एक सैतानी रात्र - भाग 33 jay zom द्वारा भयपट गोष्टी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एक सैतानी रात्र - भाग 33


भाग ३३
कालपाडा जंगल
4:०० am



मध्यरात्रीच्या समयी पोलिसांचा मिशन सुरू होता.
पण पोलिसांना हे ठावूक नव्हत - की समोरच शत्रू कोण आहे!








त्यांना फक्त एवढच ठावूक होत , की रेंचो आणी शैडो ह्या जंगलातच आहेत , त्या दोघांमधला. एकजण तर मेला सुद्धा आहे !

बस्स अजुन एकाच अंत झाल की सुटकेचा श्वास टाकायचं!


पन ते एवढ सोप्प होत का ?

रेंचोने एका सैतानाची विधी पुर्णतपार केली होती.

तब्बल पन्नासवर्षात त्याने शंभर माणसांचे बळी घेतले होते.- खून करण्याची पद्धत , ईतकी निर्दयी होती, की आत्मा चलचल काफत होता..-





रेंचो शैडो- दोन्ही भावंडांनी मिळुन एका पुरातन मृतोक्षवरी नामक (मृत्युवर विजय मिळवलेल्या) सैतानाची विधी केली होती.






त्यात रेंचोने स्वत:चा जिवही दिला होता
परंतु त्या विधित एक चुक घडली होती !
ती काय बर ?



तर या पाहुयात !


आगीने पेटलेत्या , त्या धगधगणा-या हवनकूंडासमोर रेंचो उर्फ रघुभट्टच आत्मा मांडीखालून बसला होता.



त्याच्या डोळ्यांसमोर शैडोच, त्याच्या भावाच म्हड पडल होत.

ए.डब्लु.एम च्या गोळीचा वेग इतका होता - की डोक्याची कपाळावरची पुढची कवटी फुटली होती, गोळी इतक्यावर थांबन अशक्य होत , कारण ए.डब्लु.एम प्रति सेकंद वेग 120चा स्पीड असतो - गोळी शैडोच कपाळ फोडून थेट मागच्या कवटीतून बाहेर झाली होती.

आणी ह्या क्रियेत शैडोच आतला गुलाबी रंगाचा मेंदू, वेगवेगळ्या लाल,निळ्या,पिवळ्या,रंगाच्या गांडूळासारख्या पातळसर नसा, लाल रंगाच रक्त , सगळ काही मिश्रित होऊन बाहेर आल होत...



अर्धी कवटी फुटली होती तर अर्धी ठिक होती-
उजव्या बाजूचा डोळा, नालिकेसहित बुभळांतून बाहेर आला होता..

शैडोच्या प्रेताचा तो एक उर्वरीत निर्जीव डोळा त्याच्याकडेच पाहत होता.

तोंडाचा आ- वसला होता... त्यातून जीभ बाहेर आली होती.


मेलेल प्रेत कस दिसत? तर ते अस !

पेटत्या हवनकूंडातली आग फडफडली-
पेटती आग दोन फुट उंच वर हवेत उडाली-
रेंचो उर्फ रघुभट्ट विस्फारलेल्या नजरेने त्या आगिकडे पाहत होता..


जणू ह्या प्रसंगाची त्याने कल्पना केली नव्हती.
हे अस काही घडेल त्याला माहीती नव्हत.
त्या भडकलेल्या आगीतून खर्जातला घोगरा आवाज बाहेर पडू लागला.

" कोप ....! कोप ...!.... धोका ...! विधी मंडळात स्वत:च्या सहकरम्याची हत्या होऊ देणे ह्या विधीच भाग नाही..- क्रूर कर्महिंत चांडाळा, तू आमचा विश्वास जिंकला होतास.. परंतू सहकरम्याची झालेली हत्या ह्या कृतीने हे रिंगण श्रापीतल गेलंय- हा आवार दुषित झालाय- म्हंणूनच - म्हंणूनच " त्या आगीतून येणारा तो खर्जातला आवाज वाढला - मोठा झाला.


रेंचो उर्फ रघुभट्ट नाही नाही करत डोक हलवत होता.

" नाही..नाही..! हे महामहिम, शांत व्हा ..शांत व्हा....!"
रेंचो उर्फ रघुभट्ट भयप्रद नजरेने त्या आगीकडे पाहत होता.

नक्कीच नक्कीच आता काहीतरी भयंकर घडणार आहे , ह्याची जाणिव रघुभट्टला झाली होती..आणी तसंच झाल.

" मी मृतोक्ष्वरी तुला श्राप देतो " वातावरणातला काळ गोठला , काल्याभोर आकाशात धडाड़ स्फोटकासारखा आवाज होत हिरवट रंगाची विज कडाडली- उभा जंगल , जंगलातली मोठ मोठाली झाडे हिरव्या रंगाने चमकून उठली.

" मी तुला हा श्राप देतो की तू अर्ध मानव आणी अर्धआत्मा म्हंणून जिवन जगशील..! तुला जगण्यासाठी मानवाच मांस ग्रहण कराव लागेल करावंच लागेल..- जर तू मांस ग्रहण केल नाहीस तर तुझा नाईनाट होइल...!"

" नाही....नाही...! हे महामहिम कृपा करा..
असं श्राप देऊ नका..! महामहिम...महामहिम.."
रघूभट्ट ढोप्यांवर बसला..- दोन्ही हात समोर सैतानासमोर पसरवून भिक मागू लागला..

पन नाही ! सैतानच तो, त्याला कसली आली दया माया! हवनकूंडातली उसललेली आग हळू हळू कमी होऊ लागली- पुर्व पदावर आली.

तो सैतान श्राप देऊन निघुन गेला होता.

रेंचो उर्फ रघुभट्टची अठ्ठेचाळीस वर्षांची मेहनत अशीच एका क्षणात वाया गेली होती.

हळू हळू रेंचो उर्फ रघुभट्टला भेटलेली शक्ति कमी पडू लागली..!
त्याच्या पूर्णत पारदर्शक देहावर एक काळ्या रंगाचा पातळसर कपडा तैयार होऊ लागला..

xxxxxxxxx

खैराच्या झाडावर उभा ईगल(42) स्कोपने ते दृष्य पाहत होता..- अचानक हवनकूंडात भडकलेली आग त्याने पाहिली होती- आणि लागलीच त्याने
स्कॉपने तिथे पहायला सुरुवात केली होती..

त्याच्या डोळ्यांसमोर एक अतर्कनिय दृष्य घडतांना त्याला दिसत होत.- हवनकूंडासमोर एक काळसर आकार तैयार होत होता.

हात-पाय, शरीर हळू हळू तिथे एक मानवी आकृतीच अवतरली..

" अनबिलिवीलेबल..!"
ईगलच्या तोंडून आश्चर्यकारक उद्दार बाहेर पडला.
ही घडलेली क्रिया त्याने एकट्यानेच पाहिली होती-

ईगलने पुन्हा स्कॉपमध्ये पाहिल..
हवनकूंडासमोर तो आकार ढोप्यांवर बसला होता.
पूर्णत अंगावर काळसर मैक्सी होती- डोक्यावर त्रिकोणी टोपी होती.- आणि ती त्रिकोणी टोपी खाली झुकली होती.







पाहणा-याला अस वाटेल, की तो माणुस डोक
खाली जमिनीच्या दिशेने खाली झूकवून आहे.

" व्हॉट इज धिस..? व्हू आर यू..? "
ईगल स्वत:शीच म्हंणाला.

पन पुढे जे घडल विलक्षण होत !
त्या आकृतीची मान हलू हलू वर वर येऊ लागली..
पूर्णत वर आली... तिने थेट ईगल कडेच पाहिल..

आणी शेवटी ईगलला दिसल.

त्या त्रिकोणी टोपीत काळभोर अंधार होता..
नाईट कैमरा स्कॉपमधुन सुद्धा त्या चेह-याला पाहता येत नव्हत- तो अंधार जणू त्या त्रिकोणी टोपीत दबा धरून बसला होता.

तोच त्या अंधारात दोन रंगीबेरंगी,
निळसर रंगाचे कचकड्याचे काचेसारखे डोळे लकाकले..- ती नजर उन्हात आरसा चमकावा तशी चमकली..!

झटकन त्या काळसर आकाराने आपला एक हात वर केला..- हात तरी कसल- पंज्याच्या जागी पांढर कंकाळ (हाड) होत.

त्या ध्यानाने जस हात वर केल..ईकडे ईगलच्या छाताडात धडधड़णारा ह्दय कोणीतरी मुठीत पकडल्यासारख आवळल गेल..

ईगलच सर्व शरीर थरथरल..हातातली बंदुक गळून खाली फांदीवर पडली - हे देवा काय होत आहे हे?
काळजात वेदना वाढु लागली ,श्वास बंद झाला , चेहरा घामाजला गेला- काळा, निळा पडला ,

ईकडे त्या ध्यानाने आपल्या हाडांच्या हाताची
मुठ बनवायला सुरवात केली- हळू हळू पाचही बोट मिटू लागली-

ईगलच काळीज छाताडात आवळल जाऊ लागल..- त्याच्या नाका तोंडातून लालसर रक्ताची धार बाहेर येऊ लागली- डोळ्यांतली बुभळे पांढ़री पडू लागली...

ईगलने एक हात छातीवर ठेवला.. -
छाती गच्च दाबली..- होणारी वेदना असहनीय होती.


" काय झाल असेल? ते दोघे भेटले असतील का ? आताच तर पोलिस सुद्धा बंदूक घेऊन गेले ना ? आपण सुद्धा जाऊयात का त्यांच्याबरोबर ?"



सुर्यांश झाडाखाली उभ राहून स्वत:शीच मनोमन बोलत होता -

ईगल वर बेतावलेली परिस्थिती त्याला ठावूक नव्हती- तो त्या गोष्टीपासून पुर्णत अनभिज्ञ होता.

ईगलच फांदीवरून तोळ गेल- बारा फुट उंचीवरून तो थेट खाली कोसळला..

' धप्प ' असा आवाज झाला..

अचानक आलेल्या आवाजाने सुर्यांशची
तंद्री भंग पावली..झटकन त्याने मागे वळून पाहिल..

"एय...!" सुर्यांशच्या तोंडून भयमिश्रित उद्दार बाहेर पडला , सुर्यांश घाईतच ईगल जवळ पोहचला.


खालच्या जमिनीवर झाडांची सुकलेली पाने पडली होती..त्या पानांवर ईगल पाठणावर पड़ला होता..

नाका-तोंडातून आधीच रक्त आल होत...पन वरून पडल्याने आता कानांचे पडदे सुद्धा फाटून कानांतून रक्त बाहेर आल होत.

रक्ताळलेल्या लालसर बुभळांनी तो सुर्यांशकडे पाहत होता . ..ईगलचे ओठ थरथरत होते.. तो सुर्यांशला काहीतरी सांगू इच्छीत होता
सुर्यांश विस्फारलेल्या नजरेने ईगलकडे पाहत होता..

सुर्यांश ने डोक हळूच खाली झुकवल ..
कान ईगलच्या तोंडाजवळ आणल... आणि मग सूर्यांशला तो शब्द ऐकू आला..

" पळ...!"

" पळ..?" सुर्यांशने अस म्हंणतच ईगलकडे पाहिल.

पण ईगलचा चेहरा निर्जीव झाला होता - डोळ्यांत ओळख नव्हती, ईगल मेला होता ..ते एक प्रेत ,मय्यत झाल होत.

काहीवेळा अगोदर जिवंत असलेला माणुस मेला? सुर्यांशने त्याच्याशी संवाद साधल होत..- दहा - वीस मिनिटां अगोदर आपण ज्या मांणसाशी बोललो..
ज्याने आपल्याला हँड गन (बंदूक) दिली तो माणुस मेला ?

नियतीचे हे खेळ किती अनाकलनीय असतात ह्याचा हा एक नमुना होता.

" माय गॉड हा मेला ! पन पन...हा मरण्या अगोदर पळ का म्हंणाला.? "

सुर्यांशच्या चेह-यावर गोंधळ स्पष्टपणे दिसून येत होता.

कसलाच ताळमेळ लागत नव्हता.
घटना अगदी जलद वेगाने घड्त होत्या..
पन ही तर फक्त सुरुवात होती-
आता तर खरा खेळ सुरु झाला होता ना?

क्रमश :

माझ्या प्रिय वाचक दोस्तांनो , पुढील भाग 22

आहे - रक्तपातssssss ........ वाचु शकाल तर वाचा..बर का? कारण ही कथा हिंसक आहे..
ह्दयाचा ठोका चुकला जाईल अस तंतोतंत वर्णन लेखक मित्राने केल आहे...!



चला तर भेटूयात पुढील भागात