एक सैतानी रात्र - भाग 39 jay zom द्वारा भयपट गोष्टी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एक सैतानी रात्र - भाग 39

भाग ३९


रक्तपात 5


टीप : सदर कथा हिंसक आहे ! कथेत पात्रांच्या हत्येच वर्णन अगदी तंतोतंत वर्तवल आहे ! ह्दयचा त्रास असणारे , किंवा गरोदर स्त्रियांनी कृपया ही कथा वाचु नये ! कथेत आवश्यकता असल्याने अंधश्रद्धेच वापर केल गेल आहे - पण लेखकाच समाज्यात
अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही !
आपला प्रिय लेख मित्र अंधश्रद्धेला मुळीच खतपाणी घालत नाही !


सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्व काही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी

फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत🙏

ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल!


सदर कथेचे सर्व हक्क लेखकाकडे अगदी सुखरुप आहेत - कथा कॉपी पास्ट करुन आपल्या नावे
खपवून घेणा-या चोरांवर दया दाखवली जाणार नाही !
त्यांवए ऑनलाईन कारवाई केली जाईल.

कथा सुरु
×××××××××××

वेळ मध्यरात्र 5:25 AM.


फोर्स मेंबर्सनी रेंचोचा काटा काढला होता.
त्याच कलेवर जमिनिवर वेड्या वाकड्या अवस्थेत पोटावर पालथ पडल होत .

गोळ्यांच्या वारांनी त्या हैवानाच्या अर्ध मानवी भागांवर असलेल्या मांसात गोळ्या शिरल्या होत्या.

जखमेतून लाल रक्त येण्याऐवजी कालसर रक्त बाहेर आल होत -

पालथ्या अवस्थेत पोटाखालून ते कालसर काळशार रक्त बाहेर आलेल दिसत होत.



कालपाडा गावात ज्या सैतानांनी खूनांचा थैमान घातला होता .

कित्येक निष्पाप लोकांची अमानूषपणे हत्या केली होती.

त्या हैवानांचा खात्मा झाला होता , हा विचार करून ईं: थलाईवांना किती आनंद झाला होता !


( काही तासांअगोदर )
शहरात मृतांचे आकडे कित्येकतरी पटीने वाढत चालले होते .

ई:थलाईवा ज्या ज्या घटना स्थळावर जायचे
तिथे त्या मृतांच्या नातेवाईकांची ती पाणावळेली नजर , थलाईवांना त्या नजरेला नजर भिडवायला लाज वाटत होती !

आपण पोलिस असूनही काहीच करू शकत नाही , हा विचार त्यांना मनातून खात सुटला होता.

ह्या दोन्ही हैवानांच्या हातून एकावर एक मूडदे पडत होते.

पोलिस यंत्रणा हतबल झाली होती.
वरून प्रेशरवर प्रेशर येत होत.- विचार करून करून डोक्याचा भुगा झाला होता.

ई: थलाईवा स्टेशनमध्ये आपल्या टेबलावर बसलेले , तोच
माने साहेबांचा कॉल आला.

" त्या दोन्ही हैवानांचा पत्ता लागला आहे , शुट हिमची ऑर्डर आहे - तुम्ही फोर्समध्ये सामील व्हाल का ?" माने साहेबांचा आवाज आला होता.

ई:थलाईवांना त्या दोघां मुळे सिनियर्सनी
जाम फटकारल होत - त्यांना ह्या दोघांचा खुपच राग आला होता आणी शेवटला सरकारकडून ह्या दोन्ही सायकोंची शुट हिमची ऑर्डर मिळाली होती.

ई:थलाईवांना आयतीच संधी मिळाली होती.
आपल्या डीपार्टमेंटमधले काही मेंबर्स घेऊन ते जंगलात पोहचले..

मग ईगलचा कॉल आला - त्यांच प्लान झाल.. इं:थलाईवांनी रेंचोला आपल्या फोर्स मार्फत गोल घेरा घातला होता.

आधीच त्या नराधमांवर त्यांची पार सटकली होती...

त्यात रेंचोच ते उद्धट बोलण विक्षिप्त हसण, त्यांच्या डोक्याला शॉट लावून गेल..

" शुट हिम फक धिस बिच!" म्हंणत त्यांनी
फायरींगची ऑर्डर सोडली.

चारही बाजुंनी एकाचक्षणाला गोळ्यांचा वर्षाव झाला , रेंचोच प्रेत जमिनीवर पालथ पडलेल पाहून
इं:थलाईवांच काळीज कस थंड झाल होत -

डोक्यावरून कोणीतरी शंभर - दोनशे किलोच
वजन हटवल आणी हलक - हलक वाटतं तसंच काहीस त्यांना वाटत होत.

ते ख-या अर्थाने आता आपल्या सिनियर्स समोर पुन्हा ताठ मानेने उभ राहू शकणार होते , मृतांच्या नातेवाईकांना , मिडीयावाल्यांना नजरा नजर देऊ शकत होते.

बारा फोर्स मेंबर्स मधोमध आनंदाच स्फोट झाल होत.- सर्वजन आंनद साजरा करत होते...

आप-आपल्या सह्का-याशी हात मिळवत होते.

आणी तोच तोच घात झाला...


तिथे उपस्थीत मेंबर्स मधल्या कोणीही हा विचार सुद्धा केला नव्हता की अस काही घडेल ?

अंधारात लपलेले ते चार जण, ज्या चार जणांची ह्या बारा जणांना खबर नव्हती... !


ते अंधारात लपुन शिकारीला निघाले होते..
अंधारात शिकार करायला आले होते.



एक मानवी घा-या रंगाचा बुभळ, त्यात एक गोळसर काळा टिपका असा एक उघडा डोळा दिसत होता.

हळू हळू कैमरा मागे मागे येऊ लागला ..
त्या मांणसांचा चेहरा दिसला...-

ते इं:थलाईवा होते , माफ करा कै:इं:थलाईवा

त्यांच प्रेत जमिनीवर पडल होत.- (आणी ही सर्व त्यांची मागची आठवण होती)

इं:थलाईवांच प्रेत, मय्यत , रेंचोसारख पालथ पोटावर पडल होत.-

प्रेताच डोक उजव्या दिशेला वळल होत - आपल्या सर्वाँकडे उघड्या डोळ्यांनी पाहत होत..

त्या प्रेताच्या कपाळातून बाणाची कर्सरसारखी
लोखंडी पात बाहेर आलेली दिसत होती.

डोक्यातल्या मेंदूला जोडल्या गेलेल्या नसा केबल कनेक्शनसारख्या तोडल्या गेल्या होत्या, पुर्णत सिस्टीम छाटले गेले होते
आणी त्याचा नतीजा म्हंणजे ही मौत !




इं: थलाईवांच म्हढ पडताच .

एका हवालदाराच्या तोंडातून हाक बाहेर पडली होती-

" सरsss.!." आवाज मोठा होता.


आलेल्या आवाजाने क्षणार्धात तिथे शांतता पसरली . सर्वांच्या नजरा इं:थलाईवांच्या प्रेतावर खिळल्या कोणी काही हालचाल करणार , तोच सेकंदाच्या गणीक अजुन एक बाण आला-

त्या हवालदाराच्या उघड्या जबड्यातून थेट आत घुसला , जिभेला फाडत , गळ्यातून आरपार झाला ..
थेट मानेच्या मणक्यात अटकला...

विस्फारलेल्या पांढरट नजरेने तो हवालदार
आपल्या उर्वरीत साथीदारांकडे पाहत होता.

गळ्यात माश्याचा काटा अडकल्यावर कशी वेदना होते? ईथे तर त्या हवालदाराच्या उघड्या जबड्यातून
थेट लोखंडी पातीचा धार धार बाण आत शिरला होता..! वेदनेचा उच्चांक किती असेल , हे तुम्हीच ठरवा..?

त्या हवालदाराच नाव होत रामू , ते हेड कोंन्सटेबल होते.

" अंमम्म...अंम्मम्म!"

रामुंच्या तोंडात बाण अडकून बसला होता..
जागेवर उभ राहून , ते विस्फारलेल्या डोळ्यांनीच आपल्या साथीदारांकडे पाहत होते.

अवतीभवती काळाकुट्ट अंधार पसरला होता. ज्या काही तीन- चार जनांकडे उजेड म्हंणून टॉर्च होती.. तेवढच काय तो प्रकाश होता !

आणी प्रकाशाला ते चार जण घाबरत होते - नाहीतर अंधार असता ? तर केव्हाचंच ह्या सर्वाँचे मय्यत जमिनीवर झोपलेले असते...



पन प्रकाशाला ते जिव, ध्यान,हैवान घाबरत होते.

ते सर्व फोर्स मेंबर्स गोळ गराडा करून उभे राहिले होते..



ज्यांच्या हाती टॉर्च होती...

तो टॉर्चचा पिवळा गोलसर प्रकाश चौहीदिशेना फिरवत होता.

पिवळसर प्रकाशाचा गोळसर गोळा मोठ मोठाल्या झाडांच्या फांद्यांवरून , पानांवरून, छाती इतक्या झाडझुडपांवरून वेगाने जागा बदल्ली जात पडत होता.!

पण नजरेला काहीच दिसून येत नव्हत !
पन मनाला अवतीभवती अंधारात काहीतरी नजरे आडून हालचाल करतय असा क्षणोक्षणी भास होत होता..

आणी ते सत्य होत ना ?


हा भास - आभासाचा खेळ सुरु झाला होता.



" एका जागी रहा एका जागी ..रहा..!"
कोणीतरी म्हंणाल.

आणि तोच अंधारातून पुन्हा एकदा हवेला चिरत सुई..सुई.. आवाज करत एक बाण आला, ..

रामू हवालदारांच्या उजव्या डोळ्यांत पातळसर बुभळाला फाडत आत घुसला..-

फुगा फुटाव तस रक्ताचा झिलवा फुटला,बाणाची
पात न थांबता डोळ्यांतली नसा फाडत, थेट मेंदूला चिरत मागच्या कवटीतून बाहेर आली..


" धपप्प!" आवाज झाला.
रामूच निर्जीव म्हढ जामिनदोस्त झाल.

दुसरा मय्यत पडला होता !

रामूच प्रेत डोक्यावर पडल होत - आणी स्टेंन्ड़ सारखी ती कर्सरची पात जमिनिवर उभी होती-


आणी ते प्रेत पाठीपर्यंत वर उचल्लेल होत..
कर्सरसारखी दिसणारी ती लोखंडी पात ,पातीतून डोक्यातल आतील रक्त घळा घळा बाहेर येत जामिन भिजली होती..



जमिनिवर रक्ताचा चिखल तैयार झाला होता..



क्रमश :

😈😈😈😈😈....

वाचा पन रिस्कवर