एक सैतानी रात्र - भाग 31 jay zom द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एक सैतानी रात्र - भाग 31

भाग 31जंगलात :





त्या खैराच्या झाडावर एका माकडासारखा ईगल चढला होता.





खाली उभा सुर्यांश त्याला ते झाडावर माकडासारख चढतान पाहून आश्चर्यकारक धक्का बसल्यासारखा जागीच थिजला होता.

तोंडाचा आ- वासून तो इगल कडे पाहत होता.


खैराच्या झाडाची वरची जाडजुड शेंडी गाठून ईगल दोन पायांवर त्या फांदीवर उभा राहिला होता. आजूबाजूला ही खुपसारी झाडे होती.

निलगीरी, सुरु , चिकु, चिंच, एरंड, शिसव, गुलमोहर , नाना त-हेची झाडे तिथे उपस्थित होती. दिवसा ही सर्व झाडी पाहून मन कस सुखावुन जायचं .


परंतु जशी कालोख्या अंधा-या गलभद-या रात्रीच आगमन व्हायचं ही झाडे अघोरलेली-अमानवीय शक्तिने पछाडल्या सारखी वाटू लागायची.







खैराच्या झाडावर चढुन ईगलने ए:डब्ल्यू:एम ला जोडलेल्या 8x नाईट स्कोप स्कोपवर , एक डोळ ब्ंद करून, दुसर स्कोपवर लावून पूढे पाहायला सुरुवात केली.







नाईट स्कोपमधुन सर्वकाही हिरव्या- रंगाच दिवस असल्यासारख दिसत होत.

मोठ-मोठाली झाडे, त्या झाडांची खाली जमिनीवर तुटुन पडलेली पाने आणि त्या पानांवरुन सरपट जाणारा आठफुट किंग कोबरा.. सापऽऽऽ!







तर कुठे कोण्या झाडावर उलट्या डोक्याची घुबड बसली होती.

त्याच घुबडेने गर्रकन मान वळवून ईगल कडे पाहिल.

तिचे पिवळे बुभळ त्या नाईट स्कोप मार्फत हिरवट जहरी विखारी दिसत होते.





ईगलने बंदूक आजुबाजुला फिरवायला सुरवात केली.


स्कोप ने तो आजुबाजुला पाहत होता.








तो आवाज आला होता ? तो कोणाच होत? हे त्याला जाणून घ्यायचं होत. त्याच्या मानण्यानुसार ते हास्य एका क्रिमीनल सारख होत, एक सामान्य मनूष्य अस गडगडाटी हास्य कधीच करु शकत नाही!







त्या हास्याच स्वर एका सैतानी आसुरी लयीने नढलेल होत. त्या आवाजात क्प्टी, नीच:, धुर्त, खेळी सफल झाल्याच वाईट आनंद लपल होत.





" काय वेडा आहे हा ? आवाज आल आणि माकडासारख झाडावर चढला. अक्क्लच नाही वाटत! ह्याच्या बरोबर राहिलो , तर काही होणार नाही ! त्या पेक्षा !"



सुर्यांश स्वत:शीच पुढे बोलणार तोच ईगलने बंदूकीचा बोल्ट

चक-चक आवाज करत मागे पुढे फिरवला. बंदुकीची मोठी धारधार गोळी नळीत येऊन थांबली.





तो बोल्टचा विशिष्ट चक चक आवाज जरा मोठा होता.

त्या आवाजाने सुर्यांश जागेवरच सावध झाला. ईगलला नक्कीच शत्रु दिसला असावा!




" बापरे काय दिसल ह्याला?" सुर्यांश स्वतःला म्हंनला.




नाईट स्कोपच्या हिरव्या उजेडात ईगलला एक जळणारा हवनकुंड दिसला, त्या नाईट स्कोपच्या हिरव्या उजेडात -त्या हवनकुंडात पेटलेली आग राखाडी रंगात दिसत होती.

हवनकुंडाच्य अवतीभवती मानवी डोक, बाहूल्या ,लिंबू , बिबवे , बुक्का अशी काही बाही सामग्री मांडली होती.







त्या हवनकुंडा बाजुला पुढे एक काळसर आकृती नाईट स्कोपमध्ये बसलेली दिसत होती- आकृती ही नाही हो ! फ़क्त काळसर धुर होत ते . ज्यास ना आकार होत ना उकार! आणी त्या आकृतीपासून उज्व्या
बाजुला एक साडेपाच फुट एक धिप्पाड मानवी आकार उभा होता.




" व्हॉट इज धिस? काय आहे हे ?" ईगल ने स्कोपवरच डोळ बाजुला काढल, व पुढे पाहील. साठ सत्तर -मीटर अंतरावर ते ठिकाण होत. पन 8× नाईट स्कोप मुळे ते लांबच दृष्य अगदी सहजा सहजी नजरेस येत होत.



नाईट स्कोपमधुन तो काळसर धुरासारखा आकार नजरेस येत होता..पन साधारण नजरेने पाहता तिथे काहीच दिसत नव्हत.



ईगलच एक क्षण विचार करणा-या चेतनाक्षमतेला जणू बधिरताच आली. त्याने आजतागायत असा प्रकार कधीच पाहिल नव्हता. हे काहीतरी आविश्व्स्निय होत.



" ओके, जे होईल ते होईल !" ईगल स्व्त:शीच म्हंटला.


समोर जो मानवी आकार दिसत होता त्यालाच शुट करुयात अस ठरवुन त्याने हातात असलेली ए:डब्ल्यू : एम सरळ धरली.

खैराच्या झाडाच्या जाडजुड फांदीवर तो सरळ पोटावर झोपला , मग ए:डब्ल्यू:एम बिपोड स्टेंडवर ठेवली-पुढची नळी त्या दोन आकारांच्या दिशेने तोंड करुन होती.

कोणत्याही क्षणी गोळी त्या नळीतुन बाहेर येणार होती...मृत्युचा चावा शत्रूला घेणार होती? होती ना!



×××××××××××



" आता काय करणार आहेस तू रघूभट्ट ?"


शैडोने रेंचो उर्फ रघुभट्ट कडे पाहील.

डोक्यावर मुंज, वाढलेल्या भुवया, आण कचकड्याचे निर्जीव डोळे. घेऊन ते ध्यान मान उलटी फ़िरवुन शैडोकडे पाहत होत.



" जन्म!" रघुभट्ट इतकच म्हंणाला.



" जन्म? म्हंणजे?"



" विकृतांचा जन्म घडवून आणणार मी ! मानवाच्या रक्त , मांसावर जगणा-या दैत्यांना जन्म देणार आहे मी. ह्या बाहूल्या पाहतोयस ना तू ?"



शैडोने हवनकुंडासमोर पाहिल. तिथे पीठाच्या पाच बहुल्या..होत्या.


" ह्या बाहूल्या जन्म घेतील ! आपला हा मानवभक्षकांचा वारसा ...
हे पाचजण कायम पुढे चालू ठेवतील." रघुभट्टच्या काळसर ओठांवर छद्मी हास्य पसरल.






त्याने आपल्या डाव्या हाताची मुठ बनवली.


" काळमाया.. अंधाराची , जोडे..नाळ क्रूरपाशी..
गर्भदान कर भक्तासी, वारसा दे मज याक्षिणी...!फिफिफी..फिफिफिफ "



त्या ध्यानाच्या पांढुरक्या हाताच्या पंज्याची चामडी फाटली.

त्या फाटलेल्या चामड्यामधुन काळसर रक्त मग त्यातुन वळ-वळणा-या पिवळ्या..आळ्या, मोठ-मोठ्या घोणी, कॉक्रोच्स , बाहेर पडू लागले,तोच हात रघुभट्टने त्या पाच पिठाच्या बाहुल्यांवर ठेवला...
तो काळसर रक्त त्या पिठात शोषला जात होता , त्या वळवळणा-या किड्यांनी तो पिठ खायला सुरुवात केली. कोक्रोचस त्या पीठात तोंडाने खड्डा बनवत आत घुसू लागले..हळू हळु त्या पिठाच्या बाहूल्या तांबडसर प्रकाशाने उजळून निघु लागल्या..

त्या बाहुल्यांमधुन तांबडसर प्रकाश बाहेर येऊ लागला.

मग त्यांची लहान पीठाची काया घन आकार प्राप्त करु लागली. हात-पाय डोक हळूहळूमोठ होऊ लागल..





जणु त्यांच्यात जिव येऊ लागल होत.





शैडो विस्फारलेल्या डोळ्यांनी समोर घडणारा तो अघोरी प्रकार पाहत होता.



××××××××

ईगलच्या नाईट स्कोपमधुन शैडोच डोक दिसत होत. त्याच्या कपाळावर एक लालसर र्बिंदू दिसत होता.
जो की हिट पॉइंट होता.

ईगलने कसलाही विचार न करता , ट्रिगरवर बोट ठेवल.

आणी हळकेच ट्रिगर दाबला.



" ठण ऽऽऽऽऽऽ!" त्या स्मशान शांततेत एक मोठा आवाज झाला.

बंदुकीच्या काळ्या जाड नळीतुन धुर सोडत , उधळलेल्या बैलासारखी गोळी बाहेर पडली..तीच वेग सेकंदा गणिक 120 kph होत.

हवेला चिरत , मध्ये येणा-या झाडांच्या पानांना फाडत गोळी सुई,सुई आवाज करत धावली -



वातावरणात त्या गोळीचा आवाज घुमला होता. रघुभट्टच्या अमानविय नजरेस पुढुन वेगाने येणारी ती गोळी अगदी मंद गतीने शैडोच्या दिशेने जातांना दिसली व पुढच्याक्षणाला तीचा वेग वाढला..

" फट्ट ऽऽ!" कवटी फुटल्यासारखा आवाज झाला.

शैडोच्या कपाळामधोमधून गोळी आत घुसून मागच्या बाजुने बाहेर निघली होती.

" धप्प!" आवाज करत साडेपाचफुट उंचीचा शैडो जमीनीवर

निपचीत निर्जीव वस्तूप्रमाणे खाली कोसळला.



"घर्रर्रघर्रर्र ऽऽऽऽ" रघुभट्टच्या तोंडून विचित्र चित्कारण्याचा आवाज बाहेर पडला.



ईगलची नजर अद्याप नाईट स्कोपमधून त्या हवनकुंडाभोवती फिरत होती.

नजरेस काही दिसत नसल ! तरी तिथे कोणाच्या तरी आस्तित्वाची जाणिव होत होती!




" तो दुसरा कुठे आहे?" ईगळची नजर रेंचोला शोधत होती .

शैडो गतप्राण होऊन जमिनीवर पडला.

त्याच्या प्रेता आतुन हळकीशी प्रकाश किरण
बाहेर पडायला सुरुवात झाली .


काळ्याशार आकाशात एक निळसर रंगाची वाकडीतिकडी विज उमटत होती. सापासारखे वेडेवाकडे वळण घेत ती वीज हलूच शैडोच्या दिशेने येत होती.



त्याच्या मृत देहाआतुन निघणा-या प्रकाश किरणां तुन हलकेच काळ्या रंगाचे धुळीकण बाहेर पडले... प्रथम धुळीकणांपासून जाडजुड पाय तैयार झाले मग हळूच ढोपे, त्यावर मांड्या, ढेरी असलेल पोट, डोक असा शैडोचा आत्मा तिथे अवतरला होता.



ज्याला फ़क्त आणी फ़क्त रघुभट्ट पाहू शकत होता.

कारण तो एक अमानवीय अंश होता -ह्या सृष्टीच्या अतर्कनीय गोष्टी पाहण्याचा त्याला हक्क मिळाला होता.


रघूभट्टने आपल्या कचकड्याच्या फिकट निळ्सर बुभळांनी एक कटाक्ष शैडोवर मग त्याच्या मागे आकाशातून पुढे पुढे येणा-या त्या विजेवर टाकला.





ती निळसर रंगाची विज शैडोच्या आत्म्याला घेऊन जायला आली होती.



ही पुर्णत क्रिया दैवी होती-कारण शैडोच आत्मा त्याने सैतानाकडे गहाण ठेवला नव्हता.



म्हंणुनच देवाने त्याच्या आत्म्याला नेहायला ती पाल्खी पाठवली होती.





" रेंचो..रेंचो...वाचव मला. वाचव मला ! ते बघ ते आले बघ ! मला नेहायला आले बघ , माझ्या आत्म्याचा सौदा करतील आता ते ! मला नरकात घालतील ते , मला सडवतील , माझी आत्मा घान करतील , वाचव मला रेंचो वाचव मला..! "



वेगाने त्या निळसर रंगाची विज शैडोच्या पाठणात घुसली.

" वाचव....वाचव मला...वाचव...रेंचोऽऽऽऽऽ!


एका हळक्याश्या कापसाच्या तुकड्याप्रमाणे शैडोचा आत्मा ती विज घेऊन जाऊ लागली...!



हात पाय हलवत तो आत्मा , सुटकेची धडपड करत होता. वाचवण्यासाठी भीक मागत होता.

पन सृष्टीच्या रचेत्याने बनवलेले नियम होते ! मृत्यु झाला की मानव पुन्हा जिवीत होणे शक्य नाही.



" सुड ऽऽऽऽ रेंचोऽऽऽऽऽऽऽऽ सुड ऽऽऽऽऽ"

शैडोचा खर्जातला तो शेवटचासुड शब्द
हळू हळु लहान होत कायमचा हवेत विरुन गेला...



" न्हायऽऽऽऽऽऽऽऽ! घात ..झाला....घात...झाला..!"
रघूभट्ट गरजला.
त्याचा चिरकस आवाज पुर्णत जंगलात घुमला होता.





×××××××


क्रमशः