एक सैतानी रात्र - भाग 27 jay zom द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एक सैतानी रात्र - भाग 27

भाग 27


भाग 16 S 2




बलवंतराव-माने साहेब दोघेही दरवाजापाशी पोहचले . दरवाजा उघडायला माने साहेबांनी हात वाढवला , लेच फिरवुन पाहिल , पन दरवाजा काही उघडला नाही .
" बलवंते? दरवाजा लॉक आहे!"
" काय ? थांब जरा पाहूदे !" माने साहेब दरवाजापासुन बाजुला झाले.
बलवंतरावांनी पुढे येऊन दरवाजा उघडून पाहायला सुरुवात केली, पन लेच लागून गेल होत.
" माने आता दोनच रस्ते आहेत आपल्याकडे!"
" काय बर ते?" मानेसाहेबांनी विचारल.
" एक तर हा दरवाजा तोडाव लागेल, नाहीतर मागच्या दारातुन जाव लागेल."
" नो!" मानेसाहेब अचानक जरासे ओरडत म्हंटले" मागे धोका आहे बलवंते! मी तर म्हंणतोय इथे पावला पावलावर धोका आहे, हा धुका जो तु पाहतोयस ना हा काही साधारण धुक नाहीये! मृत्यु नाचतोय त्यात, मृत्यु! आता एकच काम करुयात? हा दरवाजा तोडूनच आत जाऊयात!" माने साहेबांनी अस म्हंणतच रिव्हॉलव्हर मागे कमरेत खोवली. त्यांच्याकडे आता फ़क्त पाच गोळ्या शिल्लक राहिल्या होत्या.
आणि त्यांचा योग्यवेळी उपयोग व्हायला हवा होता.बंदूक ठेवून माने साहेबांनी त्या दरवाला एक धडक दिली.दरवाजा काचेचा आहे म्हंणजे
लागलीच तुटेल हा माने साहेबांचा भ्रम होता. दोन -तीन- पाहता पाहता माने साहेबांनी सात आठ धक्के दिले पन नाही काहीच झाल नाही.तसे त्याही परिस्थितीत बलवंतराव जरासे हसले.
" माने अहो बंदूक वापरुन पहा आता, आता तो दम राहीलेला दिसत नाही !" बलवंतराव म्हंणाले. आता दुसरा पर्याय शिल्लक नव्हता!माने साहेबांनी मागे हात नेऊन रिव्हॉलव्हर ( बंदुक) बाहेर काढली.
" एक मिनीट माने! बंदूकीची गोळी ह्या लेच बाजुला मार, म्हंणजे आपण आतून दरवाजा उघडू शकतो!" माने साहेबांनी होकारार्थी मान हलवली.बंदूकीची नळी लेच पासुन एक फुटावर धरली , मग हातोडा(हेमर) हळकेच खेचला, मग तर्जनी ट्रिगरवर ठेवत ट्रिगर दाबला-नळीतुन,धुर सोडत गोळी' धाड 'आवाज देत लेचबाजुला एक बॉलएवढ हॉलकरत निघुन गेली. माने साहेबांनी-बलवंतरावांकडे हसुन पाहिल- दोघांच्याही चेह-यावर विजयी भाव होते,जणु समुद्रातला जुना मौल्यवाज खजाना भेटल्यासारखा. त्या हॉलमधुन हात घालत बलवंतरावांनी दरवाजा उघडला व दोघेही आत शिरले. अंधा-या कोरिडॉरने त्या दोघांचीही पुढे पुढे जाणारी आकृती गिळून टाकली.
××××××××××
" आई! तू ठिक आहेस ना ?" सुर्यांश म्हंणाला. किचनच्या चौकटीपुढे तो उभा होता. त्याच्या उज्व्या बाजुलाच सना-तिच्या बाजुला अमृताबाई आणि सुर्यांशच्या पायांजवळ पियुष उभा होता.
" आई!" पियुष सुजाताबाईंच्या दिशेने धावलाच! त्याने आपल्या आईला
गच्च मीठी मारली.
" आई तु प्लीज मला सोडून नको न ग जाऊस!" पियुषने त्याच्या आईला गच्च मीठी मारत म्हंटल. सुर्यांशच्याही डोळ्यांतुन टचकन पाणी आल. तोही आपल्या आईला मीठी मारण्यासाठी उतावळा झाला होता. आई हा शब्दच असा आहे , ज्या शब्दात एक उर्जा-एक शक्ति,एक ममत्व,अशा कित्येकतरी भावनेंनी ते भरल आहे. ज्याच स्पष्टीकरण देण्यासाठी शब्दही अपुरे पडतील! सुजाताबाईंनी पियुषच्या डोक्यावरुन मायेने हात फिरवल, मग सुर्यांशकडे पाहील, डोळ्यांतुन आसवे गाळत तो आपल्या मातेकडे पाहत होता.
" ये!" सुजाताबाईंनी एका हातांनी त्याला प्रेमाची मीठीमारण्या साठी आपल्याकडे बोलावल. तसा तो लागलीच जड पावलांनी तिथे जाऊ लागला.
" आई !" सुर्यांशच्या पाणावळेल्या डोळ्यांनी,जड झालेला स्वर घशातुन बाहेर पडला. एक, दोन, तीन पावल चालून तो पुढे आला होता , तेवढ्यातच अचानक न जाणे काय झालं? कुणास ठावूक! सुजाताबाईंच्या पुर्णत शरीराला एक हळकासा झटका बसला, सुजाताबाईंच्या चेह-यावर वेदना उमटली , संपुर्णत देहात एक असहनीय कळ उठली! त्या वेदनेचा हुंकार सुद्धा बाहेर पडायला तैयार होत नव्हता इतकी असहनीय वेदना होता. सुर्यांशला एकक्षण काहीच कळलं नाही आपल्या माईला काय झालं ती अशी का करत आहे. पन जेव्हा तिच्या कमरेभोवताली मीठी मारलेला पियुष अगदी एका प्रेतासारख निश्चल,अनिर्जिव देहाने खाली पडला तेव्हा मात्र त्याच्या काळजात चर्र झाल, कानसुळ्या तापल्या , नाकातून गरम श्वास बाहेर पडू लागले.सुजाताबाईंनी विस्फारलेल्या डोळ्यांनी, आ-वासलेल्या तोंडाने आपल्या पोटाकडे पाहील! बंद दरवाज्याच्या लाकडी फळीला चिरुन एक धारधार पातिचा बाण बाहेर आला होता! त्या बाणाच्या पातीने सुजाताबाईंच्या मणक्यांच हाड तोडून थेट पुढच्या बाजूने प्रवेश केल होत. पातळसर कमरेबाजुला असलेल्या बेंबीवरुन त्या बाणाची पातळसर रक्ताळलेली पात बाहेर आली होती. त्याच पातीने पियुषच्या डोक्यात शिरुन त्याच्या मेंदूवर आघात केला होता.
" आई -पियुष !" सुर्यांश मुळाच्या देठापासुन ओरडला त्याच्या आवाजाची तीव्रता पाच पट अधिक होती.
" बलवंते सुर्यांशचा आवाज ? किचनमधुन येतोय!"
माने साहेब, बलवंतराव हॉलमध्ये उभे होते. तेव्हाच त्यांना हा आवाज ऐकू आला तसे ते दोघे किचनमध्ये पोहचले.
" सुजाता ऽऽऽऽ" बलवंतराव सुजाताबाईंकडे पाहत आक्रोश करत ओरडले, त्यांच्या अंगावर सर्रकन भीतीचा काटा आला! धाडकन ते खाली गुढघ्यांवर बसले. एकाचक्षणाला दोन विलक्षण दुखी धक्के त्यांना बसले होते.एकाक्षणात त्यांच्या ह्दयाची धडधड विलक्षण वाढली होती.डोक्यातला मेंदू बधीर झाला होता.
" आई" सुर्यांश सुजाताबाईंच्या दिशेने धावला.. बलवंतराव दोन्ही गुढघ्यांवर खाली बसले होते. दोन्ही हात चेह-यावर ठेवून ते हमसाहमशी रडत होते.ह्या सर्व कृत्याच स्वत:ला दोष देत होते. सुर्यांश सुजाताबाईंजवळ धावला तसे त्यांच्या मागोमाग माने सुद्धा जाऊ लागले. सुर्यांशने सुजाताबाईंच्या मागे येऊन पाहिल, बाण ज्या दिशेने आला होता तिथुनच एक दोरी सुद्धा आत आली होती. जणु ती बाणालाच जोडली असावी.
" ओह शट!" त्या दोरीला पाहूनसुर्यांशचे डोळेच विस्फारले. आणि तेवढ्यात त्या सुजाताबाईंच्या पोटातुन बाहेर आलेल्या बाणाची टोकदार चार पात कमळ फुलाव तश्या उघडल्या गेल्या व बाणाची दोरी ज्याच्या हाती त्याने ती दोरी बाहेरुन ओढली. बाणाच्या पातिणी गोळ विलखा पोटावर घालत एक हिसका सुजाताबाईंना दिला.
" आऽऽऽऽ" सुजाताबाई वेदनेने ओरडल्याच. व पुढच्याक्षणाला सुजाताबाईंच संपुर्णत देह त्यांच्या मागे असलेल्या लाकडी दरवाजा तोडत फल्यांचा चुराडा करत बाहेर खेचला गेला जात, धुक्यात नाहीसा झाला. सुर्यांश, मानेसाहेब, सना-अमृताबाई नुसते डोळे फाडून पाहत होते. एकक्षण काय घडल ते समजायला त्या सर्वांना काहीसावेळ जाऊ द्यावा लागणार होता. पन तेवढ वेळ मिळत ना मिळत तेवढ्यात सनाचा किंचाळण्याचा आवाज घुमला..
" एंऽऽऽऽऽ" त्या आवाजाने मानेसाहेब, अमृताबाई , सुर्यांश तिघांनी वळुन मागे पाहिल. दरवाज्यात गुढघ्यांवर बसलेल्या माने साहेबांना ते ध्यान गंचोंडीला धरुन पकडून मागे मागेघेऊन जातांना सर्वांना दिसल , शेवटच्याक्षणाला फ़क्त बलवंतरावांचे काळे बुट घातलेले व काळ्या पेंटचे पाय मात्र मागे मागे प्रेत ओढून घेऊन जाव तसे घेऊन जातांना दिसले.
" बाबा !" सुर्यांश किचनच्य चौकटीतुन बाहेर आला, हॉलमध्ये घुसला तेव्हा, जिन्याच्या वळणावर पुन्हा एकदा त्याला बलवंतरावांचे दोन पाय वर वर ओढत्या स्वरुपात घेऊन जातांना दिसले.
" बाबा!" सुर्यांश पुन्हा ओरडला ! त्याने लागलीच जिन्याच्या दिशेने धाव घेतली, पण अंधारात एका टेबलापाशी पाय अडकून तो खाली पडला..पडताना त्याच्या कपाळावर खालच्या फरशीचा फटका बसल्याने तो लागलीच बेशुद्ध झाला.
××××××××××××


रात्री साडे तीन वाजता( 3:30AM)

बंगल्यातली लाईट आली होती. सुर्यांशला त्याच्या माता-पित्याच्या खोलीत पलंगावर झोपवल होत. त्याच्या कपाळावर झालेल्या जखमेवर तपकिरी बेंडेज लावली होती. ज्याने रक्त थांबल होत.बंगल्याबाहेर पोलीसांच्या दहा-बारा गाड्या उभ्या होत्या. सर्व गाड्यांच्या त्या लाल भगव्या,निल्या सायरन लाईटस चमचम भेसुर प्रकाश सोडत चमकत होत्या. बलवंतरावांच्या आजुबाजुला असलेल्या काळपाडा गावातला एक नी एक रहीवासी झोपेतुन खाडकन उठला होता ! एका घराची लाईट पेटली की दूस-या बाजूच्या घराची सुद्धा लाईट पेटत होती.
काय तर म्हंणे बलवंतेच्या घरात काहीतरी अभद्र हत्याकांड घडल आहे.
पुर्णत कालपाडा गावात भयाण स्थिती निर्माण झाली होती.माने साहेब बाहेर पोलिसांशी बोलत होते.बंगलाच फाटक उघड ठेवल होतं, तिथेच एम्बुलेंस उभी होती. माने साहेब त्यांच्या सहका-यांशी बोलत असतांना
गायतोंडे-जना अशी दोन पांढ-या कापडात.स्ट्रेचवर झोपवलेली प्रेत रात्रीच्या अशुभ तीन वाजलेच्या समई वॉर्डबॉय घेऊन जात होते.
बंगल्यात :
सुर्यांशने हळु हळू डोळे उघडले. व तो खाडकन उठुन बसला.
" सुर्यांश हळू!तुला बर वाटत नाहीये!" सना त्याच्या बाजुलाच बसली होती.
" नाही मी ठीक आहे! पन आई ? आई -बाबा ? कुठे आहेत ? त्यांना शोधलत का तूम्ही ? " सुर्यांश मोठ्या आशेने सना -अमृताबाईंकडे पाहत होता-पन त्या दोघींनीही खाली मान घातली होती-डोळ्यांतुन अश्रु खाली फरशीवर पडत होते. सुर्यांशने दोन्ही हातांनी डोक गच्च धरल व त्याला पियुषची आठवण झाली.
" सना? पियुष , पियुष कुठे आहे? कसा आहे तो ? "
" सुर्यांश , सुर्यांश तो ठिक आहे ! त्याला हॉस्पिटलमध्ये ऐडमिट केलंय पन!" सनाचा चेहरा पुन्हा खाली आला.
" पन ?" सुर्यांशच्या ह्दयात खड्डा पडला त्याला वाटल की आपला भाऊ ही.
" डॉक्टर म्हंणाले की त्याच्या मेंदूला जराशी दुखापत झालीये , ज्यामुळे तो कोमात गेलाय !" अमृताबाई म्हंणाल्या.
सुर्यांशने पुन्हा दोन्ही हात डोक्यावर ठेवले - त्याच्या तोंडातुन रागाने एकमेकांवर दात घासल्याचे आवाज येत होते. तसाच तो पलंगावरुन उठला व थेट खोलीतून बाहेर पडला.
" सना थांबव त्याला , बाहेर जाऊ देऊ नकोस! बाहेरच दृष्य तो पाहू शकणार नाही बाळा थांबव त्याला.!"
अमृताबाई सनाला म्हंणाल्या. तशी ती सुद्धा दरवाज्यातुन बाहेर निघुन
गेली. रागा रागात पाय आपटत सुर्यांशने हॉलमधुन बाहेर जायची कोरिडॉर गाठली-बाहेर जायच्या काचेच्या दरवाज्याबाहेरुन पोलिसांच्या सायरनचा निळ्सर,भगवा,लाल प्रकाश त्याच्या चेह-यावर पडत होता.
तोच काचेचा दरवाजा उघडून तो बाहेर आला .बाहेर येताच, त्याला अंगणात स्ट्रेचरवर पांढ-या कापडात झाकलेले मृत देह दिसले.
आपल्या सहका-यांशी बोलणा-या मानेसाहेबांना बेशुद्धीतुन उठुन आलेला सुर्यांश दिसला व तो कोठे पाहत आहे हे सुद्धा दिसल.
" वेट!" म्हंणत ते आपल्या सहका-यांपासुन पुढे सुर्यांशच्या दिशेने पोहचले. मागुन सना-तिच्या मागून अमृताबाई सुद्धा आल्या.
" सुर्यांश आत चल बाळ !" अमृताबाईनी माने साहेबांकडे पाहील. तशी त्यांनी नकारार्थी मान हळवली. जड पावलांनी सुर्यांशने त्या दोन प्रेतांपर्यंत कसतरी चालत जायचं सामर्थ्य गाठल होत. त्या जड पावलांना जणु आता बधीरता आली होती. डोळ्यांतुन आसवांची धार.अशी काही बरसत होती की जस चाळणीतुन पाऊस बरसावा-डोळ्यांच्या कडा अश्याकाही भिजल्या होत्या- जणु अश्रुंचा पडदा डोळ्यांभोवती उभारला होता. पुढच दृष्य कस अंधुक अंधुक दिसत होत. मेंदूतल्या आठवणींची तार छेडली गेली होती-लहाणपनापासुन ते आतापर्यंतच्या आई-वडिलांसमवेत हसत-खेळत-रडत जेवढे घालवलेले क्षण होते ते सर्वकसे ब्लैक ऐण्ड व्हाईट चित्रफित डोळ्यांसमोर येत झळकू लागले होते. आई -बाप मेले तो आता पोरका झाला होता कधी विचारही त्यांने केला नव्हता ही अशी मायेची गाठ अर्ध्यात सुटणार होती हा दिवस आज पाहायला मिळणार होता. त्याच्या चेहर्यावर अश्रुंची धार लागली होती. आजुबाजुला पोलिसआणि गावातली लोक हा-हा म्हंणता गाव जमा झाला होता ,साठ सत्तर लोकांच्या मधील एक ही जण खुसपुसत नव्हता.नुस्ती शांतता पसरली होती तिथे, शोक शांतता. माने साहेबांनी एक कटाक्ष गर्दीवर टाकला-सर्व लोक निस्तब्धपणे उभे होते-त्या सर्वांच्या मनात बलवंतराव हे एक चांगले व्यक्तीमहत्व असलेले पुरूष होते..नाहीतर अन्य घटनास्थळावर एवढ्या मांणसांची किती कुजबुज असायची! पन आजचा देखावा किती विलक्षण होता-आपल्या मित्राच्या आठ्वणीने माने साहेबांच्याही डोळ्यांतुन टचकन अश्रु बाहेर आले. आजुबाजुला लोक जमा झाली होती- थंड गारव्याची हवा तिथे स्मशान शांतता पसरली होती. त्याच शांततेत एक हसण्याचा आवाज घुमु लागला.
" ह,ह,हा,ह,ह,ह,,ह," सुर्यांशचे खांदे हळत होते -तो वेड्यासारखा खाली मान घालुन हसत होता. त्या हसण्याच कारण भयंकर चिड,क्रोधाने भरलेली होती-म्हंणुनच तर ती लोक सुर्यांशकडे रागाने प्रतिशोधाच्या भावनेने पाहत होते.
सुर्यांशचा हसण्याचा स्वर बदल्ला! आता त्याच्या तोंडून रडण्या ओरडण्याच्या नुसत्या मनभेदरवणारा आक्रोश बाहेर पडत होता.
बाजुला उभ्या पोलिसांनी डोक्यावरच्या टोप्या काढून गबलेत धरल्या.
" आ,अह,अह,हाह, हाहाहा आ " सुर्यांशने एका हाताचा पंजा आपल्या कपाळावर दोन वेळ मारल, मग त्याच्या आईच्या प्रेतावर डोक ठेवुन हुंदके देत रडू लागला.



क्रमश:..