांनी शैडो-रेंचो,आणि ते स्व्त:हा तिघांनाही लावलेली माया,चांगले आनंदीत क्षण,अगदी झपाट्याने एका स्टेटसप्रमाणे झळकून जात होते-तर कधी जंगलात ह्या दोघांनी आपल्या आईवडीलांचा केलेला विकृत खून नजरेस येत होता. त्या दृष्यांने त्यांच काळीज हादरल जात होत. हॉलमध्ये ही तिघ बसली होती,पन कोणिही काहीच बोलत नव्हत! ज्याकारणाने बंगळ्यात स्मशान शांतता पसरली होती. बळवंतरावांपासुनच उजव्याबाजुलाच समोर पाच फुट बंद दरवाजा दिसत होता. दरवाज्याची खालची चार फुट बाजु लाकडाने बनलेली,त्यावरचौकलेटी रंग होत आणि उर्वरीत एक फुट जागा म्हंणजेच एक फुट पारदर्शक जाड काच होती. हा दरवाहा उघडला की बाहेरच्या दरवाज्यातुन आत आलेला माणुस ख-या अर्थाने बंगल्यात प्रवेश करायचा. त्या दरवाज्याच्या काचेमधुन दोन बारीकसे पिवळ्या रंगाचे डोळ्यांसारख काहीतर आट पाहत होत. त्याच्या पिवळ्याधमक नजरेत

हॉलमध्ये सोफ्यावर बसलेले,बळवंतराव-सुजाताबाई,अमृताबाई दिस होत्या. शुन्यात नजर लावून बसलेले बळवंतराव खाडकन बेशुद्धीतुन उठावे तसे डोळे मिचकावत ताठ झाले. व त्यांनी गर्रकन वळुन त्या दरवाज्यात पाहिल!

" काय हो काय झालं?" सुजाताबाईंनी विचारल. तसे काहीक्षण बळवंतराव त्या दरवाज्याकडे पाहतच राहिले मग म्हंणाले.

" मला अस वाटलं! की त्या काचेतुन कोणीतरी आपल्याला पाहत आहे!" सुजाताबाईंनी अमृताबाईंकडे पाहील . तस ह्यावेळेस बळवंतरावांकडे पाहत अमृताबाई म्हंणल्या.

" हे बाहेर गेलेले खुप उशीर झालंय ना ! मला त्यांची जरा काळजी वाटतीये !" अमृताबाई.

" वहिनी तूम्ही काळजी करु नका मी जाऊन बघतो बाहेर !"

बळवंतराव अस म्हंणतच सोफ्यावरुन उठले! चार पावलांनीच त्यांनी तो दरवाजा गाठला. दरवाज्याच्या कडीकडे काहीसेकंद बळवंतराव नुस्ते पाहतच राहिले होते.मगाशी आपल्याला खरंच भास झाला होता का? की ते सत्य होत ? आणि जर सत्यच असेल तर आपण दरवाजा उघडल आणि ते अभद्र आत आल तर? मनात चाललेल्या प्रश्णांनी जिवखायला सुरुवात केली होती. क्षणोक्षणीक आत्मविश्वास लाकडाला उधय्बआतुन पोखरावी तशी भीती आत्मविश्वास पोखरत चालली होती.शेवटी नाईलाजाने त्यांनी ती कडी उजव्या बाजूने डाव्या बाजुला ओढली आणि दरवजा उघडला...की तितक्यात , लाईट गेली.

X X X X X X X X X X X X

पियुषच्या पलंगाबाजुलाच खाली सुर्यांश पडला होता. त्याच्या डाव्या बाजुला पियुष-तर उजव्या बाजूला सना होती. दोघांनीही सुर्यांशच्या हाताला धरल होत. त्या तिघांच्या चेह-यावर भीतीने पछाडलेले भाव होते. विस्फारलेली नजर त्या चौकोनी पारदर्शक काचेच्या खिडकीवर स्थिरावली होती. त्या काचेच्या खिडकीवर असलेला राखाडी रंगाचा हाडकूळा पंजा आता हळु-हळु खाली जातांना दिसुन येत होता, तो हाताचा पंजा जसा खाली निघुन गेला.. तेवढ्यात पियुषच्या खोलीत जलणारा सप्तरंगी बल्ब, आणि भिंतीवर पेटलेली ट्यूब अचानकच बंद झाली. खोलीत असलेला पांढरट धीरदायक प्रकाश झपकन नाहीसा झाला. पुर्णत खोली काळाच्या पडद्याआड विलीन झाली. त्या अभद्र हाताच दर्शन घडलेल कमी होत की काय? लाईट सुद्धा गेली होती नी लाईट जाताच सुर्यांश,सना,पियुष तिघांचीही भीतीने आणखीणच बोबडी वळली होती. पियुषने तर आपल्या भावाला भीतीपोटी आलिंगनच दिल होत. त्या तिघांच्याही ह्दयाची नाडी त्या स्मशान शांततेत ट्रेनच्या इंजीनसारखी सुसाट धावत सूटली होती. उघड्या खिडकीतून शाईसारखा आसमंत व त्याच आसमंतातला अर्धाकार चंद्र दिसत होता , त्याच चंद्राची निळसर किरणे आत ह्या तिघांच्याही अंगावर पडली होती. त्या किरणांचा थोडासा प्रकाश खोलीत पडला होता, बाकी सर्व काही अंधाराने गिळल होत.

" द..द..दादा तो आला , मला नेहायला आला तो ! मला वाचव दादा !"

अस म्हंणतचपियुषने सुर्यांशला आधिकच घट्ट मीठी मारली.

सुर्यांशचा तर धीरच गळून पडला होता, चेह-यावर बारा वाजलेले साफ साफ दिसत होते. पियुषला मीठी मारलेल पाहून त्याने कशी बशी स्व्त:हा आत हिम्मत गोळा करायला सुरुवात केली. आपण मोठे आहोत. ह्या कठीण परिस्थितीतून मार्ग काढण,पियुष सना ,ह्या दोघांनाही सुखरुप ठेवण ही आपली जबाबदारी आहे ! आणि जर आपणच घाबरलो तर कस होणार ? सुर्यांश स्व्त:हालाच प्रश्ण करत होता. तेवढ्यात त्या काचेवर पुन्हा एकदा तोच राखाडी हाडमांस चिकटलेला पोलादी नखांचा पंजा येऊन आदळला"धप्प"आवाज आला,मग त्या हातांची नख तो पंजा काचेवर विशीष्ट प्रकारचा आवाज करत ओरबाडु लागला. चंद्राचा खिडकीतून येणा-या किरणांचा प्रकाश ह्या तिघांच्या चेह-यावर पडला होता आणि त्या हाताची काळी सावली ही त्या तिघांच्या चेह-यावर पडली होती. जणु ते ओबडधोबड अभद्र हात ह्या तिघांचाही चेहरा सोलपटून काढत आहे असं भासत होत.

पियुष उठ! " सुर्यांशने घाईत पियुषला जरास दुर केल व जागेवर उभा राहिला.

" सना काचेची खिडकी त्याला जास्तवेळ थांबवु शकणार नाही! ते ध्यान खिडकी तोडून कधीही आत येऊ शकत ! आपल्याला लगेचंच ह्या खोलीतून बाहेर पडाव लागेल ,चला !" सना,सुर्यांश , पियुष तिघेही एकदाच दरवाज्याच्या दिशेने धावले. सुर्यांशने हात वाढवुन दरवाजा उघडायला सुरुवात केली, पन दरवाजा उघडतच नव्हता.

" सुर्यांश काय झाल? उघडना दरवाजा ?" सनाने एकक्षण सुर्यांशकडे मग त्या पारदर्शज काचेच्या खिडकीकडे पाहिल. तो हाडकाठ्यांचा हात खर्रखर्र आवाज करत काचेवर ओरबाडत होता.

" दादा उघड ना दार!" पियुषही भीतीने म्हंणाला. सुर्यांश दात ओठ खाऊन पुर्णत ताकदीने दरवाजाओढत होता पन दरवाजा काही केल्या उघडायला तैयार होत नव्हता. सना बारीबारीने कधी बंद दरवाज्याकडे

तर कधी त्या खिडकीकडे पाहत होती.अशातच तीच्या नजरेला त्या खिडकीतून ते ध्यान वर-वर येतांना दिसु लागल, तशी सनाची वाचा बसलेली नजर तिथे शून्यात खिळून राहीली. त्या हाडमांसाच्या हाताची

नख ओरबाडणारी हालचाल थांबली गेली, मग हळु हळू खिडकीखालून

एक केसाळ गोळ डोक वर-वर येऊ लागल. सनाचे बारीकसे डोळे हळु हळु चेंडू एवढ आकार धारण करत होते.क्षणाक्षणाला डोळ्यांच आकार वाढत चालल होत. केसाळ डोक,मग हळकेच वर आल बारीक राखाडी कपाळ, त्यांखाली दोन काळसर भुवया आणि तपकीरी रंगाचे चकाकते डोळे, डोळ्यांखाली नप्ट नाक, गालांच्या बाजु आत गेल्या होत्या, जणू खड्डे पडले होते. पांढ-या फट्ट ओठांना विचकून ते काळसर कोरलेले निशाचारी धारधार दात दाखवत ते ध्यान हव-या भेदक नजरेने सनाला पाहून भुवया उडवून ऊडवून खांदे हळवत हसत होत.

"दरवाजा लॉक झालाय . शट!" सुर्यांशने अस म्हंणतच दरवाज्याच्या खालच्या बाजुला लाथ मारली. तसा न जाणे इतकवेळ बंद असलेला दरवाजा" खट्ट " अवाज होत उघडला.आणि अचानक तेव्हाच एक मोठी आर्तकींकाळी सुद्ध त्याच्या कानांवर ऐकू आली.

" आऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ" सुर्यांशने गर्रकन मागे वळुन सनाकडे पाहील, ती खिडकीकडे पाहून ओरडत होती.तस सुर्यांशनेही एक कटाक्ष त्या खिडकीत टाकला.

" खळ,खळ,खल !" विशिष्ट प्रकारचा आवाज होत खिडकीची काच फुटली, त्या काचेच्या खिडकीतून प्रथम एक राखाडी,प्रेताड़ रंगाच हाड मांस चिकटलेल पाय आत आल,ज्यावर एक काळसर रंगाच धोतर होत.

पाय आत आल्यानंतर एक राखाडी रंगाचा हात आत आला,ज्याची नखे विषधारी काळसर होती.शेवटला आल ते पांढ-या फट्ट चेह-याच हिडीस थोबाड, सरत्या शेवटी त्या ध्यानाने गृहात प्रवेश केला. सना-सुर्यांश दोघेही स्तब्ध झाले होते, जणु काळीज बंद पडल होत-अंगावरचा केस नी केस ताठरला होता-मणक्यावरुन घामाची थंड लाठ वाहू लागली होती.

" स्सस्स हीरी,हिरी,हिरी,हिरी, हिहिहीन,खीखी!" आपले काळसर निशाचारी दात दाखवत ते ध्यान हसल . तस सना दोन्ही हात कानांवर ठेवुन पुन्हा एकदा मोठ्याने किंचाळी.

" आऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ!" तिच्या त्या किंचाळीने सुर्यांशला एक झटका बसला जात तो भानावर आला. तेवढ्यात पियुष दरवाजा उघडला आहे हे दिसल , त्याने तोच दरवाजा पुर्णत उघडला मग प्रथम तो बाहेर पडला.

" कच्चा खाणार मी तुला,ह्यांव,ह्यांव,ह्याव !" ते ध्यान सनाकडे पाहत बायल्या स्वरात उच्चारल. मग त्याची ती हाडकूल पायांची चाल सनाच्या दिशेने येऊ लागली.

" दादा , सना दी, लवकर इकडे या." पियुषने दरवाज्याबाहेरुन हाक दिली.सना -सुर्यांश दोघांनीही मागे पाहिल-दरवाजा उघडला होता.

" सना चल !" म्हंणत सुर्यांशने तीच हात आपल्या हाती घेतल .

सावज जाळ्यातुन निसटत आहे हे लक्षात येताच ते ध्यान चवताळला.

" काय रे ए बळवंतच्या कार्ट्यांंनो! थांबा तुमच्या तर!" बायळी स्वरात ओरडत ते ध्यान सना-सुर्यांशच्या अंगावर धावल,पन सना-सुर्यांश दोघेही दरवाज्याबाहेर पोहचले होते-दरवाजा त्या ध्यानाच्य तोंडावर आदळला होता.

X X X X X X X X X X X X

क्रमश :