एक सैतानी रात्र - भाग 36 jay zom द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एक सैतानी रात्र - भाग 36


भाग ३६

कालपाडा जंगल ...



रेंचो उर्फ रघुभभट्टला फोर्स मेंबर्सने चारही दिशेने घेरा घातला होता.




" हिहिहिहिहिहीहीहीहीहीही"

रघुभट्टच्या तोंडून ते ते हसू आल.- ज्याची कोणीच अपेक्षा केली नव्हती!


रघुभट्टला चारही बाजुनी फोर्स मेंबर्सनी घेरा घातला होता.. - प्रत्येकाच्या हातात एक यू:एम:पी होती .


मिळुन एकून बारा यू:एम:पी त्या हैवानाच्या अंगावर ताणल्या असतांनाही हा हसतोच कसा?




हा प्रश्ण तिथे उप्स्थित सर्वाँना पडला होता.



प्रत्येकाच्या बंदुकी चालताच , एकाच वेळेस तीनशेच्या पुढे गोळ्या त्याच्या अंगावर बरसणार होत्या -


अंगाची , हाडा ,मांसाची, पुर्णत शरीराची बारीक बारीक चाळणीसारखी हाळत होणार होती..आणी हा हसतोय ?


इं:थलाईवांचा क्रोध अनावर झाला.



" शट यू आर माऊथ मxxxफxxर..! "

ते मोठ्याने खेकसले .

गोर गरीब मांणसांचे त्या हैवानांनी घेतलेले जिव त्यांना आठवले..

संताप मेंदूत घुसला..

इं:थलाईवांनी त्यांच्या हातात असलेली यू.एम.पी टू-एक्सकॉपसहित डोळयांसमोर धरली - आणि घशातला आवाज जरासाही न कमी करता, तितक्याच जोरात ओरडले.


" एटैकsssss..फक धिस... बिचssss .!"



तिथे उपस्थीत सर्वाँना जे हव होत ते मिळाल !
कोंन्सटेबल्ज, एस:पी सर्वाँच्या हातात असलेली
यु:एम:पी गरजली.


सर्वाँची ट्रिगरवर असलेली तर्जनी - ह्ळकासा जोर देत पुढे झाली -

आणी काय भयंकर कानठल्या बसवणारा आवाज झाला.


यु:एम:पीच्या काल्याशार नळीच्या जबड्यातून
टोकदार विस्तवासारख्या - तापलेल्या ठिंणग्यांसारख्या गोळया - फटाक्यांच्या हजारो माळा एकाचक्षणी फुटाव्या तसा आवाज करत- बाहेर पडत होत्या.



( ' ठण,ठण,ठण,ठणssssssssssss ')
बंदूकींचा वाजणारा आवाज ईतका मोठा होता.. की जंगलात झाडांवर झोपलेले सर्वच्या सर्व प्रजातीचे पक्षी,


आपल्या घरट्याला सोडून आकाशात
उडाले ,



काळ्याभोर अंधा-या आकाशातून काळेशार टीपक्यांचा थवा नाचत जातांना दिसत होता.

माने साहेब- नेमाडे साहेब दोघांच्याही कानांवर
फायरिंगचा आवाज पडत होता.

दोघेही त्या आवाजाने प्रथम दचकलेच होते.



"माय गॉड..माने साहेब, हा आवाज? एका बंदुकीचा तर वाटत नाही- अस वाटतं, की एकाच वेळेस सर्व फोर्स मेंबर्सनी, हल्ला केलाय- आणी ह्या स्क्रीनवरही तसंच दिसतय ..!"



" नेमाडे साहेब, आता स्क्रीन पाहून जमायचं नाही लवकरात लवकर लोकेशन वर पोहचायला हव,चला लवकर !"



माने साहेबांच्या वाक्यावर - नेमाडे साहेबांनी होकारार्थी मान हळवली आणी दोघेही लोकेशनच्या दिशेने धावले.



बंदुकींचे आवाज सहन न झाल्याने सुर्यांशने आपले दोन्ही हात , आपल्या कानांवर ठेवले होते.



समोरून वेगाने येणा-या गोळ्यांमुळे हवा तैयार होत होती- ज्याकारणाने हवनकूंड केव्हाचंच विझला होता.


आणी त्या काळ्याभोर अंधारात बंदुकीच्या आतून निघणा-या गोळ्या विस्तवासारख्या चमकत होत्या..

आणी त्यांचा वेग रॉकेटच्या आगीसारखा होता.


तब्बल तीस सेकंदात बारा यु:एम:पी बंदूकींमधुन तीनशेच्या पूढे गोळ्या बाहेर पडल्या होत्या..-

फोर्स मेंबर्सच्या पायाखाली गोळ्यांच्या कव्हर्सचा ढिग साचला होता.

बंदुकींचा आवाज थांबला...

तसा ट्रिगर दाबल्याचे आवाज घुमू लागले.


" खट,खट,खट!"

गोळ्या संपल्या होत्या.


" कोणीतरी टॉर्च पेटवा रे ? उजेड करा? मेला का जिवंत आहे , पाहूद्या एकदा साल्याला !"
इं:थलाईवांचा आवाज आला.


तिथे असलेल्या चार पाच हवालदारांनी ,
आप- आपल्या जवळ असलेल्या टॉर्च काढल्या..

आणी स्विच ऑन करत पेटवल्या.


चंदेरी रंगाचा प्रकाश कालोखाला चिरत
पुढे आला.

समोर पडला.


चंदेरी रंगाच्या टॉर्चच्या गोल प्रकाशात रेंचो उर्फ रघुभट्ट मृतासारखा वेड्या- वाकड्या अवस्थेत जमिनिवर तोंडावर पडलेला दिसत होता.

नक्की मेला होता ? की नाटक करत होता?

हवनकूंडाच्या अवती भवती असलेल सामान
खुद्द हवनकूंडा सुद्धा गोळ्यांमुळे फुटल होत-


हवनकूंडाबाजुची लाल,पिवळा,बुक्का असलेली थाळी उडाली होती- त्यातला बुक्का , आ- वासलेल्या तोंडाच्या - विस्फारलेल्या डोळ्यांच्या धडावर पडला होता.


ते बिन धडाच मुंडक - लाल ,पिवळ्या, रंगाने रंगल जात भयान दिसत होत.



' मेला ...मेला हरामखोर..हहहहहहह..!"
इं:थलाईवा विजयी हास्य करत म्हंणाले.

त्यांचा तो स्वर , आणी हसण्याचा आवाज ऐकून , बाकीचे मेंबर्स ही हसू लागले...



फक्त एक हवालदार सोडून ,
त्या हवालदाराच्या चेह-यावर अद्याप भयप्रद भाव होते..-


त्याच्या हातातली बैटरी तो चंदेरी प्रकाश हळु हळू हवनकूंडाच्या डाव्या बाजुला जाऊ लागला....आणी त्याचे डोळेच विस्फारले...


कपाळावरून सर्रकन एका रेषेत घाम येऊन गेला.




कारण तिथे असलेल्या पिठाच्या त्या चार पांढ-या बाहुल्या, जागेवरून गायब झाल्या होत्या.


पुर्णत फोर्स मेंबर्स जल्लोष करत होते.

जो तो स्वत:जवल उभ्या आपल्या सहका-याशी हस्तांदोलन करत होता.. हात मिळवत होता.



त्या सर्वाँनी एक मोठी कामगिरी फत्ते जी केली होती ! केली होती ना ?



इं:थलाईवांनी हसतच एक कटाक्ष त्या हेड कोंन्सटेबल हवालदार वर टाकला, जो हाती बैटरी घेऊन हवनकूंडाकडे भ्यायलेल्या नजरेने पाहत होता.

ती भीती ह्या आनंदाच्या क्षणाला
सुतक लावून जात होती.. - इं: थलाईवांच सुद्धा चेह-यावरच हसू ओसरल...


त्या हवालदाराने हळुच मान वर केली..
इं:थलाइंवाकडे पाहिल.





दोघांची नजरानजर झाली आणि त्या हवालदाराने डोक नाही नाही करत हलवल..



मंद गतीने झाडांच्या पानांमधुन सप सप आवाज करत, एक टोकदार पातीचा बाण वेगाने वाट काढत पुढे आला..

आणी इं:थलाइवांच्या डोक्याच्या मागच्या कवटीतून अलगद घुसून पुढे जात -ती धार धार रक्ताळलेली पात कपाळातून बाहेर आली..


" धप्प " आवाज करत त्यांच मय्यत खाली जमिनीवर पडल...

क्रमश :


ते चौघे आले बर का ?

कोण महितीये का बर ?

पुढच्या भागात समजेल कोण आहेत ते !



.