एक सैतानी रात्र - भाग 29 jay zom द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

एक सैतानी रात्र - भाग 29



भाग 29

थरथराट..

आजचा भाग वाचा पन आपल्या रिस्कवर ! 😬



अंधा-या रात्री खोल घनगर्द झाडीच्या जंगलात ते दोघे एका धग धगत्या आगीने पेटलेल्या हवनकुंडा समोर बसले होते. ते दोघे म्हंणजेच रेंचो आणि शैडो. त्या दोघांच्या अंगावर एक कपडा सुद्धा नव्हता, दोघेही विवस्त्र हवनकुंडा समोर बसले होते.करणी जादू टोना करताना ह्या विधीमध्ये त्या हस्तकाच्या देहावर काळा ,लाल कपडा किंवा विव्स्त्र्देह चालत ,ज्याने तो सैतान आधिकच प्रसन्न होतो. रेंचोच हाडकूल,हाड मांस,छातीचा पिंजरा झालेल देह , त्या आगीच्या तपकीरी उजेडात हिडीस दिसत होत.
डोक्यावरचे वाढलेले केस,पांढरा चेहरा-वटारलेले डोळे, जणु एक मुर्दाघरातल प्रेत उठुन बसल्यासारख वाटत होत. त्याच्या बाजुलाच साडेपाच फुट उंचीचा शैडो बसला होता. त्याच्या बलदंड भीमकाय हातांची पाचही बोट त्याने मांडी घालून ढोप्यांवर ठेवली होती.
खप्पड चेहरा,लालबुंद डोळे जणु एक भयावह भुता-खेतांना काबीज करणारा एक मांत्रीक वाटत होता. पेटत्या हवनकुंडासमोर काही बाही विचित्र हिडिस सामग्री मांडून ठेवली होती-जी आपण कल्पनेत सुद्धा
विचार करु शकत नाही. पेटत्या आगीने उफाळलेल्या हवनकुंडाच्या वरच्या बाजूस जनार्दनच शीर (डोक)ठेवल होत- त्या निर्जीव शीरेचा मालक देह तीन चार किलोमीटर दूर होत. जनार्दनच्या शीरेचे डोळे सताड उघडे आपल्या सर्वांकड़ेच पाहत होते. तोंडाचा आ-वासला जात दात, जीभ जराशी बाहेर आलेली,आतली घशातली घंटा दिसत होती. हवनकुंडाच्या खालच्या बाजूस एक मेलेल माकड ठेवल होत. माकड म्हंणजे सहदेहासहित नव्हत हो! फ़क्त कातडी अंथरली होती तिथे .
आतल मांस तर त्या हवनकुंडात जळत होत. त्या तपकीरी आगीतुन
काळधुर-करपट वास घेऊन बाहेर पडत होत. हवनकुंडाच्या डाव्या
बाजुला तांदळाच्या पिठाच्या चार बाहुल्या होत्या. त्या प्रत्येक बाहुलीच्या अंगाला काला दोरा बांधलेला व त्यांना ना रंग होत . ना आकार, ना उकार, ना चेहरे ! डोळ्यांच्या खोंबण्यांच्या जागी फ़क्त दोन काळे लहानसर खड़े बसवले होते. दोन्ही -हातांवर -खाली दोन्ही पायांवर टाचण्या टोचल्या होत्या. चारही बाहुल्यांच्या छातीवर एक बिबवा
ठेवलेला दिसत होता. हवन कुंडाच्या उज्व्या बाजुला एक गोळ सोनेरी थाली होती - त्यात काळसर ,हिरवा,पिवळा,भगवा अश्या रंगाचा बुक्का होता-त्याच थाळीत चार लिंबू होते ,लिंबाला लाल -पिवळा मिश्रित धागा
गुंडाळलेला,आणि त्यालाही टाचण्या टोचल्या होत्या.

" ..अंहंम.....पिशाच्छ आगमनाहां ,तिमीर ,अंधकारं..हं..भवं ऽऽऽऽ!" रेंचोच्या मुखाची हालचाल झाली ! त्याच्य घश्यातुन निघालेल्या किन्नरी स्वराला,घोग-या लयीची प्राप्तता झाली. ते विचीत्र मंत्र वातावरणात गुंजू लागले. त्या क्लिष्ट मंत्रीत स्वरांच्या उच्चाराने वातावरणात बदल होऊ लागला. आजूबाजूला वारा सुटला,मोठमोठाल्या झाडांचे शेंड़े झुळू लागले. जमिनिवर पडलेल्या झाडांच्या पानांची भुतासारखा फिरायला सुरुवात झाली.
" अंहंम....पिशाच्छंम..अवतरांम्ह.... भवं. ऽऽऽ" रेंचोने वटारलेल्या काजळ घातलेल्या शुन्य भावहिंत डोळ्यांनी शैडोकड़े पाहिल. हवनकुंडातल्या पेटत्या आगीच्या उजेडात त्याच्या काळ्या डोळ्यांच्या पापण्या मिटतच नव्हत्या. शैडोच्या बाजुला एक पांढ-या रंगाच्या मातीचा मडका होता- त्याच मातीच्या मडक्यात शैडोने हात घातला! व पुन्हा बाहेर काढला ! त्याच्या मुठीत ह्याक्षणाला काळे केस होते. तो पुर्णत मडकाच खून केलेल्या मांणसांच्या डोक्यावरुन उपटलेल्या केसांनी भरला होता.
" अंहं....अंधकार ....प्रगटंम...! मृतां,मयतं.. भिक्षां वाहिंम..!"
रेंचोचा खर्जातला आवाज लाऊडस्पीकरमधुन निघावा असा निघत होता. ते क्लिष्ट आसुरी मंत्रांचे उच्चार वातावरणात दूर न जाता तिथेच गुंजत होते! जणु त्या श्रापीत अघोरी,अशुभ मंत्रांना निसर्गाने सुद्धा आपल्यात सामील करायला विरोध दर्शवला होता. हवा सुद्धा ते ते अभद्र मंत्र आपल्या परिवारात सामील करून घेत नव्हती. जणु त्या मंत्रांना वजन होत. किंवा ते त्या अघोरीक्रीये भवतीच वाजणार एक संगीत होत. जे फ़क्त सैतानाला आवडत असल्याने तिथेच गुंजत -भिंगत होते.
त्या मंत्राच्या शेवटच्या उच्चाराने रेंचोच्या डोळ्यांची बुभळे भुवयांवर जात नाहीशी झाली. त्याचवेळेस शैडोने मुठीत धरलेले ते केस हवन कुंडात टाकायला सुरुवात केली. त्या पातळसर केसांचा स्पर्श हवेतच आगीला होताच-सेकंदातच त्यांची काळसर राख होऊन, केस जळाल्याचा घाणेरडा वास उत्पन्न होत होता. आजूबाजूला रात्रकिड्यांची किर्रकीर्र थांबली होती, रेंचो -शैडो दोघांच्या अवती भोवती त्या केसांचे मृत आत्मे प्रगट होत शुन्य भाव बधीर मांणसाप्रमाणे दात विचकत उभ राहून ह्या दोघांकड़े पाहत होते-त्या सर्वांच्या तोंडावर निळ्सर प्रकाश पसरला होता.
"टाक टाक टाक..! खिखिखी,मालक,मालका!" विचित्र आवाजात ते आत्मे ओरडत विव्हलत होते. जंगलातून रानटी श्वापफांच्या विव्हलण्याचा "व्हू,व्ह,व्हू" चित्कार बाहेर येत होता. आजूबाजूला असलेल्या झाडांच्या फांद्या हळू लागल्या होत्या-पानांची सळसळ होत होती. तो मंद आवाज , धोक्याची पुर्वसूचना देत होता. आजूबाजूला पसरलेल्या अंधारात चांदीचे लुकलुकणारे,पिवळेजर्द रंगाचे वेधक हिंस्त्र,अमानवी डोळे उघडझाप करतांना दिसत होते. त्या सर्व डोळ्यांच्या भुकेने आसुसलेल्या नजरा ह्या दोन मानवी आकृत्यांवर स्थिरावल्या होत्या.
" ए ते आले ,ए आले बघ बघ कशे बघतात बघ हरामखोर ! फिफिफीहीहीह!"ते आत्मे तिथे उभ्या अंधारात अवतरलेल्या त्या ध्यानांना पाहत होते. त्या अंधा-या सैनिकांना हव असतं तर ह्या दोन्ही मानवी देहांची चिरफाड करुन, हाड मांस चाटून पुसून खायला त्यांना सेकंदाचाही अवधी लागणार नव्हता. पन ते अंधाराचे सैने कशाला तरी घाबरत होते ! काहीतरी त्या सर्वांच्या शक्तिवर भारी पडत होत.
" हंब,हंब,हंब,हंब, पिशाच्छं शिर्वाद! हंब,हंब,हंब!" रेंचोच सर्व शरीर थरथर काफू लागल . डोळ्यांची बुभळे वर कोप-यात गेली होती. पांढरट बुभळे दिसत होती.काहीतरी भयाण घडल जात होत.निसर्गाच्या
मिती नियमांविरुद्ध-काहीतरी अघोरी. , आजूबाजूच वातावरण सामान्य वातावरणा वेगळच भासू लागल होत,जणु दुस-या दुनियेतल काहीतर अवतरत ह्या सृष्टीत होत, त्याला प्रवेश दिल जात होत.ज्याची उपस्थिती ह्या सामान्य निसर्गाला मान्य नव्हती कदापी नव्हती.आजुबाजुला झाडांच्या पलिकड़े अंधारात ,काहीतरी सरपटत,रेंगाळत, वाकुल्या दाखवत,हसत ,खिदळत, तर कधी रडत फिरत होत . फिदीफिदी हसण्याचा - रडण्याचा आवाज जंगलातल्या कालोखात श्रापीतल्यासारखा फिरत होता.
" हं,हं,हं,हं!" रेंचोची हाड दिसणारी छाती वर खाली होत होती-तोंडातुन तो हं,हं, उसासे टाकल्याचा आवाज एका लयीत सुरुच होता- जणु त्याच्या अंगात येत होत -होत. पन देव नव्हे......देव नव्हे.. ऽऽऽऽऽऽऽऽऽ
.... सैतान ऽऽऽऽऽ सैतान ऽऽऽऽऽऽऽऽ!
" हं,हं,हं,हं, ये..ये..ये..! माझ्या देवा , माझ्या अंधकारा हं,हं,हं,हं,
ये ...ये...ये....राकिसा...! " त्या रेंचोच्या शरीराची अंगात आलेल्या बाईसारखी शरीराची हालचाल होत होती-आणि ते किन्नरी वाक्य तोंडातुन निघतांना काळसर द्रव लाळेतुन बाहेर येत होत.जणु त्याच्या अंगात त्या बाह्य जगातल्या श्रापित,क्लिष्ट शक्तिचा अंश तैयार झाला होता. बाजुला बसलेल्या शैडोने त्या मडक्यातले सर्व काले केस हवनकुंडात अर्पण केले होते. आता त्याने मडक्यातुन एक तांदळाचा गोळ मोठा तांदळाचा लाडू बाहेर काढ़ला. त्या लाडूला काळसर केस चिकटले होते.
" हं,हं,हं, खायला पाहीजे? !" रेंचोच्या वाक्यावर हवनकुंडातुन जळत्या आगीतून एक केसाळता काळाकुट्ट हात बाहेर आला. जणु पाताळाच्या द्वारातुन काहीतरी भयान दोन्ही हैवानांनी काहीतरी ब्याद बोलावली होती. कसल्यातरी अभद्रास आमंत्रण दिल होतं.
" पिठाच्या बाहुल्या, हं,हं,हं, ( मध्येच रेंचोच्या तोंडातुन निघणारे उसासे ) मयताच्या सावळ्या !
पिठाच्या बावल्या , हं,हं,हं, नैवेदे दावल्या
मयताच्या येळेला, रातीच्या सावल्या हं,हं,हं
पीठाचा लाडू, पाताळाचा साडू....हं,हं,हं,.."
शैडोने तो पिठाचा लाडू हवनकुंडापासुन एक फुटवर धरला!
त्या केसाळत्या ,चिपचिपीत पंज्याने आपली सहा बोट विस्फारली .( होय सहा बोट ) त्या काळ्या चिपिचिपीत केसांच्या हातांची नखे पौलादासारखी धारधार होती. नुसता हाताचा पंज्याच असा आहे तर आतल ते ध्यान कस असेल? त्याची काया, आकार ,उकार्?
"हं,हं,हं, काळराज," रेंचोच किन्नरी स्वर बदल्ल ! त्याच्या घश्यातुन जणु दुसरच कोणितरी बोलत असल्यासारखा आवाज निघू लागला.तोच आवाज वातावरणात-अंधारात गुंजत होता. आजुबाजुला झाडांच्या फांद्याची सळसळ आणि आकाशात काळे ढग जमा झाले होते.
चंद्राची कोर त्या ढगांमध्ये कोठे हरवली.असेल? काहीच समजत नव्हत.
" हं,हं,हं काळराज...काळराज,ये..ये..ये..!
अंहंम... पिशाच्छं नैवेदे..अर्पणाय ... भागो, भगो ...हं...स्वाहा-ऽऽऽऽऽऽ" त्या शेवटच्या हा शब्दावर रेंचोच्या खर्जातल्या घोग-या आवाजाने कमालीचा दाब दिला.आणि त्याच शेवटच्या स्वरला होकार समजुन! शैडोने तो पिठाचा गोला हातून सोडला.गोल गोलभिंगत तो पिठाचा गोला जाऊन थेट त्या हवनकुंडातुन बाहेर आलेल्या काळ्या केसालत्या काळसर हाताने सहा टोसकूल्या नखांच्या हाताने धरुन थेट क्षणार्धात आत खेचला. तो हात आत जाताच आजुबाजुला जमिनीवर झाडावरच्या सुकलेल्या पानांणी हवेत उडायला-अघोरी नृत्य करायला सुरुवात केली! हवनकुंडातली तपकीरी आग पाण्यावर जशी हळू हळू हिरवी शेवाळ ओढावी तसा त्या आगीचा तपकीरी रंग हिरव्या रंगात बदलायला सुरुवात झाली. रेंचो -शैडो दोघेही हवनकुंडासमोर बसले होते- आणि त्या दोघांच्याही अवतीभोवती चौकलेटी रंगाची
सुकलेली पाने आणि खालची धुळ गोळ-गोळ वेगाने भिंगत होती.
हवेचा सप,सप आवाज होत होता. हिरव्या ज्वालेची काया वर-वर चार फुटांवर पोहचली होती. आकाशात कड,कड,कड काळ्या ढगांचा घासण्याचा मेघगर्जनामय आवाज काळिज पिळटून टाकत होता.
ʼधडाम, एक मोठा ढग फाटल्यासारखा आवाज झाला आणि एक हिरव्या रंगाची विषारी वीज कडाडली.
"धडाड धम्म्मऽऽऽऽऽऽ कड,कड , कड कडाट..ऽऽऽऽ..."
XX X XX X X X X X X
जंगलातुन झाडांच्या मोठ मोठ्या कायेना कट देत, ते दहा-बारा पोलिस ऑफीसर्स हातात kar98 मॉडल बंदूका घेऊन धावत सुटले होते. अंगावर खाकी कपड़े, डोक्यावर हिरवे हेल्मेट , छातीवर काळ्या रंगाचा गोळ्या लागण्यापासुन रोखण्यासाठी सुरक्षा कवच घातला होता.
(वर्ष झाल पबजी खेळायचं बंद करुन! म्हंणुन नाव😁 विसरलोय )
त्यांच्या पायातल्या काळ्या बुटांचा धप,ध्प आवाज पुर्णत जंगलातल्या स्मशान शांततेत घुमत होता. काहीवेळा अगोदर उजेड म्हंणुन सोबत असलेला चंद्र आता काळ्या ढगांआड लपला होता. एवढवेळ त्या चंद्राच्या उजेडाने दिसणारी वाट आता अंधाराने आपल्या अज्स्त्र मुखात सामावून घेतली होती. त्या सर्व पोलिस टीमच्या पुढे काळे कपड़े घातलेला ईगल42 धावत होता. त्याच्या खांद्यावर लांबसडक हिरव्या रंगाची( AWM)बंदूक होती. त्याने एकनजर आकाशात टाकली. तसा तो जागेवरच थांबला. वर पाहताच त्याच्या तोंडाचा आ-वासला.
तस बाकीचेही जागेवरच थांबले.सर्वांनी एकवेळ ईगल कड़े मग आकाशात पाहिल. आकाशात चौहीदिशेना काजळ फासल होत-काळे ढग भरुन आले होते.
" अरे बापरे, हे काळे ढग अचानक?" एक पोलिस इन्सपेक्टर आपली भावना व्यक्त करत उच्चारला. आण तेवढ्यात एक हिरव्या ल्कख अशी अघोरी अतर्कनिय विज कडाडली. त्या विजेचा हिरवा विषारी रंग उभा आसमंतात,जंगलात,कालपाडा गावावर पडला.
"हेय भगवान ? काय आहे हेऽऽऽ?" पहिल्या पोलिसाचा आश्चर्यकारक वक्तव्याचा आवाज.
" अरे मी काय बघितलं आता? हिरव्या रंगाची विज कडाडली आकाशात?" दुस-या पोलिसाचा आवाज.
" आई शप्पथ ? काय बघितल हे मी ? हिरव्या रंगाची विज ? कस शकय आहे हे ? " तिथे जमलेल्या सर्व पोलिसांची कुजबुज सुरु झाली होती.जो तो स्व्त:चे आश्चर्यकारक उद्दार-निष्कर्ष काढत सुटला होता.
ईगल 42 ची सुद्धा अवस्था सुद्धा काही और नव्हती.
" ऑफिसर्स!"ईगल42 चा मोठा आज्ञाधारक आवाज घुमला. कुजबुज बंद झाली
" मला वाटत आपन पाऊस पडायच्या अगोदर त्या दोघांनाही शोधायला हव! कारण जर पाऊस सूरु झाला , तर चिखलामूळे मला त्या दोघांनाही मारण्यासाठी चांगली दबा धरुन बसणारी जागा मिळणार नाही. म्हंणुनच पाऊस सुरु होण्या अगोदरच मला जागा शोधावी लागेल.पन त्या अगोदर आपल्याला लवकरात लवकर इथून पुढे जाव लागेल." ईगलचा स्वर.
" अरे पन येवढ काळोखात आपन त्यांना शोधणार कुठ?"
एका पोलिसाच प्रश्ण-ज्यात दम होत.
"हो ना ! ह्या पाऊसाने पूरी वाट लावली मिशनची!"
त्यातलाच एक पोलिस ऑफीसर म्हंणाला. आणि तेवढ्यात पुन्हा हिरव्या रंगाची विज कडाडली-तोच तो विषारी हिरवा फेसाळता प्रकाश उभा आसमंत -जंगल सर्वकाही उजळून निघुन गेला. आणि त्याच उजेडात त्या सर्व पोलिसांना आपल्या पुढ्यात ईगल नाहिसा झालेला दिसला.
"अरे हा ईगल कुठे गेला?" एकजण म्हंणाला.

X XXXXX X X X X X X X
मध्यरात्रीची वेळ 3:00 AM
बलवंतरावांच्या बंगल्या आत :

एका लाकडी सोफ्यावद ,! एकाबाजुला माने साहेन तर दूस-या बाजुला वनविभाग ऑफिसर शशीकांत नेमाड़े बसले होते. बंगल्याच्या सर्व खिडक्यांवर सफेद पडदे अडकवले होते. म्हंणुनच त्या दोघांना अद्याप तरी ती हिरवी विज दिसली नव्हती.( मानवाच्या कल्पनापल्याडच एक आविस्मर्नीय देखावा-क्षण होता तो. म्हंणुन त्या विजेचा उल्लेख इथे आश्चर्य ह्या हेतूनेच संबोधतोय मी. ) बलवंतराव-सुजाताबाई ,दोघांचेही प्रेत हॉस्पिटलच्या मोर्ग रुममध्ये , प्रेतांच्या चौकोनी कपाटात टाकून ठेवले होते. वाफाळत्या हिम थंड हवेचा मारा त्या निर्जीव प्रेतांच्या कातडीला घासून घासून नवी कोरी ठेवण्याचा प्रयत्न करत होता.कारण उद्या त्या दोन्ही प्रेतांवर अंत्यसंस्कार होणार होते !होणार होते ना?
"माने साहेब ? हे रेंचो आणि शैडो असे का वागतात हो? एकदम सैतान जणु!" नेमाड़ेसाहेबांनी माने साहेबांना विचारल.
" नेमाड़े साहेब उत्तर तर माझ्याकड़ेही नाहीये! की माणुस इत्क्या खालच्या पातळीपर्यंत कसा जाऊ शकतो ,इतका की आप्ल्याच आई-वडिलांचा खून कराव . त्यात आज त्यांनी आपल्या भावाचा सुद्धा खून केला." माने साहेबांच्या वाक्यावर नेमाड़ेसाहेब काहीस गंभीर होऊन विचार करत होते.
" माने साहेब एक विचारु ?" नेमाडेंचा आवाज.
"ह्या रेंचो शैडोने लहानपणापासुन ते आतापर्यंत किती खून केले असतील हो?"
" काय माहीत नाही ! पन माझ्या मते दोघांनी मिळून शंभर एक खून केले असावेत हो !" माने साहेबांच्या वाक्यावर नेमाड़े साहेब काहीवेळ स्वत:च्याच अंतर्मनात कसलीतरी चर्चा करण्यात गुंतले होते.
माने साहेब एकटकच त्यांच्याकड़े पाहत होते. त्यांना जणु समजुनच येत नव्हत.नेमाड़े नक्की अस का विचारत आहेत.
" सर!" हॉलमध्ये असलेल दार उघडून एक सब इंनस्पेक्टर व कोंनस्टेबल आत आले. त्यानी आत येताच कडक सेल्यूट टोकला.
"येस !" माने साहेब इतकेच म्हंणाले. तसे त्या इंन्सपेक्टरने आपल्या बाजुला कोंन्स्टेबल कड़े पाहिल.
"होय साहेब!" म्हंणत त्या कोंन्स्टेबलने एक तपकीरी रंगाचा एक घडी घातलेला छोटासा जुनाट कागद बाहेर काढला. मग तोच कागद त्या कोंन्सटेबने सब इंन्सपेक्टरकड़े सोपवला.मग इंन्सपेक्टरने तो काद माने साहेबांकड़े सोपवला. मानेसाहेब- वनविभाग ऑफिसर नेमाड़े फ़क्त त्यांच्या हालचाली गप्प राहून पाहत होते.
" काय आहे हे ? " म्हंणत मानेसाहेबांनी त्या हातातल्या कागदाकड़े पाहिल. एक चौकोनी घडी घातलेल अगदी जुनाट कागद वाटत होता तो. अगदी पुराणातल्या कोण्या ग्रंथातला कागद जणू कोणि फाडून स्वत: सोबत वर्षभर अगदी जपून ठेवल्यासारखा. माने साहेबांनी एकवेळ
नेमाड़ेसाहेबांकडे पाहिल-त्यांनी फ़क्त होकारार्थी मान हलवली.
जणु तो त्यांचा कागद खोलून पहा असा इशारा होता.माने साहेबांनी त्या जुनाट कागदाची घडी खोल्ली, आणि जशी घडी खोल्ली. मानेसाहेब -नेमाड़े साहेबांच्या मागची काचेची दोन झाप असलीखिडकी धाड आवाज करत उघडली,बाहेरुन भूतासारखा वारा आत घुसु लागला,हिहुही,खीखी,फिफी,आवाज करत आजुबाजुला शीळ घालत सुसाट फिरु लागला -त्या वा-याने खिडकीसमोर असलेला सफेद पडद वरच्यावर हवेत झुळू लागला. तो कोंन्स्टेबल तेव्हा खिडकी बंद करायला गेला. माने साहेबांनी कागदाची घडी उघडली.एक फुट लांबीचा तपकीरी रंगाचा कागद होता तो. त्या कागदातुन एक विशिष्ट प्रकारचा वास येत होता. त्यातपकीरी कागदावर काही अक्षर,काही विचित्र पिशाच्छ, भुत-खेतांच्या आकृत्या रेखाटलेल्या दिसत होत्या.
" प्राचीनकाळीन गुढ विद्यापुस्तक माहीती क्र: 321!"माने साहेबांनी त्या तपकीरी कागदाच्या वर असलेल नाव वाचल ! त्याखालीच-... त्याखालीच भडक काळ्या अक्षरात त्याच नाव लिहिल होत.
" मृतोक्ष्वरी....पिशाच्छदेव प्रसन्नंम..!" माने साहेबांनी काहीश्या वेगळ्याच नजरेने नेमाड़े साहेबांकड़े पाहील. नेमाड़े साहेबांचा चेहरा भीतीने,चिंतेने न्हाऊन निघाला होता. त्यांचे डोळेच विस्फारले होते. त्यांनी विचार केलेल्या गोष्टी सत्यात उतरावयला सुरुवात झाली ही फ़क्त एक झलक होती बस्स झलक .
"नेमाड़े साहेब,काय आहे हे ? "माने साहेबांनी न समजून विचारल.
" सर पुढे तर वाचा एकदा!" तो सब इंन्सपेक्टर आवंढा गिळत म्हंणाला. जणु त्या दोघांनी ते सर्वकाही आधीच वाचल होत.मानेसाहेबांनी एक आवंढा गिळून त्या कागदाकड़े पाहिल.
"कागदावर प्रथम एक आकृती दिसत होती. हिडिस,क्लिष्ट,तामसी,अघोरी विकृत बुद्धीचा एक नमूना होता तो.
लांडग्यासारख डोक,बारीकस कपाळ, डोक्यावर एक साधारणसा मुकूट होता-पन मुकुटच्या मधोमध एक हिरवा माणीक अडकवलेला . त्या माणकाच नाव होत -लाढ्यमणी! (ह्या मणीबद्दल,आपण एका कथेत जाणनार आहोत.) त्या पिशाच्छाच लांडगी तोंड पिसाळलेल्या सारख दिसत होत. कारण त्याचे ते टोकदार दात बाहेर आलेले... वखवखत्या भडक तपकीरी नजरा त्याच्या हिंस्त्रपणाचा नमुना दाखवत होते. त्याच्या कानांत आकाशी रंगाच्या ही-यांच्या कानातल्या होत्या. खालच शरीर अगदी पातळसर हाड मांस चिकटलेल कुपोषित होत.दोन पायांवर ते बसल होत. त्याचे दोन्ही हात त्या हिरव्या मणीवर टेकले होते. आणि तो हिरवा लाढ्यमणी जरासा चकाकताना दिसत होता!त्या क्लिष्ट,अमानवी आकृतीच्या दोन मानवासारख्या दिसणा-या पायांखाली त्याच लाल भडक रंगात नाव लिहील होत.
"मृतो-क्ष्वरीऽऽऽऽऽ" (मृत्युवर विजय मिळवलेला)
आणि खालीच काळ्या टपोरी अक्षरांत त्याची उपासना इत्यादी सर्व माहीती लिहिली होती.
" मृतोक्ष्वरी ( म्हंणजेच मृत्युवर विजय मिळवलेला -मृत्युची स्वारी करणारा-हा एक पुरातन देवपिशाच्छ आहे." माने साहेब वाचू लागले.
" कलियुगात मानवाच्या मनातल पाप, एकमेकांचा तिरस्कार,लैंगिक वासनामय इच्छा, धनाचा लोभ- हव्यास सर्वकाही इतक वाढेल! की त्याच्या इच्छा ह्या असमाप्तनीय होतील. त्याला त्याच्या पुर्णत आयुष्यात कसलीच भीती -चिंता उरणार नाही.... फ़क्त एक भीतीमय चिंता सोडून...... - ती म्हंणजे मृत्यु! "
" मृत्यु?"नेमाड़े साहेबांचा आवाज. त्यांनी मानेसाहेबांकड़े पाहिल, त्यांच्याही चेह-यावर कमालीचे आश्चर्यकारक भाव पसरले होते.
" होय मृत्यु!"माने साहेब पुढे वाचू लागले."कलियुगात मानवाच्या इच्छा ह्या असमाप्तनीय असतील. ह्या कलियुगी मानवाला सुख ही गोष्ट कायमस्वरुपी भोगायची असेल. साठ वर्षाच आयुष्य ह्या लोभीमानवाला पुरेस राहणार नाही - म्हंणुनच हा मानव आपला आत्मा
सैतानाकड़े गहाण ठेवेल! त्याच हस्तक बनून पिशाच्छ धर्म स्विकारेल .." माने साहेबांनी नेमाड़े साहेबांकड़े डोळे मोठे करुन पाहिल.
" मानवाला पिशाच्छ धर्मात प्रवेश देण्याच काम खुप सारे भुत-पिशाच्छ,समंध करतील त्याच श्रेणीत हा मृतोक्ष्वरी असेल. क्ष्वरी बद्दल सांगायचं तर हा अर्धमानव आणि लांडग्याच रुप असलेला पिशाच्छदेव आहे.ह्याला प्रसन्न करण म्हंणजे काही साधीसुधी गोष्ट नाही. त्यासाठी दगडाच काळीज लागत. मृतोक्ष्वरीला प्रसन्न करण्यासाठी पहिला बळी हा हस्तकाच्या रक्तातील नात्यातला हवा लागतो. त्यानंतर शंभर मानवी बळी चढवावे लागतात. प्रत्येक बळी हा हलाल करुन द्यावा लागतो- तो असा की मरणा-याचा मृत्यु ही थरथर काफेल.
पुजेची विधी: एक हवनकुंड , मृत माकडाच्या देहाची कातडी ( आणि आतल मांस-हवनकुंडात जाळण्यासाठी काढुन ठेवाव. )विविध रंगी बूक्का,७ बिबे,७लिंबू,५० टाचण्या, तांदळाच्या पिठाच्या ४ बाहूल्या, शंभर बळींच्या शरीरावरचा एक केस , पाताळाचा साडु ( पीठाचा लाडु) १ मृतशीर .
मंत्र
१} अंहंम.....पिशाच्छ आगमनाहां ,तिमीर ,अंधकारं..हं..भवं ऽऽऽऽ!"
२}अंहंम....पिशाच्छंम..अवतरांम्ह.... भवं. ऽऽ
३} अंहं....अंधकार ....प्रगटंम...! मृतां,मयतं.. भिक्षां वाहिंम..!"
४}पिठाच्या बावल्या , हं,हं,हं, नैवेदे दावल्या
मयताच्या येळेला, रातीच्या सावल्या हं,हं,हं
पीठाचा लाडू, पाताळाचा साडू....हं,हं,हं,..
५}अंहंम... पिशाच्छं नैवेदे..अर्पणाय ... भाग भगो..हं...स्वाहा-ऽऽऽऽऽऽ"
आंतिम मंत्र- मृतो . पिशाच्छं , भादो..धरी..! भग्व..दे..भग्व..दे..अवतरंम्म ʼऽऽऽऽ..क्ष्वरी..स्वाहा...!
शेवटची सूचना पाहिला बळी आणि शेवटचा शंभरावा बळी रक्ताच्या नात्यातलाच असायला हवा. ही सर्व क्रिया करतांना जर मेघ दाटुन आले, आणि त्या मेघांत हिरवी विषारी विज गडगडली तर समजुन जा- देव तुमच्यावर खूष झाला आहे!..."
" व्हॉट नोन्सेंन्स! ...काय बेवकूफ गिरी आहे ही !" माने साहेबांनी रागानेच तो कागद खाली फेकला . त्यांच्या मनाला ही कागदातली माहीती अगदी धोतांड कल्पना वाटत होती- आणि ह्याच धोतांड कल्पने नुसार त्या रेंचो शैडोने असीम निष्पाप लोकांचा खून केला होता. ह्या असल्या भलत्या सलत्या, अंधश्रद्धेला बळी पडुन त्या दोन्ही मनोवेड़यांनी काय करुन ठेवल होत ? हा विचारकरुनच त्यांच्या मनात क्रोधाचा आग्नि उफाळून वर येत होता.
" त्या पुस्तकात काहीही वेडबिंद्र लिहील आहे ! आणि त्या दोन्ही मुर्खांनी सुद्धा , काडीचाही विचार न करता.....शेऽऽऽऽ" माने साहेबांना पुढे बोलवेच ना!
" माफ करा साहेब !" अचानक एक आवाज आला. खिडकी बंद करायला गेलेला तो हेड कोंन्स्टेबल म्हंणाला." तुमचा विश्वास बसणार
नाही ! पन त्या दोन्ही येड्यांनी जे काही केलंय , ते खोट नाहीये!"हे सांगतांना त्या कोंन्सटेबलचा चेहरा भीतीने पांढरा पडला होता.
" त्या दोघांनी त्या सैतानाला जाग केलय साहेब , त्यांची...त्यांची..विद्या सफळ झालीये साहेब....! "
" व्होट रबीश! डोक ठिकाणावर आहे का तुझ? पिऊन येतोस का ड्युटीवर? हांऽऽऽऽऽ?" माने साहेब त्या हेड कोंन्सटेबलवर खेकसले.
" आईची शप्पथ घेऊन सांगतो साहेब ...दारुला आज पर्यंत हात पन नाही लावल मी! आणि तुमच माझ्यावर विश्वास नाही ना ?" त्या हेड कोंन्स्टेबलने खिडकीचा पडदा बाजुला सारला , खिडकीची झाप उघडली. बाहेरुन सोसाट्याचा वारा आत येत होतं, वातावरणात बाहेर घुप्प अंधार पसरलेल दिसत होत.
" बघा !" तो हेड कोंन्सटेबल म्हंटला. तीस सेकंद सळग खिडकीच्या चौकटीतुन माने साहेब , नेमाड़े साहेब,बाहेर पाहत होते.पन वा-या ,आणि अंधाराशिवाय तिथे काहीही नव्हत.
"वेड़े.....वेड़े झाले आहेत सर्व! अक्क्ल गहाण ठेवून आलेत घरी," म्हंणत माने साहेबा मागे वळले. त्यांच्या पाच पावलांवरच हॉलमधली सफेद भिंत होती. माने साहेब जसे मागे वळले -तसा मागून दोन सेकंदासाठी बल्ब चरचर्रवा तसा हिरवा प्रकाश त्या भिंतीवर पडुन पुन्हा नाहीसा झाला. नेमाड़ेसाहेब , तो कोंन्सटेबल ,पोलिस ऑफीसर आणि शेवटला माने साहेब सर्वांचे डोळे विस्फारले. नेमाड़े साहेबांच मुख वासल ते वासलच होत. त्या कोन्सटेबल आणि ऑफीसरच्या चेह-यावर एक विजयी छबी उमटली होती-जणु ते म्हंणत होते "पहा ,आम्ही म्हंणतोय ते खर आहे !" पाठमो-या उभ्या माने साहेबांच्या अंगभर निवडुंगाचे रोमहर्षक काटे उगवून आले होते. काय पाहील आपण? भिंतीवर कसला प्रकाश पडलां? माने साहेबांनी हलकेच गिरकी घेतली ! एक कटाक्ष त्या उघड्या खिडकीतून बाहेर टाकला . तेवढ्यात संमंध आकाशात ती विषारी फेसाळती अघोरी हिरवट वीज चरचरली.
" माय गॉडऽऽऽ" धप्पकन माने साहेब सोफ्यावर

क्रमश :


नेकस्ट पार्ट...

हॉरर ट्रिप 19
.
" हा,हा,हा,हा,ऽऽऽऽऽ! पुरात्ने..मृतोक्ष्वरी . पिशाच्छंदेव..,! .देह..अवतरंम्म ʼऽऽऽऽ..क्ष्वरी..स्वाहा...! आला रे आला माझा देव आला..हाहा....हह्हह्ह्ह्ह्ह.."

xxxx

"भयानक,भयानक आहे हे कहीतरी ! कल्पनेच्या पल्याड विचित्र आहे.
काहीतरी डेंन्जर घडणार आहे माने ! डोक्याच्या वरुन जाणार आहे आपल्या." नेमाड़े साहेब म्हंणाले. माने साहेब, कोंन्स्टेबल व सब इंन्सपेक्ट आश्चर्यकारक झटका लागल्यागत नेमाडेंच बोल ऐकत होते.
तोच.
" बाबा !" सना व अमृताबाई जिन्यावरुन खाली आल्या.
"काय झाल ?" माने साहेबांचा आवाज.
" बाबा सुर्यांश..!"
" सुर्यांश काय ? काय सुर्यांश !"
" बाबा सुर्यांश त्याच्या खोलीत नाहीये !"
" काय ? मग कुठे गेला तो! " माने साहेब जरासे ओरडलेच. आधीच एक धक्का कमी होता..जो हा धक्का सुद्धा..बसला.